Home Blog Page 134

गरजूंपर्यंत मदत पोहोचविण्यासाठी मनपाला सहकार्य करा! महापौर संदीप जोशी यांचे आवाहन : ‘कम्यूनिटी किचन’ ला दिली भेट

help to needy

नागपूर: कामासाठी शहरात आलेले अनेक लोक लॉकडाउनमुळे शहरात अडकले आहेत. या लोकांपर्यंत मदत पोहोचविण्यासाठी मनपाच्या सहकार्याने अनेक स्वयंसेवी संस्था पुढे येत आहेत. दररोज हजारो गरजू लोकांपर्यंत अन्न पोहोचविण्याचे कार्य स्वयंसेवी संस्था मनपाच्या माध्यमातून करीत आहेत, हे अभिनंदनीय कार्य आहे. आजच्या स्थितीत जास्तीत जास्त गरजूंपर्यंत मदत पोहोचणे आवश्यक आहे. या कार्यासाठी शहरातील नागरिकांनी पुढे येउन मनपाला सहकार्य करावे, असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले आहे.

नागपूर महानगरपालिकेच्या सहकार्याने शहरात २७ ‘कम्यूनिटी किचन’ सुरू आहेत. बुधवारी (ता.२२) महापौर संदीप जोशी व आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी मैत्री परिवार संस्था व लॉयन्स क्लब या दोन संस्थांच्या वतीने सुरू असलेल्या ‘कम्यूनिटी किचन’ला भेट दिली. यावेळी मनपाचे प्रभारी उपायुक्त मिलींद मेश्राम, मैत्री परिवार संस्थेचे प्रा.संजय भेंडे, प्रा.प्रमोद पेंडके, रोहित हिमटे, सीएजी ग्रुपचे विवेक रानडे, लॉयन्स क्लबचे विनोद वर्मा, श्री.कौशिक, श्रवण कुमार उपस्थित होते.

महापौरांनी दोन्ही संस्थांमार्फत सुरू असलेल्या ‘कम्यूनिटी किचन’ची आणि त्यामार्फत केल्या जाणा-या कार्याची माहिती जाणून घेतली. मनपाच्या माध्यमातून होत असलेल्या सेवा कार्याबद्दल मनपाचे प्रभारी उपायुक्त मिलींद मेश्राम यांच्या कार्याचे कौतुक करीत महापौर संदीप जोशी यांनी त्यांचे अभिनंदन केले.

महापौर म्हणाले, कोरोनाला हरविण्यासाठी संपूर्ण शहर लॉकडाउनला सहकार्य करीत आहे. आज शहरात विदर्भातील आणि परराज्यातील अनेक विद्यार्थी, नोकरदार, विस्थापित कामगार अडकले आहेत. याशिवाय ज्येष्ठ नागरिक आणि रेशन कार्ड नसलेल्या अनेकांवर मोठे संकट निर्माण झाले आहे. अशा स्थितीत या नागरिकांच्या मदतीकरीता, त्यांना दोन वेळचे जेवण किंवा अत्यावश्यक साहित्यांचा पुरवठा करण्यासाठी अनेक संस्था पुढे आल्या आहेत. दीनदयाल थालीच्या माध्यमातूनही अनेकांना दोन वेळचे जेवण पोहोचविण्यात येत आहे. नागपूर महानगरपालिकेच्या माध्यमातून आजघडीला रोज ४५ हजार लोकांपर्यंत मदत पोहोचविली जात आहे. यासाठी अहोरात्र काम करणारी प्रत्येक व्यक्ती अभिनंदनास पात्र आहे. मात्र गरजूंना मदत पोहोचविण्यासाठी मनपाचे हात अधिक बळकट करण्याची गरज आहे. या सेवा कार्यासाठी कोणत्याही स्वरूपात मदत करू इच्छिणा-यांनी पुढे यावे, असेही आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले आहे.

मैत्री परिवार संस्थेच्यावतीने शहरात सुरेंद्रनगर, वझलवार लॉन धरपेठ आणि अत्रे लेआउट या तीन ठिकाणी ‘कम्यूनिटी किचन’ चालविले जात आहेत. सुरेंद्रनगर आणि वझलवार येथील किचनमधून शहरातील ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी, भाड्याने राहणा-या व्यक्ती आदींना दररोज सकाळी व सायंकाळी प्रत्येकी एक हजार असे दोन्ही किचनमधून दररोज चार हजार जेवणाचे डबे पोहोचिण्यात येत आहेत. तर अत्रे लेआउट येथील किचनमधून सकाळी ५०० व सायंकाळी ५०० असे दररोज एक हजार लोकांपर्यंत जेवण पोहोविण्यात येत आहे.

लॉयन्स क्लबच्या माध्यमातून मानवसेवा नगर सेमीनरी हिल्स टीव्‍ही टॉवर येथे ‘कम्यूनिटी किचन’ सुरू करण्यात आली आहे. या किचनमधून हजारीपहाड, पांढराबोडी, सुदामनगरी, फुटाळा या वस्त्यांमध्ये दररोज १६०० लोकांच्या जेवणाची व्यवस्था केली जात आहे. रेशन कार्ड नसणा-यांनाही लॉयन्स क्लबद्वारे जीवनावश्यक साहित्यांची किट उपलब्ध करून देण्यात येत आहे.

४४ स्वयंसेवी संस्था, १५ दानदाते, नउ जणांकडून आर्थिक मदत

लॉकडाउनमध्ये गरजूंपर्यंत मदत पोहोचविण्यासाठी मनपाला ४४ स्वयंसेवी संस्थांचे सहकार्य लाभले आहे. या स्वयंसेवी संस्था ‘कम्यूनिटी किचन’मधून तयार होणारे जेवण गरजूंपर्यंत पोहोचविण्याचे कार्य करतात. तर ‘कम्यूनिटी किचन’मधून तयार होणा-या अन्नासाठी शहरातील १५ समाजसेवींची मदत प्राप्त झाली आहे. हे दानदाते जेवणाची आवश्यक सर्व साहित्याची मदत करीत आहेत. याशिवाय अनेक स्वयंसेवी संस्था स्वत:च्या खर्चातून जेवण तयार करतात किंवा अन्न साहित्याची मदत करतात. या संस्थांना मदतीसाठी नउ सेवाभावी नागरिक सरसावले आहेत. या नागरिकांमार्फत संस्थांना परस्पर आर्थिक मदत करण्यात आली आहे. यासर्व संस्थांच्या कार्यावर नियंत्रण, त्यांचा लेखाजोखा आणि पाठपुरावा मनपातर्फे केला जातो. या सर्व सेवाभावी स्वयंसेवी संस्था, समाजसेवी नागरिकांच्या मदतीने आजघडीला ४५ हजार लोकांना मदत पोहोचविली जात आहे. आजच्या स्थितीत विविध स्वयंसेवी संस्थांच्या मदतीने संपूर्ण शहरात २७ ‘कम्यूनिटी किचन’ सुरू आहेत.

शहराबाहेरील १३७५ नागरिक बेघर निवा-यात आश्रयीत

लॉकडाउनमुळे शहरात अडकलेले नागपूर बाहेरील १३७५ नागरिक मनपाच्या शहरी बेघर निवा-यामध्ये आश्रयाला आहेत. यामध्ये सर्वाधिक संख्या मध्यप्रदेशातील नागरिकांची आहे. मध्यप्रदेशातील ६९३ नागरिक बेघर निवा-यात निवास करीत आहेत. तर नागपूरच्या जवळच्या भागातील भंडारा, गोंदिया, अमरावती, वर्धा, चंद्रपूर, यवतमाळ, अकोला, तुमसर, बुलडाणा आणि पुणे या सर्व भागातील २९६, छत्तीसगढ येथील ३५, उत्तरप्रदेश १२९, बिहार ८, तेलंगना १६, आंध्रप्रदेश ४, कर्नाटक १, राजस्थान १५९, झारखंड १३, हरियाणा १२, ओडिशा ४ आणि इतर ५ असे एकूण १३७५ नागरिक मनपाच्या शहरी निवारा केंद्रात वास्तव्यास आहेत.

२७ ‘कम्यूनिटी किचन’साठी सरसावलेल्या संस्था व व्यक्ती

अ.क्र. जेवण तयार करणा-या संस्था संबंधित व्यक्ती
ग्रुप ऑफ नागपूर फ्रेन्ड्स-मॉ आकाश काटोले
अन्न अमृत फाउंडेशन व इस्कॉन राजेंद्र रमन
छत्तरपूर फॉर्मस्, लॉफ्टर क्लब श्री. अभिषेक
लॉफ्टर क्लब किशोर ठुठेजा
पूर्वा ऑटोमोबाईल मित्र परिवार व जागरण फाउंडेशन अशोक बंब (जैन)
जलाराम मंदिर ट्रस्ट दिलीप ठकराल
लॉयन्स क्लब विनोद वर्मा
सुसंस्कार बहुद्देशिय शिक्षण संस्था दिव्यानी अभिनव सहकारी संस्था चंद्रशेखर भिसीकर
प्रियदर्शनी बहुद्देशिय सहकारी संस्था भास्कर पराते
१० नागपूर महिला मंडळ श्री. नारनवरे
११ शगुन महिला मंडळ श्री. राय
१२ मैत्री परिवार संस्था (सुरेंद्र नगर) चंदु पेंडके
१३ मैत्री परिवार संस्था (अत्रे लेआउट) चंदु पेंडके
१४ स्वामीनारायण मंदिर ट्रस्ट प्रवीण पटेल
१५ राष्ट्रीय सेवा योजना, नागपूर विद्यापीठ केशव वाळके
१६ रतन पॅलेस सोसायटी गणेश गांधी
१७ मैत्री परिवार संस्था आणि सीएजी ग्रुप (वझलवार लॉन) चंदु पेंडके
१८ बडी मारवाड माहेश्वरी पंचायत भवन, हिवरी नगर दिनेश सारडा
१९ एमएसआरटीसी एम्प्लॉई सोसायटी गणेशपेठ एमएसआरटीसी एम्प्लॉई सोसायटी गणेशपेठ
२० लोकमान्य सांस्कृतिक व क्रीडा मंडळ रमण सेनाड
२१ हॉटेल राजधानी संजय जवाहारानी
२२ पॉवर ऑफ वेलफेअर फाउंडेशन शिल्पी बागडी
२३ सरिता कौशिक सरिता कौशिक
२४ श्री सतगुरू साई चॅरिटेबल ट्रस्ट श्री. महाजन
२५ निरजा पठनिया/नेहा पटेल निरजा पठनिया/नेहा पटेल
२६ प्रफुल्ल देशमुख प्रफुल्ल देशमुख
२७ शालिनी सक्सेना शालिनी सक्सेना

 

Also Read- चिनी किटमधून निष्कर्ष चुकीचे; देशात रॅपिड चाचण्या थांबवल्या, भारताला दिलेल्या 5 लाख चाचणी किटवर प्रश्नचिन्ह

Explore the Complete Video Conferencing Solution with ”Meeter”

video-conferencing-solution

Are you planning to use a video conferencing app for an upcoming remote meeting but you don’t know which to choose? Or are you using one because there is nothing else installed on your computer or because it’s the popular brand? As ubiquitous as they are, video conferencing apps vary greatly in feature sets, pricing, and overall capability. So, before you settle down for a solution, you might want to know more about “Meeter – Video Conferencing Application”

Stay connected wherever you go – start or join a 100+ person meeting with face-to-face video, high-quality screen sharing, and messaging with file share and many more!

Meeter is the video conferencing app that keeps simplifying your online meetings and group messaging into one easy-to-use application.  Let’s Collaborate and meet online with co-workers using the best video-conferencing application.

Meeter is lightweight video-conferencing application that does not require any complex Installations, downloads, or third-party apps/plugins.

★ KEY FEATURES ★

✔Best video meeting quality

✔Best screen sharing quality

✔Screen share directly from your device

✔Easy to share files

✔Group chat, images, and audio from the mobile, desktop, tablet

✔Contact availability status

✔Easily invite phone, email or company contacts

✔Join as interactive participant or view-only webinar attendee

✔Works over many networks Wi-Fi, 4G/LTE, and 3G networks

✔Compatible for most browsers

✔Connects with a device like  Desktop, Tablet, Smartphone, or Smart TV.

✔ Not store any data neither required any logins/password or installations

✔ Connect 100+ Participates at a time

How it works

Meeter will generate auto private URL’s for admin and user for company/institutions.

Admin can access –  https://meeter.in/app/XXcompanyadmin

User can access –  https://meeter.in/app/XXcompanyuser

How to Use “Meeter” for your business

To access the “Meeter ” for your company you just have to fill out some details like

-Company Name

-No of participants

-Link format

-Do you required password

Benefits of Video Conferencing app:

-Minimize travel costs

-Telecommuting made easy

-Increase productivity

-Better communication and relationships

The best thing is that “Meeter” is providing no-cost solution till 15th June 2020 for 10 max participants’ unlimited meetings.

It is the meetings platform for the modern workplace and can connect to desktops, mobile devices, and TV in one video meeting. Many offices, institutes are using  “Meeter” every day for video conferencing meetings,  webinars, and large interactive events, so people can work productively from anywhere.  For more information, visit www.meeter.in

चिनी किटमधून निष्कर्ष चुकीचे; देशात रॅपिड चाचण्या थांबवल्या, भारताला दिलेल्या 5 लाख चाचणी किटवर प्रश्नचिन्ह

corona rapid test

नवी दिल्ली: भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) कोविड-१९च्या चाचणीसाठी चीनहून मागवलेल्या रॅपिड टेस्ट किटच्या वापरावर बंदी घातली आहे. राजस्थानात याद्वारे ९५% पर्यंत चुकीचे निष्कर्ष आले होते. आयसीएमआरच्या ८ संस्थांतील पथके दोन दिवस या किटची प्रत्यक्ष तपासणी, चाचणी करतील. यात हे किट खराब आढळले तर त्यांना परत पाठवण्यात येईल. आयसीएमआरने चीनच्या गुआंगझू वाँडफो बायोटेक आणि जुहाई लिवजोन डायग्नोस्टिक्स या दोन कंपन्यांकडून ५ लाख किट मागवले होते.

