नागपूर: सध्या देशावर आलेले कोरोनाचे संकट म्हणजे राष्ट्रीय आपत्ती आहे. अशा परिस्थितीत समाजातील सर्वच घटकांनी एकत्रित येऊन कार्य करण्याची वेळ आहे. सामाजिक दृष्टिकोनातून प्रत्येकाने कार्य करण्याची गरज आहे. कोरोनाशी लढा देणाऱ्या योद्ध्यांसाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या माजी विद्यार्थी संघटनेने, बाटा कंपनीने आणि व्यकंटेश केमिकल्सने दिलेले योगदान मोठे आहे. यासाठी त्यांचे आभार मानावे तेवढे थोडेच आहे, या शब्दात मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.
बाटा कंपनीने सीएसआर फंडातून शासकीय वैद्यकीय महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून एक हजार बूट आणि व्यंकटेश केमिकल्सच्या वतीने ५०० लिटर सॅनिटायझर्स नागपूर महानगरपालिकेला देण्यात आले. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ते स्वीकारले. याप्रसंगी ते बोलत होते. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटनेचे डॉ. दिनकर कुंभलकर, डॉ. उदय नार्लावार, डॉ. चंद्रकांत बोकाडे, डॉ. सुधीर नेरळ, व्यंकटेश केमिकल्सचे के.के. गुप्ता, मनपाचे वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवाई, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. भावना सोनकुसळे, डॉ. प्रवीण गंटावार यांची यावेळी उपस्थिती होती.
याप्रसंगी बोलताना मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दानदात्यांचे आभार मानले. अशा मदतीच्या माध्यमातून कार्य करणाऱ्यांचे मनोबल वाढते. एकत्रित येऊन कार्य केल्याने नक्कीच कोरोनावर विजय प्राप्त करु, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. नैसर्गिक नियम पाळले तर भविष्यात अशी परिस्थिती उद्भवणार नाही. अशी परिस्थिती आली की नेहमी मेयो आणि मेडिकलवर अवलंबून राहावे लागते. त्यामुळे यापुढे मनपाची आरोग्य यंत्रणा सक्षम आणि सशक्त बनविण्याचा आपला मानस आहे. भविष्यात २०० ते ३०० खाटांचे सर्व सुविधांनी युक्त मनपाचे रुग्णालय तयार करण्याचे प्रस्तावित असून यातही समाजाची साथ हवी, असे ते म्हणाले.
बाटा कंपनीने सीएसआर फंडातून पुरविलेले आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालय माजी विद्यार्थी संघटनेच्या माध्यमातून देण्यात येणारे बुट डॉ. सुधीर नेरळ व त्यांच्या सहकाऱ्यांनी तर व्यकंटेश केमिकल्सतर्फे पुरविण्यात आलेले सॅनिटायझर के.के. गुप्ता यांनी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे सोपविले. भविष्यात आणखी काही वस्तू देण्याचा मानस डॉ. नेरळ यांनी व्यक्त केला. मनपाला देण्यात आलेल बुट हे स्वच्छता कर्मचारी, आशा वर्कर्स तसेच फिल्ड वर्कर्सला पुरविण्यात येणार आहे.
नागपूर: कोव्हिड-१९ च्या पार्श्वभूमीवर केलेल्या लॉकडाऊनमुळे परिस्थिती सध्यातरी आटोक्यात आहे. मात्र मुंबई व अन्य काही शहरातील परिस्थिती बघता नागपुरातही जर तशी वेळ आली तर उद्भवणारी परिस्थिती हाताळण्यासाठी सज्ज राहा. रुग्णालये, उपकरणे व संबंधित वस्तूंचा साठा ठेवा, असे निर्देश केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिले.
कोव्हिड-१९ चा आढावा घेण्यासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना महाराष्ट्राचे प्रभारी करण्यात आले आहे. त्याच अनुषनगाने मंगळवारी (ता. ७) त्यांनी महाल येथील श्रीमंत राजे रघुजी भोसले नगर भवन येथे लोकप्रतिनिधी व अधिकऱ्यांच्या उपस्थितीत कोव्हिड-१९ संदर्भातील सद्यपरिस्थिती, केलेल्या उपाययोजना, अंमलबजावणी आणि भविष्यातील तयारी याचा आढावा घेतला. बैठकीला ना. नितीन गडकरी यांच्यासह महापौर संदीप जोशी, उपमहापौर मनीषा कोठे, खासदार विकास महात्मे, आमदार प्रा. अनिल सोले, आमदार कृष्णा खोपडे, आमदार नागो गाणार, आमदार विकास कुंभारे, आमदार गिरीश व्यास, आमदार मोहन मते, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मनपा आयुक्त तुकाराम मुंढे, अतिरिक्त आयुक्त (नागपूर विभाग) अभिजीत बांगर, पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय यांची उपस्थिती होती. मनपाचे स्थायी समिती सभापती विजय झलके, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, विरोधी पक्ष नेते तानाजी वनवे, आरोग्य सभापती वीरेंद्र कुकरेजा, माजी महापौर तथा ज्येष्ठ नगरसेवक प्रवीण दटके, मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, पोलिस उपायुक्त (विशेष शाखा) श्वेता खेडकर, मेडिकलचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, मेयोचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, एम्सच्या मेजर जनरल डॉ. विभा दत्ता, सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे ओएसडी डॉ. फूलपाटील, यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारीही उपस्थित होते.
ना. नितीन गडकरी यांनी सर्वप्रथम कोव्हिड-१९ च्या पार्श्वभूमीवर नागपुरात असलेल्या वैद्यकीय सोयींचा आढावा घेतला. नागपुरात सुदैवाने परिस्थिती सध्यातरी आटोक्यात आहे. परंतु भविष्यात जर अधिक रुग्ण आढळले तर त्या परिस्थितीशी लढण्यासाठी संपूर्ण वैद्यकीय यंत्रणा सज्ज ठेवा. मेयो, मेडिकल आणि एम्स यांनी समन्वय ठेवून आवश्यक असलेली किट, औषधी, मास्क आदींचा योग्य साठा करून ठेवावा. व्हेंटिलेटर्स, ऑक्सीजन व अन्य सामुग्रीची व्यवस्था ठेवावी. जिथे अडचण येत असेल, तातडीने जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधून त्यांच्या अधिकारात ती व्यवस्था करून ठेवा, असे निर्देश दिले.
कोव्हिड-१९ च्या चाचणीसाठी आवश्यक असलेल्या किटची उपलब्धता मुबलक असू द्यावी. मेयोच्या प्रयोगशाळेत काही अडचणी आल्यामुळे चाचण्यांची गती मंदावली होती. आता ती पूर्ववत झाली आहे. एम्समधील प्रयोगशाळा सुरू झाली असून मेडिकलमधील प्रयोगशाळेलाही मान्यता मिळाली आहे. एक-दोन दिवसात तीसुद्धा सुरू होईल. त्यामुळे यापुढे चाचण्यांसाठी आलेल्या नमुन्यांची तातडीने चाचणी करा, असेही निर्देश ना. नितीन गडकरी यांनी दिले.
तत्पूर्वी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी जिल्हा प्रशासनातर्फे उचलण्यात आलेली पावले आणि करण्यात आलेल्य कार्यवाहीची माहिती दिली. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात आलेल्या उपाययोजना, त्याची अंमलबजावणी यासंदर्भात माहिती दिली. रस्त्यावरील व्यक्तींसाठी बेघर निवारा तयार करण्यात आले असून तेथे त्यांच्या चहा, नाश्ता आणि दोन वेळच्या भोजनाची सोयी केली जात असल्याचे सांगितले. अतिरिक्त आयुक्त (नागपूर विभाग) अभिजीत बांगर यांनी वैद्यकीय सेवेसंदर्भात उपलब्ध सोयी, प्रस्तावित सोयी याबाबत माहिती दिली.
मनपाच्या रुग्णवाहिका सज्ज ठेवा
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर रुग्णवाहिका सेवा कोलमडली आहे, यासंदर्भात लोकप्रतिनिधींनी सांगितले असता नागपूर महानगरपालिकेच्या रुग्णवाहिकांसह खासदार निधीतून मनपाला उपलब्ध करुन देण्यात आलेल्या सहा रुग्णवाहिकाही पूर्णपणे तयार ठेवा. या सहा रुग्णवाहिकांपैकी तीन मेडिकल आणि तीन मेयोकडे सोपवा, असे निर्देशही ना. नितीन गडकरी यांनी दिले.
प्रत्येकाला रेशन द्या
लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर शासनाने प्रत्येकाला स्वस्त धान्य दुकानातून धान्य मिळण्याची व्यवस्था केली आहे. मात्र, त्यामध्ये येणाऱ्या तांत्रिक अडचणी लोकप्रतिनिधींनी मांडल्या. यासंदर्भात ज्या लोकांना रेशन मिळत नाही, त्यांची यादी तयार करा, असे निर्देश ना. नितीन गडकरी यांनी जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना दिले.
काळाबाजार करणाऱ्यांवर कठोर कारवाई
लॉकडाऊनचा फायदा घेत नागपुरात तेल, दाळ व अन्य जीवनावश्यक वस्तूंचा काळाबाजार केला जात असल्याची माहिती आपल्याला प्राप्त झाली आहे. अधिकारी यासंदर्भात कठोर भूमिका घेताना दिसत नाही, असे म्हणत ना. नितीन गडकरी यांनी नाराजी व्यक्त केली. यापुढे काळाबाजार करणाऱ्यांची गय केली जाणार नाही. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना कठोर पावले उचलण्याचे निर्देश दिले.
नागपूर: शहरात कोरोना व्हायरसचा पहिला बळी गेल्याने संसर्गाचा धोका वाढला आहे. हा धोका लक्षात घेता कोरोनाग्रस्त रुग्णाच्या मृतदेहाच्या विल्हेवाटी संदर्भात मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मार्गदर्शक तत्वांबाबत आदेश जारी केले आहेत. या मार्गदर्शक तत्त्वांचे पालन व्हावे याकरिता त्यांनी पोलिस आयुक्तालय आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो) प्रशासनाला पत्रही दिले आहे.
