नागपुरात आणखी तीन रूग्ण आढळले पॉझिटिव्ह आणि एवढे संशयित

corona-positive

नागपुरातील कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत वाढच होत आहे. आज रविवारी सलग चौथ्या दिवशी या संख्येत तीनने वाढ झाली असून आता कोरोनाबाधित रूग्णांची संख्या १४ एवढी झाली आहे. आज सकाळी या तीन रूग्णांचा स्वॅब चाचणी अहवाल हा पॉझिटिव्ह आला आहे.

याच्या आधी १८ मार्च रोजी दिल्लीहून परतलेल्या एका व्यक्तीचा चाचणी अहवाल पॉझिटिव्ह निघाला होता. त्याच रूग्णाच्या संपर्कात त्याच्या परिवारातील व्यक्ती आले होते. त्यानंतर त्या सगळ्यांची स्वॅब चाचणीसाठी नमुने पाठविण्यात आले होते. या आलेल्या अहवालानंतर परिवारातील आणखी चार व्यक्ती शुक्रवारी पॉझिटिव्ह आढळल्या होत्या. तर शनिवारी आढळलेल्या दोघांपैकी एक पॉझिटिव्ह रूग्ण असून तो सुध्दा दिल्लीहून परतलेल्या रूग्णाच्या संपर्कात आला होता. रविवारी पॉझिटिव्ह आढळलेल्या रूग्णामध्ये एक ११ वर्षीय मुलीचाही समावेश आहे. तर याच ११ वर्षीय मुलीचा भाऊ सुध्दा कोरोनाबाधित आढळला आहे. या भाऊ बहिणी व्यतिरिक्त आणखी तिसरा रूग्ण हा पुरूष आहे. १४ मार्चनंतर तब्बल १२ दिवसांनी नागपुरातील कोरोनाबाधित रूग्णाच्या संख्येत गुरूवारी एकने वाढ झाली होती. त्यानंतर मात्र आता एका पाठोपाठ एक एक आणखी ११ रूग्ण वाढले आहे. गुरूवार नंतर आढळलेल्या ११ पैकी सहा नवे रूग्ण दिल्लीहून परतलेल्या रूग्णाच्या संपर्कात आल्याने संक्रमित झाले आहे. नागपुरातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या आता १४ एवढी झाली आहे.

Nagpur : कोरोना विषाणू संदर्भ:: माहिती : 29/3/20
1. दैनिक संशयित:71
एकूण संशयित: 649
2. सध्या भरती असलेल्या व्यक्ती: 35( 22 in gmc & 13 in IGMC)
एकूण भरती केलेल्या व्यक्ती: 426
3. दैनिक तपासणी नमुने: 71 (3 from NMC)
एकूण तपासणी केलेले नमुने: 457
4. पॉझिटिव्ह नमुने: 14
5. पाठपुरावा सुरु असलेल्या एकूण व्यक्ती: 1101 (Home Quarantined)
14 दिवस पाठपुरावा केलेल्या व्यक्ती : 67
6. आज विमानतळावर स्क्रीनिंग केलेले प्रवासी: 0
एकूण विमानतळावर स्क्रीनिंग केलेले प्रवासी: 1123
7. आज अलगीकरण केलेले प्रवासी: 33
8. IGGMC येथे भरतीकरिता पाठविलेले प्रवासी: 0
9. GMC येथे भरतीकरिता पाठविलेले प्रवासी: 0
10. आज अलगीकरण कक्षातून घरी पाठविलेले प्रवासी: 0
11. सध्या अलगीकरण कक्षात असलेले प्रवासी: 157