नागपूर, ता. २७: नागपूर महानगरपालिकेच्या वतीने कोरोना विषाणू (कोव्हीड-१९) चा प्रार्दुभाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजने अंतर्गत नागपूर महानगरपालिका क्षेत्रात आवश्यक त्याठिकाणी निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. ही मोहीम अग्निशमन वाहनाव्दारे हाती घेण्याचे निर्देश आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांनी संबंधितांना दिले.
अग्निशमन वाहनामध्ये सोडियम हायपोक्लोराईडचे मिश्रण तयार करुन संपूर्ण शहराच्या दहाही झोनमध्ये शुक्रवार २७ मार्चच्या रात्री १० वाजतापासून फवारणीला प्रारंभ करण्यात येणार आहे.
विशेष करुन ज्या भागात कोरोनाचे संशयित रुग्ण मिळाले आहेत अशा परिसरात फवारणी केली जावी, असेही निर्देश आयुक्तांनी उपायुक्त तथा आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार व मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांना दिले आहे.
नागपूर : लॉकडाऊनदरम्यान कुणीही व्यक्ती घराबाहेर पडू नये यासाठी मनपा प्रशासन नागरिकांच्या सुविधेसाठी निरनिराळे प्रयत्न करीत आहेत. काही औषधी दुकाने २४ तास सुरू ठेवण्याचा आणि शहरातील ४५ दुकानातून घरपोच किराण्याची व्यवस्था केल्यानंतर आता भाज्या आणि दुग्धजन्य पदार्थ घरपोच मिळण्याचीही व्यवस्था मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या प्रयत्नातून आणि पुढाकारातून करण्यात आली आहे.
सदर लिस्ट खाली PDF मध्ये दिलेली आहे
शहरालगतच्या गावातील शेतकऱ्यांशी कृषी विभागाच्या माध्यमातून संपर्क साधण्यात आला असून त्यांना फोन केला की त्यांच्या माध्यमातून भाजीपाला घरपोच उपलब्ध होणार आहे. याचप्रकारे दूधविक्रेते आणि दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रेत्यांशीही चर्चा करून हे पदार्थही घरपोच मिळेल, अशी व्यवस्था करण्यात आली आहे. भाजीपाला, दूध आणि दूग्धजन्य पदार्थांसाठी सुमारे १४० विक्रेत्यांची यादी मोबाईल क्रमांकासह प्राप्त झाली असून ही यादी खाली दिलेल्या लिंक वरून तसेच मनपाच्या अधिकृत वेबसाईट वर उपलब्ध आहे. ह्या यादीमधील मोबाईल क्रमांकावर फोन करून नागरिकांना आता भाजीपाला, दुग्धजन्य पदार्थ घरीच मागविता येतील.कृषी विभागाच्या सहकार्याने सुध्दा शेतकरी भाजीपाला नागपूरच्या विविध भागात उपलब्ध करणार आहे. त्यांची देखील यादी प्रसिध्द करण्यात आली आहे.
शहरातील रामदासपेठ, रविनगर, लकडगंज, मेडिकल चौक अशा मुख्य परिसरातील दुग्धजन्य पदार्थांच्या विक्रेत्यांचा घरपोच सेवा देणाऱ्यांमध्ये समावेश आहे. १५ एप्रिलपर्यंत अनावश्यक कामासाठी मुळीच बाहेर पडू नये. कोरोनापासून बचावासाठी ही सोय आहे. त्यामुळे या सेवेचा लाभ नागरिकांनी घ्यावा, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.
नागपूर : कोव्हिड-19 विषाणूच्या पार्श्वभूमीवर नागपूर महानगरपालिका आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांच्या पुढाकाराने कोव्हिड-19 हे अँप नागपूर शहरातील नागरीकांसाठी तयार करण्यात आले आहे. ज्या नागरिकांना ताप, कोरडा खोकला व श्वास घेण्यास त्रास होत असेल त्यांनी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करुन सदर अँप डाऊनलोड करावे असे आवाहन त्यांनी केले आहे.
यासंदर्भात माहिती देताना आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले, अँप डाऊनलोड केल्यानंतर त्यामध्ये स्वत:च्या आजाराविषयी माहिती भरावी. या अँपमध्ये काही प्रश्न विचारले जातील त्यानुसार संपूर्ण माहिती भरल्यानंतर सबमिट बटनवर क्लिक करावे. सदर भरलेल्या माहितीच्या आधारे कोव्हिड-१९ ची लक्षणे असल्यास मनपाच्या डॉक्टरांना कळेल. त्या माहितीच्या आधारे मनपाचे डॉक्टर संबंधितांशी संपर्क करुन पुढील कार्यवाही करतील, असे त्यांनी सांगितले.
‘कोव्हिडं-19’ अँप लिंक –
‘कोव्हिडं-19’ अँप डाउनलोडल करण्यासाठी https://bit.ly/nmccovid19app ही लिंक क्लिक करावी लागेल. मात्र सदर अँप फक्त कोव्हिड- १९ चे लक्षणे जसे ताप, कोरडा खोकला व श्वास घेण्यास त्रास असणा-या नागरिकांसाठी आहे. इतरांनी सदर अँपचा वापर करु नये, असा इशाराही आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे. ही अँप ७२ तासानंतर गुगल प्ले स्टोर वर नागरिकांसाठी उपलब्ध होणार आहे.
Rajyogini Dadi Janki, the chief of Brahmakumaris Sansthan, the world’s largest spiritual organisation run by women, passed away at the age of 104 after prolonged illness. She breathed her last at 2 am on Friday at a hospital in Mount Abu. She was suffering from respiratory and stomach-related problems for the last two months, an official statement said. Her last rites will be performed on Friday at a ground located in Shanti Van campus of Brahamkumaris headquarters. Prime Minister Narendra Modi expressed grief over her demise.
Rajyogini Dadi Janki Ji, Chief of the Brahma Kumaris, served society with diligence. She toiled to bring a positive difference in the lives of others. Her efforts towards empowering women were noteworthy. My thoughts are with her countless followers in this sad hour. Om Shanti. pic.twitter.com/nCUwyh58f8
ब्रह्मकुमारी संस्था की प्रमुख राजयोगिनी दादी जानकी जी के निधन के बारे में सुनकर अत्यंत दुःख हुआ। अध्यात्म, समाज कल्याण और विशेष रूप से महिला सशक्तीकरण के क्षेत्र में उनका अमूल्य योगदान रहा है। उनके अनगिनत श्रद्धालुओं के प्रति मेरी शोक-संवेदनाएं। pic.twitter.com/3ablrIZ9uV
ब्रह्माकुमारी संस्था की प्रमुख मार्गदर्शक राजयोगिनी दादी जानकी जी के निधन पर शोक व्यक्त करता हूं और विश्व भर में उनके असंख्य अनुयायियों और ब्रह्माकुमारी वृहत्तर परिवार के प्रति हार्दिक संवेदना व्यक्त करता हूं। pic.twitter.com/3lwPhKmugw
— Vice President of India (@VPSecretariat) March 27, 2020
ब्रह्माकुमारी संस्थान की प्रमुख राजयोगिनी दादी जानकी जी के देहांत का समाचार सुनकर अत्यंत दुःख हुआ। उनका निधन आध्यात्मिक जगत के लिए एक अपूरणीय क्षति है। परमपिता परमेश्वर दिवंगत आत्मा को श्रीचरणों में स्थान प्रदान करें एवं अनुयायियों को यह क्षति सहन करने का संबल प्रदान करें। pic.twitter.com/sQ9jbWfhkK
NAGPUR: In a major breakthrough, three people have been arrested by city police cyber cell on Friday for allegedly creating the fake audio clip stating ’59 positive cases’ existing in Nagpur and later making it viral. This was possibly the first case in the region where cyber cops managed to reach the source of the forwarded message in the social media successfully.
The clip had triggered widespread panic across the nation. Police said the culprits, including a businessman owning clubs in city, had made the audio file on March 23 from north Nagpur and later forwarded to their friend to create a scare among the children in their family and also others in the city.
This case now comes with landmark detection by cyber cell which managed to crack the mystery by zeroing down upon three culprits, Jay Gupta (37), Amit Pardhi (38) and Divyanshu Mishra (33), who were placed under arrest in the early hours of Friday. City police had registered the case against unidentified persons at Sadar police station around a day ago after the clip went viral triggering fear and panic across India. The conversation in the clip was between Gupta and Pardhi.
The 4.52 minute clip had also mentioned about 200 more suspected were present in the city. It had also referred to one Dr Kamlesh stating he was on ventilator after being tested positive. The clip had also mentioned a name ‘Nitin’ which many felt was a highly placed politician from Vidarbha currently at the helm of affairs in the fight against Covid-19.
Mishra had forwarded the fake clip to wife who later to a friend before the fake clip had gone viral. After learning about the police have become active to nab the creators, Gupta had also deleted the clips and reset the programme in the mobile phone of Mishra’s wife.
