Home Blog Page 138

कोरोना संसर्ग टाळण्यासाठी नागपुरातील युवा डॉक्टरने बनविले डॉक्टर्स सेफ्टी बॉक्स!

Doctor safety box

नागपूर: देशासह राज्यात कोरोनाच्या रुग्णांमध्ये वाढ होत आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांवर जबाबदारी वाढली आहे. कोरोनाग्रस्त रूग्णाच्या शरीरातून बाहेर पडणार्‍या द्रवाच्या माध्यमातून संपुर्ण जगात कोरोनाचे संक्रमण मोठ्या प्रमाणावर झाले आहे. अशातच रूग्णावर उपचार करणारे डॉक्टर स्वतःचा जीव धोक्यात घालून कोरोनाबाधित रूग्णांवर उपचार करीत आहेत.

कोरोनाबाधिताचा संसर्ग होऊन चीन, इटली मध्ये अनेक डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यामुळे उपचार करणाऱ्या डॉक्टरांना कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी नागपुरातील प्रसिध्द युवा डॉक्टर समीर अरबट यांनी एक अनोखे सुरक्षा किट बनविले आहे. याच सुरक्षा किटला डॉ अरबट यांनी “डॉक्टर्स सेफ्टी बॉक्स” असं म्हटलं आहे.

संपुर्ण भारतीय बनावटीच्या या किटमुळे कोरोनाबाधित रूग्णांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना कोरोनाचा संसर्ग टाळता येऊ शकतो असा दावा डॉ. समीर अरबट यांनी बोलताना केला. आयसोलेशनमधील कोरोनाबाधित रूग्णांवर उपचार करताना डॉक्टर, परिचारिका आणि त्यांचे सहाय्यक यांना आवश्यक ती सावधानता आणि सतर्कता बाळगण्याची गरज असते. मात्र तरीही डॉक्टरांना आणि परिचारकांना कोरोनाचा संसर्ग झाल्याची कित्येक उदाहरणं मागील दोन महिन्यात आढळले आहेत. दवाखान्यातील डॉक्टर्स, नर्सेस आणि पॅरामेडिकल स्टाफ यांना देखील यावेळी सेफ्टी किट म्हणून वाफेवर तापवून निर्जंतूकीकरण करता येण्यासारखे गाऊन, कॅप आणि मास्क देण्यात येतात.

मात्र अशा रूग्णांची ‘ब्रांकोस्कोपी’ करताना रूग्णाच्या घशात नळी टाकण्यात येते. ब्रांकोस्कोपच्या मदतीने श्वसनवाहिन्याची तपासणी केली जाते. या तपासणी दरम्यान रूग्णाला खोकला किंवा शिंका येण्याची दाट शक्यता असते. अशावेळी रूग्णाच्या खोकल्यातून बाहेर पडणारे द्रव तेथे उपस्थित असलेल्या डॉक्टरसह त्यांच्या सहाय्यकांच्या अंगावर पडले तर कोरोनाच्या संसर्गाचा धोका बळावतो. हा धोका टाळण्यासाठी डॉ. समीर अरबट यांनी हे सुरक्षा कीट बनविले आहे. डॉक्टर, परिचारिका यांच्याकरिता हे कीट सुरक्षेच्या दृष्टीने उपयुक्त आहे. कोरोनावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांनी हे किट वापरावे असे आवाहन डॉ. समीर अरबट यांनी केले आहे.

Coronavirus: 121 prisoners released from Nagpur jail, 2117 from Maha so far

किट नेमकी कशी आहे?

डॉ. समीर अरबट यांनी बनविलेले हे सेफ्टी किट म्हणजे साधारणतः दोन बाय दीड फुट आकाराचा एक आयताकृती खोका आहे. उपचार करताना हा खोका रूग्णाच्या मानेपासून वरील भागावर म्हणजेच संपुर्ण चेहर्‍यावर ठेवण्यात येतो. अॅक्रीलीक शीटच्या सहाय्याने बनविलेला हा खोका संपूर्णत: पारदर्शक आहे. या खोक्यातून एक हात जाऊ शकेल एवढ्या आकाराचे तीन छिद्र तयार करण्यात आले आहे. जेणेकरून डॉक्टर, परिचारिका यांना त्या छिद्रातून हात घालून रूग्णाच्या श्वसनवाहिन्याची तपासणी करताना लागणार्‍या नलिका रूग्णाच्या मुखावाटे आत सोडता येतील.

दहा तासांचे ऑपरेशन करोना

मुखावाटे नलिका आत सोडताना रूग्णाला खोकला आला तरी खोकल्यातून बाहेर इतरत्र उडणारे द्रवपदार्थ या खोक्याच्या बाहेर उडत नाही. आणि कोरोना चे संक्रमण रोखण्यासाठी या खोक्याच्या सहाय्याने डॉक्टरांना स्वतः चा बचाव करता येऊ शकतो. हे कीट बनवायला साधारणपणे दोन हजार रूपयांचा खर्च अपेक्षित आहे. वापरलेल्या किटचे निर्जंतूकीकरण करून तीच किट पुन्हा दुसर्‍या रूग्णाकरीता उपयोगात आणता येईल असे डॉक्टर अरबट यांनी सांगितले. एका किटच्या मदतीने शंभर रूग्णांचा उपचार करता येतो.

कोण आहेत डॉ. समीर अरबट

डॉ. समीर अरबट हे नागपुरच्या क्रिम्स हॉस्पीटल मध्ये पल्मनॉलॉजीस्ट आहेत. त्यानी वर्धा येथील सावंगी वैद्यकीय महाविद्यालयातून एमबीबीएसची पदवी घेऊन तेथूनच पल्मनॉलॉज मध्ये पदव्युत्तर पदवी पूर्ण केली आहे. या पुर्वी त्यांनी पल्मनॉलॉजीवर दोन शोधनिबंध सादर केले आहेत. अमेरिकन कॉलेज ऑफ चेस्ट फिजीशियनची त्यांनी फेलोशीप पूर्ण केली आहे.

इटली येथूनही त्यांनी इंटरवेन्शनल पल्मनॉलॉजी या विषयात फेलोशीप मिळविली आहे. न्युयार्क येथील रोचेस्टर विद्यापीठात त्यांनी वैद्यकीय शिक्षण घेणार्‍या विद्यार्थ्यांना प्रशिक्षण दिले आहे. नागपुरात येण्यापूर्वी डॉ. अरबट यांनी मुंबईच्या केईएम रूग्णालय, टाटा कॅन्सर हॉस्पीटल आणि नवी दिल्ली येथील राजीव गांधी कॅन्सर इन्स्ट्यीट्यूट येथे सेवा दिली आहे.

Also Read- ‘रुग्णालयाची अवस्था उकिरड्या सारखी झाली आहे, काम जमत नसेल तर घरी जा’

‘रुग्णालयाची अवस्था उकिरड्या सारखी झाली आहे, काम जमत नसेल तर घरी जा’

“No leave for health officials” Tukaram Mundhe
“No leave for health officials” Tukaram Mundhe

नागपूर : पुढारी ऑनलाईन नागपूर महापालिकेच्या सर्वात चांगल्या असणाऱ्या रुग्णालयाची अवस्था आज उकिरड्या सारखी झाली आहे. काम जमत नसेल तर घरी जा, असे प्रकार सहन केले जाणार नाहीत असा इशारा नागपूर महापालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना दिला. महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. याच पार्श्वभूमीवर तुकाराम मुंढे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांचा क्लास घेतला.

महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. नागपुरातही रुग्ण सापडले आहेत. काही नागरिकांना होम क्वारंटाईनवर ठेवले आहे. नागपूर महापालिकेचे डॅाक्टर्स प्रॅक्टिस करत नाहीत. त्यामुळे रुग्णांची गैरसोय होत आहे. ज्यांना काम जमत नाही त्यांनी घरी जावे. कोरोना विरुद्ध लढण्यासाठी आरोग्य विभागाने सज्ज रहावे, असा आदेशही आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला.

आयुक्त तुकाराम मुंढे यांनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना चांगलेच झापले. प्रशासनातील माहिती बाहेर कशी जाते. याबाबत त्यांनी नाराजी व्यक्त केली. नागपुरात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे दक्ष राहण्याच्या सुचनाही दिल्या. लॉकडाऊनचे पालन योग्यरित्या होत नसल्याने प्रशासनाच्या प्रयत्नांना यश मिळत नाही. नागरिकांनी लॉकडाऊनच्या निर्णयाचे पालन न केल्यास गंभीर परिस्थितीला सामोरे जावे लागेल. असा इशाराही त्यांनी दिला.

Also Read- दहा तासांचे ऑपरेशन करोना

दहा तासांचे ऑपरेशन करोना

Nizamuddin gathering

नागपूर: दिल्लीच्या निजामुद्दीनमध्ये झालेल्या मरकजमध्ये नागपूरचे ५६जण सहभागी असल्याची वार्ता शहरात धडकली आणि एकच खळबळ उडाली. मंगळवारी रातोरात २२ पोलिस ठाण्यांच्या हद्दीत तब्बल दहा तास ‘ऑपरेशन करोना’ राबविण्यात आले आणि ५४ जणांना ताब्यात घेतले गेले. त्यांना आमदार निवासमध्ये स्थानबद्ध करण्यात आले असून, त्यांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले आहेत.

दिल्लीतील निजामुद्दीन परिसरात एक धार्मिक कार्यक्रम झाला. त्यात हजारो लोक सहभागी झाले होते. त्यातील अनेकांना पुढे करोनाची लागण झाल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे या कार्यक्रमात कोण कोण उपस्थित होते, याचा शोध घेतला गेला. देशातील अनेक राज्यांतील लोकांची त्यात उपस्थिती असल्याचे आढळून आल्याने त्या-त्या राज्यांना आणि शहरांना सावध करण्यात आले.

समाजकार्य करतानाही दिशानिर्देशांचे पालन करा!

दिल्लीहून आली यादी

मरकजमध्ये सहभागी झालेल्या लोकांमध्ये महाराष्ट्रातील किती लोक होते, याची यादी दिल्ली सरकारने महाराष्ट्र सरकारला पाठवली. राज्य सरकारने त्यातील नागपूरच्या ५६ जणांची यादी नागपूर महापालिकेला पाठविली. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पोलिस आयुक्त भूषणकुमार उपाध्याय यांना माहिती दिली आणि पुढे काही तास शहरभर एकच ऑपरेशन चालले.