कोरोना व्हायरसचा संसर्ग झपाट्याने वाढत आहे. यातच कोरोनाग्रस्त मृतदेहापासून होणारा संसर्ग टाळणे हे सर्वात महत्वाचे आहे. यासंबंधी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मार्गदर्शक तत्त्वे तयार केली आहेत. त्यानुसार मृतदेहाला कुणीही स्पर्श करू नये. मृतदेहावर अंत्यविधी करताना पाच पेक्षा अधिक लोकांनी उपस्थित राहू नये. वरील दोन्ही नियमांचे काटेकोर पालन व्हावे याकरिता संबंधित रुग्णालय प्रशासनाने मृत्यूची माहिती आधी संबंधित पोलिस स्टेशनला द्यावी. मृतदेहाला कुणी स्पर्श केले नाही आणि अंत्यविधीला पाचपेक्षा जास्त लोक उपस्थित राहणार नाहीत, याची खातरजमा झाल्यानंतरच मृतदेह नातलगांना सुपूर्द करणे. अंत्यविधी करण्यात येणारे घाट किंवा स्मशानभूमीतील कर्मचा-यांनी मास्क, ग्लोव्ह आणि अन्य सुरक्षा साहित्यांचा वापर करणे अत्यावश्यक आहे.
शहरातील कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी स्वयं सुरक्षेची काळजी घेणे आवश्यक आहे. मृतदेहाच्या विल्हेवाटी संदर्भात वरील मार्गदर्शक तत्त्वांचे पालन होणे गरजेचे आहे. याबाबत काटेकोर कार्यवाही करिता आयुक्तांतर्फे पोलिस प्रशासन आणि इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाला आदेश देण्यात आले आहे.
नागपूर:नागपूर शहरातील सतरंजीपूरा झोनमधील बडी मज्जीद परिसरातील रहिवासी नागरिकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. यासंबंधी खबरदारी म्हणून सतरंजीपूरा भागाच्या सर्व सीमा सील करण्यात आल्या आहेत. शहरातील नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने मनपा आयुक्त श्री.तुकाराम मुंढे यांनी संपूर्ण भाग सिल करण्याचा निर्णय घेतला आहे.
सोमवारी (ता.६) सतरंजीपूरा झोनमधील बडी मज्जीद परिसरातील एका ६८ वर्षीय रुग्णाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. शहरात कोरोनामुळे पहिला मृत्यू झाल्याने खळबळ माजली. यासंबंधी खबरदारी म्हणून मनपा आयुक्तांनी तात्काळ सतरंजीपूरा झोनमधील बडी मज्जीद परिसरातील सर्व सीमा बंद करण्याचे आदेश दिले. त्यानुसार बडी मस्जीद, सतरंजीपूरा प्रभाग २१ या भागातील निश्चित केलेल्या कंटेनमेंट एरीया उत्तर-पूर्वेस शासकीय मागासवर्गीय मुलींचे वसतिगृह, दक्षिण-पूर्वेस रचना कॉम्प्लेक्स, दक्षिण-पश्चिमेस जुना मोटार स्टँड चौक, उत्तर-पश्चिमेस मारवाडी चौक टी-पॉईंट हा सर्व भाग प्रतिबंधीत क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले असून या भागात येणारे व जाणारे सर्व मार्ग बंद करण्यात आले आहेत.
अत्यावश्यक सेवा देणारे जसे, शासकीय व निमशासकीय सेवेतील अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणारे अधिकारी आणि कर्मचारी, आवश्यक तातडीची सेवा करणे तसेच अंत्यविधी, वैद्यकीय सेवेशी संबंधित खाजगी डॉक्टर, नर्स, मेडिकल स्टोअर्स् दुकानदार, पॅथॉलॉजीस्ट, रुग्णवाहिका इत्यादी तसेच पोलिस विभागातर्फे पास धारक असलेल्या जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणा-या व्यक्ती आदी सर्व वगळता इतर नागरिकांना बाहेर येण्या-जाण्यासाठी प्रतिबंध करण्यात आले आहे.
नागरिकांनी घाबरून न जाता स्वतःसह कुटुंबीयांची काळजी घ्यावी. कुणीही अनुज्ञेय कारणाशिवाय घराबाहेर पडू नये. नियमीत स्वच्छता राखावी. आवश्यक मदतीसाठी मनपाच्या नियंत्रण कक्षाशी संपर्क साधावा, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.
April 2020: The COVID-19 pandemic has caused disruption to scores of people across cities, towns and villages, affecting things like livelihood and regular access to food. And with transport also being hit during the national lock-down, millions of migrant workers have started their journey from various cities across India towards their home, on foot. To help bring respite to people during this difficult time, Google Maps is now indicating the locations of food shelters and night shelters in cities across India.
Google is working closely with state and central government authorities to surface the locations of these relief centers. To date, across 30 cities, people can now find these locations on Google Maps, Search and Google Assistant by simply searching for ‘Food shelters in ’ or ‘Night shelters in ’ in any of these Google products. This will soon be available in Hindi, with queries like ‘ में भोजन केंद्र’ or ‘ में रैन बसेरा’.
People can also enter the above queries into Google Search, or ask their Google Assistant on smartphones or on a KaiOS device. Google is working to bring this to other Indian languages over the coming weeks, as well as adding additional shelters in more cities across the country.
In the coming days, it will become even easier to access this feature, with features like quick-access shortcuts that will appear beneath the search bar on the Google Maps app, shortcuts on Google Maps on KaiOS feature phones, and food and night shelter pins appearing on the map by default when the Maps app is first opened.
Commenting on the launch of the feature, Anal Ghosh, Sr. Program Manager, Google India, said, “As the COVID-19 situation develops, we are making a concerted effort to build solutions that help people during these times of need. Highlighting the locations of food and night shelters on Google Maps is a step to make this information easily available to the users in need, and ensure they can avail the food and shelter services being provided by the government authorities. With the help of volunteers, NGOs, and traffic authorities, we hope to convey this important information to the affected people, many of whom may not have access to a smartphone or mobile device during this time.”
मुंबई: राज्यात कोरोनाचे संकट अधिक गडद होत चालले आहे. राज्यातील कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ झाली असून आकडा ८९१ च्या घरात पोहचला आहे. राज्यात आणखी नव्या २३ रुग्णांची चाचणी पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे राज्यातील परिस्थिती गंभीर होत चालली आहे.
Union Minister of Road Transport and Highways, Nitin Gadkari attends Media Launch of Hyderabad Circuit of ABB FIA Formula E World Championship, in Mumbai
नागपूर: भारतीय जनता पक्षाची स्थापना केवळ सत्तापरीवर्तनासाठी नव्हे, तर समाज बदलविण्याची मनिषा ठेवून झाली आहे, असे केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आज भाजपच्या स्थापना दिवसानिमीत्त बोलताना म्हणाले. आजच्या दिवशी त्यांनी भाजपच्या सर्व कायकर्त्यांनी शुभेच्छा दिल्या, तर ज्येष्ठ कार्यकर्त्यांना अभिवादन केले.
श्री गडकरी म्हणाले, अटलबिहारी वाजपेयी, लालकृष्ण अडवाणी, श्यामाप्रसाद मुखर्जी, दिनदयाल उपाध्याय यांनी जो मार्ग आम्हाला दाखवला. त्या मार्गावर चालून त्यांचे स्वप्न पूर्ण करण्याचे प्रयत्न सरकारने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात केले आहे, करीत आहे. ज्या काश्मीरसाठी श्मायाप्रसाद मुखर्जींनी बलीदान दिले. त्या काश्मीरमध्ये आज कलम ३७० रद्द झाले. याचा आम्हाला अभिमान आहे. सरकारने सीटीझन बिल पास केल्यामुळे जे मुळ भारतनिवासी आहेत, त्यांना त्यांचा अधिकार मिळाला आहे. प्रगतीच्या मार्गावर देश सातत्याने पुढे जात असल्याचा आनंद आहे.
संपूर्ण जगासह भारतावर कोरोनाचे संकट आहे. पण या संकटावर मात करुन आपण विजय निश्चीतच मिळवू. जनतेच्या सोबत राहून सामाजिक अंतर कायम ठेवण्याची आज गरज आहे. या स्थितीत देशातील गरीब लोकांच्या मदतीसाठी पक्षाच्या कार्यकर्त्यांनी ठामपणे उभे रहावे आणि त्यांची सेवा करावी. कारण लोकसेवा, लोकसंघर्ष आणि लोकशिक्षण या त्रिसूत्रीवरच भारतीय जनता पक्ष उभा आहे. म्हणुनच आज संकटाने ग्रस्त लोकांना मदत करण्याचा संकल्प भाजपच्या कार्यकर्त्यांनी करावा. देशातील शोषित, पिडीत, दलितांच्या उत्थानासाठी आपण कटीबद्ध आहो. नेहमी त्यांच्यासोबत राहण्याचा संकल्प आज करुया, असे गडकरी म्हणाले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात भारत जगातील महासत्ता बनेल आणि आज आपण हाच संकल्प करुन पुढे गेले पाहीजे. सेवेच्या माध्यमातून गरजू लोकांची मदत करण्याचा संकल्प तमाम कार्यकर्त्यांनी करावा. भारतीय जनता पक्षाला इथपर्यंत आणण्यासाठी जे कार्यकर्ते आयुष्यभर झटले, अनेकांनी बलीदान दिले. त्यांच्यामुळेच आपण आज हा दिवस पाहू शकलो. अशा कोट्यवधी कार्यकर्त्यांना अभिवान करुन पंतप्रधान मोदींच्या नेतृत्वात देशाला आर्थिक महासत्तेकडे नेण्याचा संकल्प कार्यकर्त्यांनी करावा, असे आवाहन स्थापना दिवसाच्या निमित्ताने नितीन गडकरी यांनी कार्यकर्त्यांना केले.
नागपूर:नागपुरात ६८ वर्षीय वृद्धाचा करोनामुळे मृत्यू झाला आहे. नागपुरातला करोनामुळे झालेला हा पहिलाच मृत्यू आहे. या रुग्णाला श्वास घेण्यासाठी त्रास होत असल्याने मेयो रुग्णालयात ४ एप्रिल रोजी दाखल करण्यात आलं होतं. या रुग्णाला रुग्णालयात आणण्यात आल्यापासून त्याच्याजवळ कुणीही नातेवाईक आले नाहीत. त्यांचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतरही नातेवाईक आले नाहीत. पोलिसांसह आरोग्य विभागातील कर्मचारी मृत रुग्णाच्या संपर्कातील व्यक्तीचां शोध घेत आहेत.