Cyber cell team of Asst PIs Vishal Mane, Keshav Wagh and Ashwini Jagtap, under DCP Shweta Khedkar, Addl CP, crime, Nilesh Bharne, working under Joint CP Ravindra Kadam and CP BK Upadhyay, first managed to zero down on the woman whom Mishra’s wife had forwarded and later nabbed the rest.
Around 35 people were interrogated thoroughly by the cyber cell before managing to crack the case. Several people were called and rounded up by the cyber team working round the clock in the last couple of days.
अमेरिकेत एक आठवड्यापूर्वी केवळ ८ हजार जणांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले होते. परंतु, आता अमेरिकेने चीनलादेखील मागे टाकले आहे. आतापर्यंत जगात २४ हजारहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, मागील २४ तासात अमेरिकेत १६ हजार लोक कोरोनाच्या विळख्यात सापडले आहेत. आता तेथील एकूण संख्या ८५ हजार झाली आहे.
तीन मोठ्या देशांची तुलना केल्यास तेथील कोरोनाने संक्रमित लोकांची संख्या पाहिल्यास अमेरिकेला सर्वांत मोठा दणका बसला आहे. अमेरिकेत ८५ हजार ०८८ जणांना लागण झाली आहे. चीनमध्ये ८१ हजार २८५ जणांना लागण झाली आहे. इटलीमध्ये ८० हजार ५८९ जणांना लागण झाली आहे.
अमेरिकेत मागील २४ तासात २६३ लोकांचा मृत्यू झाला आहे. एका दिवसात अमेरिकेत कोरोनाने मृत्यू झालेला ही सर्वात मोठी संख्या आहे. याप्रकारे अमेरिकेत गुरुवारपर्यंत एकूण १ हजार २९० लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर जवळपास २ हजार लोकांची परिस्थिती गंभीर बनली आहे.
चीनमध्ये आतापर्यंत ३ हजार, २८७ लोकांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. तर इटलीमध्ये कोरोनाने आचापर्यंत ८ हजार २१५ लोकांचा मृत्यू झाला आहे. अमेरिकेतील कन्फर्म केसची संख्या चीनपेक्षा अधिक असल्याच्या मुद्द्यावर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प म्हणाले, हे कुणालाही माहिती नाही की, चीनमध्ये किती संख्या आहे. मी चीनचे राष्ट्रपती शी जिनपिंग यांच्याशी चर्चा करेन.
नागपूर : कोरोनाबाधित रूग्णाच्या संख्येत विदर्भात शुक्रवारी अचानक पाच रूग्णांची वाढ झाली आहे. आरोग्य प्रशासनाकडून ही माहिती देण्यात आली आहे. नागपुरातील कोरोनाबाधित रूग्णाच्या संख्येत गुरूवारी एकने वाढ झाली होती. शुक्रवारी नागपुरात आणखी पाच रूग्णाच्या नमुन्याचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत.
शुक्रवारचे नवे रूग्ण मिळून नागपुरातील कोरोनाबाधित रूग्ण संख्या १० एवढी झाली होती. मात्र, एका रूग्णाचे नमुने निगेटिव्ह आल्याने त्याला काल रूग्णालयातून सुटी देण्यात आली आहे. त्यामुळे नागपुरातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या आता ९ एवढी झाली आहे तर यवतमाळातील ४ रूग्ण मिळून विदर्भात कोरोनाचे १३ रूग्ण झाले आहेत,असे आरोग्य प्रशासनाने स्पष्ट केले.
दिल्लीहून परतलेल्या ज्या रूग्णाचे नमुने गुरूवारी पॉझिटीव्ह आढळले होते त्याच रूग्णाच्या परिवारातील आणखी तीन जणांनाही कोरोनाचे संक्रमण झाले आहे. तर एक रूग्ण हा त्यांच्याच घरी काम करणारा व्यक्ती आहे. नव्याने आढळलेल्या रूग्णामध्ये एक रूग्ण गोंदियाचा रहिवासी आहे. यवतमाळ मध्येकोरोनाबाधित रूग्णांची संख्या ४ वर स्थिरावली आहे. यवतमाळ मधील दोन रूग्णाच्या प्रकृतीत ही सुधारणा होत असल्याचे आरोग्य विभागाने काल सांगितले आहे.
नवी दिल्ली : देशात कोरोनाचं संकट असलं तरी बँकाच्या विलिनीकरणाची योजना पुढे ढकलली जाणार नाहीये. ही योजना लवकरच पूर्ण केली होईल. १ एप्रिलपासून ही योजना अंमलात येणार असल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामण यांनी स्पष्ट केलं आहे. त्यामुळे देशात लॉकडाऊन असलं तरी देखील बँकांचं विलिनीकरण होण्याची प्रक्रिया पार पडणार आहे.
वास्तविक, केंद्रीय मंत्रिमंडळाने या महिन्याच्या सुरूवातीला १० सरकारी बँकांची चार बँकांमध्ये विलिनीकरणाच्या प्रस्तावाला मान्यता दिली आहे. हे विलीनीकरण पुढील आर्थिक वर्षापासून अंमलात येणार आहे. म्हणजेच 1 एप्रिलपासून 10 बँका 4 बँकामध्ये विलीन होतील.
कोरोना विषाणूच्या संकटाच्या पार्श्वभूमीवर जेव्हा अर्थमंत्र्यांना जेव्हा विचारले गेले की सरकार सार्वजनिक क्षेत्रातील बँकांसाठी विलीनीकरण करण्याची मुदत वाढविण्याबाबत विचार करीत आहे का, तेव्हा सध्या अशी कोणताही विचार नाही असं त्यांनी म्हटलं.
बँकेचे व्यवहार प्रकरणांचे सचिव देबाशिष पांडा म्हणाले की, विलीनीकरण प्रक्रिया सध्या सुरू आहे, बँक क्षेत्र कोरोनाच्या आव्हानावर मात करेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. अर्थमंत्र्यांचे हे विधान महत्त्वपूर्ण आहे. कारण कोरोना विषाणूच्या साथीच्या पार्श्वभूमीवर विलिनीकरणाची अंतिम मुदत वाढविण्यात यावी अशी काही विभागांची मागणी आहे.
अखिल भारतीय बँक ऑफिसर्स कॉन्फेडरेशनने (एआयबीओसी) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना आजपासून कोरोनामुळे विलीनीकरण प्रक्रिया पुढे ढकलण्याची मागणी केली आहे.
प्रस्तावित विलीनीकरणानुसार, ओरिएंटल बँक ऑफ कॉमर्स आणि युनायटेड बँक ऑफ इंडियाचं विलिनीकरण पंजाब नॅशनल बँकेत, सिंडिकेट बँकचं विलिनीकरण कॅनरा बँकेत, आंध्र बँक आणि कॉर्पोरेशन बँकेचं विलिनीकरण बँक ऑफ इंडियामध्ये तर अलाहाबाद बँकेचं विलिनीकरण इंडियन बँकेत होणार आहे.
या विलिनीकरणानंतर देशात सात मोठ्या आकाराच्या बँका असतील ज्यांचा व्यवसाय आठ लाख कोटींपेक्षा जास्त असेल. विलिनीकरणानंतर सात मोठ्या बँका आणि पाच लहान बँका देशात राहतील. 2017 मध्ये सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची संख्या 27 होती.
मुंबई : करोनाला रोखण्यासाठी देशभरात लागू झालेल्या लॉक डाऊननंतर अर्थव्यवस्ठेला सावरण्यासाठी केंद्र सरकारपाठोपाठ रिझर्व्ह बँकेने आज मोठी घोषणा केली. बँकेने प्रमुख व्याजदरात ०.७५ टक्क्याची कपात करून तो ४.४० टक्के करण्यात केला आहे. व्याजदर कपातीने ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला असून गृह, वाहन यासह इतर कर्जांचा दर कमी होणार असून मासिक हप्त्याचा भार हलका होणार आहे.
बाजारात रोकड उपलब्धता वाढवण्यासाठी एसएलआर दर ३ टक्के करण्यात आला आहे. यामुळे बँकांना १.७ लाख कोटींची अतिरिक्त रोकड उपलब्ध होणार आहे. याशिवाय आणखी दोन उपाययोजनांमुळे येत्या ३० जून पर्यंत बाजारात ३.७४ लाख कोटीची अतिरिक्त रोकड उपलब्ध होणार असल्याचे आरबीआयने म्हटल आहे.
लॉक डाऊनच्या पार्श्वभूमीवर बँकेच्या पतधोरण समितीने नियोजित वेळापत्रकाचा आठवडाभर आधीच बैठकी घेतली. ज्यात समितीने रेपो दरात ०.७५ टक्क्यांची कपात करण्याचा निर्णय घेतला. आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी ही घोषणा केली. RBI ने रेपो रेट ०.७५ टक्के घटवून ४.४० टक्के केला आहे. रिव्हर्स रेपो रेट ०.९० टक्के घटवून ४ टक्के केला असल्याचे शक्तिकांत दास यांनी सांगितले.
