नागपूर : आणखी ७ जणांना कोरोनाची लागण, रूग्णांची संख्या ८८ वर

corona-positive

नागपूर : नागपुरात कोरोनाबाधीत रूग्णांच्या संख्येत मंगळवारी सुध्दा लक्षणीय वाढ नोंदविण्यात आली आहे. नागपुरातील कोरोनाबाधितांची रूग्ण संख्या दरदिवशी वाढतच आहे. मंगळवारी सकाळीच (दि २१ ) नागपुरात कोरोनाचे आणखी ७ नवे रूग्ण आढळले. रविवारी एकाच दिवशी नागपुरात ९ रूग्ण आढळले. त्यानंतर सोमवारी आ ७ रूग्ण आणि सलग तिसर्‍या दिवशी मंगळवारी ७ रूग्णांची भर पडून कोरोनाग्रस्त रूग्णांची संख्या आता ८१ वरून ८८ वर पोहोचली. या नव्या ७ कोरोना रुग्णांमुळे नागपुरातील कोरोनाबधितांची एकूण संख्या पुन्हा वाढली आहे.

नागपूरातील कोरोनाबाधित रूग्णाच्या संख्येत रविवारी सर्वात मोठ्या रूग्ण संख्येची वाढ नोंदविण्यात आली होती. रविवारी एकाच दिवशी नागपुरातील ९ संशयीत रूग्णाचे थ्रोट स्वॅब अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. त्यामुळे उपराजधानीतील जिल्हा प्रशासन आता पुरते हादरले आहे. नागपुरातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या आता ८८ एवढी झाली आहे. आज नव्याने सापडलेले कोरोनाबाधित रूग्ण हे नागपुरातील आमदार निवास आणि वनामती येथील विलगीकरण कक्षात कॉरंटाईन करण्यात आले होते. विशेष म्हणजे सतरंजीपुरा येथील मृत्यूमुखी पडलेल्या कोरोनाबाधित रूग्णाच्या संपर्कात आलेल्या नागरीकांचे अहवाल पॉझिटिव्ह येण्याचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे प्रशासनाची चिंताही वाढली आहे. रविवारी सोमवार आणि मंगळवार सलग तीन दिवसात २५ रूग्ण सापडल्याने उपराजधानी असलेल्या नागपुरात कोरोनाच धोका आणखी बळावला आहे.

Also Read- नागपुरातील मनपाच्या बेघर निवाऱ्यात मध्य प्रदेशातील सर्वाधिक लोक