२२ पथके तयार

यादी हातात पडताच पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, पोलिस सहआयुक्त रवींद्र कदम यांनी या संशयित नागरिकांच्या धरपकडीसाठी ‘ऑपरेशन करोना’ राबविण्याचा निर्णय घेतला. उपाध्याय, कदम यांनी विशेष शाखेच्या उपायुक्त श्वेता खेडकर यांच्याकडे या मोहिमेची सूत्रे सोपविली. खेडकर यांनी विशेष शाखा व गुन्हेशाखेच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या मदतीने सुरुवातीला नागरिक राहत असलेल्या ठिकाणांची माहिती काढली. ५४ नागरिक शहरातील २२ पोलिस स्टेशनच्या हद्दीत राहत असल्याचा निष्कर्ष खेडकर यांनी काढला. त्यानुसार या २२ पोलिस स्टेशनच्या वरिष्ठ पोलिस निरीक्षकांना तत्काळ पथक तयार करण्यास सांगितले. त्यानुसार २२ पथके तयार करण्यात आली. यात एक अधिकारी व पाच कर्मचाऱ्यांच्या समावेश होता. पथक तयार होताच पोलिस आयुक्तांनी पथकातील कर्मचाऱ्यांना सावधगिरीच्या सूचना करीत डॉक्टरांचाही समावेश करण्याचे निर्देश दिले.

Coronavirus: 121 prisoners released from Nagpur jail, 2117 from Maha so far

सलग दहा तास

श्वेता खेडकर यांनी या संशयितांच्या धरपकडीसाठी फुल प्रूफ प्लान तयार केला. रात्री ८ वाजताच्या सुमारास पोलिसांनी ‘ऑपरेशन करोना’ राबवायला सुरुवात केली. रातोरात जागोजागी पोलिसांचे डग्गे पोहोचले. यादीतील लोकांना ताब्यात घेतले. ही कारवाई पहाटे ६ वाजेपर्यंत चालली.

मुक्काम आमदार निवास

ताब्यात घेतलेल्या सगळ्या व्यक्तींना आमदार निवासमध्ये स्थानबद्ध करण्यात आले. तिथेच त्यांचे नमुने घेण्यात आले आणि ते तपासणीसाठी पाठविण्यात आले. त्यांचे नमुने निगेटिव्ह आले तर त्यांची मुक्तता केली जाईल, ते पॉझिटिव्ह आले तर त्यांच्या परिवारासही तपासणीसाठी बोलावले जाण्याची शक्यता आहे.

दहाजण परप्रांतीय

धार्मिक कार्यक्रमात सहभागी झालेले दहा नागरिक हे अन्य राज्यांतील असून, ते कार्यक्रम संपल्यानंतर नागपुरातच वास्तव्यास होते. या दहा नागरिकांचे पत्ते शोधण्यास पोलिसांना मोठी अडचण गेली. परंतु, अनुभवाचा फायदा घेत पोलिस तेथपर्यंत पोहोचले. दिल्लीहून नागपुरात परतलेल्या काही नागरिकांनी स्वत: डॉक्टरकडे जाऊन तपासणी केल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

Also Read- Suspect from Nizamuddin gathering of Tablighi Jamaat admitted in GMCH Nagpur

Coronavirus: 121 prisoners released from Nagpur jail, 2117 from Maha so far

Nagpur Jail

Mumbai: In a bid to decongest jails in view of the coronavirus outbreak, the Maharashtra government on Wednesday released 412 prisoners from various facilities, taking their total number to 2117 in the last five days, an official said.

The government had decided to release those prisoners who are serving jail terms for a period of less than seven years, an official said.

Suspect from Nizamuddin gathering of Tablighi Jamaat admitted in GMCH Nagpur

Accordingly, the Prisons department started releasing such prisonerson bail from March 27, he said, adding that 412 prisoners were released on Wednesday.

While 272 prisoners have been released from the Mumbai Central Prison, 236 ohers were released from Thane and 176 from the Taloja Central Prison, he said, adding that 26 women inmates were released from Byculla prison.

A total of 161 prisoners were released from Yerawada Central Prison in Pune, 121 from Nagpur jail, and 134 others from Amaravati, he said.

In Aurangabad region, 68 prisoners were released from the Aurangabad Central Prison and 70 others from the Nashik Road Central Prison, he added. PTI DC NSK NSK

Also Read- समाजकार्य करतानाही दिशानिर्देशांचे पालन करा!

समाजकार्य करतानाही दिशानिर्देशांचे पालन करा!

“No leave for health officials” Tukaram Mundhe
“No leave for health officials” Tukaram Mundhe

नागपूर, ता. ३१: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या ‘लॉकंडाऊन’ दरम्यान गरजू लोकांना अनेक स्वयंसेवी संस्था मदतीचा हात देत आहे. मात्र मदत पुरविताना गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. सामाजिक अंतर पाळावे, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

तब्बल सहा दिवसांनी नागपूरच्या जीवात जीव

यासंदर्भात बोलताना ते म्हणाले, लॉकडाऊनदरम्यान हातावर पोट असणाऱ्यांना अडचणीतून जावे लागत आहे. त्यांच्या मदतीसाठी अनेक हात पुढे आले आहेत. अनेक स्वयंसेवी संस्था, समाजसेवक अशा गरजू लोकांना अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करीत आहे. रस्त्यांवर असणाऱ्या लोकांनाही अन्न पुरविले जात आहे. मात्र हे करताना काही ठिकाणी मदत घेण्यासाठी अनेक लोक एकत्र येत आहेत. यामुळे कोरोनाचे समूह संक्रमण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. लॉकडाऊनच्या उद्देशालाच हरताळ फासल्या जात आहे. समाजकार्य करायलाच हवे. मात्र, कोरोनाचे संक्रमण होऊ नये यासाठी शासनाने दिलेले दिशानिर्देश पाळायलाच हवे, असे आवाहन त्यांनी केले आहे. तसे न झाल्यास, दिशानिर्देशाचे उल्लंघन झाल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशाराही मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.

Also Read- बुलडाण्यात तरुणाला करोनाची लागण; चिंता वाढली

बुलडाण्यात तरुणाला करोनाची लागण; चिंता वाढली

Coronavirus: नियम आणि शिस्तीचे पालन करून हे ९० गावं झाले करोनामुक्त

बुलडाणा: बुलडाण्यात आज आणखी एकाला करोनाची लागण झाली असून येथील करोना रुग्णांची संख्या चार झाली आहे. धक्कादायक बाब म्हणजे एका २३ वर्षाच्या तरुणाला करोनाची लागण झाल्याने चिंतेत भर पडली आहे.

बुलडाण्यात ‘त्या’ मृताच्या कुटुंबातील दोघांना करोना

बुलडाण्यात एका २३ वर्षाच्या तरुणाला करोनाची लागण झाली असून येथील करोना रुग्णांची संख्या चारवर पोहोचल्याचं जिल्हा शल्य चिकित्सक प्रेमचंद पंडित यांनी सांगितलं. जिल्ह्यातील अजून ८ चाचण्यांचे रिपोर्ट येणे बाकी असून त्यातील एक रिपोर्ट हायरिस्क नमुन्याचा असल्याचंही त्यांनी सांगितलं. आज सापडलेल्या रुग्णाच्या परिसराला सील करण्यात येणार असून त्याच्या संपर्कात आलेल्या त्याच्या कुटुंबासहीत मित्रपरिवारातील लोकांचीही चाचणी करण्यात येणार असल्याचं सूत्रांनी सांगितलं. दरम्यान, आज सापडलेला हा रुग्ण परदेशातून आलेला नव्हता. त्याची परदेशवारीची हिस्ट्रीही नव्हती. त्यामुळे तो नेमका कुणाकुणाच्या संपर्कात आला आणि त्यांच्या संपर्कातील कुठला व्यक्ती परदेशातून आला होता, याचीही माहिती घेण्यात येणार आहे. बुलडाण्यात या आधी करोनामुळे एकाचा मृत्यू झाला आहे. त्यातच हा नवीन रुग्ण आढळल्याने चिंता वाढली आहे.

दरम्यान, राज्यात मंगळवारी करोनाचे ७२ रुग्ण सापडल्याने आरोग्य यंत्रणेची डोकेदुखी वाढलेली असतानाच आज पुन्हा राज्यात १८ नवे रुग्ण आढळल्याने आरोग्य यंत्रणेच्या चिंतेत भर पडली आहे. या १८ पैकी मुंबईत १६ आणि पुण्यात दोन रुग्ण पॉझिटिव्ह आढळले आहेत. त्यामुळे राज्यातील करोनाग्रस्तांची संख्या ३२०वर गेली आहे. मात्र, गेल्या तीन-चार दिवसांत करोना रुग्ण मोजण्यात चूक झाल्याने ही संख्या वाढल्याचं सूत्रांनी सांगितलं.

Also Read- तब्बल सहा दिवसांनी नागपूरच्या जीवात जीव

Suspect from Nizamuddin gathering of Tablighi Jamaat admitted in GMCH Nagpur

Nizamuddin gathering

Nagpur: One out of eight persons who arrived to city after attending religious congregation organized by the Tablighi Jamaat in Delhi was rushed to Government Medical College and Hospital (GMCH) on Tuesday. The man reportedly showed the symptoms of novel Corona Virus (Covid-19) following which the District Administration put him in an isolated ward at GMCH. Doctors have performed all the tests and the detail reports in the regards is awaiting.

बुलडाण्यात ‘त्या’ मृताच्या कुटुंबातील दोघांना करोना

The Maharashtra Police and state administration have already started zeroing in on those who took part in a religious congregation organised by the Tablighi Jamaat in Delhi in the early days of March.

कनिका कपूर ५ व्यांदा कोरोना पॉझिटिव्ह, डॉक्टर म्हणाले…

Several cases of Corona Virus in the country have been traced to the gathering organised by the religious group that took place in the capital earlier in March. Members of the group then travelled all across India, and state authorities have started looking for them.

Also Read- तब्बल सहा दिवसांनी नागपूरच्या जीवात जीव 

तब्बल सहा दिवसांनी नागपूरच्या जीवात जीव

nagpur-corona

नागपूर: करोना विषाणू जगाच्या पाठीवरील अनेक बलाढ्य देशांमधील सार्वजनिक आरोग्याला व्हेंटिलेटरवर पोहोचवित आहे. त्याने नागपुरात दस्तक देऊन मंगळवारी २१ दिवसांची साखळी पूर्ण केली. या मागच्या तीन आठवड्यांमध्ये करोनाबाधितांचा आकडा १६ वर येऊन पोचला असला तरी ज्या झपाट्याने तो वाढतो, त्याची गती मंदावण्यास मात्र उपराजधानीने आतापर्यंत अंशत: का होईना, यश मिळविले आहे. त्यामुळे या पुढील काळ खऱ्या अर्थाने नागपूरकरांसाठी कसोटीचा काळ ठरणार आहे. यातील आणखी समाधानाची बाब म्हणजे, २६ मार्चपासून सुरू असलेली करोनाबाधितांची साखळीदेखील मंगळवारी तब्बल १२ दिवसांनी खंडित झाली आहे.

दोहामार्गे अमेरिकेतून नागपुरात पोहोचलेल्या एका माहिती क्षेत्रातील अभियंत्याला सर्वांत पहिले ११ मार्चला करोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर एका मागोमाग एक पहिल्या बाधित रुग्णाच्या संपर्कात आलेली त्याची पत्नी आणि त्याच्यासोबत अमेरिकेला गेलेले दोन सहकारी सलग दोन दिवस करोनाबाधित झाल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे नागपूरकरांचा जीव टांगणीला लागला होता.