हा ६८ सतरंजीपुरा भागातील आहे. त्यामुळे सतरंजीपुरा हा भाग सील करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. खबरदारीचा उपाय म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. करोनाग्रस्तांची देशातली संख्या ही ४ हजाराच्या वर गेली आहे. तर महाराष्ट्रात ही संख्या ८०० च्या वर गेली आहे. रुग्णसंख्या वाढणं हा चिंतेचा विषय ठरतो आहे. करोनाचा प्रादुर्भाव होऊ नये म्हणून १४ एप्रिलपर्यंत देशभरात लॉकडाउन पुकारण्यात आला आहे.
नागपूर: नागपूर महानगरपालिकेच्या वतीने शहरातील दिव्यांगांना जीवनावश्यक वस्तूंच्या किटचे वितरण केले जात आहे. सोमवारी (ता.६) डिप्टी सिग्नल बाजार चौक परिसरातील दिव्यांगांना जीवनावश्यक वस्तूंचे वितरण करण्यात आले आहे. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनात मनपातर्फे शहरातील बेघर, निराधार व्यक्तींची भोजन व्यवस्था केली जात आहे.
मनपाच्या कार्यामध्ये ४४ स्वयंसेवी संस्थांनी सहकार्य प्रदान केले आहे. या सेवाकार्यांतर्गत दिव्यांग बांधवांना तांदुळ, डाळ, खाद्य तेल, भाजीपाला यासह अन्य जीवनावश्यक वस्तुंचा समावेश असलेल्या किटचे वितरण करण्यात येत आहे. या किटच्या वितरणासाठी शैलेंद्र भोसले, रमेश उमाठे, विमल मारोटीया, अशोक बंब (जैन) या समाजसेवींनी पुढाकार घेतला आहे. सोमवारी (ता.६) उपायुक्त मिलींद मेश्राम, सहायक अधीक्षक संजय दहीकर यांच्या उपस्थितीत या किटचे वितरण करण्यात आले.
लॉकडाउनच्या परिस्थितीत नागरिकांच्या सहकार्यासाठी आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात मनपाची संपूर्ण टिम कार्यरत आहे. लॉकडाउनच्या परिस्थितीत दिव्यांगांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. जीवनावश्यक वस्तूंसाठी त्यांची होणारी धडपड लक्षात घेता मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी त्यांच्या मदतीकरिता संबंधित अधिका-यांना निर्देशित केले. त्यानुसार शहरातील विविध भागातील दिव्यांगांना घरपोच जीवनावश्यक वस्तू वितरीत करण्यात येत आहेत. या कार्यासाठी अनेक सेवाभावी नागरिकही सढळ हाताने मदत करीत आहेत.
दररोज सुमारे ३५ हजार नागरिकांची भोजन व्यवस्था
लॉकडाउनमध्ये अडकलेले बेघर, निराधार व ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही अशा नागरिकांसाठीही मदतकार्य सुरू आहे. या सेवाकार्याद्वारे आतापर्यंत दररोज सुमारे ३५ हजार लाभार्थ्यांची भोजन व्यवस्था केली जात आहे. यासाठी शहरातील ४४ स्वयंसेवी संस्था पुढे आल्या आहेत. मनपाद्वारे दहाही झोनमध्ये सकाळ व सायंकाळी भोजनाची व्यवस्था केली जाते. यासाठी प्रत्येक झोन क्षेत्रामध्ये दोन याप्रमाणे २० टिम तयार करण्यात आल्या आहेत. या टिम सकाळी व सायंकाळी नागरिकांना जेवण किंवा आवश्यक भोजन साहित्य पुरवितात. निराधार, बेघर व ज्यांच्याकडे जेवणाची सुविधा नाही अशा व्यक्तींकरीता मनपाद्वारे संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. ०७१२-२५६९००४, ९४२२६४११०१, ७०२८०३३८७२, ९८२३३३०९३४ या संपर्क क्रमांकांवर अशा व्यक्तींची माहिती मिळताच त्या व्यक्तीबाबत संबंधित झोन क्षेत्राची जबाबदारी देण्यात आलेल्या टिमला त्या व्यक्तीची माहिती व त्याचा संपर्क क्रमांक कळविण्यात येते. त्यानुसार संबंधित टिम गरजू व्यक्तीपर्यंत जेवण किंवा साहित्य पोहोचविते.
ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, नोकरदारांना मैत्री परिवाराची साथ
याशिवाय ज्येष्ठ नागरिक, शहरात अडकलेले विद्यार्थी, नोकरदार आदींकडून संपर्क होताच त्यांना जेवणाचा डबा पोहोचविण्यात येत आहे. याकरिता मैत्री परिवार संस्था कार्य करीत आहे. घरी एकटे राहणारे ज्येष्ठ नागरिक यांच्या जेवणाची अडचण होते. शिक्षणासाठी शहरात येणा-या विद्यार्थ्यांना मेसच्या जेवणावर अवलंबून राहावे लागते. मात्र लॉकडाउनमुळे सर्व मेस बंद आहेत. त्यामुळे शहरात अडकलेल्या विद्यार्थ्यांचे हाल होत आहेत. अशीच अवस्था शहरात एकटे राहणा-या नोकरदारांचीही आहे. या सर्वांकरिता मैत्री परिवार संस्था पुढे आली आहे. स्वयंपाकाची व्यवस्था नसलेल्या ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, एकटे राहणा-या नोकरदारांना मैत्री परिवार संस्थेतर्फे दररोज सकाळी व सायंकाळी जेवणाचा डबा पुरविण्यात येत आहे. शहरात अडकलेल्या अशा गरजूंनी ९८९०४३२४५४ या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात येत आहे.
बेघर, निराधार, रस्त्यावर जीवन व्यतित करणा-यांसाठी मनपातर्फे बेघर निवारा केंद्रांचीही व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे अशा व्यक्तींची माहिती मिळताच मनपाशी संपर्क साधावा, असे आवाहन महानगरपालिकेच्या वतीने करण्यात येत आहे.
नागपूर: जीवनावश्यक वस्तू तसेच अन्य अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर पडताना मास्क वापरूनच जावे. मास्क लावल्याशिवाय कुणीही घराबाहेर पडू नका, असे आवाहन मनपाआयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांनी केले आहे.
यासंबंधी एक व्हीडिओ संदेश आयुक्तांनी जारी केला आहे. यामध्ये मनपा आयुक्तांनी कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांना १०० टक्के लॉकडाऊन पाळण्याचे आवाहन केले आहे. केवळ लॉकडाऊनचे पालन केल्यानेच आपण या संक्रमणापासून स्वत:चा बचाव करू शकतो.
जीवनावश्यक वस्तुंसाठी नागरिकांना घराबाहेर पडावे लागू नये म्हणून प्रशासनाने या वस्तू घरपोच मिळण्याचा प्रयत्न केला आहे. तथापी नागरिकांना या वस्तुंसाठी किंवा अन्य अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर पडायचे झाल्यास त्यांनी मास्क लावूनच बाहेर निघावे. वापरण्यात येणारा मास्क हा विकतच घेतला पाहिजे असे नाही. तर हा मास्क आपल्याला घरच्या घरी देखील सुती कापडापासून तयार करता येईल. घरच्या घरी मास्क तयार करण्याची कृती ‘मास्क इंडिया डॉट कॉम’ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असेही आयुक्तांनी सांगितले.
नागपूर: केंद्र सरकारने नागपूर जिल्ह्यातल कोव्हिड-१९ बाबत निरिक्षण आणि आढावा घेण्याकरिता केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून नियुक्ती केलेली आहे. त्याच अनुषंगाने नागपूर जिल्हा कोव्हिड-१९ बाबत सविस्तर आढावा घेण्यासाठी मंगळवारी (ता. ७) महाल येथील श्रीमंत राजे रघुजी भोसले नगर भवन येथे बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.
सदर बैठकीच्या अध्यक्षस्थानी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी राहतील. बैठकीला नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री नितीन राऊत, राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख, पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय मंत्री सुनील केदार, खासदार डॉ. विकास महात्मे, महापौर संदीप जोशी, उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समितीचे सभापती पिंटू झलके, आमदार कृष्णा खोपडे, आमदार विकास कुंभारे, आमदार मोहन मते, आमदार गिरीश व्यास, आमदार प्रा. अनिल सोले, आमदार नागो गाणार, आमदार विकास ठाकरे, विभागीय आयुक्त संजीव कुमार, अतिरिक्त आयुक्त अभिजीत बांगर, जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे, मनपा आयुक्त तुकाराम मुंढे, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सजल मित्रा, सुपर स्पेशालिटी रुग्णालयाचे ओ.एस.डी. डॉ. फूलपाटील, इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया उपस्थित राहतील.
नागपूर: नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सोमवारी (ता. ६) घरोघरी जाऊन सर्वेक्षण करणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांची भेट घेऊन त्यांचे मनोबल वाढविले. ३० लाख नागपूरकरांची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. त्यामुळे तुम्ही स्वत:चीही काळजी घ्या, असा प्रेमळ सल्ला देत सर्व कर्मचाऱ्यांना आश्चर्याचा सुखद धक्का दिला.
मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांची ही भेट आकस्मिक होती. कोरोनाविरुद्धचा लढा लढणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांचे मनोबल वाढविण्याच्या हेतूने त्यांनी सर्व्हेक्षणाला निघण्याच्या वेळेवर आयसोलेशन हॉस्पीटलमध्ये पोहोचून त्यांच्याशी संवाद साधला. समोर अचानक आयुक्त तुकाराम मुंढे यांना बघून तेथे उपस्थित आणि सर्वेक्षणाला निघण्याच्या हेतूने बसमध्ये बसलेले सारेच कर्मचारी अवाक् झाले. विशेष म्हणजे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी स्वत: बसमध्ये चढून सर्व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्या कामाचे कौतुक करीत सर्वांशी हितगूज साधले. आपल्याला आपला जीव धोक्यात घालून कार्य करावे लागत आहे. त्यामुळे आपली काळजी आपणच घ्यायला हवी, असे म्हणत एका सीटवर एकाच महिलेने बसण्यास सांगत निर्देशाचे पालन करण्यास सांगितले. सगळयांना कोविड-१९ च्या गाइडलाइन्स प्रमाणे सर्वेक्षण मध्ये माहिती गोळा करण्याचा सल्ला देत आयुक्त म्हणाले कि नागपूरकरांची आशा तुमच्यावर आहे. आपल्या सगळयांना मिळून कोरोनाच्या संकटातून बाहेर पडायचे आहे.