आयसीएमआरचे मुख्य संशोधक डॉ. रमण गंगाखेडकर यांनी सांगितले, किटमध्ये गडबड असल्याची माहिती आम्हाला तीन राज्यांकडून मिळाली. त्यांच्या निष्कर्षात खूप फरक पडला. काही ठिकाणी तर ६ ते ७१% पर्यंत आहे. त्यामुळे दोन दिवस या किटचा वापर करू नये, असे राज्यांना सांगण्यात आले आहे. आयसीएमआरने खराब किट पाठल्याचा आरोप सर्वप्रथम प. बंगालने केला होता.

ममता सरकारने केंद्रीय पथकांना हॉटेलात रोखले, वाद वाढल्यानंतर सायंकाळी बाहेर जाऊ दिले

कोलकाता | कोरोना महामारीविरुद्ध देशाच्या लढाईला आता राजकीय विषाणूची बाधा होऊ लागली आहे. लॉकडाऊन आणि संसर्ग रोखण्यासाठीच्या उपायोजनेवर नजर ठेवण्यासाठी प. बंगालमध्ये दोन केंद्रीय पथके पाठवण्यावरून केंद्र आणि राज्य सरकार यांच्यात जुंपली आहे. गृह मंत्रालयाने मंगळवारी म्हटले की, राज्य सरकार कोलकाता आणि जलपायगुडी येथे गेलेल्या पथकांना हॉटेलमधून बाहेर पडू दिले नाही. तर तृणमूल काँग्रेसने म्हटले की, केंद्रीय पथके साहसी पर्यटनासाठी आली आहेत. ममता यांनी सोमवारी म्हटले होते की, केंद्रीय पथके पाठवण्याचा ठोस आधार पंतप्रधान मोदी व गृहमंत्री शहांनी सांगितला नाही तर राज्य सहकार्य करणार नाही. दिवसभराच्या आरोप-प्रत्यारोपानंतर सायंकाळी साडेचार वाजता केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांना बाहेर जाऊ दिले.

केंद्राचे निर्देश : राज्य सरकारने योग्य व्यवस्था करावी

केंद्रीय पथकाच्या कामात अडथळ्यांवर केंद्रीय गृह सचिव अजय भल्ला यांनी प. बंगालचे मुख्य सचिव राजीव सिन्हा यांना पत्र पाठवले. ते म्हणाले की, राज्यातील अधिकाऱ्यांनी पथकांसाठी योग्य व्यवस्था करावी. त्यांना दौरा, आरोग्य कर्मचाऱ्यांना भेटणे आणि वास्तव स्थितीचा आढावा घेण्यापासून रोखण्यात येत आहे. हे सर्व आपत्कालीन प्रतिबंधक कायदा, २००५ नुसार आदेश लागू करण्यात अडथळा मानले जाईल.

राज्यांतील अधिकाऱ्यांचे सहकार्य नाही : पथक प्रमुख

प. बंगालमध्ये आलेल्या पथकाचे प्रमुख संरक्षण मंत्रालयाचे अतिरिक्त सचिव अपूर्व चंद्रा म्हणाले, बंगालमध्ये दाखल झाल्यापासून मी सहकार्यासाठी मुख्य सचिवांच्या संपर्कात आहे. आज सांगण्यात आले की बाहेर कोठेही जायचे नाही. आम्ही राज्यातील अधिकाऱ्यांसोबतच बाहेर जाऊ. मात्र, सायंकाळी पथकाला बाहेर जाऊ दिले.

पथकांनी जास्त रुग्णांच्या राज्यांत जायला हवे : तृणमूल

तृणमूलचे खासदार डेरेक ओ’ब्रायन यांनी केंद्रीय पथकाचा दौरा साहसी पर्यटन असल्याचे म्हटले आहे. त्यांनी विचारणा केली की, ही पथके गुजरात, उत्तर प्रदेशसह जेथे जास्त रुग्ण आणि हॉटस्पॉट आहेत तेथे का गेली नाहीत. बंगालमध्ये सध्या ३५९ रुग्ण आहेत.

Also Read- नागपूर : आणखी ७ जणांना कोरोनाची लागण, रूग्णांची संख्या ८८ वर

Cricket Australia finding temporary jobs for laid off staff at supermarket

cricket australia

Cricket Australia has approached supermarket giant and one of its sponsors Woolworths to help with temporary jobs for its staff laid off until the end of June due to a financial crunch caused by the coronavirus pandemic. Cricket Australia is currently not eligible for the federal government’s JobKeeper support program having lost no major revenue streams from cancelled matches.

“I wrote to Brad Banducci the CEO of Woolworths given that Woolworths is among organisations that need more staff at the moment,” CA chief executive Kevin Roberts was quoted as saying by ‘SEN Radio’ here.

“Our people and culture team are also working with other organisations who are in the habit of placing people in organisations and industries that have a temporary need for more people.”Roberts also said that a home international season played without crowds would hit their revenues.”Our revenue from ticket sales you could put a ring around 40-50 million Australian dollars depending on the season. So that is significant obviously, and something that goes into our planning.

“So we’re doing those things proactively…as much as we hate making those sorts of decisions we had to make last week.

“The other side of that coin is certainly that we’re supporting our people and looking for even temporary opportunities for them to be involved and earning income elsewhere when their income is reduced from cricket,” he explained.

The staff kept on job are working on 20 per cent of their usual salaries but CA’s executives remain on 80 per cent of their usual base rates of pay.

Roberts defended the decision saying that it had simply been a matter of judging how much work was able to be done while placing the business on hold and paying employees accordingly. ”It’s what activities are being paused and what’s the skeleton staff we require for the activities that continue and that leads you to a temporary solution, which is the national coaches being part-time through this period,” Roberts said.

The state associations and the cricketers association (ACA) had reservations about CA’s measures around coronavirus, but Roberts said he had support from majority of stakeholders.

“We know that you won’t have 100 percent of people and 100 percent of stakeholders happy at any particular time. But the reality is that the vast majority of our people, our members, our stakeholders are very comfortable with how we’re working through this,” he said.

“I think it’s just the reality of the situation versus what is sometimes reported, given that stories of harmony don’t necessarily sell.

“We’re working through things in an open and really orderly way with all of those organisations. It’s all about focusing on, in cricket parlance, the next ball,” he added.

Also Read- Facebook buys $5.7 billion stake in Reliance Jio: 5 things you should know about it

नागपूर : आणखी ७ जणांना कोरोनाची लागण, रूग्णांची संख्या ८८ वर

corona-positive

नागपूर : नागपुरात कोरोनाबाधीत रूग्णांच्या संख्येत मंगळवारी सुध्दा लक्षणीय वाढ नोंदविण्यात आली आहे. नागपुरातील कोरोनाबाधितांची रूग्ण संख्या दरदिवशी वाढतच आहे. मंगळवारी सकाळीच (दि २१ ) नागपुरात कोरोनाचे आणखी ७ नवे रूग्ण आढळले. रविवारी एकाच दिवशी नागपुरात ९ रूग्ण आढळले. त्यानंतर सोमवारी आ ७ रूग्ण आणि सलग तिसर्‍या दिवशी मंगळवारी ७ रूग्णांची भर पडून कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या आता ८१ वरून ८८ वर पोहोचली. या नव्या ७ कोरोना रुग्णांमुळे नागपुरातील कोरोनाबधितांची एकूण संख्या पुन्हा वाढली आहे.

नागपूरातील कोरोनाबाधित रूग्णाच्या संख्येत रविवारी सर्वात मोठ्या रूग्ण संख्येची वाढ नोंदविण्यात आली होती. रविवारी एकाच दिवशी नागपुरातील ९ संशयीत रूग्णाचे थ्रोट स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे उपराजधानीतील जिल्हा प्रशासन आता पुरते हादरले आहे. नागपुरातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या आता ८८ एवढी झाली आहे. आज नव्याने सापडलेले कोरोनाबाधित रूग्ण हे नागपुरातील आमदार निवास आणि वनामती येथील विलगीकरण कक्षात कॉरंटाईन करण्यात आले होते. विशेष म्हणजे सतरंजीपुरा येथील मृत्यूमुखी पडलेल्या कोरोनाबाधित रूग्णाच्या संपर्कात आलेल्या नागरीकांचे अहवाल पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंताही वाढली आहे. रविवारी सोमवार आणि मंगळवार सलग तीन दिवसात २५ रूग्ण सापडल्याने उपराजधानी असलेल्या नागपुरात कोरोनाच धोका आणखी बळावला आहे.

Also Read- नागपुरातील मनपाच्या बेघर निवाऱ्यात मध्य प्रदेशातील सर्वाधिक लोक

Facebook buys $5.7 billion stake in Reliance Jio: 5 things you should know about it

Reliance Jio

New Delhi: Facebook on April 22 announced that it was investing $5.7 billion in Reliance Jio.

“Today we are announcing a $5.7 billion, or INR 43,574 crore, investment in Jio Platforms Limited, part of Reliance Industries Limited, making Facebook its largest minority shareholder,” Facebook wrote in a press release.

The company said that as a part of the investment Facebook said that it would collaborate with Jio to create new ways for people and businesses to operate more effectively in the growing digital economy. “For instance, by bringing together JioMart, Jio’s small business initiative, with the power of WhatsApp, we can enable people to connect with businesses, shop and ultimately purchase products in a seamless mobile experience,” Facebook wrote in a press release.

Here are top five things that you should know about the collaboration:

1. Facebook’s investment translates into a 9.99% equity stake in Jio platform on a fully diluted basis. This is the largest investment for a minority stake by a tech company in an Indian firm.

2. This is also the largest foreign direct investment (FDI) for a minority investment in India.

3. Focus on small and micro businesses: As a part of the partnership, the two companies will focus on 60 million micro, small and medium businesses in India. This includes nearly 120 million farmers, 30 million small merchants and millions of small and medium enterprises in the informal sector. The two companies will also work closely to ensure that consumers are able to “access the nearest kiranas who can provide products and services by transacting seamlessly with JioMart using WhatsApp.”

4.WhatsApp Reliance Retail: In addition to the investment, Jio Platforms, Reliance Retail and WhatsApp have entered into a partnership to “accelerate Reliance Retail’s New Commerce business on the JioMart platform using WhatsApp and to support small businesses on WhatsApp.”

5. The latest collaboration valuates Jio $65.95 billion.

Also Read- Facebook to introduce gaming app on April 20 on live game streaming

नागपुरातील मनपाच्या बेघर निवाऱ्यात मध्य प्रदेशातील सर्वाधिक लोक

homeless people

नागपूर : रोजगारासाठी नागपुरात आलेले १ हजार ३७० परप्रांतीय कामगार लॉकडाऊनमुळे अडकले आहेत. काम बंद असल्याने बेरोजगार आहेत. त्यांचे येथे स्वत:चे घर नसल्याने अडचणीत सापडलेल्या या लोकांना महापालिकेच्या बेघर निवारा केंद्रात आश्रय देण्यात आला आहे. यात सर्वाधिक ६८८ लोक मध्य प्रदेशातील आहेत.

महापालिकेची पाच स्थायी व १५ अस्थायी निवारा केंद्रे आहेत. या केंद्रात विविध राज्यांतील निराश्रित आश्रयास आहेत. यात मध्य प्रदेशातील सर्वाधिक ६८८ असून सर्वांत कमी कर्नाटकातील एक व्यक्ती आहे. महापालिकेने सेवाभावी संस्थांच्या सहकार्याने या लोकांची जेवणाची व निवासाची व्यवस्था केली आहे. लॉकडाऊन असेपर्यंत या सर्वांनी निवारा केंद्रातच राहावे, असे आवाहन मनपाने केले आहे.

निवारा केंद्रांतील बहुसंख्य लोक येथे रोजगारासाठी आलेले आहेत. लॉकडाऊनमुळे त्यांचा रोजगार बंद झाला आहे. ते गावाला जाण्याच्या तयारीत होते. परंतु त्यांना जाता आले नाही. मनपा व पोलिस प्रशासनाने या लोकांची निवारा केंद्रात राहण्याची व्यवस्था केली आहे. कोरोना संसर्गापासून बचावासाठी त्यांना मास्क व साधने उपलब्ध करण्यात आलेली आहेत.

Also Read- सामाजिक अंतर पाळा, कोरोनाची साखळी खंडीत करा!

सामाजिक अंतर पाळा, कोरोनाची साखळी खंडीत करा!

“No leave for health officials” Tukaram Mundhe
“No leave for health officials” Tukaram Mundhe

नागपूर: आज जगभर कोरोनाचा प्रकोप वाढला आहे. जगातील २०० पेक्षा जास्त देशात कोरोनाचा प्रसार आहे. कोरोना हा संसर्गजन्य आजार असल्यामुळे माणसापासून माणसापर्यंत हा आजार पसरतो. एक रुग्ण ४०० ते एक हजार लोकांना कोरोनाबाधित करू शकतो. कोरोना संसर्गाची साखळी खंडीत करायचे असेल तर त्यावर एकमेव उत्तम उपाय म्हणजे कोणत्याही दोन व्यक्तींनी एकत्र येण्यापासून रोखणे आवश्यक आहे. घरातही दोन व्यक्तींमध्ये किमान पाच फुटाचे अंतर राखणे गरजेचे आहे. आज नागपुरात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या वाढत्या संख्येला अशाच संसर्गाची पार्श्वभूमी आहे. एका रुग्णामुळे शहरात सुमारे १९९ जणांना संसर्गाचा धोका निर्माण झाला आहे. कोरोनाचा संसर्ग थांबवाचा असेल, ही साखळी खंडीत करायची असेल तर प्रत्येकाने सामाजिक अंतर पाळावे, असे आवाहन नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले. ‘कोरोनाची साखळी कशी खंडीत होणार?’ या विषयावर ‘फेसबुक लाईव्ह’च्या माध्यमातून त्यांनी मंगळवारी (ता. २१) नागरिकांशी संवाद साधला आणि प्रश्नांना उत्तरे दिली.

कोविड-१९चा प्रादुर्भाव टाळण्यासाठी लॉकडाउन करण्यात आले आहे. मात्र अजूनही बहुतांशी लोक लॉकडाउनला गांभीर्याने घेत नाहीत. प्रधानमंत्र्यांपासून ते मुख्यमंत्र्यांपर्यंत सारेच घरात राहण्याचे आवाहन करित आहेत. वैज्ञानिक दृष्टीकोनातून विचार केल्यास कोरोनापासून बचावाचा उत्तम उपाय घरी राहणे हाच आहे. कोरोना संशयित आढळल्यानंतर त्यांना मनपाच्या विलगीकरण कक्षात ठेवणे आवश्यक आहे. संसर्गाची साखळी खंडीत करण्यासाठी संशयीताच्या संपर्कात येणा-यांचा शोध घेउन त्यांची संपूर्ण ‘हिस्ट्री’ शोधून त्यांनाही ‘क्वारंटाईन’ करणे का आवश्यक आहे, ही सर्व माहिती अगदी सोप्या भाषेत त्यांनी दिली. यासह नागरिकांकडून विचारण्यात येणा-या प्रश्नांचेही त्यांनी सोप्या भाषेत समाधान केले.