करोनाशी लढा देण्यासाठी अर्थमंत्रालया गुरुवारी १.७० लाख कोटींची पॅकेज जाहीर केले होते. रेपो दर कपातीनंतर शेअर बाजार तेजीत दिसून आली. सेन्सेक्स १००० अंकांनी तर निफ्टी ३०० अंकांनी वधारले आहेत. दरम्यान रिजर्व्ह बँकेच्या १५० कर्मचाऱ्यांना खरबदारीचा उपाय म्हणून quarantine केले असल्याची माहिती दास यांनी यावेळी दिली.
नागपूर : कोरोनाबाधित पहिला रुग्ण कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून घरी जात असताना त्याचवेळी पाचवा रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली. दिल्ली प्रवासाची पार्श्वभूमी असलेला हा रुग्ण १८ मार्चपासून नागपुरात आहे. दोन दिवसांपूर्वीपासून लक्षणे आढळून आल्याने बुधवारी मेडिकलमध्ये दाखल झाले. गुरुवारी सकाळी नमुने पॉझिटिव्ह आले. प्राप्त माहितीनुसार, त्यांच्यापूर्वी त्यांची पत्नी आणि दोन्ही मुलांनी मेडिकलमध्ये नमुने तपासले असता ते निगेटिव्ह आले. परंतु आता पुन्हा त्यांचे नमुने तपासले जाणार आहे.
व्यवसायाच्यानिमित्ताने ४२ वर्षीय हा पुरुष रुग्ण दिल्लीला गेले होते. १८ मार्च रोजी ते घरी परतले. सुरूवातील काही दिवस प्रकृती ठिक होती. परंतु गेल्या दोन-तीन दिवसांपासून त्यांना सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी आदींचा त्रास वाढला. हीच लक्षणे त्यांच्या पत्नी आणि दोन्ही मुलांमध्ये होती. यामुळे मंगळवारी त्यांनी मेडिकलमध्ये जाऊन नमुन्याची तपासणी केली असता ते निगेटिव्ह आले. बुधवारी यांनीही आपल्या नमुन्याची तपासणी केली. परंतु आज सकाळी नमुने पॉझिटिव्ह येताच सर्वांनाच धक्का बसला. विशेष म्हणजे, त्यांनी दिल्ली ते नागपूर हा प्रवास रेल्वेतून केला आहे, आणि गेल्या आठ दिवसांपासून ते नागपुरात आहेत. यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. संपर्कात आलेल्या व्यक्तीची माहिती घेतली जात आहे.
नागपूर, ता. २६ :‘कोरोना’ चा प्रसार रोखण्यासाठी नागपुरात ‘लॉकडाऊन’ घोषित करण्यात आले आहे. यादरम्यानअत्यावश्यक सेवांचे दुकान सुरू असले तरी नागरिकांचा घराबाहेर पडण्याचा त्रास वाचविण्यासाठी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घरपोच किराणा मिळण्याची व्यवस्था केली आहे. फोन करा आणि किराणा घरपोच मिळवा अशी ही व्यवस्था आहे.
नागपूर महानगरपालिकेअंतर्गत असलेल्या दहाही झोनमधील सुमारे ४५ दुकानदारांनी ही व्यवस्था केली आहे. अशी व्यवस्था व्हावी यासाठी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्वतः पुढाकार घेतला. नागरिकांच्या सोयीसाठी आणि नागरिकांनी घराबाहेर पडू नये यासाठी पुढाकार घेणारी नागपूर महानगरपालिका राज्यात पहिली ठरली आहे. नागरिकांनी या सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन स्वतः मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे. घरपोच किराणा सामान पोहचविणाऱ्या दुकानांची यादी परिसराचे नाव आणि मोबाईल क्रमांकासहदिलेल्या PDF मध्ये तसेच मनपाच्या अधिकृत फेसबुक पेजवर उपलब्ध आहे.
याव्यतिरिक्त प्रत्येक झोनमधील जी अत्यावश्यक सेवांची दुकाने सुरू आहेत, त्या दुकानांसमोर सामाजिक अंतर ठेवण्यासाठी मनपा व्दारे तीन-तीन फुटांवर गोल खुणा करण्यात आल्या आहेत. त्यानुसारच ग्राहकांना उभे राहायचे आहे. कोरोनासंदर्भात आवश्यक उपाययोजनांवर मनपा प्रशासन भर देत असून याअंतर्गत ही व्यवस्था करण्यात आली आहे.
नागपूर: नागपूर शहरातील प्रत्येक कुटुंब आणि कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीची आरोग्यविषयक माहिती घेण्यासाठी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार आजपासून कोरोना सर्व्हेक्षणाला सुरुवात झाली आहे.
नागपुरात आढळलेले कोरोना बाधित रुग्ण लक्ष्मीनगर आणि धरमपेठ झोनमधील होते. त्यांच्या घरापासून तीन किमी परिसरातील कुटुंबांचा सर्व्हे नुकताच आटोपला. आता उर्वरित आठही झोनचा सर्व्हे करण्याचा निर्णय आयुक्त तुकाराम मुंढे यांनी घेतल्यानंतर आज २६ मार्चपासून २८८ चमूच्या माध्यमातून सर्व्हेक्षणाला सुरुवात झाली. आठही झोनमध्ये एकाच वेळी विविध चमूने नागरिकांच्या घरी भेटी देत आरोग्यविषयक माहिती जाणून घेतली. याच सर्व्हेदरम्यान कोणी परदेशातून आले आहेत का, याची माहितीही घेतली जात असल्याचे आरोग्य उपसंचालक तथा आरोग्य अधिकारी डॉ. भावना सोनकुसळे यांनी सांगितले. या सर्व्हेक्षणामुळे संपूर्ण शहरातील नागरिकांची आरोग्यविषयक माहिती मनपाला उपलब्ध होणार असून कोरोनाची काही लक्षणे कोणामध्ये आढळल्यास तातडीने त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात येतील. त्यामुळे नागरिकांनी घरी येणाऱ्या मनपाच्या चमूला सहकार्य करावे, असे आवाहन डॉ. भावना सोनकुसळे यांनी केले आहे.
नवी दिल्ली : देशभरात लॉक डाऊन सुरु असून आणखी २० दिवस अशीच स्थिती राहणार आहे. या कठिण परिस्थितीत शेतकऱ्यांना केंद्र सरकारने दिलासा दिला आहे. पंतप्रधान किसान (PM KISAN) योजनेत सरकारने १५००० कोटी मंजूर केले आहेत. लवकरच टप्याटप्याने ते शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहेत. जवळपास साडेसात कोटी शेतकऱ्यांना या मदतीचा लाभ मिळणार आहे.
करोनाचा प्रसार रोखण्यासाठी सरकारने देशभर २१ दिवसांचा लॉक डाऊन घोषीत केला आहे. अत्यावश्यक सेवांना यातून वगळण्यात आले आहे. मात्र शेतकरी बांधवांना शेतमाल नेण्यासाठी अनके अडचणींचा सामना करावा लागत आहे. अशा कठीण परिस्थितीत दोन हजारांची मदत शेतकऱ्यांना थोडीफार दिलासा देणारी ठरणार आहे.
येत्या १ एप्रिलपासून शेतकऱ्यांच्या खात्यात २ हजार रुपये जमा केले जाणार आहे. पीएम किसान (PM KISAN) योजनेत तीन टप्प्यात शेतकऱ्यांना सहा हजारांची मदत केली जाणार आहे. लाभार्थी शेतकऱ्यांची यादी तयार करण्यात आली असून ती संबंधित राज्य सरकारांना पाठवण्यात आल्याची माहिती एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली. १ एप्रिल रोजी शेतकऱ्यांच्या खात्यात २ हजारांचा पहिला हप्ता जमा करण्यासाठी सरकारी यंत्रणा सज्ज असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.
पीएम किसान (PM KISAN) योजनेत डिसेंबर २०१९ पासून ८ कोटी ७१ लाख शेतकऱ्यांना ५४ हजार कोटींचा निधी वितरित करण्यात आला आहे. देशभरातून जवळपास १० कोटी शेतकऱ्यांची माहिती सरकारला प्राप्त झाली आहे. यात राज्यनिहाय शेतकरी आणि आधार जोडणी यांची छाननी केली जात असल्याचे या अधिकाऱ्याने सांगितले.
नागपूर, ता. २५ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन दरम्यान अत्यावश्यक सेवा सुरू राहतील. यातही मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पुढाकार घेत केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोशिएशनच्या सहकार्याने शहरातील विविध भागांतील १२ मेडिकल स्टोर्स २४ तास सुरू ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
अत्यावश्यक सेवांमध्ये किराणा, भाजीपाला, दूध, औषधी आदींचा समावेश आहे. या वस्तूंची दुकाने शहरात सुरू राहतील. मात्र या ठिकाणी नागरिकांनी गर्दी करू नये असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे. या सेवांमध्ये औषधी पुरवठा ही अत्यावश्यक सेवा असून गरजू व्यक्तीना २४ तास औषधी मिळावी या हेतूने मोजकी मेडिकल स्टोर्स २४ तास सुरू ठेवण्याबाबत मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केमिस्ट अँड ड्रगिस्ट असोशिएशनच्या पदाधिकाऱ्यासोबत चर्चा केली. त्याला सकारात्मक प्रतिसाद देत १२ मेडिकल स्टोर्स २४ तास सुरू ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. अन्य मेडिकल स्टोर्स दिवसा नियमित वेळेत सुरू असतील.
