नागपूर: नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील मंगळवारी झोन अंतर्गत गौतम नगर प्रभाग क्रमांक १० या भागात कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने त्याचा प्रादुर्भाव शहरातील अन्य भागामध्ये होउ नये म्हणून नागरिकांच्या सुरक्षेच्यादृष्टीने प्रभाग १० आणि धरमपेठ झोन अंतर्गत प्रभाग १२चा परिसर सील करण्याचे आदेश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत.
मनपा आयुक्तांनी जारी केलेल्या आदेशानुसार मंगळवारी झोन क्रमांक १० अंतर्गत प्रभाग १० आणि धरमपेठ झोन क्रमांक २ अंतर्गत प्रभाग १२च्या दक्षिण-पूर्वेस गिट्टीखदान पोलिस स्टेशन, दक्षिण-पूर्वेस पारसी सिमेटरी एंट्री पॉईंट, दक्षिणेस पारसी सिमेटरी साउथ पॉईंट, दक्षिण-पश्चिमेस ताज किराणा, पश्चिमेस निर्मल गंगा कॉम्प्लेक्स, पश्चिमेस गिट्टीखदान चौक काटोल रोड, उत्तर-पश्चिमेस वेल्कीन मल्टीस्पेशालिस्ट हॉस्पीटल, उत्तरेस कॅप्स रिजेकन्सी, उत्तर-पूर्वेस श्री रामदेवबाबा टेंम्पल प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत. सदर भागात येणारे व जाणारे सर्व मार्ग तात्काळ बंद करून या भागाच्या सर्व सीमा आवागमनासाठी पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात येत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे. सदर भागातील नागरिकांना प्रतिबंधित क्षेत्राच्या बाहेर जाण्यास व प्रतिबंधित क्षेत्राबाहेरील नागरिकांना या क्षेत्रात येता येणार नाही.
शासकीय व निमशासकीय सेवेतील अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी, आवश्यक तातडीची वैद्यकीय कारणे तसेच अंत्यविधी, वैद्यकीय सेवेशी संबंधित खाजगी डॉक्टर, परिचारीका, मेडीकल स्टोअर्स दुकानदार, पॅथॉलॉजिस्ट, रुग्णवाहिका, पोलिस विभागामार्फत पासधारक असलेले जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे व्यक्ती यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे.
मुंबई :कोरोना व्हायरसने थैमान घातल्यामुळे जगभरातल्या सगळ्याच क्रीडा स्पर्धा थांबवण्यात आल्या आहेत. कोरोनाच्या धोक्यामुळे आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आली आहे. बीसीसीआयने याबाबत अधिकृत घोषणा केली आहे. स्पर्धा स्थगित करण्यात आल्याचं ट्विट आयपीएलच्या अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून करण्यात आलं आहे.
आयपीएल अनिश्चित काळासाठी स्थगित करण्यात आल्याचं कालच एका टीमच्या अधिकाऱ्याने माध्यमांना सांगितलं होतं, पण बीसीसीआयने याबाबत अधिकृत प्रतिक्रिया दिली नव्हती. आज मात्र आयपीएलबाबतच्या सगळ्या शंकांना पूर्णविराम मिळाला आहे.
कोरोना व्हायरसच्या वाढत्या प्रभावामुळे देशभरातला लॉकडाऊन ३ मेपर्यंत वाढवण्यात आला. लॉकडाऊन वाढवल्यामुळे आयपीएल एप्रिल-मेपर्यंत होण्याचा प्रश्नच नव्हता. २९ मार्च ते २४ मे या कालावधीत आयपीएल स्पर्धा खेळवली जाणार होती. कोरोनाचं वाढतं संकट लक्षात घेता सुरुवातीला आयपीएल १४ एप्रिलपर्यंत स्थगित करण्यात आली होती.
लॉकडाऊन वाढवण्याबाबात केंद्र सरकार आणि राज्य सरकार नेमका काय निर्णय घेतात, हे बीसीसीआयचे अध्यक्ष सौरव गांगुली आणि सचिव जय शाह पाहत होते. पण लॉकडाऊन वाढवल्यामुळे आयपीएल स्थगित करण्यावाचून पर्याय नव्हता, असं सांगितलं जात आहे.
आयपीएल स्थगित करण्यात आली असली, तरी वर्षाच्या शेवटी स्पर्धा खेळवली जाईल, अशी अपेक्षा आयपीएल टीमच्या एका अधिकाऱ्याने बोलून दाखवली आहे. सप्टेंबर महिन्यात दुबईमध्ये होणाऱ्या आशिया कपच्या तारखा बदलण्याच्या चर्चा सुरू झाल्या आहेत. आयपीएल खेळवण्यासाठी आशिया कपची तारीख बदलण्याच्या हालचाली सुरू असल्याचं बोललं जातंय. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने मात्र याला विरोध केला आहे. आयपीएल खेळवण्यासाठी आशिया कप रद्द करण्याला आम्ही तयार होणार नाही, असं पीसीबीचे अध्यक्ष एहसान मणी म्हणाले आहेत.
नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केल्या जात असलेल्या उपाययोजनांचा आता यशस्वी परिणाम दिसू लागला आणि त्यामुळेच देशात संक्रमित रुग्ण बरे होण्याचे प्रमाण वाढत असल्याचे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने गुरुवारी सांगितले. त्याचबरोबर देशातील 325 जिल्ह्यांत अद्याप एकही कोरोनाबाधित आढळला नसल्याची माहितीही देण्यात आली.
दरम्यान, गुरुवारी देशातील एकूण संक्रमित रुग्णांची संख्या 12 हजार 380 आणि बळींची संख्या 414 झाली. यामध्ये गेल्या 24 तासांतील 941 नवीन रुग्णांचा आणि 37 जणांच्या मृत्यूचा समावेश आहे.
आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दैनंदिन पत्रकार परिषदेत सांगितले की, कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनचे आता परिणाम दिसू लागले आहेत. संक्रमणाने प्रभावित झालेल्या 17 राज्यांच्या 27 जिल्ह्यांत गेल्या 14 दिवसांपासून एकही कोरोनाबाधित आढळला नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अशाच प्रकारे पुद्दुचेरीच्या माहे जिल्ह्यात गेल्या 28 दिवसांपासून संक्रमणाचे एकही प्रकरण समोर आलेले नाही. संक्रमणाची साखळी तुटण्याचे हे स्पष्ट संकेत आहेत.
अग्रवाल यांनी सांगितले की, संक्रमण प्रभावित ज्या जिल्ह्यांमध्ये दोन आठवड्यापासून एकही रुग्ण आढळला नाही, त्यामध्ये बिहारमधील पाटणा, पश्चिम बंगालमधील नादिया, राजस्थानमधील प्रतापगड, गुजरातमधील पोरबंदर, गोव्यातील दक्षिण गोवा, उत्तर प्रदेशमधील पीलिभीत, जम्मू-काश्मीरमधील राजौरी, उत्तराखंडमधील पौढी गढवाल, छत्तीसगडमधील राजनंदगाव, कर्नाटकमधील बेल्लारी, केरळमधील वायनाड, हरियानातील पानिपत आणि मध्य प्रदेशमधील शिवपुरी या जिल्ह्यांचा समावेश आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी लॉकडाऊनचा कालावधी 14 एप्रिलवरून वाढवून 3 मेपर्यंत करण्याची घोषणा केल्यानंतर बुधवारी गृहमंत्रालयाने मोठ्या प्रमाणात संक्रमण असलेले 170 हॉटस्पॉट जिल्हे आणि 207 संभाव्य हॉटस्पॉट जिल्ह्यांची यादी जाहीर करत या जिल्ह्यांमध्ये संक्रमण विरोधी मोहीम राबविण्याचे निर्देश राज्य सरकारांना दिले. अग्रवाल म्हणाले की, 20 एप्रिलपर्यंत संक्रमणमुक्त 325 जिल्ह्यांसह देशातील अन्य सर्व जिल्ह्यांमध्ये कोरोना संक्रमण रोखण्याच्या उपायांची कठोर अंमलबजावणी आणि निरीक्षण केले जात आहे.
रुग्ण बरे होणे चांगला संकेत
देशात संक्रमित रुग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढत आहे आणि हा एक चांगला संकेत असल्याचे सांगत अग्रवाल यांनी, रुग्ण बरे होण्याचे प्रमाण गेल्या काही दिवसांत 11.4 टक्क्यांवरून वाढून 12.02 टक्के झाले असल्याची माहिती दिली. त्यामुळे आतापर्यंत 1498 रुग्णांना उपचारानंतर बरे वाटत असल्याने रुग्णालयांतून घरी सोडण्यात आले आहे. यामध्ये गेल्या 24 तासांत स्वस्थ झालेल्या 184 रुग्णांचाही समावेश आहे.
मुंबई : काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जेव्हा देशातील नागरिकांना कोरोना Coronavirus विषाणूच्या या तणावपूर्ण परिस्थितीत संबोधित केलं तेव्हा ते एका वेगळ्या रुपात दिसले. यावेळी त्यांनी एक गमछा घेतल्याचं पाहायला मिळालं होतं. अर्थाच पंतप्रधानांच्या या लूकचीही सोशल मीडियावरही चर्चा झाली. ज्यावर आता सेलिब्रिटी फॅशन डिझायनर नीता लूल्लानेही प्रतिक्रिया दिली आहे.
एका व्हिडिओदरम्यान, तिने या गमछ्याविषयीचं मत मांडलं. हा गमछा वापरुन पंतप्रधानांनी भारतीय संस्कृतीच साऱ्या विश्वासमोर आणली आहे, असं ती म्हणाली.‘देशाला संबोधित करतेवेळी पंतप्रधानांनी तोंडावर हा गमछा लावून त्याला एक वेगळं महत्त्वं दिलं’.
मुळात घरात मास्क उपलब्ध नसल्यास घरातील उबलब्ध गोष्टी किंवा कापडाचाच नाक आणि तोंड झाकणअयासाठीचा मास्क म्हणून वापर कसा करावा ही बाब इथे अधोरेखित करायची होती. आपल्याला कोणत्याही प्रकारची हाणी पोहोचणार नाही, विषाणूचा संसर्ग टाळला जाईल आणि सोशल डिस्टन्सिंगचंही पालन केलं जाईल ही बाब इथे महत्त्वाची होती.
आपलं मत मांडत पुढे नीता म्हणाली, गमछा हा भारतीय संस्कृती, वेशभूषेचा एक मोठा भाग आहे. अनेकजणांची याला पसंती आहे. तिच्या म्हणण्यानुसार उत्तर भारतापासून दक्षिण भारतापर्यंत सर्वत्र गमछा परिधान करण्याची प्रथा आहे. नैसर्गिक सूतापासून तयार करण्यात आल्यामुळे तो घाम शोषून घेतो. उष्ण दिवसांमध्ये हा अधिक फायद्याचा ठरतो. त्यामुळे मोदींच्या या कृतीतून पुन्हा एकदा सिद्ध झालं की, भारतीय संस्कृती आणि पोशाखातून खूप गोष्टी या अनुकरणीय असून, सध्याच्या घडीला कोरोनाशी लढण्यासाठीसुद्धा त्या फायद्याच्या ठरतील.
मुंबई: राज्यात गुरुवारी २८६ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. एकूण रुग्ण संख्या ३,२०२ वर गेली आहे. राज्यात गुरुवारी ७ रुग्णांचा मृत्यू झाला. यात मुंबईच्या तिघांचा प पुण्याच्या चौघांचा समावेश आहे. राज्यातील कोरोना बळींचा एकूण आकडा १९४ वर पोहोचला आहे. दिवसभरात ५ रुग्णांना घरी सोडण्यात आले असून आतापर्यंत राज्यभरात ३०० रुग्ण बरे झाले असल्याची माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली.
