Home Blog Page 147

Sony SAB to launch Maddam Sir!

Get ready for a rollercoaster ride filled with a rush of emotions as one of India’s most loved Hindi GEC channel Sony SAB is all set to offer their fans a fresh new comedy Maddam Sir. The show with an apt tagline ‘Kuch Baat hai, kyunki jazbaat hai’ is a fresh take on the current social issues through the eyes of four dynamic police officers who will set the audience’s hearts on fire with their unique set of qualities that distinguish them from each other.

Based on Lucknow, four female police officers will take up all the challenges they will be facing while looking to resolve them in their uniquely distinct style. Caution – too much awesomeness is on your way with a talented list of star cast featuring Gulki Joshi (Haseena Mallik), Yukti Kapoor (Karishma Singh), Bhavika Sharma (Santosh Sharma), Sonali Naik (Pushpa Singh) along with Gaurav Wadwa as a reporter who will blow your mind away with some hard-hitting performances and yes an eye-opening message.

Madam Sir is a quality addition to an existing line-up of some light-hearted values-driven content on Sony SAB – which also is in-line with our philosophy of spreading ‘Khushiyon Wali Feeling’.

Mobil strengthens its presence on Amazon.in and Flipkart

Mobil, the popular lubricant brand, has made its best in class products available on India’s largest online stores- Amazon.in and Flipkart.

In recent times, online shopping has gained a lot of popularity in India as customers look for more choices and greater convenience. With the aim of catering to such digitally savvy customers, Mobil has made its top-selling range of motorcycle and car engine oils reachable and available for customers right at their fingertips. The range also includes Mobil 1 – one of the global market-leading synthetic engine oils.

Speaking on these collaborations, Rupinder Paintal, Director, Market Development– India, ExxonMobil Lubricants Pvt. Ltd., said, “Customer experience is of paramount importance to us and we are ready to take this experience up to another notch with the launch on India’s leading e-commerce platforms. Now our customers can buy the best engine oils for their vehicles from the comfort of their homes with just a few clicks. We believe Amazon.in and Flipkart are great selling platforms for us as they reach customers across India- thereby making Mobil’s products nationwide accessible.”

The available range of products can be looked on Amazon.in and Flipkart.

Classic Legends unveils the Jawa Perak in Nagpur

Jawa-Perak-in-Nagpur

Nagpur: Classic Legends Pvt. Ltd. unveiled the stunning new Jawa Perak. The Jawa Perak was officially launched on November 15th 2019 and the bookings for this factory-custom bobber motorcycle has started on January 1st. The motorcycle is priced at INR 195500, ex-showroom Nagpur.

Speaking about the new motorcycle, Ashish Singh Joshi, CEO, Classic Legends Pvt. Ltd. said, “The Jawa Perak invokes an emotion never witnessed in India’s motorcycling scenario. The Perak is India’s first factory custom, and its distinctive styling, bobber stance and dark theme make it stand out in a crowd. What also sets it apart is the powerful engine packed with modern technology that gives it the performance to match its ‘stealth-inspired’ looks.”

The motorcycle is available for display, test rides and booking at the following Jawa dealership:

  • SHREE KUSHAL MOTOR– Plot No: 37, Gandhi Grain Market, Telephone Exchange Square, CA Road, Nagpur – 440008

Interested customers can also book the Jawa Perak online at:

https://www.jawamotorcycles.com/motorcycles/jawa-perak/book-your-perak/

The booking amount for the Perak is INR 10,000 and deliveries will commence from April 2nd 2020.

To add convenience for the buyers, the company is also providing attractive finance schemes* and an industry-first exchange program* that offers the customer a higher valuation by up to INR 5000 compared to any other exchange scheme in the market.

 Jawa Perak a distinctive Bobber embodying the spirit of Stealth, Vigilante and Dark in a factory custom avatar. Power comes through a 334cc liquid-cooled, single-cylinder, four-stroke, DOHC engine, producing 30 bhp of power and 31 Nm of torque, breathing out through signature twin Jawa exhausts chopped for the authentic bobber stance. All this power is put to the tarmac via a 6-speed transmission with ratios optimized to offer a great riding experience through the gears.

Housed in a completely reworked chassis with an all-new swingarm, engineered to offer the optimum transverse, longitudinal, torsional rigidity. Frame and swingarm stiffness have been tuned for a linear feel, aiding stability over straights and poise along winding roads. This plays a significant role in improving the handling.

The Perak is a motorcycle reminiscing the past, yet far ahead of its time. Designed and developed as a factory custom embodying the spirit of ‘Stealth, Vigilante and Dark’, the Jawa Perak will be BSVI compliant when the delivery starts in April 2020. The Perak is a true bobber in spirit and form. The ‘bobbed’ fenders, chopped exhaust and a floating seat make it the quintessential bobber.

*Conditions Apply.

खाऊ गल्ली २६ जानेवारीपासून नागरिकांच्या सेवेत

गांधीसागर तलावाजवळील खाऊ गल्ली

नागपूरकेंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ९ जानेवारी रोजी शुभारंभ झालेली गांधीसागर तलावाजवळील खाऊ गल्ली २६ जानेवारीपासून नागरिकांच्या सेवेत खुली होणार आहे.

खाऊ गल्लीमध्ये ३२ स्टॉल्स असून निविदाधारकांना ईश्वरचिठ्ठीद्वारे त्याचे वाटप करण्यात आले आहे. खवय्यांना विविध प्रकारचे खाद्यपदार्थ येथे मिळणार आहेत. खाऊ गल्लीतील स्टॉलधारकांना सामान ठेवण्यासाठी सोयीचे व्हावे यासाठी शटर लावण्याचे कार्य, काऊंटरचे कार्य आणि एकाच प्रकारचे फलक तयार करण्यासाठी अवधी लागणार आहे. नागपूर महानगरपालिकेतर्फे वॉश बेसीन, पिण्याचे पाणी आणि प्रत्येक स्टॉल धारकाला स्वतंत्र वीज मीटर देण्यात येणार आहे. सांड पाण्याची व्यवस्था व स्टॉलच्या मागील भागात रोज लागणारे जड सामान ठेवण्याकरिता दोन पायऱ्या तोडून शटर लावण्यात येणार आहे. जेणेकरून त्यांचे सामान सुरक्षित राहील. या कामासाठी १५ ते २० दिवसांचा अवधी लागणार असून २६ जानेवारी रोजी खाऊ गल्ली खवय्यांच्या सेवेत रुजू होईल. अशी माहिती उदयान अधीक्षक अमोल चौरपगार यांनी दिली आहे.

निर्भया प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, दोषींची क्युरेटिव्ह याचिका फेटाळली

नवी दिल्ली : निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील आरोपी विनय कुमार शर्मा आणि मुकेश सिंग यांनी दाखल केलेली क्युरेटिव्ह अर्थात फेरविचार याचिका कोर्टाकडून फेटाळण्यात आली आहे. सर्वोच्च न्यायालयाने हा सगळ्यात महत्त्वाचा निर्णय दिला आहे. निर्भयावर सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही नराधमांच्या फाशीचा ‘मुहूर्त’ ठरला आहे. 22 जानेवारीला सकाळी 7 वाजता तिहार तुरुंगात या चौघांना फासावर लटकावले जाईल, असा आदेश पतियाळा हाऊस कोर्टाने मंगळवारी दिले. दोषी मुकेश, विनय, पवन आणि अक्षयविरुद्ध डेथ वॉरंट बजावले आहेत.

पहिली क्युरेटिव्ह अर्थात फेरविचार याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली होती. अॅड. ए.पी.सिंह यांच्यामार्फत नराधम विनय शर्मा याने क्युरेटिव्ह याचिका दाखल केली होती. मुकेश व विनयचे वकील ए. पी. सिंह यांनी आपण सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह याचिका दाखल केल्याचं माध्यामांना सांगितले होते.

दुसरीकडे, तिहार तुरुंग प्रशासनाने उत्तर प्रदेश सरकारला पत्र पाठवून मेरठहून जल्लाद मागवला आहे. सन 2012 मध्ये 16 डिसेंबरच्या रात्री धावत्या बसमध्ये सहा जणांनी पॅरामेडिकलच्या विद्यार्थिनीवर बलात्कार केला होता. 29 डिसेंबरला तिचा मृत्यू झाला. सहापैकी एक अल्पवयीन असल्याने तो तीन वर्षांनंतर सुटला.

एक दोषी रामसिंह याने तुरुंगात आत्महत्या केली होती. आरोपी अक्षय याने 16 डिसेंबर 2012 रोजी निर्भयावर धावत्या बसमध्ये बलात्कार करून तिला मारहाणही केली होती. पवन यानेही निर्भयावर बलात्कार करून तिच्या मित्राला बेदम मारहाण केली होती. मुकेश ही बस चालवत होता. त्यानेही निर्भयासोबत कुकृत्य केले होते. विनय याने निर्भयाचा छळ, बलात्कार, नंतर तिला बसबाहेर फेकले होते.

राष्ट्रसंत से राष्ट्रपिता संकल्पयात्रा आजपासून

नागपूर- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांनी ग्रामविकास, ग्रामोद्धार आणि स्वावलंबनाचा मूलमंत्र समाजाला दिला. तर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी स्वच्छता, स्वदेशी आणि गावातून विकासाचा मंत्र देत विदर्भाच्या भूमीतून स्वराज्याच्या अहिंसक यज्ञाला सुरुवात केली. या दोन्ही महापुरुषांनी विदर्भाच्या भूमीतून मांडलेले विचार आजही समकालीन वाटतात. हाच विचारधागा केंद्रस्थानी ठेवून आज, मंगळवारपासून ‘राष्ट्रसंत ते राष्ट्रपिता’ अशी संकल्प यात्रा काढली जाणार आहे.

महात्मा गांधी यांच्या १५०व्या जयंतीनिमित्त राष्ट्रपित्याला अभिवादन करण्यासाठी गुरुकुंज मोझरी येथून या संकल्पयात्रेला सुरुवात होईल. १९ जानेवारीपर्यंत पाच दिवस निघणाऱ्या या पदयात्रेला मंगळवारी दुपारी १२ वाजता सुरुवात होईल. यावेळी केंद्रीय मंत्री मनसुखभाई मांडविया, अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर प्रामुख्याने उपस्थित राहणार आहेत.

खासदार डॉ. विकास महात्मे यांच्या संकल्पनेतून निघणाऱ्या या यात्रेत गावा-गावांत स्वच्छता, प्लास्टिक कचऱ्यापासून साहित्य बनविण्याचे प्रात्यक्षिक दाखविले जाणार आहेत. सोबतच जोडधंद्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याच्या विविध पर्यायांवर चिंतनही केले जाणार आहे. ही पदयात्रा एकूण १८ गावांमधून मार्गक्रमण करेल. यात यामध्ये स्थानिक ग्रामस्त सामाजिक कार्यकर्ते, विद्यार्थी, लोक प्रतिनिधी, इत्यादींचा सहभाग असेल. रात्री गावातील विश्रामस्थळी शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्याविषयी चिंतन सत्र, स्वच्छता, वृक्षारोपण, पर्यावरण संरक्षण, जलसंधारण, सिंगल वापर प्लास्टिकबंदी, अंधश्रद्धा आणि नशामुक्ती आदींवर आवाहन केले जाईल. गावातून श्रमदान, प्रभात फेरी यामधूनसुद्धा उपरोक्त संदेश दिले जातील. महात्मा गांधी, संत गाडगे बाबा, राष्ट्रसंत तुकडोजी यांच्या मौलिक विचारांचा प्रचार करण्यात येईल.