‘ही’ मेडिकल स्टोर्स सुरू राहणार २४ तास
लोकमत चौकातील जैन मेडिकल, प्रिन्स मेडिकोज, गेटवेल हॉस्पिटल धंतोली येथील गेटवेल फार्मसी, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथील ड्रग स्टोर्स, मेडिकल चौकातील हार्दिक मेडिकल, धंतोली पोलिस ठाण्यामागील न्यूरॉन फार्मसी, सीआयआयएमएस हॉस्पिटल येथील सीआयआयएमएस फार्मसी, कस्तुरचंद पार्कजवळील किंग्जवे हॉस्पिटल येथील किंग्जवे फार्मसी, टेलिफोन एक्सचेंज चौकातील न्यू एरा हॉस्पिटलची न्यू एरा फार्मसी, सेवन स्टार हॉस्पिटल नंदनवन येथील सेवन स्टार फार्मसी आणि नॉर्थ अंबाझरी मार्गावरील व्होकार्ट हॉस्पिटलची व्होकार्ट फार्मसी ह्या १२ फार्मसी २४ तास सुरू राहतील.
नागपूर, ता. २५ : नागपुरातील कोरोनाबाधित रुग्णांच्या निवासापासून तीन किलोमीटर परिसरात सर्व्हेची घोषणा केल्यानंतर लक्ष्मीनगर आणि धरमपेठ झोनअंतर्ग़त येणाऱ्या संपूर्ण घरांचा सर्व्हे पूर्ण झाला आहे. आता गुरुवार २६ मार्चपासून आता या दोन झोन व्यतिरिक्त संपूर्ण नागपूर शहरात सर्व्हे होणार असून यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.
नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार उर्वरीत आठ झोनमध्येही हा सर्व्हे करण्यात येणार आहे. ‘कोरोना’विषयक जनजागृती आणि शहरातील आरोग्याची माहिती अशा दुहेरी हेतूने हे सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. या संपूर्ण सर्व्हेक्षणादरम्यान संपूर्ण नागरिकांची माहिती घेण्यात येणार आहे. आरोग्यविषयक प्रश्न विचारण्यात येणार आहे. नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावी. आपल्या घरापर्यंत येणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांकडे ओळखपत्र राहणार आहेत. त्यामुळे त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे. ‘लॉकडाऊन’दरम्यान काही अडचणी येत असतील तर त्यासुद्धा आपण त्यांना सांगाव्या, असेही त्यांनी म्हटले आहे.
नागरिकांकडून माहिती घेतल्यानंतर, ज्या कोणाला आरोग्याचा काही त्रास जाणवत असेल त्यांनी अथवा त्यांच्या कुटुंबीयांना मनपाच्या नियंत्रण कक्षात फोन करून याबाबत माहिती द्यायची आहे. कुणालाही दवाखान्यापर्यंत जाण्याची गरज नाही. नागरिकांनी माहिती दिल्यानंतर डॉक्टरांची चमू संबंधित घरापर्यंत जाईल आणि तेथे उपचार देईल. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनानचे पुढील आदेश येईपर्यंत घराबाहेर पडण्याची गरज नाही, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
लक्ष्मीनगर आणि धरमपेठ झोनमधील सर्व्हेक्षणासाठी १६ चमू तयार करण्यात आल्या होत्या. एका चमूमध्ये २६ सदस्य असून त्यातील २-२ सदस्य एका-एका घरी भेट देत आहेत. आता संपूर्ण शहराच्या सर्व्हेसाठी २८८ चमू तयार करण्यात आल्या असून यातील दोन-दोन सदस्य शहरातील प्रत्येक घरी जाऊन हा सर्व्हे करेल. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर राज्यात अशा प्रकारचा हा पहिलाच सर्व्हे असून नागपूर महानगरपालिकेने कोरोनाचा संसर्ग वाढू नये, यासाठी हे पाऊल उचलले आहे. मनपाकडून येणाऱ्या टीममध्ये आरोग्य सेविका, शिक्षक तसेच कर्मचारी आहेत. त्यामुळे कुठलाही दुजाभाव न ठेवता त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.
सर्व्हेदरम्यान एकही बाधीत आढळला नाही
पूर्वीच्या बाधीत चार रुग्णांच्या घरापासून तीन किलोमीटरच्या परिघात सर्व्हेक्षण करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मनपाच्या आरोग्य विभागाने लक्ष्मीनगर आणि धरमपेठ झोनमध्ये सुमारे ६४ हजार ४३६ कुटुंबातील दोन लाख ६४ हजार ६१७ लोकांची माहिती घेतली. विशेष म्हणजे दोन झोनचा सर्व्हे पूर्ण झाला असून त्यात एकही कोरोनाची लक्षणे असलेला अथवा बाधीत व्यक्ती आढळला नाही. ही अत्यंत सुखावह बाब असल्याचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी म्हटले आहे.
नागपूर, ता. २५ :नागपूर महानगरपालिका समाजकल्याण विभाग आणि दीनदयाल अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानांतर्गत ‘लॉकडाऊन’दरम्यान रस्त्यावर राहणाऱ्या आणि फुटपाथवर झोपणाऱ्या बेघरांना शहरात असलेल्या पाचही बेघर निवाऱ्यांमध्ये नेण्यात येत आहे. कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर त्यांचीही या बेघर निवाऱ्यामध्ये विशेष काळजी घेतली जात आहे. राज्यातील विविध महानगरपालिकांच्या अख्यत्यारीत असलेल्या अशा बेघर निवाऱ्यांमध्ये कोरोनाच्या पार्श्वभूमीवर रस्त्यावरील लोकांना नेऊन लाभार्थ्यांची विशेष काळजी घेणारी नागपूर महानगरपालिका ही राज्यात पहिली ठरली आहे.
मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार, कोरोनाची बाधा होऊ नये, यासाठी शहरातील प्रत्येक घटकावर लक्ष केंद्रित केले जात आहे. रस्त्यावर राहणारे बेघर अर्थात शहरी बेघर निवाऱ्यातील लाभार्थी हे त्यातलेच एक होय.
नागपूर शहरात सीताबर्डी येथील बुटी कन्या शाळा, टिमकी भानखेडा येथील हंसापुरी प्राथमिक शाळा, डिप्टी सिग्नल येथील गुरु घासीदास समाज भवन, नारा रोड येथील मनपा ग्रंथालय आणि समाजभवन तसेच टेकडी गणेश मंदिराजवळील रेल्वे स्थानक पुलाच्या खाली असे पाच शहरी बेघर निवारा आहेत. ‘लॉकडाऊन’ची घोषणा होताचा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रस्त्यांवरील बेघरांना तातडीने बेघर निवाऱ्यात नेण्याचे आदेश दिले. त्यानुसार यंत्रणेने बेघरांना तेथे नेले. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर स्वच्छतेचे धडे दिले जात आहे. कोरोना विषाणूसंदर्भात संपूर्ण माहिती व घ्यावयाची काळजी शासनाच्या माहिती पुस्तिकेच्या माध्यमातून देण्यात येत आहे. पाचही निवाऱ्यांमधील लाभार्थ्यांना निवाऱ्यात प्रवेश करण्यापूर्वी हात स्वच्छ धुण्यास सांगण्यात येत आहे. लाभार्थ्यांनी हात कसे धुवायचे याची प्रात्यक्षिके निवारा कर्मचाऱ्यांमार्फत करून दाखविण्यात येत आहे. लाभार्थ्यांनी कोणती खबरदारी घ्यावी, याचीही माहिती दिली जात आहे. मास्कविषयी माहिती देऊन मास्कही उपलब्ध करून दिले जात आहे.
सध्या नागपुरात लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे वृद्ध बेघरांसोबतच सर्व बेघर लाभार्थ्यांना मोफत भोजन उपलब्ध करून देण्यात येत आहे. भोजनसमयी तीन फुटाचे अंतर ठेवून बसविण्यात येत आहे. त्यांना बाहेर न निघण्याविषयी विनंती करण्यात येत आहे. ज्या बेघरांना ताप, सर्दी, खोकल्याचा त्रास असेल किंवा श्वास घेण्यास त्रास होत असेल अशांची विशेष काळजी घेऊन त्यांची वैद्यकीय तपासणी करण्यात येत आहे व आवश्यक तो औषधोपचार करण्यात येत आहे.
सर्व बेघर निवाऱ्यांमछ्ये कीटकनाशक फवारणी करण्यात यावी यासंदर्भात नागपूर महानगरपालिका आरोग्य विभागाकडे विनंती अर्ज करण्यात आला आहे. पाचही निवाऱ्यांमध्ये सुमारे ३०० बेघर व्यक्ती असून कोव्हिड-१९ बाबत जाणीव जागृती आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यात येत आहे.