५२,७६२ नमुने कोरोना निगेटिव्ह
राज्यात कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूचा दर हा देशातील इतर राज्यांपेक्षा जास्त आहे. आजपर्यंत झालेल्या ५६ हजार ६७३ नमुन्यांपैकी ५२ हजार ७६२ जणांचे नमुने कोरोना निगेटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ७१,०७६ लोक होम क्वारंटाइन, तर ६१०८ लोक संस्थात्मक क्वारंटाइनमध्ये आहेत.
रुग्णांचा तपशील
मुंबई महानगरपालिका २०७३, ठाणे १३, ठाणे महानगरपालिका १०९, नवी मुंबई ६८, कल्याण डोंबिवली ५०, उल्हासनगर १, भिवंडी निजामपूर १, मीरा भाईंदर ५१, पालघर ५, वसई विरार ३४, रायगड ६, पनवेल १२, नाशिक मंडळ ७९, पुणे मंडळ ४९२, कोल्हापूर मंडळ ३९, औरंगाबाद मंडळ ३२, लातूर मंडळ १२, अकोला मंडळ ५४, नागपूर ६०, इतर राज्ये ११.
२०.५० लाखांवर लोकांचे सर्वेक्षण
क्लस्टर कंटेनमेंट कृतियोजने अंतर्गत २९७ कंटेनमेंट झोन क्रियाशील असून ५६६४ पथकांनी २०.५० लाखाहून अधिक लोकसंख्येचे सर्वेक्षण केले आहे.
नागपूर : लॉकडाऊनच्या या काळात कुणालाही आर्थिक समस्यांचा सामना करावा लागू नये, यासाठी सर्व बँका व त्यांच्या सर्व शाखा नियमितपणे सुरू ठेवाव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी दिले आहेत. गुरुवारी सर्व बँकांच्या प्रतिनिधींची बैठक घेऊन त्यांनी हे आदेश दिले. त्यानुसार उद्या शुक्रवारपासून सर्व बँकांच्या सर्व शाखा नियमितपणे सकाळी १० ते सायंकाळी ५ या वेळेमध्ये सुरू राहतील. ग्राहकांकरिता बँकेची वेळ सकाळी १० ते दुपारी ४ वाजेपर्यंतची राहील.
केंद्र सरकारच्या आदेशानुसार, महिलांच्या जनधन खात्यामध्ये प्रत्येकी ५०० रुपये जमा होण्यास सुरुवात झाली आहे. हे सानुग्रह अनुदान एप्रिल, मे व जून महिन्यात जमा होणार आहे. त्याप्रमाणे एप्रिल महिन्याचे पैसे सद्यस्थितीत जमा झालेले आहेत, त्यामुळे गर्दी होऊ नये. म्हणून बँकांच्या सर्व शाखा सुरू राहणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी ठाकरे यांनी सांगितले. यासोबतच सर्व शाखांमध्ये सोशल डिस्टन्सिंग पाळण्याकरिता ४-४ फुटांच्या अंतरावर सर्कल्स मार्किंग करावेत. त्यानुसार ग्राहकांना उभे राहण्यास सांगावे. ग्राहकांसाठी सॅनिटायझर, हॅण्डवॉश, साबण, पाणी इत्यादींची व्यवस्था बँकेतर्फे करावी. बँकेच्या दर्शनी भागावर कोरोना जनजागृती, उपाययोजनासंबंधीचे होर्डिंग्ज लावणे बंधनकारक राहील. गर्दी होणार नाही याची काळजी घ्यावी. गर्दी होऊ नये म्हणून मोठ्या बँकांनी नागरिकांना घरपोच रक्कम देण्याची व्यवस्था करावी, परंतु प्रतिनिधी निवडताना त्यास ताप, खोकला असू नये, तसेच ती व्यक्ती हॉटस्पॉटमधील नसावी, असेही निर्देश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.
नागपूर: कार्यालयाच्या फेऱ्या न मारता लोकांना एका क्लिकवर त्यांच्या समस्यांचे समाधान भेटायला हवे, या उद्देशातून मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पुढकाराने तयार करण्यात आलेल्या ‘नागपूर लाईव्ह सिटी’ ॲपला आठवडाभरातच प्रचंड प्रतिसाद मिळाला. केवळ सात दिवसांत सुमारे साडे तीन हजार नागपूरकरांनी ॲप डाऊनलोड केले असून आतापर्यंत ७०० च्या वर तक्रारी ॲपच्या माध्यमातून प्राप्त झाल्या आहेत.
विशेष म्हणजे प्राप्त झालेल्या तक्रारींपैकी अर्ध्यांपेक्षा अधिक तक्रारींवर कार्यवाही करण्यात आली. त्याची माहितीही संबंधित नागरिकांना ॲपच्या माध्यमातूनच देण्यात आली. नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सात दिवसांपूर्वी समस्त नागपूरकरांसाठी ‘नागपूर लाईव्ह सिटी’ ॲप लॉन्च केले. नागपूर शहरातील कुठल्याही व्यक्तीला मुलभूत सोयीसुविधांविषयी कुठलीही तक्रार असेल तर सदर ॲपच्या माध्यमातून तक्रार करू शकतात. सदर ॲप सध्या ॲन्ड्रॉईड यूजर्ससाठी असून प्ले-स्टोअरमधून ते डाऊनलोड करता येईल अथवा http://www.nmcnagpur.gov.in/ grievance या लिंकवरून पोर्टलला भेट देता येईल. या ॲपमुळे आता नागरिकांना महानगरपालिकेशी संबंधित पाणीपुरवठा, विद्युत पुरवठा, शिक्षण, घनकचरा व्यवस्थापन, स्वच्छता, मालमत्ता कर, जन्म-मृत्यू नोंदणी, धोकादायक इमारती, रस्त्यावर पडलेली झाडे, मलवाहिनी, उद्यान आदींसंदर्भातील तक्रारी ॲपच्या माध्यमातून करण्याची सोय आता मनपाने उपलब्ध करून दिलेली आहे.
केवळ सात दिवसांत ३६०० नागपूरकरांनी ॲप डाऊनलोड केले आहे. सरासरी प्रति दिवस ५०० नागपूरकर ॲप डाऊनलोड करीत असून प्रति दिवस १०० तक्रारी प्राप्त होत आहेत. आतार्पंत एकूण ७५२ तक्रारी प्राप्त झाल्या असून त्यापैकी ४१९ तक्रारींचे निराकरण करण्यात आले आहे.
विशेष म्हणजे ॲपच्या माध्यमातून येणाऱ्या तक्रारींवर खुद्द मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचे नियंत्रण असून दररोज याचा ते आढावा घेतात. संबंधित तक्रारींची जबाबदारी संबंधित अधिकाऱ्यांना दिली असून निर्धारीत वेळेच्या आत तक्रारीचे निराकरण झाले नाही तर ॲपच्या माध्यमातूनच संबंधित अधिकाऱ्याला कारणे दाखवा नोटीस जाते. हे ॲप नागरिकांसाठी उपयुक्त असून नागरिकांनी तक्रारींचे निराकरण करण्यासाठी या ॲपचा वापर करावा, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.
नवी दिल्ली :दिल्लीमध्ये एका डिलिव्हरी बॉयच्या हातचा पिझ्झा खाणे ७२ जणांना महागात पडले आहे. पिझ्झा डिलिव्हरी बॉय कोरोना पॉझिटिव्ह निघाला आहे. त्यानंतर दक्षिण दिल्लीतील हौज खास आणि मालवीय नगरमधील ७२ लोकांना होम क्वारंनटाईन करण्यात आले आहे.
सूत्रांच्या माहितीनुसार, डिलीव्हरी बॉयच्या संपर्कात ७२ लोक आले होते. अद्याप या लोकांची टेस्ट करण्यात आलेली नाही. सर्वांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. जर या लोकांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळतात, तर त्यांची तपासणी केली जाईल. डिलिव्हरी बॉय मार्चच्या शेवटच्या आठवड्यात ड्यूटीवर होता आणि मागील आठवड्यात त्याचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.
डिलिव्हरी बॉयने दक्षिण दिल्लीमधील अनेक भागात पिझ्झा डिलिव्हर केला होता. त्यामुळे येथील अनेक लोकांना क्वारंटाईन करण्यात आले. दक्षिण दिल्लीचे डीएम बीएम मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘सध्या या पिझ्झा डिलिव्हर बॉयच्या संपर्कात आलेली ७२ घरे क्वारंटाईन करण्यात आली आहेत.
देशात कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी देशभरात जारी असलेले लॉकडाऊन वाढवून 3 मे पर्यंत वाढविले. तथापि, कोरोना संसर्गाच्या घटनांमध्ये घट आढळून आल्यास देशातील काही भागात 20 एप्रिलपासून लॉकडाऊनमध्ये थोडी शिथिलता दिली जाऊ शकते. लॉकडाऊनचे मुख्य उद्दीष्ट म्हणजे सामाजिक दुराव आणि एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जाणाऱ्या लोकांच्या हालचाली रोखून कोरोना विषाणूचा प्रसार रोखणे हे आहे. लॉकडाऊन दरम्यान अत्यावश्यक सेवा सुरू असल्याने राज्य सरकारांनी ई-पास प्रणाली लागू केली आहे. हा ई-पास वापरून लोक एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जाऊ शकतात. ई-पासच्या साहाय्याने आरोग्य, वैद्यकीय, वीज, पाणी यासारख्या आवश्यक सुविधा मिळविण्यासाठी व्यक्ती एका ठिकाणाहून दुसर्या ठिकाणी जाऊ शकतो. आपण आपल्या राज्यात ई-पास कसे मिळवू शकता हे जाणून घेऊया…
कर्फ्यू ई-पाससाठी आवश्यक असलेल्या सेवांची यादी
– आरोग्य सेवा
– अग्निशमन विभाग
– अन्न पुरवठा
– आरोग्य कर्मचारी
– बँक
– कायदा व सुव्यवस्था सेवा
– मीडिया
– मृत्यू प्रकरण
– वाहने (केवळ आपत्कालीन परिस्थितीसाठी ट्रक, कार आणि बाइक)
– वीज
– पोलिस
– पाणी
– रुग्ण
ई-पास अर्जासाठी आवश्यक माहिती
– अर्जदाराचे नाव
– शहर
– जिल्हा
– अधिकृत आयडी
– फोन नंबर
– वाहन नोंदणी क्रमांक
नागपूर : ”कोरोनाच्या लढाईत संपूर्ण जग हे रणांगण झाले आहे आहे. सर्व देश आपआपल्या परीने ही लढाई लढत आहेत. पण इतर प्रगत देशांपेक्षा भारताची लढाई उत्तम सुरु आहे, आपण यशस्वी होतोय. लक्षात ठेवा, युद्ध हरल्यावर माणूस संपत नाही, तर युद्धभूमी सोडून गेल्यावर तो संपतो. त्यामुळे या युद्धजन्य परीस्थितीत आपल्याला मैदान सोडायचे नाही, तर संपूर्ण आत्मविश्वासाने आणि ताकदीने हे युद्ध लढायचे आहे. फारच फार एक-दीड महीन्यात आपण हे युद्ध जिंकू,” असा विश्वास केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी व्यक्त केला.
फेसबुकच्या माध्यमातून गडकरींनी देशवासीयांसोबत संवाद साधला. ते म्हणाले, ”जीवनात समस्या येतात आणि जातात. पण यामुळे संकटांवर मात करण्याची क्षमता आपल्यांत निर्माण होते. आपल्या देशात सरकारमध्ये ती क्षमता आहे. त्यामुळे कोरोनाला घाबरुन न जाता लढण्याची गरज आहे. अमेरिकेसारख्या बलाढ्य देशात हे संकट गडद झाले असताना आपण योग्य पद्धतीने उपाययोजना करीत आहोत. आता सकारात्मक पद्धतीने या संकटाकडे पहावे लागणार आहे.”