गांधीजींच्या निवासाने पावन झालेल्या सेवाग्राम येथे ही पदयात्रा विसर्जित होईल. ही पदयात्रा पाच दिवस, चार रात्री वाटचाल करणार आहे. केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी, अभिनेत्री अलका कुबल, वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार, खासदार रामदास तडस समारोपीय कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत.

महात्मा गांधींनी देशाला जीवनमूल्ये दिली. सत्य अहिंसेचा मार्ग शिकविला; सहिष्णुता शिकविली आणि सोबतच स्वच्छतेचा मंत्रही दिला जो आजही संयुक्तिक आहे. तर तुकडोजी महाराजांनी ग्रामोद्धाराचा मूलमंत्र दिला. या दोन्ही महापुरुषांच्या मूल्यांची जपणूक आणि संवर्धन करतानाच आपल्यालाही आपल्या अंगी ही मूल्ये रुजविता यावीत म्हणून ही पदयात्रा, निघणार आहे, असे खासदार डॉ. महात्मे यांनी साधलेल्या संवादात नमूद केले.

घ्या, आता साखर महागली!

नागपूर- भाजीपाल्यांची दरवाढ थांबत नाही तोच आता साखर महागली आहे. गेल्या काही महिन्यांपासून सुरू असलेल्या वेगवेगळ्या वस्तूंच्या दरवाढीचे शुक्लकाष्ठ काही संपलेले नाही. त्यामुळे ग्राहकराजा पुरता चिंतेत असून, अचानकपणे झालेल्या साखरेच्या दरातील वाढ सणासुदीचा काळ कटू करणार की काय, असा सवाल उपस्थित झाला आहे.

मकरसंक्रांतीचा सण तोंडावर आहे. या काळात गूळ, साखरेचा उपयोग मोठ्या प्रमाणात होतो. तीळगूळ बनविण्यासाठी मुख्यत्वे गुळाचा वापर होतो. मात्र, तिळाचे इतर पदार्थ वा हलव्याच्या दागिन्यांमध्ये साखरेचा उपयोग करण्यात येतो. या पार्श्वभूमीवर साखरेचे दर प्रतिक्विंटल शंभर रुपयांनी वाढले आहेत. ठोक बाजारातील साखरेची आवक कमी झाल्याचे कारण यामागे सांगण्यात येत आहे. व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, यंदा साखरेचे उत्पादन अपेक्षेपेक्षा तीस टक्क्यांनी कमी झाले आहे. परिणामत: बाजारपेठांमध्ये साखरेची आवक रोडावली आहे. ठोक बाजाराप्रमाणेच किरकोळमध्येही साखरेची आवक घटली आहे. किरकोळ बाजाराचा विचार करता साखरेच्या दरात प्रतिकिलो एक रुपयाने वाढ झाली आहे. यामध्ये येत्या काही दिवसांत दोन ते तीन रुपयांची वाढ होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

सोनपापडीमुळे विक्री अधिक

नागपूर आणि सोनपापडी हे समीकरण जुने आहे. शहरातील सोनपापडी संपूर्ण देशभर विकली जाते. सोनपापडीचे कारखाने मोठ्या संख्येने आहेत. त्यामुळे साखरेची विक्री उपराजधानीत अधिक दिसून येते. वाढलेल्या दराचा परिणाम सोनपापडी व्यवसायावरदेखील होणार आहे. प्राप्त माहितीनुसार, सोनपापडी व्यवसायामुळे दिवसाकाठी पन्नास ट्रक साखरची विक्री शहरात होते. इतक्या मोठ्या प्रमाणात साखर खरेदी करणारे नागपूर मध्य भारतातील एकमेव शहर आहे. साखरेच्या वाढलेल्या दरामुळे सोनपापडीसुद्धा महागणार आहे.

वर्षभरात तिसऱ्यांदा वाढ

साखरेच्या दरामध्ये वर्षभरात तिसऱ्यांदा वाढ झाली आहे. यापूर्वी सप्टेंबर २०१९ मध्ये पितृपक्षात साखर दोन रुपयांनी महागली होती. त्यापूर्वी पुरामुळे ऑगस्ट महिन्यात साखरेचे दर वाढले. त्यानंतर आता नववर्षाच्या पहिल्याच महिन्यात दरवाढ झाली आहे. दोन दिवसांपूर्वी ज्या प्रतीच्या साखरेचे दर प्रतिक्विंटल ३४५० ते ३५०० रुपये होते. ते आता ३५५० ते ३६०० रुपये झाले आहेत. अन्य एका चांगल्या प्रतीच्या साखरेचे दर ३५५० ते ३६०० वरून ३६५० ते ३७०० रुपयांवर गेले आहेत.

आई-बाबा, लागा स्वच्छतेच्या कामाला!

नागपूर

नागपूर- ‘खूबसुरत होगा नागपुर हर छोर, क्यूं की मम्मी-पापा जो मिल रहे हैं सफाई करने के लिए चारो ओर’, ‘आओ मिल कर सबको जगाएं, गंदगी को स्वच्छता से दूर भगाएं’, ‘कदम से कदम और हाथ में हाथ मिलाना हैं, नागपुर को सब से श्रेष्ठ और सुंदर बनाना है’, ‘उरलेले अन्न जमा करीन डब्यात, कचऱ्याची गाडी आली टाकीन हिरव्या डब्यात’, ‘आई-बाबा सांगत्ये मी तुम्हाला, लागा तुम्ही स्वच्छतेच्या कामाला’ अशा एकापेक्षा एक घोषवाक्यांची निर्मिती नागपूर शहरामधील शाळांतील विद्यार्थ्यांनी करून आपल्यातील कल्पकतेचा आणि जागरुकतेचा परिचय करून दिला.

मनपा, शालेय शिक्षण विभाग आणि पोलिस वाहतूक विभागाच्यावतीने आयोजित ‘मम्मी पापा यू टू’ अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. यानिमित्ताने १३ ते १९ जानेवारीदरम्यान राबविण्यात येत असलेल्या अभियानाच्या पहिल्या दिवशी शहरातील विद्यार्थ्यांसाठी घोषवाक्य स्पर्धा घेण्यात आली. यात मनपा संचालित शाळांसह एकूण ९२६ शाळांतील एक लाख १५ हजार ५३६ विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदवित एकापेक्षा एक सरस घोषवाक्यांची निर्मिती केली. हीच घोषवाक्ये घेऊन शहरातील सर्व शाळांतील विद्यार्थी शुक्रवार, १७ जानेवारी रोजी सकाळी ८.३० वाजता मानवी साखळी तयार करणार आहेत. घोषवाक्यांच्या घोषणा देत स्वच्छतेविषयी आणि वाहतूक नियम पाळण्यासंदर्भात जनजागृती करणार आहेत. सोमवारी झालेली घोषवाक्य स्पर्धा शाळास्तरावर दोन गटांत घेण्यात आली. यामध्ये ५ ते ८ एक गट आणि ९ ते १२ वी दुसऱ्या गटाचा समावेश आहे.

या स्पर्धेतून प्रत्येक शाळेतील एक उत्कृष्ट घोषवाक्य निवडण्यात येईल. यानंतर ३० केंद्रावरून केंद्रस्तरावर प्रत्येकी एका केंद्रातून एक अशी ३० घोषवाक्ये निवडण्यात येतील. त्यातून उत्कृष्ट तीन आणि दहा उत्तेजनार्थ बक्षिसांसाठी घोषवाक्यांची निवड महापालिकास्तरावर करण्यात येणार आहे. घोषवाक्य स्पर्धेसाठी प्रथम ११ हजार रुपये, द्वितीय पाच हजार रुपये तर तृतीय तीन हजार रुपयांचे पारितोषिक देण्यात येईल. प्रत्येकी एक हजार रुपयांचे दहा उत्तेजनार्थ पारितोषिकही देण्यात येईल. आज पार पडलेल्या स्पर्धेमध्ये विद्यार्थ्यांचा उत्साह दांडगा होता. शिक्षकांनीही यासाठी परिश्रम घेत प्रत्येक विद्यार्थ्यांना सहभागी करवून घेतले. शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर यांच्या मार्गदर्शनात आणि मुख्याध्यापकांच्या नेतृत्वात प्रत्येक शाळांतील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी स्पधेच्या यशस्वितेसाठी परिश्रम घेतले.

महापौर, आयुक्तांकडून कौतुक

एखाद्या चांगल्या उद्देशासाठी नागपूर शहरातील सर्वच शाळांतील विद्यार्थ्यांनी इतक्या मोठ्या प्रमाणावर स्पर्धेत सहभागी होण्याची ही पहिलीच वेळ आहे. ‘मम्मी पापा यू टू’ अभियानाच्या निमित्ताने मुख्याध्यापक, शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी पहिल्याच स्पर्धेला दिलेल्या प्रतिसादाबद्दल महापौर संदीप जोशी आणि आयुक्त अभिजित बांगर यांनी सर्वांचे अभिनंदन करीत कौतुक केले आहे. अभियानात आयोजित सर्वच स्पर्धांमध्ये असाच प्रतिसाद देत नागपूर शहराला स्वच्छ आणि सुंदर करण्यात हातभार लावावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

आज पथनाट्य स्पर्धा

‘मम्मी पापा यू टू’ अभियानांतर्गत आज, मंगळवारी पथनाट्य स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. ही स्पर्धा प्रथम शाळास्तरावर होईल. यातून केंद्रस्तरावर उत्कृष्ट पथनाट्यांची निवड करून पाठविण्यात येईल. त्यातून उत्कृष्ट पथनाट्यांची निवड शाळास्तरावर करण्यात येईल, अशी माहिती शिक्षणाधिकारी प्रीती मिश्रीकोटकर यांनी दिली.

Tanhaji & Chhapaak Box Office Collection : अजयच्या ‘तानाजी’ने दीपिकाच्या ‘छपाक’ला दिला धोबीपछाड! तीन दिवसांत तिप्पट कमाई

मुंबई : अजय देवगण (Ajay Devgn) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) यांची प्रमुख भुमिका असलेल्या ‘तानाजी: द अनसंग वॉरियर’(Tanhaji: The Unsung Warrior) ने विकेंडमध्ये धमाकेदार प्रदर्शन केले आहे. या सिनेमानं पहिल्या आणि दुसऱ्या दिवशीच्या तुलनेत शनिवारी आणि रविवारी जास्त कमाई केली. तानाजीनं रविवारी 25 ते 26 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळं तीन दिवसांत तानाजीची कमाई ही 61.75 कोटी झाली आहे. तर, त्याच दिवशी प्रदर्शित झालेल्या दीपिकाच्या छपाकनं रविवारी 7 ते 7.50 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळं या सिनेमाची तीन दिवसांची कमाई 18.67 कोटी झाली आहे.

बॉक्स ऑफिस इंडिया डॉट कॉम वेबसाइटनं दिलेल्या माहितीनुसार अजय देवगणच्या या सिनेमानं पंजाब, नवी दिल्ली, उत्तर प्रदेशमध्ये जास्त कमाई केली आहे. या सिनेमाला जवळजवळ 4 हजार स्क्रिन्सवर रिलीज करण्यात आला होता. तर, दीपिका पदुकोणच्या सिनेमाने पहिल्या दिवशी 4.77 कोटी कमाई केली होती. तर, दुसऱ्या दिवशी 30-40% जास्त कमाई केली होती. त्यामुळं शनिवारी आणि रविवारी छपाकनं जवळ जवळ 35 कोटींचा गल्ला जमवला आहे.