या बेघर निवाऱ्यांमध्ये भोजनाच्या व्यवस्थेसाठी स्वयंसेवी संस्थांनी पुढे येण्याचे आवाहनही आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे. यासाठी उपायुक्त तथा समाजकल्याण अधिकारी डॉ. रंजना लाडे (मो.क्र.- ९७६५५५०२१४) आणि दीनदयाल अंत्योदय योजनेचे कार्यक्रम समन्वयक प्रमोद खोब्रागडे (मो.क्र. ९९२२०९३६३९) यांचेशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
नागपूर, ता. २४ : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घोषणा केल्यानंतर कोरोना विषाणूच्या प्रतिबंधासाठी नागपुरातही १४ एप्रिलपर्यंत ‘लॉक डाऊन’ करण्यात आल्यामुळे तोपर्यंत नागरिकांनी घरातच राहावे, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.
ते म्हणाले, ‘लॉक डाऊन’ला नागरिकांनी घाबरण्याची आवश्यकता नाही. केवळ १४ एप्रिलपर्यंत सर्वांना आपल्या घरातच राहायचे आहे. संयमाने घरात राहावे. स्वत:ला आणि कुटुंबीयांना सुरक्षित ठेवावे. सामान्य जनतेला आवश्यक सामान उपलब्ध व्हावे यासाठी कारणा दुकान, मेडिकल स्टोअर्स, दूध, भाजी आदींची दुकाने सुरू असतील. या सामानांसाठी शासनाने आवश्यक ती व्यवस्था केली आहे. त्यामुळे सामानाचा विनाकारण साठा करु नका. शासन आणि मनपाच्या प्रयत्नांना मदत करा आणि कोरोनासोबतची लढाई जिंका, असे आवाहनही आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.
नागपूर, ता. २४ : नागपूर शहरात कोरोनाचा ५० वर रुग्ण असल्याचा दावा करणारी मोबाईलवरील संभाषण क्लिप व्हायरल होत आहे. ही क्लिप बोगस असून त्यावर कुणीही विश्वास ठेवू नये, असे आवाहन करीत अशा अफवा पासरविणाऱ्या समाजविघातक प्रवृत्तीवर कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.
यासंदर्भात आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले, नागपुरात कोरोनाचा प्रसार होऊ नये म्हणून परिस्थितीचे गंभीर्य आणि वेळेची गरज ओळखून तातडीने सर्व खबरदारीच्या उपाययोजना करण्यात आल्या. इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय तसेच नागपूर महानगरपालिकेचा आरोग्य विभाग एकत्रितपणे दिवसरात्र कार्य करीत आहे. नागपुरात होणारी चाचणी एक्सपर्ट डॉक्टर्सकडून करण्यात येते. त्यामुळे त्यावर संशय घेणे म्हणजे समर्पित आरोग्य सेवेला आणि शासनाच्या प्रामाणिक प्रयत्नांची खिल्ली उडविण्यासारखे आहे. अशा क्लिप सोशल मीडियावर फॉरवर्ड करून समाजात भीती पसरविणाऱ्या प्रवृत्तीचा प्रशासन बंदोबस्त करेलच. पण जनतेनेही अशा पोस्ट आणि क्लिप फॉरवर्ड करताना संयम बाळगावा. कुठलीही खातरजमा न करता आणि त्याची सत्यता न तपासता असे संदेह फॉरवर्ड करणाऱ्याची गय केली जाणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला.
केवळ ४ बाधित; प्रकृतीत सुधारणा
नागपूर शहरात कोरोनाबाधित केवळ चार रुग्ण असून त्यांच्यावर योग्य उपचार सुरू आहेत. ते आरोग्य विभागाच्या देखरेखीखाली असून त्यांच्या प्रकृतीत सुधारणा आहे. नागपूरकरांनी घाबरण्याची गरज नसून शासन आणि प्रशासनाच्या निर्देशाचे योग्यरीत्या पालन करावे आणि १५ एप्रिलपर्यंत घराबाहेर पडू नये, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले.
केवळ शासन माहितीवर विश्वास ठेवा
कोरोनासंदर्भात अनेक चुकीच्या माहिती सोशल मीडियावर फिरत आहे. मात्र अशा कुठल्याही माहितीवर विश्वास न ठेवता अपडेटसाठी नागपूर महानगरपालिकेच्या अधिकृत फेसबुक पेज आणि ट्विटर हँडलवरील माहितीला आणि शासनाच्या अधिकृत वेबसाईटवरील माहितीला खरे समजावे अथवा सत्य त्यावरून तपासावे किंवा मनपाच्या नियंत्रण कक्षातून माहिती घ्यावी, असे आवाहनही मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.
नागपूर, ता. २४ : नागपुरातील कोरोनाबाधित रुग्णांच्या निवासापासून तीन किलोमीटर परिसरात सर्व्हेची घोषणा केल्यानंतर लक्ष्मीनगर आणि धरमपेठ झोनअंतर्ग़त येणाऱ्या सुमारे ५० हजार कुटुंबातील दोन लाख लोकांपर्यंत मनपाच्या आरोग्य विभागाची चमू पोहोचली. आता या दोन झोन व्यतिरिक्त संपूर्ण नागपूर शहरात असा सर्व्हे होणार असून यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन नागपूर महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.
नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानुसार उर्वरीत आठ झोनमध्येही हा सर्व्हे करण्यात येणार आहे. ‘कोरोना’विषयक जनजागृती आणि शहरातील आरोग्याची माहिती अशा दुहेरी हेतूने हे सर्व्हेक्षण करण्यात येणार आहे. यासंदर्भात माहिती देताना सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण गंटावार म्हणाले, या संपूर्ण सर्व्हेक्षणादरम्यान संपूर्ण नागरिकांची माहिती घेण्यात येणार आहे. आरोग्यविषयक प्रश्न विचारण्यात येणार आहे. नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे द्यावी. आपल्या घरापर्यंत येणाऱ्या प्रत्येक कर्मचाऱ्यांकडे ओळखपत्र राहणार आहेत. त्यामुळे त्यांना सहकार्य करण्याचे आवाहन डॉ. गंटावार यांनी केले आहे.
नागरिकांकडून माहिती घेतल्यानंतर, ज्या कोणाला आरोग्याचा काही त्रास जाणवत असेल त्यांनी अथवा त्यांच्या कुटुंबीयांना मनपाच्या नियंत्रण कक्षात फोन करून याबाबत माहिती द्यायची आहे. कुणालाही दवाखान्यापर्यंत जाण्याची गरज नाही. नागरिकांनी माहिती दिल्यानंतर डॉक्टरांची चमू संबंधित घरापर्यंत जाईल आणि तेथे उपचार देईल. त्यामुळे नागरिकांनी प्रशासनानचे पुढील आदेश येईपर्यंत घराबाहेर पडण्याची गरज नाही, असे आवाहनही त्यांनी केले आहे.
नागपूर, ता. २४: ‘कोरोना’ प्रतिबंधाच्यादृष्टीने संचारबंदी लागू करण्यात आली आहे. प्रत्येकाने नियमाचे पालन करावे. कुणीही घराबाहेर पडू नये. ‘कोरोना’ संदर्भात माहिती आणि तक्रारीसाठी मनपा नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे. याशिवाय पाणी पुरवठा आणि मलनि:सारणाच्या तक्रारींसाठीही हेल्प लाईन सुरू करण्यात आली आहे. नागरिकांना सुविधा प्रदान करण्यास महानगरपालिका तत्पर आहे. नागरिकांनीही आपली जबाबदारी ओळखून घरीच राहावे, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले.
मनपाद्वारे ‘कोरोना‘ संदर्भात सुरू करण्यात आलेले नियंत्रण कक्ष व पाणी पुरवठा आणि मलनिःसारण सुविधेबाबच्या हेल्प लाईनलाईनची मंगळवारी (ता.२४) मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पाहणी केली व संपूर्ण यंत्रणेच्या कार्याचा आढावा घेतला.
शहरात संचारबंदी लागू असल्याने अत्यावश्यक गोष्टींसाठीच घरातील कोणत्याही एका सदस्याला घराबाहेर पडण्याची मुभा आहे. भाजी, किराणा, औषध या अत्यावश्यक गोष्टींची खरेदी करताना संसर्ग टाळण्यासाठी दोन व्यक्तींमध्ये किमान पाच फुटाचे अंतर राखावे. ‘कोरोना’च्या प्रतिबंधासाठी या सर्व गोष्टींचे पालन करावे. नागरिकांची कोणत्याही प्रकारे असुविधा होऊनये यासाठी मनपामध्ये नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आले आहे. नियंत्रण कक्षामध्ये आधी एकच संपर्क क्रमांक होता आता आणखी एक असे दोन संपर्क क्रमांक सुरू करण्यात आले आहेत. नागरिकांनी मनपाच्या नियंत्रण कक्षाशी ०७१२ २५६७०२१ आणि ०७१२ २५५१८६६ या क्रमांकावर संपर्क साधावा.