छोट्या गोष्टींतूनच कोरोनावर करता येईल मात
ते पुढे म्हणाले, ”सरकारने वेळोवेळी महत्वाचे निर्णय घेतले आहेत. या लढाईत आपल्याला काही महत्वाच्या गोष्टी करायच्या आहेत. त्या म्हणजे सामाजिक अंतर पाळणे, बाजारात, किराणा दुकानात गर्दी न करणे, बाहेर असताना वेळोवेळी सॅनिटायझर आणि साबण-पाण्याने हात धुणे. शक्यतोवर घरात राहूनच काम करावे आणि फारच गरज भासली तर बाहेर जावे आणि जाताना मास्कचा वापर करणे. या लहान-लहान गोष्टी करुनच आपण कोरोनावर मात करु शकतो.”
केंद्राच्या उपाययोजनांची दिली माहिती
”केंद्र सरकारच्या नियमांप्रमाणे काही उद्योग टप्प्याटप्प्याने सुरु करण्यात येतील. जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगी घेऊन काही उद्योग सुरु करता येतील. तेथे सरकारच्या नियमांनुसार कामगारांची भोजन आणि सुरक्षेची व्यवस्था करण्यात येईल. भारताची अर्थव्यवस्था पुढे नेण्यासाठी या गोष्टी कराव्या लागतील. यासाठी सरकारने काही महत्वाची कामे केली आहेत, सरकारने माल वाहतूक, बंदरे, निर्यात चालू केली. कारखाने (काळजीपूर्वक) चालू करायला परवानगी दिली आहे. आरोग्य आणि सुरक्षा वस्तूंचे वेगवान उत्पादन सुरू केले आहे. चीनमधून येणाऱ्या औषधांची कच्च्या मालाची आयात बंद करून भारतात मोठ्या प्रमाणात उत्पादन सुरू केले आहे. सर्व हायटेक वैद्यकीय उपकरण उत्पादने भारतात तयार होण्यासाठी पहिला डीव्हाईस पार्क विशाखापट्टणम येथे सुरु करण्यात आला आहे. देशात असेच चार नवे पार्क लवकरच सुरु करण्यात येतील.” अशी माहिती त्यांनी दिली.
रस्ते बांधणीला देणार वेग
”संपूर्ण जगातून जपान आणि चीनमध्ये मोठ्या प्रमाणात गुंतवणूक होत होती. पण आता बव्हंशी देश चीनसोबत व्यवहार करण्यास इच्छुक नाहीत. त्यामुळे तेथील गुंतवणूक बाहेर हलविली जाणार आहे. अमेरिका व चीनकडून आपण आयात थांबवणार आहोत. याचा भारतीय उद्योगाला मोठा फायदा होणार आहे. देशभरात रस्ते बांधकामाचा वेग दुप्पट करण्यात येईल. सात नवीन हायवेंचे काम सुरु करण्यात आले आहेत. नदी वाहतूक व नदीजोड प्रकल्प चालू होणार. ब्रॉडगेज मेट्रो लवकरच सुरू करणार. सुरुवातीला गोंदीया-बडनेरा आणि गोंदीया-नरखेड ही ब्रॉडगेज सुरु करण्यात येणार आहे,” असेही त्यांनी सांगितले.
राजकारण विसरुन एकजुटीने प्रयत्न करु
”उद्योगांना जास्त भांडवल देणार, टॅक्स भरण्याची मुदत ३१ डिसेंबरपर्यंत वाढविण्यात येईल. ग्रामीण अर्थव्यवस्थेला प्राथमिकता देण्यात येणार आहे. तीन वर्षात 5 लाख कोटी वार्षिक उलाढालीचे लक्ष्य सरकारने निर्धारीत केले आहे. पेट्रोल, तेलबियांची आयात कमी करण्यासाठी ग्रामीण उद्योगांमार्फत बायोडीझल आणि इथेनॉलचे विक्रमी उत्पादन करण्यात येईल. दुग्ध, कुक्कुट उद्योग वाढवण्यासाठीही योजना राबविण्यात येणार आहेत. इलेक्ट्रॉनिक आणि वृत्तपत्रांच्या प्रिंटींग पेपरची आयात कमी करण्यासाठी योजना लागू करण्यात येणार आहे. भारताला लवकरच 5 ट्रीलीयन सुपरपॉवर बनविण्यासाठी राजकारण विसरुन एकजुटीने प्रयत्न करण्यात येतील,” असेही गडकरी म्हणाले.
निर्यात वाढवण्यावर भर देणार
आयात कमी करुन निर्यात वाढविण्यावर यापुढे भर राहणार आहे आणि कोरोनावर मात केल्यानंतर सर्व कामांचा वेग दुपटीने वाढविण्यात येणार आहे. हे सांगताना अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष रिचर्ड निकसन यांच्या आत्मचरीत्रातील एक वाक्य त्यांनी सांगितले. ते म्हणाले, “वॉटरगेटच्या कारणावरुन लोक त्यांच्यावर नाराज होते. तेव्हा त्यांनी वॉशिंग्टनमध्ये जागा घेतली होती. तेथील लोकांनीही त्यांना तेथे येण्यास मज्जाव केला होता. त्यावेळी त्यांचा अपमान झाला. पण ते लढत होते. तेव्हा त्यांनी आत्मचरीत्र लिहिले आणि त्यात एक वाक्य होते, ते माझ्या जीवनात मी नेहमी लक्षात ठेवतो. ते म्हणजे, ‘मॅन ईज नॉट फिनीश्ड व्हेन ही ईज डिफीटेड, बट ही ईज फिनिश्ड व्हेन ही क्वीट्स.’ युद्धभूमीवर हरल्यानेतर माणुस संपत नाही, तर तो युद्धभूमी सोडतो तेव्हा तो संपतो.”
त्यामुळे ही संकटं, समस्या, आव्हानं आपण स्विकारुन कोरोनाची लढाई लढावी आणि त्यानंतर आपल्या देशाला, अर्थव्यवस्थेला अधिक बळकट बनविण्याचा संकल्प करु, असे आवाहन गडकरी यांनी देशवासीयांना संबोधित करताना शेवटी केले.
नागपूर: मागील आठवड्यापासून शहरात कोरोनाबाधितांची संख्या दर दिवसाला वाढत आहे. 12 ते 14 एप्रिल या तीन दिवसांत 30 कोरोनाबाधितांची नोंद झाली. यामुळे शहर डेंजर झोनमध्ये आले. मात्र आजचा दिवस नागपुरकरांना दिलासा देणारा ठरला. मेयो, एम्स आणि पशुवैद्यक प्रयोगशाळेत एकही कोरोना बाधित आढळला नाही. यामुळे प्रशासनानेही समाधान व्यक्त केले.
नागपुरात कोरोनाबाधितांची संख्या 56 झाली. यामुळे समुहात प्रादुर्भावाची भिती व्यक्त करीत आरोग्य विभाग हादरला होता. परंतु मध्येच मरकजशी संबधित रुग्णांची संख्या वाढल्यामुळे प्रशासन दहशतीमध्ये आले. महापालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील सर्व मरकजशी संबधित रुग्णांना सक्तीचे विलगीकरण केले. ही समाधानाची बाब ठरली. आरोग्य विभागाने मरकज आणि दिल्लीशी संबंधित व्यक्तींची यादी मिळताच जोखमीतील आणि कमी जोखमीतील व्यक्तींचा तातडीने शोध घेतला. त्यांना सक्तीने आमदार निवास, रवी भवन, लोणारा, वनामतीसह सिंबॉयसिस येथे विलगीकरणात ठेवण्यात आले. 14 दिवसांच्या विलगीकरणात पुढे हे बाधित झाले.
मागील 14 दिवस हे व्यक्ती समाजात मिसळले असते तर मात्र नागपुरामध्ये कोरोनाची संख्या प्रचंड वाढली असती. या व्यक्तींच्या फिरण्यावर मर्यादा आल्याने विलगीकरणातीलच व्यक्तीचे अहवाल सकारात्मक निघाले. त्यांचा संपर्क टाळला गेल्याचे समाधान महापालिका आयुक्तांच्या दुरदृष्टीमुळे टळले. बुधवारी मेयो, एम्स आणि पशुवैद्यक प्रयोगशाळेत सुमारे अडिचशेवर कोरोना चाचण्या करण्यात आल्या असून एकही कोरोनाबाधित आढळला नाही. एम्सच्या चाचणीत यवतमाळ येथील एक जण बाधित आढळला आहे.
नऊ कोरोना संशयित दाखल
शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) तसेच इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय (मेयो) रुग्णालयांतील कोरोना बाह्यरुग्ण विभागात तपासण्यात आलेल्या रुग्णांमध्ये कोरोनासदृश्य आजाराची लक्षणे आढळून आलेल्या नऊ जणांना दाखल करण्यात आले. त्यांचे नमुने तपासणीसाठी पाठवण्यात आले. अहवाल आल्यावरच त्यांच्या आजाराची नेमकी माहिती मिळेल. मेयोच्या कोरोनासंबंधित बाह्यरुग्ण विभागात 95 तर मेयोच्या बाह्यरुग्ण विभागात 50 जणांची तपासणी केली गेली.
नागपूर: करोनाच्या विळख्यात गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पॉझिटिव्ह रुग्ण आढळत असलेल्या उपराजधानीसाठी बुधवारचा दिवस दिलासा देणारा ठरला. इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेयो), शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय (मेडिकल) आणि अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) या तीन ठिकाणी तपासलेल्या एकूण १७९ नमुन्यांपैकी यवतमाळ येथील एक पॉझिटिव्ह वगळता नागपुरातील सर्व नमुन्यांचे अहवाल निगेटिव्ह आले.
दिवसभरात सर्वच नमुने निगेटिव्ह आल्याने गेल्या काही दिवसांपासून नागपूरासाठी हा बहुधा पहिलाच प्रसंग ठरला आहे. त्यामुळे करोनाच्या प्रादुर्भावामुळे अस्वस्थ झालेल्या नागपूरकरांनी गेल्या काही दिवसांपासून पहिल्यांदाच समधानाचा श्वास घेतला. शहरात गेल्या शहरात गेल्या पाच दिवसांत ३७ रुग्ण आढळले आहेत. यातील २९ रुग्ण हे १२ ते १४ एप्रिल या तीन दिवसांमधील आहेत. त्यामुळे आरोग्य विभागच नव्हे तर अख्ख्या उपराजधानीचा जीव टांगणीला लागला होता. मात्र, बुधवारने शहरवासीयांना दिलासा दिला. गेल्या काही दिवसांपासून पॉझिटिव्ह आढळत असलेले बहुतांश रुग्ण हे करोनाची लागण झालेल्यांच्या प्रत्यक्ष- अप्रत्यक्षरित्या सहवासात आल्याने त्यांना लागण झाली आहे. यातील अनेक जण संस्थात्मक एकांतवास कक्षात ठेवण्यात आले होते.
नवीन नऊ संशयित दाखल
या घडामोडीत करोनासदृश आजाराची लक्षणे आढळल्याने मेडिकलमध्ये चार, आणि मेयोत पाच असे नऊ संशयित उपचारासाठी दाखल झाले. त्यांच्या घशातील द्रवाचे नमुने तातडीने तपासणीला पाठवण्यात आले. या घडामोडीत मेयोच्या बाह्यरुग्ण विभागात दिवसभरात तब्बल ९२ जणांची तपासणी केली गेली.
मुंबई: गेल्या काही दिवसांपासून करोनाच्या विळख्यात सापडलेल्या मुंबईसाठी दिलासादायक बातमी आहे. मुंबईत करोनाच्या नव्या रुग्णांमध्ये काल बुधवारी ३५ टक्क्यांनी घट झाली आहे. काल करोनाचे १४० रुग्ण सापडले असून २ जणांचा मृत्यू झाला आहे. गेल्या ११ दिवसांतील करोना रुग्णांचा हा सर्वात कमी आकडा आहे. गेल्या आठवड्यात या व्हायरसमुळे रोज ९ ते १६ रुग्णांचा मृत्यू होत होता. पालिकेने रुग्णांच्या टेस्टिंगचे मापदंड बदलले आहेत. त्याचा हा परिणाम असल्याचं सूत्रांनी सांगितलं.
