मास्क लावल्याशिवाय घराबाहेर पडू नका !

Date:

नागपूर: जीवनावश्यक वस्तू तसेच अन्य अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर पडताना मास्क वापरूनच जावे. मास्क लावल्याशिवाय कुणीही घराबाहेर पडू नका, असे आवाहन मनपा आयुक्त श्री. तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

यासंबंधी एक व्हीडिओ संदेश आयुक्तांनी जारी केला आहे. यामध्ये मनपा आयुक्तांनी कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे नागरिकांना १०० टक्के लॉकडाऊन पाळण्याचे आवाहन केले आहे. केवळ लॉकडाऊनचे पालन केल्यानेच आपण या संक्रमणापासून स्वत:चा बचाव करू शकतो.

मनपा आयुक्तांनी वाढविले आरोग्य कर्मचाऱ्यांचे मनोबल सर्वेक्षण करणाऱ्या कर्मचाऱ्यांची घेतली भेट : काळजी घेण्याचा दिला प्रेमळ सल्ला

जीवनावश्यक वस्तुंसाठी नागरिकांना घराबाहेर पडावे लागू नये म्हणून प्रशासनाने या वस्तू घरपोच मिळण्याचा प्रयत्न केला आहे. तथापी नागरिकांना या वस्तुंसाठी किंवा अन्य अत्यावश्यक कामासाठी घराबाहेर पडायचे झाल्यास त्यांनी मास्क लावूनच बाहेर निघावे. वापरण्यात येणारा मास्क हा विकतच घेतला पाहिजे असे नाही. तर हा मास्क आपल्याला घरच्या घरी देखील सुती कापडापासून तयार करता येईल. घरच्या घरी मास्क तयार करण्याची कृती ‘मास्क इंडिया डॉट कॉम’ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असेही आयुक्तांनी सांगितले.

Also Read- ना. नितीन गडकरी ७ एप्रिलला घेणार कोरोनासंदर्भात जिल्ह्याचा आढावा

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

Jallianwala Bagh Massacre: 105 Years of Tragedy

Back on April 13, 1919, something tragic happened in...

Celebrate Bhimrao Ramji Ambedkar Jayanti Day 2024

Each year, April 14th in India is a time...

BMW Group India Announced the Appointment of Gallops Autohaus as Its Dealer Partner for Nagpur.

After successful operations in Nagpur since 2014, Munich Motors...