नागपूर शहरात आतापर्यंत रुग्णांची संख्या किती आहे व ती पुढे वाढेल का, या प्रश्नाला उत्तर देताना मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले की, नागपूर शहरात आतापर्यंत ८६ कोरोना रुग्ण आढळले आहेत. त्यापैकी ७१ रुग्णांवर उपचार सुरू आहे. संसर्गामुळे कोरोना वाढतो आहे. सतरंजीपुरा येथील एका रुग्णामुळे शहरात सर्वाधिक संसर्ग वाढला आहे. या एकट्या रुग्णामुळे ४४ जण कोरोनाबाधित झाले आहेत. या रुग्णाशी संबंधित शंभरावर चाचणी अहवाल प्रतिक्षेत असल्याने पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रत्येकाने आता अधिक जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. घरी राहूनच कोरोनाची साखळी खंडीत होउ शकते त्यामुळे सर्वांनी घरीच राहावे, असेही आवाहन त्यांनी केले.

…तर ५०० रुपये दंड

अनेक भाजी विक्रेते मास्क वापरत नसल्याच्या प्रश्नावर उत्तर देताना आयुक्त म्हणाले, जागतिक आरोग्य संघटनेने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी प्रत्येकाने मास्क लावणे अत्यावश्यक आहे. भाजी विक्रेते असो अथवा सामान्य नागरिक घराबाहेर पडणा-या प्रत्येक व्यक्तीने मास्क लावणे बंधनकारक आहे. शहरात कुणीही मास्कविना आढळल्यास त्याच्याकडून ५०० रुपये दंड वसूल करण्याचा विचार मनपा प्रशासन करत असल्याचेही त्यांनी सांगितले. याशिवाय सकाळी व सायंकाळी अनेक भागात बरेच लोक फिरायला निघत असून त्यांच्यावर मनपातर्फे करण्यात येणा-या कारवाई संदर्भात सांगताना ते म्हणाले, ‘मॉर्निंग’ आणि ‘इव्‍हिनींग वॉक’ करणा-यांवर कारवाई सुरू आहे. अनेक वाहनेही जप्त करण्यात आले असल्याचेही त्यांनी सांगितले.

बालकांच्या लसीकरणासंदर्भात नियंत्रण कक्षाशी संपर्क साधा

सद्या लॉकडाउनमध्ये वाढ करण्यात आल्याने बालकांच्या लसीकरणासाठी काही सुविधा करण्यात आली आहे का, या प्रश्नाला उत्तर देताना आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले की, लॉकडाउन असले तरी बालकांना विहीत कालावधीमध्येच लसीकरण व्हावे यासाठी मनपा तत्पर आहे. ज्या बालकांना लसीकरण द्यायचे असेल त्यांनी मनपाच्या नियंत्रण कक्षामध्ये ०७१२-२५६७०२१, २५५१८६६, २५६२४७४ या क्रमांकावर संपर्क साधून माहिती देण्यात यावी, असे आवाहन त्यांनी केले. ‘फेसबुक लाईव्ह’ दरम्यान ज्या महिलांनी लसीकरणासंदर्भात प्रश्न विचारले त्यांनी दिलेल्या संपर्क क्रमांकावर त्याच वेळी संपर्क साधून आवश्यक कार्यवाही सुरू करण्यात आली.

Also Read- No coronavirus COVID-19 case reported in 60 districts in past 14 days

Facebook to introduce gaming app on April 20 on live game streaming

Facebook testing Voice Clips status updates for Indian users

New Delhi: In a bid to take on Twitch and Youube, Facebook is set to launch its own gaming app on Monday that will be free and allow billions of users to watch and stream live games from their smartphones.

The Facebook Gaming app will initially be available on Android devices.

According to a New York Times report on Sunday, an iOS version will also be released soon, if Apple which is currently promoting its own Cloud-based gaming service Arcade gives its approval.

The app will also introduce a new Go Live feature, which will let users upload streams of other mobile games on the same device by pressing just a few buttons”

“Investing in gaming in general has become a priority for us because we see gaming as a form of entertainment that really connects people. It`s entertainment that`s not just a form of passive consumption but entertainment that is interactive and brings people together,” Fidji Simo, Head of the Facebook Gaming app, was quoted as saying.

Facebook Gaming app will have some casual games to begin with, but the focus will primarily be on watching and creating game livestreams.

There will not be any ads in the beginning on the Facebook Gaming app.

According to the report, Facebook is currently relying on “stars” ratings from viewers, like “bits” in Twitch.

Facebook has been testing versions of the app in Latin America and Southeast Asia for the past 18 months.

Also Read: History Created! Zee Talkies becomes No.1 Marathi channel with highest ever GRPs

History Created! Zee Talkies becomes No.1 Marathi channel with highest ever GRPs

zee takies

Mumbai: The time spent on the channel has grown significantly to 138 minutes in Wk 14. The reach has attained a top stop for 3 consecutive weeks in a row and stands at 36.1% (Wk 14) in Marathi genre (except Marathi news).

While the country battles the ongoing Coronavirus pandemic, the leading Marathi movie Channel – Zee Talkies has left no stone unturned to curate a library of titles that viewers can sit back and enjoy with their families. With a great line up of offerings, the channel has attained the No.1 spot with 165 GRPs, surpassing all the Marathi general entertainment, news, music and movie channels both at Maharashtra Urban and Urban + Rural levels.

The time spent on the channel has grown significantly to 138 minutes in Wk 14. The reach has attained a top stop for 3 consecutive weeks in a row and stands at 36.1% (Wk 14) in Marathi genre (except Marathi news).

While viewers act responsible towards the society and practice social distancing, Zee Talkies had the perfect remedy to drive away their boredom. The latest offering of ‘Talkies Premier League’ coupled with robust programming has created a lot of affinity amongst the audience. Talkies Premiere League kickstarted with blockbuster movie ‘Tumbbad’ that was presented to viewers in Marathi.

It garnered a remarkable TVR of 3.4. In the coming weeks, Zee Talkies aims to continue its winning streak by constantly innovating and offering audience-centric content. Zee Talkies will continue to enthral its viewers with its interesting line-up of movies under ‘Talkies Premier League’ and will feature entertaining titles like ‘Khari Biscuit’, ‘Aaltoon Paltoon’ to name a few.

Moreover, the devotional shows Gajar Kirtanacha and Man Mandira continue to play a vital role in keeping the state’s spirits high and rekindling hope with viewers in these trying times. There’s a lot of demand for popular kirtankars to be aired during this lockdown period.

With its promise of best of Marathi films and nonstop fun through mash-ups, Zee Talkies will continue to provide quality entertainment to the audiences of Maharashtra.

Also Read- No coronavirus COVID-19 case reported in 60 districts in past 14 days

No coronavirus COVID-19 case reported in 60 districts in past 14 days

Coronavirus: नियम आणि शिस्तीचे पालन करून हे ९० गावं झाले करोनामुक्त

NEW DELHI: The nation’s collective fight against the coronavirus pandemic is yielding positive results as no fresh case of COVID-19 infection has been reported in the past 14 days in as many as 60 districts of the country.

According to a government release, ”the doubling rate of COVID-19 cases calculated using growth over the past seven days indicates that India’s doubling rate for the week before the lockdown was 3.4 and has improved to 7.5 as on 19th April 2020 (for the last seven days).”

”The 18 States that have shown improvement in doubling rate as compared to the national average, as on 19th April are – Doubling rate: Less than 20 days – Delhi (UT)- 8.5 days; Karnataka- 9.2 days; Telangana- 9.4 days; Andhra Pradesh- 10.6; – J&K (UT)- 11.5 days; Punjab- 13.1 days; Chhattisgarh – 13.3 days; Tamil Nadu- 14 days; Bihar- 16.4 days.”

Doubling rate: Between 20 days to 30 days: A&N (UT) – 20.1 days; Haryana – 21 days; Himachal Pradesh – 24.5 days; Chandigarh (UT)- 25.4 days; Assam – 25.8 days; Uttarakhand – 26.6 days; Ladakh (UT) – 26.6 days

Doubling rate: More than 30 days: Odisha – 39.8 days; Kerala – 72.2 days

‘All COVID-19 patients in Goa were discharged from hospital after recovery, and now Goa has no active case,’’ the government release said.

”Besides, three districts – Mahe (Puducherry), Kodaggu (Karnataka) & Pauri Garhwal (Uttrakhand) have also not reported any fresh cases during the last 28 days. There are now 59 additional districts from 23 States/UTs that have not reported any fresh cases during the last 14 days. The six new districts have been included in this list: Dungarpur & Pali in Rajasthan; Jamnagar and Morbi in Gujarat; North Goa in Goa; Gomati in Tripura.

The death toll due to COVID-19 rose to 590 and the number of cases climbed to 18,601 on Tuesday, according to the Union Health Ministry. The number of active COVID-19 cases stood at 14,759 while 3,251 people have been cured and discharged, and one patient has migrated, the Ministry said.

The total number of cases includes 77 foreign nationals.

Also Read- नागपुरातील पत्रकारांची होणार कोरोना चाचणी महापौर संदीप जोशी यांचा पुढाकार

प्रतिबंधित क्षेत्रासह संपूर्ण शहरात पाणी पुरवठा सुरळीत ठेवा उपमहापौर मनीषा कोठे यांचे निर्देश : शहरातील पाणी पुरवठ्याचा घेतला आढावा

deputy mayor meeting

नागपूर: शहरात कोरोनाचे संकट वाढत आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शहरातील अनेक क्षेत्र प्रतिबंधीत करण्यात आले आहे. या प्रतिबंधित क्षेत्रामध्ये मनपातर्फे आवश्यक सर्व सुविधांकडे विशेष लक्ष दिले जात आहे. या भागात पाणी पुरवठ्याकडेही प्राधान्याने लक्ष देण्यात यावे. यासह संपूर्ण शहरातही पाणी पुरवठा सुरळीत होणे आवश्यक आहे. त्यादृष्टीने प्रशासनातील संबंधित अधिका-यांनी गांभीर्याने लक्ष देत प्रतिबंधित क्षेत्रासह संपूर्ण शहरात पाणी पुरवठा सुरळीत ठेवावा, असे निर्देश उपमहापौर मनीषा कोठे यांनी दिले.

शहरातील पाणी पुरवठ्यासंदर्भात व्यवस्थेसंबंधी चर्चा करण्यासाठी सोमवारी (ता.२०) उपमहापौर मनीषा कोठे यांच्या अध्यक्षतेत बैठक घेण्यात आली. बैठकीत स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, सत्तापक्ष नेता संदीप जाधव, आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अधीक्षक अभियंता (जलप्रदाय) श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता मनोज गणवीर, ओसीडब्ल्यूचे संजय रॉय, के.एम.पी.सिंग, राजेश कालरा आदी उपस्थित होते.

प्रारंभी उपमहापौर मनीषा कोठे यांनी झोननिहाय पाणी समस्येचा आढावा घेतला. अधीक्षक अभियंता (जलप्रदाय) श्वेता बॅनर्जी यांनी शहरातील पाणी पुरवठ्याच्या स्थितीची माहिती दिली. शहरातील काही भागांमध्ये २४x७ योजना यशस्वी आहे. तर काही भागात प्रायोगिक तत्वावर ही योजना सुरू करण्याबाबत कार्यवाही सुरू असल्याचे अधीक्षक अभियंत्यांनी सांगितले. झोपडपट्टी भागामध्ये दुषीत पाणी पुरवठा तसेच अत्यंत कमी वेळ पाणी पुरवठा होत असल्याच्या तक्रारी आहेत. या तक्रारी तातडीने सोडविण्याचे निर्देश उपमहापौरांनी यावेळी दिले.

शहरात कोरोनाचे संकट उभे आहे. प्रशासनातर्फे नागरिकांना घरातच राहण्याचे आवाहन केले जात आहे. या आवाहनाला नागरिकही प्रतिसाद देत आहे. त्यामुळे या लोकांना उत्तम सुविधा पुरविणे मनपाचे कर्तव्य आहे. त्यादृष्टीने पाणी पुरवठा सुरळीत सुरू राहावा, यासाठी कार्य करा, असेही त्यांनी निर्देशित केले. याशिवाय अनेक भागामध्ये नळ कनेक्शन नसल्याने त्या भागामध्ये टँकरने पाणी पुरवठा केला जातो. कोरोनामुळे अनेक भागामध्ये टँकर न आल्याच्या तक्रारीही नागरिकांकडून प्राप्त झाल्याचे बैठकीमध्ये मान्यवरांनी सांगितले. नागरिकांच्या सुविधेच्यादृष्टीने प्रशासनाने गांभीर्य जपण्याची गरज आहे. पुढे उन्हाची दाहकता वाढणार आहे. त्यामुळे येत्या काळात टँकरने सुद्धा गरज असलेल्या ठिकाणी सुरळीत पाणी पुरवठा करण्यात यावा, असेही निर्देश उपमहपौर मनीषा कोठे यांनी दिले.

ओसीडब्ल्यूतर्फे शहरात पाणी पुरवठा करण्यात येत आहे. आज शहरात उद्भवलेल्या स्थितीवर मात करण्यासाठी ओसीडब्ल्यूला सर्व पदाधिकारी व मनपा प्रशासनाद्वारे योग्य सहकार्य मिळत आहे. पदाधिकारी आणि प्रशासनाच्या सहकार्याने पुढेही नागरिकांना उत्तम सेवा पुरविण्यास तत्पर असल्याचे ओसीडब्ल्यूच्या पदाधिका-यांद्वारे यावेळी सांगण्यात आले.

Also Read- महिन्द्रा ॲन्ड महिन्द्रा कंपनीच्या वतीने कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी “फेस शिल्ड” सुपुर्द

महिन्द्रा ॲन्ड महिन्द्रा कंपनीच्या वतीने कोरोनाचा मुकाबला करण्यासाठी “फेस शिल्ड” सुपुर्द

face shield by mahindra

नागपूर: कोविड-१९ चा संसर्ग टाळण्यासाठी संपूर्ण देशात लॉकडाऊन असले तरी आरोग्य व स्वच्छता सारख्या अत्यावश्यक सेवेतील कर्मचा-यांना त्यांचे कर्तव्य बजविण्याकरीता मैदानात उतरावे लागते. कोविड-१९ च्या लढाईत उतरलेल्या आरोग्य विभागाचे कर्मचारी व सफाई कामगार इत्यादी योध्यांना या विषाणूंचा मुकाबला करण्यासाठी ७००० ‘फेस शिल्ड’ देण्यात येणार आहे.

