Corona Virus in Nagpur; नागपुरात पाचवा कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण

corona virus in nagpur

नागपूर : कोरोनाबाधित पहिला रुग्ण कोरोनामुक्त होऊन रुग्णालयातून घरी जात असताना त्याचवेळी पाचवा रुग्ण पॉझिटिव्ह आल्याने खळबळ उडाली. दिल्ली प्रवासाची पार्श्वभूमी असलेला हा रुग्ण १८ मार्चपासून नागपुरात आहे. दोन दिवसांपूर्वीपासून लक्षणे आढळून आल्याने बुधवारी मेडिकलमध्ये दाखल झाले. गुरुवारी सकाळी नमुने पॉझिटिव्ह आले. प्राप्त माहितीनुसार, त्यांच्यापूर्वी त्यांची पत्नी आणि दोन्ही मुलांनी मेडिकलमध्ये नमुने तपासले असता ते निगेटिव्ह आले. परंतु आता पुन्हा त्यांचे नमुने तपासले जाणार आहे.

कोरोना व्हायरस चा प्रादूर्भाव होऊ नये म्हणून घरपोच सेवा देणा-या किराणा दुकानांची यादी

व्यवसायाच्यानिमित्ताने ४२ वर्षीय हा पुरुष रुग्ण दिल्लीला गेले होते. १८ मार्च रोजी ते घरी परतले. सुरूवातील काही दिवस प्रकृती ठिक होती. परंतु गेल्या दोन-तीन दिवसांपासून त्यांना सर्दी, खोकला, ताप, अंगदुखी आदींचा त्रास वाढला. हीच लक्षणे त्यांच्या पत्नी आणि दोन्ही मुलांमध्ये होती. यामुळे मंगळवारी त्यांनी मेडिकलमध्ये जाऊन नमुन्याची तपासणी केली असता ते निगेटिव्ह आले. बुधवारी यांनीही आपल्या नमुन्याची तपासणी केली. परंतु आज सकाळी नमुने पॉझिटिव्ह येताच सर्वांनाच धक्का बसला. विशेष म्हणजे, त्यांनी दिल्ली ते नागपूर हा प्रवास रेल्वेतून केला आहे, आणि गेल्या आठ दिवसांपासून ते नागपुरात आहेत. यामुळे आरोग्य यंत्रणा सतर्क झाली आहे. संपर्कात आलेल्या व्यक्तीची माहिती घेतली जात आहे.

विविध परिसरातील १२ मेडिकल स्टोर्स देणार २४ तास सेवा, केमिस्ट असोसिएशनच्या सहकार्याने मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचा पुढाकार