यानंतर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील इतर भागाचाही दौरा केला. यात त्यांना जेथे-जेथे लोकं एकत्र गर्दी करून दिसलीत तेथे गाडीतून उतरून त्यांना ‘सोशल डिस्टंसिंग’चे धडे दिले. ‘कोरोना’ला हरविण्यासाठी, साखळी तोडण्यासाठी नागरिकांचे सहकार्य आवश्यक असल्याचे सांगत लॉकडाऊनदरम्यान घराच्या बाहेर पडू नका, असे आवाहन केले.
मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सकाळीच शहर पालथे घातले. मानेवाडा परिसरात एका रेशन दुकानासमोर धान्य घेण्यासाठी गर्दी असल्याचे दिसले. तेथे सामाजिक अंतराचे पालन करण्यात येत नसल्याचे लक्षात येताच ते स्वत: तेथे पोहोचले. सर्वांना तीन-तीन फुटाच्या अंतरावर उभे करून सामाजिक अंतराचे पालन करण्यासंदर्भात मार्गदर्शन केले. कोरोनाला हद्दपार करण्यासाठी गर्दी टाळण्याचे आवाहन केले. राशन दुकानदाराला तातडीने दुकानासमोर तीन-तीन फुटावर खुणा करण्यास सांगितले.
अनेकांना आश्चर्याचा धक्का
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या ‘लॉकडाऊन’ची अंमलबजावणी व्हावी यासाठी मनपा आयुक्त मुंढे स्वत: शहरात फिरत असल्याचे बघून सर्वांनाच आश्चर्य वाटले. गर्दी असलेल्या ठिकाणी गाडी थांबल्याचे बघताच आणि त्यातून येणारा व्यक्ती दुकानाकडे येत असल्याचे बघून अनेकांना सुरुवातीला काही कळलेच नाही. मात्र, दुकानात पोहोचल्यावर ते मनपा आयुक्त तुकाराम मुंढे असल्याचे लक्षात येताच सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला.
नागपूर: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या संचारबंदी दरम्यान नागपूर विभागाच्या पाचही जिल्ह्यात विविध क्षेत्रातील सुमारे ९ हजार २९३ स्थलांतरित मजुरांची व्यवस्था करण्यात आली आहे. या मजुरांकरीता विशेष शिबिरात व्यवस्था करण्यात आली असल्याची माहिती विभागीय आयुक्त डॉ संजीव कुमार यांनी दिली आहे.
इतर राज्यातील स्थलांतरित नागरिकांमध्ये उत्तर प्रदेश, बिहार, तेलंगाणा, तामिळनाडू, कर्नाटक, राजस्थान, पश्चिम बंगाल आदी राज्यातील आहेत, यामध्ये नागपूर शहर ७५५, नागपूर ५०९, वर्धा १७९४, भंडारा ३४९, गोंदिया १०८५, चंद्रपूर ४३९५, व गडचिरोली ४०६ अशा ९ हजार २९३ स्थलांतरितांचा समावेश आहे.
नागपुरात साधारण १२ मार्चपासून कोरोनाच्या संकटाची चाहूल लागली. पहिल्या दोन आठवडयात एक अंकी असणारी रुग्णसंख्या ही आता साधारणत १७ पॉझिटिव्ह रुग्णांवर स्थिरावली आहे. कोरोनाच्या संसर्गाला थांबविण्यासाठी आरोग्य यंत्रणा व प्रशासन सक्षमतेने काम करत आहे. मात्र कोरोना विषाणूपासून निर्माण झालेल्या परिस्थितीमुळे अनेक मजुरांचा रोजगार बुडाला. त्यांच्यावर उपासमारीची वेळ येऊ नये, त्यांच्याही पोटामध्ये दोन घास पडले पाहिजे, आपण जसे दररोज भोजन घेतो तसे त्यांनाही जेवण मिळाले पाहिजे ,त्यांचे जगणे सुलभ होण्यासाठी शासनातर्फे शेल्टर हाऊसची सोय करण्यात आली आहे.
नागपूर जिल्हयातील हिंगणा येथे मध्यप्रदेशातील कामगार मोठया प्रमाणावर रोजी रोटीसाठी येतात. कोरोनाची चाहुल लागताच कलम १४४ लावल्याने ते हिंगणा येथेच थांबलेत. तातडीने जिल्हा प्रशासनातर्फे रेणुका सभागृहात त्यांना निवारा उपलब्ध् करून देण्यात आला. येथे ३० मार्च पासून साधारण २६ कामगार राहतात. त्यामध्येच कैलास व सविता कैलास मरताम हे दाम्पत्यही आहेत.
रेणुका सभागृहातील या लोकांची सर्वप्रथम वैद्यकीय तपासणी करण्यात आली. या सभागृहात थांबलेल्या लोकांसाठी स्वतंत्र बेड देण्यात आले. त्यांना शुध्द पिण्याचे पाण्यासोबतच प्रत्येकाला साबण, टूथपेस्ट, शॅम्पू, बिस्कीट पुडा, केसांना लावायचे तेल, पिण्याच्या पाण्याची बॉटल प्रशासनाने दिली आहे. तसेच बातम्या बघण्याकरीता प्रोजेक्टरची सुविधा, स्वतंत्र भोजन कक्ष, मोबाईलकरीता वाय-फाय आदी सुविधा येथे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली नियोजनाची सर्व व्यवस्था करण्यात आली आहे. उपविभागीय अधिकारी इंदीरा पखाले यांच्या मार्गदर्शानाखाली तहसीलदार संतोष खांडरे मुख्याधिकारी राहुल परिहार, पोलिस निरीक्षक सारीन दुर्गे, असून तलाठी सोनकुसरे, नांदुरकर, दीपक गादे व इतर कर्मचारी कार्यरत आहेत.
नागपूर, ता. ४: ‘कोरोना’शी लढा देण्यासाठी मनपातील अधिकारी, कर्मचारी सर्वच मेहनत करीत आहेत. याशिवाय लोकप्रतिनिधीही त्यांच्याकडे येणा-या तक्रारी आपल्या स्तरावर सोडवून नागरिकांना दिलासा देण्याचे कार्य करीत आहेत. परिस्थितीशी दोन हात करताना सर्वच लढा देत आहेत. मनपातर्फे शहरात विविध ठिकाणी निर्जंतुकीकरण आणि फवारणीचे कार्य हाती घेण्यात आले आहेत. मात्र या कार्यामध्ये लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने समन्वयाने काम करण्याची गरज आहे. याच समन्वयातून तातडीने उर्वरित निर्जंतुकीकरण फवारणी पूर्ण करा, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले.
नागपूर शहरात सद्यस्थितीत सॅनिटायझेशन व फवारणी बाबत नागरिक व लोकप्रतिनिधींमधील प्रचंड असंतोषासंदर्भात शनिवारी (ता.४) महापौरांच्या अध्यक्षतेत बैठक घेण्यात आली. मनपा मुख्यालयातील महापौर कक्षापुढील आवारात झालेल्या बैठकीत महापौर संदीप जोशी यांच्यासह उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, आयुक्त तुकाराम मुंढे, सत्तापक्ष नेते संदीप जाधव, विरोधी पक्षनेता तानाजी वनवे, आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, ज्येष्ठ नगरसेवक व माजी महापौर प्रवीण दटके, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, उपायुक्त तथा आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ.प्रदीप दासरवार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.योगेंद्र सवाई, प्रमुख अग्निशमन अधिकारी राजेंद्र उचके, तथा सर्व झोनचे झोनल अधिकारी (स्वच्छता) उपस्थित होते.
प्रारंभी महापौर संदीप जोशी यांनी सॅनिटायझेशन आणि फवारणीचा झोननिहाय आढावा घेतला. शहरात दररोज निर्जंतुकीकरण केले जाते. गर्दीच्या ठिकाणी तसेच ज्या भागात कोरोनाग्रस्त रुग्ण आढळून आले त्या भागात प्राधान्याने फवारणी केली जात आहे. शहरातील ब-याचशा भागांमध्ये बहुतांशी निर्जंतुकीकरण करण्यात आले असल्याची माहिती यावेळी आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ.प्रदीप दासरवार यांनी दिली.
नेहरूनगर झोनमधील अनेक भागामध्ये फवारणी झाली नसल्याच्या अनेक तक्रारी दररोजच नागरिकांकडून येत आहेत. दुसरीकडे प्रशासनाकडून निर्जंतुकीकरण आणि फवारणीसंदर्भात बहुतांशी काम पूर्ण झाल्याचा दावा केला जात आहे. त्यामुळे निर्जंतुकीकरण आणि फवारणीसंदर्भात दैनंदिन आढावा घेणारी यादी सर्व नगरसेवकांना देण्यात यावी, असे निर्देश उपमहापौर मनीषा कोठे यांनी दिले.
मनपाच्या आरोग्य विभागामार्फत संपूर्ण शहरात कार्य सुरू आहे. मात्र प्रशासन आणि स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी समन्वयातून कार्य केल्यास त्याचे अधिक चांगले परिणाम दिसून येतील, असे मत स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांनी मांडले.
मोठ्या वस्त्यांमध्ये वाहनावरील मोठ्या मशीनद्वारे फवारणी करण्यात येते. मात्र अरुंद रस्ते असणा-या ठिकाणी हे वाहन जाउ शकत नाही. ‘हँड फॉगींग’ मशीनचीही मनपाकडे कमी आहे. त्यामुळे अरुंद रस्ते आणि वस्त्यांकरीता छोट्या वाहनांची व्यवस्था करण्याची सूचना सत्तापक्ष नेते संदीप जाधव यांनी मांडली.
कोरोनाशी लढा देण्यासाठी मनपाचा आरोग्य आणि स्वच्छता विभाग उत्तम कार्य करीत आहे. त्यांनी आपल्या कार्याची गती पुढेही अशीच कायम ठेवावी, अशी अपेक्षा आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी व्यक्त केली.
संबंधित भागातील निर्जंतुकीकरणासंदर्भात लोकांना काही माहिती दिली जात नसल्याने नागरिक नगरसेवकांवर असंतोष व्यक्त करतात. प्रशासनाद्वारे फवारणी संदर्भात माहिती देण्यासाठी निर्जंतुकीकरण गाडीवर कोरोना जनजागृतीसह निर्जंतुकीकरणासाठी वापरण्यात येणा-या औषधाची माहिती देणारी ऑडिओ क्लिप वाजण्यात यावी, अशी सूचना यावेळी ज्येष्ठ नगरसेवक व माजी महापौर प्रवीण दटके यांनी मांडली.