पालिकेने गेल्या तीन दिवसांपासून टेस्टिंगचे मापदंड बदलले आहेत. त्याचे सकारात्मक परिणाम दिसून येत आहेत. मुंबईत आतापर्यंत ११४ जणांचा मृत्यू झाला आहे. तर सोमवारी ९ जणांचा मृत्यू झाला होता. गेल्या शुक्रवारपर्यंत मुंबईतील मृतांचा आकडा दोन अंकी होता. काल बुधवारी ही संख्या केवळ दोनवर आली आहे. काल मुंबईत एका ६५ वर्षीय महिलेचा मृत्यू झाला होता. या महिला मधुमेह आणि हायपरटेन्शनचा त्रास होता. त्याशिवाय एका ५० वर्षीय महिलेचाही मृत्यू झाला. काल मुंबईतच नव्हे तर संपूर्ण राज्यातली करोना रुग्णांच्या संख्येत घट झाल्याचं पाहायला मिळालं. काल राज्यात २३२ नवे रुग्ण सापडले. मंगळवारच्या तुलनेत हा आकडा ३४ टक्क्याने कमी होता. त्याशिवाय काल दिवसभरात राज्यात ९ लोकांचा मृत्यू झाला. गेल्या सहा दिवसातील ही संख्याही सर्वात कमी आहे. राज्यात करोनाचे रुग्ण वाढून २९१६ झाले आहेत. तर राज्यात आतापर्यंत १८७ लोकांचा मृत्यू झाला आहे. राज्याच्या आरोग्य विभागाच्या माहितीनुसार दिल्लीच्या निजामुद्दीन मरकजला जाऊन आलेल्यांपैकी राज्यातील ५० लोकांना करोना झाला आहे. त्यात मुंबईतल्या १४ जणांचा समावेश आहे.
राज्यात रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांचा शोध घेण्यासाठीही विशेष मोहीम राबवण्यात आली आहे. त्यानुसार केवळ एका दिवसात ७६ पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. संपर्कातून करोना बाधित झालेले आतापर्यंत ८५७ रुग्ण सापडले आहेत. ज्या ठिकाणी रुग्ण सापडले तो परिसर आणि ते राहत असलेल्या ३३ हजार ६३६ इमारती आतापर्यंत सॅनिटाइज करण्यात आल्या आहेत. पालिकेच्या माहितीनुसार मुंबईत आतापर्यंत १७ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर राज्यात आतापर्यत १८१ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
नागपूर: लॉकडाउनच्या काळात रेशन कार्ड धारकांना सरकारी स्वस्त धान्य दुकानांमधून अन्नधान्याचा पुरवठा केला जात आहे. मात्र शिधापत्रिकेवर अन्नधान्याची उचल न केलेले नागपूर शहर आणि जिल्ह्यातील सुमारे साडेतीन लाख नागरिक आहेत. त्यांना सद्याच्या परिस्थितीत अन्नधान्य देण्यात येत नसल्याचे दिसून येत आहे. याशिवाय नागपूर शहरात शेजारील राज्यातून व आजुबाजूच्या खेड्यांमधून उदरनिर्वाहासाठी येणा-या गोरगरीब मजुरांना व असंघटित क्षेत्रातील कामगारांनाही अन्नधान्याचा पुरवठा होत नाही आहे. अशा स्थितीत राज्य सरकारने तत्काळ प्रभावाने सर्व त्रुट्या दूर करून त्वरित सर्वांना अन्नधान्य पुरवठा करावा, अशी मागणी माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली. यासंदर्भात त्यांच्या नेतृत्वात शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांना निवेदन दिले.
शिष्टमंडळात आमदार अनील सोले, आमदार नागो गाणार, भारतीय जनता पार्टी नागपूर शहर अध्यक्ष प्रवीण दटके, भाजपा नागपूर जिल्हा अध्यक्ष अरविंद गजभिये यांचा समावेश होता.
शिधापत्रिकेवर अनेक लोक अन्नधान्याची उचल करत नाही. मागील तीन महिन्यात नागपूर शहरातील सुमारे २ लाख ५० हजार तर ग्रामिण भागातील एक लाख शिधापत्रिका धारकांनी अन्नधान्याची उचल केली नाही. आज लॉकडाउनच्या परिस्थितीत या सर्वांना अन्नधान्याची गरज आहे. शहरात रोजगाराच्या शोधात येणा-या अनेकांकडे शिधापत्रिका नाही. आज सर्वत्र काम बंद असल्याने अशा लोकांच्याही दोन वेळच्या अन्नाचा प्रश्न निर्माण झाला आहे. अशा मजूर व असंघटित क्षेत्रातील कामगारांना स्वस्त दरात किंवा शासनातर्फे देण्यात येणारे मोफत अन्नधान्य मिळावे, याबाबत जिल्हाधिका-यांनी पुढाकार घेवून अशा सर्व गोरगरीबांच्या रेशनची व्यवस्था करावी, अशी मागणीही निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
नागपूर: बेघरांच्या सुरक्षेच्यादृष्टीने मनपातर्फे सुरू करण्यात आलेले निवारा केंद्र आता बेघरांना सक्षम करण्याचे केंद्र ठरत आहे. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या संकल्पनेतून या निवारा केंद्रांमध्ये स्वच्छतेच्या काळजीसह बेघरांच्या आत्मनिर्भरतेसाठी विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येत आहे. शहरातील रस्ते, फुटपाथवर राहणा-या या बेघरांना सक्षम बनवून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी नागपूर महानगरपालिकेद्वारे लॉकडाउनचा अभिनव फायदा करून घेतला जात आहे.
शहरातील लॉकडाऊनच्या पार्श्वभूमीवर नागपूर महानगरपालिकेच्या समाजकल्याण विभागातर्फे दीनदयाळ अंत्योदय योजना-राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियानाच्या माध्यमातून मनपा आयुक्तांच्या पुढाकाराने नियमित निवाऱ्यासोबतच तात्पुरत्या शहरी बेघर निवाऱ्याची व्यवस्था करण्यात आली आहे. सध्या शहरातील विविध भागातील एकूण २० बेघर निवाऱ्यात १२५२ जणांनी आसरा घेतला असून मनपातर्फे चहा, नाश्ता व दोन वेळच्या संपूर्ण भोजनाचीही मोफत सोय तेथे करण्यात येत आहे. पोटाची भूक भागविताना या बेघरांच्या संपूर्ण सुरक्षेचीही पूर्णपणे काळजी घेतली जात आहे. पहिल्यांदा निवारा केंद्रामध्ये आलेल्या बेघरांची अवस्था केश वाढलेले, मळकट कपडे, मळलेले शरीर अशी होती. निवारा केंद्रामध्ये आणल्यानंतर त्यांचे केश कापण्यात आले, रोज आंघोळ करून स्वच्छ नवीन कपडे वापरायला दिले जात आहेत. अनेक स्वयंसेवी संस्थांकडून या बेघरांसाठी नवीन कपडे देण्यात आले आहेत. एकूणच मनपा आयुक्तांनी संकल्पना आणि स्वयंसेवी संस्थांच्या पुढाकारातून या बेघरांचे पूर्णत: ‘मेक ओव्हर’ झाले आहे.
अन्न आणि स्वच्छतेसह या बेघरांच्या कौशल्यांकडेही विशेष लक्ष देण्यात येत आहे. रस्त्यावर राहणा-या बेघरांना आत्मनिर्भर करून लॉकडाउन नंतर त्यांना सक्षमतेने जीवन व्यतित करता यावे यासाठी त्यांच्यातील कौशल्य विकसीत केले जात आहे. या बेघरांना वेगवेगळ्या कौशल्यांचे प्रशिक्षण देण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून काही दिवसांपूर्वी सुतार कामाचे प्रशिक्षण देण्यात आले. त्याचे फलित म्हणजे सर्व प्रशिक्षणार्थ्यांकडून सुंदर स्वरूपाचे पक्ष्यांचे घरटे तयार झाले. उन्हाळ्यामध्ये पक्ष्यांना दिलासा देण्या-यांमध्ये आता या बेघरांचेही हात पुढे आले आहेत. याशिवाय पाककलेच्या प्रशिक्षणात सर्वांनी जलेबी सुद्धा बनविली. विशेष म्हणजे या निवारा केंद्रांकरिता व तिथे राहणा-या बेघरांच्या सुविधा आणि प्रशिक्षणाकरिता अनेक स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेतला आहे. या स्वयंसेवी संस्थांच्या पुढाकारातूनच हे सर्व कार्य सुरू आहे.
बेघरांचे सन्मानाने जगणे मान्य व्हावे
या सर्व उपक्रमाची माहिती देताना मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले की, लॉकडाउनमध्ये रस्त्यावर, फुटपाथवर राहणा-या बेघरांची दुरावस्था होउ नये याकरिता मनपाने त्यांची व्यवस्था निवारा केंद्रात केली. मात्र लॉकडाउन नंतरही या बेघरांनी रस्त्यावरच जीवन व्यतित करू नये. ते या समाजाचा एक भाग आहेत आणि त्यांनी आपले सामाजिक जीवन स्वीकार करावे व समाजानेही त्यांचे सन्मानाने जगणे मान्य करावे यासाठी मनपाने त्यांच्या कौशल्य विकासाचा उपक्रम हाती घेतला आहे. त्यादृष्टीने या निवारा केंद्रातील नागरिकांमधील कौशल्य शोधून त्यांना त्याचे प्रशिक्षण दिले जात आहे. सुतारकाम, बुट बनविणे, स्वयंपाक काम यासारख्या विविध कामांमध्ये रुची असणा-यांना त्यांच्या आवडीनुसार प्रशिक्षण देण्यात येते. जेणे करून पुढे हे नागरिक दुस-यांवर निर्भर न राहता ते स्वयंसक्षमतेने जीवन जगू शकतील, असेही त्यांनी सांगितले.
२० निवारा केंद्र
शहरात मनपाच्या समाजकल्याण विभागातर्फे संचालित करण्यात येणाऱ्या शहरी बेघर निवाऱ्यासोबतच एकूण २० शहरी बेघर निवाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. सीताबर्डी येथील बुटी कन्या शाळा, पंडित रवीशंकर शुक्ला मनपा शाळा, टेकडी गणेश मंदिरासमोरील उड्डाणपुलाखालील गाळे, डिप्टी सिग्नल येथील साखरकर वाडीतील गुरु घासीदास समाज भवन, नारा इंदोरा परिसरातील मठमोहल्ला येथील वाचनालय व समाजभवन, हंसापुरी प्राथमिक माध्यमिक शाळा, रा.ब.गो.गो. मनपा शाळा सदर, कोराडी मार्गावरील तुली हॉस्टेल, रविनगर येथील अग्रसेन भवन, सेंट्रल एव्हेन्यू मार्गावरील अग्रसेन भवन चौकातील लोहाना महाजनवाडी, हिंगणा मार्गावरील एल्केम साऊथ एशिया प्रा.लि., सौराष्ट्र लेवा पटेल समाज रेवतीनगर, बेसा, सदर येथील शासकीय तंत्रनिकेतन वसतिगृह, बगडगंज येथील परमात्मा एक सेवक, हिवरी नगर येथल श्री लोहाना सेवा मंडळ, उमरेड मार्ग आवारी चौक येथील जैन कलार समाज सभागृह, मानेवाडा मार्गावरील सिद्धेश्वर सभागृह, कामठी मार्गावरील पीडब्ल्यूएस कॉलेज आणि दुर्गा माता मंदिर समाज भवन छावनी या २० ठिकाणी निवाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली आहे. संपूर्ण निवारे मिळून एकूण १५९१ इतकी क्षमता आहे. यामध्ये सध्या १२५२ नागरिकांनी आसरा घेतला आहे. यामध्ये ११२१ पुरुष, ९५ महिला आणि ३६ बालकांचा समावेश आहे.