महिन्द्रा ॲन्ड महिन्द्रा कंपनीने याकरीता पुढाकार घेवून आज दिनांक २० एप्रिल रोजी ७०० ‘फेस शिल्ड’ उपमहापौर श्रीमती मनीषा कोठे यांचेकडे महापौर कक्षात सुपुर्द केल्या. कंपनीने आतापावेतो पोलीस, रेल्वे, शासकीय रुग्णालये आदिंना या ‘फेस शिल्ड’चे नि:शुल्क वितरण केले असून शहराकरीता ५० हजार ‘फेस शिल्ड’ चे उत्पादन करुन शहरात वितरण करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.

याप्रसंगी प्रभारी उपायुक्त (आरोग्य) डॉ. प्रदीप दासरवार, महिन्द्रा ॲन्ड महिन्द्रा कंपनीचे प्लान्ट प्रमुख श्रीकांत दुबे, महाप्रबंधक सचिन तारे, उपमहाप्रबंधक नरेंद्र सातफळे, एच.आर.प्रमुख प्रशांत देशपांडे उपस्थित होते.

Also Read- नागपुरातील पत्रकारांची होणार कोरोना चाचणी महापौर संदीप जोशी यांचा पुढाकार

नागपुरातील पत्रकारांची होणार कोरोना चाचणी महापौर संदीप जोशी यांचा पुढाकार

महापौर संदीप जोशी

नागपूर: मुंबई येथील ५३ पत्रकार कोरोना पॉझिटिव्ह निघाल्याने प्रसार माध्यम क्षेत्रात काम करणा-या प्रतिनिधींना कोविड-१९चा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर नागपुरातील पत्रकारांसाठी कोरोनाची विशेष चाचणी घेण्याचा पुढाकार महापौर संदीप जोशी यांनी घेतला आहे.

महापौरांच्या पुढाकारातून शहरातील इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाच्या प्रतिनिधींची कोरोना चाचणी २१ आणि २२ एप्रिलला इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात घेण्यात येणार आहे. मंगळवारी २१ एप्रिलला इलेक्ट्रॉनिक मीडियाच्या प्रतिनिधींची सकाळी ९.३० वाजता तर बुधवारी २२ एप्रिलला प्रिंट मीडियाच्या फिल्डवर काम करणा-या प्रतिनिधींची चाचणीही सकाळी ९.३० वाजतापासून करण्यात येणार आहे.

नागरिकांपर्यंत अचूक माहिती पोहोचविण्यासाठी इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियातील पत्रकार दिवस रात्र कार्य करीत आहेत. सर्वत्र कोरोनाचा धोका असतानाही हे प्रतिनिधी जीवाची पर्वा न करता अनेक ठिकाणी जाउन जनतेपर्यंत अचूक माहिती पोहोचविण्याचे महत्वाचे कार्य करीत आहेत. अशा स्थितीत त्यांनाही कोरोनाचा धोका निर्माण झाला आहे. पत्रकारांच्या परिवाराच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांची चाचणी होणे आवश्यक आहे. यासाठी इलेक्ट्रॉनिक आणि प्रिंट मीडियाच्या फिल्डवर काम करणा-या प्रतिनिधींनी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयात (मेयो हॉस्पीटल) जाउन ही चाचणी करून घ्यावी, असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले आहे.

Also Read- फळ व भाजी विक्रेत्यांच्या फिरत्या सेवेबाबत कार्यवाही करा: आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांचे निर्देश

फळ व भाजी विक्रेत्यांच्या फिरत्या सेवेबाबत कार्यवाही करा: आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांचे निर्देश

Arogya meeting

नागपूर: कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी शहरात जमावबंदी लागू करण्यात आली. त्याअंतर्गत शहरातील मोठे बाजारही बंद करण्यात आले. या बाजारातील विक्रेत्यांना मनपातर्फे व्यवसायाकरिता जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे. मात्र या जागांवरही फळे आणि भाजी विक्रेत्यांसह ग्राहकांचीही गर्दी दिसून येत आहे. अशा स्थितीत फळ व भाजी विक्रेत्यांनी एकाच जागेवर स्थायी दुकान न ठेवता निवासी भागामध्ये फिरून ती सेवा द्यावी. यासंदर्भात प्रशासनातर्फे आवश्यक कार्यवाही पूर्ण करण्यात यावी, असे निर्देश आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी दिले.

कोविड-१९ च्या उपाययोजनेसंदर्भात मनपातर्फे करण्यात येत असलेल्या कार्यवाहीचा सोमवारी (ता.२०) आरोग्य समिती सभापतींनी यांनी आढावा घेतला. मनपा मुख्यालयातील डॉ.पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहात आयोजित बैठकीत स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके, आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, उपसभापती नागेश सहारे, समिती सदस्या विशाखा बांते, सरीता कावरे, लीला हाथीबेड, सदस्य संजय बुर्रेवार, कमलेश चौधरी, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, प्रभारी उपायुक्त डॉ.प्रदीप दासरवार, अधीक्षक अभियंता (जलप्रदाय) श्वेता बॅनर्जी, सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण गंटावार, अतिरिक्त सहायक आरोग्य अधिकारी डॉ.विजय जोशी, हत्तीरोग अधिकारी दिपाली नासरे आदी उपस्थित होते.

कोरोनाचा वाढता संसर्ग टाळण्यासाठी गर्दी टाळणे अत्यंत आवश्यक आहे. त्यादृष्टीने फळे आणि भाजी या जीवनावश्यक बाबींविषयी जास्त खबरदारी घेणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने लोकांच्या दारापर्यंत जाउन त्यांना फळे आणि भाजी उपलब्ध करून दिल्यास नागरिक घराबाहेर निघणार नाही. शहरातील आजची परिस्थिती पाहता ही बाब अत्यंत आवश्यक आहे. यासंदर्भातील त्रुट्या, अडथळे दूर करून नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने तातडीने आवश्यक कार्यवाही करण्यात यावे, असे आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी निर्देश दिले.

याशिवाय कोरोनाग्रस्तांच्या संपर्कात आलेले व काही लक्षणे आढळलेल्या कोरोना संशयीतांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. या विलगीकरण कक्षातील लोकांकडूनही अनेक तक्रारी प्राप्त होत आहेत. त्यामुळे विलगीकरणातील रुग्णांच्या दैनंदिन स्थितीबाबत वेळोवेळी आवश्यक पाठपुरावा करणे गरजेचे आहे. याबाबत संबंधित अधिका-यांमार्फत दररोज पाठपुरावा करण्याचेही निर्देश त्यांनी दिले.

कोरोनावर मात करण्यासाठी सर्वांनी एकत्रित येउन कार्य करणे आवश्यक आहे. महापौर संदीप जोशी यांच्या नेतृत्वात आणि आयुक्त तुकराम मुंढे यांचया मार्गदर्शनात आरोग्य विभागातर्फे उत्तम कार्य केले जात आहेत. नगरसेवकांच्या सहकार्याने या सेवा कार्याची गती वाढविण्यात यावी, असेही त्यांनी निर्देशित केले. प्रारंभी आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा यांनी शहरातील कोरोनाच्या स्थितीचा झोननिहाय आढावा घेतला. यावेळी सहायक वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण गंटावार यांनी शहरातील कोरोनाची सद्यस्थिती आणि मनपातर्फे करण्यात येत असलेल्या उपाययोजनात्मक कार्याची माहिती दिली.

बुधवारी करणार नाग नदी स्वच्छतेची पाहणी

शहरातील नदी स्वच्छता अभियानाला सुरूवात झाली आहे. शहराचे वैभव असलेल्या नाग नदीच्या पुनर्जीवनाचे कार्यही या काळात सुरू आहे. मनपातर्फे सुरू असलेल्या नाग नदी स्वच्छतेच्या कार्याची पाहणी करण्यासाठी बुधवारी (ता.२२) स्थायी समिती सभापती विजय (पिंटू) झलके यांच्यासह आरोग्य समिती सभापती वीरेंद्र कुकरेजा, उपसभापती नागेश सहारे अन्य सदस्यांसह दौरा करणार आहेत.

Also Read- सतरंजीपु-यातील ‘त्या’ रुग्णांने केले आणखी ६ लोकांना कोरोना बाधित खरी माहिती पुरविण्याचे मनपा आयुक्तांचे नागरिकांना भावनिक आवाहन

सतरंजीपु-यातील ‘त्या’ रुग्णांने केले आणखी ६ लोकांना कोरोना बाधित खरी माहिती पुरविण्याचे मनपा आयुक्तांचे नागरिकांना भावनिक आवाहन

Deceased COVID 19 Positive Santranjipura Case

नागपूर : कोविड-१९ पासून बचावासाठी सोशल डिस्टंसिंगचे पालन हा सर्वोत्तम उपाय आहे. त्याचे पालन न केल्याने किती मोठा धोका निर्माण होउ शकतो याची प्रचिती नागपुरातील सद्यस्थिती पाहता येते. वारंवार आवाहन करूनही मनपाच्या विलगीकरण कक्षात येण्यास तयार न झाल्याने व स्वत:मधील लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यामुळे आज शहरातील जवळपास २०० लोकांचे जीवन धोक्यात आले आहे. सतरंजीपुरा परिसरात आढळलेला आणि मृत्यू पावलेला कोरोनाग्रस्त रुग्ण आज शहरातील १९९ लोकांच्या कोरोना संसर्गाचे कारण ठरू शकतो अशी स्थिती आहे. कोरोनाग्रस्ताच्या संपर्कात आल्याचे स्पष्ट होताच या १९९ जणांना मनपाच्या विलगीकरण कक्षात दाखल करण्यात आले आहे. यापैकी ४४ व्यक्तींचा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे तर ११ जणांचा अहवाल निगेटिव्ह आला असून १४४ जणांचा अहवाल प्रतीक्षेत आहे. कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव टाळण्यासाठी व कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करण्याची गरज आहे. स्वत:सह इतरांचा जीव वाचविण्यासाठी मनपाच्या सर्वेक्षण चमूला योग्य आणि खरी माहिती द्या, असे भावनिक आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी नागरिकांना केले आहे.

यासंदर्भात माहिती देताना मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले की, सोमवारी (ता.२०) आणखी सहा कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळल्याने नागपुरात चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे. आपल्याला अजून जास्त सावधगिरी बाळगण्याची आणि काळजी घेण्याची गरज आहे. कोविड-१९ हा संसर्गजन्य आजार आहे. एका कोरोना पॉझिटिव्ह रुग्णामुळे ४०० ते एक हजार लोकांना संसर्ग पसरू शकतो, ही वैज्ञानिकदृष्ट्या महत्वाची बाब आहे. नागपूर शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. या वाढत्या कोरोनाग्रस्त रुग्णांशी एकाच कुटुंबाची पार्श्वभूमी जुळली आहे. पाच एप्रिलला शहरात कोरोनाचा पहिला मृत्यू झाला. या व्यक्तीच्याच संपर्कात आलेल्या किंवा त्याच्या परिवारातील सदस्यांच्या संपर्कात आलेले सर्व पॉझिटिव्ह आहेत.

सतरंजीपुरा परिसरातील ‘त्या’ वृध्दाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याने प्रशासनाने जलद कार्यवाही सुरू केली. सुरूवातीला या कोरोनाग्रस्त इसमाच्या संपर्कातील त्याच्या परिवारातील तीन मुली, मुलगा, जावई, सुन, नातवंड अशा २२ सदस्यांचे मनपाच्या ‘कोरोना केअर सेंटर’मध्ये विलगीकरण करण्यात आले. याशिवाय किराणा सामान, डॉक्टर, औषध दुकान आणि यासह ज्या अन्य ठिकाणी ‘त्या’ कोरोनाग्रस्त मृत रुग्णाचा व त्याच्या परिवारातील सदस्यांचा संपर्क आला. अशा सर्व ठिकाणच्या १९ लोकांचेही मनपाद्वारे विलगीकरण करण्यात आले. या १९ जणांपैकी आठ जणांचा कोरोना अहवाल निगेटिव्ह आला व एकाचा अहवाल पॉजीटिव्ह आला तर १० अहवाल प्रतीक्षेत आहेत. सदर रुग्णाच्या संपर्कात आलेल्या खाजगी डॉक्टर आणि त्यांच्या दोन सहका-यांनाही विलगीकरण कक्षात ठेवले असून त्यांच्या सहका-यांचा पहिला अहवाल निगेटिव्ह आला होता. मात्र दुस-या अहवालात एक सहकारी कोरोना पॉझिटिव्ह निघाली. आता सदर डॉक्टरकडे मागील १४ दिवसात येणा-या रुग्णांची माहिती घेउन त्यांनाही मनपाच्या विलगीकरण कक्षात आणण्याची कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

या व्यतिरिक्त या व्यक्तीच्या आजारपणात अनेक नातलग आणि शेजारी भेटायला आले. यांची संख्या ४९ आहे. असे एकूण ‘त्या’ रुग्णाच्या थेट संपर्कात आलेल्या ८९ व्यक्ती शोधण्यात आल्या असून त्यांना मनपाच्या विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले आहे. ८९ व्यक्तींपैकीच ४२ व्यक्तींचा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे तर ११ रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे. एकंदरीत नागपुरात एका रुग्णामुळे वेगाने कोरोनाचा संसर्ग वाढतो आहे. मनपाची टिम घरोघरी जाउन सर्वे करून लोकांची माहिती घेत आहे. सतरंजीपुरा भागातील ‘त्या’ रुग्णाने व त्याच्या परिवारातील सदस्याने वेळेवर योग्य माहिती दिली असती तर ही परिस्थिती टाळता आली असती. मात्र अयोग्य माहिती, अपूर्ण माहिती दिल्यामुळे आज या एका रुग्णामुळे शहरातील १९९ लोक त्यांच्या संपर्कात आल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यापैकी ४४ व्यक्तींचा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे तर ११ रुग्णांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे, तर १४४ जणांचा अहवाल प्रतीक्षेत आहे.