नागरिकांच्या मनात असलेल्या कोरोनाच्या भितीमुळे सर्वच भागातून निर्जंतुकीकरणाची मागणी केली जात आहे. नागरिकांच्या या असंतोषाचा सामना स्थानिक नगरसेवकांना करावा लागतो. निर्जंतुकीकरण अथवा फवारणीसाठी स्थानिक नगरसेवक आवश्यक ती मदत करण्यास तयार आहेत. मात्र प्रशासनाने त्यांच्याशी योग्य समन्वय साधणे गरजेचे आहे. त्यामुळे निर्जंतुकीकरण आणि फवारणीसंदर्भात संबंधित झोनल अधिका-यांनी स्थानिक नगरसेवकांना विश्वासात घ्यावे तसेच त्यांच्याशी योग्य समन्वय साधून उर्वरित भागातील निर्जंतुकीकरणाचे कार्य तातडीने पूर्ण करावे, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी दिले.
निर्जंतुकीकरण कार्य १० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार : आयुक्त तुकाराम मुंढे
शहरातील बहुतांशी भागातील निर्जंतुकीकरण कार्य लवकरच पूर्ण होण्याची स्थिती आहे. मनपाद्वारे मोठ्या वस्त्यांवर वाहन आणि लहान वस्त्यांमध्ये छोट्या मशीनद्वारे सोडियम हायपोक्लोराईड मिश्रणाची फवारणी करून निर्जंतुकीकरण केले जात आहे. येत्या १० एप्रिलपर्यंत संपूर्ण शहरात १०० टक्के निर्जंतुकीकरण कार्य होईल, असा विश्वास आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यावेळी व्यक्त केला.
कोरोनापासून बचावासाठी घरात राहणे हाच सर्वोत्तम उपाय आहे. मात्र नागरिकांनी अद्यापही याबाबत गांभीर्याने घेतले नसल्याचे दिसून येत आहे. अनेक ठिकाणी नागरिकांची गर्दी होत असल्याचे दिसून येत आहे. संभाव्य धोका लक्षात घेता आणखी पुढे काही दिवस कॉटन मार्केट सुरू करता येणार नाही, असेही आयुक्तांनी स्पष्ट केले.
लोकप्रतिनिधींकडून येणा-या सूचनांचा विचार करून त्यावरही अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न केला जाईल. तसेच निर्जंतुकीकरण आणि फवारणीसंदर्भातील दैनंदिन माहितीचा अहवालही सर्व नगरसेवकांना देण्यात येईल. फायलेरिया विभागामार्फत होणा-या फवारणीचेही कार्य प्रगतीपथावर आहे. या फवारणीसाठी प्रत्येक झोनमधील तिव्र संवेदनशील, मध्यम संवेदनशील आणि कमी संवेदनशील अशा भागांची वर्गवारी करण्यात आली आहे. त्यामुळे तिव्र संवेदनशील भागांमध्ये फवारणीला प्राधान्य दिले जात आहे. टप्प्याटप्प्याने सर्वच भागात वैज्ञानिक पद्धतीने फवारणी केली जात आहे. याशिवाय डासांची पैदास होणारी ठिकाणे शोधून त्या ठिकाणीही फवारणी केली जाईल. त्यामुळे नागरिकांनी ‘पॅनिक’ न होता घरीच बसून राहावे, असे आवाहनही आयुक्त तुकाराम मुंढे यांनी यावेळी केले.
बैठकीत सोशल डिस्टन्सिंगचे पालन
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे सर्वत्र गर्दी टाळण्याचे निर्देश दिले जात आहेत. त्यानुसार शनिवारी (ता.४) झालेल्या बैठकीमध्येही सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात आले.
महापौर कक्षामध्ये बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. मात्र बैठकीमध्ये होणारी गर्दी लक्षात घेता महापौर संदीप जोशी यांनी महापौर कक्ष व उपमहापौर कक्ष यांच्यामधील आवारामध्ये बैठक आयोजित करण्याचे निर्देश दिले. त्यानुसार सोशल डिस्टन्सिंगचे पालन करीत आवारामध्ये तीन फुटाचे अंतर ठेवून बैठक व्यवस्था करण्यात आली होती.
नागपुर: दिल्ली के तबलीगी जमात से लौटे लोगों की वजह से समूचे देशभर में कोरोना का खतरा दिनोंदिन बढ़ता ही जा रहा है. देश के अलग-अलग शहरों में हर दिन मरकज कनेक्शन सामने आ रहा है. अब इससे आरेंजसिटी भी अछूती नहीं रही. इस बीच क्वारंटाइन में रखे गये मध्य नागपुर के एक 32 वर्षीय युवक की रिपोर्ट पाजिटिव आने के बाद प्रशासन का सिरदर्द बढ़ गया है. इसके साथ ही पूरे इलाके को लाकडाउन कर दिया गया. लग रहा था कि सिटी में कोरोना की चेन टूट गई है, लेकिन 5 दिन बाद मिले पाजिटिव मरीज ने खतरा बढ़ा दिया है. इतना ही नहीं करीब 15 दिनों तक आम लोगों के बीच रहने के बाद प्रशासन ने उसे 1 अप्रैल को क्वारंटाइन किया था.
प्रशासन द्वारा पिछले सप्ताहभर से मरकज कनेक्शन की तलाश की जा रही थी. सिटी का एक युवक 13 मार्च को दिल्ली पहुंचा था. वहां वह मरकज जमात में शामिल हुआ और 14 मार्च को ट्रेन से नागपुर लौट आया. लौटने के बाद उसमें सर्दी, खांसी और जुकाम के लक्षण दिखाई दिये थे लेकिन अन्य डाक्टर के पास दवाई ली थी. इस वजह से खुद को क्वारंटाइन भी नहीं किया, लेकिन जब प्रशासन द्वारा मरकज से लौटने वालों की पहचान की गई तो उक्त युवक का पता चला. पश्चात उसे 1 अप्रैल को वनामति में क्वारंटाइन किया गया.
एम्स की लैब में की गई जांच
क्वारंटाइन करने के बाद उसके नमूने जांच के लिए प्रयोगशाला में भेज दिये गये थे, लेकिन मेयो की प्रयोगशाला में पहले से ही नमूने होने और संदिग्ध की भीड़ बढ़ने से युवक के नमूने एम्स की प्रयोगशाला में भेजे गये. शनिवार को रिपोर्ट आने के बाद उसके संक्रमित होने की पुष्टि हुई. रिपोर्ट पाजिटिव मिलने के बाद से प्रशासन द्वारा युवक के संपर्क में आने वालों की तलाश शुरू कर दी गई है. साथ ही उसके घर से कुछ किमी की दूरी तक के लोगों की जांच शुरू कर दी गई है.
180 आयसोलेशन
कोरोना का एक टेस्ट करने के लिए अलग-अलग चक्र में करीब 7 घंटे का समय लगता है. एक दिन में 3 चक्र में जांच की जाती है. मेयो की प्रयोगशाला में एक मशीन बंद होने से अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) में जांच की शुरुआत की गई. पहले ही दिन 25 नमूनों की जांच की गई है. इसके साथ ही सिटी में पाजिटिव मरीजों की संख्या 17 हो गई है. दरअसल प्रशासन ने मरकज से लौटे 180 लोगों को आयसोलेशन में रखा है. एम्स में प्रयोगशाला तैयार करने के साथ ही 100 बिस्तरों का आयसोलेशन वार्ड बनाया गया है. संस्था में पहले से ही कोरोना मरीजों की जांच के लिए कोरोना कार्नर शुरू है. अब मरीजों के बढ़ने की संभावना के मद्देनजर एम्स ने मास्क, वेंटिलेटर सहित अन्य सामग्री की तत्काल खरीदी शुरू कर दी है.
मिल रही सभी सुविधाएं
कोरोना का प्रादुर्भाव टालने के लिए संदिग्ध और बाधित नागरिकों की प्रत्येक स्तर पर जांच की जा रही है. कोरोना पाजिटिव 4 मरीजों की हालत में सुधार होने के बाद उन्हें पहले ही छुट्टी दे दी गई है. 4 अप्रैल को सुबह तक विधायक निवास, रविभवन व वनामति में कुल 639 लोगों को रखा गया. इसमें दिल्ली के मरकज से लौटने वाले 407 लोगों का भी समावेश था, जिसमें से 127 को घर छोड़ दिया गया. यहां लोगों को सभी तरह की आवश्यक सुविधाएं उपलब्ध कराई जा रही हैं.
नागपूर: कोरोनाविरुद्ध लढताना या लढ्यात जे योद्धा म्हणून भूमिका बजावत आहे त्यांचे मनोबल वाढण्यासाठी आणि प्रत्येक व्यक्ती प्रत्येकासोबत आहे याची जाणीव करून देण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी सहकुटुंब दीप प्रज्वलित करून एकतेचा संदेश दिला.
कोरोना विषाणू विरुद्ध नागपूरकर एकत्रित येऊन लढा देत आहेत. संपूर्ण यंत्रणा कोरोनाची साखळी तोडण्यासाठी एकजूट झाली आहे. लॉकडाऊनला प्रतिसाद देत नागरिकही तेवढ्याच जिकरीने लढत आहेत. यादरम्यान जे गरीब व्यक्ती आहेत, मजूर वर्ग आहे, त्यांची काळजी यंत्रणेसोबत अनेक समाजसेवी संस्था, अनेक व्यक्ती घेत आहेत. बंदोबस्तावर असलेल्या पोलिसांचीही काळजी त्यांना चहा, नाश्ता देत अनेक संस्था घेत आहेत. या सर्व लढाईत नागपूरकर संपूर्ण ताकदीने एकत्रित आहे. पंतप्रधानांच्या आवाहनाला प्रतिसाद देत आज नागपूरकरांनी दिवे लावून आसमंत उजळला. याबददल सर्व नागपूकरांचे आभार मानतो, या शब्दात महापौर संदीप जोशी यांनी दीपपर्वावर आपल्या भावना व्यक्त केल्या. त्यांनी स्वगृही सहकुटुंब दिवे लावून प्रकाशपर्वात सहभाग घेतला.
