नागपूर,ता.११: नागपूर महानगरपालिका हद्दीतील गांधी-महाल झोन अंतर्गत येणा-या बैरागीपुरा प्रभाग क्रमांक २२ येथे कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात होउ नये म्हणून नागरिकांची सुरक्षा लक्षात घेता हा संपूर्ण परिसर सील करण्याचे आदेश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत.
या आदेशानुसार गांधी-महाल झोन क्रमांक ६ आणि सतरंजीपुरा झोन क्रमांक ७ अंतर्गत असलेल्या प्रभाग क्रमांक २१ व २२च्या उत्तर-पूर्वेस ए.एम.ए. कंपनी मालधक्का रोड, दक्षिण-पूर्वेस उमिया शंकर शाळा, दक्षिण-पश्चीमेस मासुरकर चौक, उत्तर-पश्चीमेस होटल मदिना, पूर्वेस बोधीसत्व बौद्ध विहार, प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत. या भागात येणारे व जाणारे सर्व मार्ग तात्काळ बंद करून या भागाच्या सीमा आवागमनासाठी पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात येत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
शासकीय व निमशासकीय सेवेतील अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी, आवश्यक तातडीची वैद्यकीय कारणे तसेच अंत्यविधी, वैद्यकीय सेवेशी संबंधित खाजगी डॉक्टर, परिचारीका, मेडीकल स्टोअर्स दुकानदार, पॅथॉलॉजिस्ट, रुग्णवाहिका, पोलिस विभागामार्फत पासधारक असलेले जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे व्यक्ती यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे.
नवी दिल्ली :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील लॉक डाउन वाढवण्याची तयारी दर्शवली असल्याची माहिती मिळत असून ३० एप्रिलपर्यंत निर्बंध लागू राहतील अशी शक्यता आहे. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्याला आर्थिक मदत दिली जावी, अशी मागणी नरेंद्र मोदींकडे केली असल्याचंही कळत आहे.
सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी जवळपास तशीच तयारी दाखवली आहे. जागतिक आरोग्य संघटेनेने अचानक लॉक डाऊन शिथिल करणे हे धोकादायक ठरू शकेल, असा इशारा दिला आहे. महाराष्ट्रात देशात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आहेत.मुंबई शहरात ही संख्या वाढत आहे. त्यामुळे महाराष्ट्रात लॉक डाऊन वाढेल, असा अंदाज व्यक्त होत होता. तशीच मागणी ठाकरे यांनी आज मोदी यांच्याकडे केली.
राज्यातील कोरोना बाधितांची संख्या झपाट्याने वाढत असून शुक्रवारी राज्यात 210 नवीन रुग्णांचे निदान झाले आहे. त्यामुळे राज्यातील एकूण रुग्णांची संख्या एक हजार 574 वर जाऊन पोचली असल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य विभागाने दिली आहे.
त्याशिवाय राज्यात गेल्या चोवीस तासांमध्ये 13 रुग्णांचा मृत्यू झाला. दरम्यान, आतापर्यंत राज्यात 188 बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. राज्यात मृत्यू झालेल्या रुग्णांमध्ये मुंबई येथील दहा, तर पुण्यातील एका रुग्णाचा समावेश आहे. आज झालेल्या 13 मृत्यूपैकी 6 जण हे 60 वर्षांवरील आहेत, तर 5 रुग्ण हे वय 40 ते 60 वर्षे या वयोगटातील आहेत;
तर दोघेजण 40 वर्षांपेक्षा लहान आहेत. मृत्युमुखी पडलेल्या 11 रुग्णांमध्ये (85 %) मधुमेह, उच्च रक्तदाब, अस्थमा, हृदयरोग अशा स्वरूपाचे अतिजोखमीचे आजार आढळले आहेत. कोरोनामुळे राज्यात झालेल्या मृत्यींची संख्या आता 110 झाली आहे.
आजपर्यंत तपासणीसाठी पाठवण्यात आलेल्या 33093 नमुन्यांपैकी 30477 जणांचे नमुने निगेटिव्ह आले आहेत; तर 1574 जण पॉझिटिव्ह आले आहेत. आतापर्यंत 188 कोरोनाबाधित रुग्णांना बरे झाल्यानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आले आहे. सध्या राज्यात 38927 व्यक्ती घरगुती विलगीकरण असून 4738 जण संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
राज्यातील ज्या भागात रुग्णांचे क्लस्टर सापडले आहेत, त्या ठिकाणी केंद्र सरकारच्या मार्गदर्शनानुसार क्लस्टर कंटेन्मेंट कृतियोजना अमलात आणण्यात येत आहे. राज्यात या प्रकारे एकूण चार हजार 374 सर्वेक्षण पथके काम करत असून त्यांनी साडेसोळा लाखांहून अधिक लोकांचे सर्वेक्षण करण्यात आले आहे.
April 2020- In probably the first initiative of it’s kind, young and upcoming chess players from across the country devised a unique way to promote their sport, as well as raise money for the PMCares fund simultaneously.
1 International Grandmasters , 7 International masters, many National Chess Champions , Chess players and enthusiasts, have come together to host an online chess tournament under the aegis of “The Chesster group” on 7th April 20 .
Thrown open to chess enthusiasts across the country, there was no participation fee. However, participants were requested to donate to the PMCares fund which is raising money to combat the COVID 2019 pandemic, send a screenshot of it to the organizers – and play on !
The tournament got an enthusiastic response from Chess players across the country (Mumbai , Noida , Nagpur , Hyderabad etc) and has seen interest and donations come in from the Immortal Chess Forum ( a Global Chess Forum ) amongst others. The tournament was hosted on www.Lichess.org ( a global Not for profit chess platform created to promote chess.)
More than 60 people across chess players and enthusiasts have contributed Rs 105,000/- to the cause. Speaking on the occasion, Vedant Panesar ( Age 16 yrs , U 17 National Chess Champion , 2018), Adarsh Tripathi & Yash Srivastava (Age 14 & 17 , International rated chess players ) , the organisers who ideated this said “We hoped to raise as much as possible and contribute in our small way to our prime minister’s cause. It has been gratifying that well wishers across the globe helped us in our endeavor.”
Vakil Akhtar , their Chess Coach added that he was extremely proud of the initiative taken by his students to use Chess to raise money for a noble cause.
Over 80 people participated in the tournament and IM Ravi Teja from Hyderabad, Telangana won the tournament. Prizes were given to around 20 players , which was contributed from the pocket money of the teenage organisers.
नागपूर:सतरंजीपुरा परिसरात करोनाबाधिताचा मृत्यू व इतर सहाजण पॉझिटिव्ह आढळल्याचा पार्श्वभूमीवर इतवारी बाजारपेठेत खबरदारीची उपाययोजना करण्यात आली आहे. या बाजारात खरेदीसाठी दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात झुंबड उडत होती. शिवाय, या दोन्ही परिसरांतील छोट्या-मोठ्या गल्ल्यांतूनही गर्दी वाढत असल्याने परिसरातील व्यापारी, नागरिकांनी पुढाकार घेत परिसर सील केला. पोलिसांना याबाबत विनंती करण्यात आली.
मनपाच्या आरोग्य विभागाने गुरुवारी रात्रीच या परिसरात सर्वेक्षण करीत फवारणी व निर्जंतुकीकरणही केले. शहरातील सर्वात मोठी बाजारपेठ असल्याने या भागात जीवनावश्यक वस्तू खरेदीसाठी गर्दी कमी होत नव्हती. रस्त्यांवर असलेल्या पोलिसांनाही गर्दी जुमानत नव्हती. त्यातच करोनाचे रुग्ण वाढल्याने बाजारपेठेत भीतीचे वातावरण वाढले.
त्यामुळे या भागातील नागरिकांनी पुढाकार घेतला. येथील नगरसेविका आभा पांडे व इतरांनी पोलिसांकडे गल्लीतील रस्ताही बंद करण्याची विनंती केली. अनेकांनी स्वत:हून गल्लीतील रस्ता बंद केला. बाजारपेठेतील व्यापाऱ्यांनी सुरक्षेच्या कारणास्तव यास सहमती दर्शविली. त्यांनी या परिसराला सील करण्याची विनंती केली. केवळ आरोग्य विभागाचे कर्मचारी तेवढे परिसरात सर्वेक्षणासाठी फिरताना दिसत आहे.
इतवारी, सतरंजीपुरा, दलालपुरा, नेहरू पुतळा परिसर, तेलीपुरा, मस्कासाथ, परवारपुरा, इतवारी मिरची बाजार व आसपासच्या परिसरातून जाणाऱ्या छोट्या-मोठ्या रस्त्यांवर बॅरिकेड्स ठेवण्यात आले. अनेक गल्ल्यांमध्ये तर आडवे दांडे बांण्यात आले. कुठल्याही दुचाकींना गल्लीतून जाण्यास मज्जाव करण्यात आला आहे.
संशयित मोकाट फिरत असल्याची तक्रार
सतरंजीपुरा भागातील करोनाने मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या संपर्कात आलेली एक व्यक्ती परिसरात मोकाट फिरत असल्याची तक्रार मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्याकडे करण्यात आली. ही व्यक्ती दलालपुरा भागातील असून, ती मृत व्यक्तीला घरी व मेयोतही जाऊन भेटल्याची माहिती देण्यात आली आहे. आता या व्यक्तीचा शोध घेण्यात येत आहे.
नागपूर :बुटीबोरी औद्योगिक वसाहतीमधील फार्मास्युटिकल युनिट इन्व्हेंटिस रिसर्च कंपनी प्रा.लि. या कंपनीत प्राणघातक कोरोना विषाणूविरुद्ध प्रभावी औषध म्हणून ‘फ्लाविपिरॅव्हिर’ या नावाच्या जपानी औषधावर क्लिनिकल चाचण्या घेण्यात येत आहेत.
इन्व्हेंटिस रिसर्चचे मुख्य व्यवस्थापकीय संचालक डॉ. दीपक बी. बिरेवार यांनी गुरुवारी ही माहिती दिली. मूळचे हे औषध जपानच्या फुजी केमिकल इंडस्ट्रीज कंपनी लिमिटेडने तयार केले आहे आणि अनेक प्रकारच्या ‘एन्फ्लुएन्झा’ प्रकारच्या आजारांवर प्रभावी असल्याचे डॉ. बिरेवार यांनी सांगितले. व्यावसायिक कारणासाठी कंपनीला या चाचण्या आयोजित करण्यासाठी फुजी केमिकल इंडस्ट्रीजची परवानगी मिळाली नाही. पण जर आम्ही चाचण्यात यशस्वी ठरलो तर आपोआपच परवानगी मिळेल, असे डॉ. बिरेवार यांनी आत्मविश्वासाने सांगितले.