बुलडाण्यात ‘त्या’ मृताच्या कुटुंबातील दोघांना करोना

सुदैवाने त्यांच्या संपर्कात आलेल्यांची साखळी मोडून काढण्यात यश आल्याने पुढचे १२ दिवस ही साखळी जोडली गेली नाही. बाधितांची संख्या पुढचे १२ दिवस चौकाराच्या पुढे जाऊ शकली नव्हती. तोवर २२ मार्चला पंतप्रधानांनी देशभर एक दिवसाचा लॉकडाउन जारी केला. या मधल्या काळात आंतरराष्ट्रीय विमानप्रवासावर मर्यादा आली तरी देशांतर्गत विमान वाहतूक सुरूच होती.

त्यामुळे नवी दिल्ली येथून प्रवास करून आलेल्या खामला भागातील एका व्यापाऱ्यामुळे ही खंडित झालेली लागण साखळी २६ मार्चला पुन्हा सुरू झाली. त्यापाठोपाठ एका मागे एक असे पुढचे सलग ११ दिवस करोनाबाधितांचा आकडा समोर येतच राहिला. यापैकी अवघ्या सहा दिवसांत संपर्कात आलेल्या १२ जणांना करोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. त्यात नवी दिल्ली येथूनच आलेल्या आणखी एका नव्या करोनाग्रस्ताने नागपूरकरांना लागलेला घोर पुन्हा वाढविला. त्यामुळे साखळी खंडित होईल, की नाही ही धास्ती नागपूरकरांना बसली असताना १२ दिवसांच्या खंडानंतर ही साखळी मोडण्यात मंगळवारी पुन्हा यश आले. सुदैवाने आतापर्यंत एकही रुग्ण सकारात्मक न आल्याने नागपूरकरांच्या जीवात जीव आला आहे.

‘त्या’ संशयिताचाही अहवाल निगेटिव्ह

या घडामोडीत सोमवारी सायंकाळी साडेचारच्या सुमारास इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात करोनासदृश्य आजाराची लक्षणे घेऊन एक जण तपासणीसाठी आला. त्याचा इतिहास घेतला जात असतानाच अवघ्या दीड तासांत हा रुग्ण प्रकृती अत्यवस्थ झाल्याने दगावला. त्यामुळे संपूर्ण आरोग्य यंत्रणेची झोप उडाली. त्याच्या घशातील द्रवाच्या नमुन्याची तातडीने तपासणी केली असता त्याचा अहवाल नकारात्मक आला. त्यामुळे सर्वांनीच सुटकेचा श्वास टाकला आहे.

पुढचा टप्पा कसोटीचा

शहरात पहिला करोनाबाधित रुग्ण आढळल्यानंतर २१ दिवसांची साखळी पूर्ण झाली आहे. त्यामुळे पुढचा टप्पा हा समुदाय प्रादुर्भावाचा असू शकतो, असे आरोग्य क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. असे झाल्यास गुणाकार पद्धतीने रुग्ण वाढण्याची जोखीम लक्षात घेता करोनाबाधित मूळ रुग्णाचा शोध घेणे आव्हान ठरणार आहे. त्यामुळे पुढचा टप्पा हा नागपूरकरांसाठी कसोटीचा ठरणार आहे. संवेदनशीलपणे लॉकडाउन पाळला तर ही साखळी मोडून काढता येणे शक्य होणार आहे. त्यामुळे प्रशासनदेखील ‘घरातच बसा, सुरक्षित रहा,’ असे आवाहन करीत आहे.

Also Read- कनिका कपूर ५ व्यांदा कोरोना पॉझिटिव्ह, डॉक्टर म्हणाले…

कोरोनाग्रस्तांवर उपचार करणारे ‘ते’ हॉस्पिटल सिलमनपाच्या आरोग्य विभागातर्फे कारवाई

hospital-seal

नागपूर : कोरोनाग्रस्त रुग्णांवर उपचार करणारे शहरातील एक हॉस्पिटल आणि दोन डायगनोस्टीक सेंटर सिल करण्यात आले आहेत. नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागातर्फे ही कारवाई करण्यात आली आहे.

नागपुरातील जरीपटका येथील जनता हॉस्पिटल, रामदासपेठ येथील रेनबो मेडिनोवा डायगनोस्टीक सेंटर यासह रामदासपेठ येथील पेनोरमा एम.आय.आर. सेंटर येथे शहरातील काही कोरोनाग्रस्त उपचार करण्यात आले होते. यासंदर्भात माहिती मिळताच मनपाच्या आरोग्य विभागातर्फे एक हॉस्पिटल आणि दोन डायगनोस्टीक सेंटरचे निर्जंतुकीकरण करून ते सिल करण्यात आले आहेत, अशी माहिती मनपाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण गंटावार दिली. केंद्र सरकारच्या निर्देशानुसार सदर हॉस्पिटल संदर्भात आरोग्य विभागातर्फे पुढील कार्यवाही करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

कनिका कपूर ५ व्यांदा कोरोना पॉझिटिव्ह, डॉक्टर म्हणाले…

कनिका कपूर

बॉलिवूड गायिका कनिका कपूरला कोरोनाची लागण झाल्यापासून ती अधिक चर्चेत आली आहे. आता कनिका कपूरची कोरोनाची चाचणी पाचव्यांदा पॉझिटिव्ह आली आहे. याआधी चारही चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. पाचव्यांदा पॉझिटिव्ह चाचणी आल्यानंतर डॉक्टर आशावादी आहेत.

कोरोना बाधित रुग्णाची तपासणी प्रत्येक ४८ तासानंतर केली जाते. कनिकावर लखनौमधील संजय गांधी पीजीआय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जेव्हा कनिकाची चौथी चाचणीही पॉझिटिव्ह आली, तेव्हा तिने सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. कनिकाने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत लिहिले होते, मला अपेक्षा आहे की, माझी पुढची चाचणी निगेटिव्ह येईल. कनिकाने एक मोटिवेशनल कोट लिहिले होते, ‘जिंदगी हमे वक्त का सही इस्तेमाल करना सिखाती है जबकि वक्त हमे जिंदगी की कीमत समझाता है’

घाबरण्याचे कारण नाही. कनिकाची प्रकृती स्थिर आहे, असे डॉक्टरांनी म्हटले आहे.

तसेच कनिका कपूरने आपली मुले आणि कुटुंबाला आठवण करत म्हटले होते की, सर्व सुरक्षित असतील. कनिका कपूरने खुद्द सोशल मीडियावर माहिती दिली होती की, ती कोरोनाने बाधित आहे. त्यानंतर काही दिवसांनंतर तिने आपली पोस्ट डिलीट केली होती.

वाहनधारकांना दिलासा; नितीन गडकरींनी घेतला ‘हा’ निर्णय

Union Minister of Road Transport and Highways, Nitin Gadkari attends Media Launch of Hyderabad Circuit of ABB FIA Formula E World Championship, in Mumbai
Union Minister of Road Transport and Highways, Nitin Gadkari attends Media Launch of Hyderabad Circuit of ABB FIA Formula E World Championship, in Mumbai

जगासह देशात कोरोनाने थैमान घातले आहे. देशात २१ दिवसांसाठी लॉकडाऊन जाहीर करण्‍यात आले आहे. अशा परिस्‍थितीमध्‍ये आज ३१ मार्चच्‍या पार्श्वभूमिवर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी वाहनधारकांच्‍या दृष्‍टीकोनातून एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

ज्या गाड्यांचे रजिस्ट्रेशन, फिटनेस सर्टिफिकेट, परमीट तसेच ड्रायव्हिंग लायसेन्स यांची मुदत 31 मार्चपर्यंत वैध आहे. त्यांना 30 जून पर्यंत मुदतवाढ देण्याचे निर्देश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले आहेत. सगळ्या राज्य सरकारने निर्देशाचे पालन करून लोकांना कुठलाही त्रास होणार नाही, याची दक्षता घ्यावी, अशी विनंती त्‍यांच्‍याकडून करण्यात आली आहे.

बुलडाण्यात ‘त्या’ मृताच्या कुटुंबातील दोघांना करोना

corona-positive

बुलडाणा: जिल्हा सामान्य रुग्णालयात मृत्यू झालेल्या करोना बाधिताच्या संपर्कात आलेल्या दोघांचे चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याचं आज, मंगळवारी स्पष्ट झालं. बुलडाण्यातील करोनाबाधितांचा आकडा तीनवर पोहोचला आहे. त्यामुळं आरोग्य यंत्रणा सतर्क झाली असून, आणखी नऊ अहवाल प्राप्त व्हायचे आहेत.

करोनाचे आणखी दोन रुग्ण सापडल्यानं बुलडाणा जिल्हा हादरून गेला आहे. जिल्ह्यात लॉकडाऊन असून, शहर सीमा बंद केल्या आहेत. मृत व्यक्तीच्या सान्निध्यात आलेल्या सर्वांना आरोग्य यंत्रणेकडून तपासणीसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्यातील ३२ जणांचे स्वब नमुने नागपूर येथे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. सुमारे ७१ जणांना रविवारी सायंकाळपर्यंत रुग्णालयात दाखल करण्यात आले. यातील पाच जणांना जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन कक्षात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

नागपूर येथून प्राप्त झालेले २० जणांचे चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने सोमवारी काहीसा दिलासा मिळाला होता. मात्र, आज मंगळवारी सकाळी मिळालेल्या तीन अहवालांपैकी दोघांचे अहवाल पॉझिटिव्ह आहेत. हे दोघेही मृत व्यक्तीच्या कुटुंबातील सदस्य असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित यांनी दिली. यात एक ६५ वर्षीय वृद्ध असून, एका १२ वर्षीय मुलीचा यात समावेश आहे. अजून नऊ अहवाल प्राप्त व्हायचे आहेत. आरोग्य विभागानं ४० पथके तयार केली असून, शहरात घरोघरी जाऊन ते तपासणी करत आहेत. नागरिकांनी घरातच राहवे, असे आवाहन करण्यात येत आहे.

Corona Effect: सरकारी कर्मचाऱ्यांना मार्च महिन्यात अर्धाच पगार

Ajit Pawar

मुंबई: ‘करोना’च्या प्रादुर्भावामुळे निर्माण झालेल्या आरोग्य व आर्थिक परिस्थितीवर मात करण्यासाठी राज्याच्या मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांपासून, विधीमंडळाचे सर्व सदस्य तसेच स्थानिक स्वराज संस्थांच्या सदस्यांपर्यंत सर्व लोकप्रतिनिधींच्या मार्च महिन्याच्या वेतनात 60 टक्के कपात करुन त्यांना 40 टक्के वेतन देण्यात येणार आहे.