या संस्थांद्वारे निवारा केंद्राचे संचालन
या संपूर्ण शहरी बेघर निवाऱ्यांचे संचलन विविध सामाजिक संस्थांकडे देण्यात आले आहे. सह्याद्री ग्रामीण विकास बहुउद्देशीय संस्था, मनीषनगर, संस्कृती महिला व बालविकास बहुउद्देशीय संस्था मनीष नगर, सहारा बहुउद्देशीय संस्था, लिलाई बहुउद्देशीय संस्था प्रेम नगर, परमात्मा एक बहुउद्देशीय शिक्षण संस्था तांडापेठ, लाईव्हवेल संस्था मेडिकल चौक, धम्मदीप बहुउद्देशीय शिक्षण संस्था धंतोली, संतोषी बहुउद्देशीय जनकल्याण संस्था, हनुमाननगर, ऐश्वर्या बहुउद्देशीय संस्था, नेहरू नगर, कल्पना बहुउद्देशीय मंडळ आणि नीरजा पठानिया यांचा निवाऱ्यांचे संचलन करणाऱ्या संस्था आणि व्यक्तींमध्ये समावेश आहे.
मुंबई : काही दिवसांपूर्वी ‘चेन्नई एक्सप्रेस’ चित्रपटाचे निर्माते करीम मोरनी यांच्या दोन्ही मुलींना कोरोनाची लागण झाल्याची बातमी समोर आली होती. आता त्याच्या दोन्ही मुलींची अर्थात शजा आणि जोयाची कोरोनाच्या विळख्यातून सुटका झाली आहे. परंतु करीम यांची दुसरी कोरोना चाचणी देखील पॉझिटिव्ह आली आहे. त्यामुळे त्यांच्या कुटुंबामध्ये भीतीचं वातावरण आहे. शिवाय कलाविश्वातून देखील त्यांच्या आरोग्यासाठी चिंता व्यक्त करण्यात येत आहे. आता हॉलिवूडनंतर बॉलिवूडला देखील कोरोनाची झळ बसत आहे.
सर्वप्रथम करीमयांच्या मोठ्या मुलीला म्हणजे शजा मोरानीला कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांची लहान मुलगी जोयाची देखील कोरोना चाचणी पॉझिटिव्ह आली होती. जोयावर कोकिलाबेन रुग्णालयात उपचार सुरू होते. आता तिला रुग्णालयातून डिसचार्ज देण्यात आला आहे.
डीएनएने दिलेल्या वृत्तनुसार, करीम यांना ह्रदय विकाराचा धोका आहे. त्यामध्ये भर म्हणजे त्यांची कोरोनाची दुसरी चाचणी देखील पॉझिटिव्ह आली आहे. म्हणून त्यांच्या कुटुंबियांकडून आणि मित्रपरिवाराकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे. सध्या मुंबईच्या रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू आहे. महत्त्वाचं म्हणजे डॉक्टरांनी त्यांची प्रकृती गंभीर असल्याचं सांगितलं आहे.
दरम्यान, योग्य उपचारानंतर सलग दोनवेळा त्यांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास त्यांना डिसचार्ज देण्यात येणार असल्याचं सांगण्यात येत आहे.
अमरावती शहरातील कोतवाली पोलिसांनी 18 विदेशी नागरिकांना ताब्यात घेतले आहे. या सगळ्यांना एका मशिदीतून बाहेर काढण्यात आले आहे. गेला 1 महिना ते या मशिदीत राहात असल्याची पोलिसांना माहिती मिळाली आहे. या सगळ्यांविरोधात गुन्हे दाखल करण्यात आले असून त्यांना क्वारंटाईनही करण्यात आले आङे. हे विदेशी इथे आले कसे? त्यांना मशिदीत राहायला परवानगी दिली कोणी, हे मात्र अजून कळू शकलेलं नाहीये. या विदेशी नागरिकांनी दिल्लीतील निझामुद्दीन भागातील धार्मिक कार्यक्रमाला हजेरी लावली होती का, याबाबतही पोलीस माहिती घेण्याचा प्रयत्न करत आहेत.
अमरावती शहरामध्ये कोरोनाचे 5 रुग्ण आढळले आहे. हे रुग्ण एकाच परिसरातील असल्याने हा भाग सील करण्यात आला आहे. याशिवाय दिल्लीच्या निजामुद्दीन मरकजमधल्या कार्यक्रमात सहभागी होऊन परतलेल्या बडनेरा येथील 8 नागरिकांना क्वारंन्टाईन करण्यात आले आहे. या 8 जणांना कोरोनाची लागण झाली आहे अथवा नाही हे जाणून घेण्यासाठीचा अहवाल अजून मिळायचा बाकी आहे. दिल्ली मरकजशी निगडीत कार्यक्रमात आणखी कोण सहभागी झाले होते हे खंगाळल्यानंतरही कागी नवीन हाती लागले नव्हते. मात्र 3 दिवसांपूर्वी शहरातील एका मशिदीत 18 विदेशी नागरिक राहात असल्याची पोलिसांना माहिती मिळाली. पोलिसांनी या सगळ्यांना ताब्यात घेऊन चौकशी केली. या विदेशी नागरिकांनी व्हिसाच्या नियमांचे उल्लंघन केल्याचे दिसून आले. यामुळे पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा नोंदवला आहे.
नागपूर: कोव्हिड-१९ विषाणू प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर नागपूरसह संपूर्ण देशात लॉकडाऊन सुरू आहे. यामुळे वैद्यकिय सेवेसाठी रक्ताचा तुटवडा निर्माण होत आहे. ही गरज ओळखून जिव्हाळा फाऊंडेशनच्या कार्यकर्त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीचे औचित्य साधून ७ ते १४ एप्रिल दरम्यान दररोज रक्तदान शिबिराचे आयोजन करून सामाजिक कार्यात योगदान दिले. सतत सात दिवस चाललेल्या रक्तदान शिबिराचा समारोप डॉ. आंबेडकर जयंतीच्या दिवशी करण्यात आला.
एका वेळी गर्दी होऊ नये म्हणून जिव्हाळा तर्फे सतत सात दिवस रक्तदान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. संस्थेचे मार्गदर्शक माजी खासदार अजय संचेती, आमदार डॉ. रामदास आंबटकर, आमदार प्रा. अनिल सोले, आमदार नागो गाणार, आमदार मोहन मते, माजी महापौर प्रवीण दटके यांच्या मार्गदर्शनात व उपस्थितीत शिबिराचे आयोजन करण्यात आले.
प्रारंभी उपस्थितांनी सामाजिक अंतर ठेवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले. ‘शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा’ हा डॉ. बाबासाहेबांचा संदेश आज खऱ्या अर्थाने अंमलात आणण्याची गरज आहे. यासाठी सर्वांनी संघटित होऊन घरी बसून कोरोनाविरुद्धचा संघर्ष करायचा आहे. ह्या संघर्षात कोरोनाला हद्दपार करायचे आहे, असा विचार उपस्थित पाहुण्यांनी मांडला.
जिव्हाळा फाऊंडेशनचे अध्यक्ष मनीष मेश्राम, सचिव तुषार महाजन, जयंत पाध्ये, नेहाताई लघाटे, अंगद जरुळकर, डॉ. सुमित पैडलवार, निखिल कावळे, प्रदीप कदम, प्रणव हळदे, विलास मसरे, आशुतोष बेलेकर, नीतेश समर्थ, व्यंकटेश होलगरे, रिद्दु चोले, केतन साठवणे, अभिजीत सरोदे, समीर भोयर, रोहित ठाकरे, सिद्धेश झलके, सारंग पेशन, निखिल चरडे, मोहीत भिवनकर, अपराजित फुलजले, निखिल कावळे, स्नेहल कुचनकर मोहित भिवनागर, आदित्य शास्त्रकार, प्रसाद हडप आदी पदाधिकारी व सदस्यांनी या सामाजिक कार्यात योगदान दिले. सामाजिक अंतराचे भान राखत आयोजित या रक्तदान शिबिरात ६५ व्यक्तींनी रक्तदान केले.
नागपुर: उपराजधानीवर कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढू लागला आहे. मंगळवारी पुन्हा ९ रुग्णांचे नमुने पॉझिटिव्ह आले. या रुग्णांसह नागपुरात कोरोना विषाणूची लागण झालेल्या रुग्णांची संख्या ५६ झाली आहे. विशेष म्हणजे, आज नोंद झालेले सर्वच रुग्ण संतरजीपुऱ्यातील आहेत. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करीत आहे. जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांच्या पुढाकारामुळे नागपुरात आणखी दोन प्रयोगशाळा सुरू झाल्या आहेत. नमुने चाचणीची संख्या वाढली आहे. गेल्या तीन दिवसांत आढळून आलेले २९ रुग्ण हे संस्थात्मक विलगीकरण कक्षातील आहेत. यामुळे रुग्ण वाढत असले तरी त्यांच्यापासून इतरांना होणारा संपर्क नियंत्रणात असल्याचे चित्र आहे. आज नोंद झालेल्या नऊपैकी तीन रुग्णांमध्ये आठ व १८ वर्षांची मुलगी व ५८ वर्षीय पुरुष आहे. हे सर्व सतरंजीपुऱ्यातील बाधित मृताच्या नातेवाईकांच्या संपर्कातील आहेत. यांचे नमुने मेडिकलच्या प्रयोगशाळेत तपासण्यात आले. तर उर्वरित सहा रुग्णांमध्ये ७०, २८ व १९ वर्षीय पुरुष तर ५० व दोन ४५ वर्षीय महिला आहेत. यातील एक रुग्ण इतवारी येथील आहे. तर उर्वरित पाच रुग्ण सतरंजीपुऱ्यातील आहेत. यांचे नमुने अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेने (एम्स) तपासले आहेत. यातील चौघांना मेयोत तर उर्वरित पाच रुग्णांना मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
१८० नमुने निगेटिव्ह
मेयो, मेडिकल व एम्सने मिळून १८० नमुने तपासले. यात नऊ पॉझिटिव्ह नमुने वगळता १७१ नमुने निगेटिव्ह आले आहेत. एकीकडे पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत असताना एवढ्या मोठ्या संख्येत नमुने निगेटिव्ह येत असल्याने, सोबतच कोरोनामुक्त होऊन रुग्ण रुग्णालयातून घरी जात असल्याने मोठा दिलासा आरोग्य यंत्रणेला मिळाला आहे.
एकट्या वर्ध्यातील ४० नमुन्यांची तपासणी
काही दिवसांपूर्वी वर्ध्यात उत्तर प्रदेशात जात असलेल्या ट्रक पोलिसांनी पकडला होता. यात ४० वर लोक लपून बसले होते. या सर्व लोकांना वर्ध्यातच क्वारंटाईन करून ठेवण्यात आले. यांचे नमुने मेयोच्या प्रयोगशाळेत पाठविण्यात आले असून तपासणी केली जाणार आहे.
अलगीकरणातून १२८ संशयितांना पाठविले घरी
आमदार निवास, वनामती, रविभवन, लोणारा व आजपासून सुरू झालेल्या सिम्बॉयसिस या संस्थात्मक अलगीकरण कक्षातून १२८ संशयितांना घरी पाठविण्यात आले. यांना अलगीकरण कक्षात १४ दिवस झाले असून अहवालही निगेटिव्ह आला आहे. सध्या या सहाही अलगीकरण कक्षात ४६७ संशयित आहेत.
कोरोनाची आजची स्थिती
दैनिक संशयित ५८
दैनिक तपासणी नमुने १८०
दैनिक निगेटिव्ह नमुने १७१
नागपुरातील पॉझिटिव्ह नमुने ५६
नागपुरातील मृत्यू १
डिस्चार्ज केलेले पॉझिटिव्ह रुग्ण ११
डिस्चार्ज केलेले संशयित रुग्ण ९७८
क्वारंटाईन कक्षात एकूण संशयित ४६७
नागपूर: लॉकडाउनमध्ये जीवनावश्यक वस्तू घरपोच मिळण्यासाठी आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या संकल्पनेतून व ग्लोबल लॉजिक व नीती या कंपनीच्या पुढाकारातून ग्राहकांसाठी ‘फार्म टू होम’ (Farm to Home) हे विशेष ॲप तयार करण्यात आले आहे. याशिवाय दुकानातील उपलब्ध वस्तूंच्या साठ्याच्या नोंदणी व पुरवठ्यासाठी दुकानदार किंवा सेवा पुरवठादार यांच्याकरिता ‘बास्केट ओनर’ (Basket Owner) हे सुद्धा ॲप तयार करण्यात आले आहे.