फ्लाविपिरॅव्हिर’ एक सक्रिय फार्मास्युटिकल घटक (एपीआय) किंवा बल्क ड्रग फुजी केमिकल इंडस्ट्रीजने विकसित केले आहे. कोरोना विषाणूविरुद्ध प्रभावी मानले जाणारे जगप्रसिद्ध औषध ‘हायड्रोक्सीक्लोरोक्विन’ तयार करण्याचा कंपनी ‘फ्लाविपिरॅव्हिर’ सोबत प्रयत्न करीत आहे. भारतामध्ये दररोज २० ते ३० लाख गोळ्या ‘हायड्रोक्सीक्लोरोक्विन’ तयार करण्याची क्षमता आहे, पण सध्याच्या परिस्थितीत ही क्षमता कमी पडत आहे. बिरेवार म्हणाले, सरकारने ‘हायड्रोक्सीक्लोरोक्विन’ औषधावरील निर्यात बंदीदेखील काढून टाकली आहे. त्यामुळे या औषधाची निर्यात क्षमता वाढली आहे. आम्ही जवळपास एका महिन्यात ‘हायड्रोक्सीक्लोरोक्विन’ आणि पुढील अडीच महिन्यात ‘फ्लाविपिरॅव्हिर’ विकसित करण्याची योजना आखली आहे, असेही ते आत्मविश्वासाने म्हणाले.
इन्व्हेंटिस रिसर्च ही चंद्रपूर आधारित मल्टी आर्गेनिक्स प्रायव्हेट लिमिटेडची उपकंपनी असून सन १९७६ मध्ये बाबूराव व्ही. बिरेवार यांनी स्थापन केली. कंपनी अजूनही शेती, फार्मास्युटिकल्स, औषधे, प्लास्टिक आणि इतर अनेक क्षेत्रांसाठी आवश्यक औषधे आणि सेंद्रीय रसायने तयार करते. इन्व्हेंटिस कंपनीची स्थापना डॉ. दीपक बिरेवार यांनी सन २०१४ मध्ये केली होती आणि कंपनीचे कामकाज संपूर्ण भारतात १०० कोटी रुपयांपेक्षा जास्त उलाढालीने सुरू आहे. कंपनीने २०१५ मध्ये फार्मा स्टार्टअपचा ईटी पुरस्कारही जिंकला आहे.
नागपूर :कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्कचा तुटवडा भासू नये, यासाठी मोठ्या प्रमाणावर मास्क निर्मिती करण्याचे उद्दिष्ट ठेवून कारागृहातील बंदीजनांकडून, तसेच महिला बचत गटांकडूनही मास्कनिर्मिती करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यानुसार जिल्ह्यात ५७ बचत गटांच्या माध्यमातून आतापर्यंत ३६ हजाराच्यावर मास्कची निर्मिती करण्यात आली आहे. सदर मास्क हे माफक दरात उपलब्ध करून दिले जात असून योग्य रितीने स्वच्छ करून पुनर्वापर करण्याच्या योग्यतेचे आहेत. याद्वारे महिला बचत गटाला रोजगारही उपलब्ध होत असून जनतेसाठी माफक दरात व उच्च गुणवत्तेचे मास्क उपलब्ध होत आहेत.
कोरोना करीता उमेद अभियान
उमेद अभियानाच्या माध्यमातून ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये आरोग्यविषयक जागरूकता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात आहे. बचत गटातील महिला ग्रामस्तरीय कोरोना नियंत्रण व स्वच्छता समितीमार्फत गावामध्ये कोरोना प्रतिबंधात्मक उपाययोजनेमध्ये हातभार लावत आहेत. त्याबरोबरच मास्कची निर्मिती करून कोरोनाविरोधातील शस्त्र जनतेला उपलब्ध करून देत आहेत, असे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमोल येडगे यांनी सांगितले. उमेद अभियानातील बचत गटांना मास्क तयार करण्याबाबत योग्य मार्गदर्शन जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा अमरावती मार्फत देण्यात आलेले आहे.
यातून मोठ्या प्रमाणात ग्रामीण भागातील बचत गट महिला मास्क तयार करत आहेत. जिल्हा परिषद, पंचायत समिती, जिल्ह्यातील इतर शासकीय कार्यालये यांच्याकडून बचत गटांनी तयार केलेल्या मास्कची खरेदी करण्यात येत आहे. पंचायत समिती चिखलदरामार्फत रोजगार हमी योजनेमध्ये काम करणाऱ्या मजुरांसाठी मास्क वाटप करण्यासाठी बचत गटांकडे मागणी करण्यात आली आहे.
तसेच ग्रामपंचायत १४व्या वित्त आयोगातील अनुदानातून कोरोना प्रतिबंधात्मक उपाय योजनेअंतर्गत बचत गटांकडून मास्कची खरेदी करत आहेत. गटातील महिला देखील गावातील नागरिकांना मास्क वापरण्यासाठी प्रेरित करीत आहे. विविध गावातील ग्रामसंघाद्वारे सुध्दा गरजूंना मोफत मास्कचे वितरण करण्यात आले आहे. आतापर्यंत बचत गटातील महिलांनी ३६ हजारांच्या वर मास्क तयार केले असून यामधून ४ लक्ष ८० हजारची विक्री करण्यात आली आहे.
कोरोना विरोधातील लढाईत सहभागाचे समाधान
मेळघाटातील चिखलदरा येथील उमेदच्या अध्यक्षा मंगला बारस्कर यांनी सांगितले की, स्वयं सहायता समूहातील महिलांच्या सहकार्याने आतापर्यंत तीन हजार १०० मास्कची विक्री केली आहे. शासकीय कार्यालये, ग्रामपंचायत, तसेच ग्रामस्थांकडून स्वयंसहायता समूह निर्मित मास्कला चांगली मागणी आहे. यातून रोजगार उपलब्ध झालेला आहे, तसेच लोकांच्या आरोग्य संरक्षणाचे कामही करता येत असल्याने करोना विरोधातील लढाईमध्ये समाविष्ट झाल्याचे समाधान मिळत आहे.
नागपूर: वातावरणातील बदल आणि त्यामुळे उद्भवणारे आजार यामुळे अनेकांच्या मनात धास्ती निर्माण झाली आहे. या गोष्टीची दखल घेत मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पुढाकारानुसार नागपूर महानगरपालिकेतर्फे दहाही झोनमध्ये १० ‘फिवर क्लिनिक’ सुरू करण्यात आले आहेत. या ‘फिवर क्लिनिक’ मध्ये तज्ज्ञ डॉक्टरांद्वारे नि:शुल्क तपासणी व उपचार केले जाणार आहे.
वातावरणातील बदलामुळे ताप, सर्दी, खोकल्याने अनेक जण त्रस्त आहेत. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अशी लक्षणे दिसल्याने आधीच धडकी भरते. अशा किरकोळ स्वरूपाच्या आजारांच्या तपासणीकरीता व त्यावरील उपचाराकरीता मनपातर्फे प्रत्येक झोनमध्ये एक याप्रमाणे संपूर्ण शहरात १० ‘फिवर क्लिनिक’ सुरू केले आहेत. संबंधित झोनमधील मनपाच्या नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये हे ‘फिवर क्लिनिक’ सुरू झाले आहेत. लक्ष्मीनगर झोनमध्ये जयताळा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, धरमपेठ झोनमधील के.टी.नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, हनुमान नगर झोनमधील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, धंतोली झोनमधील नरसाळा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, नेहरूनगर झोनमधील नंदनवन नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, गांधीबाग झोनमधील मोमीनपूरा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, सतरंजीपुरा झोनमधील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, लकडगंज झोनमधील पारडी नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, आसीनगर झोनमधील कपील नगर नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र, मंगळवारी झोनमधील इंदोरा नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे ‘फिवर क्लिनिक’ नागरिकांच्या सेवेत सुरू करण्यात आले आहेत.
या ‘फिवर क्लिनिक’मध्ये एक एमबीबीएस डॉक्टर, एक परिचारिका, फॉर्मसिस्ट, पॅथॉलॉजिस्ट सेवा देतील. सकाळी ८ ते दुपारी ४ या वेळेमध्ये नागरिकांना नि:शुल्क सेवा देण्यात येईल. ‘फिवर क्लिनिक’मध्ये रुग्णावर आवश्यक उपचार केले जाईल. आवश्यकता असल्यास त्याच्या रक्ताचे नमूने घेतले जातील, आवश्यक औषधेही देण्यात येतील. याशिवाय तिव्र स्वरूपाचे ताप व अन्य लक्षणे दिसून आल्यास तातडीने त्याला पुढील तपासणीकरीता पाठविण्यात येईल.
याव्यतिरिक्त ज्या नागरिकांना खासगी रुग्णालयामध्ये तपासणी करायची असेल त्यांना मनपाद्वारे नोंदणीकृत खासगी रुग्णालय व हॉस्पिटलमध्ये जाउन तपासणी करता येईल. यासंबंधी मनपाद्वारे सर्व खासगी रुग्णालय तथा हॉस्पिटलना सेवा पुरविण्याचे निर्देश दिले आहेत.
‘फिवर क्लिनिक’ सुरू करण्यात आलेले नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र
नागपूर:लॉक डाऊन मुळे हातावर पोट असणाऱ्या नागरिकांवर उपासमारीची वेळ आली आहे त्यांच्या परिवारावर गंभीर संकट आलेले आहे. अशा परिस्थितीत सामाजिक बांधिलकीची जाणं ठेऊन बेझनबाग इंदोरा मित्र परिवार व युवा भीम मैत्री संघ गोर गरीब कामगार व मोलकरणी यांचे मदतीला सरसावली आहे.
उपरोक्त सेवाभावी सामाजिक संस्थे तर्फे उत्तर नागपुरातील हात मजुरी व गरीब नागरिकांची यादी तयार करून समता नगर, नारी, इटभट्टी परिसर, निर्मल कॅलोणी, चंद्रिकापुरे नगर, इंदोरा, लिंबूनी नगर आदी परिसरात राहणाऱ्या मोलमजुरी करणाऱ्या नागरिकांना तेलाचे पाकीट, चना डाळ चना, वाटाणे, डाळ, पोहे,साखर,चायपत्ती,मिरची पावडर,हळद,मसाला पाकीट, मीठ पाकीट सोयाबीनवडी आदी खाद्यपदार्थांचे पॉकेट मोठया प्रमाणात तयार करून वाटप करण्यात आले हे वाटप संघटनेचे पदाधिकारी सर्वश्री अशोक कोल्हटकर प्रदीप बनसोड, जितू बनसोड, दीपक बवानगडे, संघपाल उपरे, डॉ अनमोल टेम्भुरने, हितेश उके, नागसेन फुलझले, राजेश रायपूरे, निशांतनागदिवे, राजेन्द्र कांबळे, धम्मपाल लांजेवार, प्रशांत भिवंगडे, बबलू माहुरे, पपु ठवरे, भारती डोंगरे, अमिताभ मेश्राम आदींच्या मार्गदर्शनाथ वाटप करण्यात आले या कार्यात जरीपटका पोलीस स्टेशन चे पोलिस मित्रांनी सहकार्य केले या नंतर असा उपक्रम चार टप्यात राबविण्याचे येणार आहे.