राज्यातील ‘अ’ आणि ‘ब’ वर्गातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या वेतनात 50 टक्के कपात करण्यात आली असून त्यांना निम्मे वेतन देण्यात येणार आहे. ‘क’ वर्गाच्या कर्मचाऱ्यांना 75 टक्के वेतन मिळेल. ‘ड’ वर्गाच्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात कोणतीही कपात करण्यात आलेली नाही. राज्य शासकीय अधिकारी-कर्मचारी संघटनांच्या प्रतिनिधींशी चर्चा करुन हा निर्णय घेण्यात आला आहे. उपमुख्यमंत्री तथा वित्त व नियोजनमंत्री अजित पवार यांनी ही माहिती दिली.

‘कोरोना’चं संकट आणि ‘टाळाबंदी’मुळे राज्याच्या आर्थिक उत्पन्नात झालेली घट लक्षात घेऊन तसेच ‘कोरोना’विरुद्धच्या लढ्याला नैतिक आणि आर्थिक बळ देण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला असल्याचे उपमुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहांचे तसेच राज्यातील सर्व स्थानिक स्वराज संस्थांचे अध्यक्ष, पदाधिकारी, सदस्य तसेच राज्यातील सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी या निर्णयाला पाठिंबा, सहकार्य देतील, असा विश्वास उपमुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.

नागपुरातील इसमाचा ‘बुलडाणा पॅटर्न’ मृत्यू

Coronavirus nagpur: पाच प्रकारच्या नवीन स्ट्रेनमुळे नागपुरात करोनाचा उद्रेक

नागपूर: न्यूमोनियाचा उपचार सुरू असलेल्या बुलडाणा येथील रुग्णाचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर हा रुग्ण करोना पॉझिटिव्ह असल्याचे लक्षात आले आणि खळबळ उडाली. असाच प्रकार नागपुरातही घडला आहे. शहरातील एका खासगी रुग्णालयात पाच दिवसांपासून न्यूमोनियाचा उपचार घेणाऱ्या रुग्णाचा मृत्यू झाला आहे. हा करोनाबाधित होता की नाही, याबाबतच्या अहवालाची प्रतीक्षा आहे. अहवाल पॉझिटिव्ह आल्यास चिंतेत भर पडणार आहे.

मृत्यू झालेला हा ४५ वर्षीय संशयित रुग्ण १४ मार्च रोजी नवी दिल्ली येथून प्रवास करून नागपुरात आला होता. त्यानंतर त्याची प्रकृती बिघडली. पाच दिवसांपूर्वी तो खासगी रुग्णालयात भरती झाला. या रुग्णाला न्यूमोनिया झाल्याचे निदान करण्यात आले. सोमवारी या रुग्णाची प्रकृती खालावली. अखेरीस त्याची मेयोत रवानगी करण्यात आली. मेयोत हलवून तासभर होत नाही तोच सोमवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास त्याचा मृत्यू झाला. मेयोतील डॉक्टरांची चिंता वाढली. ही माहिती तातडीने मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया यांना देण्यात आली. डॉ. केवलिया यावेळी जिल्हाधिकाऱ्यांकडील बैठकीला उपस्थित होते. ती बैठक अर्धवट सोडून ते मेयोत आले. या संशयित रुग्णाच्या घशातील द्रवाचे नमुने तातडीने प्रयोगशाळेत पाठवण्यात आले आहे. अहवालाची प्रतीक्षा आहे.

माहितीच दिली नाही

न्यूमोनियाची लक्षणे आणि करोनाची लक्षणे ही सारखी असल्याचे स्पष्ट होऊ लागले आहे. महापालिकेच्या आरोग्य विभागाने प्रत्येक न्यूमोनियाग्रस्त व्यक्तीला करोना संशयित गृहीत धरून तिच्या घशातील द्रवाच्या नमुन्याची चाचणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. याउपरही या ४५ वर्षीय रुग्णावर उपचार करणाऱ्या खासगी रुग्णालयाने लक्षणांची महापालिकेला माहिती दिली नसल्याचे समजते. न्यूमोनियाच्या रुग्णांकडे विशेष लक्ष द्या, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर आवाहन केले आहे. करोनाबाधितांवर उपचार करणाऱ्या डॉक्टरांसोबतच सामान्य रुग्ण बघणाऱ्या डॉक्टरांवरीलही जबाबदारी आता वाढली आहे.

लॉकडाऊनमध्ये घरपोच सेवेसाठी ई-कॉमर्स कंपन्या पुन्हा मैदानात

eCommerce

मुंबई : करोना रोखण्यासाठी २१ दिवसांच्या देशव्यापी लॉकडाऊनमध्ये ई-कॉमर्स कंपन्यांनी पुन्हा एकदा किराणा वस्तूंची घरपोच सेवा सुरु केली आहे. सोशल डिस्टन्सिंगचे पालन करुन ई-कॉमर्स कंपन्यांची यंत्रणा कार्यरत झाली आहे. यामुळे ग्राहकांना दिलासा मिळाला आहे.

लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात व्यत्यय आल्यामुळे काही राज्यांमध्ये ई-कॉमर्स सेवांच्या डिलिव्हरींवर परिणाम झाला होता. त्यामुळे कंपन्यांनी सर्व सेवा खंडीत केली होती. मात्र केंद्र आणि राज्य सरकारने किराणा आणि इतर जीवनावश्यक वस्तूंची दुकाने २४ तास खुली ठेवण्याचे निर्देश दिले. या आदेशाअंतर्गत किराणा माल आणि अत्यावश्यक मालाची डिलिव्हरी करण्यास ई-कॉमर्स कंपन्यांना परवानगी देण्यात आली.

फ्लिपकार्ट, अॅमेझॉन, बिगबास्केट, ग्रोफर्स, झोमॅटो, स्विगी या कंपन्यांना सरकारने घरपोच सेवा देण्याकरिता स्वतंत्र मार्ग उपलब्ध करून दिला आहे. या आश्वासनामुळे यातील बहुतेक कंपन्यांनी किराणा माल आणि अत्यावश्यक वस्तू पोहोचवणाऱ्या कंपन्यांनी आपल्या सेवा पुन्हा सुरू केल्या आहेत. ग्राहक एकमेकांमध्ये सामाजिक अंतर राखत ई-कॉमर्स सेवा देत आहे. फ्लिपकार्टसारख्या कंपन्या कर्मचारी, खासकरून डिलिव्हरी एग्झिक्युटिव्ह आणि ग्राहकांसाठी सुरक्षित आणि निर्विघ्न पद्धतीने पुरवठा-साखळी बळकट करीत आहेत. काही श्रेणींमधील मागणी सुरूच राहण्याची शक्यता असून फ्लिपकार्टने पुरवठा-साखळीच्या आणि डिलिव्हरीच्या अंतिम टप्प्याच्या सुरक्षिततेसाठी सर्व आस्थापना आणि डिलिव्हरी वाहने (किराणा मालासाठी) यांच्या नियमित निर्जंतुकीकरणाच्या माध्यमातून बहुविध प्रतिबंधात्मक उपाय योजले आहेत. विक्रेत्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या संदर्भात पुरेशा प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात यादृष्टीने त्यांना शिक्षित आणि प्रोत्साहित करण्याचे प्रयत्नही सुरू आहेत.

फ्लिपकार्टने डिलिव्हरी एग्झिक्युटिव्हजचा आरोग्यविमा आणि जीवनविमा उतरवण्यात आला आहे. एखाद्या कर्मचाऱ्याला क्वारंटाइन करावे लागले तर त्या दिवसांचा पूर्ण पगार दिला जाणार आहे, असे कंपनीने म्हटलं आहे. कंपनीने किराणामाल पुरवठा सुरू केला असून आता आमच्या पुरवठा केंद्रांमध्ये काम पुन्हा सुरू झाले आहे. गेल्या काही दिवसांत किराणामालाच्या मागणीत मोठ वाढ झाली असून ही मागणी पूर्ण करण्यासाठी आम्ही आमची क्षमता वाढवत आहोत, असे ‘फ्लिपकार्ट’चे मुख्य कॉर्पोरेट अफेअर्स अधिकारी रजनीश कुमार यांनी सांगितले. ते म्हणाले की, स्थानिक प्रशासन, पोलिस यंत्रणा व केंद्र सरकारकडूनही सहकार्य मिळत आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये सकारात्मक भावना आहे.

एकीकडे देश कोविड-१९ कोरोना विषाणूशी जोरदार लढा देत असतानाच आमच्या डिलिव्हरी टिम्स व पुरवठा साखळीवर नजर ठेवणाऱ्या कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी आम्ही सातत्याने प्रयत्न करत आहोत. त्यांना जीवनविमा, वैद्यकीय संरक्षण देण्यात येत असून जर एखादा कर्मचारी विषाणू संसर्गाने बाधित झालाच, तर त्यांना आवश्यक ती आर्थिक व वैद्यकीय मदत देण्याचीही आमची पूर्ण तयारी आहे, असेही रजनीश कुमार यांनी स्पष्ट केले.

करोना विषाणू: महाराष्ट्रात २१ ते ३० वयोगट सर्वाधिक बाधित

corona Survey

करोना विषाणूचा सर्वाधिक धोका हा मध्यम वयोगटानंतर २१ ते ३० वयोगटाला असल्याचे दिसून येत आहे. राज्यात आतापर्यंत आढळलेल्या २०३ रुग्णांपैकी या वयोगटातील ४४ तरुणांना करोनाची बाधा झाल्याचे समोर आले आहे. तर ३१ ते ४० या वयोगटामधील ४३ तर ४१ ते ५० वयोगटातील ३८ जणांना करोनाचा संसर्ग झाला आहे.

वैद्यकीय शिक्षण विभागाने सोमवारी जाहीर केलेल्या अहवालामध्ये ही माहिती स्पष्ट झाली आहे. सोमवारपर्यंत राज्यात नोंदवण्यात आलेल्या या करोनाबाधित रुग्णांमध्ये सर्वाधिक प्रमाण हे महाराष्ट्रामध्ये असून मुंबईमध्ये सर्वाधिक म्हणजे ८७ रुग्णांची नोंद झाली आहे, त्या खालोखाल पुणे आणि सांगलीमध्ये २५ तर नागपूरमध्ये १४ करोनाबाधित आढळून आले आहेत. वसई आणि ठाण्यात प्रत्येकी पाच तर कल्याणमध्ये सहा रुग्ण आढळून आले आहेत. नवी मुंबई, यवतमाळमध्ये प्रत्येकी चार तर अहमदनगरमध्ये तीन रुग्णांची नोंद झाली आहे. राज्यात नोंदवलेल्या आकडेवारीमध्ये ६४ टक्के पुरुष तर ३६ टक्के स्त्रियांना करोनाचा संसर्ग झाला आहे.

३५ टक्के रुग्ण परदेशातून आलेले

संसर्ग झालेल्या करोनाच्या रुग्णांमध्ये ३५ टक्के हे संसर्गित देशातून आलेले प्रवासी आहेत. तर संपर्कामध्ये आलेल्याचे प्रमाण २९ टक्के आहे, ३१ टक्के व्यक्तींचे अहवाल अद्याप आलेले नसून, ५ टक्के व्यक्तींमध्ये अद्याप करोनासंदर्भातील अंतिम निष्कर्ष काढता आलेला नाही. आतापर्यंत राज्यात करण्यात आलेल्या निदान चाचण्यांपैकी चार टक्के चाचण्यांचे निष्कर्ष हे निगेटिव्ह आलेले आहेत. कोव्हिडमुक्त झालेल्या चार टक्के रुग्णांना घरी पाठवण्यात आले आहे.