दीपिका पादुकोणच्या ‘छपाक’ चे बजेट सुमारे 35 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. ‘छापाक’ ची कथा मालती म्हणजेच अ‍ॅसिड हल्ला पीडिता लक्ष्मी अग्रवालच्या हिच्या जीवनावर आधारित आहे. दरम्यान, या सिनेमा प्रदर्शित होण्याआधी अनेक वादात सापडला होता. तर, तानाजी हा सिनेमा तान्हाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित आहे. छपाक हा सिनेमात वादात सापडल्याचा फायदाही तानाजीला झाला.

छपाक सिनेमाची कहानी आधारित असलेल्या अ‍ॅसिड हल्ला पीडित लक्ष्मी अग्रवाल यांच्यात वकील अपर्णा भट्ट यांनी श्रेय न दिल्याप्रकरणी याचिका दाखल केली होती. आता दिल्ली हाय कोर्टानं वकील अपर्णा भट्ट यांना श्रेय देण्याच्या प्रकरणात फॉक्स स्टुडिओची याचिका फेटाळून लावली आहे. या याचिकेवर सुनावणी करताना दिल्ली उच्च न्यायालयाने पटियाला हाऊस कोर्टाच्या निर्णयाला न्याय्य ठरविले आहे. मुळे हाय कोर्टाच्या निर्णयानंतर चित्रपट निर्मात्याला आता वकील अपर्णा भट्ट यांना श्रेय द्यावे लागणार आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे की अपर्णा भट्ट यांना श्रेय न दिल्यास 15 जानेवारीपासून चित्रपटगृहात सिनेमा दिसणार नाही. तर, 17 जानेवारीपासून इतर ठिकाणी बंदी घातली जाईल.

छत्रपतींशी मोदींची तुलना केल्याप्रकरणी काँग्रेसची पोलिसात तक्रार, महाराजांच्या वंशजांनी राजीनामा द्यावा- संजय राऊत

नागपूर- छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना नरेंद्र मोदींशी केल्यामुळे महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले आहे. राज्यात याचे तीव्र पडसाद उमटत असून भाजपवर टीकेची झोड उठली आहे. आता याप्रकरणी काँग्रेस प्रवक्ते अतुल लोंढे यांनी पोलिसांत भावना दुखावल्याप्रकरणी तक्रार दाखल केली आहे. या पुस्तकाच्या लेखक, प्रकाशक तसेच विमोचकावर तातडीने कारवाई करावी. तसेच यावर बंदी घालावी अशी मागणी करत नागपूरमधील नंदनवन पोलिस ठाण्यात करण्यात आली.

महाराजांच्या वंशजांनी राजीनामा द्यावा- संजय राऊत

शिवाजी महाराजांशी तुलना केल्यामुळे शिवसेना नेते संजय राऊत चांगले तापले आहेत. त्यांनी शिवाजी महाराजांचे वशंजांवरही टीकास्त्र सोडले. ते म्हणाले की, “सातारा, कोल्हापूरमधील राजे हे सर्व भाजपमध्ये आहेत. भाजपचे खासदार,आमदार आहेत. सातारा आणि कोल्हापूरच्या गादीचा देशाला आदर आहे. मात्र मोदींची छत्रपतींशी तुलना हा महाराष्ट्राचा अपमान आहे. या वादानंतर महाराजांच्या वंशजांनी राजीनामा द्यायला हवे होते,” असे राऊत म्हणाले.

महाराजांच्या पायाच्या नखाचीही बरोबरी नाही- अशोक चव्हाण

“छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्त्व आणि कार्य अतुलनीय आहे. कोणी कितीही प्रयत्न केला, तरी त्याला महाराजांच्या पायाच्या नखाचीही बरोबरी करता येणार नाही,” असे ट्विट करत अशोक चव्हाण यांनी भाजपवर टीका केली आहे.

राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड, धनंजय मुंडे आणि इतर अनेकांनी नाराजी व्यक्त केली आहे.

नागपुरात हत्यासत्र सुरूच, रविवारी रात्री दोन हत्या

नागपूर : नव्या वर्षातही नागपुरात हत्यांचं सत्र थांबायचं नाव घेत नाहीये. नागपुरात काल रात्रीही दोन हत्या झाल्या. या घटनानंतर परिसरात भीतिचं वातावरण आहे. या दोन्ही हत्या प्रकरणामुळे परिसरात खळबळ उडाली आहे.

झिंगाबाई टाकळी परिसरात आनंद खरे नावाच्या व्यक्तिची मराठी शाळेजवळ भोसकून हत्या करण्यात आली. मद्यपान केल्यानंतर झालेल्या भांडणार ही हत्या करण्यात आली. तर दुसऱ्या घटनेत सावनेर भागात अंगद सिंह या जिम संचालकाची भोसकून हत्या करण्यात आली. ऑक्सिजन या जिमचा संचालक असलेल्या अंगदसिंगवर रात्री ९ वाजता हल्ला करण्यात आला. अंगद सिंग हा राज्याचे युवा कल्याण आणि क्रीडा मंत्री सुनील केदार यांचा कार्यकर्ता आहे. अनेकवेळा तो त्यांच्यासोबत दिसायचा.

हत्यांच सत्र सुरूच आहे. 4 तारखेपासून हे हत्यासत्र सुरू झालं आहे. आतापर्यंत आठ हत्या झाल्या आहेत. गेल्या 12 दिवसांमध्ये झालेल्या या हत्यासत्रामुळे नागपुरात कायदा, सुव्यवस्थेचा काय प्रश्न आहे हे स्पष्ट होत आहे. यामधील काही हत्या शहरात तर काही हत्या ग्रामीण भागात झाल्या आहेत. नागपुर जिल्ह्यात घडलेल्या या हत्यासत्रानंतर सामान्य नागरिक हादरले आहेत.

तसेच महाविकासआघाडी सरकारचे गृहमंत्रीपद नागपुरात आले तरीही हत्यांचे सत्र हे सुरूच आहे. शहरातील कायदा- सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झाला आहे. पोलिसांनी कडक कारवाई करावी अन्यथा गुन्हेगारांमध्ये कायद्याची भीती नष्ट होईल, असं देखील म्हटलं जात आहे.

Embrace 2020 on a healthy note, with almonds!

almonds

As we enter 2020, most of us are already thinking of things we would like to do differently this year, and New Year resolutions present the perfect opportunity to fulfill our determinations. But, often a lot of us end up making a list of unrealistic resolutions and for many, it becomes almost impossible to follow them through the year.

Losing weight and remaining fit during the year are popular resolution choices that many promise to work towards at the beginning of every year. But soon, most of us to get distracted and come back to the same routine. Let’s change that this year, by resolving to make small, positive changes in our family as well as our lives, which can go a long way in building overall health.

One good way to do this is by incorporating a healthy snack like almonds in our daily diets. Almonds are a good source of vital nutrients like vitamin E, magnesium, good fat, dietary fibers and plant protein. In fact, a handful of almonds may have satiating properties that promote feeling of fullness, which may keep hunger at bay between meals[1].

Fitness enthusiast and Supermodel Milind Soman said, “During the holiday-season, we tend to over-indulge in unhealthy and high-calorie food. Once we enter the New Year, we then start thinking about ways to become fit and healthy. An important part of maintaining a healthy lifestyle is adding a regular dose of exercise to it. I enjoy running, and make sure I try to do it 2-3 times a week, even during the holiday season or on vacation. To complement this, I personally opt for wholesome snacks like almonds which are a source of 15 nutrients such as magnesium, riboflavin, zinc etc. Added to that, global research also suggests that daily consumption of almonds may have a positive impact on type 2 diabetes, heart health and weight management.”

Leading Bollywood actress Soha Ali Khan said, “For a lot of us, January is a month of new beginnings. But how many of us are able to see them through the year is questionable. Having family responsibilities, and a young daughter to take care of, I try to keep smaller, more achievable resolutions at the start of the year, and work through the year to achieve them. As we enter 2020, I urge everyone to make more informed snacking choices, and opt for snacks like almonds, or fresh fruits which will aid your overall health.”

When we commit to remain healthy and fit throughout the year, diet and meal options become crucial. While we may plan our diets to the hilt, what we tend to miss out on, is planning a balanced snacking routine that is tasty and nutritious at the same time. Snacking on almonds instead of unwholesome snacks can make a healthy difference to our lives.

According to Madhuri Ruia, Pilates Expert and Diet & Nutrition Consultant, “While planning our diet, we often neglect planning for the in-between snacks. I strongly recommend to choose health substitutes like roasted, flavoured or salted almonds for those in-between meal hunger pangs. Snacking smart with almonds is a small yet great change that can help people lead a healthier lifestyle.”

Commenting on this, Sheela Krishnaswamy, Nutrition and Wellness Consultant said, “As the New Year begins, I usually come across many clients who are looking for a diet plan that could help manage their weight. In such cases, I highly recommend fresh fruits and nuts like almonds which help in weight management. Recently, I also came across a study published in the European Journal of Clinical Nutrition, which highlighted that participants who consumed 43 grams of dry, roasted, lightly salted almonds every day experienced reduced hunger and improved dietary vitamin E and monounsaturated (“good”) fat intake without increasing body weight[2].”

Regional Head-Dietetics, Max Healthcare – Delhi, Ritika Samaddar added, “Almonds are one of the easiest foods to include in our diet; we can eat a handful before we start our day, enjoy some as an evening tea time snack, or even add them to our food preparation. In addition, as per a recent research, inclusion of 45 grams of almonds in everyday diet can help in the reduction of LDL (bad cholesterol) and alleviate conditions like dyslipidemia, linked to the same. Regular consumption of almonds, when replaced with other carbohydrate rich snacks, can effectively help in reducing LDL and total cholesterol, thus making you healthier in the long run[3].”

So, this year, resolve to lead a healthier lifestyle by consuming a handful of almonds every day.

Almonds from California are a natural, wholesome and quality food. The Almond Board of California promotes almonds through its research-based approach to all aspects of marketing, farming and production on behalf of the more than 6,800 almond growers and processors in California, many of which are multi-generational family operations. Established in 1950 and based in Modesto, California, the Almond Board of California is a non-profit organization that administers a grower-enacted Federal Marketing Order under the supervision of the United States Department of Agriculture. For more information on the Almond Board of California or almonds, visit www.almonds.in

 [1] Hull S, Re R, Chambers L, Echaniz A, Wickham SJ. A mid-morning snack generates satiety and appropriate adjustment of subsequent food intake in healthy women. European Journal of Clinical Nutrition 2014; DOI 10.1007/s00394-014-0759-z.

[2] Tan YT, Mattes RD. Appetitive, dietary and health effects of almonds consumed with meals or as snacks: a randomised, controlled trial. European Journal of Clinical Nutrition. 2013; 67:1205-14.

[3] Kalita S, Khandewal S, Madan J, Pandya H, Sesikeran B, Krishnaswamy K. Almonds and Cardiovascular Health: A Review. Nutrients. 2018; 10:468. Doi:10.3390/nu10040468.

