पिझ्झा डिलिव्हरी बॉय कोरोना पॉझिटिव्ह; तब्बल ७२ जणांना क्वारंटाईन होण्याची वेळ!

pizza-delivery

नवी दिल्ली : दिल्लीमध्ये एका डिलिव्हरी बॉयच्या हातचा पिझ्झा खाणे ७२ जणांना महागात पडले आहे. पिझ्झा डिलिव्हरी बॉय कोरोना पॉझिटिव्ह निघाला आहे. त्यानंतर दक्षिण दिल्लीतील हौज खास आणि मालवीय नगरमधील ७२ लोकांना होम क्वारंनटाईन करण्यात आले आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, डिलीव्हरी बॉयच्या संपर्कात ७२ लोक आले होते. अद्याप या लोकांची टेस्ट करण्यात आलेली नाही. सर्वांना होम क्वारंटाईन करण्यात आले आहे. जर या लोकांमध्ये कोरोनाची लक्षणे आढळतात, तर त्यांची तपासणी केली जाईल. डिलिव्हरी बॉय मार्चच्या शेवटच्या आठवड्यात ड्यूटीवर होता आणि मागील आठवड्यात त्याचा कोरोनाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे.

डिलिव्हरी बॉयने दक्षिण दिल्लीमधील अनेक भागात पिझ्झा डिलिव्हर केला होता. त्यामुळे येथील अनेक लोकांना क्वारंटाईन करण्यात आले. दक्षिण दिल्लीचे डीएम बीएम मिश्रा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ‘सध्या या पिझ्झा डिलिव्हर बॉयच्या संपर्कात आलेली ७२ घरे क्वारंटाईन करण्यात आली आहेत.

Also Read- राज्यात ई-पास कसे मिळवू शकता हे जाणून घेऊया…