काही लक्षणे आढळल्यास किंवा सतरंजीपुरा येथील ‘त्या’ रुग्णाच्या व त्याच्या संपर्कात आलेल्या लोकांशी कुणाचा संपर्क आला असल्यास त्याची माहिती त्वरीत मनपाला द्या. मनपाच्या नियंत्रण कक्षाद्वारे आपल्याला आवश्यक मदत केली जाईल. कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी वेळीच तपासणी होणे आवश्यक आहे. आज शहरात ७५ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत. यापैकी ६० जणांवर उपचार सुरू आहे तर इतर १४ पूर्णपणे बरे झाले आहेत. शहरातून निघणारे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आधीच विलगीकरण कक्षात ठेवले आहेत. रुग्ण आढळताच वेळीच त्यांच्या संपर्कातील व्यक्तींचा शोध घेतला जात आहे. कोरोनाची साखळी खंडीत करण्यासाठी हे सर्व वेळेत होणे आवश्यक आहे. मात्र यासाठी प्रत्येकाचे सहकार्य आवश्यक आहे. कोरोनाला रोखण्यासाठी प्रत्येकाने प्रशासन आणि समाजाला सहकार्य करा, असे आवाहनही मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

मनपाच्या सर्वेक्षण चमूला सहकार्य करा

शहरात ज्या ठिकाणी कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत ते क्षेत्र मनपातर्फे प्रतिबंधित करून सील करण्यात आले आहेत. आतापर्यंत मनपाद्वारे एकूण नउ क्षेत्र प्रतिबंधित केले आहेत. यापैकी चार क्षेत्रांचा १४ दिवसांचा कालावधी पूर्ण झाला आहे. १४ दिवस मनपाच्या चमूद्वारे सर्वेक्षण करण्यात आले असून या चार क्षेत्रामध्ये कोणताही रुग्ण संशयीत आढळला नाही. सद्यस्थिती पाच क्षेत्र प्रतिबंधित असून संपूर्ण परिसर सील करण्यात आला आहे. या भागातील लोकांना बाहेर जाउ दिले जात नाही व बाहेरील लोकांनाही प्रतिबंधित क्षेत्रात प्रवेश देण्यात येत नाही. कोरोनाग्रस्त रुग्ण आढळलेल्या दिवसापासून मनपाच्या वैद्यकीय चमूद्वारे १४ दिवस सर्वेक्षण केले जाते. पाच झोनमध्ये २४ डॉक्टरांसह २७१ चमू कार्यरत आहेत. या चमूंद्वारे दररोज सुमारे १९४४३ घरांमधील ८१०६१ लोकांचे सर्वेक्षण केले जात आहे. सर्दी, ताप, खोकला यासह अन्य लक्षण आणि प्रवासाची माहिती या सर्वेक्षणात घेतली जाते. पाच झोनमधील लक्षणे आढळलेल्या १८७ जणांना विलगीकरण कक्षात पाठविण्यात आले आहे. नागरिकांच्या सुरक्षेसाठी मनपाची आरोग्य चमू जीव धोक्यात घालून कर्तव्य बजावत आहे. नागरिकांनीही या चमूला योग्य आणि अचूक माहिती देउन सहकार्य करावे, असे आवाहन आयुक्तांनी केले आहे.

Also Read- धोका वाढला! नागपुरात करोनाग्रस्तांची संख्या ८० वर

धोका वाढला! नागपुरात करोनाग्रस्तांची संख्या ८० वर

corona-positive

नागपूर: करोना विषाणूची साखळी नागपुरभोवती दिवसेंदिवस करकचून आवळली जात आहे. एकाच दिवशी काल दहा रुग्णांना प्रादुर्भाव झाल्यानंतर अवघ्या काही तासांमध्ये यात आणखी आठ जणांची भर पडली. त्यामुळे या विषाणूने शहरात शिरकाव केल्यापासून आतापर्यंत बाधित झालेल्यांची संख्या ८० पर्यंत पोहोचली आहे.

चिंतेची बाब म्हणजे शहरात सोमवारी नव्याने पॉझिटिव्ह आढळलेल्या आठ जणांपैकी बहुतांश जण हे सतरंजीपुरा येथील करोनाबाधित रुग्णाच्या निकट सहवासात आलेल्यांपैकी आहेत. करोना प्रादुर्भावाची साखळी खंडीत होण्याऐवजी ती दिवसागणिक वाढत असल्याने सतरंजीपुराचा परिसर या आजाराचे केंद्रबिंदू ठरत आहे. त्यामुळे संपूर्ण सतरंजीपुरा, मोमिनपुरा आणि शांतीनगरात भीती- दहशत आणि चिंता असे विचित्र वातावरण आहे.

सोमवारी पॉझिटिव्ह आढळलेल्यांच्या घशातील स्त्रावाची शहरातील मेडिकल, मेयो आणि एम्स अशा तिन्ही ठिकाणी चाचणी करण्यात आली. त्यात एम्समध्ये एक, मेयोत एक तर मेडिकलच्या विषाणू प्रयोगशाळेत चार नमुन्यांमध्ये करोनाचा अंश सापडला. यात मेडिकलमध्ये पॉझिटिव्ह आढळलेल्यांमध्ये ४० वर्षीय पुरुष आणि अनुक्रमे ११ वर्षीय मुलगी आणि ३५ वर्षीय महिलेचा समावेश आहे. तर मेयोत तपासलेल्या नमुन्यांपैकी १३ वर्षीय मुलाच्या घशातील स्त्राव नमुन्यात करोना विषाणूचा अंश सापडला. सतरंजीपुरा येथील रुग्णाचा नातेवाईक असलेला हा मुलगा लोणारा येथील विलगीकरण कक्षात दाखल होता.

This is Why Government is Not Allowing Shopping Sites to Sell Everything Just Yet

The government of India has done a U-turn on the sale of essential goods via e-commerce websites, three days after it gave the go-ahead. A ministry of home affairs press release said, “supply of nonessential goods by e-commerce companies to remain prohibited during the lockdown.” The u-turn comes after the CAIT – Confederation of All India Traders sought the prime minister’s intervention against the decision to allow the sale of non-essentials via e-commerce websites. CAIT’s National Secretary General, Praveen Khandelwal in a statement on Sunday welcomed the new decision of the government. “CAIT demolished the sinister plan of e-commerce companies to trade in non-essential commodities. Thanks to HM Amit Shah, Defence Minister Rajnath Singh and Commerce Minister Piyush Goyal,” Khandelwal said.

Piyush Goyal too had written to MHA about the decision to allow the sale of non-essentials by e-commerce companies.

On Sunday a fresh order was issued by the union home secretary which said that e-commerce vehicles will need special permission to operate. Amending sub-clause 5 under clause 14 on commercial and private establishments, Home secretary’s order said “In continuation of the MHA order dated 15th and 16th April 2020, undersigned hereby orders to exclude the following from the consolidated revised guidelines for strict implementation – e-commerce companies, vehicles used by e-commerce operators will be allowed to play only with necessary permissions.” While the order doesn’t spell out a clear ban on the sale of nonessentials, MHA spokesperson clarified the position.

Earlier the MHA guideline had said that all Kirana stores, brick and mortar stores, and e-commerce websites will be allowed to operate if they followed the social distancing norms. Since the order didn’t make a distinction between essentials and nonessentials, e-commerce websites had started accepting orders for non-essential goods to be delivered post 20th April.

UPDATE: Union Home secretary in a fresh order has asked states and Union Territories to not allow the sale of nonessential goods on e-commerce websites. “I would like to clarify that while operations of e-commerce companies for non-essential goods have been prohibited, however, they will continue to operate for essential goods as has been allowed earlier,” the home secretary said in his latest communication with chief secretaries of states and UTs. He has also instructed that field agencies in States be accordingly apprised

Also Read- उपराजधानीत दिवसभरात १० ‘कोरोना’ बाधितांचे निदान; एकूण ७३

उपराजधानीत दिवसभरात १० ‘कोरोना’ बाधितांचे निदान; एकूण ७३

करोनाग्रस्तांच्या तुलनेत करोनामुक्तांचे प्रमाण घसरून ७७.६० टक्यांवर

नागपूर : कोरोनाबाधितांची संख्या वाढतच चालली आहे. रविवारी पाच महिलेसह पाच पुरुषांना कोरोनाची लागण झाल्याचे निदान झाले. या रुग्णांसह नागपुरात बाधितांची संख्या ७३ झाली. धक्कादायक म्हणजे, पहिल्या कोरोना मृताकडून आतापर्यंत ४० पॉझिटिव्ह आले आहेत. यात त्यांचे नातेवाईक, शेजारी व नातेवाईकांच्या घरी काम करणाऱ्यांचा समावेश आहे. ही संख्या आणखी वाढण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.

नागपुरात पहिल्या कोरोनाबाधित ६८ वर्षीय रुग्णाचा मृत्यू ४ एप्रिल रोजी झाला. परंतु नमुन्याचा अहवाल येण्यास दोन दिवस लागले. त्यानंतर मृताचे नातेवाईक, शेजारी, यांच्यापासून इतरांना संसर्ग होण्याची साखळी वाढतच चालली आहे. विशेष म्हणजे, मृताची प्रवाशाची पार्श्वभूमी नसताना ते पॉझिटिव्ह आले होते. ही लागण त्यांचाच नातेवाईक ज्याचा ट्रव्हल्स एजन्सीचा व्यवसाय आहे त्याच्याकडून झाल्याचे सांगण्यात येते. हा एजंटही नऊ एप्रिल रोजी पॉझिटिव्ह आला. रविवारी पॉझिटिव्ह आलेले नऊ रुग्ण याच संपर्कातील आहे. यात १३, २९, ३३, ३५ व ३६ वर्षीय महिला तर १३, १५, ३३ व ३५ वर्षीय पुरुष आहे. यातील एक रुग्ण मोमीनपुरा तर चार रुग्ण शांतीनगर तर उर्वरीत रुग्ण हे सतरंजीपुºयातील आहेत.

यांना काही दिवसांपूर्वी आमदार निवासाच्या अलगीकरण कक्षात दाखल केले होते. दोन दिवसांपूर्वी यांचे नमुने मेयोच्या प्रयोगशाळेत पाठविले असता आज सकाळी अहवाल पॉझिटिव्ह आला. यातील चार रुग्णांना मेयो तर पाच रुग्णांना मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले. विशेष म्हणजे, शनिवारी मेडिकलच्या प्रयोगशाळेत तपासण्यात आलेल्या नमुन्यांचा अहवाल रविवारी सायंकाळी प्राप्त झाला. यात राजीवनगर कामठी रोडवरील ३२ वर्षीय व्यक्ती पॉझिटिव्ह आला. हा रुग्ण आमदार निवासात क्वारंटाइन होता.

Also Read- शहरातील अनुज्ञेय उद्योग, आस्थापनांना सामाजिक अंतराचे नियम पाळणे बंधनकारक

शहरातील अनुज्ञेय उद्योग, आस्थापनांना सामाजिक अंतराचे नियम पाळणे बंधनकारक

Nagpur Municipal Corporation NMC

नागपूर: लॉकडाऊनदरम्यान २० एप्रिलपासून काही उद्योग, आस्थापना सुरू करण्यासंदर्भात राज्य सरकारने १७ एप्रिल रोजी एकत्रित मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. लॉकडाऊन कालावधीत राज्य सरकारने विहीत केलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार संबंधितांकडून संपूर्ण अटी व शर्तींचे पालन होत असेल तरच मनपा आयुक्त त्यासंदर्भातील अनुषांगिक परवानगी देतील. यासंदर्भात अर्ज करताना संबंधित आस्थापनेची कार्यप्रणाली कशी असेल, किती कर्मचारी उपस्थित राहतील, त्यांच्या बसण्याची व्यवस्था करताना सामाजिक अंतर पाळले जात आहे की नाही, सॅनिटायझेशनची काय व्यवस्था असेल आदींचा स्पष्ट उल्लेख अर्जात असायला हवा. अनुज्ञेय उद्योग सुरु करताना तेथपर्यंतच्या कर्मचा-यांच्या प्रवासाची परवानगीकरिता कर्मचा-यांना ‘ट्रॅव्हल पास’ मनपा आयुक्तांकडून घ्यावी लागेल व महाराष्ट्र शासनाच्या १७ एप्रिल रोजीच्या आदेशातील परिशिष्ट दोनमध्ये नमूद केलेल्या एसओपीचे पालन करणे बंधनकारक राहील.

प्रतिबंधित क्षेत्रात शिथिलता नाही

नागपूर महानगरपालिकेतील जे क्षेत्र कोविड-१९ चे रुग्ण आढळल्यामुळे मनपा आयुक्तांनी प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित केले आहे, त्या क्षेत्रात मात्र सदर उद्योग, आस्थापनांना शिथिलता अनुज्ञेय राहणार नाही. अर्थात कोरोनाचे रुग्ण आढळलेले जे क्षेत्र मनपा आयुक्तांनी सील केलेले आहेत, त्या क्षेत्रातील वरीलपैकी कुठल्याही सदर कामांना परवानगी मिळणार नाही अथवा भविष्यात नव्याने कोरोना रुग्ण आढळले तर रुग्ण ज्या क्षेत्रातील असेल ते क्षेत्र प्रतिबंधित म्हणून घोषित करण्यात येईल. तेथील कुठल्याही उद्योगांना, आस्थापनांना तात्काळ प्रभावाने लॉकडाऊन कालावधीत व्यवसाय करण्यासंदर्भातील परवानगी रद्द करण्याचे अधिकार मनपा आयुक्तांना राहतील. सद्यस्थितीत महानगरपालिकेच्या एकूण दहा झोनपैकी गांधी-महाल, सतरंजीपुरा, आसीनगर, मंगळवारी व धरमपेठ या झोनमधील संबंधित काही क्षेत्र हे प्रतिबंधित क्षेत्र म्हणून जाहीर करण्यात आलेले आहेत. त्यामुळे सदर क्षेत्रात सदर शिथीलतम उद्योग, व्यवसायांना परवानगी अनुज्ञेय असणार नाही.

असे राहतील मार्गदर्शक तत्त्वे (एसओपी)

उद्योग, आस्थापना व शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार ज्यासाठी परवानगी हवी आहे त्यासाठी पुढीलप्रकारे मार्गदर्शक तत्त्वे (एसओपी) राहतील.