कोरोनाचा वाढता संसर्ग लक्षात घेता लॉकडाउनचा कालावधी वाढविण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनीही विशेष खबरदारी घेत घराबाहेर पडणे टाळावे. नागरिकांना दैनंदिन जीवनावश्यक वस्तू घरपोच मिळाव्यात यासाठी मनपातर्फे आवश्यक सर्व प्रयत्न केले जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणजे दुकानदार आणि ग्राहक या दोघांच्याही सुरक्षेच्या दृष्टीने दोन विशेष ॲप तयार करण्यात आले आहेत.
ग्राहकांसाठीच्या ‘फार्म टू होम’ या ॲपद्वारे दुकानामध्ये उपलब्ध वस्तूंचा साठा आणि त्याच्या किंमती लक्षात घेउन ग्राहकांना आपली मागणी नोंदविता येईल. त्यानुसार आवश्यक वस्तूंचा घरपोच पुरवठा करण्यात येईल.
‘बास्केट ओनर’ हे ॲप दुकानदार किंवा सेवा पुरवठादारांकरीता तयार करण्यात आले आहे. यासाठी आधी दुकानदार किंवा सेवा पुरवठादारांना आवश्यक माहिती सादर करून नोंदणी करावी लागेल. नोंदणी केल्यानंतर दुकानामध्ये उपलब्ध वस्तू अथवा मालाची माहिती, साठा, त्याची किंमत याचा तपशील सादर करावा लागेल.
सद्यस्थितीत मनपाच्या अधिकृत nmcnagpur.gov.in या संकेतस्थळावरून हे दोन्ही ॲप डाउनलोड करता येउ शकतात. ज्यांना ॲप डाउनलोड करणे शक्य नाही त्यांनी ०७१२-२५२२२२२ या क्रमांकावर संपर्क साधावा. संपर्क साधणा-या ग्राहक आणि दुकानदारांना जीवनावश्यक वस्तूंसंदर्भात आवश्यक ती सर्व मदत केली जाईल. ग्लोबल लॉजिक (Global Logic) कंपनीद्वारे दोन्ही ॲप तयार करण्यात आले असून त्याला ऋत्विक जोशी यांच्या नीती (NEETII) या कंपनीचे तांत्रिक सहकार्य लाभले आहे.
याशिवाय जे दुकानदार स्वत:च्या मनुष्यबळाद्वारे घरपोच सेवा देण्यास इच्छूक आहेत त्यांनीही ॲपवर नोंदणी करावी किंवा संपर्क क्रमांकावरून माहिती कळवावी, असे आवाहनही मनपाद्वारे करण्यात आले आहे.
नागपूर: नागपूर महानगरपालिका हद्दीतील सतरंजीपुरा झोन अंतर्गत दलालपूरा प्रभाग क्रमांक २१ येथे कोरोनाबाधित रुग्ण आढल्याने व त्याचा प्रादुर्भाव शहरातील इतर भागात होउ नये म्हणून नागरिकांची सुरक्षा लक्षात घेता हा संपूर्ण परिसर सील करण्याचे आदेश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत.
या आदेशानुसार सतरंजीपुरा झोन क्रमांक ७ अंतर्गत असलेल्या प्रभाग क्रमांक २१ च्या दक्षिण-पश्चीमेस मस्कासाथ चौक, उत्तर-पश्चीमेस चकना चौक, उत्तर-पूर्वेस महाजन किराणा, पूर्वेस शिवशक्ती इनक्लेव, दक्षिण-पूर्वेस दहीबाजार पूल, दक्षिणेस रोकडे बिल्डींग प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहेत. या भागात येणारे व जाणारे सर्व मार्ग तात्काळ बंद करून या भागाच्या सीमा आवागमनासाठी पुढील आदेशापर्यंत बंद करण्यात येत असल्याचे आदेशात नमूद करण्यात आले आहे.
शासकीय व निमशासकीय सेवेतील अत्यावश्यक सेवेत कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी, आवश्यक तातडीची वैद्यकीय कारणे तसेच अंत्यविधी, वैद्यकीय सेवेशी संबंधित खाजगी डॉक्टर, परिचारीका, मेडीकल स्टोअर्स दुकानदार, पॅथॉलॉजिस्ट, रुग्णवाहिका, पोलिस विभागामार्फत पासधारक असलेले जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारे व्यक्ती यांना या आदेशातून वगळण्यात आले आहे.
बुलडाणा :बुलडाणा जिल्ह्यात गृह विलगीकरणामध्ये असलेल्या 70 नागरिकांनी आपला 14 दिवसांचा निरीक्षण कालावधी पूर्ण केला आहे.यामुळे त्यांची यातून मुक्तता करण्यात आली आहे. असं असलं तरी गृह विलगीकरणात सोमवारी 30 रुग्णांची वाढ झाली आहे. सद्यस्थितीत गृह विलगीकरणात 93 नागरिक आहेत. संस्थात्मक विलगीकरणात एकूण 80 जण होते ज्यातील 30 नागरिकांना सोमवारी सुटी देण्यात आली. मात्र दुसरीकडे यात संस्थात्मक विलगीकरणात सोमवारी 3 नागरिकांची वाढ झाली. ज्यामुळे हा आकडा आता 53 झाला आहे.
बुलडाण्यातील अलगीकरण कक्षात 28 मार्च रोजी मृत पावलेल्या कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात 4 जण आले होते. यामुळे त्यांना अलगीकरण कक्षात ठेवण्यात आले होते. याला आता 14 दिवस पूर्ण होत असून त्यांचे नमुने सोमवारी प्रयोगशाळेत पुन्हा तपासणीसाठी पाठविण्यात आले. चाचणीचा अहवाल हा आज प्राप्त होण्याची शक्यता आहे.
जिल्ह्यात आयसोलेशन कक्षात सोमवारी एकही संशयित दाखल करण्यात आलेला नाही. सद्यस्थितीत खामगांव आयसोलेशन (अलगीकरण) कक्षात 1, बुलडाण्यात 18 व शेगांव येथे 12 व्यक्ती दाखल करण्यात आले आहे. अशाप्रकारे जिल्ह्यात एकूण 31 व्यक्ती अलगीकरणात आहेत. घरीच स्वतंत्र खोलीत 14 दिवस निरीक्षण कालावधी पूर्ण केलेल्या आजपर्यंत 145 नागरिकांची निरीक्षणातून मुक्तता करण्यात आली. तसेच संस्थात्मक विलगीकरणातून 14 दिवसांचा निरीक्षण कालावधी पूर्ण केल्यानंतर सोमवारपर्यंत 162 नागरिकांना निरीक्षणातून घरी सोडण्यात आले आहे. अलगीकरणातून सोमवारी एकालाही सुटी देण्यात आली नाही.
मुंबई: करोना व्हायरसला लढा देण्यासाठी देशातील सर्व एकत्र आले असून प्रत्येकजण जमेल तेवढी मदत करत आहेत. अशात बॉलिवूडचा बादशाह शाहरुख खानने महाराष्ट्रातील डॉक्टर्स आणि नर्सेससाठी 25 हजार पीपीई किट्सचे वाटप केले आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी ट्विट करत शाहरुखच्या या मदतीसाठी त्याचे आभार मानले आहेत.
शाहरुख खान यांनी 25 हजार पीपीई कीट देऊन केलेली मदतीसाठी त्यांचे मनापासून आभार. करोना विषाणूविरुद्ध लढा देण्यामध्ये याची आम्हाला मदत होईल आणि मेडिकल टीमच्या आरोग्याची काळजी देखील घेतली जाईल, असं ट्विट आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केलं आहे. यावर शाहरुखनेही त्यांचे आभार मानले आणि ही वेळ मानवजातीच्या सुरक्षेसाठी सर्वजण एकत्र येऊन लढा देण्याची असल्याचे म्हटलं. त्याने म्हटले की मदत करणे आमचे कर्तव्य आहे. आपलं कुटंब आणि टीम सुरक्षित आणि स्वस्थ राहो, अशी कामना केली आहे.
या व्यतिरिक्त शाहरुखने वांद्रे येथील त्याची चार मजली कार्यालयीन इमारत विलगीकरणासाठी दिली आहे. शिवाय त्याने आपल्या कंपन्या कोलकाता नाइट रायडर, रेड चिलीज एंटरटेनमेंट, मीर फाऊंडेशन आणि रेड चिल्लीज VFX डून सात संस्थांना निधी देत असल्याचं जाहीर केलं होतं. याशिवाय मोठ्या प्रमाणात मदत जाहीर केली आहे.
नागपूर: करोना विषाणूची साखळी गेल्या काही दिवसांपासून विदर्भा भोवती करकचून आवळली जात आहे. रविवारी एकाच दिवशी २० जणांचे नमूने पॉझिटिव्ह आल्याच्या संकटातून जाणाऱ्या नागपुरला सोमवारी मध्यरात्री नंतर आणखी एक धक्का बसला. त्यामुळे अर्धशतकाच्या दिशेने संत्रानगरीने आणखी एक पाऊल पुढे टाकत बाधितांचा आता आकडा ४८ वर पोचला.
सोमवारी मध्यरात्री प्राप्त अहवालानुसार करोना विषाणूचा अंश आढळलेला नवा रुग्ण वाडी येथील रहिवासी आहे. त्यामुळे आता करोना विषाणूच्या आणखी एक नवी साखळी जोडली जात आहे. आधी बजाज नगर, त्यानंतर खामला, जरिपटका, सतरंजीपूरा, मोमिनपूरा, काटोल रोड अशा चौफेर वाढणाऱ्या करोनाच्या साखळीत सोमवारी आता वाडी परिसराचीही भर पडली. त्यामुळे चोहो बाजूंनी करोनाचा विळखा वाढत असल्याने नागपूरकरांच्या चिंतेत दिवसागणिक वाढ होत आहे.
इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात पॉझिटिव्ह आलेला हा रुग्ण काही दिवसांपूर्वी राजस्थान येथील अजमेर येथून परतला होता.
नागपुरात आल्यानंतर त्याला आमदार निवासातल्या सक्तीच्या एकांतवास कक्षात दाखल करण्यात आले होते. अजमेर येथील प्रवासादरम्यान आणखी एकजण त्याच्या सोबत होता. त्यामुळे आता या दोघांच्या सहवासात आलेल्यांची साखळी जोडून पाहिली जाणार आहे. मेयोतील खात्रीलायक वैद्यकीय सूत्रांकडून मिळत असलेल्या माहितीनुसार गेल्या ४८ तासांमध्ये करोनाच्या चाचणीत पॉझिटिव्ह आढळलेला हा २१ वा बाधित ठरला आहे. अर्धशतकाच्या दिशेने उपराजधानीने सोमवारी मध्यरात्रीच्या काळोखात आणखी एक पाऊल पुढे टाकले.
नवी दिल्ली :कोरोना महामारीला रोखण्यासाठी भारतात ३ मे पर्यंत लॉकडाऊनमध्ये वाढ करण्यात आली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (दि. १४) याची घोषणा केली. पंतप्रधांनी आज देशाला संबोधीत केले. यावेळी ते बोलत होते.
पीएम मोदी म्हणाले की, सोशल डिस्टंसिंग आणि लॉकडाऊनचा मोठा लाभ देशाला मिळाल आहे. भारताने योग्य वेळी योग्य निर्णय घेतले. जर हे निर्णय योग्यवेळी घेतले नसते तर काय झाले असते याच्या कल्पनेनेच अंगावर काटे उभे राहतात. अन्य देशांशी भारताची तुलना करणे योग्य नाही, तरी देखील तुलनेने भारतातील करोनाबाधितांची संख्या ३० टक्क्यांनी कमी आहे, असे त्यांनी सांगितले.