६१ ते ७० वयोगटात मृत्यूचे प्रमाण अधिक

मृत्यूचे प्रमाण हे ६१ ते ७० या वयोगटामध्ये सर्वाधिक म्हणजे चार टक्के इतके आहे. तर ४१ ते ५० या वयोगटामध्ये ते २ टक्के इतके नोंदवण्यात आले आहे. ८१ ते ९० वर्ष वयोगटामध्ये मृत्यूचे प्रमाण १ टक्का आहे. एक ते चाळीस वर्षे वयोगटामध्ये राज्यात एकाही व्यक्तीच्या मृत्यूची नोंद झालेली नाही.

२१व्या दिवशी सर्वाधिक नोंद

करोना संसर्गाच्या २१व्या दिवशी सर्वाधिक रुग्णांची नोंद राज्यात झाली आहे. चौथ्या दिवशी एकही रुग्ण सापडला नव्हता, आठव्या दिवशी ही संख्या एक होती. तर अठराव्या दिवशी दोन रुग्ण सापडले होते. तिसऱ्या, पाचव्या, १७व्या दिवशी प्रत्येकी अकरा आणि पंधरा रुग्णांची नोंद झाली होती. २१व्या दिवशी २७ तर २२व्या दिवशी २२ रुग्णांची नोंद झाली होती.

शेतकऱ्यांनी थेट शहरात येऊन भाजीपाला विकावा: कॉटन मार्केट ३१ मार्चपर्यंत बंद

vegetables-milk-home-delivery-list-in-nagpur-nmc

नागपूर, ता. २९: निर्जंतुकीकरणासाठी कॉटन मार्केट ३१ मार्चपर्यंत तीन दिवस बंद करण्याचा निर्णय नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतला आहे. त्यामुळे आजूबाजूच्या शेतकऱ्यांना शहरातील ज्या परिसरात सोयीचे होईल त्या परिसरात जाऊन भाजीपाला विकावा.list of farmers

कोरोनाचा प्रादुर्भाव आणि सद्यस्थितीत सुरू असलेले लॉकडाऊन लक्षात घेता नागपूर महानगरपालिकेने आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पुढाकाराने नागपुरातील नागरिकांची गैरसोय होऊ नये व त्यांना भाजीपाला, दूध, किराणा व औषधी इत्यादी आवश्यक वस्तू घरपोच उपलब्ध व्हाव्यात यासाठी अगोदरच पाऊल उचलले आहे. यासाठी कृषी विभागाच्या मदतीने आजूबाजूच्या खेड्यातील व गावातील शेतकरी आपला भाजीपाला घरोघरी जाऊन ग्राहकांना विकत आहेत. परंतु कॉटन मार्केट हे भाजीपाला विक्रीचे मध्यवर्ती केंद्र असल्यामुळे तेथे फार जास्त प्रमाणात गर्दी होत असल्याचे लक्षात आल्याने सदर मार्केट पुढील तीन दिवस अर्थात ३१ मार्चपर्यंत निर्जुंतुकीकरण करण्यासाठी बंद ठेवण्यात येणार आहे. तेथे आपला भाजीपाला घेऊन येणाऱ्या शेतकऱ्यांनी आपला भाजीपाला थेट आपल्या वाहनाने घरोघरी जाऊन विकावा. ज्या शेतकऱ्यांना ज्या भागात भाजीपाला विकायचा आहे, त्या भागात विकता येईल. त्यासाठी नागपूर महानगरपालिकेचे प्रभारी उपायुक्त महेश मोरोणे (मोबाईल क्र. ९८२३३३०९३२) व बाजार अधीक्षक श्रीकांत वैद्य (मोबाईल क्र. ९६७३९९६३३२) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे. गर्दीमुळे होणारा संभाव्य धोका लक्षात घेता हे पाऊल उचलण्यात येत आहे. जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा शहरातील नागरिकांना अविरत सुरू राहावा, हीच यामागची भूमिका आहे. कुठलाही बाजार बंद करणे, हा महानगरपालिकेचा उद्देश नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. शेतकऱ्यांचाण क्रमाक खालील. लिस्ट मध्ये दिलेला आहे.

Also Read- देशात कोरोनाग्रस्तांनी हजारचा आकडा गाठला!

 

देशात कोरोनाग्रस्तांनी हजारचा आकडा गाठला!

corona-positive

केंद्र सरकार आणि राज्य सरकारांच्या प्रयत्नांना न जुमानता, जागतिक साथीचा कोरोना हळूहळू भारताच्या विविध भागात पोहोचत आहे. आरोग्य विभागाच्या वेबसाईटनुसार, रविवारी सायंकाळपर्यंत देशात कोरोना संक्रमित रुग्णांची संख्या १ हजार १२० वर पोहोचली आहे. यामधील ९६ लोक असे आहेत जे एकतर परदेशी आहेत किंवा कोरोनातून बरे झाले आहेत. या व्यतिरिक्त या साथीच्या आजारामुळे ३० जणांचे प्राणही गेले आहेत. या आकडेवारीत महाराष्ट्र आणि केरळ या दोन राज्यांची स्थिती सर्वांत चिंताजनक आहे. या दोन राज्यात ४०० पेक्षा जास्त लोकांना संसर्ग झाला आहे.

महाराष्ट्रात आतापर्यंत २०९ लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी ८ लोकांचा मृत्यू झाला आहे आणि २५ लोक या विषाणूचा पराभव करून पूर्णपणे बरे झाले आहेत. यापैकी एकट्या मुंबई व ठाण्याला मिळून ११० संक्रमित लोक आहेत. पुण्यात ३७, नागपूरचे १६, अहमदनगर ३, रत्नागिरी १, औरंगाबाद ३, यवतमाळ ३, सांगली २५, सातारा, सिंधुदुर्ग, कोल्हापूर ३, जळगाव आणि बुलडाण्यात प्रत्येकी एक जण आढळून आला आहे.

भारतातील कोरोनाची पहिली घटना केरळमध्ये आढळून आली. आता येथे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. जरी हे राज्य महाराष्ट्रापेक्षा खूपच लहान असले, तरी देखील कोरोनाची लागण होण्याचे प्रमाण २०० पेक्षा जास्त आहे. रविवारी संध्याकाळपर्यंत केरळमधील २०२ लोकांमध्ये कोरोना संसर्गाची पुष्टी झाली आहे. यापैकी १६ लोक बरे झाले असून एकाचा मृत्यू झाला आहे. युएईमधील बहुसंख्य भारतीय केरळमधील स्थलांतरित आहेत. या मल्याळम भाषिक लोकांची युएईच्या अर्थव्यवस्थेत महत्त्वपूर्ण भूमिका आहे. परदेशात प्रवास करणारे आणि त्यांच्या संपर्कात आलेल्यांना कोरोना संसर्गाची प्रकरणे नोंदली गेली आहेत.

Also Read- ‘लॉकडाऊन’चे काटेकोर पालन करा, अन्यथा…

सावधान; झोपडपट्ट्यांमध्ये शिरला कोरोना

मुंबई: उच्चभ्रू वस्तीत असणारा कोरोना विषाणू दाटीवाटीने असलेल्या मुंबईच्या झोपडपट्ट्यांत अखेर पसरला. यामुळे कोरोनाबाधितांमध्ये प्रचंड वाढ होण्याची शक्यता आहे. खात्रीलायक सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आतापर्यंतच्या तपासणीत 99 कोरोनाग्रस्त, तर 283 संशयित आढळले आहेत.

झोपडपट्ट्यांमध्ये लोकसंख्येची घनता जास्त आहे. घरे एकामागोमाग एक लागून आहेत. यामुळे, कोरोना वेगाने पसरला. कोरोनाला रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने कंबर कसली आहे. संसर्गाचा विळखा दाटीवाटीने वसलेल्या झोपडपट्ट्यांना बसू नये यासाठी पालिकेने मिशन झोपडपट्ट्या राबवायला सुरुवात केली आहे. गेल्या आठवडाभरात 60 हजार 678 झोपड्यांचे सर्वेक्षण केले. यात 2 लाख 43 हजार 384 लोकांची वैद्यकीय तपासणी केली. यामध्ये 99 जणांना कोरोनाची लागण झाल्याचे तर 283 जण संशयित आढळून आले आहेत. संशयितांवर घरच्या घरी उपचार केले जात असल्याची माहिती पालिका सूत्रांनी दिली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह देशात विशेष काळजी घेतली जात आहे. महापालिकेचे डॉक्टर, नर्सेस तसेच अग्निशमन यंत्रणा आदी यंत्रणा तासन्तास अथक परिश्रम घेत आहेत. 24 तास जागी राहणार्‍या मुंबईत 55 ते 60 टक्के नागरिक झोपडपट्ट्यांत राहतात. बिल्डिंगमध्ये राहणार्‍या रहिवाशांना स्वताला सुरक्षित अंतर ठेवणे शक्य आहे. मात्र दाटीवाटीने एकमेकांना खेटून उभ्या राहिलेल्या झोपडपट्ट्याच्या दारात पोहचलेल्या या संसर्गाला थोपवण्यासाठी पालिकेची यंत्रणा कामाला लागली आहे. ज्या विभागात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळला आहे, तेथे पालिकेची यंत्रणा तात्काळ पोहचून उपाययोजना सुरू केली आहे.

या पार्श्वभूमीवर पालिकेच्या आरोग्य खात्याने मुंबईतील झोपड्यांकडे लक्ष केंद्रित केले आहे. सुमारे 55 टक्के लोक झोपडपट्टी भागात राहतात. त्यामुळे भविष्यातील संभाव्य धोका लक्षात घेऊन 60 हजार 679 झोपड्यांचे सर्वेक्षण केले. यात 2 लाख 43 हजार 384 लोकांची वैद्यकीय तपासणी केली. यामध्ये 99 जणांना कोरोनाची लागण तर 283 जण संशयित आढळून आल्याचे वास्तव समोर आले आहे. कोरोनाबाधित रुग्णांवर कस्तुरबा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. तर संशयितांवर वैद्यकीय टीमची देखरेख ठेवण्यात येत आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

सोडियम डायक्लोराईड

गर्दीच्या ठिकाणी कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता असते. त्यामुळे मुंबईतील वर्दळीची ठिकाणे, सार्वजनिक ठिकाणे, फळ भाजी मार्केट, रुग्णालय आदी ठिकाणी निर्जंतुकीकरण्यावर भर दिला आहे. 11 हजार 80 लीटर सोडियम डायक्लोराईडमध्ये 5 लाख 54 हजार लीटर पाणी मिक्स करून फवारणी केली जात आहे. 24 प्रभागात अग्निशमन दलामार्फत ही कामगिरी बजावली जात आहे.