Royal Enfield launches BS VI compliant Classic 350

Royal Enfield launches BS VI compliant Classic 350

Royal Enfield, the global leader in the mid-size motorcycle segment, announced the launch of the new Bharat Stage VI compliant Royal Enfield Classic 350, the first motorcycle under the company’s Unit Construction Engine (UCE) platform to transition to the new regulatory emission norms. The new Classic 350 dual channel ABS variants will be introduced beginning with two refreshed colourways – Stealth Black and Chrome Black alongside Signals Airborne Blue, Signals Stormrider Sand, Gunmetal Grey and Classic Black. From today onwards, the motorcycles will be available across all dealerships in India starting at Rs. 1,65,025 (Ex-showroom).

While the Classic 350 dual channel ABS is the the first motorcycle to transition to new regulatory emission norms, other motorcycles in the portfolio will be BS VI compliant by 31 March 2020.

The Royal Enfield Classic 350 will now come equipped with Electronic Fuel Injection system (EFI) in the UCE engine which will further help in improving the refinement, driveability and consistent cold startability ensuring a smooth power delivery without any fluctuation in all conditions. The overall engine power and torque delivery is tuned and optimised in such a way to get an enhanced vehicle performance throughout the operating range with a superior riding feel while meeting the BS VI emission norms. The Stealth Black and Gunmetal Grey colourways of Classic 350 will be equipped with alloy wheels and tubeless tyres as standard. All the BS VI motorcycles will now come with three years warranty along with three years of Roadside Assistance which has been increased from one year.

Speaking about the launch of the new BS VI compliant motorcycles, Mr. Vinod Dasari, CEO of Royal Enfield said, ‘Royal Enfield believes that sustainable growth comes from thinking ahead and deploying long-term strategies. The directive by the Government to adhere to the BS VI emission norms is a welcome move as it is one of the first steps towards transitioning to the future of mobility. This not just ensures cleaner technology and sustainable mobility but also puts the Indian automotive sector ahead of its global counterparts. We have ensured BS VI compliance as mandated well ahead of time in the current portfolio to ensure a seamless experience for our existing and potential customers. We are confident that this will further enhance customer confidence in the brand and welcome more people into the world of pure motorcycling.”

Introduced in 2008, the Royal Enfield Classic is a tribute to the retro look of British motorcycles in the post-World War II era. The Classic retains the quintessential classic British styling of the 1950s; simple,

harmonious, proportioned and finished. The motorcycle will be powered by 346cc engine, front & rear mudguards, the headlight casing, the fuel tank, the oval toolbox, the exhaust fins, the speedometer dials, tail light assembly and the headlamp cap, conforming to the native imagery of British motorcycles in the aftermath of World War II.

बसमध्ये प्रसाधनगृह

नागपूर: मनपाच्या परिवहन सेवेतून बाद झालेल्या जुन्या भंगार बसेसचा उपयोग करून त्यामध्ये महिलांसाठी प्रसाधनगृह निर्माण करण्याची संकल्पना मनपातर्फे राबविण्यात येणार आहे. यासंबंधी सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावर दोन बसेसमध्ये प्रसाधनगृह निर्माण केली जाणार आहेत. यामध्ये एक स्थायी तर दुसरे फिरते शौचालय निर्माण तयार करण्याच्या विषयावर गुरुवारी परिवहन समितीच्या सभेमध्ये चर्चा करण्यात आली.

सभेमध्ये परिवहन समिती सभापती नरेंद्र (बाल्या) बोरकर यांच्यासह समिती सदस्य अर्चना पाठक, विशाखा बांते, मनीषा धावडे, रूपाली ठाकूर, वैशाली रोहनकर, नागेश मानकर, नितीन साठवणे, उपायुक्त तथा परिवहन व्यवस्थापक राजेश मोहिते, प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे, श्रम अधिकारी अरूण पिपरुडे, सुकीर सोनटक्के, यांत्रिकी अभियंता योगेश लुंगे, प्रकाश जोशी आदी उपस्थित होते.

बोरकर यांनी परिवहन समिती सभापती म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर परिवहन विभागाची पहिली सभा गुरुवारी झाली. नागपूर शहरातील महिलांसाठी व प्रवासी महिलांकरिता मोबाईल टॉयलेट योजना राबवून सुलभ प्रसाधनगृहाची व्याप्ती वाढविण्याकरीता मनपाच्या जुन्या भंगार बसचा वापर फिरते शौचालयाकरिता करण्याचे महापौर संदीप जोशी यांनी निर्देशित केले होते. त्यानुसार प्रायोगिक तत्त्वावर दोन बसमध्ये प्रसाधनगृहांची निर्मिती केली जाणार आहे. याबाबतचा निर्णय धोरणात्मक असून याविषयावर सभागृहामध्ये चर्चा करूनच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असे यावेळी बोरकर यांनी सांगितले.

नवीन ४० इलेक्ट्रिक बसेस

केंद्र शासनाच्या पर्यावरणपूरक धोरणाप्रमाणे नागपूर महापालिकेच्या ‘आपली बस’ सेवेमध्ये नवीन ४० इलेक्ट्रिक बस नियुक्त करण्याचे प्रस्तावित आहे. पर्यावरणाच्या दृष्टीने उपयुक्त अशा नवीन इलेक्ट्रिक बसेसकरिता निविदाप्रक्रिया राबविण्यात येणार आहे. मात्र, संबंधित विषय धोरणात्मक असून याबाबत अंतिम निर्णय सभागृहामध्ये चर्चा करूनच घेण्यात येईल, असेही परिवहन समिती सभापती नरेंद्र ऊर्फ बाल्या बोरकर यांनी यावेळी सांगितले.

निर्भया बलात्कार प्रकरण: नराधमाकडून सुप्रीम कोर्टात पहिली क्युरेटिव्ह याचिका

नवी दिल्ली,9 जानेवारी: निर्भयावर सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही नराधमांच्या फाशीचा ‘मुहूर्त’ ठरला आहे. 22 जानेवारीला सकाळी 7 वाजता तिहार तुरुंगात या चौघांना फासावर लटकावले जाईल, असा आदेश पतियाळा हाऊस कोर्टाने मंगळवारी दिले. दोषी मुकेश, विनय, पवन आणि अक्षयविरुद्ध डेथ वॉरंट बजावले आहेत. आता निर्भया सामूहिक बलात्कार प्रकरणातील पहिली क्युरेटिव्ह अर्थात फेरविचार याचिका सुप्रीम कोर्टात दाखल करण्यात आली आहे. अॅड. ए.पी.सिंह यांच्यामार्फत नराधम विनय शर्मा याने क्युरेटिव्ह याचिका दाखल केली आहे. मुकेश व विनयचे वकील ए. पी. सिंह यांनी आपण सुप्रीम कोर्टात क्युरेटिव्ह याचिका दाखल करणार असल्याचे आधीच सांगितले होते.

दुसरीकडे, तिहार तुरुंग प्रशासनाने उत्तर प्रदेश सरकारला पत्र पाठवून मेरठहून जल्लाद मागवला आहे. सन 2012 मध्ये 16 डिसेंबरच्या रात्री धावत्या बसमध्ये सहा जणांनी पॅरामेडिकलच्या विद्यार्थिनीवर बलात्कार केला होता. 29 डिसेंबरला तिचा मृत्यू झाला. सहापैकी एक अल्पवयीन असल्याने तो तीन वर्षांनंतर सुटला. एक दोषी रामसिंह याने तुरुंगात आत्महत्या केली होती. आरोपी अक्षय याने 16 डिसेंबर 2012 रोजी निर्भयावर धावत्या बसमध्ये बलात्कार करून तिला मारहाणही केली होती. पवन यानेही निर्भयावर बलात्कार करून तिच्या मित्राला बेदम मारहाण केली होती. मुकेश ही बस चालवत होता. त्यानेही निर्भयासोबत कुकृत्य केले होते. विनय याने निर्भयाचा छळ, बलात्कार, नंतर तिला बसबाहेर फेकले होते.

दरम्यान, देशात प्रथमच चार दोषींना एकाच वेळी फासावर लटकावले जाणार आहे.

खुनाचा बदला घेण्यासाठीच समीरची हत्या

नागपूर

नागपूर : साथीदार लांजेवार याच्या खुनाचा बदला घेण्यासाठीच समीर ऊर्फ बाबू ऊर्फ बाबा शेख रमजान शेख (वय २३) याची निर्घृण हत्या करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. समीर याच्या हत्येप्रकरणात यशोधरानगर पोलिसांनी सहा मारेकऱ्यांना अटक केली आहे. विजय नरेश पडोळे (वय १९, रा. पोळा मैदान), अजय सूरज चव्हाण (वय २२, रा. यादवनगर), आर्यन ऊर्फ गौरव मोहनलाल गुप्ता (वय २०, रा. प्रेमनगर), अंकुश उत्तम सूर्यवंशी (वय २१, रा. कांजी हाऊस चौक), प्रदीप ऊर्फ बंटी यादवराव कनपटे (वय १९, रा. कांजीहाऊस) व महेश ऊर्फ सोनू राजकुमार कुसेरे (वय २५, रा. बारनल चौक), अशी अटकेतील मारेकऱ्यांची नावे आहेत. सहा जणांनी मंगळवारी रात्री यशोधरानगरमधील आर. के. सावजी भोजनालयात धारदार शस्त्रांनी वार करून समीर याची हत्या केली होती.

मे २०१७ मध्ये समीर व त्याचा साथीदार फरदीन खान मुजीब खान ऊर्फ शेर खान या दोघांनी कुख्यात प्रवीण ऊर्फ प्रकाश (वय २२) याची हत्या केली. त्यामुळे प्रवीण याचे साथीदार संतापले होते. या प्रकरणात समीर व त्याचा साथीदार निर्दोष सुटले. खून प्रकरणात निर्दोष सुटल्यानंतर समीर हा परिसरात दादागिरी करायला लागला. रविवारी त्याने दुकानात घुसून अंकुश याच्या गळ्याला तलवार लावली. ठार मारण्याची धमकी दिली. त्यानंतर समीर याने विजय पडोळे याच्या घरावर हल्ला केला होता. यामुळे अंकुश व विजय संतापले. दोघांनी अन्य चार साथीदारांच्या मदतीने समीर याचा खात्मा करण्याचा कट आखला. मंगळवारी सकाळी त्यांनी दारु प्यायली. समीर याचा शोध सुरू केला.

रात्री वनदेवीनगर भागात समीर हा त्यांना आढळला. सहा जणांनी त्याच्यावर हल्ला केला. समीर पळाला. जीव वाचविण्यासाठी समीर हा आर. के. सावजी भोजनालयात घुसला. भोजनालयातच सहा जणांनी धारदार शस्त्रांनी वार करून समीर याला ठार केले व पसार झाले. याप्रकरणी यशोधरानगर पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल केला. यशोधरानगर पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक डी. एस. साखरे निरीक्षक एन. एन. मोहिते , सहाय्यक पोलिस निरीक्षक खंदारे, पाटील, उपनिरीक्षक श्रीनिवास दराडे, सहाय्यक पोलिस उपनिरीक्षक विनोद सोलव, प्रकाश काळे, दीपक धानोरकर, नरेश, गजानन, नीलेश यांनी मारेकऱ्यांचा शोध सुरू केला. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. मारेकरी निष्पन्न होताच यशोधरानगर पोलिसांनी चौघांना तर पाचपावली पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक किशोर नगराळे यांच्या नेतृत्वात पाचपावली पोलिसांनी बंटी व महेश या दोघांना अटक केली. अटकेतील सहा मारेकऱ्यांना गुरुवारी न्यायालयात हजर करण्यात येईल.