ते म्हणाले, आपण संयम ठेवू, नियमांचे पालन करू आणि कोरोनासारख्या साथीला आम्ही पराभूत करू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. तसेच देशवासीयांनी कोरोनावर मात करण्यासाठी सप्तपदीचे पालन करण्याचे आवाहन यावेली मोदींनी केले.
काय आहेत सप्तपदी सूत्रे…
पहिली गोष्ट :
आपल्या घरातील वडीलधा-यांची विशेष काळजी घ्या. विशेषत: ज्यांना जुने आजार आहेत, आपल्याला त्यांच्यासाठी अतिरिक्त काळजी घ्यावी लागेल. वडीलधा-यांना कोरोनापासून खूप सुरक्षित ठेवावे.
दुसरी गोष्ट :
लॉकडाउन आणि सामाजिक अंतराच्या लक्ष्मण रेषेचे पूर्णपणे पालन करा. मास्कचा काटेकोरपणे वापर करा.
तिसरी गोष्ट :
आपली प्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी, आयुष मंत्रालयाने दिलेल्या सूचनांचे पालन करा. गरम पाणी प्या.
चौथी गोष्ट :
कोरोना संक्रमणाचा प्रसार रोखण्यासाठी आरोग्य सेतु मोबाइल अॅप डाउनलोड करा. हे अॅप डाउनलोड करण्यासाठी इतरांना प्रेरित करा.
पाचवी गोष्ट :
शक्य होईल तितक्या गरीब कुटुंबांची काळजी घ्या. त्यांच्या अन्न-धान्याची आवश्यकता पूर्ण करण्यासाठी प्रयत्नशील रहा.
सहावी गोष्ट :
आपल्याबरोबर आपल्या व्यवसायात, आपल्या उद्योगात काम करणा-या लोकांप्रती संवेदनशील रहा. कुणालाही नोकरीवरून काढू नका.
सातवी गोष्ट :
देशाचे कोरोना योद्धे, जसे की, डॉक्टर्स, नर्स, आरोग्य कर्मचारी, सफाई कामगार, पोलिस कर्मचा-यांचा पूर्ण आदर राखा.
पीएम पुढे म्हणाले की, भारतात कोरोनाची समस्या दिसता क्षणी आपण त्यावर उपाय करणे सुरू केले. भारतीय नागरिकांनी दाखवलेला संयम प्रेरणादायी आहे. देशव्यापी लॉकडाउनच्या काळात लोकांनी संयम पाळल्याचे दिसले. यासाठी मी देशवासीयांचे आभार मानतो.
पंतप्रधानांनी देशातील विविध राज्यांमधील सण आणि नववर्षानिमित्त जनतेला दिल्या शुभेच्छा दिल्या. तसेच त्यांनी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना जयंतिनिमित्त श्रद्धांजली वाहिली. जयंतीदिनी मी डॉ. बाबासाहेब आंबोडकरांना नमन करतो, असे ते म्हणाले.
Get ready for a journey filled with madness, laughter and non-stop entertainment as Sony SAB is all set to bring the timeless classic TV series ‘Office Office’ back to your television screens.
Yes, you read it right! Pankaj Kapur as Mussaddi Lal Tripathi aka the common man and the office staff Asawari Joshi as Usha Madam, Sanjay Mishra as Shukla, Deven Bhojani as Patel, Manoj Pahwa as Bhatia, Hemant Pandey as Pandey Ji and Eva Grover as Tina are coming back to entertain you with an office culture like nowhere else! These loveable office workers will be seen lighting up television screens once again from April 13 from Monday to Friday at 6 PM and 10:30 PM only on Sony SAB.
Considered as one of India’s most iconic shows – a comedy for all generations, Office Office revolves around Mussadilal and his struggle to with bureaucratic hurdles to get his work done from an office filled with employees all having annoying yet entertaining and unique characteristics.
Originally aired in 2001, the show presented a fresh take on comedy with immaculately crafted episodic stories and an array of various characters that continue to be highly relatable years later as well. The roles for each character had been written perfectly along with their trademark ‘takiya kalams’ such as Usha Madam’s ‘Wohi Toh’ and Patel Ji’s ‘Do baatein’.
Manoj Pahwa essaying the role of Bhatia said, “It’s a good feeling that when you have worked so hard for a show, which also performed really well in its time, is now returning on Sony SAB for the audience to enjoy. People who have loved the show previously will be able to reminisce the memories and those who haven’t seen it but only heard about it, will be able to see it. Those were some really great days and it was a lovely experience shooting for this show, with such an amazing bunch of actors. I had a really good rapport with the entire team and I’ve specially learnt a lot from Pankaj Kapur sir, who was our senior. The entire team had such a good bond that we used to look forward to go on sets and have fun while shooting. It’s a great memory.”
Hemant Pandey essaying the role of Pandey Ji said, “My happiness knows no bounds that the show which is so close to my heart will be back on Sony SAB. The timing of Office Office making a comeback is perfect as during this testing time the families can come together and watch a show that only brings happiness. Like my colleague Patel ji used to say, ‘ab toh do baatein hogi’ – this show will make people nostalgic and also make younger audience experience comedy like never before. I have beautiful memories attached to the show and even I cannot wait to watch Office Office again. The show earned immense love and support back then and even today the story is so relevant and relatable. Office Office created classic comedy which can never grow old and I look forward to reliving my old memories through the show.”
Deven Bhojani essaying the role of Patel said, “I am ecstatic as two of my shows, Bhakharwadi and Office Office will now be airing on the same channel, Sony SAB. It’s a great feeling that Office Office is coming back. We had done it during 2001 – 2002. And after almost 2 decades, it would go on air again. The show is still relatable the way it was then. How a common man suffers and struggles when he needs to get something important done amidst the offices of corrupt people. In the period of lockdown, when the whole world is going through tension, pain and sadness, re-run of OFFICE OFFICE will divert their minds and bring smiles to their faces. I myself am looking forward for such a show.”
Asawari Joshi essaying the role of Usha Madam said, “After two decades we are coming back for the viewers of Sony SAB. We are going through a tough and challenging time right now and to make this phase much easier for everyone and to spread happiness, Office Office is coming your way. It seems unreal that it has been over 20 long years since we started shooting for this show. All the immensely talented artists of Office Office were mainly from the theatre background and I believe magic happens when theater artists come together on a project. All the characters have received so much love from the viewers for their uniqueness. We all are back again to entertainment the fans and viewers of Office Office only on Sony SAB.”
While you can’t travel your own office, Sony SAB brings Office Office to you, from 13th April every Monday-Friday at 6 PM and 10:30 PM on Sony SAB
नागपूर : कोरोनाचा प्रादुर्भाव झालेल्या रूग्णांकरीता आणि संशयितांकरीता आयसोलेशन वॉर्ड तयार करण्यात आले आहेत. मात्र, रुग्णांची वाढती संख्या बघता भविष्यात आयसोलेशन वॉर्डासाठी जागा कमी पडू शकते. हा विचार करून गरज भासल्यास जामा मशिदीचा वापर आयसोलेशन वॉर्ड म्हणून करा, ‘असे मशिदीच्या कमिटीने जिल्हाधिकाऱ्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे. त्याचबरोबर, जामा मशिदीच्या तळघराचा भाग आयसोलेशन वॉर्डात रुपांतरित केला जाऊ शकतो. ही जागा सुमारे ५ हजार वर्ग फूट इतकी आहे. याखेरीज जागा अपुरी पडत असल्यास मोमिनपुऱ्यातील मशिदी आणि मदरस्यांमधील खोल्यासुद्धा उपलब्ध केल्या जाऊ शकतात असेही कमिटीच्या सदस्यांनी या निवेदनात म्हटले आहे.
आवश्यकता नसल्यास घराच्या बाहेर पडू नका : जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे
नागपूर शहरात कोरोनाचा संसर्ग वाढत असून नागरिकांनी आवश्यकता नसल्यास घराबाहेर पडू नये. प्रशासनाने वारंवार आवाहन करुनसुद्धा नागरिक नियमांचे उल्लंघन करताना दिसतात. ही बाब गंभीर असून विनाकारण घराबाहेर न पडता घरातच सुरक्षित राहा, असे कळकळीचे आवाहन जिल्हाधिकारी रविंद्र ठाकरे यांनी केले.
मुस्लिम समाजबांधवांनी नमाज पठन घरातच करावे, असे आवाहन मौलवींनी केले आहे. जिल्हाधिकारी कार्यालयात मुस्लिम समाजातील प्रमुख मान्यवरांची बैठक आयोजित करण्यात आली होती. अब्दुल बारी पटेल, अमन फाऊंडेशनचे झाकीर खान, मौला हाफीज मसूद अहमद व हाफीज अब्दुल वाशिद यावेळी उपस्थित होते. मुस्लिम समाज बांधवांनी घरातच नमाज पठन करावे, असे कळकळीचे आवाहन मुस्लिम समाजातील प्रतिष्ठित व्यक्तींनी समाज बांधवांना केले.
जिल्हाधिकारी म्हणाले की, नागपूर शहरातील नागरिकांनी लॉकडाऊनचे काटेकोर पालन करणे आवश्यक आहे. शासनाच्या नियमाप्रमाणे वागणे गरजेचे असून कोरोना संसर्ग रोखण्यासाठी सोशल डिस्टन्सिंग हा एकमेव पर्याय आहे. गरज नसल्यास घराबाहेर पडू नये, असे कळकळीचे आवाहन त्यांनी जनतेला केले.
नागपूर: राज्याच्या नकाशावर करोना प्रादुर्भावाचे हॉट स्पॉट म्हणून पुढे येत असलेल्या उपराजधानीसाठी रविवारचा दिवस नागपूरकरांच्या काळजात धडकी भरविणारा ठरला. दिवसभरात १४ जणांना करोना विषाणूची लागण झाल्याच्या धक्यातून शहर सावरलेही नव्हते.तोच अवघ्या काही तासांत यात आणखी सहा जणांची वाढ झाली. त्यामुळे एकट्या नागपुरातील करोना बाधितांचा दिवसभरातील आकडा १४ वरून थेट २० वर जाऊन थांबला आहे. हा विदर्भच नव्हे तर मध्य भारतातील करोना बाधितांचा उच्चांकी आकडा ठरला आहे.
त्यामुळे नागपूरातील करोनाबाधितांचा आतापर्यंतचा आकडा ४१ वरून ४७ वर गेला आहे. अर्धशकताच्या दिशेने ही वाढती संख्या नागपूरकरांच्या चिंतेत भर घालणारी आहे. यातील सर्वांत धक्कादायक बाब म्हणजे रविवारीमध्यरात्री प्राप्त अहवालात करोना विषाणूचा नव्याने अंश सापडलेली ४२ वर्षीय महिला आणि १४ वर्षीय मुलगा १५ वर्षीय अल्पवयीन मुलगी ही सतरंजीपूरा येथील रहिवासी आहेत. त्यामुळे ही साखळी गेल्या रविवारी दगावलेल्या करोना बाधिताच्या सहवासाशी जोडली जात आहे. गेल्या सात दिवसांत या साखळीत आणखी किती जण जोडले गेले, याचा शोध घेण्याचे आव्हान प्रशासनासमोर उभे ठाकले आहे.
गेल्या काही दिवसांपासून नागपुरातीलच नव्हे तर संपूर्ण विदर्भातील करोना बाधितांचा आकडा सातत्याने वाढत आहे. सुरुवातीला यवतमाळ येथील आठ, त्यानंतर अकोल्यातील सात, बुलडाण्यातील पाच करोना बाधितांमध्ये एकाच दिवशी वाढ झाली होती. या घटनाक्रमात रविवारी नागपूरच्या साखळीने भर घातली. शहरात एकाच दिवशी करोनाची लागण झालेल्यांच्या संख्येत १४ ची भर पडली. या साखळीची जोडही सतरंजीपूरातील बाधिताशी जुळली असताना यात अजून तिन जण वाढले. त्यामळे नागपुरातील बाधितांची संख्या ४७ वर गेली आहे.