Also Read- आपल्या भविष्यासाठी ‘लॉकडाऊन’ पाळा! महापौर संदीप जोशी यांची नागरिकांना कळकळीची विनंती

आपल्या भविष्यासाठी ‘लॉकडाऊन’ पाळा! महापौर संदीप जोशी यांची नागरिकांना कळकळीची विनंती

nagpur-lockdown

नागपूर, ता. २९: नागपुरात ‘कोरोना रुग्णांची संख्या आणखी वाढू शकते, ही वस्तूस्थिती नाकारता येत नाही. पुढील १५ दिवस आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचे आहे. ‘लॉकडाऊन’ हा कोणाचे नुकसान व्हावे, या हेतूने जाहीर करण्यात आला नाही तर आपल्या आणि कुटुंबीयांच्या भविष्यासाठी हे सारे प्रयत्न आहेत. त्यामुळे कृपया लॉकडाऊन पाळा. घरीच कुटुंबीयांसोबत वेळ घालवा आणि त्यांनाही सुरक्षित ठेवा, अशी कळकळीची विनंती महापौर संदीप जोशी यांनी नागपूरकरांना केली आहे.

नागपुरात अत्यावश्यक सेवांची दुकाने सुरू आहेत. मात्र, त्याचा गैरफायदा घेताना नागरिक दिसत आहेत. दुकानात गेल्यानंतर तेथे नियम पाळल्या जात नाही. कॉटन मार्केटमध्ये विनाकारण गर्दी केली जात आहे. त्यामुळे आता मोजक्या लोकांमध्ये असलेला कोरोना विषाणू समाजात पसरण्यास वेळ लागणार नाही. केवळ काळजी हाच यावरील उपाय आहे. जर हा वेगाने पसरला तर १५ एप्रिलनंतरही घरात बसण्याचा कठोर निर्णय घ्यावा लागेल. आता जर या विषाणूवर विजय मिळविला तर लवकर आपल्याला घराबाहेर पडून आपली दैनंदिनी सुरू करता येईल. त्यामुळे सर्वांनी घरातच राहावे. घरपोच सेवांचा लाभ घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले आहे.

खासगी वैद्यकीय सेवा अबाधित ठेवा!

हे करीत असताना ज्यांचे हातावर पोट आहे, अशांना संपूर्ण मदत देण्याचा शासन आणि स्वयंसेवी संस्था प्रयत्न करीत आहे. नागरिकांनी संयम पाळावा, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

दरम्यान, महापौर संदीश जोशी यांनी शहरातील विविध परिसरात जाऊन नागरिकांना घरी थांबण्याचे आवाहनही केले. प्रशासकीय यंत्रणेचे संपूर्ण परिस्थितीवर लक्ष असून नागरिकांनी कुठलीही आरोग्य सेवा हवी असल्यास मनपाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

Also Read- करोनाविरुद्ध लढा; टाटांचे ५०० कोटींचे घसघशीत दान

खासगी वैद्यकीय सेवा अबाधित ठेवा!

medical service

नागपूर: ‘लोकडाऊन’ दरम्यान कुठलीही खासगी वैद्यकीय सेवा बंद ठेवू नये. त्या अबाधित ठेवाव्या असे आदेश देत कुठलेही कारण नसताना बंद आढळलयास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला.

करोनाविरुद्ध लढा; टाटांचे ५०० कोटींचे घसघशीत दान

यासंदर्भात आज रविवारी (ता.२९) एक आदेश निर्गमित केला आहे. लॉकडाऊन हे लोकांनी घराबाहेर पडून कोरोना विषाणूचा प्रसार करू नये, यासाठी आहे. अत्यावश्यक सेवांना यातून वगळण्यात आले आहे. मात्र शहरात अनेक खासगी दवाखाने बंद असल्याचे निदर्शनास आले आहे. खासगी दवाखाने, ओपीडी, पॅथॉलॉजी लॅब, मेडिकल स्टोर्स बंद ठेवण्याचे काहीही कारण नाही. अनेक ठिकाणी या सेवा बंद करण्यात आल्याने नागरिकांची गैरसोय होत आहे. यासंदर्भात नागरिकांच्याही तक्रारी प्राप्त झाल्या. त्यामुळे सर्व खासगी वैद्यकीय व्यावसायिकांनी सेवा सुरू ठेवण्याचे आदेश दिले आहेत. विनाकारण सेवा बंद ठेवल्यास साथरोग नियंत्रण कायदा आणि भारतीय दंड संहितेनुसार कारवाई करण्यात येईल, असे आदेशात नमूद केले आहे. वैद्यकीय सेवेशी संबंधित सर्व संघटनांना हा आदेश पाठविण्यात आला आहे.

Also Read-लॉकडाऊन’चे काटेकोर पालन करा, अन्यथा…

नागपुरात आणखी २ कोरोना रूग्ण पॉझिटिव्ह; १३ वर्षाच्या मुलाला लागण

corona Survey

नागपुरातील कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत आज सोमवारी सलग पाचव्या दिवशी दोनने वाढ झाली. सोमवारी सकाळी आणखी दोन रूग्णाचा स्वॅब चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आला. त्यामुळे नागपुरातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या आता १६ वर पोहोचली आहे. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या रूग्णालयात दाखल असलेल्या एका कोरोनाबाधित रूग्णाच्या संपर्कात आल्याने या दोघांना लागण झाली आहे.

रूग्णाच्या संपर्कामुळे ४४ वर्षीय महिला आणि १३ वर्षाचा मुलगा संक्रमित झाला आहे. १८ मार्चला दिल्लीहून परतलेल्या एका व्यक्तीचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह निघाला होता. याच रूग्णाच्या संपर्कात आलेल्या त्याच्या परिवारातील आणखी चार व्यक्ती शुक्रवारी पॉझिटिव्ह आढळल्या. शनिवारी आढळलेल्या दोनपैकी एक पॉझिटिव्ह रूग्णसुध्दा दिल्लीहून परतलेल्या रूग्णाच्या संपर्कात आला होता. १४ मार्चनंतर आतापर्यंत एका पाठोपाठ एक आणखी १३ रूग्ण वाढले आहे.

नागपुरात आणखी तीन रूग्ण आढळले पॉझिटिव्ह आणि एवढे संशयित

corona-positive

नागपुरातील कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत वाढच होत आहे. आज रविवारी सलग चौथ्या दिवशी या संख्येत तीनने वाढ झाली असून आता कोरोनाबाधित रूग्णांची संख्या १४ एवढी झाली आहे. आज सकाळी या तीन रूग्णांचा स्वॅब चाचणी अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे.

याच्या आधी १८ मार्च रोजी दिल्लीहून परतलेल्या एका व्यक्तीचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह निघाला होता. त्याच रूग्णाच्या संपर्कात त्याच्या परिवारातील व्यक्ती आले होते. त्यानंतर त्या सगळ्यांची स्वॅब चाचणीसाठी नमुने पाठविण्यात आले होते. या आलेल्या अहवालानंतर परिवारातील आणखी चार व्यक्ती शुक्रवारी पॉझिटिव्ह आढळल्या होत्या. तर शनिवारी आढळलेल्या दोघांपैकी एक पॉझिटिव्ह रूग्ण असून तो सुध्दा दिल्लीहून परतलेल्या रूग्णाच्या संपर्कात आला होता. रविवारी पॉझिटिव्ह आढळलेल्या रूग्णामध्ये एक ११ वर्षीय मुलीचाही समावेश आहे. तर याच ११ वर्षीय मुलीचा भाऊ सुध्दा कोरोनाबाधित आढळला आहे. या भाऊ बहिणी व्यतिरिक्त आणखी तिसरा रूग्ण हा पुरूष आहे. १४ मार्चनंतर तब्बल १२ दिवसांनी नागपुरातील कोरोनाबाधित रूग्णाच्या संख्येत गुरूवारी एकने वाढ झाली होती. त्यानंतर मात्र आता एका पाठोपाठ एक एक आणखी ११ रूग्ण वाढले आहे. गुरूवार नंतर आढळलेल्या ११ पैकी सहा नवे रूग्ण दिल्लीहून परतलेल्या रूग्णाच्या संपर्कात आल्याने संक्रमित झाले आहे. नागपुरातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या आता १४ एवढी झाली आहे.

Nagpur : कोरोना विषाणू संदर्भ:: माहिती : 29/3/20
1. दैनिक संशयित:71
एकूण संशयित: 649
2. सध्या भरती असलेल्या व्यक्ती: 35( 22 in gmc & 13 in IGMC)
एकूण भरती केलेल्या व्यक्ती: 426
3. दैनिक तपासणी नमुने: 71 (3 from NMC)
एकूण तपासणी केलेले नमुने: 457
4. पॉझिटिव्ह नमुने: 14
5. पाठपुरावा सुरु असलेल्या एकूण व्यक्ती: 1101 (Home Quarantined)
14 दिवस पाठपुरावा केलेल्या व्यक्ती : 67
6. आज विमानतळावर स्क्रीनिंग केलेले प्रवासी: 0
एकूण विमानतळावर स्क्रीनिंग केलेले प्रवासी: 1123
7. आज अलगीकरण केलेले प्रवासी: 33
8. IGGMC येथे भरतीकरिता पाठविलेले प्रवासी: 0
9. GMC येथे भरतीकरिता पाठविलेले प्रवासी: 0
10. आज अलगीकरण कक्षातून घरी पाठविलेले प्रवासी: 0
11. सध्या अलगीकरण कक्षात असलेले प्रवासी: 157

लॉकडाऊन’चे काटेकोर पालन करा, अन्यथा…

“No leave for health officials” Tukaram Mundhe
“No leave for health officials” Tukaram Mundhe

नागपूर: नागपुरात ‘कोरोना’ रुग्णांची वाढती संख्या चिंताजनक आहे. ‘लॉकडाऊन’चे काटेकोरपणे पालन होत नसल्याने प्रशासकीय यंत्रणा करीत असलेल्या प्रयत्नांना यश येत नाही. आता यापुढे नागरिकांनी लॉकडाऊनचे पालन केले नाही तर भविष्यात गंभीर स्थितीला सामोरे जावे लागेल, असा इशारा मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला.

त्यांनी रविवारी (ता. २९) पुन्हा सोशल मीडियाच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधत सध्या उद्‌भवत असलेल्या गंभीर परिस्थितीची माहिती दिली. ‘लॉकडाऊन’ असताना आणि प्रशासन वारंवार बजावित असतानाही नागरिक खोटे कारणं सांगून विनाकारण बाहेर पडताना दिसत आहेत. बर्डी, कॉटन मार्केट अशा ठिकाणी गर्दी करताना दिसत आहे. सध्या नागपुरात कोरोनाचे १४ रुग्ण आहेत. त्यापैकी चार रुग्णांना बरे झाल्यामुळे घरी पाठविण्यात आले आहे. उर्वरीत दहा रुग्ण इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय तसेच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात उपचार घेत आहेत. मात्र, नागरिकांनी आता ऐकले नाही आणि प्रशासनाच्या निर्देशाचे पालन केले नाही तर हा विषाणू समाजात मोठ्या प्रमाणावर पसरण्याची शक्यता नाकारता येत नाही.