नागपूर: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन दरम्यान शहरात अडकलेली कोणतिही व्यक्ती उपाशी राहू नये यासाठी नागपूर महानगरपालिकेने गरजूंना जेवण पोहोचविण्याची जबाबदारी स्वीकारली आहे. मनपाच्या या कार्यात आतापर्यंत ५० स्वयंसेवी संस्थांनीही सहकार्य दिले आहे. या सेवा कार्याची गती वाढवून जास्तीत जास्त गरजूंना लाभ मिळावा यासाठी शुक्रवारी (ता.१०) मनपा मुख्यालयामध्ये ‘फूड झोन’ तयार करण्यात आले आहे. या ‘फूड झोन’ मध्ये मनपाच्या कर विभागाच्या महिला कर्मचारी जेवण पॅकिंगचे काम करीत आहेत तर पुरूष कर्मचा-यांमार्फत हे जेवण गरजूंपर्यंत पोहोचविले जात आहे. शुक्रवारी (ता.१०) पहिल्याच दिवशी एक हजार गरजूंपर्यंत अन्न पोहोचविण्यात आले आहे.
मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या मार्गदर्शनात मनपातर्फे विविध स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून शहरातील बेघर, निराधार व्यक्तींची भोजन व्यवस्था केली जात आहे. या कार्यासाठी प्रभारी उपायुक्त मिलींद मेश्राम यांच्या नेतृत्त्वात मनपाची संपूर्ण चमू कार्यरत आहे.
मनपा मुख्यालतील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील दुस-या माळ्यावर मनपातर्फे ‘फूड झोन’ तयार करण्यात आले आहे. मनपाच्या स्थानिक संस्था कर आणि मालमत्ता कर विभागाचे ८० कर्मचारी बेघर, निराधार, गरजूंना जेवण मिळावे यासाठी कार्य करीत आहेत. सर्व कर्मचारी टप्प्याटप्प्याने ‘सोशन डिस्टसिंग’चे पालन करीत सेवाकार्य करीत आहेत. या कार्यासाठी दोन स्वयंसेवी संस्थाही पुढे आल्या आहेत. लॉकडाउन दरम्यान कुणीही उपाशी राहू नये याकरिता स्वामी नारायण मंदिर संस्थेतर्फे मनपाला पोळ्यांची तर रतन पॅलेस गणेशपेठ सोसायटी या संस्थेतर्फे भाजीची व्यवस्था करून देण्यात आली आहे. दोन्ही संस्थांकडून दररोज येणारे जेवण मनपाच्या ‘फूड झोन’मध्ये स्थानिक संस्था कर व मालमत्ता कर विभागाच्या महिला कर्मचा-यांकडून पॅक केले जाते. पॅक झालेले जेवणाचे डबे दोन्ही विभागाचे पुरूष कर्मचारी गरजूंपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करतात. शुक्रवारी (ता.१०) पहिल्याच दिवशी सर्व कर्मचा-यांतर्फे एक हजार जेवणाचे डबे तयार करण्यात आले व ते गरजूंपर्यंत पोहोचविण्यात आले आहेत.
गरजूंनी मनपाशी संपर्क साधा
निराधार, बेघर व ज्यांच्याकडे जेवणाची सुविधा नाही अशा व्यक्तींकरीता मनपाद्वारे संपर्क क्रमांक जाहीर करण्यात आला आहे. ज्यांची दोन वेळच्या जेवणाची व्यवस्था होउ शकत नाही, अशा गरजू व्यक्तींनी ०७१२-२५३९००४, ९४२२६४११०१, ७०२८०३३८७२, ९८२३३३०९३४ या क्रमांकांवर संपर्क साधावा, असे आवाहनही मनपातर्फे करण्यात आले आहे.
नागपूर: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे शनिवारी (ता.११) फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून नागरिकांशी संवाद साधणार आहेत. दुपारी २ वाजता आयुक्त फेसबुक लाईव्ह येतील. नागरिकांनी कोविड-१९ म्हणजे कोरोना संदर्भातील आपल्या काही शंका, अडचणी, तक्रारी अथवा प्रश्न फेसबुक लाईव्हद्वारे विचारावे, असे आवाहन मनपातर्फे करण्यात येत आहेत.
मनपा आयुक्तांशी फेसबुक लाईव्हद्वारे संवाद साधण्यासाठी @ShriTukaramMundhe या मनपा आयुक्तांच्या फेसबुक अकाउंटशी कनेक्ट होता येईल. यासोबतच @nmcngp या नागपूर महानगरपालिकेच्या अधिकृत फेसबुक पेजवरून आणि @smartcitynagpur या स्मार्ट सिटीच्या फेसबुक पेजवरूनही संवाद साधता येईल, नागरिकांनी कोव्हिड-१९ संदर्भात प्रशासनातर्फे होत असलेल्या उपाययोजना, अंमलबजावणी आणि मदतीसंदर्भात प्रश्न इनबॉक्सच्या माध्यमातून विचारावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
नागपूर: दिल्लीवरून आल्यानंतर कोविड-१९ पॉझिटिव्ह ठरलेला नागपुरातील पाचवा रुग्ण आज पूर्णपणे बरा होउन घरी परतला. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या कोरोना कक्षातून बाहेर पडल्यानंतर तेथील वैद्यकीय अधिकारी व परिचारिकांनी त्यांचे टाळ्या वाजवून अभिनंदन केले आणि तेथून निरोप दिला.
नागपूर शहरासाठी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आजचा दिवस सकारात्मक ठरला. १७ मार्च रोजी दिल्ली येथून परतलेले खामला येथील ४२ वर्षीय व्यक्तीला २२ मार्च रोजी अस्वस्थ वाटू लागले. प्राथमिक उपचारानंतरही त्यांच्या प्रकृतीत सुधारणा दिसली नसल्याने २५ मार्च रोजी ते इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात चाचणीसाठी गेले. त्यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करून घेत त्यांचे ‘स्वॅब’ चाचणीकरीता पाठविण्यात आले होते. २६ मार्च ला प्राप्त चाचणी अहवालानुसार त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे निष्पन्न झाले.
तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीत त्यांच्यावर उपचार सुरू झाले. १४ दिवसांच्या ‘हॉस्पिटल कॉरंटाईन’ दरम्यान वेळोवेळी त्यांचे ’स्वॅब’ घेण्यात आले. त्यांच्या तीनही चाचण्या निगेटिव्ह आल्यानंतर त्यांना शुक्रवारी (ता.१०) घरी पाठविण्यात आले. यावेळी उपस्थित वैद्यकीय उपअधीक्षक डॉ.सागर पांडे यांच्यासह उपस्थित परिचारिका व रुग्णालय कर्मचा-यांनी त्यांचे टाळ्या वाजवून अभिनंदन केले.
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाचे वैद्यकीय उपअधीक्षक डॉ. सागर पांडे यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, खामला येथील कोरोनाबाधीत असलेले रुग्ण पूर्णत: बरे झाले असून ते आता सुदृढ आहेत. मधुमेहाचा त्रास असतानाही त्यांनी उपचाराला दिलेली साथ, रुग्णालय प्रशासनाने घेतलेली काळजी आणि शासनाच्या दिशानिर्देशानुसार केलेल्या उपचारामुळे हे शक्य झाले आहे. मात्र पुढील १४ दिवस त्यांना ‘होम क्वारंटाईन’ राहणे बंधनकारक आहे. या रुग्णाला सुट्टी मिळाल्यानंतर आता मेयो रुग्णालयात केवळ आठ रुग्ण असून या रुग्णाच्या संपर्कात आलेले इतर रुग्णही बरे झाले असून त्यांना शनिवारी सुट्टी होण्याची शक्यता आहे.
रुग्णाने मानले आभार
पूर्णपणे बरे होउन घरी परतलेले खामला येथील रुग्ण यांनी कोरोनाशी लढा देणा-या आणि त्यांच्यावर उपचार करणा-या डॉक्टरांचे तसेच संपूर्ण रुग्णालय कर्मचा-यांचे आभार मानले. जिल्हा प्रशासन, नागपूर महानगरपालिका प्रशासन आणि पोलिस प्रशासनाने जे सहकार्य केले त्याबद्दलही त्यांनी भावनिक होउन आभार मानले. कोणत्याही नागरिकाला कोरोनाची लक्षणे आढळल्यास घाबरण्याचे काहीही कारण नाही. वेळीच उपचार घ्या, प्रशासनाला सहकार्य करा आणि घरी बसून एकत्रितपणे कोरोनाविरुद्ध लढा, असे आवाहनही त्यांनी केले.
बुलडाणा:गुरुवारी एकाच दिवशी पुन्हा पाच संशयितांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने जिल्ह्यातील बाधितांचा आकडा १७वर पोहोचला आहे. एकाच दिवशी रुग्णांच्या संख्येत पाचने वाढ झाल्याने नागरिकांसह आरोग्य यंत्रणेतही चिंतेचे वातावरण दिसून आले. बाधितांत शेगाव येथील दोन व खामगाव येथील एक, देऊळगाव राजामधील एक तर मलकापूरमधील एका रुग्णाचा समावेश आहे, अशी माहिती जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रेमचंद्र पंडित यांनी दिली. दिल्ली कनेक्शनमुळे जिल्ह्यातील करोना बाधितांचा आकडा तिप्पट झाला आहे. दरम्यान, बुधवारपर्यंत आयसोलेशनमध्ये दाखल असलेल्या ११ बाधितांवर आरोग्य यंत्रणा विशेष लक्ष ठेवून आहे.
जिल्ह्यातील करोनाबाधितांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून दुहेरी आकड्यात जाऊन पोहोचल्याने नागरिकांत काहिसे चिंतेचे वातावरण आहे. त्यातच जिल्ह्यात एका बाधिताच्या मृत्यूची नोंद झाली आहे. दिल्लीच्या निजामुद्दीन परिसरातील मरकजमधून जिल्ह्यात परतलेल्या आणि त्यांच्या संपर्कातील आणखी काही हायरिस्क असलेले नमुने नागपूरला तपासणीसाठी पाठविण्यात येत आहेत. यात ५ एप्रिल रोजी चार जण एकाच दिवशी पॉझिटिव्ह आढळले होते. त्यानंतर ६ एप्रिल रोजी दोन, ८ एप्रिल रोजी एक आणि गुरुवारी पुन्हा पाच संशयितांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह प्राप्त झाले आहेत.
बुधवारी संशयीतांचे ४४ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले होते. त्यापैकी गुरुवारी ३२ नमुन्यांचे रिपोर्ट प्राप्त झाले असून २७ जण निगेटिव्ह तर ५ जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. गुरुवारी पुन्हा प्रयोगशाळेत १३ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत.
आयसोलेशनमध्ये २५ जण
जिल्ह्यातील रुग्ण संख्या वाढत असून संशयितांच्या संख्येतदेखील त्यामुळे वाढ होत आहे. आयसोलेशन कक्षात सध्या २५ व्यक्ती दाखल असून त्यामध्ये खामगाव येथील ५, शेगांवमधील ९ व बुलडाण्यातील ११ व्यक्तींचा समावेश आहे. आतापर्यंत प्रयोगशाळेत जिल्ह्यातून एकूण १८२ नमुने पाठविण्यात आले आहेत. त्यापैकी १५७ नमुन्यांचे रिपोर्ट प्राप्त झाले आहेत. त्यामध्ये १७ पॉझिटिव्ह व १४० रिपोर्ट निगेटिव्ह प्राप्त झाले आहेत. २५ नमुन्यांच्या अहवालाची प्रतीक्षा आहे, अशी माहिती अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सांगळे यांनी दिली.