– संबंधित आस्थापनेच्या संपूर्ण क्षेत्राचे निर्जंतुकीकरण करणे

– कर्मचाऱ्यांसाठी कंपनीतर्फे सामाजिक अंतर पाळून प्रवास व्यवस्था करणे

– थर्मल स्कॅनिंग करणे

– लिफ्टचा कमीत कमी वापर करणे

– गुटखा, तंबाखू आणि थुंकण्यावर निर्बंध

– कामाच्या दोन पाळ्यांमध्ये एक तासाचे अंतर असावे

परवानगीसाठी मनपात विशेष कक्ष

संबंधित आदेशानुसार घ्यावयाच्या परवानगीसाठी विहीत नमुन्यातील अर्ज भरून द्यावा लागेल. नागपूर महानगरपालिकेच्या सामान्य प्रशासन विभागात यासाठी विशेष कक्ष सुरु करण्यात येत आहे. संबंधितांनी सादर केलेल्या अर्जाची संपूर्ण पडताळणी केल्यानंतरच योग्य वाटल्यास आणि नियमांची पूर्तता करणाऱ्या अर्जांनाच परवानगी देण्यात येईल.

लॉकडाऊन सुरूच राहणार

काही अटी शर्तींच्या आधारे परवानगी देण्यात येत असली तरी लॉकडाऊन ३ मे पर्यंत कायमच राहील. या सर्व सेवांतील व्यक्ती, वाहने ज्यांना मनपा आयुक्तांतर्फे परवानगी आहे, अशांनाच फक्त संबंधित ठिकाणी जाता येईल. इतरांना घरातच राहायचे आहे. लॉकडाऊनदरम्यान पाळावयाचे नियम पाळायचेच आहेत. या काळात राज्य सरकारच्या सूचनांचे जे लोक उल्लंघन करतील, त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

Also Read- डासांमार्फत होणा-या आजारांच्या प्रतिबंधासाठी मनपाची स्वच्छता मोहिम

भारताने फास आवळला; चीनचा ‘बायपास’ मार्गही बंद

परकीय गुंतवणूक

चीन आणि सीमा लागून असलेल्या इतर सात देशांमधून येणाऱ्या परकीय गुंतवणुकीसाठी पूर्व परवानगी आवश्यक असल्याचं भारताने जाहीर केलं आहे. यासाठी परकीय गुंतवणूक नियमात बदल करण्यात आले आहेत. विशेषतः चीनमधून येणाऱ्या गुंतवणुकीवर यातून नजर असेल. भारतातील कमकुवत उद्योग वाचवणं हा यामागचा हेतू आहे. पण भारताने आता आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. अप्रत्यक्षरित्या चीनमधून येणाऱ्या गुंतवणुकीलाही परवानगी लागणार आहे. उदाहरणार्थ, ऑस्ट्रेलियातील गुंतवणूक भारतात येत असेल, पण त्या संबंधित कंपनीत जर चीनची गुंतवणूक असेल तर त्याला परवानगीची गरज असेल. भारताने चीनच्या अप्रत्यक्ष गुंतवणुकीविरोधातही फास आवळल्याने गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले आहेत. संधीसाधू गुंतवणूक टाळण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करत आहे. करोनाच्या पार्श्वभूमीवर भारतीय बाजारात रोकड तरलतेचा अभाव असल्याने आर्थिक संकट आहे. याचा फायदा घेऊन चीनने अनेक उद्योगांमध्ये आपले पाय पसरण्याची भीती जाणकारांकडून व्यक्त केली जात होती.

चीन, नेपाळ, पाकिस्तान, भूटान, बांगलादेश, म्यानमार आणि अफगाणिस्तान या देशांमधून येणाऱ्या प्रत्येक गुंतवणुकीची माहिती केंद्र सरकारला द्यावी लागेल. अंतिम निर्णय केंद्र सरकारवर अवलंबून असेल. सध्या अस्तित्वात असलेल्या कंपनीत गुंतवणूक येत असेल किंवा नवीन गुंतवणूक असेल तरीही परवानगी घ्यावी लागेल. सरकारी अधिकाऱ्यांच्या मते, ही बहुस्तरीय व्यवहार पद्धत आहे, ज्यावर सरकारकडून नियंत्रण ठेवलं जातंय. चीनची गुंतवणूक असलेल्या एखाद्या उद्योगाला भारतात यायचं असेल तर त्यालाही परवानगी घ्यावी लागेल. कोणत्याही स्तरावर चीनची गुंतवणूक असेल तर सरकारचा निर्णय अंतिम असेल. त्यामुळे भारतीय नियमांना बायपास करण्याचा मार्गही आता बंद झाला आहे.

चीनमध्ये गुंतवणूक असणारे खाजगी इक्विटी गुंतवणूकदार आणि व्हेंचर कॅपिटल फंड यांनाही पूर्व परवानगीची आवश्यकता असेल. शनिवारी जाहीर करण्यात आलेल्या नवीन नियमांनुसार, सात देशांसाठी स्वयंचलित परकीय गुंतवणूक बंद करण्यात आली आहे. पण यातून बहुस्तरीय व्यवहाराच्या माध्यमातून भारतात गुंतवणूक येण्याची शक्यता अजूनही होती. करोना व्हायरसमुळे विविध देशातील परिस्थिती कमकुवत बनली आहे. त्यामुळे भारतासह इतर देशही आपले उद्योग वाचवण्यासाठी प्रयत्न करत आहेत.

जगभरात स्वतःचे उद्योग वाचवण्यासाठी खबरदारी

युरोप आणि अमेरिकेनेही यासाठी पाऊलं उचलली आहेत. ऑस्ट्रेलियाने करोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर मार्च महिन्यातच नियम कडक केले होते, जेणेकरुन ऑस्ट्रेलियन उद्योगांचं कमी पैशात अधिग्रहण केलं जाऊ नये. जाणकारांच्या मते, भारताने घेतलेल्या या निर्णयाचा सर्वात मोठा फटका चीनला बसणार आहे. प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष परकीय गुंतवणुकीसाठी मुक्त बाजारपेठेतून पूर्व परवानगीकडे वाटचाल हा निर्णय भारत सरकारकडून होणं अपेक्षितच होतं. कमी दरात अधिग्रहण ही भीती सगळीकडेच आहे. आता विशेषतः चीनच्या कंपन्या सरकारच्या रडारवर असतील आणि त्यावर निगराणी राहिल, अशी प्रतिक्रिया नांजिया अँडरसन एलएलपीचे संचालक संदीप झुंझुनवाला यांनी ईटीशी बोलताना दिली. चीनचे उद्योग भारतात पाय पसरण्यासाठी उत्सुक असून कित्येक बिलियन डॉलरची तरतूदही यासाठी केलेली आहे. त्यामुळे चीनला याचा फटका बसेल, असं जाणकार सांगतात.

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांनीही याबाबतची चिंता नुकतीच व्यक्त केली होती. त्यांनी आता सरकारच्या निर्णयाचं स्वागत केलं आहे. आर्थिक मंदीमुळे भारतीय कंपन्या अत्यंत कमकुवत झाल्या असून त्या अधिग्रहणासाठी आकर्षणाचं केंद्रबिंदू बनल्या आहेत. या राष्ट्रीय संकटाच्या परिस्थितीत कोणत्याही परकीय व्यक्तीने भारतीय उद्योगाचं अधिग्रहण करू नये याची काळजी सरकारने घ्यायला हवी, अशी मागणी राहुल गांधींनी केली होती. चीनच्या केंद्रीय बँकेने एचडीएफसीमध्ये शेअर विकत घेतल्यानंतर राहुल गांधी यांनी ट्वीट केलं होतं.

लॉकडाऊनमुळे उद्योग संकटात

करोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटाचा फायदा घेऊन भारतीय उद्योगांचे संधीसाधू अधिग्रहण केले जाऊ नये यासाठी भारताकडून आढावा घेण्यात आला आहे, असंही पत्रकात स्पष्ट करण्यात आलं आहे. काही देशांतून येणाऱ्या परकीय गुंतवणुकीची अतिरिक्त पडताळणी करण्यासाठी डीपीआयआयटी आणि केंद्रीय गृहमंत्रालय सध्या चर्चा करत आहेत. पण चीनमधून येणारी संधीसाधू गुंतवणूक भारतीय उद्योगांना गिळंकृत करू नये ही सर्वात मोठी भीती आहे. भारतातील बहुतांश उद्योग लॉकडाऊनमुळे आर्थिक संकटाचा सामना करत आहेत.

लॉकडाउन: आज पासून काय सुरू, काय बंद?

lockdown

नवी दिल्ली: देशव्यापी लॉकडाउन सुरूच असून मात्र, आज पासून केंद्र सरकारने कंटेनमेंट झोन नसलेल्या भागांसाठी सशर्थ सूट देऊ केली आहे. मात्र, करोना हॉटस्पॉट असणाऱ्या भागांमध्ये कडक निर्बंध लागूच असणार आहेत. केंद्र सरकारने याबाबत काल रविवारी स्पष्ट केले.

आज २० एप्रिलपासून या सेवा सुरू राहणार…

१. आयुषसह सर्व आरोग्य सेवा.

२. काही व्यावसायिक आणि खासगी आस्थापने

3. राज्यांतर्गत प्रवास करत मजुरांना काम करण्याची मुभा

४. जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा.

५. ५० टक्क्यांच्या कर्माचारी संख्येने आयटी आणि आयटीशी संबंधित सेवा

६. ग्रामिण क्षेत्रातील उद्योगधंदे

७. किराणा आणि रेशनची दुकाने.

८. वर्तमानपत्रे, वृत्त वाहिन्या, डीटीएच आणि केबल सेवा

९. इलेक्ट्रिशियन, प्लंबर, मोटर मेकॅनिक, कारपेंटर, आयटी दुरुस्ती, कुरिअर सेवा.

१०. फळभाज्या, फळांची दुकाने, साफसफाईचे सामान विकणारी दुकाने.

११. दूध आणि दुधाशी संबंधित अन्य पदार्थांची दुकाने.

१२. चिकन, मटण, मासे आणि अंडी विकणारी दुकाने.

१३. ‘ई कॉमर्स’ कंपन्यांकडून अत्यावश्यक वस्तूंची सेवा.

१४. मासेमारी आणि जलचर उद्योग

१५. चहा, कॉफीचे मळे, रबर उत्पादन (५० टक्के कामगारांनाच परवानगी)

१६. पशुसंवर्धन

१७. सामाजिक क्षेत्रे

१८. मनरेगाची कामे

१९. सार्वजनिक सेवा-सुविधा

२०. मालाचे लोडिंग-अनलोडिंग ( राज्यांतर्गत तसेच आंतरराज्यीय)

२१. निवडक उद्योग (सरकारी आणि खासगी)

२२. अत्यावश्यक सेवांसाठी खासगी वाहने (वैद्यकीय, पशुवैद्यकीय सेवा, जीवनावश्यक वस्तू)

२३. परवानगी देण्यात आलेल्या कामगारांना कामाच्या स्थळी प्रवास करणे

२४. केंद्र, राज्य आणि केंद्र शासित प्रदेशातील शासकीय कार्यालये

या सेवा राहणार बंद

१. प्रवासी रेल्वे वाहतूक (सुरक्षेसाठी वगळून)

२. सार्वजनिक बस सेवा

३. मेट्रो रेल्वे सेवा

४. विमान वाहतूक

५. ऑटो रिक्षा, कॅब सेवा

६. आंतरजिल्हा आणि आंतरराज्य व्यक्तिगत प्रवास ( वैद्यकीय कारणे आणि सरकारने परवागी दिलेल्या व्यक्ती वगळून)

७. ई-कॉमर्स कंपन्यांची अत्यावश्यक सेवेत न येणाऱ्या वस्तू

८. सिनेमा हॉल, शॉपिंग मॉल, जिम आणि बार, स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स, स्वीमिंग पूल, मनोरंजनाची ठिकाणे, कार्यक्रमाचे हॉल आणि तत्सम ठिकाणे.

९. शाळा, कॉलेज आणि कोचिंग इन्स्टिट्यूट

१०.सर्व धार्मिक स्थळे आणि धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

११. सर्व सामाजिक, राजकीय, मनोरंजनात्मक, शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रम

१२. अंत्यसंस्कारासाठी २० पेक्षा अधिक लोकांना परवानगी नाही

डासांमार्फत होणा-या आजारांच्या प्रतिबंधासाठी मनपाची स्वच्छता मोहिम

municipal sanitation campaign

नागपूर: डासांपासून होणा-या आजारांपासून संरक्षणाच्या दृष्टीने नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाद्वारे मोहिम सुरू करण्यात आले आहे. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या संकल्पनेतून सुरू करण्यात आलेल्या मोहिमेद्वारे डासांची पैदास होणारी १५ हजार ठिकाणे शोधण्यात आली असून ती बंद करण्याबाबत कार्यवाही सुरू करण्यात आली आहे.

शहरातील रहिवासी क्षेत्राजवळ, मोकळ्या जागेत दलदल, कचरा, घाणीमुळे डासांची पैदास होत आहे. त्यामुळे डेंग्यू, मलेरियासारखे आजार पसरतात. पावसाळ्यापूर्वीच अशी ठिकाणे शोधून ती बंद करण्याची आवश्यकता आहे. यासाठी मनपा आयुक्तांच्या नेतृत्वात डास निर्मूलनासाठी मोहिम सुरू करण्यात आली आहे. या मोहिमेद्वारे माती, मलबा टाकून डासांची पैदास होणारी ठिकाणे बंद करण्यात येत आहे. यासाठी रस्त्याच्या बाजूच्या फुटपाथलगतच्या पावसाचे पाणी जाण्यासाठी तयार करण्यात आलेल्या नाल्यांची स्वच्छता सुरू करून त्यामधून निघणारा कचरा, माती याचा वापर डासांची पैदास स्थळे बंद करण्यासाठी केला जात आहे.

शहरातील मुख्य मार्ग आणि अंतर्गत मार्गांच्या बाजूला असलेल्या नाल्या बुजलेल्या स्थितीत असल्याने पावसाळ्यात रस्त्यावर पावसाचे पाणी जमा होउन पूरजन्य परिस्थिती निर्माण होते. प्रत्येकच पावसाळ्यात नागरिकांना हा त्रास सहन करावा लागतो. ही बाब लक्षात घेता शहरातील सर्व रस्त्यांच्या बाजूला फुटपाथलगतच्या पावसाचे पाणी जाण्याच्या नाल्यांची स्वच्छताही सुरू करण्यात आली आहे. या स्वच्छतेद्वारे नाल्यांमधून माती व अन्य कचरा काढून प्रवाह मोकळा करण्यात येत आहे. यामधून निघणारी माती डासांची पैदास होणा-या दलदलीच्या ठिकाणी टाकून ती ठिकाणे बंद करण्यात येत आहे. शहरात आतापर्यंत डासांची १५ हजार पैदास स्थळे शोधण्यात आली असून ती बंद करण्यासाठी फुटपाथलगतच्या नाल्यांतील माती, कच-यासह शहरात पडून असलेल्या बांधकाम साहित्य, मलब्याचाही उपयोग केला जात आहे.

