कनिका कपूर ५ व्यांदा कोरोना पॉझिटिव्ह, डॉक्टर म्हणाले…

कनिका कपूर

बॉलिवूड गायिका कनिका कपूरला कोरोनाची लागण झाल्यापासून ती अधिक चर्चेत आली आहे. आता कनिका कपूरची कोरोनाची चाचणी पाचव्यांदा पॉझिटिव्ह आली आहे. याआधी चारही चाचण्या पॉझिटिव्ह आल्या आहेत. पाचव्यांदा पॉझिटिव्ह चाचणी आल्यानंतर डॉक्टर आशावादी आहेत.

कोरोना बाधित रुग्णाची तपासणी प्रत्येक ४८ तासानंतर केली जाते. कनिकावर लखनौमधील संजय गांधी पीजीआय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. जेव्हा कनिकाची चौथी चाचणीही पॉझिटिव्ह आली, तेव्हा तिने सोशल मीडियावर एक पोस्ट केली होती. कनिकाने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत लिहिले होते, मला अपेक्षा आहे की, माझी पुढची चाचणी निगेटिव्ह येईल. कनिकाने एक मोटिवेशनल कोट लिहिले होते, ‘जिंदगी हमे वक्त का सही इस्तेमाल करना सिखाती है जबकि वक्त हमे जिंदगी की कीमत समझाता है’

घाबरण्याचे कारण नाही. कनिकाची प्रकृती स्थिर आहे, असे डॉक्टरांनी म्हटले आहे.

तसेच कनिका कपूरने आपली मुले आणि कुटुंबाला आठवण करत म्हटले होते की, सर्व सुरक्षित असतील. कनिका कपूरने खुद्द सोशल मीडियावर माहिती दिली होती की, ती कोरोनाने बाधित आहे. त्यानंतर काही दिवसांनंतर तिने आपली पोस्ट डिलीट केली होती.