वाशिंगटन:अमेरिका में कोविड-19 से कम से कम 11 भारतीयों की मौत हो गई है, जबकि 16 और लोगों के संक्रमित होने की पुष्टि हुई है. कोरोना वायरस से संक्रमित होने के कारण अमेरिका में अब तक 14,000 से अधिक लोगों की मौत हो चुकी है, जबकि चार लाख से अधिक लोग संक्रमित हैं. अमेरिका में घातक संक्रमण से जिन भारतीय नागरिकों की मौत हुई है, वे सभी पुरुष हैं, जिनमें से दस न्यूयॉर्क और न्यूजर्सी क्षेत्र से हैं. मृतकों में से चार न्यूयॉर्क शहर में टैक्सी चालक बताए जा रहे हैं. फ्लोरिडा में एक भारतीय नागरिक की कथित तौर पर कोरोनावायरस के कारण मौत हो गई. कैलिफोर्निया और टेक्सास राज्यों में अधिकारी कुछ अन्य भारतीय मूल के लोगों की राष्ट्रीयता का भी पता लगा रहे हैं.
इसके अलावा चार महिलाओं सहित 16 भारतीय को कोरोना वायरस से संक्रमित पाया गया है और सभी पृथक वास में रह रहे हैं. उनमें से आठ न्यूयॉर्क से, तीन न्यूजर्सी से और बाकी टेक्सास और कैलिफोर्निया जैसे राज्यों से हैं. ये भारतीय उत्तराखंड, महाराष्ट्र, कर्नाटक और उत्तर प्रदेश जैसे राज्यों के रहने वाले हैं. कोविड-19 से प्रभावित भारतीय नागरिकों और छात्रों को आवश्यक सहायता प्रदान करने के लिए भारतीय दूतावास और अमेरिका भर में स्थित वाणिज्य दूतावास स्थानीय अधिकारियों और भारतीय-अमेरिकी संगठनों के साथ मिलकर काम कर रहे हैं.
नागपूर :गेले काही दिवस नागपुरात स्थिर असलेल्या कोरोना बाधित रूग्णाच्या संख्येत शुक्रवारी पहाटे ६ ने वाढ झाल्याने प्रशासनाची चिंता वाढली आहे. नागपुरात आता कोरोनाबाधित रूग्णांची संख्या २५ वर पोहोचली आहे. नागपुरातील सतरंजीपूरा येथे कोरोनाची लागण झाल्याने रविवारी दगावलेल्या एका ज्येष्ठ रुग्णाच्या संपर्कात आलेल्या सहा जणांना करोनाची बाधा झाल्याचे शुक्रवारी पहाटे स्पष्ट झाले.
सहा जणांच्या घशातील स्त्रावाच्या नमुन्यांमध्ये कोरोना विषाणूचा अंश आढळला. त्यामुळे नागपुरातील कोरोनाबाधितांची संख्या आता १९ वरून थेट २५ वर पोचली आहे. या सर्वांवर सध्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातल्या वॉर्ड क्रमांक २५ मधील आयसोलेसन वॉर्डात उपचार सुरू आहे. सतरंजीपूरा येथील कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेला ८ ते १२ वर्षे वयोगटातील दोन अल्पवयीन मुले आणि २२ ते ३५ वयोगटातला चार तरुण नातेवाईकांचा समावेश आहे.
नागपूर: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागपूर शहरात लॉकडाऊन सुरू आहे. याच काळात १४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती आहे. या सोहळ्यासाठी दरवर्षी एकत्रित होणारा जनसमुदाय लक्षात घेता ‘कोरोना’चा प्रसार गर्दीतून होऊ नये म्हणून यावर्षी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती समूहाने एकत्रित येऊन सार्वजनिक ठिकाणी साजरी करता येणार नाही. कार्यालय व इतर ठिकाणीही जयंती कार्यक्रमात पाचपेक्षा अधिक लोकं नको आणि ते ही सामाजिक अंतर राखूनच कार्यक्रम घेण्यात यावा, असे आदेश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जारी केले आहे.
सध्या महाराष्ट्रात साथ रोग प्रतिबंधात्मक कायदा लागू असून या कायद्याअंतर्गत दिलेल्या अधिकाराच्या अनुषंगाने मनपा आयुक्तांनी हा आदेश निर्गमित केला आहे. या आदेशानुसार, कोरोना विषाणूचा प्रसार टाळण्यासाठी कोणत्याही प्रकारचे सार्वजनिक कार्यक्रम सार्वजनिक ठिकाणी साजर करण्यास प्रतिबंध घालणे आवश्यक आहे. त्यामुळे १४ एप्रिल रोजी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम लॉकडाऊन कालावधीत दीक्षाभूमी तसेच इतर सार्वजनिक ठिकाणी साजरा करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे. कार्यालयीन ठिकाणी डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचा कार्यक्रम किंवा इतर कोणताही कार्यक्रम साजरा करताना पाच पेक्षा जास्त नसेल इतक्या व्यक्तींच्या उपस्थितीत सामाजिक अंतर ठेवून आणि चेहऱ्यावर त्रिस्तरीय मास्क किंवा कापडी मास्क परिधान करून नियमानुसार साजरा करता येईल, असेही आदेशात नमूद केले आहे.
नागपूर:कोरोनाविरुद्धच्या लढाईत स्वत:चे योद्धा बना. स्वत:ला त्रास करवून घेऊ नका. इतरांना आपल्यामुळे त्रास होणार नाही याची काळजी घ्या. घराबाहेर पडताना मास्क वापरा. सामाजिक अंतर पाळा. घरात प्रवेश करताना हात स्वच्छ धुवा. प्रत्येकाने कोरोनाविरुद्धची लढाई स्वत: योद्धा बनून लढायची आहे, असे भावनिक आवाहन नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले.
नागपूर शहरात कोरोनाचा वाढता प्रसार रोखणे, हे केवळ नागरिकांच्या हाती आहे, असे सांगताना मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागरिकांना शासनाने दिलेल्या निर्देशाचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले आहे. समाजाने एकत्रित येऊन ही लढाई लढणे गरजेचे आहे. प्रत्येकाने योद्धा बनणे गरजेचे आहे. योद्धा बनणे म्हणजे लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करणे होय. अत्यंत आवश्यक असेल तरच घराच्या बाहेर पडावे. घराबाहेर पडताना मास्क लावणे बंधनकारक आहे. आवश्यक कामाने घराबाहेर पडलाच तर लवकरात लवकर घरात यावे. घरात प्रवेश करताना साबणाने हात स्वच्छ धुवावे. हे करणे म्हणजेच योद्धा होय. हे केलं नाही म्हणजे समाजाचे शत्रू बनणे होय. त्यामुळे समाजाचा शत्रू न बनता स्वत:चा आणि समाजाचा योद्धा बना, असे आवाहन त्यांनी समस्त नागपूरकरांना केले आहे.
मास्क वापरणे आता बंधनकारक
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी राज्यात साथ रोग प्रतिबंधक कायदा लागू करण्यात आला आहे. या कायद्यांतर्गत नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी बुधवारी (ता. ८) एक आदेश काढून घरातून बाहेर पडताना मास्क वापरणे आता बंधनकारक केले आहे. या आदेशानुसार शहरातील रस्ते, रुग्णालये, कार्यालये, बाजार इत्यादी सार्वजनिक ठिकाणी कोणत्याही हेतूने वावरणाऱ्या व्यक्तीने, खासगी किंवा कार्यालयीन वाहनाने कुठेही वावरताना तसेच कार्यालय अथवा कामांच्या ठिकाणावर मास्क परिधान करणे बंधनकारक राहील. कोणत्याही व्यक्ती, अधिकाऱ्यांनी मास्क परिधान केल्याशिवाय सभा, बैठकीला उपस्थित राहू नये. प्रमाणित मास्क औषधींच्या दुकानात उपलब्ध असून ते वापरता येतील किंवा घरी बनविलेले मास्कसुद्धा वापरता येतील. व्यवस्थित धुवून आणि निर्जंतुकीकरण केलेले मास्कदेखिल वापरता येतील, असे आदेशात नमूद केले आहे. या आदेशाचे पालन न झाल्यास भारतीय दंड संहितेच्या कलम १८८ अन्वये नागरिक कारवाईस पात्र ठरतील, असेही आदेशात म्हटले आहे. मास्क घरच्या घरी देखील सुती कापडापासून तयार करता येईल. घरच्या घरी मास्क तयार करण्याची कृती ‘मास्क इंडिया डॉट कॉम’ या संकेतस्थळावर उपलब्ध आहे, असेही आयुक्तांनी सांगितले.
नागपूर:“डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती” दिनानिमित्त मंगळवार दिनांक १४ एप्रिल २०२० ला शहरातील कत्तलखाने तसेच मांस विक्रीचे दुकाने बंद ठेवण्याबाबत नागपूर महानगरपालिकेच्या दिनांक २/०९/२०१८ रोजीच्या स्थगित साधारण सभेतील मंजूर ठराव क्र.२४० दिनांक ०२/०८/२०१८ चे मंजुरी नुसार नागपूर शहरातील सर्व कत्तलखाने व मांस विक्रीचे दुकाने बंद ठेवण्याचे निर्णय घेतलेला आहे.
त्यानुसार मंगळवार दिनांक १४ एप्रिल २०२० ला “डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती” दिनानिमित्त नागपूर महानगरपालिका हददीतील सर्व कत्तलखाने व मांस विक्रीची दुकाने बंद राहतील.
जे या आदेशाचे उल्लंघन करतील त्यांच्यावर महानगरपालिकेच्या भरारी पथकाव्दारे कारवाई करण्यात येईल.
As India’s leading Hindi General Entertainment Channel and a responsible broadcaster, Zee TV has always placed its viewers on the highest pedestal over the past 27 years. The channel has provided cutting-edge content and kept its audience entertained through thick and thin. In fact, during this phase of social distancing when people are spending more time at home, Zee TV is all set to spread some cheer and add a dollop of laughter to everyone’s mundane quarantine afternoons by bringing back one of its most loved comedies and family entertainers on public demand. A universal favorite across generations, Hum Paanch will make a mega comeback on television after 15 years, starting from April 13 and it will air Monday to Sunday at 12 Noon, only on Zee TV!
A story of an ordinary yet amusing middle-class family, Hum Paanch revolves around Anand Mathur, his second wife – Bina Mathur and his five daughters, who are constantly plotting plans to turn his world upside down. Adding more chaos and confusion to his life is the photo frame of his late wife, who occasionally talks to him and nags him on certain decisions. The iconic show brought together a stellar cast 25 years ago and each of the characters have been etched in the minds of viewers ever since. The decade-long show had concluded in 2006, but on public demand, Zee TV is all set to bring back the crazy family of Anand Mathur (Ashok Saraf), Bina Mathur (Shoma Anand), Meenakshi Mathur (Vandana Pathak), Radhika Mathur (AmitaNangia and later played by Vidya Balan), Sweety Mathur (Rakhi Vijan), Kajal Mathur (BhairaviRaichura) and Choti (Priyanka Mehra). The audience is in for some fun and frolic and afternoons will never be the same!