अमरावती: अमरावतीत दोन दिवसांपूर्वी दगावलेल्या व्यक्तीचा करोना अहवाल आला असून त्यात त्याचा मृत्यू करोनानेच झाल्याचं उघड झालं आहे. अमरावतीतील हा पहिलाच करोना बळी असल्याने अमरावतीत खळबळ उडाली असून हा व्यक्ती राहत असलेला परिसर सील करण्यात आला आहे. या व्यक्तीचा करोना अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर विदर्भातील करोना बळींची संख्या दोन झाली असून राज्यातील करोना बळीचा आकडा २७वर पोहोचला आहे.
या ४५ वर्षीय व्यक्तीला २ एप्रिल रोजी अमरावतीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. करोनाची लक्षणं आढळल्याने त्याच्यावर तात्काळ उपचारही सुरू करण्यात आले होते. मात्र, डॉक्टरांनी त्याला न्यूमोनिया झाल्याचं निदान केलं होतं. उपचार सुरू असतानाच त्याच दिवशी सकाळी साडे नऊ वाजता त्याचा मृत्यू झाला होता. आज पहाटे ३ वाजता त्याच्या करोना टेस्टचा अहवाल आला असून त्यात त्याला करोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने तो राहत असलेला हत्तीपुरा परिसर सील केला आहे. तसेच त्याच्या कुटुंबीयांना आणि शेजाऱ्यांना क्वॉरंटाइन करण्यात आले आहे. या शिवाय तो आणि त्यांचे कुटुंबीय ज्यांच्या ज्यांच्या संपर्कात आले होते, त्यांचाही शोध घेतला जात आहे.
मुंबईकर ऐकेनात; संचारबंदी मोडण्यात आघाडीवर!
दरम्यान, राज्यात करोना बळींची संख्या २७वर पोहोचली आहे. मुंबईत एकूण १८, पुणे, बुलडाणा आणि अमरावतीत प्रत्येकी एकाचा मृत्यू झाला आहे. तर राज्यात आतापर्यंत ४९० जणांना करोनाची लागण झाली आहे. यात मुंबईतील २७८ जणांचा समावेश आहे. गेल्या २४ तासांत राज्यात ६७ नवे करोना रुग्ण सापडले आहेत. काल दिवसभरात एकट्या मुबईतच ४३ रुग्ण सापडले, तर पुण्यात ११ रुग्ण आढळले असून नवी मुंबईत ८ रुग्ण सापडले आहेत. दिलासादायक बाब म्हणजे राज्यात आतापर्यंत ५०जण बरे झाले आहेत
नागपूर: कोरोना विषाणूच्या अनुषंगाने करण्यात आलेल्या लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर अतितीव्र आजाराने ग्रस्त असलेल्या वयोवृद्ध व्यक्ती, कुटुंबात कोणाचाही आधार नसलेले एकाकी राहणारे दिव्यांग व्यक्तींसाठी नागपूर महानगरपालिकेने हेल्पलाईन सुरू केली आहे. अशा व्यक्तींना जीवनावश्यक वस्तूंची गरज असल्यास त्यांनी सदर हेल्पलाईनवर संपर्क करण्याचे आवाहन मनपाच्या समाजकल्याण विभागातर्फे करण्यात आले आहे.
नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पुढाकारातून ही हेल्पलाईन सुरू करण्यात आली आहे. अतितीव्र आजाराने ग्रस्त असलेल्या वयोवृद्ध व्यक्ती, कुटुंबात कोणाचाही आधार नसलेल्या एकाकी दिव्यांग व्यक्तींना लॉकडाऊन परिस्थितीत घराच्या बाहेर पडावे लागू नये तसेच त्यांची गैरसोय होऊ नये यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. संबंधित गरजू व्यक्तीने हेल्पलाईन क्रमांकावर संपर्क साधल्यानंतर ही सेवा उपलब्ध होऊ शकेल.
मनपाने सुरू केलेल्या या हेल्पलाईनचा क्रमांक ०७१२-२५६७०१९ असा असून संपर्क अधिकारी (नोडल ऑफिसर) म्हणून अभिजीत राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. क्षेत्रनिहाय समाजसेवी संस्था निश्चित करण्यात आल्या आहेत. अन्नधान्य, औषधे, भाजीपाला, दूध आदी अत्यावश्यक वस्तूंचा पुरवठा करणाऱ्या संस्था या स्वयंसेवी संस्थांशी जोडण्यात आल्या आहेत.
इच्छुक असलेल्या स्वयंसेवी संस्था/दिव्यांग क्षेत्रात काम करणाऱ्या संस्था यांनी या प्रक्रियेत सहभाग घेण्याची इच्छा दर्शविल्यास हेल्पलाईन संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.
हेल्पलाईनवर प्राप्त माहितीच्या अनुषंगाने स्वयंसेवी संस्था वयोवृद्ध, दिव्यांग व्यक्तींना आवश्यक सहकार्य करतील. सदर हेल्पलाईन क्रमांक सकाळी ९ ते रात्री ९ पर्यंत सुरू राहील.
नागपूर: नागपुरात असलेल्या परप्रांतीय विद्यार्थ्यांना लॉकडाऊनदरम्यान मदत व्हावी, या उद्देशाने जिव्हाळा फाऊंडेशन सरसावले आहे. विशेषत: जम्मू, काश्मीर आणि लद्दाखमधील जे विद्यार्थी नागपुरातील विविध भागात शिक्षणासाठी राहात आहेत, अशांसाठी ही सोय करण्यात आली आहे.
याअंतर्गत जिव्हाळा फाऊंडेशनतर्फे दररोज २०० गरजूंना फूड पॅकेट व फळवाटप करण्यात येत आहे. लॉकडाऊन संपेपर्यंत ही व्यवस्था करण्यात येणार आहे. जम्मू-कश्मीर आणि लद्दाख येथील अनेक विद्यार्थी नागपुरात राहतात. अशा ५० विद्यार्थ्यांची किराणाची व्यवस्था जिव्हाळा फाऊंडेशनने करून दिली आहे.
याव्यतिरिक्त सोमवारी क्वार्टर व हनुमान नगर येथे राहणाऱ्या १० विद्यार्थ्यांच्या जेवणाची व्यवस्था संस्थेचे मार्गदर्शक माजी खासदार अजय संचेती, आमदार डॉ. रामदास आंबटकर, आमदार अनिल सोले, माजी महापौर प्रवीण दटके यांच्या मागरदर्शनात संस्थेचे अध्यक्ष मनीष मेश्राम , संस्थेचे सचिव तुषार महाजन, अंगद जरुळकर , डॉ. सुमित पैडलवार, प्रदीप कदम , जयंत पाध्ये, प्रणव हळदे, आशुतोष बेलेकर, नितेश समर्थ, योगेश मधुमटके, प्रसाद हडप, अतिश रॉय, व्यकंटेश होलगरे,उदय झोडे, विलास मसरे, रिद्दु चोले, केतन साठवणे, अभिजित सरोदे, अभिजीत गावंडे, मयुर शेंडे, विनोद कोटांगळे, रोशन झाडे, अपराजित फुलझेले, नेहा लगाटे, स्नेहल कुचनकर पदाधिकारी व सदस्य करीत आहेत.
नागपुर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊन दरम्यान नागरिकांना अत्यावश्यक वस्तू मिळावा यासाठी नागपूर महानगरपालिका संपूर्ण प्रयत्न करीत आहे. अत्यावश्यक वस्तूंची कोणती दुकाने सुरू आहेत, याची माहिती मिळण्यासाठी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पुढाकारातून नागपूर महानगरपालिकेने वेब ॲप्लिकेशन तयार केले असून यामाध्यमातून आता त्यांना घराजवळील परिसरातील सुरू असलेल्या दुकानांची माहिती उपलब्ध होणार आहे.
किराणा, दूध, दुग्धजन्य पदार्थ, भाजीपाला, औषधी आदींची दुकाने अत्यावश्यक गरजांमध्ये मोडतात. त्यामुळे नागरिकांना त्यांच्या घराजवळची सुरु असलेली दुकाने, सुपर मार्केट याची माहिती व्हावी, या उद्देशाने ही व्यवस्था करण्यात आली आहे. विशेष म्हणजे, यामध्ये नागपूर महानगरपालिकेअंतर्गत येणाऱ्या दहाही झोनमधील अत्यावश्यक दुकानांची यादी मोबाईल क्रमांक आणि लोकेशनसह आहे. ही ॲप्लिकेशन उघडल्यानंतर नागरिकांना त्यांना हवे असलेल्या दुकानाची कॅटेगिरी सिलेक्ट करायची आहे. यानंतर झोन सिलेक्ट करायचा आहे. झोन सिलेक्ट केल्यानंतर किराणा दुकान अथवा सुपर मार्केट अथवा दुधाची दुकाने यापैकी एक सिलेक्ट करावे लागेल. या क्रमानुसार सिलेक्ट केल्यानंतर नागरिकांना हवी असलेली माहिती ॲपच्या माध्यमातून उपलब्ध होईल.
सदर ॲप्लिकेशन नागरिकांच्या सोयीसाठी http://covidcarenagpur.cdaat.in या लिंक वर क्लिक करून सदर ॲप्लिकेशन उघडता येईल. त्याचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.
नागपुर : कोरोना वायरस से फैली महामारी से गरीब वर्गों को भारी मुसीबतो का सामना करना पड़ रहा है. लॉक डाउन के कारण उनकी रोजीरोटी नही होने से उन्हें भोजन के लिए काफी मशक्कत करनी पड़ रही है.
ऐसे में शहर की संयम स्वर्ण महोत्सव समिति इस नेक कार्य में पिछले 10 दिनों से करीब 800 लोगो को रोज शहर के विभिन्न इलाको के गरीबो को खाना खिलाकर अपना सामाजिक दायित्व निभा रही है.
इस अवसर पर पूर्व नागपुर के आमदार कृष्णा खोपड़े की प्रमुख उपस्थिति में संस्था के अनिल जैन, इन्द्रचंद जैन, राजु शर्मा, संजय वाधवानी, राज जैन, प्रीतम शर्मा, पीयूष जैन, राजेश ठाकुर, दर्पण जैन, उल्हास अग्रवाल, मनीष वलेचा, मीना जैन, गौरी शर्मा, शोभा जैन आदि इस कार्य मे जुटे हुवे है।
नागपूर: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शहरात सुरू असलेल्या लॉकडाऊन दरम्यान शहरातील नागरिकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. हे नागरिक नगरसेवकांकडे समस्या घेऊन येत आहे. त्यावर करावयाच्या उपाययोजनासंदर्भात महापौर संदीप जोशी यांनी शुक्रवारी (ता. ३) पदाधिकाऱ्यांसोबत चर्चा केली.