छेड काढण्यास विरोध केल्याने वाठोड्यात हत्या

वाठोडा येथील मृत युवकाची ओळख पटविण्यात पोलिसांना यश आले असून, मानलेल्या बहिणीची छेड काढण्यास विरोध केल्यानेच युवकाची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याचे उघडकीस आले. हिमांशू मनोहर डेंगे (वय २२, रा. अनमोलनगर), असे मृतकाचे नाव आहे. त्याची हत्या विकास नावाच्या युवकाने केली. पोलिस त्याचा कसून शोध घेत आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, हिमांशू हा खासगी काम करीत होता. त्याची विकास याच्यासोबत मैत्री होती. विकास हा हिमांशूच्या मानलेल्या बहिणीची छेड काढायचा. हिमांशू याने त्याला विरोध केला. त्यामुळे विकास संतापला. मंगळवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास गंगा सेलिब्रेशन हॉल परिसरात विकास याने हिमांशूची हत्या केली व पसार झाला.

————–

कॅप्शन- अटकेतील सहा मारेकऱ्यांसह यशोधरानगर पोलिस.

Celebrating 15 years of remarkable leadership, Toyota Kirloskar Motor (TKM) opens bookings for BS-VI Compliant Innova Crysta

Toyota Kirloskar Motor (TKM)

– Available in Petrol and Diesel, in both MT and AT variants, BS-VI Innova Crysta and Touring Sport are competitively priced in the range of Rs 15,36,000 and Rs 24,06,000 Ex-showroom Delhi

– Pioneering the MPV segment in India for the last 15 years, the Innova has sold close to 9,00,000 units since its launch in 2005

– Innova Crysta has sold close to 2,70,000 units, conquering about 40% of share in its segment

– Vehicle Stability Control(VSC), Hill Assist Control(HAC) & Emergency Brake Signal(EBS) are standardized across all grades of BS6 Innova Crysta

– Supply of the BS-VI compliant Innova Crysta will begin February 2020 onwards, across the country (subject to BS-VI fuel availability)

– With BS-VI rollout, the regulatory limits of the most harmful vehicle emission i.e. the Particulate matter 2.5 (PM 2.5) are the same for large or small cars and for CNG, petrol, and diesel-run cars

– Bookings for BS-VI Innova Crysta are now open at a celebratory price for a limited period and customer orders for a limited number

Bangalore: Strengthening its commitment to the Government of India’s vision of a green and sustainable environment, Toyota Kirloskar Motor (TKM), today, opened bookings for the BS-VI compliant version of its flagship MPV, Innova Crysta. The petrol and diesel variants of the BS-VI compliant Innova Crysta will be available in both Manual as well as Automatic Transmission options.

Launched in 2016, the Innova Crysta has been the undisputed leader in the MPV segment known for its luxurious features, comfort, safety, powerful performance, low maintenance, and high resale value, delivering Toyota’s legendary promise of Quality, Durability, and Reliability (QDR).

Sharing his thoughts on the announcement, Mr. Naveen Soni, Senior Vice President, Sales & Service said, “The Government, auto industry and oil industry have together worked tirelessly with full commitment to usher in the cleaner BS-VI emission norms in record time. Under these norms, the regulatory vehicle emission limits for particulate matter 2.5 (PM 2.5) will be the same irrespective of the size of the car as well as for cars that run on CNG, petrol or diesel. At Toyota, we are committed to bring advanced and environment-friendly technologies to the Indian market and align our concerted efforts with the Government’s policies to create a greener and cleaner tomorrow. Since its launch, Innova Crysta has carved a niche for itself and maintained a leading position in the MPV segment.

Often referred to as a segment creator for MPVs in India, it continues to be the most preferred MPV in the country with a segment share of 40%. It is indeed a proud moment for us to present BS-VI Innova Crysta, as we open bookings for it today at a celebratory price for a limited time period and customer orders for a limited number.”

He further added, “The launch of the BS-VI Innova Crysta, is a crucial step towards achieving the goal of minimizing emissions for a sustainable future. Innova Crysta comes with a BS-VI compliant engine, an improvement of the already powerful GD-Series engines, promising low emissions and higher efficiency. We thank our customers for their unwavering support and trust in Innova Crysta and believe this BS-VI Innova Crysta will offer them the best driving experience with powerful performance, luxurious features, comfort, and most importantly safety.”

A perfect combination of flawless luxury and effortless power, over the years, Innova Crysta has set a benchmark for the tough and sophisticated exterior, coupled with an enhanced interior, powerful powertrain, and uncompromised luxury. Taking the driving experience, a notch higher, the BS-VI Innova Crysta is both economical and efficient, ensuring lower emissions and a cleaner, better environment

जिल्हा परिषद / नागपूरातुन गृहमंत्री अनिल देशमुखांच्या पुत्राचा विजय तर आदिवासी विकास मंत्री पाडवींच्या पत्नीचा तोरणमाळमधून पराभव

नागपूर

नागपूर- राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या घारत परत एकदा गुलाल उढळला जाणार आहे. अनिल देशमुखांचे चिरंजीव सलील देशमुख जिल्हा परिषद निवडणुकीत विजयी झाले आहेत. राष्ट्रवादीच्या तिकीटावर निवडणुकीच्या रिंगणात उतरलेल्या सलील देशमुखांनी नागपुरातील मेटपांजरा येथून विजयी मिळवला. नागपूर जिल्हा परिषद सदस्य म्हणून सलील देशमुख पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.

सलील देशमुख राष्ट्रवादीचे सक्रिय कार्यकर्ते आहेत. यापूर्वी अनिल देशमुखांनी विधानसभेसाठी मुलाची शिफारस केली होती. पण, विधानसभावारी हुकलेल्या सलील देशमुखांना जिल्हा परिषदेत झेंडा रोवण्यात यश आले आहे. नागपूरचा गड राखताना भाजपची चांगलीच दमछाक होत आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने नागपुरात चांगली पकड घेतल्याचे दिसत आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनाही धक्का बसला आहे. नितीन गडकरींचं मूळ गाव असलेल्या धापेवाडा आणि बावनकुळेंचं मूळ गाव कोराडीमध्ये भाजपला पराभवाला सामोरं जावं लागलं.

के.सी. पाडवींच्या पत्नी पराभूत

दुसरीकडे राज्याचे आदिवासी विकास मंत्री के.सी. पाडवी यांच्या पत्नी हेमलता पाडवी यांचा नंदूरबारमधील तोरणमाळ गटातून पराभव झाला आहे. शिवसेनेचे गणेश पराडके यांनी केला एक हजार मतांनी त्यांचा पराभव केला आहे. नंदूरबार जिल्हा परिषदेचे 56 गट आणि पंचायत समितीच्या 112 गणांसाठी सहा तालुक्यात मंगळवारी मतदान झाले होते. मतमोजणी सुरू असून संपूर्ण जिल्ह्यात धक्कादायक आणि अनपेक्षित निकाल समोर येत आहेत. धडगाव तालुक्यातील तोरणमाळ गटात प्रथमच निवडणूत लढणाऱ्या आदिवासी विकालमंत्री के.सी. पाडवी यांच्या पत्नी हेमलता पाडवी यांना पराभवाला सामना करावा लागला.

Nagpur ZP Election Result: देवेंद्र फडणवीसांना सगळ्या मोठा धक्का, नागपूर ‘भाजपमुक्त’

Nagpur ZP Election

नागपूर: विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि राष्ट्रवादीसोबत घरोबा करत सत्तेत आलेल्या काँग्रेसने Nagpur ZP Election जिल्हा परिषद निवडणकीमध्ये  जोरदार मुसंडी मारली आहे. भाजकडून काँग्रेसने नागपूर जिल्हा परिषद हिसकावून घेतली आहे. काँग्रेसने एकून 58 जागांपैकी 26 जागांवर आपला विजय मिळवला आहे. तर भाजपला अवघ्या 10 जागा राखता आल्या आहेत. त्यामुळे काँग्रेसने मुसंडी मारत भाजपला भुईसपाट केलं असं म्हणायला हरकत नाही.

नागपूरसह राज्यातील धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि पालघर या सहा जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार आहेत. मंगळवारी झालेल्या मतदानानंतर बुधवारी सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नितीन गडकरी यांना मोठा धक्का बसला आहे. गडकरींचे मूळ गाव धापेवाडा येथून काँग्रेसचे उमेदवार काँग्रेसचे महेंद्र डोंगरे विजयी झाले आहेत. दरम्यान, सर्वच जिल्हा परिषदांमध्ये आजी-माजी मंत्र्यांसह सर्वपक्षीय दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली होती.

नागपूर जिल्हा परिषद (Nagpur ZP Election) एकूण जागा- 58

काँग्रेस-26

राष्ट्रवादी – 12

भाजप -10

शिवसेना -01

अपक्ष– 01

शेकाप- 01

नागपुरात गड राखण्यासाठी भाजपची तारेवरील कसरत

नागपूर जिल्हा परिषद निवडणूक (Nagpur ZP Election) ही भाजपसाठी अस्तित्वाचा लढाई मानली जात होती. त्याचप्रमाणे काँग्रेस-राष्ट्रवादीसाठीही निवडणूक महत्त्वाची आहे. नागपूर जिल्हा परिषदेच्या 58 गटांसाठी 270 उमेदवार रिंगणात होते. तर 13 पंचायत समित्यांच्या 116 गणांसाठी मतदान झाले. नागपूरमध्ये 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 12 पैकी 11 जागा मिळाल्या होत्या, तर फक्त एक जागा काँग्रेसला मिळाली होती. मात्र 2019 मध्ये चित्र पालटलं. काँग्रेस-राष्ट्रवादीने मिळून पाच जागा मिळवल्या.

भाजपचा धुव्वा

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांचा गृह जिल्हा असलेल्या नागरपुरात जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक पार पडली. काँग्रेस आणि राष्ट्रवादी हे भाजपचा प्रभाव कमी करण्यासाठी निवडणुका लढत होते. त्यासाठी महाविकास आघाडीने तीन मंत्र्यांना हा भार सोपविला होता. त्यामुळे ही निवडणूक नेत्यांच्या अस्तित्वाची लढाई ठरली आहे. जिल्हा परिषदेच्या 58 सर्कलसाठी 270 तर पंचायत समितीच्या 116 गणासाठी 497 उमेदवार रिंगणात आहेत. भाजप, काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना या पक्षासह गोंडवाना गणतंत्र पार्टी, प्रहार, बहुजन वंचित विकास आघाडी या पक्षाचेही उमेदवार रिंगणात होते.

Nagpur ZP Election Result: गडकरींना धक्का, बावनकुळे यांच्या गावातही काँग्रेस

Nitin Gadkari , नितीन गडकरी Nagpur

नागपूर: नागपूरसह राज्यातील धुळे, नंदुरबार, अकोला, वाशिम आणि पालघर या सहा जिल्हा परिषदांच्या निवडणुकांचे निकाल आज जाहीर होणार आहेत. मंगळवारी झालेल्या मतदानानंतर बुधवारी सकाळी दहा वाजता मतमोजणीला सुरुवात झाली आहे. पहिल्या टप्प्यात केंद्रीय मंत्री आणि भाजपचे नेते नितीन गडकरी यांना मोठा धक्का बसला आहे. गडकरींचे मूळ गाव धापेवाडा येथून काँग्रेसचे उमेदवार काँग्रेसचे महेंद्र डोंगरे विजयी झाले आहेत. दरम्यान, सर्वच जिल्हा परिषदांमध्ये आजी-माजी मंत्र्यांसह सर्वपक्षीय दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.