नागपूर महानगरपालिकेच्या आरोग्य विभाग, लोककर्म विभाग आणि स्वयंसेवी संस्थांच्या सहकार्याने हे कार्य सुरू आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने सुरू करण्यात आलेल्या या मोहिमेमुळे येत्या एक महिन्यात शहराचे चित्र पालटणार आहे.

Also Read- नागपुरातील सतरंजीपुरा ठरतेय ‘करोना’चे हब

नवजात शिशुंसाठी मनपा उपलब्ध करून देतेय आहार

“No leave for health officials” Tukaram Mundhe
“No leave for health officials” Tukaram Mundhe

नागपूर: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरू असलेल्या लॉकडाऊनच्या काळात वृद्धांना, निराधारांना मदतीचा हात देणाऱ्या नागपूर महानगरपालिकेने आता नवजात शिशुंना आहार देण्याचा उपक्रम सुरु केला आहे. मनपाच्या वतीने गरजू कुटुंबांसाठी ही व्यवस्था करण्यात आली आहे.

नागपूर महानगरपालिकेच्या वतीने लॉकडाऊनदरम्यान शहरातील गरजू व्यक्तींसाठी अन्नदानाची व्यवस्था करीत असताना मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या लक्षात हा प्रश्न आला. गरीब घरातील अनेक मातांची या काळात प्रसूती झाली. त्या घरात मनपातर्फे कुटुंबातील सदस्यांसाठी अन्न तर पुरविले जात आहे. मात्र नवजात शिशुंची होरपळ होत असल्याचे वास्तव त्यांच्या लक्षात आले. त्यांनी ही बाब हेरून पॉवर ऑफ वन वेलफेयर फाऊंडेशन या संस्थेला आवाहन केले. मनपा आयुक्तांच्या आवाहनाला दाद देत सदर संस्थेने ही व्यवस्था केली. शनिवारी (ता. १८) शहरातील १० गरजू परिवारांना शिशु आहाराची व्यवस्था करुन देण्यात आली.

उपायुक्त तथा नोडल अधिकारी मिलिंद मेश्राम यांनी सांगितले की, गरजू कुटुंबातील नवजात शिशुंसाठी आहाराची व्यवस्था यापुढे करण्यात येईल. यासाठी गरजूंनी ०७१२-२५३९००४ क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन त्यांनी केले.

Also Read- नागपुरातील सतरंजीपुरा ठरतेय ‘करोना’चे हब

महासंकटाच्या काळात ‘मैत्री’चा आधार मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केली प्रशंसा : किचनला भेट देऊन सेवाव्रतींचा वाढविला उत्साह

munde visited the kitchen

नागपूर: कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाऊन सुरू असताना बाहेरगावचे असलेले आणि नागपुरात अडकलेले विद्यार्थी, निराधार ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग आणि नागपुरात अडकलेल्या बाहेरगावच्या व्यक्तींच्या मदतीसाठी नागपूर महानगरपालिकेच्या आवाहनाला साद देत अनेक सामाजिक संस्था धावून आल्या. मनपाच्या नेतृत्वात या सामाजिक संस्थांनी अशा व्यक्तींना आधार दिला. यातीलच एक संस्था म्हणजे मैत्री परिवार. अन्नदानाचे महत्‌कार्य करीत ‘मैत्री’ने गरजूंना दिलेला आधार लाख मोलाचा ठरत आहे.

नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शहरातील अशा व्यक्तींच्या मदतीसाठी स्वयंसेवी संस्थांना हाक दिली. शहरातील २७ ठिकाणी कम्युनिटी किचन उघडून ज्या व्यक्तींना भोजनाची आवश्यकता आहे अशा व्यक्तींना दोन वेळचे भोजन पुरविण्याचे कार्य नागपूर महानगरपालिकेने सुरू केले. यामध्ये शहरातील अग्रणी सेवाभावी संस्था ‘मैत्री परिवारा’चे कार्य प्रशंसनीय ठरले आहे.

मैत्री परिवाराने २५ मार्चपासून लॉकडाऊनच्या काळात बाहेरगावचे होस्टलवर किंवा रुमवर राहणारे विद्यार्थी ज्यांच्याकडे जेवणाची काही सोय नाही अशांना भोजन पुरविण्याची व्यवस्था उभारली. प्रारंभी ४१६ व्यक्तींना कोतवाली पोलिस ठाण्याच्या माध्यमातून भोजन पुरविण्याची सुरुवात झाली. हळूहळू हा आकडा वाढत गेला. २९ मार्चपासून मैत्री परिवाराने संस्थेच्या नेटवर्कच्या माध्यमातून सेवा देण्यास प्रारंभ केला. आज सुमारे २५०० विद्यार्थी, ज्येष्ठ नागरिक आदींना फूड पॅकेट पोहचविण्यात येतात.

मैत्री परिवाराच्या किचनमधून तयार झालेल्या फूड पॅकेटस्‌पैकी ८७३ व्यक्तींना मैत्री परिवार स्वयंसेवकांच्या माध्यमातून, १७५ फूड पॅकेटस्‌ राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांच्या माध्यमातून, १०० फूड पॅकेटस्‌ कोतवाली पोलिस ठाण्याच्या माध्यमातून तर ३०० फूड पॅकेटस्‌ नागपूर महानगरपालिका कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून पोहचविण्यात येतात. हा आकडा दररोज बदलत असतो.

दोन किचन आणि शेकडो स्वयंसेवक

मैत्री परिवार दोन किचनच्या माध्यमातून सामाजिक अंतराचे भान राखत शेकडो स्वयंसेवकांच्या मदतीने अन्नदानाचे कार्य करीत आहे. मैत्री परिवारातर्फे संचालित सुरेंद्र नगर येथील वसतिगृहात एक स्वयंपाकघर तयार करण्यात आले आहे तर दुसरे स्वयंपाकघर धरमपेठ येथील वझलवार लॉन येथे सिटीझन ॲक्शन ग्रुपच्या सहकार्याने तयार करण्यात आले आहे. येथे निर्जंतुकीकरण नियमित करण्यात येते. या दोन्ही स्वयंपाकघरात सकाळी ५ वाजतापासून स्वयंपाकाला सुरुवात होते. दुपारी १२ वाजताच्या आत गरजूंना फूड पॅकेट पोहचविले जातात. विशेष म्हणजे हे अन्न जीवनसत्व युक्त असून त्यात वैविध्य असते. या काळात नागरिकांना श्रीखंड, बुंदीचे लाडू, या मिष्ठान्नासोबतच फळेसुद्धा दिली जातात. अन्न वितरणाच्या दृष्टीने मैत्री परिवाराने संपूर्ण शहराची विभागणी १४ झोनमध्ये केली आहे. वितरणासाठी १४ वाहने असून वाडी, हिंगणा, पारडी, उमरेड रोड, हुडकेश्वर, काटोल रोड आदी दूरवरच्या भागातही अन्न पुरविले जात आहे. विशेष म्हणजे या फूड पॅकेट्सव्यतिरिक्त १५०० अतिरिक्त चपात्याही गरजूंना पुरविल्या जातात. मागणी आल्यानंतर संबंधित व्यक्तींकडून आधार कार्ड, महाविद्यालयाचे ओळखपत्र किंवा कर्मचारी असेल तर कार्यालयाचे ओळखपत्र घेतले जाते. संबंधित व्यक्ती खरंच गरजू आहे अथवा नाही याची शहानिशा केल्यानंतरच त्याला सेवा पुरविली जाते.

मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिली भेट

नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी शनिवारी (ता. १८) सुरेंद्रनगर आणि धरमपेठ येथील दोन्ही स्वयंपाकघराला भेट देऊन मैत्री परिवार आणि कॅगच्या सेवाकार्याची प्रशंसा केली. मैत्री परिवाराचे अध्यक्ष प्रा. संजय भेंडे प्रा. प्रमोद पेंडके, कॅगचे विवेक रानडे, श्रीपाद इंदोलीकर यांच्याशी चर्चा केली. मैत्री परिवार या महासंकटसमयी करीत असलेल्या कार्याला तोड नाही. भविष्यात जर गरज पडली तर नागपूर महानगरपालिका पुन्हा काही संसाधने उपलब्ध करून देईल, असा विश्वास त्यांनी यावेळी दिला. यावेळी त्यांनी तेथील स्वयंसेवकांशी संवाद साधून त्यांचा उत्साह वाढविला. यावेळी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्यासह अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त तथा नोडल अधिकारी मिलिंद मेश्राम उपस्थित होते. बंडू भगत, अमन रघुवंशी, रोहित हिमते, माधुरी यावलकर, मनीषा गाडगे, मृणालिनी पाठक, दिलीप ठाकरे, किरण संगावार, सुचित सिंघानिया, नितीन पटवर्धन आदी मैत्री परिवाराच्या माध्यमातून या सेवेसाठी अथक परिश्रम घेत आहेत.

ज्येष्ठ निराधारांसाठी विशेष सेवा

मैत्री परिवार अन्नदानासोबतच शहरातील निराधार ज्येष्ठ नागरिकांसाठी विशेष सेवा पुरवित आहे. भोजनाची मागणी असलेल्या विद्यार्थ्यांसाठी ९११९५६७६७२ आणि निराधार ज्येष्ठांच्या मदतीसाठी ८६००५९०६२० हे दोन क्रमांक संस्थेने जाहीर केले आहे. निराधार वृद्धांना कुठलीही मदत हवी असल्यास त्यांनी संबंधित क्रमांकावर फोन केल्यास मैत्री परिवार त्यांना मदत पोहचवेल. दरम्यान मैत्री परिवाराने त्यांना आलेल्या कॉलच्या आधारावर बुटीबोरीतील एका ज्येष्ठ व्यक्तीला औषधी पोहचविली होती.

Also Read- नागपुरातील सतरंजीपुरा ठरतेय ‘करोना’चे हब

Air India opens bookings on select domestic routes from May 4, intl from June 1

Air India

New Delhi: Air India on Saturday announced it has opened bookings on select domestic and international routes from May 4 and June 1, respectively.

“In the light of the ongoing global health concerns, we have currently stopped accepting bookings on all domestic flights for travel till May 3, 2020, and on all international flights for travel till May 31, 2020,” a notification on Air India’s website said on Saturday.

“Bookings for select domestic flights for travel from May 4, 2020, and for international flights for travel from June 1, 2020 onwards are open,” it stated.

India has been under lockdown since March 25 to curb the spread of novel coronavirus. The first phase of the lockdown was from March 25 to April 14. Prime Minister Narendra Modi on April 14 extended the lockdown till May 3.

All domestic and international commercial passenger flights have been suspended during this period. On April 3, Air India had said it has stopped bookings, both domestic and international, till the end of the month.

Also Read- कोविड-१९ चा प्रभाव कमी करण्यासाठी बाजारात १ लाख कोटींची तरलता

नागपुरातील सतरंजीपुरा ठरतेय ‘करोना’चे हब

corona Survey

नागपुर: करोना विषाणूच्या संसर्गाचे हब ठरत असलेल्या पूर्व नागपुरातील सतरंजीपुरात शनिवारी आणखी चौघांना लागण झाली. यातील तिघे हे करोनामुळं दगावलेल्या रुग्णांचे नातेवाईक आहेत. हे तिघे आजारी रुग्णांना भेटण्यासाठी त्यांच्या घरी गेले होते. या खेरीज मोमिनपुरा येथील नव्या व्यक्तीला करोनाची लागण झाली आहे. कोणाच्या संपर्कात आल्याने त्याला लागण झाली, याचा शोध घेतला जात आहे. नव्या रुग्णांमध्ये नागपुरातील बाधितांचा आकडा आता ६३ वर पोचला आहे.

करोनाचा शनिवारी नव्याने प्रादुर्भाव झालेल्या सतरंजीपुरा येथील रहिवाशांमध्ये २३ आणि २९ वर्षीय महिला, ३० वर्षीय पुरुष आणि मोमिनपुरा येथील ४२ वर्षीय व्यक्तीचा समावेश आहे. यापैकी सतरंजीपुरा येथील तिघेही करोना बाधिताच्या निकट सहवासात आलेल्यांपैकी आहेत. दगावलेल्या बाधित रुग्णाचे नातेवाईक असलेल्या या चौघांनाही करोनाच्या संशयावरून आमदार निवासातील सक्तीच्या एकांतवासात ठेवण्यात आले होते.

इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या (मेयो) विषाणू प्रयोगशाळेत शनिवारी त्यांच्या घशातील द्रवाचे नमुने तपासले गेले. त्यात करोना विषाणूचा अंश आढळून आला. त्यामुळे करोनाची लागण झाल्यानंतर दगावलेल्या सतरंजीपुरातील एकट्या रुग्णाच्या सहवासात आल्याने प्रादुर्भाव झालेल्यांची संख्या आता ३४ वर पोहोचली आहे. एका रुग्णांमुळे इतक्या लोकांना संसर्ग झाल्यामुळं मध्य भारतातील ही सर्वांत मोठी संसर्ग साखळी ठरली आहे.

Also Read- कोविड-१९ चा प्रभाव कमी करण्यासाठी बाजारात १ लाख कोटींची तरलता

कोविड-१९ चा प्रभाव कमी करण्यासाठी बाजारात १ लाख कोटींची तरलता

RBI

नागपूर : भारतीय अर्थव्यवस्थेत कोविड-१९ लॉकडाऊनमुळे होणारे नुकसान कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी शुक्रवारी २० दिवसांत दुसऱ्या प्रोत्साहन पॅकेजमध्ये आणखी एक लाख रुपयांची तरलता आर्थिक बाजारात जाहीर केली. हे पॅकेज २७ मार्च रोजी दास यांनी त्यांच्या पहिल्या प्रोत्साहन पॅकेजमध्ये जाहीर केलेल्या ३ लाख ७४ हजार कोटींच्या व्यतिरिक्त आहे.

