‘कोरोना’ चा प्रार्दुभाव रोखण्यासाठी दहाही झोनमध्ये निर्जंतुकीकरण फवारणी : आयुक्त तुकाराम मुंढे

नागपूर महानगरपालिकेच्या वतीने कोरोना विषाणू (कोव्हीड-१९) चा प्रार्दुभाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजने अंतर्गत नागपूर महानगरपालिका क्षेत्रात आवश्यक त्याठिकाणी निर्जंतुकीकरण करण्यात येणार

tukram mundhe

नागपूर, ता. २७: नागपूर महानगरपालिकेच्या वतीने कोरोना विषाणू (कोव्हीड-१९) चा प्रार्दुभाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजने अंतर्गत नागपूर महानगरपालिका क्षेत्रात आवश्यक त्याठिकाणी निर्जंतुकीकरण करण्यात येणार आहे. ही मोहीम अग्निशमन वाहनाव्दारे हाती घेण्याचे निर्देश आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांनी संबंधितांना दिले.

किराणा सोबतच आता भाजी, दुधचीही घरपोच व्यवस्था – १४० विक्रेत्यांची यादी

अग्निशमन वाहनामध्ये सोडियम हायपोक्लोराईडचे मिश्रण तयार करुन संपूर्ण शहराच्या दहाही झोनमध्ये शुक्रवार २७ मार्चच्या रात्री १० वाजतापासून फवारणीला प्रारंभ करण्यात येणार आहे.

नागपुरात आणखी नवीन पाच कोरोनाग्रस्त – एकून संख्या ९ वर

विशेष करुन ज्या भागात कोरोनाचे संशयित रुग्ण मिळाले आहेत अशा परिसरात फवारणी केली जावी, असेही निर्देश आयुक्तांनी उपायुक्त तथा आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. प्रदीप दासरवार व मुख्य अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके यांना दिले आहे.

Also Read- देशात १ एप्रिलपासून या १० बँकांचं होणार ४ बँकेमध्ये विलिनीकरण