वाढदिवसाचे औचित्य साधून शालेय विदयार्थीनीची प्रधानमंत्री सहायता निधीला देणगी

नागपूरच्या एका विदयार्थीने आपल्या वाढदिवसानिमित्त प्रत्येकी एक्कावन हजार याप्रमाणे एकूण एक लाख दोनहजार रुपये प्रधानमंत्री केयर फंड आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ लोक कल्याण समितीला कोविड-१९ चा नियंत्रणासाठी दिले.

donation

नागपूर: नागपूरच्या एका विदयार्थीने आपल्या वाढदिवसानिमित्त प्रत्येकी एक्कावन हजार याप्रमाणे एकूण एक लाख दोनहजार रुपये प्रधानमंत्री केयर फंड आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघ लोक कल्याण समितीला कोविड-१९ चा नियंत्रणासाठी दिले. कु.रिमझिम उपाध्याय हिने आज महाल टाऊन हॉल येथील बैठकीनंतर दोन धनादेश केन्द्रीय मंत्री श्री.नितिन गडकरी यांचे स्वाधीन केले. तीने नुकतीच दहावी ची परीक्षा दिली आहे.

सतरंजीपूरा झोनमधील बडी मज्जीद परिसरातील सीमा सिल: आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या आदेशानंतर तात्काळ कारवाई

तसेच आसमी रोड करियर प्रायवेट लिमिटेड चे डायरेक्टर श्री. प्यारे खान यांनी देखील रु. तीन लाख सहा हजार पाचशे चा धनादेश प्रधानमंत्री केयर फंड साठी दिला. त्यांनी धनादेश केन्द्रीय मंत्री श्री.नितिन गडकरी यांचे सुपूर्द केला. यावेळी महापौर श्री.संदीप जोशी, खासदार डॉ.विकास महात्मे, आमदार सर्वश्री. कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, मोहन मते, गिरीश व्यास, प्रा.अनिल सोले, नागो गाणार, उपमहापौर श्रीमती मनीषा कोठे, स्थायी समिती अध्यक्ष विजय झलके, सत्तापक्ष नेता श्री.संदीप जाधव, विपक्ष नेता श्री.तानाजी वनवे, माजी महापौर श्री.प्रवीण दटके आदी उपस्थित होते.

Also Read- कोरोनाग्रस्त मृतदेहाच्या विल्हेवाटीसंदर्भात मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करा!