याशिवाय पाणी पुरवठा आणि मलनिःसारण या अत्यावश्यक सेवांसाठी स्वतंत्र हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. सोमवार (ता.२३)पासून सुरू करण्यात आलेल्या या हेल्पलाईनवर पाणी पुरवठ्याबाबत सुमारे १५ तर मलनिःसारण संदर्भात १२ तक्रारी प्राप्त झाल्या. यापैकी काही तक्रारी सोडविण्यात आल्या आहेत तर काहींवर काम सुरू आहे. पाणी पुरवठा आणि मलनिःसारण सुविधेसाठी नागरिकांनी ०७१२ २५३२४७४ या क्रमांकावर संपर्क साधावा.
नियंत्रण कक्ष सुरू केल्यापासून अर्थात १३ मार्चपासून आजपर्यंत १०११ नागरिकांनी कोरोनासंदर्भात माहिती विचारली. मंगळवारी (ता.२४) सकाळी ८ ते दुपार २ वाजतापर्यंत ५७ नागरिकांनी फोन करून माहिती घेतली, तक्रारी केल्या. नियंत्रण कक्षात माहिती देण्यासाठी एक वैद्यकीय अधिकारी, एक परिचारिका आणि दोन कर्मचारी नागरिकांना माहिती देत आहेत.
कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्यास मनपा तत्पर आहे. मनपातर्फे ‘इमर्जेंसी ट्रान्सपोर्टेशन प्लान’ संदर्भात कार्य सुरू आहे. नागरिकांनी सहकार्य करावे हीच अपेक्षा आहे. ३१ मार्च पर्यंत कुणीही घराबाहेर पडू नये. आवश्यक माहितीसाठी मनपाशी संपर्क साधावा, असेही आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.
नागपूर, ता. २३ : ‘कोरोना’वर प्रतिबंधासाठी विनाकारण रस्त्यावर न फिरण्याचे आदेश निघाल्यानंतर तीन दिवसांपासून नागपूर शहरात अघोषित संचारबंदी आहे. त्यातल्या त्यात आता मुख्यमंत्र्यांनी संचारबंदी लागू केले. यामुळे नागपूर शहरातील रस्ते ओस पडले आहेत. या ओस रस्त्यांवर आता नागरिकांनी टाकलेले बांधकाम साहित्य स्पष्टपणे दिसू लागले आहे. हे साहित्य तातडीने उचलण्याचे आदेश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहे.
त्याच अनुषंगाने मनपाच्या लोककर्म विभागाचे अधीक्षक अभियंता मनोज तालेवार यांनी लक्ष्मीनगर, धरमपेठ, हनुमाननगर, धंतोली आणि मंगळवारी झोनच्या संबंधित अधिकाऱ्यांना तसे आदेश निर्गमित केले आहे. संचारबंदी काळात ठिकठिकाणी रस्त्यांच्या बाजूला पडलेले बांधकाम साहित्य उचलण्यात यावे आणि ज्या परिसरात किंवा भागांत घाण आहे, जेथून मच्छरांची उत्पत्ती होते, अशा ठिकाणी हे साहित्य टाकण्याचे निर्देशही त्यांनी दिले आहेत.
नागपूर, ता. २३ : एकीकडे कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी जिल्हा आणि मनपा प्रशासन दिवसरात्र एक करीत आहे तर दुसरीकडे प्रशासनाच्या आदेशाला झुगारून काही खासगी कंपन्यांकडून कर्मचाऱ्यांना कामावर बोलावले जात आहे. असा आदेश झुगारणाऱ्या दोन कंपन्यांना सोमवारी (ता. २४) मनपाच्या उपद्रव शोध पथकाने दीड लाखांचा दंड ठोठावला.
शहरातील सर्व खासगी, कॉर्पोरेट व अन्य आस्थापना ३१ मार्चपर्यंत बंद ठेवण्याचे निर्देश मनपा आयुक्तांनी दिलेले आहेत. असे असतानाही वर्धमान नगर येथील ठवकर कंपनीतील सुमारे ६०-७० लोकांना कामावर बोलावण्यात आले होते. कंपनीचे शटर बंद ठेवून त्यांच्याकडून काम करवून घेतले जात होते.
मनपाच्या नियंत्रण कक्षाकडे याबाबत माहिती मिळताच मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार लकडगंज झोनचे सहायक आयुक्त सुभाष जयदेव आणि उपद्रव शोध पथकाच्या चमूने सदर कंपनीवर धाड टाकली. तक्रारीनुसार तेथे सुमारे ६० ते ७० कर्मचारी काम करताना आढळून आले. कोरोना संदर्भात साथ रोग नियंत्रण कायद्याखाली मनपा आयुक्तांनी काढलेल्या आदेशाचे उल्लंघन झाल्याचे लक्षात येताच मनपाच्या अधिकाऱ्यांनी सदर कंपनीवर एक लाख रुपयांचा दंड ठोठावला.
बजाज शो रुमवरही कारवाई
वर्धमान नगरमधीलच हनी सागर अपार्टमेंट येथे बजाजचे शो रुम आहे. याठिकाणीसुद्धा मागील गेटने कामगारांना आत घेऊन तेथे काम सुरू ठेवण्यात आले होते. याबाबतही मनपाच्या नियंत्रण कक्षाला माहिती मिळताच अधिकाऱ्यांनी तेथेही धाड मारली. आदेशाचे उल्लंघन झाल्याचे लक्षात येताच शो रुम मालकाला ५० हजार रुपयांचा दंड ठोठावण्यात आला. वेळोवेळी सांगूनही जर नागरिक कायद्याचे उल्लंघन करीत असेल तर यापेक्षाही कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.
नागपूर, ता. २३ : ‘कोरोना’ वर मात करण्यासाठी जिल्हा प्रशासन, मनपा प्रशासन यांच्यासह संपूर्ण आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. या आरोग्य यंत्रणेच्या साथीला वैद्यकीय क्षेत्रातील सेवानिवृत्त अधिकारी कर्मचाऱ्यानी यावे, असे आवाहन नागपूर महानगर पालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
‘कोरोना’शी लढा देण्यासाठी संपूर्ण आरोग्य यंत्रणा दिवसरात्र काम करीत आहे. काळजी घेण्याचे नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे. तरीही भविष्यात गंभीर परिस्थिती उद्भवली तर आरोग्य यंत्रणाही तोकडी पडण्याची शक्यता आहे. हे लक्षात घेता यापूर्वी निमलष्करी दल, सैनिकी सेवा, शासकीय आरोग्य सेवा, मनपा आरोग्य सेवा आदी ठिकाणी सेवा देऊन सेवानिवृत्त झालेले वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, डीएमएलटी असलेले व्यक्ती आदिंनी स्वतः पुढाकार घेऊन कोरोनाशी एकत्रितपणे लढा देण्यासाठी आरोग्य सेवा द्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
जे व्यक्ती ही सेवा देण्यास इच्छुक आहेत, त्यांनी मनपाचे सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण गंटावार यांचेशी ९८२२५६९२१३ या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधावा, असे मनपाद्वारे कळविण्यात आले आहे.
नागपूर: राज्यात संचारबंदी लागू झाल्यानंतर शहर पोलिसांनी कठोर उपाययोजना आखल्या आहेत. मध्यरात्री नागपुरातील उड्डाणपुलांवरुन सर्वाधिक वाहतूक होत असल्याचे निदर्शनास येताच उड्डाणपुलांच्या दोन्ही बाजूने कडेकोट पोलिस बंदोबस्त तैनात करण्यात आला. त्यामुळे या मार्गावरील वर्दळ कमी झाली असली तरी रात्री ११.५३ वाजताच्या सुमारास दक्षिण नागपूरसह उपराजधानीतील सर्वच उड्डाणपुलांवर अचानक ‘ब्लॅक आऊट’ झाल्याने संभ्रम निर्माण झाला. नंदनवन परिसरासह सक्करदरा उड्डाणपुलावर झालेल्या या ‘ब्लॅक आऊट’मुळे संभ्रमाचे वातावरण निर्माण झाले. खबरदारीचा उपाय म्हणून दिवे बंद करण्यात आले की अन्य कारणाने, हे मात्र वृत्त लिहिपर्यंत कळू शकले नाही.
राज्यात संचार बंदी लागू झाल्यानंतर शहरात रात्री होणाऱ्या हालचाली टिपल्या असता हे तथ्य समोर आले. संचार बंदी लागू झाल्यानंतर शहरातील मध्यरात्री होणाऱ्या घडामोडी ब्लॅक आऊट व पोलिस बंदोबस्ताचा आढावा घेतला. सिव्हिल लाइन्स परिसरात रात्री १० वाजतानंतर बोटावर मोजण्याइतके नागरिक घराबाहेर फिरताना आढळले. यापैकी तीन नागरिकांकडे पाळीव श्वान होते. तर रात्री १०.१८ वाजताच्या सुमारास चिल्ड्रेन ट्राफिक पार्क मागील व्हीआयपी मार्गावर पाच युवक तीन मोपेडवर जाताना आढळले. यापैकी तीन युवकांची देहयष्टी अत्यंत संशयास्पद होती. नाकाबंदीदरम्यान या ठिकाणी नेहमी पोलिस तैनात असतात, परंतु सोमवारी रात्री येथे एकही पोलिस आढळून आला नाही.