बैठकीला महापौर संदीप जोशी यांच्यासह उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समितीचे सभापती विजय (पिंटू) झलके, सत्तापक्ष नेता संदीप जाधव, आरोग्य सभापती वीरेंद्र कुकरेजा उपस्थित होते. लॉकडाऊन दरम्यान नागरिकांनी घरीच राहावे यासाठी प्रशासनाने किराणा, भाजीपाला, दूध आणि दुग्धजन्य पदार्थ घरपोच मिळावे, याची व्यवस्था केली आहे. मात्र तरीही नागरिक समस्या घेऊन नगरसेवकांकडे जात आहेत.नगरसेवकांनी त्यांच्या समस्येचे समाधान करावे आणि त्यांना घरी राहणे का गरजेचे आहे, याबाबत सांगावे, असे महापौर संदीप जोशी यांनी सांगितले.
नागपूर शहरातील कुण्याही नागरिकाला लॉकडाऊनदरम्यान त्रास होऊ नये, यासाठी प्रशासन कार्यरत असून संपूर्ण नगरसेवकांनी व्यवस्थेला सहकार्य करावयाचे आहे. जिथे कुठे अडचण येत असेल तेथे सरळ महापौर, पदाधिकारी किंवा अधिकाऱ्यांशी थेट संपर्क साधावा, असे आवाहन त्यांनी केले.
देशव्यापी लॉकडाउनला आज ९ दिवस होत आहेत. आजपर्यंत ज्या प्रकारे लोकांनी सहकार्य केलं ते अभूतपूर्वी आहे. प्रशासन आणि जनतेनं त्याला उत्तमरित्या सांभाळण्याचं काम केलंय. २२ मार्च रोजी सर्वांनी करोनाविरुद्ध लढणाऱ्यांचे आभार मानले त्याची दखल सर्व देशांनी घेतली आहे. या लोकांनी संकट काळात सामूहिक शक्तीचं दर्शन घडवलंय. देश एक होऊन करोनाविरुद्ध लढू शकतो हे आपण दाखवून दिलंय, असं पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशातील जनतेला संबोधित केलं.
देशातील कोट्यवधी लोक आज घरात आहेत ते विचार करत असतील की एवढी मोठी लढाई आपण एकटं लढू. अजून असे किती दिवस असतील. आज लॉकडाउन असलं तरी कोणी एकटं नाही.
१३० कोटी लोकांची सामूहिक शक्ती एकत्र आहे. वेळोवेळी या सामूहिक शक्तीच्या भव्यतेचं दर्शन घडवणं आवश्यक आहे. या महामारीमुळे पसरलेल्या अंधकारातून आपल्याला प्रकाशाकडे जायचं आहे. ज्यांच्यावर जास्त संकट आलंय अशा गरीब बांधवांना आपल्याला पुढे घेऊन जायचं आहे. आपल्याला करोना संकटाला हरवायचं आहे, असं मोदी यावेळी म्हणाले.
१३० कोटी लोकांच्या महासंकल्पाला वर घेऊन जायचंय. ५ एप्रिल रात्री तुमच्या सर्वांचे नऊ मिनिट हवे आहेत. घरातील सर्व लाईट बंद करून घराच्या दरवाज्यावर उभं राहून ९ मिनिटांसाठी मेणबत्ती, दिवा, टॉर्च किंवा मोबाईलची फ्लॅशलाईट सुरू करा. त्यावेळी घरातील सर्व लाईट बंद करून सर्व घरात दिवा उजळेल तेव्हा आपण एकाच ध्येयानं लढत आहोत हे सिद्ध होईल. त्यावेळी प्रत्येकानं आपल्या मनात संकल्प करा आपण एकटे नाही आहोत, असंही मोदी यावेळी म्हणाले. यावेळी कोणीही एकत्र व्हायचं नाही. सोशल डिस्टन्सिंगच्या लक्ष्मण रेषा तोडायची नाही. करोनाची साखळी तोडण्याचा हा रामबाण उपाय आहे, असंही त्यांनी नमूद केलं
Maharashtra, India | April 2020: The Public Health Department of Maharashtra has launched a dedicated State Covid Helpline – +91 20 2612 7394 on WhatsApp. This service will be free-to-use and will act as a central source for accurate, trustworthy and up-to-date information about the ongoing COVID-19 pandemic.
To use the free Covid Helpline Maharashtra on WhatsApp, simply save the number +91 20 2612 7394 in your phone contacts and then text the word ‘Hi’ in a WhatsApp message to get started. This service will be available both in English and Marathi.
The Covid Helpline Maharashtra is an automated ‘chatbot’ service which will allow citizens to get verified answers to questions about Coronavirus from the Public Health Department of Maharashtra within 24 hours. To begin with, the service will provide information on topics such as Coronavirus prevention and symptoms, support being provided by Maharashtra government and details on common myths, with more options to be included in the future.
Complimenting the partnership with WhatsApp, Uddhav Thackeray, Chief Minister of Maharashtra said, “At this challenging time we urge residents to stay home and message the ‘Covid Helpline Maharashtra’ service on WhatsApp for verified facts and the latest guidance from the Government of Maharashtra.”
“Access to credible sources of information is critical to battling Coronavirus and is our top priority. We are pleased to have this opportunity to work with the Public Health Department of Maharashtra on this initiative. We encourage users to depend on verified sources for any information during this pandemic,” added Abhijit Bose, Head of India for WhatsApp.
In addition to the MyGov central helpline, similar services have been introduced in several states of India to empower users to find credible information both in English and their specific regional language. Users can now reach Health Ministries of Gujarat (+91 74330 00104) and Kerala (+91 90722 20183) on WhatsApp with more states to launch in the coming days. Users can reach out to the fact-checking community by visiting our recently launched WhatsApp Coronavirus Information hub whatsapp.com/coronavirus.
वॉशिंग्टन: कोरोनाचा सर्वाधिक मोठा फटका अमेरिकेला बसण्याची शक्यता आहे. अमेरिकन प्रशासनानंदेखील याची तयारी सुरू केल्याचं दिसत आहे. अमेरिकेच्या आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेनं संरक्षण विभागाकडे १ लाख बॉडी बॅग्स मागितल्या आहेत. त्यामुळे कोरोनाच्या रुग्णांचा आकडा झपाट्यानं वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. आतापर्यंत अमेरिकेत कोरोनामुळे ६ हजारहून अधिक जणांचा मृत्यू झाला आहे.
आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेनं १ लाख बॉडी बॅग्स मागितल्याची माहिती पेंटॉगॉननं गुरुवारी दिली. अमेरिकन प्रशासनानं कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी, रुग्णांवरील उपचारांसाठी संपूर्ण यंत्रणा कामाला लावली असली तरीही मृतांचा आकडा १ लाख ते २ लाख ४० हजारांपर्यंत जाऊ शकतो, अशी शक्यता व्हाईट हाऊसमधील तज्ज्ञांनी व्यक्त केली आहे. याच पार्श्वभूमीवर आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेनं तयार सुरू केली आहे.
फेडरल इमर्जन्सी मॅनेजमेंट एजन्सीनं (फेमा) केलेल्या विनंतीनंतर पेंटागॉनच्या डिफेन्स लॉजिस्टिक एजन्सीनं हालचाली सुरू केल्या आहेत. ‘संघराज्यांमधील आरोग्य विभागांच्या वतीनं आपत्ती व्यवस्थापन यंत्रणेनं १ लाख बॉडी बॅग्सची मागणी केली आहे. त्यानुसार आम्ही प्रक्रिया सुरू केली आहे,’ अशी माहिती पेंटागॉनचे प्रवक्ते लेफ्टनंट माईक अँड्रूज यांनी दिली.
अमेरिकेत, विशेषत: न्यूयॉर्कमध्ये कोरोनाचा अतिशय वेगानं फैलाव झाला आहे. त्यामुळे पुढील दोन आठवडे अतिशय वाईट असू शकतात, असं अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारीच म्हटलं होतं. पुढील काही दिवस अतिशय अवघड असणार आहेत. प्रत्येक अमेरिकन नागरिकानं त्यासाठी तयार राहावं, असं आवाहन त्यांनी केलं होतं.
सध्या जगातील कोरोनाबाधितांची संख्या १० लाख ३० हजार १८१ इतकी आहेत. यातील जवळपास २५ टक्के रुग्ण रुग्ण अमेरिकेत आहेत. अमेरिकेतल्या कोरोनाबाधितांची संख्या २ लाख ४५ हजार ३८० इतकी असून मृतांचा आकडा ६ हजार ९५ वर पोहोचला आहे. काल एकाच दिवसात अमेरिकेत ९०० हून अधिक जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला.
Nagpur: At a time when there is spurt in the numbers of novel Corona Virus (Covid-19) cases in India, most of the hospitals are running short of ventilators which are absolutely necessary to help the infected continue breathing.
Acknowledging this, the team of New Era Hospital lead by Dr. Anand Sancheti made a device which can ventilate as many as eight persons.
Couple of days back we made this splitter by computerized 3 D printing mechanism. By 3 D printing powder mechanism in factory, we could make this part in 1 day. Thanks to Mr Bhusari who made my thought and design possible in 1 day, says Dr Sancheti.
Earlier in foreign countries this type of spliters was made and tried upto 6 patients but this spliter can ventilate upto 8 patients, he mentioned.
Now in case of emergency like mass casualty we can ventilate many patients with one ventilator. We can make more if any one needs for corona virus infection if outburst happens, he added.
Mumbai/Pune:ŠKODA AUTO Volkswagen India Private Limited (ŠAVWIPL) pledges financial aid of INR 1 crore towards the setup of the dedicated COVID -19 facility with 1100 beds with Sassoon General Hospital in Pune. The contribution is made towards essential medical consumables and critical care equipment for the medical team and patients fighting the COVID-19.
In addition, ŠAVWIPL will donate over 35,000 sanitizers to hospitals in Pune, Aurangabad and Mumbai and distribute over 50,000 food packets in the Aurangabad region. The company is also producing reusable face shields within the Chakan factory which will distributed amongst healthcare providers treating Covid-19 patients.