लॉकडाऊनदरम्यान सर्व सुविधा घरपोच मिळण्याची व्यवस्था मनपा प्रशासनाने केली आहे. त्यामुळे लोकांनी घरीच राहावे. कोरोनाची साखळी तोडण्यास मदत करावी, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सोशल मीडियावरील एका व्हिडिओद्वारे केले आहे. विशेष म्हणजे नागरिक गर्दी करीत असल्यामुळे आजपासून कॉटन मार्केट पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात आले आहे. भाजी घेऊन नागपुरात येणारी वाहने आता कॉटन मार्केटमध्ये न पाठविता शहरातील विविध भागात पाठविण्यात येतील. यामुळे एकाच ठिकाणी होणारी गर्दी विभागली जाईल, असेही आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले.

करोनाविरुद्ध लढा; टाटांचे ५०० कोटींचे घसघशीत दान

ratan-tata

मुंबई: करोनाविरुद्ध देशाने युद्धच पुकारले असून या लढाईत सरकारची मदत करण्यासाठी अनेक उद्योगपती सरसावले आहेत. टाटा ट्रस्टने करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी ज्या उपाययोजना केल्या जात आहेत त्याला हातभार लावण्यासाठी ५०० कोटींचा निधी जाहीर केला आहे.

टाटा समूहाचे चेअरमन रतन टाटा यांनी या मदतीची घोषणा केली आहे. करोनाचं संकट मोठं आहे. या संकटात तातडीने उपाययोजना करण्याची आवश्यकता असून त्यासाठीच आम्ही ही मदत देत आहोत, असे टाटांकडून स्पष्ट करण्यात आले. टाटांच्याआधी मेदांता ग्रुपचे अनिल अग्रवाल यांनीही १०० कोटी रुपयांची मदत जाहीर केली होती. महिंद्रा ग्रुपचे आनंद महिंद्रा यांनीही आपले एक महिन्याचे वेतन देण्याची घोषणा केली आहे.

ताज हॉटेलकडून भोजनाची व्यवस्था

टाटा समूह अनेक मार्गांनी मदतीचा हात पुढे करत आहे. करोनाच्या संकटात वैद्यकीय क्षेत्रातील डॉक्टर, नर्स, वॉर्डबॉय असे सगळेच जण अहोरात्र सेवा देत आहेत. याशिवाय रुग्णालयांमध्ये असलेल्या रुग्णांचीही मोठी कोंडी झाली आहे. ही बाब लक्षात घेऊन टाटा समूहाच्या ताज हॉटेलने अशी सेवा देणाऱ्या सर्वांनाच तसेच गरजू रुग्णांसाठी भोजनाची व्यवस्था केली आहे. याबाबत मुंबई महापालिकेकडूनही दुजोरा देण्यात आला आहे. मुंबई पालिका आणि ताज कॅटरर्स यांच्या अंतर्गत समन्वयातून भोजनव्यवस्था करण्यात आली आहे. मुंबई पालिकेच्या रुग्णालयांत दाखल असलेले रुग्ण तसेच सर्व स्टाफच्या भोजनाची व्यवस्था ताज हॉटेलने केली आहे, असे ट्विट मुंबई पालिकेने केले आहे.

घाबरण्याचे कारण नाही, समाजात कोरोनाचा प्रसार नाही : आयुक्त तुकाराम मुंढे

tukram mundhe

नागपूर: नागपुरात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा ११ वर पोहोचला आहे. मात्र दिल्लीवरून आलेला जो व्यक्ती पॉझिटिव्ह आहे त्याच्या कुटुंबातीलच अन्य बाधित आहे. लोकांमध्ये ते गेले नाही आणि त्यांच्यामुळे समाजात कोरोना पसरला नाही. त्यामुळे घाबरण्याचे कारण नाही, असे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले.

नागपुरात पूर्वी जे चार व्यक्ती कोरोनाबाधित होते त्यांच्यापैकी एक रुग्ण पूर्णत: बरा झाला असून त्यांना घरी पाठविण्यात आले आहे. अन्य तीन रुग्णही बरे होत असून पुढील काही दिवसांत त्यांनाही घरी पाठविण्यात येईल. हे चारही रुग्ण परदेशातून आलेले होते. नव्याने जे पॉझिटिव्ह आढळले आहे, त्यांच्यातील एक व्यक्ती आपल्या व्यवस्थापकासह दिल्लीला गेला होता. तेथून आल्यानंतर घरातील काहींच्या संपर्कात ते आले. त्या सर्वांची तपासणी करण्यात आली असून जे-जे पॉझिटिव्ह आहेत, त्यांच्यावर उपचार सुरू झाले आहेत.

मनपाची चमू आता पुन्हा एकदा लक्ष्मीनगर आणि धरमपेठ झोनच्या कोअर एरियामध्ये सर्व्हेक्षण करत आहे. पुढील १४ दिवसांपर्यंत मनपाच्या १८५ चमू २७४६३ घरात राहणाऱ्या एक लाख लोकांचे सर्वेक्षण करणार आहे. सध्या आढळलेल्या पॉझिटिव्ह रुग्णाच्या घरापासून एक कि.मी. त्रिज्येच्या परिसरातील ही घरे आहेत. ज्या ठिकाणी कोरोनाची लक्षणे असलेले व्यक्ती आढळतील त्यांच्यावर मनपाच्या आरोग्य विभागाची चमू लक्ष ठेवेल. असाच सर्व्हे आता संपूर्ण शहरातही सुरू असून सुमारे ४९५ चमू यासाठी कार्यरत आहेत, असेही मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले.

AIIMS Nagpur released clarification against rumour

aiims nagpur
AIIMS Nagpur

Nagpur: Various fake rumours of COVID-19 infection of AIIMS Nagpur staff at AIIMS has been doing rounds on various medium. AIIMS Nagpur released clarification

“One of our faculty at AIIMS Nagpur, had complaints of low-grade fever, mild cough, rhinitis, myalgia and malaise since evening of 24th of March, No complaints of high-grade fever, breathlessness or respiratory difficulties. There was no history of travel to a COVID-19 affected region and there was no travel to Italy anytime as rumoured. There was no known history of contact with COVID-19 case. Clinical examination was conducted by our team of doctors on 26th of March and the patient was advised home quarantine for 14 days. The nasopharyngeal and oral swab for COVID-19 testing was sent to IGGMC, Nagpur and results of the test is Negative. On the day 3 of illness, our faculty is symptomatically better with no report of fever, is stable and doing well.
All medical and paramedical staff of AIIMS Nagpur are responsible citizens at your service.
It is requested to the public to stay away from rumour-mongering at this time when the nation is fighting against this global pandemic.

नागपूर 2, राज्यात कोरोनाचे 6 नवीन रुग्ण, एकूण रुग्णांची संख्या 160

breaking news

Nagpur (28 March): राज्यात कोरोनाची लागण झालेले 7 नवीन रुग्ण आढळले आहेत. 2 नागपूर आणि 5 मुंबई येथील आहे. आता नागपुरातील एकूण संख्या ११ झाली असून राज्यातील एकूण कोरोग्रस्तांची संख्या 160 इतकी झाली आहे.

Nagpur : कोरोना विषाणू माहिती : 28/3/20 (  नागपूर जिल्हा माहिती कार्यालय ) 
1. दैनिक संशयित:62
एकूण संशयित: 596
2. सध्या भरती असलेल्या व्यक्ती: 72( 29 in gmc & 43 in IGMC)
एकूण भरती केलेल्या व्यक्ती: 358
3. दैनिक तपासणी नमुने: 62
एकूण तपासणी केलेले नमुने: 386
4. पॉझिटिव्ह नमुने: 11
5. पाठपुरावा सुरु असलेल्या एकूण व्यक्ती: 1012 (Home Quarantined)
14 दिवस पाठपुरावा केलेल्या व्यक्ती : 49
6. आज विमानतळावर स्क्रीनिंग केलेले प्रवासी: 0
एकूण विमानतळावर स्क्रीनिंग केलेले प्रवासी: 1123
7. आज अलगीकरण केलेले प्रवासी: 0
8. IGGMC येथे भरतीकरिता पाठविलेले प्रवासी: 0
9. GMC येथे भरतीकरिता पाठविलेले प्रवासी: 0
10. आज अलगीकरण कक्षातून घरी पाठविलेले प्रवासी: 0
11. सध्या अलगीकरण कक्षात असलेले प्रवासी: 124

Updating feed..

कोविड -19 चा अर्थव्यवस्थेवरचा प्रभाव कमी करण्यासाठी, विकासाला चालना देण्यासाठी आणि आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी रिझर्व बँकेच्या गव्हर्नरांकडून सर्व समावेशक पॅकेज जाहीर

कोविड-19, Reserve Bank of India

नवी दिल्ली, 27 मार्च 2020: रिझर्व बँकेने रेपो दरात 75 बेसीस पॉंईंटसनी कपात केल्यामुळे हा दर आता 4.4 % झाला आहे तर रिव्हर्स रेपो दरात 90 बेसिस पोईटची कपात करत हा दर 4 % झाला आहे. आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांनी आज मुंबईत ही माहिती दिली. 28 मार्च पासून एक वर्षासाठी सर्व बँकांसाठी राखीव-रोखता प्रमाण 1 टक्क्यांनी कमी करून ते 3 % करण्यात आले आहे. या उपाययोजनांमुळे व्यवस्थेमध्ये 3.74 लाख कोटी रुपयांची रोकड सुलभता येणार आहे. कोविड-19 च्या हानिकारक प्रभावामुळे रेपो आणि रिव्हर्स रेपो दरात कपात करावी लागल्याचे ते म्हणाले. यामुळे कोरोना विषाणूचा अर्थव्यवस्थेवरचा प्रभाव कमी करण्यासाठी, विकासाला चालना देण्यासाठी आणि आर्थिक स्थैर्य राखण्यासाठी मदत होणार आहे.

आणखी एक महत्वाची घोषणा करत, सर्व वाणिज्यिक बँका ( प्रादेशिक ग्रामीण बँका, लघु वित्तीय बँका, स्थानिक क्षेत्र बँकांसह), सहकारी बँका, अखिल भारतीय वित्तीय संस्था, एनबीएफसी(गृह कर्ज आणि सूक्ष्म वित्त संस्था) यासारख्या कर्जदार संस्थाना सर्व कर्जावरच्या देय हप्त्याची वसुली तीन महिने पुढे ढकलण्याची परवानगी त्यांनी दिली.