मोमिनपुरा, सतरंजीपुरा हे भाग आता करोनाबाधितांच्या बाबतीत हॉटस्पॉट ठरत आहेत. शिवाय रविवारी सकारात्मक आलेल्यांपैकी अनेक जण हे आमदार निवासातल्या संस्थात्मक एकांतवासातले होते. मधल्या काळात चाचण्यांची साधने अपुरी असल्याने त्यांचे निदान थांबले होते. आता निदान चाचण्यांच्या पायाभूत सुविधा वाढल्या आहेत. त्यामुळे बाधितांचे निदान होऊन आकडा देखील वाढण्याची जोखीम दिवसागणिक वाढत आहे. शिवाय मालधक्का रोड, अमिया शंकर शाळा, मासूरकर चौक, मालधक्का रोडवरील हॉटेल मदिनाचा परिसर यंत्रणेच्या रडारवर आला आहे.
नागपूर, ता. १२ : नागपूर शहरामध्ये कोरोनाचा धोका आणखी वाढला आहे. रुग्णांची संख्या वाढतेच आहे. किमान आतातरी लॉकडाऊनदरम्यान घराच्या बाहेर पडू नका. नागपूर महानगरपालिका, जिल्हा प्रशासन आणि पोलिस प्रशासन जनतेची काळजी घेते आहे. तुम्ही खबरदारी घ्या, आम्ही जबाबदारी घेतो, या शब्दात नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी भावनिक आवाहन करीत लोकांना सहकार्य करण्यासाठी साद दिली.
रविवारी (ता.१२) शहरात १४ नवीन कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. या पार्श्वभूमीवर आयुक्त तुकाराम मुंढे यांनी व्हिडिओ संदेशाच्या माध्यमातून नागरिकांना गांभीर्य सांगितले आणि सहकार्य करण्याचे आवाहन केले.
रविवारी आढळलल्या १४ रुग्णांमध्ये चार जबलपूरचे, एक कामठी येथील आणि उर्वरित ९ नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील रुग्ण आहेत. कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढल्याने आपणा सर्वांना आता आणखी जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. त्यामुळे कुणीही विनाकारण घराबाहेर पडू नये, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.
यासंबंधी माहिती देताना मनपा आयुक्तांनी सांगितले की, सर्व १४ ही रुग्णांना यापूर्वीच ‘क्वारंटाईन’ करण्यात आले होते. त्यांची चाचणी घेतल्यानंतर रविवारी ते कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे स्पष्ट झाले. त्यांनी पूर्वीच क्वारंटाईन केल्यामुळे त्यांच्यापासून इतरत्र कोरोना पसरण्याची भीती नाही. दिल्ली येथून प्राप्त माहितीच्या आधारे २५१ व्यक्ती आणि त्यांच्या संपर्कात आलले ३० अशा एकूण २८१ व्यक्तींना ‘क्वारंटाईन’ करण्यात आले होते. दिल्ली येथून आलेल्यांमध्ये ८ जण मूळचे जबलपूरचे आहेत. या आठ जणांपैकी चौघे कोरोनाग्रस्त असल्याने निष्पन्न झाले आहे.
कोरोनाग्रस्त रुग्ण आढळलेला परिसर खबरदारीच्या दृष्टीने सील करण्यात येतो. त्यानुसार सदर रुग्ण राहत असलेला सतरंजीपुरा, मोमीनपुरा परिसर पूर्णतः सील करण्यात आला आहे. तर काही रुग्ण काटोल रोड व कामठी रोड भागातील असून तो परिसरही सील करण्यात येत आहे. संसर्ग पसरू नये यासाठी मनपातर्फे सर्वेक्षण करण्यात येणार आहे. यासाठी मनपाने टीम निर्धारित केल्या असून १४ दिवस मनपाची चमू निर्धारित परिसर, तेथील घरे आणि लोकसंख्या या सर्वांची माहिती घेऊन सर्वेक्षण करणार आहेत. तरी सर्व नागरिकांनी सर्वेक्षण करणा-या चमूला व मनपा प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.
नागपूर शहरामध्ये आज रविवारी १४ नवे कोरोना पॉझिटीव्ह रुग्ण आढळले आहेत. यामध्ये ४ रुग्ण मुळचे जबलपूरचे, एक कामठी येथील आणि उर्वरित ९ नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील रुग्ण आहेत. यासंदर्भात विस्तृत माहिती देताना मनपा आयुक्त तुकाराम मुंढे.@Tukaram_IndIASpic.twitter.com/4cA4jCbKb7
दक्ष राहा, लक्षणे आढळल्यास त्वरित मनपाला माहिती द्या
नागपूर महानगरपालिका क्षेत्रातील रुग्णांची वाढती संख्या ही नागपूरकरांसाठी चिंतेची बाब आहे. त्यामुळे आता प्रत्येकाला अधिक जास्त काळजी घ्यावी लागणार आहे. आपल्या ३० लाख लोकांचे आरोग्य आपल्याच हातात आहे. त्यामुळे या ३० लाख लोकांनाच आता ठरवायचे आहे की कोरोनाशी लढा कसा द्यायचा. संक्रमण वाढत आहे, दक्ष राहा. अशा स्थितीत घराबाहेर न पडणे जास्त संयुक्तिक आहे. जीवनावश्यक वस्तू शक्यतो फोनवरूनच घरी मागवा. बाहेर जाण्याची गरज पडल्यास मास्क वापरा, सोशल डिस्टंनसिंगचे पालन करा. कुणाच्या संपर्कात आल्यास, ताप, सर्दी, कोरडा खोकला येत असेल तर त्वरित मनपाच्या नियंत्रण कक्षाला माहिती द्या. वेळेत उपचार झाल्यास कोरोनापासून लवकर बरे होता येईल. त्यामुळे सजग राहा, निमयांचे पालन करा, प्रशासनाला सहकार्य करा, असेही आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले.
नागपूर, ता. ११ : कोव्हिड-१९ हा नागरिकांच्या जीवावर उठलेला या शतकातला भयानक विषाणू आहे. त्याविषयी सर्वप्रथम जाणून घ्या. स्वत:ची आणि कुटुंबाची काळजी घ्या. शासनाच्या निर्देशाचे पालन करा. घरीच राहा आणि कोरोनाशी योद्धा बनून लढा द्या, सामाजिक अंतर पाळा, अत्यावश्यक कामाकरिताच घराबाहेर पडा. लवकर घरी जा. घरात प्रवेश करण्याअगोदर हात स्वच्छ धुवा, असे भावनिक आवाहन नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले. ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून त्यांनी शनिवारी (ता. ११) नागरिकांशी संवाद साधला आणि प्रश्नांना उत्तरे दिली.
कोव्हिड-१९ बद्दल आजही बहुतांश नागरिकांना नेमकी माहिती नाही. त्याची उत्पत्ती, त्याचा प्रसार, त्याची भयावहता, त्याचे गांभीर्य, त्यावरील उपाययोजना आदींबाबत नागरिकांच्या मनात असलेल्या शंकांचे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी समाधान केले. कोव्हिड-१९ म्हणजे नेमके काय हे सांगताना त्यांनी वैद्यकीय दृष्टिकोनातून अगदी सोप्या भाषेत नागरिकांना त्याची माहिती करुन दिली. एकदा कोरोना विषाणू गळ्याखाली उतरला की नंतर उपचार कठीण होऊन बसतो. त्यामुळे त्याची लक्षणे आढळताच तातडीने डॉक्टरांकडून तपासणी करून घ्या. वेळीच उपचार घ्या. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार क्वॉरंटाईन व्हा आणि समाजाला आपल्यापासून धोका होणार नाही, याची काळजी घ्या, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
पूर्वी मास्क वापरण्याची गरज नाही, असे सांगितले गेले मात्र नंतर मास्क वापरणे बंधनकारक करण्यात आले, असे का या प्रश्नाला उत्तर देताना मनपा आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले, राज्यात कोरोनाने जेव्हा शिरकाव केला तेव्हा त्याची तीव्रता कमी होती. त्यानंतर हळू हळू संख्या वाढत गेली. यासंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेच्या निर्देशानुसार केंद्र आणि राज्य शासन वेळोवेळी मार्गदर्शक तत्त्वे जाहीर करते. पूर्वी शासनाच्या निर्देशासनुसार मास्क प्रत्येकाने वापरणे बंधनकारक नव्हते. मात्र, आता कोरोनाचा प्रसार आणि वाढती रुग्णसंख्या बघता आपल्यापासून दुसऱ्याला आणि इतरांपासून आपल्याला रोग होऊ नये, ही काळजी घेण्यासाठी शासनानेच मास्क वापरणे बंधनकारक केले आहे. त्यामुळे मास्कचा वापर करा आणि स्वत:सोबतच इतरांनाही सुरक्षित ठेवा, असे त्यांनी सांगितले.
कॉटन मार्केट बंद करण्याचा निर्णय योग्यच
कॉटन मार्केट आणि नव्याने सुरू करण्यात आलेले इतर पाच मार्केट मनपाने बंद केले. यात नियोजन फसले, यंत्रणा कमी पडतेय की नागरिक आवरत नाही. या प्रश्नावर मनपा आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले, मनपा प्रशासन जे निर्णय घेते ते परिस्थिती पाहून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी निर्णय घेत असते. कॉटन मार्केटमध्ये कितीही आवरण्याच्या प्रयत्न केला तरी प्रचंड गर्दी व्हायची. त्यामुळे ते बंद करून इतर काही ठिकाणी मैदानावर गाड्या पाठविणे सुरू केले. मात्र, तेथेही नागरिकांनी सामाजिक अंतर पाळले नाही म्हणून नागरिकांच्या सुरक्षिततेसाठीच ते बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, अनेक शेतकरी संघाशी संपर्क साधून त्यांच्या माध्यमातून वॉर्डावॉर्डात भाजीपाला पोचविला जात आहे. सध्यातरी नागरिकांना भाजीपाला मिळण्यात कुठली अडचण नसल्याचे ते म्हणाले.
गरज असेल तिथे धान्य आणि जेवण द्या
अनेक ठिकाणी गरजूंना मदत पोहोचत नसल्याचे नागरिकांनी लक्षात आणून देताच मनपा आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले, नागपूर महानगरपालिका युद्धपातळीवर अशा गरजूंना अन्न पोहोचविण्याचे काम सामाजिक संस्थांच्या सहकार्याने करीत आहे. यासाठी ०७१२-२५३९००४ हा दूरध्वनी क्रमांक आहे. ज्यांना रेशनची गरज आहे अशा गरजूंना रेशनसुद्धा पुरविण्यात येत आहे. त्यामुळे असे काही आढळल्यास नागरिकांनी मनपाला माहिती द्यावी. मनपाची चमू गरजूंपर्यंत अन्न पोहोचविण्यास कटीबद्ध आहे, असेही ते म्हणाले.
घरातूनच साजरी करा डॉ.आंबेडकर जयंती
१४ एप्रिल रोजी भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी करण्यात येते. मात्र यावर्षी सार्वजनिक रूपाने जयंती साजरी करता येणार नाही. डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या ‘शिका, संघटित व्हा, संघर्ष करा’ या विचाराला आपल्याला आत्मसात करायचे आहे. कोरोनाला हरविण्यासाठी आता ख-या अर्थाने संघटित होउन संघर्ष करण्याची वेळ आहे. त्यामुळे डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर घरातच नतमस्तक होउन सर्वांनी कोरोनाशी घरात राहून लढण्याचा संदेश द्यावा, असे आवाहनही मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले.
Makar Sankranti Wishes : Makara Sankranti (Sankranthi) is a Hindu festival that encourages people to live in peace and harmony. Here are best quotes,...