Face shields help protect the wearer’s face from body fluids and can be worn in conjunction with masks while offering clarity for procedures. Designed to prevent fogging while being light weight to allow healthcare personnel to communicate freely talk at the same time be movement friendly. Approval has been obtained from Dr. Ajay Chandanwale, Dean of the Maharashtra State Government run Sassoon General Hospital. The Face masks produced by SAVWIPL has been certified by the team for Indoor and outdoor use, will be used in ICU while doing procedures and for COVID -19 OPD consultation. The transparent sheet that forms the shield, can be sanitized after 6-8 hours before reuse.
Considering the surging shortage of sanitizer’s in the market, ŠAVWIPL will donate over 35,000 sanitizers to Sassoon General Hospital (Pune), Kasturba Gandhi Hospital (Mumbai) and Government Hospital (Aurangabad). The company also lending its support to Annamitra Foundation who will be distributing 50,000 food packets to the needy people in and around Aurangabad till the lockdown is lifted. The company is also looking at utilising its global supply chain capabilities to organise essential medical supplies that India needs to fight the Covid-19 pandemic.
#WeNotMe. Our parent company, ŠKODA AUTO a.s. in collaboration with the Czech Technical University, Prague, has developed and producing reusable FFP3 respirators for hospitals using 3D printers. It is also helping charities, municipalities and volunteers distribute medicines and food by offering the use of its fleet of owned vehicles. The Volkswagen Group is organizing medical materials including face masks, gloves, disinfectants, clinical thermometers, protective goggles and protective clothing – is to be made available to medical personnel providing emergency treatment and care.
नागपूर, ता. २: निर्जंतुकीकरणाच्या नावावर दोन दिवस कॉटन मार्केट बंद करण्यास मनपा प्रशासनाने सांगितले. मात्र अद्यापही ते सुरू करण्यात आले नाही, अशी कैफियत कॉटन मार्केट मर्चंट असोशिएशनच्या पदाधिकाऱ्यांना महापौर संदीप जोशी यांच्यासमोर मांडली. याची दखल घेत त्यांनी कॉटन मार्केट तातडीने सुरू करण्याचे निर्देश मनपा प्रशासनाला दिले.
महापौर संदीप जोशी यांनी गुरुवारी (ता. २) शहरात विविध ठिकाणी सुरू करण्यात आलेल्या भाजी मार्केटला भेट दिली. दरम्यान, ते कॉटन मार्केट येथेही पोहोचले. तेथे कॉटन मार्केट असोशिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांची भेट घेतली. निर्जंतुकीकरणाच्या नावावर मनपा प्रशासनाने ३१ मार्चपर्यंत मार्केट बंद करण्यास सांगितले. त्यानुसार आम्ही मार्केट बंद ठेवले. मात्र ३१ मार्चनंतरही प्रशासनाने मार्केट सुरू करु दिले नाही. गाड्या अधिक प्रमाणात येतात. त्यामुळे गर्दी होते, हे कारण पुढे केले जात आहे. प्रशासनाने कळमना मार्केट बंद केल्यामुळे तेथील संपूर्ण भार कॉटन मार्केटवर आला होता. आता ते मार्केट सुरू केले. शहरात इतर दहा ठिकाणी मोकळ्या जागांवर मार्केट सुरू केले. परंतु गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू असलेले नागपूरच्या मध्यवर्ती भागातील कॉटन मार्केट बंद ठेवले.
आम्ही सर्व नियम पाळायला तयार आहोत. सामाजिक अंतर पाळायला तयार आहोत. गाड्यांची संख्या कमी करायला तयार आहोत. मार्केटचे गेट पूर्णपणे उघडे न ठेवता अर्धवट उघडे ठेवून सुरक्षा रक्षकाच्या माध्यमातून गर्दीवर नियंत्रण ठेवायला तयार आहोत. दिवसभर मार्केट सुरू न ठेवता सकाळी ७ ते दुपारी २ या वेळेत पूर्ण व्यवसाय करायला तयार आहोत. मात्र, प्रशासनाने विश्वासात न घेता, चर्चा न करता घेतलेला निर्णय चुकीचा असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
पदाधिकाऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतल्यानंतर महापौर संदीप जोशी यांनी मनपाचे उपायुक्त महेश मोरोणे यांच्याशी भ्रमणध्वनीवरून संवाद साधला. शहरात इतर ठिकाणी मार्केट सुरू केल्यामुळे गर्दी विभागली गेली आहे. कॉटन मार्केट अटी आणि शर्तींच्या आधारे सुरु करायला हरकत नाही. गाड्यांची संख्या ५० किंवा १०० ठेवा. किंवा टप्प्याटप्प्याने मार्केटमध्ये गाड्या सोडा. कोरोनाच्या प्रतिबंधासाठी पाळावयाचे सर्व नियम पाळण्याची ताकीद देऊन तातडीने कॉटन मार्केट सुरू करा, असे निर्देश महापौर संदीप जोशी यांनी यावेळी दिले.
रेशन कार्ड संदर्भात मार्गदर्शक तत्त्वे उपलब्ध करून द्या!
नागपूर, ता. २ : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या ‘लॉकडाऊन’ दरम्यान अनेकांची अन्नधान्यासाठी परवड होत आहे. ज्यांच्याकडे रेशन कार्ड आहे आणि ज्यांच्याकडे नाही, अशांना शासनाने केलेल्या उपाययोजनांसंदर्भात अनेक शंका आहेत. त्यामुळे शासन आणि जिल्हा प्रशासनाने यासंदर्भात तात्काळ मार्गदर्शक तत्त्वे उपलब्ध करुन द्यावे, अशी विनंती करणारे पत्र नागपूर महानगरपालिकेचे स्थायी समितीचे सभापती विजय (पिंटू) झलके यांनी मुख्यमंत्री आणि जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.
सदर पत्रात नमूद केल्यानुसार, लॉकडाऊनमध्ये दैनंदिन गरजा भागविण्यासाठी गोरगरीबांना अनेक संकटांचा सामना करावा लागत आहे. अशा परिस्थितीत नागरिक लोकप्रतिनिधींकडे जाऊन विविध मागण्या करीत आहेत. राशन मिळण्याकरिता फॉर्म भरून द्यावा, असा आग्रह ते लोकप्रतिनिधींना करीत आहेत. मात्र, यासंदर्भात प्रशासनाकडून काही गोष्टी लोकप्रतिनिधींनाच जाणून घेणे क्रमप्राप्त आहे. ज्या नागरिकांकडे राशन कार्ड आहे. मात्र ऑनलाईन नसल्याने त्यांना राशन मिळण्याकरिता अडचण येत आहे. ज्या नागरिकांकडे राशन कार्ड आहे, मात्र ते बाहेरगावचे असल्याने त्यांना राशन मिळण्यात अडचण येत आहे.
जे नागरिक बाहेरगावकडी मजूर किंवा किरायदार आहेत त्यांना राशन मिळण्याकरिता अडचण येत आहे. मोफत गॅस सिलिंडरचीही घोषणा झाली. मात्र, ते केवळ उज्ज्वला सिलिंडर धारकांनाच मिळणार की सर्वांनाच मिळणार याबाबतही शंका आहे. या सर्व शंकांचे निरसन करण्यासाठी आणि लोकप्रतिनिधींना नागरिकांना उत्तरे देता येतील, यादृष्टीने मार्गदर्शक तत्वे उपलब्ध करून देण्याची विनंती या पत्रात केली आहे. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना आज (ता. २) हे पत्र सोपविण्यात आले असून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनाही पाठविण्यात आले आहे. यावेळी स्थायी समितीचे सभापती विजय (पिंटू) झलके यांच्यासोबत तुषार वानखेडे, मनोज डोरले उपस्थित होते.
नागपूर, ता. २ : नागपुरातील ‘कोरोना’चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता प्रशासनाने केलेल्या उपाययोजना, त्याची अंमलबजावणी आणि परिस्थितीवर नियंत्रणाच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिका मुख्यालयात ‘वॉर रूम’ तयार करण्यात आली आहे. ‘कोरोना’च्या आव्हानाला सामोरे जाण्यासाठी गेल्या आठवडाभरापासून ह्या ‘वॉर रूम’मध्ये रणनीति आखली जात आहे.
नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या संकल्पनेतून तयार करण्यात आलेल्या या ‘वॉर रूम’मध्ये कोरोनासोबत लढण्याची रणनीति तयार केली जाते. नागपूर महानगर पालिकेकडे कोरोना कंट्रोल रूम, कोव्हिड-१९ मोबाइल ॲप, कंटेनमेंट सर्वेक्षण, हाय रिस्क नागरिकांचे सर्वेक्षण, ४८ रॅपिड रिस्पांस टीम, राज्य शासन आणि केन्द्र शासन आदींच्या माध्यमातूनदररोज ‘कोरोना’संदर्भात माहिती प्राप्त होते. मिळालेल्या माहितीवर काय कार्यवाही करायला हवी, काय कार्यवाही झाली आहे यावर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या उपस्थितीत दररोज रात्री ९.३० वाजता चर्चा केली जाते. डॉक्टरांच्या चमूसोबत विचारविनिमय करून याच ‘वॉर रूम’मध्ये रणनीति ठरविली जाते. गेल्या आठवडाभरापासून हे काम अविरत सुरू आहे.
यासंदर्भात अधिक माहिती देताना मनपा आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले, ‘कोरोना’वर प्रतिबंध घालण्यासाठी नागपूर महानगरपालिका प्रशासन आटोकाट प्रयत्न करीत आहे. कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी आणि परिस्थितीवर नियंत्रण मिळविण्यासाठी ‘वॉर रूम’ची भूमिका महत्त्वाची राहणार आहे. मात्र, ही वॉर रूम केवळ कोरोनापुरतीच मर्यादित राहणार नसून ‘कोरोना’चे संकट गेल्यानंतरही भविष्यात मनपाची आरोग्य यंत्रणा अधिक सुदृढ आणि सक्षम होण्याच्या दृष्टीने ‘वॉर रूम’ कार्य करेल. ही वॉर रूम नेहमीकरिता राहणार असल्याचे त्यांनी सांगितले
Makar Sankranti Wishes : Makara Sankranti (Sankranthi) is a Hindu festival that encourages people to live in peace and harmony. Here are best quotes,...