Zee TV Business Head Aparna Bhosle said, “In times of uncertainty and stress that the world is currently going through, what audiences are truly looking forward to on television is an escape into happier times and familiar characters that they have all grown up loving over the years. For years now, we have been receiving umpteen requests to revive Hum Paanch or bring back a new season of this cult classic comedy. Through a motley of truly adorable characters brought to life by some remarkably natural actors, the show is a heartwarming depiction of how much fun a typical Indian middle class family can be when they all just let their hair down. Hum Paanch evokes nostalgia amongst anyone who was in front of the television in the 90’s and 2000’s. In fact, 2020 also marks 25 glorious years of Hum Paanch and we believe the best way to pay a tribute to such an iconic show is by letting the audience revisit the whole journey at a time when they need it the most.”
We cannot wait to Pooja Aunty to say, “Aunty Mat Kaho Na” once again!
Revisit the golden era of television as the Mathur family takes you on a journey of comical and entertaining misadventures, starting from April 13th, Monday to Sunday at 12 pm, only on Zee TV!
Delhi:Eicher Group, which comprises Royal Enfield (a unit of Eicher Motors Limited) and VE Commercial Vehicles (a joint venture between the Volvo Group and Eicher Motors Limited), has pledged its commitment and contribution towards aid for the unprecedented crisis caused due to the Coronavirus pandemic outbreak in India. Eicher Group has announced an initial CSR outlay of Rs. Fifty crores towards various immediate relief and support measures, and towards building dedicated COVID-19 care facilities, to tackle the impact of the pandemic. While this is an initial commitment of funds, Eicher Group will continue to assess the situation and is likely to increase spends over the forthcoming months, to deploy support and for long term rehabilitation in the aftermath of the pandemic.
Having undertaken a detailed assessment of immediate and near-term requirements, Eicher Group will deploy the initial Rs. 50 crores for relief initiatives under the following areas:
The Group will work towards providing food, provisions and sanitation consumables, as well as setting up sanitation facilities for high-need-gap, underprivileged local communities in parts of several states across the country. Towards this, the Group has partnered with reputed NGOs to assess needs and deliver support to the needy
Part of the funds will be deployed to purchase and distribute personal protective equipment for medical care personnel across government hospitals in Chennai for the interim period, until Government procurement and supplies stabilize
Eicher Group will work towards augmenting healthcare support by working with an identified set of government and private hospitals to build dedicated COVID-19 specialty wards, including isolation areas, and equipment towards patient care
Funds will also be directed towards support and relief measures for truck drivers, including food and sanitation supplies and COVID-19 healthcare testing kits
Employees of the Group have started contributing to Government relief funds. In addition Eicher Group will also contribute towards the PM Care Fund as well as Relief Funds in Tamil Nadu and Madhya Pradesh
Eicher Group is in talks with various government organizations to support the production of critical medical equipment and supplies, including ventilators. This will include the employment and leverage of new-age technologies like 3-D printing for rapid scaling up of parts for the medical equipment.
While these are initiatives being undertaken immediately, there is a strong need to employ recovery and rehabilitation efforts in the medium and long term. Towards this, Eicher Group will be working on livelihood training and reskilling initiatives for rehabilitation of labour impacted in the aftermath of COVID-19, for improving their employability.
Nagpur: Nagpur Municipal Corporation has developed the Citizen Grievance Management Application, under the guidance of Municipal CommissionerTukaram Mundhe for the benefit of the citizens. The grievance regarding different civic services like Water Supply, Electrical supply, Schools and Education, Solid Waste Management, Property Tax, Birth and Death Registration, Unsafe buildings, removal of fallen trees, etc. will be resolved by this Application in time-bound and hassle-free manner.
The App is designed keeping in mind the citizen centricity. It will provide citizens access of apps at their fingertips for resolving the grievances related to civic services. The App is designed on the principles of
1.Transparency to every stakeholder including citizens and officers.
2.Built-in accountability of each officer to attend and resolve the grievance in the specified time and reply to the complaint, else auto-escalation activates and grievances are escalated to the higher authority for its resolution.
3.No discretion is provided to the authorities regarding the time limit or shifting/transferring the grievance to other authorities.
The App is user friendly, easy to handle and has citizens dashboard for tracking the status of the grievance.
This application is available on the Google play store. Any citizen can download “Nagpur Live City” from Google play store or the citizen can access the portal from below link: https://www.nmcnagpur.gov.in/grievance
Key Features of applications:
Citizens have to make onetime registration with the app by filling the required fields.
After a successful registration person has to Sign Up the system for registering any citizen service complaint.
Citizen can track the current status of their grievance, all the grievances registered by them, they can also give their feedback at their fingertips.
All the grievances registered through application will be automatically assigned to the concerned authority of NMC. The authority has to resolve the grievance in time bound manner.
मुंबई: लॉकडाऊनचे दिवस कमी-कमी होत असताना राज्यातील करोना बाधितांचा आकडा मात्र दिवसागणिक वाढत आहे. मागील १२ ते १४ तासांत करोनाग्रस्तांमध्ये १६२ रुग्णांची भर पडली असून ही संख्या आता तेराशेच्या जवळ पोहोचली आहे.
नव्यानं नोंद झालेल्या रुग्णांमध्ये मुंबईतील सर्वाधिक १४३ रुग्ण आहेत. कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या क्षेत्रात ४, पुणे, औरंगाबादमध्ये प्रत्येकी ३, पिंपरी-चिंचवड, नवी मुंबईमध्ये प्रत्येकी दोन रुग्ण आढळून आले आहेत. तर, यवतमाळ, ठाणे, मीरा-भाईंदर, वसई-विरार आणि सिंधुदुर्गात प्रत्येकी एकाला करोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे.
करोनाची साथ आल्यापासून मुंबई हे करोनाच्या संसर्गाचं जणू केंद्रच बनलं आहे. येथील संसर्ग थांबता थांबत नाही. शहरातील अनेक परिसर सील केल्यानंतरही संसर्ग थांबताना दिसत नाहीए. वरळी आणि धारावी हे दोन विभाग मुंबईतील सर्वाधिक बाधित आहेत. तेथील रुग्णांची संख्या सातत्यानं वाढत आहे. संसर्ग रोखण्यासाठी व बाधितांचा आकडा कमी करण्यासाठी प्रशासन शक्य ती सर्व पावलं उचलत आहे. खबरदारी म्हणून महापालिकेनं निर्बंध आणखी कठोर केले असून घराबाहेर पडताना मास्क घालणं सक्तीचं केलं आहे.
नागपूर :दिल्लीतील तबलिगी जमातमध्ये सहभागी होऊन नागपुरातील एका धार्मिक स्थळामध्ये विनापरवानगी मुक्काम करणाऱ्या आठ विदेशी नागरिकांवर तहसील पोलिसांनी गुन्हे दाखल केले. त्या आठही जणांना आमदार निवासातील विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. यामध्ये चार महिलांचाही समावेश आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कोरोनाचे संकट पाहता सध्या देशात लॉकाडाऊन आणि संचारबंदी लागू करण्यात आली आहे. या दरम्यान दिल्लीतील निजामुद्दीन येथील मरकज येथे शेकडो लोकांनी एकत्र येऊन लॉकडाऊनचे उल्लंघन करुन कोरोनाला आमंत्रण दिले होते. मरकज येथे देशभरातील नागरिकांसह विदेशांतील लोकही सहभागी झाले होते. दिल्लीतून अनेक जण आपापल्या राज्यात परतले, तर विदेशी नागरिक भारतातील विविध शहरांतील धार्मिक स्थळी मुक्कामी होते. अशाप्रकारे नागपुरात 56 मरकज जमाती आढळले होते. त्यांना आमदार निवासात कोरंटाईन करण्यात आले होते.
दरम्यान यांसह विदेशातील अन्य नागरिक नागपुरातील असल्याची माहिती तहसील पोलिसांना मिळाली. पोलीस निरीक्षक जयेश भांडारकर आणि उपनिरीक्षक स्वप्निल वाघ पथकासह सोमवारी शहरातील एका धार्मिक स्थळी पोहोचले. त्यांनी तेथे विदेशी नागरिकांबाबत चौकशी केली. तेथे चार विदेशी नागरिक असल्याची माहीती त्यांना मिळाली. पीएसआय वाघ यांनी तेथून चौघांना ताब्यात घेतले. तीन महिला दुसऱ्या ठिकाणी मुक्कामी असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी लगेच तेथे पोहोजून चार महिलांना ताब्यात घेतले. हे सर्व नागरिक यानगोन सिटी, म्यानमार-बर्मा येथील असल्याचे सांगण्यात आले. त्यांच्यावर लॉकडाऊन उल्लंघन, व्हॉयलेटींग फॉरेनर्स ऍक्टनुसार गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
7 मार्चला आले होतो नागपुरात
आठही विदेशी नागरिक 7 मार्चला नागपुरात आले. सुरूवातीला गिट्टीखदान परीसरातील एका धार्मिक स्थळी त्यांनी वास्तव्य केले. त्यानंतर त्यांनी गिट्टीखदानमधून तहसील परीसरात मुक्काम ठोकला. तेव्हापासून ते आठही नागरिक तहसील परीसरातच होते. पोलिस आयुक्तांनी आवाहन केल्यानंतरही त्यांनी पोलिसांनी माहिती दिली नाही, हे विशेष.
नागपूर :कोरोनाचा फैलाव होऊ नये याकरिता तातडीने आवश्यक कार्यवाही करण्यासाठी जिल्ह्यामध्ये १२४ शीघ्र कृती दलांची स्थापना करण्यात आली आहे. त्यामध्ये नागपूर शहराकरिता स्थापन ३८, नगर परिषद व नगर पंचायत क्षेत्राकरिता स्थापन २० आणि ग्राम पंचायत क्षेत्राकरिता स्थापन ६६ शीघ्र कृती दलांचा समावेश आहे.
जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात प्रतिज्ञापत्र सादर करून ही माहिती दिली. व्यावसायिक सुभाष झंवर यांची कोरोनासंदर्भातील जनहित याचिका उच्च न्यायालयात प्रलंबित आहे. त्यात उच्च न्यायालयाने जिल्हाधिकाऱ्यांना कोरोनावर करण्यात आलेल्या उपाययोजनांची माहिती मागितली होती. प्रतिज्ञापत्रातील अन्य माहितीनुसार, जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस आयुक्त व पोलीस अधीक्षक यांना पत्र लिहून लॉकडाऊनची काटेकोर अंमलबजावणी करण्याची विनंती केली आहे. नागरिक विनाकारण घराबाहेर दिसायला नको असेही त्यांनी सांगितले आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरणाऱ्या प्रवाशांची थर्मल स्क्रिनिंग केली जात होती. दरम्यान, सरकारने १४ एप्रिलपर्यंत विमानसेवा बंद केली आहे. परिणामी, विमानातून होणारे प्रवाशांचे आगमन थांबले आहे. रेल्वे स्थानक, बस स्थानक व सरकारी कार्यालयांमध्येही सुरक्षेचे सर्व आवश्यक उपाय केले जात आहेत. सर्वांना पत्र पाठवून सुरक्षेसंदर्भात सूचना करण्यात आल्या आहेत. राहत्या घरात क्वॉरंटाईन केलेल्या नागरिकांनी घरातच राहणे बंधनकारक आहे. त्याचे उल्लंघन करून बाहेर फिरणाऱ्या नागरिकांवर फौजदारी कारवाई करून त्यांना सरकारी क्वारंटाईनमध्ये ठेवले जात आहे. नागरिकांच्या सुविधेसाठी अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे नागरिकांनी केवळ अत्यावश्यक गोष्टींसाठीच बाहेर पडावे व बाहेर पडल्यानंतर सोशल डिस्टन्सिंगचे पालन करावे असे आदेश जारी केले गेले आहेत. व्यावसायिकांनी या काळात संधीचा फायदा घेऊन नफेखोरी करू नये व त्यांनी मानवतेचा दृष्टीकोण ठेवून व्यवसाय करावा यासाठी व्यावसायिकांमध्ये जागृती करण्यात आली आहे.
