खाऊ गल्ली २६ जानेवारीपासून नागरिकांच्या सेवेत

गांधीसागर तलावाजवळील खाऊ गल्ली

नागपूरकेंद्रीय भूपृष्ठ वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते ९ जानेवारी रोजी शुभारंभ झालेली गांधीसागर तलावाजवळील खाऊ गल्ली २६ जानेवारीपासून नागरिकांच्या सेवेत खुली होणार आहे.

खाऊ गल्लीमध्ये ३२ स्टॉल्स असून निविदाधारकांना ईश्वरचिठ्ठीद्वारे त्याचे वाटप करण्यात आले आहे. खवय्यांना विविध प्रकारचे खाद्यपदार्थ येथे मिळणार आहेत. खाऊ गल्लीतील स्टॉलधारकांना सामान ठेवण्यासाठी सोयीचे व्हावे यासाठी शटर लावण्याचे कार्य, काऊंटरचे कार्य आणि एकाच प्रकारचे फलक तयार करण्यासाठी अवधी लागणार आहे. नागपूर महानगरपालिकेतर्फे वॉश बेसीन, पिण्याचे पाणी आणि प्रत्येक स्टॉल धारकाला स्वतंत्र वीज मीटर देण्यात येणार आहे. सांड पाण्याची व्यवस्था व स्टॉलच्या मागील भागात रोज लागणारे जड सामान ठेवण्याकरिता दोन पायऱ्या तोडून शटर लावण्यात येणार आहे. जेणेकरून त्यांचे सामान सुरक्षित राहील. या कामासाठी १५ ते २० दिवसांचा अवधी लागणार असून २६ जानेवारी रोजी खाऊ गल्ली खवय्यांच्या सेवेत रुजू होईल. अशी माहिती उदयान अधीक्षक अमोल चौरपगार यांनी दिली आहे.