नॅशनल बँक ऑफ रूरल डेव्हलपमेंट (नाबार्ड), स्मॉल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट बँक ऑफ इंडिया (सिडबी) आणि नॅशनल हाऊसिंग बँक (एनएचबी) यांना आरबीआयने केवळ तीन संस्थांसाठी ५० हजार कोटी रुपयांचे विशेष पुनर्वित्त पॅकेज जाहीर केले आहे. ५० हजार कोटींपैकी ग्रामीण क्षेत्र आणि शेतकऱ्यांची देखभाल करणाऱ्या नाबार्डला २५ हजार कोटी, लघु व मध्यम उद्योगांच्या गरजा पूर्ण करणाऱ्या सिडबीला १५ हजार कोटी आणि गृहनिर्माण क्षेत्राकडे लक्ष देणाऱ्या एनएचबीला १० हजार कोटी रुपये दिले आहेत. या पॅकेजचा निव्वळ परिणाम शेतकरी, लघु उद्योजक आणि सर्वसामान्यांनाही होणार आहे.

पुनर्वित्त पॅकेज व्यतिरिक्त आरबीआयने लॉन्ग टर्म रेपो ऑपरेशन्सच्या (एलटीआरओ) माध्यमातूनही ५० हजार कोटी रुपयांची घोषणा केली आहे. म्हणजेच रेपो दर वार्षिक ४.४० टक्के केल्याने बँकांना जास्त रक्कम मिळणार आहे. त्यातील किमान ५० टक्के कॉर्पोरेट डेटमध्ये अर्थात एनसीडी, सीपी इत्यादींमध्ये गुंतवणूक करता येईल. या उपाययोजनांद्वारे कॉपोर्रेट कंपन्यांना ५० हजार कोटी रुपयांची तरलता मिळेल.

एका महत्त्वाच्या टप्प्यात रिझर्व्ह बँकेने सर्व शेड्यूल आणि सहकारी बँकांवर ३० सप्टेंबर २०२० पर्यंत कोणतेही लाभाश वितरित करण्यास बंदी घातली आहे. रिझर्व्ह बँकेच्या या घोषणेमुळे बँकांकडे लाभाशाचे पैसे कायम राहतील आणि बँकांना आर्थिक बळकटी मिळेल.

उद्योग क्षेत्राला मोठा दिलासा देताना रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे की, २७ मार्च रोजी जाहीर केलेली तीन महिन्यांची मुदत १ मार्च ते ३१ मे २०२० या कालावधीत एनपीए (नॉन-परफॉर्मिंग अ‍ॅसेट्स) होणाऱ्या कर्जावर लागू होणार नाही. दुसऱ्या शब्दांत सांगायचे तर १ मार्च २०२० रोजी कंपन्यांनी न चुकविलेले कर्ज ३१ मे २०२० पर्यंत एनपीए घोषित केले जाणार नाही. एनपीएचा डिफॉल्ट कालावधी ९० दिवसांवरून १८० दिवसांपर्यंत वाढविण्याची उद्योगांची मागणी रिझर्व्ह बँकेने वेगळ्याप्रकारे पूर्ण केली आहे.

रिझर्व्ह बँकेच्या घोषणेची आणखी एक वैशिष्ट्यपूर्ण बाब म्हणजे रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो दर यातील अंतर नेहमीच्या २५ बेसिक ऐवजी ६५ बेसिस वाढविण्यात आले आहे. हा स्पष्ट संकेत आहे की, कोविड-१९ असामान्य साथीचा आजार असून त्यावर असामान्य उपायांची आवश्यकता होती, त्याचप्रमाणे राष्ट्रीय अर्थव्यवस्थेवरील त्याचा प्रभाव कमी करण्यासाठी रिझर्व्ह बँकेने पूर्णपणे धाडसी व असामान्य उपाययोजना केल्या आहेत. गव्हर्नर शक्तिकांत दास यांच्या दुसऱ्या प्रोत्साहन पॅकेजमध्ये रिझर्व्ह बँकेच्या या संकल्पांचे प्रदर्शन स्पष्टपणे दर्शविते.

Also Read- कोरोना : स्वॅब तपासणी मशीन आता अमरावतीतही

कोरोना : स्वॅब तपासणी मशीन आता अमरावतीतही

Inspection-Machine

नागपूर: कोरोना संसर्ग प्रतिबंधासाठी तात्काळ उपाययोजनेच्या अनुषंगाने चाचण्यांसाठी अमरावतीत दोन लॅब सुरू होत आहेत. त्यामुळे थ्रोट स्वॅब नमुने अहवाल आता अमरावतीतच मिळू शकतील. शासनाकडून दोन मशीन संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या प्रयोगशाळेत दाखल झाल्या आहेत. त्यामुळे लगेच तपासणी अहवाल प्राप्त होऊन उपचाराला गती मिळणार आहे. आतापर्यंत थ्रोट स्वॅब नमुने नागपुरच्या प्रयोगशाळेत पाठविले जात होते. त्यामुळे अमरावतीत लॅब सुरू होण्याच्या दृष्टीने जिल्हा प्रशासनाने पाठपुरावा चालविला होता. त्यानुसार अमरावतीला या दोन मशीन मिळाल्या असून, शुक्रवारी प्रायोगिक तत्वावर त्याची चाचपणीही करण्यात आली.

आयसीएमआरच्या ॲप्रुव्हलची प्रतीक्षा

अमरावती शहर हे प्रशासकीय स्तरावर विभागाचे मुख्यालय असल्याने येथे कोरोना थ्रोट स्वॅब तपासणी यंत्र उपलब्ध व्हावे, अशी मागणी वैद्यकीय क्षेत्रातून जोर धरू लागली होती. विद्यापीठाच्या सीआयसी युनिटमध्ये या दोन मशीन प्राप्त झाल्या आहेत. आता केवळ आयसीएमआर (इंडियन काऊंन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च) यांच्याकडून मान्यतेची प्रतीक्षा आहे. विद्यापीठाच्यावतीने त्यासाठी प्रपोजलही पाठविण्यात आले असून, दोन दिवसातच मान्यता मिळण्याची शक्यता आहे. त्यानंतर कोरोना संशयिताच्या थ्रोट स्वॅब नमूने अहवाल लगेच अमरावती उपलब्ध होणार आहे.

मोफत तपासणी

या मशीनसह किट शासनाच्यावतीने संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाला उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. अमरावतीत ही व्यवस्था नसल्याने थ्रोट स्वॅब नमुने नागपुरला पाठविले जात होते. त्याचा अहवाल मिळायला विलंब होत होता. त्यामुळे निदान लागायला उशीर होऊन नेमका उपचार करण्यासही अडचणी येत होत्या. परंतु आता अमरावतीतच या मशीन आल्याने लगेच तपासणी अहवाल प्राप्त होऊन उपचार करणे सोयीचे होणार आहे. विद्यापीठाच्या सीआयसी युनिटचे विशेषज्ज्ञ डॉ. प्रशांत ठाकरे व डॉ. निरज हनुमंते यांनी शुक्रवारी मशीनची टेस्टिंग घेतली.

या मशीन कायमस्वरूपी

अमरावती येथे थ्रोट स्वॅबचा चाचणी अहवाल मिळण्याची सुविधा नव्हती. त्यातही अनेक अहवाल प्रलंबित राहिल्याने संभ्रम निर्माण होत होता. त्यामुळे ही लॅब सुरू करण्यासाठी आम्ही सगळ्यांनी मिळून संयुक्त पाठपुरावा केला. डीपीडीसीतर्फे निधी उपलब्ध करण्यात आला. लवकरच लॅब सुरू होतील. ही सुविधा कायमसाठी उपलब्ध राहील. डॉ. पंजाबराव देशमुख मेडिकल कॉलेज येथेही लॅब लवकरच कार्यान्वित होत आहे, असे पालकमंत्री ॲड. यशोमती ठाकूर यांनी सांगितले.

दोन दिवसात तपासणी सुरू होण्याची शक्यता

थ्रोट स्वॅबचे नमुने तपासणीकरिता शासनाकडून मशीन व किट्स उपलब्ध करण्यात आल्या आहेत. याशिवाय आम्ही कोणत्याच प्रकारचा फंड घेतला नाही. आयसीएमआरकडून मान्यता मिळताच टेस्टींग सुरू करण्यात येईल. येत्या दोन दिवसात मान्यता मिळण्याची शक्यता आहे. या मशीनची टेस्टींग आमच्या विशेषज्ञांकडून करण्यात आली आहे, असे अमरावती विद्यापीठाचे कुलगूरू मुरलीधर चांदेकर यांनी सांगितले

खूप मोठी सुविधा झाली

संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाच्या सीआयसीमध्ये यंत्रणा पोहोचली आहे. आयसीएमआरच्या मान्यतेनंतर लगेच थ्रोट स्वॅब नमून्यांची तपासणी सुरू केली जाईल. ही एक खूप मोठी सुविधा जिल्ह्यात सुरू होत आहे. विद्यापीठाने याकरिता आयसीएमआरला प्रस्ताव पाठविला आहे. आम्हीसुध्दा त्याचा पाठपुरावा करत आहोत. ॲप्रुव्हल मिळताच तपासणीला सुरूवात होईल, असे जिल्हाधिकारी शैलेश नवाल यांनी सांगितले.

Also Read- कोरोनाला घाबरू नका, मनपा करणार आता समुपदेशन

कोरोनाला घाबरू नका, मनपा करणार आता समुपदेशन

ias-tukram-mundhe-nagpur

नागपूर: कोव्हिड-१९ च्या रुपाने आलेल्या संकटाने संपूर्ण देश हादरला आहे. यामुळे नेमके काय होईल, किती दिवस लॉकडाऊनमध्ये जाणार आहेत, नोकरी तर जाणार नाही ना, आर्थिक आधार तर खचणार नाही, अशा अनेक शंका आणि त्यामुळे भीती निर्माण होते. त्यामुळे ही भीती घालविण्यासाठी आणि मानसिक आरोग्य सुदृढ ठेवण्यासाठी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या पुढाकारातून आता नागपूर महानगरपालिकेचे तज्ज्ञांची चमू आणि प्रख्यात मानसोपचार तज्ज्ञ समुपदेशन करणार आहेत.

नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी एकीकडे कोरोना विषाणूशी लढण्यासाठी आरोग्य विभागासोबतच मनपाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांची फौज उभारली आहे. विषाणूशी लढा देतानाच दुसरीकडे सामाजिक दायित्वही गरजूंना, बेघरांना मदत पोहचवून निभावत आहे. लॉकडाऊनदरम्यान शहरातील कुठल्याही व्यक्तीला त्रास होऊ नये याची काळजी घेण्यासाठी त्यांनी किराणा, भाजीपाला व अन्य जीवनावश्यक वस्तू घरपोच मिळेल अशी व्यवस्था केली. तर गरजूंना किराणा किट, निराधार ज्येष्ठ व्यक्ती, दिव्यांग, नागपुरात अडकलेले विद्यार्थी, मजूर आदींना समाजसेवी संस्थांच्या सहकार्याने कम्युनिटी किचनच्या माध्यमातून दोन वेळेचे भोजन पुरविले जात आहे. नागरिकांच्या आरोग्यावर सर्व्हेक्षणाच्या माध्यमातून बारिक नजर ठेवली जात आहे. हे करीत असताना अनेकांच्या मनात कोरोना आणि लॉकडाऊनमुळे अनेक प्रश्न निर्माण झाल्याचे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या लक्षात आले. एकीकडे आरोग्याची भीती आणि दुसरीकडे आर्थिक कंबरडे मोडण्याची भीती अशा दुहेरी शंकांमुळे मानसिक आरोग्यावर परिणाम होत असल्याचे त्यांच्या लक्षात आले. हे ओळखून त्यांनी मनपाच्या दहाही झोनमध्ये समाजकल्याण विभागाच्या मार्फत सुरू असलेल्या समुपदेशन केंद्राचा यासाठी उपयोग करवून घेण्याचे ठरविले. त्यानुसार आता नागरिकांना अशी कुठली भीती मनात असेल तर त्यांनी मनपाच्या नियंत्रण कक्षात दूरध्वनी करून संपूर्ण माहिती द्यावी. तेथे उपस्थित डॉक्टरांची चमू नागरिकांचे समुपदेशन करेल. गरज पडल्यास झोनच्या चमूला संबंधित व्यक्तीच्या घरी पाठविण्यात येईल. याशिवाय अत्यंत आवश्यकता भासल्यास शहरातील प्रख्यात मानसोपचार तज्ज्ञसुद्धा समुपदेशन करतील. नागरिकांनी या समुपदेशन सेवेचा लाभ घ्यावा, असे आवाहन नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

समुपदेशनासाठी करा कॉल

कोव्हिड संदर्भातील भीती आणि अन्य शंका असतील तर समुपदेशनासाठी नागपूर महानगरपालिका नियंत्रण कक्षात दूरध्वनी करावा. ०७१२-२५६७०२१, ०७१२-२५६२४७४। ०७१२-२५६१८६६ या क्रमांकावर दूरध्वनी करून समुपदेशन सेवेचा लाभ घेता येईल.

Also Read- प्रभाग १० आणि प्रभाग १२चा परिसर सील मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांचे आदेश : गौतम नगर परिसरात कोरोनाबाधित आढळल्याने निर्णय

Nagpur Weather

Nagpur
haze
38 ° C
38 °
38 °
12 %
3.6kmh
0 %
Sat
38 °
Sun
41 °
Mon
41 °
Tue
42 °
Wed
44 °

Stay connected

5,248FansLike
422FollowersFollow
500FollowersFollow
394FollowersFollow
2,380SubscribersSubscribe

Most Popular

Top 100 new year Wishes

Top 100 New Year Wishes 2023

0
Top 100 New Year Wishes 2023: If you are searching for some good wishes for the new year 2023 then you are on the...

Dhamma Chakra Pravartan Din : 15 Famous quotes by Dr. Babasaheb Ambedkar

0
Dhamma chakra Pravartan Din also known by the name of DhammaChakra Anupratan Din is a day to praise the Buddhist change of B. R....
Happy Diwali 2021

15+ Unique Happy Diwali wishes for 2022

0
Nowadays the only way through which connection is possible is the social networking site. The biggest festival in India is coming soon. Diwali is...
makar Sankranti

Top 100 best quotes, WhatsApp messages, wishes and greetings for Makar Sankranti 2024

0
Makar Sankranti Wishes : Makara Sankranti (Sankranthi) is a Hindu festival that encourages people to live in peace and harmony. Here are best quotes,...