कारागृहात १५ स्वतंत्र वॉर्ड
कोरोनाचा फैलाव होऊ नये याकरिता नागपूर मध्यवर्ती कारागृहात १५ स्वतंत्र वॉर्ड तयार करण्यात आले आहेत. कारागृहात येणाऱ्या नवीन बंदीवानांना १५ दिवस स्वतंत्र वॉर्डात ठेवले जात आहे. दरम्यान, कोरोनाची लक्षणे आढळून आली नाहीत अशा बंदीवानांना बराकमध्ये स्थानांतरित केले जात आहे अशी माहिती न्यायालयाला देण्यात आली.
मजुरांसाठी ४१ शेल्टर होम
स्थलांतर करणाºया मजुरांसाठी जिल्ह्यामध्ये ४१ शेल्टर होम तयार करण्यात आले आहेत. या सर्व शेल्टर होममध्ये एकूण ४९९० मजूर राहू शकतात. त्यांची काळजी घेण्यासाठी व त्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी १८ कौन्सिलरची नियुक्ती करण्यात आली आहे. मजुरांना अन्न, पाणी, औषधी इत्यादी गोष्टी पुरविल्या जात आहेत.
असा मिळाला निधी
कोरोनाविरुद्ध लढण्यासाठी केंद्र सरकारने जिल्ह्याला २५ कोटी रुपये दिले आहेत. तसेच, जिल्हा नियोजन समितीकडून मेडिकलला ५.४२ कोटी, मेयोला १० कोटी आणि जिल्हा सामान्य नागरी रुग्णालयाला ३० लाख रुपये मिळाले आहेत.
गरजूंना रेशन वितरण
गरजू नागरिकांना सार्वजनिक वितरण प्रणालीच्या माध्यमातून रेशन पुरवठा केला जात आहे. जिल्ह्यात १.२३ लाख रेशन कार्डधारक कुटुंबे आहेत. त्यापैकी अंत्योदय रेशन कार्डधारकांना एकाचवेळी तीन महिन्याचे रेशन दिले जात आहे. याशिवाय अंत्योदय व प्राधान्य गटातील कुटुंबांना प्रति व्यक्ती ५ किलो तांदुळ अतिरिक्त दिला जात आहे. उर्वरित रेशनकार्डधारकांना मासिक रेशन दिले जात आहे. रेशनकार्ड नाही अशा नागरिकांनी आधार कार्ड, कुटुंबातील सदस्य संख्या, पत्ता इत्यादी माहिती रेशन दुकानातील सूचनापेटीमध्ये टाकावी असे आवाहन करण्यात आले आहे. त्यांनाही स्वस्त दरात रेशन दिले जाणार आहे.
रुग्णवाहिकांचे दर निश्चित
रुग्णवाहिकांसाठी मनमानी पद्धतीने पैसे घेतले जाऊ नये याकरिता दर निश्चित करून देण्यात आले आहेत. शहरांतर्गत २५ किलोमीटरपर्यंतच्या अंतरासाठी मारुती व्हॅनचे ५००, टाटा सुमोचे ५५०, टाटा विंजरचे ६०० तर, टेम्पो ट्रॅव्हलचे ७०० रुपये ठरविण्यात आले आहे. यापेक्षा जास्त अंतर असल्यास अनुक्रमे १०, १०, १२ व १४ रुपये प्रति किलोमीटर असे दर निश्चित करण्यात आले आहेत. वाहन वातानुकुलित असल्यास १० टक्के रक्कम अधिक आकारली जाईल.
नागपूर: नागपूर महानगरपालिकेअंतर्गत येणाऱ्या क्षेत्रात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत असून एकाचा मृत्यू झाला आहे. ही परिस्थिती अत्यंत गंभीर आहे. कोरोनामुळे उद्भवलेल्या परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन नागरिकांनी शासनाने दिलेले निर्देश पाळावे. घरात राहावे, सुरक्षित राहावे असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला आहे.
कोरोनामुळे नागपुरात एका व्यक्तीचा मृत्यू झाला हे धक्कादायक आहे. त्यामुळे समूह संसर्ग टाळण्यासाठी नागरिकांनी लॉकडाऊनचे काटेकोरपणे पालन करावे. जीवनावश्यक सर्व वस्तू मुबलक आहे. भाजीपाला, किराणा, दुध यासारख्या सेवा घरपोच मिळतील याबाबत व्यवस्था मनपाने काही व्यवसायीक व शेतकरी बचतगटाच्या माध्यमातुन केली आहे. किमान पुढील काही दिवस स्वत:वर बंधन घालणे आवश्यक आहे. यासोबतच वेळोवेळी साबणाने हात स्वच्छ धुवावे, सॅनिटायझरचा वापर हात स्वच्छ करण्यासाठी करावा, बाहेर निघताना मास्क लावावे, असे आवाहनही मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.
कोरोनाचा संसर्ग होऊ नये म्हणून नागपूर महानगरपालिका आवश्यक ती सर्व काळजी घेत आहे. कोव्हिड-१९ चे पॉझिटिव्ह असलेले रुग्ण ज्या परिसरात राहतात, त्या परिसरात राहणाऱ्या कुण्या व्यक्तीला जर बाधा झाली असेल तर ते तातडीने समोर यावे, त्यांच्यामुळे इतरांमध्ये हा विषाणू पसरु नये, यासाठी ही काळजी घेत जात असल्याचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले. याअंतर्गत लक्ष्मीनगर झोनमध्ये १८५ चमू, धंतोली झोनमध्ये दोन चमू, गांधीबाग झोनमध्ये ३५ चमू आणि मंगळवारी झोनमध्ये २३ चमूंच्या माध्यमातून सर्वेक्षण सुरु आहे. लक्ष्मीनगर झोनमधील २७४६३ घरांतील १०६७१९ नागरिक, धंतोली झोनमधील ५९ घरातील २७८ नागरिक, गांधीबाग झोनमधील १४९७ घरातील ७७३८ नागरिक आणि मंगळवारी झोनमधील २१४९ घरांतील ९३१४ नागरिकांची या चमूंच्या माध्यमातून दररोज माहिती घेतली जात असल्याचे त्यांनी सांगितले.
८६८ पैकी ७७८ निगेटिव्ह
नागपुरात कोरोनाचे संशयित रुग्णांची संख्या वाढली आहे. आतापर्यत १२०२ नागरिकांत कोरोनाची लक्षणे आढळली. त्यापैकी १११६ व्यक्ती देखरेखीखाली आहेत. यापैकी ५९५ जणांचा १४ दिवसांचा देखरेखीचा कालावधी पूर्ण झाला आहे. ८६८ नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले असून त्यापैकी १८ नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. मंगळवारी (ता.७) पॉझिटिव्ह आढळलेला १ रुग्ण चंद्रपुरातील होता. त्यामुळे नागपुरात सद्यस्थितीत १८ पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद आहे. ७७८ नमुने निगेटिव्ह आली असून ७१ नमुन्यांचा अहवाल प्राप्त व्हायचा आहे. ७८१ व्यक्तींना घरी पाठविण्यात आले असून ८५ व्यक्तींवर दवाखान्यात उपचार सुरू आहेत.
शहरात १७ लाख नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण
याव्यतिरिक्त दहाही झोनमध्ये ३३३ चमूंच्या माध्यमातून संपूर्ण नागरिकांची माहिती घेण्यात येत आहे. एकूण लोकसंख्येपैकी आतापर्यंत १७६१२८५ नागरिकांचे सर्वेक्षण पूर्ण झाले आहे. झोनल वैद्यकीय अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात एकूण ४३७१९१ घरांचे सर्व्हेक्षण झाले असून दररोज सुमारे २८३९३ घरांचे सर्वेक्षण होत आहे. याव्यतिरिक्त प्रभागनिहाय ‘रॅपिड रिस्पान्स टीम’ तयार करण्यात आली असून आलेल्या माहितीच्या आधारे तातडीने संबंधित ठिकाणी पोहचून नागरिकांची तपासणी केली जाते. संपूर्ण शहरात दहाही झोन मिळून असे ३८ पथक आहे. आतापर्यंत १५३८ घरांना रॅपिड रिस्पान्स टीमने भेट दिली आहे.
नागपूर : विदर्भात कोरोनाबाधित रूग्णाच्या संख्येत मंगळवारी ८ ने वाढ झाली. आज वाढलेल्या रूग्णांमध्ये सर्वाधिक ३ रूग्ण अमरावतीत वाढले आहेत. तर, नागपूर, चंद्रपूर आणि अकोला येथील प्रत्येकी एक आणि बुलढाणा येथील २ रूग्णांचा समावेश आहे.
चंद्रपूरचा रूग्ण नागपुरात विलगीकरण कक्षात आहे. त्यामुळे आता नागपुरात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या १९ एवढी झाली आहे. बुलडाणा येथील ३२ चाचणी अहवालांपैकी २ अहवाल पॉझिटिव्ह आले तर ३० अहवाल निगेटिव्ह आले आहेत. त्यामुळे बुलडाणा येथे आता कोरोनाबाधित रूग्णांची संख्या ११ एवढी झाली आहे. बुलडाणा जिल्ह्यातील हे दोन नवे रूग्ण सिंदखेडराजा आणि शेगाव येथील असल्याचे जिल्हा आरोग्य यंत्रणेने सांगितले.
अमरावतीत ३ रूग्ण वाढले
अमरावतीतील हाथीपुरा परिसरातील निधन झालेल्या नागरिकाच्या संपर्कातील तीन व्यक्तींचे कोरोना चाचणी अहवाल मंगळवारी पॉझिटिव्ह आले आहेत. त्यात २ पुरुष व एका महिलेचा समावेश आहे. निधन झालेल्या व्यक्तीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्याने त्यांच्या संपर्कातील २४ जणांना क्वारंटाईन करण्यात आले होते. त्यांना सुपर स्पेशालिटी रूग्णालयातील कोविड रूग्णालयात ठेवण्यात आले होते. त्यापैकी तिघांचे अहवाल पॉझिटिव्ह असून, त्यांना पॉझिटिव्ह रूग्णांसाठीच्या स्वतंत्र कक्षात ठेवण्यात आले आहे. त्यांच्यावर उपचार होत आहेत. अमरावतीत आता कोरोनाबाधित रूग्ण संख्या ४ झाली आहे. अमरावतीच्या कोविड रूग्णालयात काल सोमवारी उपचारादरम्यान निधन झालेल्या नागरिकाचा अहवाल प्रलंबित आहे.