तुम्ही हाक द्या, आम्ही सेवेत हजर राहू: महापौर संदीप जोशी यांची भावनिक साद

रिव्हर्स रेपो दरात 90 बेसिस पोइंटची कपात केल्यामुळे बँकांना आरबीआयकडे निधी जमा करण्यासाठी फारसे प्रोत्साहन न मिळता त्याऐवजी हा पैसा कर्ज देण्यासाठी उपयोगात आणण्याला प्रोत्साहन मिळणार असल्याचे त्यांनी सांगितले. वित्तीय ओघ प्रवाही ठेवणे हे आरबीआयचे सर्वात महत्वाचे उद्दिष्ट आहे, या महामारीचा अर्थव्यव स्थेवरचा विपरीत परिणाम कमी करून विकासाला चालना देण्यासाठी साधने खुली करण्याचा हा काळ असल्याचे ते म्हणाले.

जागतिक आर्थिक घडामोडी जवळपास ठप्प झाल्या आहेत.जगातला मोठा भाग मंदीमधे जाण्याची शक्यता वाढली आहे. आरबीआय मिशन मोड मधे वित्तीय परिस्थितीवर लक्ष ठेवूनअसून अतिरिक्त तरलता पुरवण्याच्या दृष्टीने आणि आवश्यकतेनुसार इतर उपाय योजना करत असल्याचे त्यांनी सांगितले. महामारीपासून देशाच्या अर्थव्यवस्थेचा बचाव करण्यासाठी आवश्यक कृती करणे ही आत्ताच्या घडीची गरज असल्याचे ते म्हणाले.

कोविड-19 चा प्रभाव आणि प्रसार रोखण्यासाठी तत्पर आणि योग्य पावले उचलल्याबद्दल आरबीआय गव्हर्नरांनी केंद्राची प्रशंसा केली. या लढ्यात विजय मिळवण्यासाठी प्रत्येकाने सरकारला संपूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन त्यांनी केले.

जगभरातली सरकारे अदृश्य मारेकऱ्या विरोधात लढा देत आहेत.हा लढा लांबला आणि पुरवठा साखळीवर आणखी परिणाम झाला तर जागतिक मंदीची सावली अधिक गडद होण्याची भीती त्यांनी व्यक्त केली. मात्र कच्च्या तेलाच्या किमतीतली घट काहीसा दिलासा देईल असे ते म्हणाले.

2019- 20 या वर्षाच्या चौथ्या तिमाहीसाठी अंदाजित जीडीपी विकास दरावर विपरीत परिणामाची शक्यता त्यांनी वर्तवली. कोविड-19 महामारीचा कृषी आणि संलग्न क्षेत्र वगळता, अर्थव्यवस्थेच्या अनेक क्षेत्रांवर विपरीत प्रभाव पडण्याची शक्यता आहे, या महामारीची तीव्रता, प्रसार आणि कालावधी यावर तो अवलंबून आहे. अशा परिस्थितीत ठेवीदारांनी उतावीळ पणे ठेवी काढू नयेत असे आवाहन त्यांनी केले. सर्वांनी स्वच्छता पाळा, सुरक्षित राहा आणि डिजिटल राहा असा संदेश त्यांनी दिला.

किराणा सोबतच आता भाजी, दुधचीही घरपोच व्यवस्था – १४० विक्रेत्यांची यादी

कांद्याच्या दरांमुळे, चलनवाढीचा तिमाही दर, अंदाजित दरापेक्षा चढा राहील असे 2020 च्या जानेवारी आणि फेब्रुवारी महिन्याचे कल दर्शवत आहेत. विक्रमी अन्नधान्य आणि फळं भाजीपाला उत्पादन यामुळे अन्नधान्याच्या किमतीत घट होऊ शकते असे ते म्हणाले.

कोरोना पासून अर्थव्यवस्था सुरक्षित राखण्यासाठी आरबीआयने मोठे पाऊल उचलले आहे असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. आजच्या घोषणेमुळे रोकड सुलभता वाढेल आणि मध्यम वर्ग आणि व्यापाराला त्याचा फायदा होईल असे त्यांनी म्हटले आहे.

वित्तीय स्थैर्य विषयक गव्हर्नरांच्या आश्वासक बोलांची केंद्रीय वित्त मंत्र्यांनी प्रशंसा केली आहे. आरबीआय गव्हर्नर द्वै मासिक वित्तीय धोरण निवेदन इथे.

Also Read- ‘कोरोना’ चा प्रार्दुभाव रोखण्यासाठी दहाही झोनमध्ये निर्जंतुकीकरण फवारणी : आयुक्त तुकाराम मुंढे

तुम्ही हाक द्या, आम्ही सेवेत हजर राहू: महापौर संदीप जोशी यांची भावनिक साद

महापौर संदीप जोशी

नागपूर, ता. २७: नागपुरात बाहेर राज्यातील अनेक जण ‘लॉकडाऊन’ मध्ये अडकले आहेत. बाहेरगावचे विद्यार्थी अडकून आहेत. त्यांच्या भोजनाचाही मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा विद्यार्थ्यांना, लोकांनी माझ्या स्वीय सहायकाला फोन करावा. ज्यांना खरंच गरज आहे, त्यांची पूर्ण व्यवस्था आम्ही करू. तुम्ही अडचणीत असाल तर केवळ हाक द्या, आम्ही सेवेत राहू, अशी भावनिक साद महापौर संदीप जोशी यांनी घातली.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात ‘लॉकडाऊन’ आहे. १५ एप्रिलपर्यंत सर्वांना घरात राहायचे आहे. पण यामुळे नागरिकांच्या मनात अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. नागपूर शहराचे प्रथम नागरिक म्हणून नागरिकांच्या शंकांचे निरसन करायचे या उद्देशाने महापौर संदीप जोशी यांनी ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून तब्बल एक तास नागरिकांशी संवाद साधला. या काळात नागरिकांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी दिलखुलासपणे उत्तरे दिली. नागपूर शहरात जी बाहेरगावची लोकं अडकली आहेत, त्यांना कुठलीही अडचण असेल तर त्यांनी महापौर ॲप, त्यावरील वॉटस्‌ॲप क्रमांकावर अथवा स्वीय सहायकाच्या क्रमांकावर मदतीची माहिती द्यावी. तातडीने त्याची दखल घेतली जाईल. नागरिकांनी घरीच राहावे. विनाकारण बाहेर पडू नये यासाठी प्रशासन सर्वतोपरी व्यवस्था करीत आहे. किराणा सामान, भाजीपाला, दूध, दुग्धजन्य पदार्थ घरपोच मिळावे, यासाठी प्रत्येक परिसरातील विक्रेत्यांची, दुकानांचे नावे, मोबाईल क्रमांकासह मनपाच्या अधिकृत वेबसाईट, फेसबुक पेजवर देण्यात आली आहे. नागरिकांनी या विक्रेत्यांच्या मोबाईल क्रमांकावर फोन करून जे हवे आहे, ते घरपोच मागवावे, असे आवाहन त्यांनी केले.

नागपुरात आणखी नवीन पाच कोरोनाग्रस्त – एकून संख्या ९ वर

जे व्यक्ती अडकले आहेत, त्यांना बाहेरगावी जाण्यासाठी मात्र कुठलीही मदत करता येणार नाही. त्यांनी आहे तेथेच १५ एप्रिलपर्यंत राहून कोरोनाची साखळी तोडण्यास सहकार्य करावे, असे आवाहन त्यांनी केले. मच्छरांच्या वाढत्या प्रादुर्भावासंदर्भात असलेल्या प्रश्नांना उत्तर देताना ते म्हणाले, संपूर्ण शहरात फॉगिंग व्हावे, यासाठी आवश्यक ते निर्देश मलेरिया, फायलेरिया विभाग आणि झोन कार्यालयांना देण्यात आले आहे. त्याची अंमलबजावणीही सुरू झाली आहे.

आयुक्त फिरतात आपण का फिरत नाही, या प्रश्नाच्या उत्तरात ते म्हणाले, आपण फिरलो तर विनाकारण गर्दी जमा होईल. ते टाळावे म्हणून आपण फिरणे टाळतोय. मात्र तरीही कोरोनाबाधित रुग्णांच्या घरी जाऊन, रुग्णालयात जाऊन परिस्थिती जाणून घेतली. आरोग्य यंत्रणेशी चर्चा करून आवश्यक बाबींची पूर्तता करण्याचे निर्देश प्रशासनाला दिले. आता उद्यापासून आपण आपल्या गाडीवर स्वत:च्या आवाजात नागरिकांना आवाहन करीत फिरणार असल्याचे त्यांनी सांगितले.

‘कोरोना’ हा संसर्गजन्य रोग आहे. झपाट्याने याचा प्रसार होतो आहे. नागरिक एकमेकांच्या संपर्कात आल्याने तो वेगाने पसरतो. कोरोनाची ही साखळी तोडण्यासाठीच संपूर्ण देशभरात लॉकडाऊन करण्यात आले आहे. हे आपण पुढील काही दिवस पाळले तर भविष्यात होणारा मोठा धोका टाळू शकतो. म्हणून नागरिकांनी शासनाचे निर्देश पाळावे. घरीच थांबावे. काळजी घ्यावी. घरपोच सेवांचा लाभ घ्यावा. काही अडचण असल्यास जिल्हाधिकारी कार्यालय अथवा मनपाच्या नियंत्रण कक्षात फोन करावा, असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी ‘फेसबुक लाईव्ह’ दरम्यान केले.

३१ मार्चला साधणार संवाद

चार दिवसानंतर पुन्हा महापौर संदीप जोशी नागरिकांशी ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून संवाद साधणार आहेत. ३१ मार्च रोजी दुपारी २ ते ३ या वेळेत फेसबुकच्या माध्यमातून ते पुन्हा नागरिकांच्या भेटीला येतील. यादरम्यान, नागरिकांना काही अडचणी असतील, प्रश्न असतील तर त्यांनी थेट प्रक्षेपण समयी इनबॉक्समध्ये करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

Also Read-‘कोरोना’ चा प्रार्दुभाव रोखण्यासाठी दहाही झोनमध्ये निर्जंतुकीकरण फवारणी : आयुक्त तुकाराम मुंढे

Nagpur Weather

Nagpur
haze
38 ° C
38 °
38 °
12 %
3.6kmh
0 %
Sat
38 °
Sun
41 °
Mon
41 °
Tue
42 °
Wed
44 °

Stay connected

5,248FansLike
422FollowersFollow
500FollowersFollow
394FollowersFollow
2,380SubscribersSubscribe

Most Popular

Top 100 new year Wishes

Top 100 New Year Wishes 2023

0
Top 100 New Year Wishes 2023: If you are searching for some good wishes for the new year 2023 then you are on the...

Dhamma Chakra Pravartan Din : 15 Famous quotes by Dr. Babasaheb Ambedkar

0
Dhamma chakra Pravartan Din also known by the name of DhammaChakra Anupratan Din is a day to praise the Buddhist change of B. R....
Happy Diwali 2021

15+ Unique Happy Diwali wishes for 2022

0
Nowadays the only way through which connection is possible is the social networking site. The biggest festival in India is coming soon. Diwali is...
makar Sankranti

Top 100 best quotes, WhatsApp messages, wishes and greetings for Makar Sankranti 2024

0
Makar Sankranti Wishes : Makara Sankranti (Sankranthi) is a Hindu festival that encourages people to live in peace and harmony. Here are best quotes,...