नागपुरात गड राखण्यासाठी भाजपची तारेवरील कसरत

नागपूर जिल्हा परिषद निवडणूक (Nagpur ZP Election) ही भाजपसाठी अस्तित्वाचा लढाई मानली जात आहे. त्याचप्रमाणे काँग्रेस-राष्ट्रवादीसाठीही निवडणूक महत्त्वाची आहे. नागपूर जिल्हा परिषदेच्या (Nagpur ZP Election) 58 गटांसाठी 270 उमेदवार रिंगणात आहेत. तर 13 पंचायत समित्यांच्या 116 गणांसाठी मतदान झाले. नागपूरमध्ये 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 12 पैकी 11 जागा मिळाल्या होत्या, तर फक्त एक जागा काँग्रेसला मिळाली होती. मात्र 2019 मध्ये चित्र पालटलं. काँग्रेस-राष्ट्रवादीने मिळून पाच जागा मिळवल्या.

live Update-

– राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांचे चिरंजीव सलिल देशमुख विजयी.

– मेटपांजरा सर्कल मधून विजयी जिल्हा परिषद सदस्य म्हणून सलिल देशमुख पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात उतरले होते.

– नागपूर जिल्हा परिषद (Nagpur ZP Election) – एकूण जागा 58

– पारडसिंगा जिल्हा परिषद – चंद्रशेखर कोल्हे, राष्ट्रवादी विजयी,

– एकूण 13 पंचायत समित्या, 116 गण

– पारडसिंगा शेकाप उमेदवार धम्मापाल खोब्रागडे विजयी

– लाडगाव – राष्ट्रवादी निलिमा ठाकरे विजयी

– चंद्रशेखर बावनकुळे यांना डावलल्याने मतदारांची भाजपवर नाराजी कायम

– चंद्रशेखर बावनकुळे यांच्या कोराडी या मुळ गावातंही भाजप विरोधी मतदान, कोराडीतून काँग्रेसचे नाना कंभाले विजयी

– काँग्रेस – पाच विजयी

– राष्ट्रवादी- तीन विजयी

*आघाडी

-काँग्रेस – चार आघाडीवर

-राष्ट्रवादी – तीन आघाडीवर

-शिवसेना – दोन आघाडीवर

-भाजप – चार आघाडीवर

Bharat Bandh today: Here’s what you need to know about trade, bank unions’ strike

Bharat Bandh

Nagpur: Millions of workers belonging to 10 central trade unions will go on a strike Bharat Bandh today on Wednesday against the government’s disinvestment, privatization, and labor reform policies.

The unions have said more than 250 million workers will participate in the Bharat Bandh to press for a 12-point common demand related to minimum wage and social security, among others.

Several banks and agricultural unions will also participate in the strike.

Here’s all you need to know about a strike on Wednesday:

What time will the strike start?

The 24-hour all-India strike will begin at 6 am on Wednesday.

Which trade unions are participating in Bharat Bandh?

* Indian National Trade Union Congress (INTUC)

* All India Trade Union Congress (AITUC)

* Hind Mazdoor Sabha (HMS)

* Centre of Indian Trade Unions (CITU)

* All India United Trade Union Centre (AIUTUC)

* Trade Union Coordination Centre (TUCC)

* Self Employed Women’s Association (SEWA)

* All India Central Council of Trade Unions (AICCTU)

* Labour Progressive Federation (LPF)

* United Trade Union Congress (UTUC)

Which bank unions are supporting the strike?

All India Bank Employees Association

All India Bank Officers’ Association (AIBOA)

Bank Employees Federation of India

Indian National Bank Employees’ Federation (INBEF)

Indian National Bank Officers Congress INBOC

Bank Karmachari Sena Mahasangh (BKSM)

Why are bank unions joining the strike?

Bank unions will strike to protest against banking reforms and mega-merger of PSU banks. They are also demanding a pay hike beside a uniform five-day week.

Which banking services will be affected?

Banking services at branches and ATMs could be hit at several places because of the strike. You won’t be able to withdraw and deposit cash from the banks and cheque clearing also will not be done. However, there will be no impact on online banking.

What are the other organizations supporting the strike?

Several farmers and agricultural workers’ unions will also extend support to the strike and observe Gramin Bharat Bandh. Sectoral independent federations and associations will be part of the Bharat Bandh.

What has the government said?

The government has asked public sector undertakings (PSUs) to dissuade their employees from participating in a strike and said striking workers would face consequences “which, besides deduction of wages, may also include appropriate disciplinary action”.

It has also advised PSUs to prepare a contingency plan to ensure the smooth functioning of the enterprises.

Which union is not participating?

News agency PTI has reported that the Bhartiya Mazdoor Sangh is not participating in the Bharat Bandh.

नागपूर / स्नानगृहात अडकलेल्या बिबट्याची 5 तासांनंतर सुटका, बिबट्यांचा वावर वाढल्यामुळे नागरिक भयभीत

नागपूर

नागपूर : भंडारा जिल्ह्यात स्नानगृहात अडकलेल्या बिबट्याची पाच तासांनंतर सुटका करण्यात आल्याची घटना भंडारा जिल्ह्यातील अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील बाक्टी येथे घडली. स्नानगृहात बिबट्या अडकल्याची माहिती पसरताच घटनास्थळी बघ्यांची गर्दी उसळली होती.

तालुक्यात गेल्या अनेक दिवसांपासून बिबट्यांचा वावर गावखेड्यात वाढल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. काही दिवसांपूर्वीच नवेगावबांध येथील एका घरातून बिबट्याला जेरबंद करून जंगलात सोडण्यात आले होते. या घटनेला काही दिवस होत नाही तोच मंगळवारी सकाळच्या सुमारास तालुक्यातील बाक्टी येथील श्रीराम शेंडे यांच्या घरातील स्नानगृहात बिबट्याने आश्रय घेतल्याचे लक्षात आले.सकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास शेंडे यांच्या स्नानगृहात बिबट्याने ठाण मांडल्याचे लक्षात येताच वन विभागाला माहिती देण्यात आली. वन विभागाच्या रेस्क्यू पथकाने सरळ बाक्टीकडे धाव घेत बिबट्याला जेरबंद करण्यासाठी प्रयत्न सुरू केले. तब्बल पाच तासांच्या थरारानंतर बिबट्याला जेरबंद करण्यात आले.

टागोरांनी हायकू भारतात आणले

नागपूर- ‘तीन ओळींमध्ये आणि कमी शब्दांत आश्चर्यकारक भाव व्यक्त करण्याची कला असणारा हायकू हा जपानी काव्यप्रकार भारतात रवींद्रनाथ टागोर यांनी आणला. त्यानंतर हिंदी, मराठी, इंग्रजी आणि बंगाली भाषांमध्ये हायकू अत्यंत लोकप्रिय ठरले’, अशी माहिती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या माजी हिंदी विभागप्रमुख डॉ. वीणा दाढे यांनी रविवारी दिली.

विदर्भ साहित्य संघाच्या ग्रंथसहवास आणि हिस्लॉप महाविद्यालयाच्या इंग्रजी विभागातर्फे ‘हेम’ या हिंदी, इंग्रजी आणि मराठी भाषेवरील हायकू कार्यशाळेचे आयोजन हिस्लॉप महाविद्यालयात करण्यात आले होते. यावेळी तीनही भाषांमधील हायकूचे महत्त्व, हायकू कसे लिहावे, त्याचा प्रचार-प्रसार आदींवर मार्गदर्शन करण्यात आले. हिंदी भाषेतील हायकूवर बोलताना डॉ. दाढे म्हणाल्या, ‘हिंदी भाषेत सुरुवातीपासूनच वेगवेगळ्या छंदामध्ये काव्यनिर्मिती करण्याची परंपरा राहिली आहे. विशेषत: लांबलचक अशा सहा ते सात ओळींचे काव्यप्रकार हिंदीमध्ये बरेच लोकप्रिय आहेत. परंतु, केवळ दोन ओळींचे ‘दोहे’ लिहिण्याचा प्रघात बिहारी या कवीने आणला. तेथूनच खऱ्या अर्थाने हायकूचे बीज रोवले गेले. नंतरच्या काळात सूर्यकांत त्रिपाठी ‘निराला’ यांनी छंदमुक्त काव्याची संकल्पना जगापुढे मांडली. आजघडीला हिंदी भाषेत हायकू करणाऱ्यांची संख्या वाढली असून कमी शब्दांमध्ये मोठा गर्भितार्थ सांगण्याचे सामर्थ्य असलेला हा काव्यप्रकार लोकप्रिय ठरला आहे.’

इंग्रजी भाषेतील हायकूवर बोलताना प्रा. सुपंथ भट्टाचार्य म्हणाले, ‘आकाराने लहान, लिहायला कठीण पण तितकाच मार्मिक हा काव्यप्रकार जपान येथून आपल्याकडे आला. मराठीमध्ये या प्रकाराला शिरीष पै यांनी विशेष ओळख प्राप्त करून दिली. जुन्या काळात हायकू हे केवळ निसर्ग आणि मृत्यू या दोन संकल्पनांवर आधारित होते. कालौघात वेगवेगळ्या धाटणीचे हायकू तयार होऊ लागलेत. यामध्ये आता विनोदी तसेच गणित आणि विज्ञानाशी संबंध दर्शविणारे काव्यदेखील निर्माण होऊ लागले आहे.’

शेवटच्या सत्रात अंजली कारंजकर यांनी मराठी भाषेतील हायकू काव्यप्रकारावर प्रकाश टाकला. संपूर्ण दिवसभर चाललेल्या कार्यशाळेचे उद्घाटन मराठीचे शिलेदार बहुउद्देशिय संस्थेचे संस्थापक अध्यक्ष राहुल पाटील यांनी उद्घाटन केले. दरम्यान, नरेंद्र परिहार आणि श्यामलबाबू यांना अनुक्रमे हिंदी आणि इंग्रजी भाषेतील उत्कृष्ट हायकू रचनांसाठी पुरस्कृत करण्यात आले. प्रास्ताविक दिलीप म्हैसाळकर यांनी केले.

महिलासुरक्षेला प्राधान्य : डॉ.भूषणकुमार उपाध्याय

नागपूर

नागपूर- ‘महिला, तरुणींच्या सुरक्षेसाठी पोलिस कटिबद्ध आहेत. महिला सुरक्षेला पोलिसांचे प्राधान्य असेल,’ अशी ग्वाही पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांनी दिली. श्री स्वामी समर्थ बहूद्देशीय संस्थेच्यावतीने ‘उडान एक नयी सोच, सॅल्युट नागपूर पोलिस’ या उपक्रमांतर्गत ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या व ज्येष्ठ गांधीवादी लीलाताई चितळे यांच्याहस्ते डॉ. उपाध्याय यांचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी ते बोलत होते. पोलिस उपायुक्त निर्मला देवी, विनिता शाहू व संस्थेच्या अध्यक्षा नूतन रेवतकर यावेळी प्रामुख्याने उपस्थित होत्या.

डॉ. उपाध्याय म्हणाले, पोलिसांनी पुढाकार घेऊन महिला व तरुणींसाठी रात्री ९ ते पहाटे ५ वाजतापर्यंत ‘होम ड्रॉप’ हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमाचे देशभरात कौतुक होत आहे. या उपक्रमामुळे नागरिकांचा पोलिसांकडे बघण्याचा दृष्टिकोनही बदलला आहे. ‘होम ड्रॉप’ ही संकल्पना नूतन रेवतकर यांची मुलगी पूनम रेवतकर यांच्या नेतृत्वातील एका शिष्टमंडळाने दिलेल्या भेटीतून मिळाली, असेही आयुक्तांनी सांगितले.