अकोल्यात पहिला कोरोनाबाधित रूग्ण आढळला
एकही कोरोना बाधित रुग्ण नसलेल्या अकोल्यात पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याची माहिती आता समोर आली. या अकोल्याच्या बैदपुरा भागातील हा पहिला रूग्ण आहे. त्यामुळे अकोलेकरांसाठी आता हा चिंतेचा विषय बनला आहे. अकोला जिल्ह्यात कोरोनाच्या संशयीत रुग्णांची संख्या दररोज वाढत आहे. परंतु, एकही पॉझिटिव्ह रुग्ण नसल्याने बहुतेक लोकांना चिंता नव्हती. परंतु, आज एका रुग्णाचा वैद्यकीय चाचणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याने अकोला जिल्ह्यातही या कोरोनाच्या महामारीचा शिरकाव झाल्याचे स्पष्ट झाले आहे.
मुंबई:केंद्र सरकारने जाहीर केलेल्या योजनेत फक्त तांदूळ वाटपाचा समावेश आहे. जे लोक दारिद्र्य रेषेखाली आहेत, त्यांनाच तांदूळ मिळणार असून केशरी कार्डधारकांना केंद्राने या योजनेतून वगळलं आहे, अशी माहिती देतानाच राज्य सरकारकडून मात्र मध्यमवर्गीयांनाही ८ रुपये प्रति किलो दराने तीन किलो गहू आणि १२ रुपये प्रति किलो दराने तांदूळ दिले जात आहेत, अशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. त्यामुळे केंद्र सरकारने मोफत धान्य वाटप करायला सांगूनही राज्य सरकार धान्य वाटप करत नसल्याच्या भाजपच्या आरोपातील हवा निघून गेली आहे.
मुंबई आणि पुण्यात कोरनाचा पहिला रुग्ण सापडल्यानंतर राज्यात लॉकडाऊन करण्यात आलं होतं. त्याला काल चार आठवडे पूर्ण झाले. यापार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील नागरिकांशी फेसबुकच्या माध्यमातून संवाद साधत त्यांना मानसिक बळ देण्याचा प्रयत्न केला. तसेच करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दिवस रात्र मेहनत करणाऱ्या अत्यावश्यक सेवेतील नागरिकांचं त्यांनी आभार मानले. यावेळी बोलताना त्यांनी मोफत अन्नधान्य वाटपावरून होत असलेल्या भाजपच्या आरोपांमधील हवा काढून टाकली. केंद्राच्या योजनेत केवळ तांदळाचं मोफत वाटप करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यामुळे तांदळाचं वाटपही सुरू झालं आहे. मात्र केंद्राने केवळ दारिद्रयरेषेखालील लोकांनाच मोफत तांदूळ वाटप करण्यास सांगितलेलं आहे. त्यात केशरी कार्डधारकांचा समावेश नाही. त्यामुळे मध्यमवर्गीयांना या योजनेचा लाभ मिळत नाही, असं सांगतानाच केशरी कार्डधारक मध्यमवर्गीयांसाठी योजना आखण्याची विनंती पंतप्रधानांना केली आहे. त्यांच्याशी फोनवरूनही बोललो असून त्यांना पत्रही पाठवलेलं आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं.
सर्वच जण अडचणीचा सामना करत असल्याने राज्य सरकारने केशरी कार्डधारक मध्यमवर्गीयांसाठी ८ रुपये प्रति किलो दराने तीन किलो गहू आणि १२ रुपये प्रति किलो दराने २ किलो तांदूळ देण्याचा निर्णय घेतला आहे. राज्याला किमान आधारभूत किंमतीवर आणखी धान्य मिळावं म्हणून आम्ही केंद्राकडे मागणीही केली आहे, असं मुख्यमंत्री ठाकरे यांनी सांगितलं. तसेच राज्यसरकार शिवभोजन योजनेतून रोज साडेपाच सहा लाख लोकांना अन्न पुरवत आहे. लोकांच्या तीनवेळच्या जेवणाची व्यवस्था केली आहे. गरज पडल्यास आणखी व्यवस्था करू, असेही त्यांनी सांगितलं.
राज्यातील करोना रुग्णांना व्हेंटिलेटरची कमतरता भासू नये म्हणून महाराष्ट्र आणि गुजरातमधील काही कंपन्या व्हेंटिलेटर तयार करत आहेत. या कंपन्यांना व्हेंटिलेटरचं उत्पादन करण्याचा अनुभव नसला तरी त्यांच्याकडून व्हेंटिलेटर घेताना ते तपासूनच घेतलं जाईल. त्यामुळे राज्यात व्हेंटिलेटरचा प्रश्न निर्माण होणार नाही, असंही त्यांनी सांगितलं. देशातच नव्हे तर संपूर्ण जगभरात पीपीटी किटचा तुटवडा आहे. अमेरिकेनेही आपल्याकडे मदत मागितली आहे. मात्र, असं असलं तरी आपणही पीपीटी किट तयार करण्याचं काम करत आहोत. हाही प्रश्न सुटणार आहे, असं मुख्यमंत्री म्हणाले.
करोनानंतर आर्थिक युद्ध लढायचं आहे
करोनाविरोधातील युद्ध जिंकल्यानंतर आपल्याला आणखी एक युद्ध लढावं लागणार आहे. ते म्हणजे आर्थिक संकटाविरोधातील हे युद्ध आहे. आर्थिक संकट हे एक जागतिक युद्ध असेल. संपूर्ण जगात आर्थिक संकटावर मात करण्यासाठी चढाओढ लागलेली असेल आणि हे युद्ध सुद्धा आपण नक्कीच जिंकू असा मला विश्वास आहे. त्यामुळे या युद्धात लढण्यासाठी तुम्ही मानसिकदृष्ट्या फिट आणि सक्षम असणं गरजेचं आहे. त्याकरिता घरीच थांबा. घरातल्या घरात योगा करा. व्यायाम करा. मन आनंदी आणि प्रसन्न ठेवणारे कार्यक्रम पाहा. आवडत्या छंदामध्ये स्वत:ला गुंतवून घ्या, अशा सूचनाही त्यांनी केल्या.
करोनामुळे जापानमध्ये आणीबाणी लागण्याची शक्यता आहे. सिंगापूरमध्ये लॉकडाऊन वाढवलेला आहे. मात्र, अशाही परिस्थितीत चीनच्या वुहानमध्ये लॉकडाऊन उठवण्यात आला आहे. ही दिलासादायक बातमी आहे. तब्बल ७४-७५ दिवसानंतर हा निर्बंध उठवण्यात आला आहे. त्यामुळे हे ताणलं गेलं तर कुठपर्यंत ताणलं जाऊ शकतं हे लक्षात येतं. मात्र हे दिवसही जाणारच. आपण या युद्धात जिंकणारच. आपण हिंमतीने हे युद्ध जिंकू. त्यासाठी तुमची तंदुरुस्ती हवी, असंही ते म्हणाले. तसेच वृत्तवाहिन्यांना बातम्यांबरोबर जुने आणि हलके फुलके कार्यक्रम दाखवण्याचं आवाहनही त्यांनी केलं.
खाण्याची पथ्य पाळा
यावेळी त्यांनी विविध व्याधींशी सामना करणाऱ्या ज्येष्ठ नागरिकाना खाण्याचे पथ्य पाळण्याचे आवाहन केलं. मी खाण्यावर निर्बंध आणणार नाही. पण ज्यांना मधूमेह, किडनीचा विकार आहे किंवा रक्तदाबाचा त्रास आहे, अशा ज्येष्ठ नागरिकांनी खाण्याची पथ्यं पाळली पाहिजेत, असं त्यांनी सांगितलं.
गोंदिया: गोरेगाव तालुक्यातील चीचगाव येथे एका घरावर पॅराशूट सदृश्य मोठ्या आकाराचा फुगा पडल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे. या घटनेची बातमी सर्वत्र पसरताच आकाशातून पडलेला हा फुगा पाहण्यासाठी नागरिकांनी या घरासमोर एकच झुंबड केली होती.
आज सकाळी ७ वाजता ही घटना घडली. जिल्हा परिषदेचे माजी कृषी सभापती मोरेश्वर कटरे यांच्या घरासमोरील दखणे यांच्या घरावर हा फुगा पडला. घरावर काही तरी पडल्याने मोठा आवाज झाल्याने घरावर काय पडले हे पाहण्यासाठी घरातील लोक बाहेर आले. त्यावेळी त्यांना घरावर मोठा फुगा दिसला. दखणे कुटुंबांनी ही माहिती परिसरातील ग्रामस्थांना दिली. त्यामुळे ही बातमी संपूर्ण गावात वाऱ्यासारखी पसरली आणि दखणे यांच्या घरासमोर एकच झुंबड उडाली. त्यानंतर काही ग्रामस्थांनी पुढे होऊन हे साहित्य तपासले असता त्यात दोन किट आढळून आल्या. त्यावर ‘मौसम विभाग के महानिदेशक का कार्यालय, भारत मौसम विज्ञान विभाग, लोधी रोड नवी दिल्ली ‘असे लिहिले आहे. यावरून सदर पॅराशूट सदृश फुगा हा भारतीय हवामान खात्याचे माहिती दर्शक उपक्रमाचे साधन असावे, असे स्पष्ट होते. विशेष म्हणजे घरावर पडल्यानंतरही त्या दोन किट्समध्ये लाइट जळत असल्याचे गावकऱ्यांनी सांगितले.
नागपूर: नागपूरच्या एका विदयार्थीने आपल्या वाढदिवसानिमित्त प्रत्येकी एक्कावन हजार याप्रमाणे एकूण एक लाख दोनहजार रुपये प्रधानमंत्री केयर फंड आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ लोक कल्याण समितीला कोविड-१९ चा नियंत्रणासाठी दिले. कु.रिमझिम उपाध्याय हिने आज महाल टाऊन हॉल येथील बैठकीनंतर दोन धनादेश केन्द्रीय मंत्री श्री.नितिन गडकरी यांचे स्वाधीन केले. तीने नुकतीच दहावी ची परीक्षा दिली आहे.
तसेच आसमी रोड करियर प्रायवेट लिमिटेड चे डायरेक्टर श्री. प्यारे खान यांनी देखील रु. तीन लाख सहा हजार पाचशे चा धनादेश प्रधानमंत्री केयर फंड साठी दिला. त्यांनी धनादेश केन्द्रीय मंत्री श्री.नितिन गडकरी यांचे सुपूर्द केला. यावेळी महापौर श्री.संदीप जोशी, खासदार डॉ.विकास महात्मे, आमदार सर्वश्री. कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, मोहन मते, गिरीश व्यास, प्रा.अनिल सोले, नागो गाणार, उपमहापौर श्रीमती मनीषा कोठे, स्थायी समिती अध्यक्ष विजय झलके, सत्तापक्ष नेता श्री.संदीप जाधव, विपक्ष नेता श्री.तानाजी वनवे, माजी महापौर श्री.प्रवीण दटके आदी उपस्थित होते.
