Tanhaji & Chhapaak Box Office Collection : अजयच्या ‘तानाजी’ने दीपिकाच्या ‘छपाक’ला दिला धोबीपछाड! तीन दिवसांत तिप्पट कमाई

मुंबई : अजय देवगण (Ajay Devgn) आणि सैफ अली खान (Saif Ali Khan) यांची प्रमुख भुमिका असलेल्या ‘तानाजी: द अनसंग वॉरियर’(Tanhaji: The Unsung Warrior) ने विकेंडमध्ये धमाकेदार प्रदर्शन केले आहे. या सिनेमानं पहिल्या आणि दुसऱ्या दिवशीच्या तुलनेत शनिवारी आणि रविवारी जास्त कमाई केली. तानाजीनं रविवारी 25 ते 26 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळं तीन दिवसांत तानाजीची कमाई ही 61.75 कोटी झाली आहे. तर, त्याच दिवशी प्रदर्शित झालेल्या दीपिकाच्या छपाकनं रविवारी 7 ते 7.50 कोटींची कमाई केली आहे. त्यामुळं या सिनेमाची तीन दिवसांची कमाई 18.67 कोटी झाली आहे.

बॉक्स ऑफिस इंडिया डॉट कॉम वेबसाइटनं दिलेल्या माहितीनुसार अजय देवगणच्या या सिनेमानं पंजाब, नवी दिल्ली, उत्तर प्रदेशमध्ये जास्त कमाई केली आहे. या सिनेमाला जवळजवळ 4 हजार स्क्रिन्सवर रिलीज करण्यात आला होता. तर, दीपिका पदुकोणच्या सिनेमाने पहिल्या दिवशी 4.77 कोटी कमाई केली होती. तर, दुसऱ्या दिवशी 30-40% जास्त कमाई केली होती. त्यामुळं शनिवारी आणि रविवारी छपाकनं जवळ जवळ 35 कोटींचा गल्ला जमवला आहे.

दीपिका पादुकोणच्या ‘छपाक’ चे बजेट सुमारे 35 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. ‘छापाक’ ची कथा मालती म्हणजेच अ‍ॅसिड हल्ला पीडिता लक्ष्मी अग्रवालच्या हिच्या जीवनावर आधारित आहे. दरम्यान, या सिनेमा प्रदर्शित होण्याआधी अनेक वादात सापडला होता. तर, तानाजी हा सिनेमा तान्हाजी मालुसरे यांच्या जीवनावर आधारित आहे. छपाक हा सिनेमात वादात सापडल्याचा फायदाही तानाजीला झाला.

छपाक सिनेमाची कहानी आधारित असलेल्या अ‍ॅसिड हल्ला पीडित लक्ष्मी अग्रवाल यांच्यात वकील अपर्णा भट्ट यांनी श्रेय न दिल्याप्रकरणी याचिका दाखल केली होती. आता दिल्ली हाय कोर्टानं वकील अपर्णा भट्ट यांना श्रेय देण्याच्या प्रकरणात फॉक्स स्टुडिओची याचिका फेटाळून लावली आहे. या याचिकेवर सुनावणी करताना दिल्ली उच्च न्यायालयाने पटियाला हाऊस कोर्टाच्या निर्णयाला न्याय्य ठरविले आहे. मुळे हाय कोर्टाच्या निर्णयानंतर चित्रपट निर्मात्याला आता वकील अपर्णा भट्ट यांना श्रेय द्यावे लागणार आहे. दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे की अपर्णा भट्ट यांना श्रेय न दिल्यास 15 जानेवारीपासून चित्रपटगृहात सिनेमा दिसणार नाही. तर, 17 जानेवारीपासून इतर ठिकाणी बंदी घातली जाईल.