७० टक्के गुन्हे रागाच्या भरात घडतात. चांगले बोलल्याने कोणताही वाद क्षणात मिटवता येतो. वाद कुठलाही असो शब्दांच्या जादुई शक्तीने भडकलेला जमावदेखील शांत होऊ शकतो. पोलिसांनी प्रत्येक नागरिकाशी नम्रतेने वागावे, असा सल्लाही डॉ. उपाध्याय यांनी उपस्थित पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिला. संस्थेने प्रथमच क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीदिनी पोलिस अधिकाऱ्यांचा सत्कार घडवून आणला. ‘सीपी टू पीआय‘ अशी सत्काराची संकल्पना होती. यावेळी पोलिस उपायुक्त अनुक्रमे निर्मला देवी, विनीता शाहू, विवेक मसाळ, नीलोत्पल, राहुल माकणीकर, वाहतूक शाखेचे चिन्मय पंडित, पोलिस उपायुक्त (मुख्यालय) विक्रम साळी यांच्यासह सहाय्यक पोलिस आयुक्त व वरिष्ठ पोलिस निरीक्षकांचाही सत्कार करण्यात आला. संचालन आरजे मोना यांनी केले. प्रास्ताविक नूतन रेवतकर यांनी केले. डिम्पल सिंग या चिमुकलीने दिल्लीतील निर्भया प्रकरणावर ‘नारी’ ही कविता सादर केली.

भगवा असल्याचा देखावा करते शिवसेना, सत्तेसाठी काँग्रेसच्या रंगात रंगलीय – नितीन गडकरी

नागपूर – भगवा असल्याचा देखावा करते, परंतु प्रत्यक्षात ती आता काँग्रेसच्या रंगात रंगली असल्याची टीका केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केला. शिवसेनाने मुख्यमंत्री पदासाठी आपल्या विचारधारेसोबत तडजोड केली आणि काँग्रेस तसेच राष्ट्रवादीसोबत मिळून शिवसेना फक्त सत्तेसाठी एकत्र आले असल्याचेही गडकरी म्हणाले. नितीन गडकरी नागपुरात एका कार्यक्रमादरम्यान बोलत होते.

नितीन गडकरींचे हे विधान नेमके अशावेळी समोर आले ज्यावेळी वीर सावरकरांच्या मुद्द्यावर काँग्रेस आणि शिवसेना समोरासमोर आले आहेत. काँग्रेसने मध्य प्रदेशात आपल्या कार्यकर्त्यांना एका पुस्तकाचे वाटप केले. ज्यात वीर सावरकरांबाबत आक्षेपार्ह लिखाण केले आहे. यावर प्रतिक्रिया देत संजय राऊत म्हणाले की, वीर सावरकर एक महान व्यक्ती होते, आणि नेहमी राहतील. एक गट नेहमीच सावरकरांबाबत चुकीचे बोलत असतो. यावरून त्यांचे विचार किती गलिच्छ आहेत हे समजते.

गेल्यावर्षीच्या विधानसभा निवडणुकीत भाजप आणि शिवसेनेने एकत्रितपणे काँग्रेस आणि राष्ट्रवादी विरोधात निवडणूक लढवली होती. मात्र कमी जागा जिंकूनही शिवसेनेने भाजपकडे मुख्यमंत्री पदाची मागणी केली होती. यावर भाजपने नकार दिला होता. यानंतर शिवसेना आणि भाजप युती संपुष्टात आली. त्यांतर शिवसेनाने काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेससोबत महाआघाडी करून राज्यात सत्ता स्थापन केली. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले.

मुसळधार पावसाने वस्त्या जलमय

नागपूर

नागपूर: नागपूर शहरात गुरुवारी सकाळी झालेल्या मुसळधार पाऊस व गारपिटीमुळे अनेक वस्त्यांमध्ये पाणी शिरले, तर अनेक मुख्य रस्त्यांवर पाणी साचल्याने नागरिक व वाहनचालकांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले.

अचानक झालेल्या मुसळधार पावसामुळे शहरातील अनेक सखल भागात पाणी साचले. शहरात कुठे आपत्ती परिस्थिती तर उद्‌भवली नाही ना, याची पाहणी करण्यासाठी महापौर संदीप जोशी यांनी सकाळीच भेट मनपा मुख्यालयातील ‘सिटी ऑपरेशन सेंटर’ गाठले. तेथून संपूर्ण शहरातील परिस्थितीची पाहणी केली आणि अधिकाऱ्यांना आवश्यक ते निर्देश दिले. नागपुरात सकाळपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर चांगलाच होता. अनेक भागात पाणी साचण्याची शक्यता बळावली होती. हे लक्षात घेऊन महापौरांनी सकाळी १० वाजताच मनपाच्या छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारतीत असलेले सिटी ऑपरेशन सेंटर गाठले. यावेळी त्यांच्यासोबत ‘नागपूर स्मार्ट ॲण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड’ चे राजेश दुफारे उपस्थित होते. सिटी ऑपरेशन सेंटरमधून त्यांनी शहरातील सर्व झोनमधील भागांची पाहणी केली. पावसामुळे नेहमी बाधित होत असलेल्या भागांचीही पाहणी केली. पाहणीदरम्यान कुठेही परिस्थिती हाताबाहेर गेले नसल्याचे त्यांना आढळले. तरीही ज्या भागात पाणी साचले आहे त्या भागातून लगेच पाणी काढण्याचे निर्देश त्यांनी संबंधित झोनच्या सहायक आयुक्तांना दिले. पावसाचा जोर लक्षात घेता आणि हवामान खात्याने दिलेला अंदाज बघता महानगरपालिकेच्या आणि आपत्ती व्यवस्थापनाच्या यंत्रणेने सज्ज राहण्याचे निर्देश त्यांनी यावेळी दिले. नागरिकांच्या तक्रारी येण्याची वाट न बघता संबंधित कर्मचाऱ्यांना आढावा घेऊन आवश्यक त्या ठिकाणी आवश्यक ती मदत तातडीने पोहचविण्याचे निर्देशही जोशी यांनी दिले.

महापालिकेच्या अग्निशमन विभागाला पाणी शिरल्याच्या अनेक तक्रारी आल्या. यात उत्तर नागपुरातील कपिलनगरचा समावेश होता. तर म्हाळगीनगरात एक झाड उन्मळून पडल्याचे अग्निशमन विभागाकडून सांगण्यात आले. पाणी शिरलेल्या अनेक भागात पंपाच्या सहाय्याने पाणी काढण्यात आल्याची माहिती आहे.

चित्ररथ रोखण्यामागे राजकीय षडयंत्र; सेना, राष्ट्रवादीचा आरोप

खासदार संजय राऊत

मुंबई: प्रजासत्ताक दिनी दिल्लीतील राजपथावर होणाऱ्या संचलनात महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाकारण्यात आल्याने त्यावरून तीव्र प्रतिक्रिया व्यक्त होऊ लागल्या आहेत. शिवसेना नेते, खासदार संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी यावरून केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे.

महाराष्ट्राचा चित्ररथ राजपथावरील संचलनात नेहमीच देशाचे आकर्षण ठरत आला आहे. अनेकदा पहिल्या क्रमांकाचा पुरस्कार महाराष्ट्राच्या चित्ररथाने पटकावलेला आहे. असे असतानाही महाराष्ट्राला डावलून केंद्र सरकारला कोणता घोडा पुढे सरकवायचा आहे?, असा सवाल संजय राऊत यांनी ट्विटरच्या माध्यमातून विचारला. काँग्रेस राजवटीत हा प्रकार घडला असता तर महाराष्ट्र भाजपाने बोंबाबोंब केली असती. आज ते गप्प का?, असा प्रश्नही राऊत यांनी राज्यातील भाजप नेत्यांना विचारला. महाराष्ट्रासह तृणमूल काँग्रेसची सत्ता असलेल्या पश्चिम बंगालच्या चित्ररथालाही परवानगी नाकारण्यात आली आहे. त्यावर बोट ठेवत महाराष्ट्र आणि पश्चिम बंगालचे चित्ररथ यावेळी प्रजासत्ताक दिनी दिसू नयेत यामागे राजकीय षडयंत्र आहे काय? आम्ही प्रखर राष्ट्रभक्त आहोत हा आमचा गुन्हा आहे का?, असे प्रश्नही राऊत यांनी उपस्थित केले.’प्रजासत्ताक दिनानिमित्तच्या संचलनात महाराष्ट्र व पश्चिम बंगालच्या चित्ररथास केंद्र सरकारने परवानगी नाकारली. हा देशाचा उत्सव असून केंद्र सरकारने सर्व राज्यांना प्रतिनिधित्व देणे अपेक्षित आहे. परंतु सरकार आकसाने वागत असून विरोधकांची सत्ता असणाऱ्या राज्यांना सापत्नभावाची वागणूक देतेय’, अशा शब्दांत सुप्रिया सुळे यांनी आपली नाराजी व्यक्त केली.

महाराष्ट्राचा प्रस्ताव विलंबामुळे नाकारला?

दरवर्षी प्रजासत्ताक दिनी निवडक राज्यांचे चित्ररथ दिल्लीत होणाऱ्या पथसंचलनामध्ये सहभागी होत असतात. गेली अनेक वर्षे महाराष्ट्राचा चित्ररथ या पथसंचलनामध्ये सहभागी होत होता. गेल्या पाच वर्षांत दोनदा महाराष्ट्राच्या चित्ररथाने पहिला क्रमांक मिळवला होता. या वर्षी ‘मराठी रंगभूमीची १७५ वर्षे’ या संकल्पनेवर आधारित चित्ररथ साकारण्यात येणार होता. मात्र, केंद्रीय गृहमंत्रालय आणि संरक्षण मंत्रालयाने महाराष्ट्राच्या चित्ररथाला परवानगी नाकारली आहे. त्यामुळे आता यावर्षीच्या प्रजासत्ताक दिनाला राजपथावर महाराष्ट्राचा चित्ररथ दिसणार नाही. संरक्षण मंत्रालयाकडे एकूण ५६ चित्ररथांचे प्रस्ताव आले होते. त्यापैकी चित्ररथांचे २२ प्रस्ताव मंजूर करण्यात आले आहेत. त्यात १६ राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांचे, तर सहा केंद्रीय मंत्रालयांतील चित्ररथ आहेत. मंत्रालयाकडे एकूण ३२ प्रस्ताव हे राज्य सरकारे आणि केंद्रशासित प्रदेशांकडून आले होते. तर अन्य २४ प्रस्ताव हे विविध केंद्रीय मंत्रालये आणि विभागांकडून आले होते. त्यापैकी २२ प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली आहे. महाराष्ट्राचा प्रस्ताव विलंबाच्या कारणास्तव नामंजूर करण्यात आल्याचे बोलले जात आहे तर पश्चिम बंगालचा प्रस्ताव तज्ञ समितीद्वारे दुसऱ्या फेरीतील परीक्षणानंतर फेटाळण्यात आल्याचे मंत्रालयाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

मंत्र्यांच्या स्वागतासाठी झालेल्या गर्दीत चेंगराचेंगरी, दोन महिला जखमी

Gulabrao_patil

जळगाव: शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री गुलाबराव पाटील यांचे आज बुधवारी दुपारी साडेबारा वाजताच्या सुमारास जळगावात आगमन झाले. त्यांच्या स्वागतासाठी रेल्वे स्थानकावर हजारोंच्या संख्येने शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. यावेळी गर्दीमुळे चेंगराचेंगरी होऊन दोन महिला पदाधिकारी जखमी झाल्या.