नागपूर: कोव्हीड १९ चा आढावा घेण्यासाठी महाराष्ट्राचे प्रभारी म्हणून नेमलेल्या केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी मंगळवारी (ता. ७) महाल येथील श्रीमंत राजे रघुजी भोसले नगर भवनात लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची बैठक बोलाविली होती. या बैठकीत येणारे ना. नितीन गडकरी यांच्यासह प्रत्येक व्यक्तींवर टनेलच्या माध्यमातून जंतुनाशक फवारणी करण्यात आली.
नागपुरात पहिल्यांदाच कुठल्या बैठकीसाठी अशा प्रकारची जंतुनाशक फवारणी करण्यात आली. महापौर संदीप जोशी यांनी यासाठी पुढाकार घेतला. फॅबलॅब यांच्या सहकार्याने राजेन्द्र प्रसाद सायन्स एक्सप्लोरेटरी यांच्या माध्यमातून नगर भवनाच्या मुख्य द्वारावरच १६ फूट लांबीचे टनेल उभारण्यात आले होते. या टनेलमध्ये जेव्हा-जेव्हा कुणी प्रवेश करेल तेव्हा स्वयंचलित उपकरणाद्वारे जंतुनाशक फवारणी होत होती. किमान १० सेकंद ही फवारणी होते आणि व्यक्तीचे निर्जंतुकीकरण करण्यात येते.
महापौर संदीप जोशी यांची ही संकल्पना फॅबलॅबचे संचालक प्रतीक गडकर, मिर्झा असासीम बेग, गोविंद सहस्त्रबुद्धे, यांच्यासह निखिल जुमडे, आशीष बालपांडे, यश नायक यांनी सत्यात उतरविली. सोडियम हायपोक्लोराईडचे सोल्युशन तयार करून शॉवरिंगच्या माध्यमातून ही फवारणी करण्यात येत होती.
महापौर संदीप जोशी यांनी या संपूर्ण संकल्पनेची माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना दिली. ना. गडकरी यांनी फॅबलबच्या संपूर्ण टीमचे कौतुक केले.
मेकर्स-१९ मास्कचे वाटप
फॅबलॅबच्या चमूने अभिनव पद्धतीचे मास्कसुद्धा तयार केले आहेत. एम-१९ (मेकर्स -१९) या नावाचे हे मास्क असून आतापर्यंत सुमारे तीन हजार मास्क कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मोफत वाटप करण्यात आले आहे. अशी मास्क मोठ्या प्रमाणात तयार करून वाटप करण्याचा मनोदय फॅबलॅबच्या संचालकांनी व्यक्त केला.
नागपूर: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नागपुरात सुरु असलेल्या लॉकडाऊनदरम्यान गरजू व्यक्तींना दोनवेळच्या भोजनाचा पुरवठा तसेच दिव्यांग नागरिकांना रेशनचा पुरवठा व निराधार ज्येष्ठ नागरिकांना भोजन देण्याचे कार्य नागपूर महानगरपालिका सेवाभावी संस्था आणि सामाजिका कार्यकर्त्यांच्या माध्यमातून अविरत करीत आहेत.
नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात आणि मार्गदर्शनात शहरातील प्रत्येक गरजू व्यक्तींपर्यंत ही सेवा पोहचत आहे. नागपूर महानगरपालिका क्षेत्रात लॉकडाऊन कालावधीत बेघर, विस्थापित, कामगार, परराज्यातील अडकेलेले कामगार यांच्यासाठी निवारागृह, अन्न, पाणी, वैद्यकीय देखभाल आणि त्यांना इतर सुविधा देण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने पुढाकार घेतला आहे. सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने नागपूर शहरात असे १७२ निवारागृह उभारण्यात आले आहेत. त्याची क्षमता ६८०६ इतकी आहे. आजघडीला या निवारागृहात ५५९५ नागरिक वास्तव्यास असून दररोज ही संख्या वाढत आहे. ह्या संपूर्ण नागरिकांना दोन वेळचे भोजन पुरविण्यासाठी मनपाने २६केंद्रीय स्वयंपाकघराची व्यवस्था केली आहे. निवारागृहात असलेल्या आणि झोपडपट्यामधील गरजू व्यक्तींनाही या स्वयंपाकघराच्या माध्यमातून अन्न पुरविण्याचे कार्य मनपाच्या चमू दिवसरात्र करीत आहे.
४ एप्रिल रोजी निवारागृहातील ५५५६, झोपडपट्ट्यातील ९९०५ असे एकूण १५४६१ नागरिकांना अन्न पुरवठा करण्यात आला. ५ एप्रिल रोजी निवारागृहातील ५५७८ आणि झोपडपट्टीतील ११४३६ अशा एकूण १७०१४ नागरिकांना आणि ६ एप्रिल रोजी निवारागृहातील ५५९५ आणि झोपडपट्टीतील १५९४७ अशा एकूण २१५४२ नागरिकांना दोन वेळचे भोजन पुरविण्यात आले.
दिव्यांगांना रेशन तर निराधार ज्येष्ठांना भोजन व्यवस्था
मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पुढाकारातून चार दिवसांपूर्वी दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिकांनाही मदतीसाठी विशेष हेल्पलाईन सुरू करण्यात आली. यामाध्यमातून आतापर्यंत ४० दिव्यांग आणि ज्येष्ठ व्यक्तींनी मदत मागितली असून मनपाच्या माध्यमातून दिव्यांग नागरिकांपर्यंत रेशन कीट पोहचविण्यात आली आहे. याव्यतिरिक्त अन्य २२०० कुटुंबांनाही रेशन किट पुरविण्यात आली आहे. रेशन किट मध्ये गव्हाचे पीठ (५ कि.ग्रॅ.), तांदूळ (२.५ कि.ग्रॅ.), डाळ (१.२५ कि.ग्रॅ.), मिरची पावडर (२५० ग्रॅम), हळद पावडर (१२५ ग्रॅम), मसाला (२५० ग्रॅम), मीठ (२५० ग्रॅम), खाद्य तेल (१ कि.ग्रॅ.), कांदे (२ कि.ग्रॅ.), आलू (२ कि.ग्रॅ.) या वस्तूंचा समावेश असून प्रत्येक कुटुंबाला सात दिवस पुरेल इतकी ही व्यवस्था आहे. तसेच निराधार ज्येष्ठ नागरिकांना दैनंदिन दोन वेळचे स्वादिष्ट भोजन स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून देण्यात येत आहे.
सामाजिक संस्थांनी दिले दान
लॉकडाऊनदरम्यान गरजूंना मदत व्हावी यासाठी अनेक सामाजिक संस्थांनी पुढे येऊन दान दिले आहे. आतापर्यंत रोटरी क्लब, पॉवर ऑफ वन वेलफेअर फाऊंडेशन, मे. एस. एस. कुळकर्णी ॲण्ड असोशिएटस्, मे. कृष्णा ट्रेडिंग कंपनी, लॉयन्स क्लब यांच्या माध्यमातून ११४०० कि.ग्रॅ. गव्हाचे पीठ, ११२०० कि.ग्रॅ. तांदूळ, ५६०० कि.ग्रॅ. डाळ, ३३३० कि.ग्रॅ. तेल, ५५२० कि.ग्रॅ. मीठ, ९००० नग साबण, १०८.३ कि.ग्रॅ. हळद, ११८.३ कि.ग्रॅ. मिरची पावडर, २० कि.ग्रॅ. मसाला, १११०० कि.ग्रॅ. कांदे आणि १११०० कि.ग्रॅ. आलू नागपूर महानगरपालिकेला प्राप्त झाले आहेत. मॉईलने १० लाख रुपये दिले असून १५०० अन्न पॅकेट दररोज वितरीत करीत आहेत. विजय ढवंगळे आणि अजय ढवंगळे यांनी १० लाख रुपये आणि श्री रमण यांनी १२५०० रुपये दान दिले आहेत. मे. इस्कॉन, अन्न अमृत फाऊंडेशन, प्रियदर्शिनी बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्था, संस्कार बहुउद्देशीय सेवा सहकारी संस्था, शगून महात्मा औद्योगिक सहकारी संस्था, नागपूर महिला सहकारी सनसञथा, मैत्री परिवार आदींच्या माध्यमातून अन्न तयार केले जात आहे.
मुलाच्या मदतीसाठी परदेशातील महिलेचा ई-मेल
लॉकडाऊनमध्ये नागपुरात अडकलेल्या एका परदेशातील विद्यार्थ्याच्या आईचा ई-मेल नागपूर महानगरपालिकेला प्राप्त झाला. त्या मेलमध्ये मोबाईल क्र. किंवा सविस्तर पत्ता नव्हता. केवळ संबंधित विद्यार्थी हजारी पहाड परिसरात राहतो, असा उल्लेख होता. केवळ या माहितीच्या आधारे मनपाच्या चमूने ग्रो व्हिल फाऊंडेशनच्या माध्यमातून विद्यार्थ्याचा पत्ता शोधून काढला आणि त्याला आवश्यक ते सामान पोहचविले. असेच एक उदाहरण वृद्ध महिला व तिच्या नातवांचे आहे. नातवांसोबत राहणाऱ्या या वृद्ध महिलेच्या नातवांनीही मदतीसाठी आर्जव केली. त्यांनाही दिवसरात्र भोजन पुरविण्याचे कार्य मैत्री परिवार संस्थेच्या माध्यमातून मनपा करीत आहे.
गुगल शीटच्या माध्यमातून संनियंत्रण
नागपूर शहरातील एक नागरिक शोबीत चांडक यांनी नागपूर महानगरपालिकेच्या या सेवाभावी कार्यात स्वत:चेही योगदान दिले आहे. मनपाची मदत योग्य ठिकाणी पोहचते की नाही याचे मॉनिटरींग करण्यासाठी त्यांनी एक गुगल शीट मनपा अधिकाऱ्यांना तयार करून दिली. कलर कोडच्या माध्यमातून झोननिहाय त्यात माहिती अपडेट केली जाते. दररोज येणारी मागणी आणि होणारा पुरवठा याबाबत यात अपडेट होत असून जर गरजूला मदत मिळाली नाही तर लगेच ते नोडल अधिकारी तथा उपायुक्त मिलिंद मेश्राम यांना माहिती होते. मग तातडीने संपर्क करुन त्यांना मदत पोहचविली जाते.
दान आणि मदतीसाठी करावा संपर्क
नागपूर महानगरपालिकेतर्फे करण्यात येणारे सेवाकार्य समाजसेवी संस्था आणि दानशूर व्यक्तींच्या माध्यमातून सुरू आहे. ज्यांना या सेवाकार्यात दान द्यायचे आहे अथवा ज्या गरजूंना मदत हवी आहे त्यांनी ०७१२-२५३९००४, ९४२२६४११०१, ७०२८०३३८७२, ९८२३३३०९३४ या क्रमांकावर संपर्क करण्याचे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.
Makar Sankranti Wishes : Makara Sankranti (Sankranthi) is a Hindu festival that encourages people to live in peace and harmony. Here are best quotes,...