जमावबंदी व त्यानंतर सोमवारी लागू झालेल्या संचारबंदीनंतर पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, सह पोलिस आयुक्त रवींद्र कदम यांनी अत्यंत सावधगिरी बाळगत काळजीपूर्वक पावले उचलली आहेत. खरबदाराची उपाय म्हणून शहरात येणाऱ्या आठ नाक्यांवर पोलिसांची गस्त वाढविण्यात आली आहे. नागपुरातून बाहेर जाणाऱ्या व उपराजधानीत येणाऱ्या प्रत्येकावर ‘करोना बंदी‘ करण्यात आली आहे. कोण कुठे कशासाठी जात आहे, गेला होता याबाबत पोलिस कसून चौकशी करीत आहेत.
नाक्यांशिवाय शहरातील उड्डाणपुलांजवळही पोलिस तैनात करण्यात आले आहेत. उपराजधानातील सर्वच उड्डाणपुलांवर प्रवेश घेताना अथवा खाली उतरताना पोलिसांचा चोख बंदोबस्त तैनात करण्यात आला. यासह महत्त्वाच्या चौकांमध्ये पोलिस कर्तव्य बजावत आहेत. सोमवारी रात्री ११.५३ वाजताच्या सुमारास सक्करदरा उड्डाणपुलांवर असताना अचानक पुलावरील दिवे बंद झाले. नेमके काय झाले हे अन्य वाहनचालकाही कळेनासे झाले. वाहनचाकांमध्ये काही काळ भीतीचे वातावरण निर्माण झाले. वाहनाचा दिवा ‘अप्पर डिप्पर’ करीत चालक समोर निघाले असता पोलिसांचा ताफाच आडवा झाला. त्याने पण ज्यांच्याकडे ओळखपत्र नव्हते ते रात्री कशासाठी फिरत आहेत, याचे नेमके कारण शोधण्याचा प्रयत्न नागपूर पोलिस करताना आढळून आले.
नागपूरकर पोलिसांना सहकार्य करतात पण सोमवारी मात्र नागपूरकर पोलिसांना प्रतिसाद देताना आढळून आले नाहीत. करोना बंदी झुगारत नागपूरकर खुलेआम रस्त्यांवर फिरताना आढळले. शहरवासीय कोणतीही काळजी न करता झोपेत असताना शहर पोलिस मात्र सोमवारी रात्री प्रामाणिकपणे कर्तव्य बजावत होते. त्यांच्या शिस्तीचा भाग असला तरी पोलिस मात्र प्रत्येक नागपूरकरांच्या आरोग्यासाठी झटत आहे. ही खटपट त्यांच्या वागणुकीतून जाणवते. ते दिवस-रात्र जागून केवळ ‘आपके खातीर‘ रस्त्यांवर उभे आहेत.
मुंबई: करोना विषाणूचा प्रसार रोखण्यासाठीच्या उपाययोजनांचा भाग म्हणून सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी संचारबंदी व जिल्हाबंदीची घोषणा केल्यानंतर आज सरकारनं याबाबतची अधिसूचना काढली आहे. राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी ही अधिसूचना जारी केली असून संपूर्ण महाराष्ट्रात येत्या ३१ मार्चपर्यंत बंदी आदेश लागू असेल, असं त्यात नमूद करण्यात आलं आहे.
या अधिसूचनेनुसारमहाराष्ट्रात, अत्यावश्यक आणि नाशवंत वस्तू वगळता अन्य सर्व वस्तूंच्या दळणवळणासाठी राज्याच्या सर्व सीमा बंद करण्यात आल्या आहेत. एसटी महामंडळाच्या बसेस आणि मेट्रो यांसह एका शहरातून दुसऱ्या शहराला जोडणाऱ्या सर्व सार्वजनिक वाहतूक सेवा बंद असतील. चालकाव्यतिरिक्त अन्य दोन व्यक्तींसाठी टॅक्सी तर एका प्रवाशासह ऑटो रिक्षा यांना विशिष्ट कारणांसाठी वाहतूक करता येईल. अत्यावश्यक वैद्यकीय सेवेसाठी प्रवासी वाहतूक करण्यास परवानगी असेल.
>> एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाणाऱ्या बससेवा आणि खासगी प्रवासी वाहतूक सेवा यांना बंदी
>> विलगीकरणात राहण्याचा निर्देश देण्यात आलेल्या प्रत्येक व्यक्तीने त्या निदेशाचे पालन करणे आवश्यक आहे अन्यथा त्यांच्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल व त्याला शासकीय विलगीकरण व्यवस्थेत स्थलांतरित केले जाईल.
>> सर्व रहिवाशांनी घरातच थांबावे. केवळ वरील कारणांसाठी त्यांना बाहेर पडता येईल. तथापि, बाहेर पडल्यानंतर त्यांना परस्परांपासून किमान अंतर राखण्याचा दंडक पाळणे आवश्यक असेल.
>> सार्वजनिक ठिकाणी पाचपेक्षा जास्त व्यक्तींनी एकत्र येण्यास बंदी असेल.
व्यावसायिक आस्थापने, कार्यालये, कारखाने, कार्यशाळा, गोदामे आदींसह सर्व दुकानांचे व्यवहार बंद असतील. तथापि, वस्तूंची निर्मिती करणारे व प्रक्रिया सातत्य (कंट्युनिअस प्रोसेस) आवश्यक असलेले कारखाने, औषध विक्री आदी सुरू ठेवण्यास परवानगी असेल.
>> डाळ, तांदूळ, अन्नधान्यविषयक बाबी, दूधविषयक पदार्थ, पशुखाद्य अशा अत्यावश्यक वस्तूंच्या निर्मितीच्या कारखान्यांना त्यांची कामे सुरू ठेवण्यास परवानगी असेल.
>> शासकीय कार्यालये आणि सुरू ठेवण्यात येणारी दुकाने आणि आस्थापने यांनी अतिशय कमीतकमी कर्मचारीवर्ग असण्याची आणि परस्परांपासून किमान अंतर राखण्याची (जसे चेकआऊट काउंटरवर तीन फुटाचे अंतर राखण्यासाठी जमिनीवर खुणा करणे ) दक्षता बाळगावी.
आणखी महत्त्वाचे
राज्य शासनाचे विभाग आणि कार्यालये आणि सार्वजनिक उपक्रम हे फक्त अत्यावश्यक सेवा देण्यासाठीच कार्यरत राहतील.
कोणत्याही संप्रदायांची सर्व धार्मिक स्थळे सुयोग्य अशा प्रतिबंधात्मक आदेशान्वये बंद करण्यात येतील.
बंदीच्या काळात अत्यावश्यक गरजेच्या वस्तूंच्या पुरवठ्याबाबत कोणताही अडथळा निर्माण होणार नाही, यासाठी योग्य त्या उपाययोजना केल्या जातील.
कोविड-19 च्या रूग्णांना योग्य त्या आरोग्यविषयक सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी सर्व खाजगी आणि शासकीय रूग्णालयातील वैकल्पिक शस्त्रक्रिया पुढे ढकलण्यात येतील.
गरज भासल्यास, आरोग्य सेवेत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यासाठी, सर्व विभागीय आयुक्त, महानगरपालिका आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना रूग्णालयाच्या आसपास उपलब्ध जागांचा शोध घेण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.
सध्या कोरोना विषाणू मुक्त असलेल्या जिल्ह्याचे जिल्हाधिकारी हे त्यांच्या जिल्ह्यात बाहेरून वाहने येण्यास प्रतिबंध करणारे आदेश काढू शकतील. या जिल्ह्यांमध्ये वर्धा, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, बुलडाणा, अमरावती, अकोला, वाशिम, नाशिक, धुळे, नंदूरबार, जळगाव, बीड, जालना, उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, लातूर, नांदेड आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा समावेश आहे. हा आदेश अत्यावश्यक वैद्यकीय कारणासाठी लागू राहणार नाही.
महाराष्ट्रात सर्व जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, पोलीस आयुक्त, महानगरपालिकांचे आयुक्त आणि इतर संबंधित संस्था, आस्थापना यांचे सक्षम प्राधिकारी यांना, मानवीय व न्यायपूर्ण पद्धतीने वरील सर्व उपाययोजना व तरतूद यांची अंमलबजावणी करण्यासाठी अधिकार देण्यात आले आहेत.