उद्धव ठाकरे सरकारच्या पहिल्याच मंत्रिमंडळ विस्तारात जळगाव जिल्ह्यातील जळगाव ग्रामीण मतदारसंघाचे आमदार गुलाबराव पाटील यांची कॅबिनेट मंत्रिपदी वर्णी लागली. मंत्रिपदाची शपथ घेतल्यानंतर ते पहिल्यांदाच जळगावात दाखल झाले. मुंबईहून ते गीतांजली एक्सप्रेसने जळगावात पोहचले. त्यांचे स्वागत करण्यासाठी हजारोंच्या संख्येने शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते. गुलाबराव पाटील हे रेल्वे स्थानकातून बाहेर पडत असताना कार्यकर्त्यांनी एकच गोंधळ केला. त्यामुळे चेंगराचेंगरी झाली. त्यात कार्यकर्त्यांच्या गराड्यात अडकलेल्या शिवसेनेच्या महिला पदाधिकारी मंगला बारी आणि शोभा चौधरी या जखमी झाल्या. ही बाब काही कार्यकर्त्यांच्या लक्षात आल्याने त्यांनी दोघांना सुखरूप बाहेर काढले.

दरम्यान, गर्दीमुळे गुलाबराव पाटील हे देखील मध्ये अडकले होते. मात्र, त्यांच्या सुरक्षा ताफ्यातील पोलिसांनी त्यांना सुरक्षेचे कडे देत जिन्याच्या एका बाजूला केले. गर्दी ओसरल्यानंतर त्यांना बाहेर काढण्यात आले. पोलिसांनी गर्दी पांगवल्यानंतर त्यांच्या मिरवणुकीला सुरुवात झाली.

अॅमेझॉन, फ्लिपकार्टला टक्कर; जिओ मार्ट लॉन्च

Jio Mart

नवी दिल्लीः मुकेश अंबानी यांची मालकी असलेल्या रिलायन्स उद्योग समूहाने ई-कॉमर्सच्या क्षेत्रात पाऊल ठेवले आहे. रिलायन्सने आपले नवे जिओ मार्ट लॉन्च केले आहे. यामुळे ई-कॉमर्स क्षेत्रात दिग्गज मानल्या जाणाऱ्या अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टला चांगलीच टक्कर मिळेल, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे.

‘देश की नई दुकान’ या टॅगलाइनसह मुंबई, नवी मुंबई, ठाणे आणि कल्याण भागात प्रथम जिओ मार्ट सुरू केले जाणार आहे. १२ ऑगस्ट २०१९ रोजी झालेल्या रिलायन्सच्या सर्वसाधारण सभेत जिओ मार्ट सुरू करण्याविषयी घोषणा करण्यात आली होती. जिओ मार्टची सेवा आम्ही सुरू केली असून, जिओ ग्राहकांना नोंदणी करण्यासाठी सवलत दिली जाणार असल्याची माहिती रिलायन्स रिटेलच्या अधिकाऱ्यांनी दिली. सुरुवातीला जिओ मार्ट तीन क्षेत्रात आपली सेवा देणार असून, पुढे जाऊन अधिकाधिक क्षेत्रात जिओ मार्टची सेवा सुरू होईल, असेही ते म्हणाले.

जिओ मार्टच्या प्लानबाबत अद्याप अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही. जिओ मार्टच्या ग्राहकांना ५० हजार प्रकारची घरगुती उत्पादने घरपोच देण्याची सुविधा दिली जाणार असून, यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही. ही सेवा ग्राहकांसाठी मोफत असणार आहे. एखादे उत्पादन किंवा वस्तू परत करावयाची असल्यास त्यासाठी कोणत्याही अटी ठेवण्यात आलेल्या नाहीत.

रिलायन्स रिटेलची ई-कॉमर्स सेवा ऑनलाइन आणि ऑफलाइन अशा दोन्ही माध्यमातून देण्यात येणार आहे. सर्व उत्पादक, व्यापारी, छोटे दुकानदार, ब्रॅण्ड आणि सेवा देणाऱ्यांना या ई-कॉमर्स व्यवसायात जोडले जाणार आहे. सुमारे दोन वर्षांच्या योजनेअंतर्गत ही कामे पार पाडली जाणार आहेत. रिलायन्स रिटेलच्या माध्यमातून नेबरहूड स्टोअर, सुपरमार्केट, हायपर मार्केट आदी सेवा पुरवल्या जात आहेत.

दररोज वापरात असणाऱ्या वस्तू, साबण, शॅम्पू आणि अन्य घरगुती सामान्यांच्या विक्रीवर कंपनी सध्या भर देत आहे. चीनमधील अलीबाबा या कंपनीच्या कार्य पद्धतीनुसार, स्थानिक दुकानदारांना ऑनलाइन टू ऑफलाइन बाजारपेठ उपलब्ध करण्याचे काम रिलायन्स जिओ मार्ट करणार आहे. यानुसार, ऑनलाइन पद्धतीने सर्च केलेली उत्पादने, वस्तू आणि अन्य गोष्टी प्रत्यक्ष दुकानात जाऊन खरेदी करण्याचा पर्याय यातून उपलब्ध करून देण्यात येतो.

अजित पवारांचे जोरदार ‘कमबॅक’; महिनाभरात पुन्हा उपमुख्यमंत्री

Ajit Pawar

मुंबई: राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार अवघ्या महिनाभरात पुन्हा एकदा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले आहेत. विधानभवनाच्या प्रांगणात आज झालेल्या शपथविधी सोहळ्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडून अजित पवार यांनी पद व गोपनीयतेची शपथ घेतली. दरम्यान, अजित पवार यांच्याकडे अत्यंत महत्त्वाचे असे गृहमंत्रिपद सोपवले जाणार असल्याची चर्चा आहे.

अजित पवार चौथ्यांदा महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रिपदी विराजमान झाले आहेत. सर्वप्रथम नोव्हेंबर २०१०, त्यानंतर ऑक्टोबर २०१२ आणि त्यानंतर नोव्हेंबर २०१९ मध्ये अजित पवार यांच्यावर उपमुख्यमंत्रिपदाची जबाबदारी देण्यात आली होती. गेल्या महिन्यात जमतेम ८० तासांसाठीच अजित पवार यांच्याकडे हे पद होते. राष्ट्रवादी काँग्रेसमधून बंड करून अजित पवार भाजपसोबत गेले होते आणि २३ नोव्हेंबर रोजी त्यांनी देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर नाट्यमय घडामोडी घडल्या आणि २६ नोव्हेंबर रोजी अजित पवार यांना आपल्या पदाचा राजीनामा द्यावा लागला. पाठोपाठ सरकार अल्पमतात आल्याने देवेंद्र फडणवीस यांनाही मुख्यमंत्रिपदावरून पायउतार व्हावे लागले होते.

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवार यांच्यानंतर अजित पवार हेच दुसऱ्या क्रमांकाचे नेते आहेत, हे आज पुन्हा एकदा सिद्ध झाले. भाजपसोबत सलगी केल्याने अजित पवार यांच्यावर शरद पवार नाराज असल्याचे सांगितले जात होते. ती नाराजी पूर्णपणे दूर करण्यात अजित पवार यांना यश आल्याचेच आता दिसत आहे. अजित पवार यांना उपमुख्यमंत्रिपद मिळावे असा पक्षातील बहुतांश आमदारांचा आग्रह होता. तो लक्षात घेऊन शरद पवार यांनी पुन्हा एकदा अजितदादांवर विश्वास टाकला आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांच्या बंडानंतर बरेच तास ‘नॉट रीचेबल’ झालेले धनंजय मुंडे यांनाही मंत्रिमंडळ विस्तारात मानाचे पान देण्यात आले आहे. अजित पवार यांच्या बंडानंतर शरद पवार व उद्धव ठाकरे यांची पत्रकार परिषद झाली होती. या पत्रकार परिषदेत अजित पवारांनी जो निर्णय घेतला आहे तो त्यांचा वैयक्तिक निर्णय आहे. पक्ष त्यांच्यासोबत नाही, असे पवार यांनी स्पष्ट केले होते. विशेष म्हणजे अजित पवारांच्या शपथेला उपस्थित राहणारे डॉ. राजेंद्र शिंगणे हे राष्ट्रवादीचे आमदार या पत्रकार परिषदेला हजर राहिले व त्यांनी आम्ही शरद पवार यांच्यासोबतच असल्याचे स्पष्ट केले. शिंगणे यांनी दाखवलेल्या या निष्ठेची दखल घेत राष्ट्रवादीकडून शिंगणे यांना कॅबिनेट मंत्रिपदाची बक्षिसी देण्यात आली आहे.

जयंत पाटील नाराज?

बंडानंतर अजित पवार यांना राष्ट्रवादी काँग्रेसच्या विधिमंडळ गटनेतेपदावरून दूर करून ही जबाबदारी जयंत पाटील यांच्याकडे सोपवण्यात आली होती. ठाकरे सरकारमध्ये उद्धव यांच्यासोबत राष्ट्रवादीच्या वतीने शपथ घेणारे जयंत पाटील व छगन भुजबळ हे पहिले दोन मंत्री ठरले होते. दरम्यान, जयंत पाटील यांना उपमुख्यमंत्रिपद मिळेल, अशीही चर्चा होती. मात्र अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदासह मंत्रिमंडळात प्रवेश केल्याने राज्यात राष्ट्रवादीमध्ये अजित पवारच ‘दादा’ असल्याचे स्पष्ट झाले आहे. या घडामोडींमुळे जयंत पाटील काहीसे नाराज असल्याची चर्चा आहे. मात्र पाटील यांनी आपण नाराज नसल्याचे स्पष्ट केले आहे. माझ्याकडे पाहून मी नाराज दिसतो का, असा उलट प्रश्न त्यांनी माध्यमांना विचारला.

Nagpur Weather

Nagpur
haze
27 ° C
27 °
27 °
34 %
1kmh
0 %
Thu
27 °
Fri
37 °
Sat
39 °
Sun
42 °
Mon
41 °

Stay connected

5,248FansLike
422FollowersFollow
500FollowersFollow
394FollowersFollow
2,380SubscribersSubscribe

Most Popular

Top 100 new year Wishes

Top 100 New Year Wishes 2023

0
Top 100 New Year Wishes 2023: If you are searching for some good wishes for the new year 2023 then you are on the...

Dhamma Chakra Pravartan Din : 15 Famous quotes by Dr. Babasaheb Ambedkar

0
Dhamma chakra Pravartan Din also known by the name of DhammaChakra Anupratan Din is a day to praise the Buddhist change of B. R....
Happy Diwali 2021

15+ Unique Happy Diwali wishes for 2022

0
Nowadays the only way through which connection is possible is the social networking site. The biggest festival in India is coming soon. Diwali is...
makar Sankranti

Top 100 best quotes, WhatsApp messages, wishes and greetings for Makar Sankranti 2024

0
Makar Sankranti Wishes : Makara Sankranti (Sankranthi) is a Hindu festival that encourages people to live in peace and harmony. Here are best quotes,...