कोणतीही व्यक्ती, संस्था या तरतुदींचा भंग करतील त्यांच्यावर साथ रोग कायदा – १८९७, आपत्ती व्यवस्थापना कायदा – २००५ आणि इतर कायदे व विनियमने यानुसार कार्यवाही करण्यात येईल अथवा सद्हेतुने कार्यवाही करणाऱ्या व्यक्तीविरूद्ध वा तसा हेतू असणाऱ्या व्यक्तींविरूद्ध कायदेशीर कारवाई केली जाणार नाही.
या आधी वेगवेगळ्या प्राधिकाऱ्यांनी निर्गमित केलेले आदेश हे या आदेशांशी सुसंगती राखून अंमलबजावणी संस्था लागू करतील.
नागपूर : करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी सरकारला मदत व्हावी, म्हणून महामेट्रोने एक दिवसाचे वेतन देण्याचा निर्णय घेतला. मुख्यमंत्री सहायता निधीत १२ लाख रुपयांचा धनादेश देणार असल्याचे महामेट्रोकडून सांगण्यात आले.
करोना विषाणूला रोखण्याकरिता भारत सरकार आणि महाराष्ट्र शासन प्रयत्नशील आहे. महामेट्रोदेखील प्रवासी तसेच कर्मचाऱ्यांकरिता उपाययोजना करीत आहे. महाराष्ट्र मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड अंतर्गत नागपूर व पुणे मेट्रो रेल प्रकल्पाकडून मुख्यमंत्री महाराष्ट्र सहायता निधीमध्ये करोना विरुद्धच्या लढाईसाठी १२ लाखांची मदत स्वरूपात देणार असल्याचे महा मेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक डॉ. ब्रिजेश दीक्षित यांनी सांगितले. मुख्यमंत्री सहायता निधीकरिता महामेट्रोचे अधिकारी आणि कर्मचारी एक दिवसाचा पगार मदतीच्या स्वरूपात देणार आहेत. महामेट्रो येथे सुरुवातीपासूनच स्वच्छतेसंदर्भात विविध उपाययोजना केल्या असून, करोनाचा उद्रेक झाल्यापासून या उपाययोजनांमध्ये आणखी वाढ करण्यात आली आहे. विषाणूचा प्रकोप एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तींकडे पसरू नये, यासाठी महामेट्रोने आपल्या प्रवासीफेऱ्या ३१ मार्चपर्यंत बंद ठेवल्या आहेत.
मेट्रो कार्यालय येथे इन्फ्रारेड थर्मामीटरद्वारे कर्मचाऱ्यांचे थर्मल स्कॅनिंग केले जात आहे. कार्यालय, कार्यस्थळ आणि कामगार कॉलनी येथे वरिष्ठांनी दिलेल्या निर्देशानुसार नियमितपणे साफ-सफाई आणि औषधीची फवारणी करून औषधी आणि सॅनिटायझर उपलब्ध करून देण्यात आले आहेत. तसेच सोशल मीडियाद्वारे जनजागृती केली जात आहे. याव्यतिरिक्त करोनाच्या बचावापासूनची माहिती स्टेशन सूचनाफलकांवर लावण्यात आली आहे.
नागपूर : करोनाचा प्रसार होऊ नये, यासाठी महामेट्रोने ३१ मार्चपर्यंत मेट्रो प्रवासी सेवा पूर्ण बंद करण्याचा निर्णय घेतला. २३ मार्च ते ३१ मार्चपर्यंत मेट्रो धावणार नसल्याचे महामेट्रोकडून कळविण्यात आले आहे. सीताबर्डी ते खापरी आणि सीताबर्डी ते लोकमान्यनगर या २५ किलोमीटरवर सध्या मेट्रो धावत होती. करोना पसरू नये, यासाठी सुरुवातीला मेट्रोऱ्या फेऱ्या कमी करण्यात आल्या.
आता खबरदारी म्हणून ३१ मार्चपर्यंत पूर्णच मेट्रो फेऱ्या बंद करण्यात आली आहे. अर्धवट राहिलेल्या मेट्रो स्थानकाचे काम सध्यातरी सुरू राहणार असल्याचे महामेट्रोकडून सांगण्यात आले.
नागपूर, ता. २२ : ‘कोरोना’चा अधिक ताकदीने प्रतिबंध करण्याच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी रविवारी (ता. २२) पुन्हा एक नवा आदेश काढला आहे. या आदेशानुसार आता सोमवार २३ तारखेपासून सर्व व्यवासायिक वाहतूक करणारी वाहने नागपूर शहर सीमेत पुढील आदेशापर्यंत बंद राहणार आहेत.
कोरोना विषाणूमुळे उद्भवणाऱ्या संसर्गजन्य रोगाचा प्रतिबंध व नियंत्रण यासाठी महाराष्ट्र कोव्हीड-१९ उपाययोजना नियम२०२० यातील नियम ३ नुसार आयुक्तांनी सदर आदेश निर्गमित केले आहेत.
या आदेशानुसार आता नागपूर शहरातील अत्यावश्यक सेवा देणारी वाहने व जीवनावश्यक वस्तूंची वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या सेवा वगळून इतर सर्व प्रकारच्या व्यावसायिक वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या वाहतुकीस नागपूर शहर सीमेत पुढील आदेशापर्यंत निर्बंध घालण्यात आले आहेत. यामध्ये नागपूर महानगरपालिकेच्या शहर बस सह ऑटो, ओला, उबेर व अन्य कंपन्यांच्या टॅक्सी, खासगी ट्रॅव्हल्स आदींचा समावेश आहे.
Chhattisgarh: One of the biggest setbacks for security forces in Chhattisgarh, Maoists killed 17 troopers in an encounter in Sukma, police said Sunday.
Police have found the bodies of the 17 jawans of state police in Minpa jungles of Sukma where a fierce encounter took place on Saturday.
Chhattisgarh police had said on Saturday that more than a dozen security personnel were reported missing after the encounter while 14 injured jawans were injured and were brought for treatment to Raipur, about 400 km north of the site of the fighting.
“Seventeen bodies of jawans of state police has been recovered by the rescue teams sent in the jungle till now,” said Chhattisgarh’s Director General of Police (DGP) DM Awasthi. Fifteen automatic rifles including 10 AK-47 of the security forces are missing, a police official said.
Awasthi said the encounter began at around 1 pm on Saturday near Korajguda hills in the Chintagufa area when a joint team of security forces was out on an anti-Maoists operation.
“There were multiple encounters after 1pm, which took place in that area till evening. After the force came back we found that 17 jawans of state police were missing and 14 were injured,” said Awasthi. The operation was launched by the police’s District Reserve Guard (DRG), Special Task Force and CoBRA (Commando Battalion for Resolute Action) had launched the operation from Chintagufa and involved 150 security personnel,
A large reinforcement was sent to the encounter spot on Sunday morning, the DGP said. The police chief said members of the team involved in the encounter said about a dozen Maoists sustained bullet injuries. But the search team did not find any bodies of Maoists.
The DGP further said that the encounter took place with Battalion Number One of CPI (Maoist), which is led by Mandavi Hidma. “There were about 300 Maoists who were led by Hidma … We have information that the cadres of other states have also gathered near Minpa,” the DGP added. Saturday’s loss was the biggest for security forces since April 24, 2017, when Maoists killed 25 CRPF personnel in an ambush near Burkapal in Sukma.
नागपूर, ता. २२ : ‘कोरोना’ संदर्भातील माहिती देण्यासाठी आणि घेण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने उघडलेला नियंत्रण कक्ष आणखी सक्षम करण्यात आला असून २४ तास या कक्षाशी नागपूरकरांना संपर्क साधता येणार आहे.
‘कोरोना’चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता मनपाने आपत्ती व्यवस्थापन कक्ष अधिक सक्षम आणि अद्ययावत केला आहे. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या निर्देशानुसार, नागपूर महानगरपालिक छत्रपती शिवाजी महाराज नवीन प्रशासकीय इमारतीच्या तळमजल्यावर हा कक्ष सुरू करण्यात आला असून येथे २४ तास कोरोना संदर्भातील माहिती देणारे डॉक्टर उपस्थित राहतील. कोरोनासंदर्भातील आपल्या शंकाचे समाधान या नियंत्रण कक्षाच्या माध्यमातून करता येईल. यासोबतच कोरोना संदर्भात कुणी रुग्ण आपल्या निर्देशनात येत असेल तर त्याबाबतही या नियंत्रण कक्षाला माहिती देता येईल. नियंत्रण कक्षाचा दूरध्वनी क्रमांक ०७१२-२५६७०२१ आणि ०७१२-२५५१८६६ असा आहे.
‘लॉक डाऊन’ दरम्यान नागरिकांच्या सुविधा बाधित होऊ नये म्हणून पाणीपुरवठा आणि मलनि:सारण संदर्भातील जर तक्रारी असतील तर त्यासाठी स्वतंत्र कक्ष आणि दूरध्वनी क्रमांक आहे. याविषयीच्या तक्रारींसाठी ०७१२-२५३२४७४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन नागपूर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आले आहे.
Makar Sankranti Wishes : Makara Sankranti (Sankranthi) is a Hindu festival that encourages people to live in peace and harmony. Here are best quotes,...