Home Blog Page 130

राज्यात २३ हजार पोलिसांना‘ कमी जोखमी’च्या नेमणुका; पोलिस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांची माहिती

Subodhkumar Jashwal
सुबोधकुमार जयस्वाल

नागपूर : कोरोनाशी लढा सुरू असताना राज्याच्या पोलिसांवर कामाचा ताण दिसू लागला आहे. त्यामुळेच आम्ही ५५ वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या जवळपास १२ हजार कर्मचाऱ्यांना सुटीवर जाण्याची संधी दिली. आता ५० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या २३ हजार कर्मचाऱ्यांना कमी जोखमीच्या जबाबदाऱ्या देण्यात येत आहेत. ते कमीत कमी लोकांच्या संपर्कात यावेत म्हणून त्यांना पोलिस ठाण्यात कार्यालयीन काम दिले जात असल्याची माहिती राज्याचे पोलिस महासंचालक सुबोधकुमार जयस्वाल यांनी माहिती दिली.

जयस्वाल म्हणाले, सध्या पोलिस ठाण्यांमध्ये कर्मचाऱ्यांचा लोकांशी फार संंपर्क येत नाही. त्यामुळे पन्नाशीपुढील कर्मचाऱ्यांकडे प्राधान्याने पोलिस ठाण्याची ड्यूटी सोपवली जात आहे. पोलिसांसाठी कोविड हेल्पलाइनही सुरू करण्यात आली आहे. प्रत्येक युनिटचा कमांडर दैनंदिन त्याचे मॉनिटरिंग करतो. आजारी पोलिस कर्मचाऱ्यांना दर्जेदार सुविधा देण्यासाठी गरजेनुसार त्यांना एका शहरातून दुसरीकडे शिफ्ट करण्याची व्यवस्था राबवली जात असल्याचे जयस्वाल म्हणाले.

साइड ब्रँचही तैनात

बंदोबस्तातील कर्मचाऱ्यांची कमतरता भरून काढण्यासाठी लोहमार्ग पोलिस दल, पोलिस प्रशिक्षण संस्था तसेच इतर साइड ब्रँचमधील एक हजारवर कर्मचाऱ्यांना तेथून बाहेर काढून जबाबदाऱ्या दिल्या आहेत.

३५ वर्षांच्या करिअरमधील हे सर्वात मोठे आव्हान…

“माझ्या ३५ वर्षांच्या करिअरमधील हे सर्वात मोठे आव्हान आहे. अशा संकटाच्या काळात सव्वादोन लाख कर्मचाऱ्यांच्या दलाचे नेतृत्व करणे माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. पोलिस कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी जिवाचे रान करीत असताना जनतेकडून खूप मोठे सहकार्य मिळत आहे” – सुबोधकुमार जयस्वाल, पोलिस महासंचालक, महाराष्ट्र

राज्यातील 1007 पोलिसांना कोरोना संसर्ग झाला असून 4,899 पोलिस विलगीकरणात आहेत. तर 124 कर्मचारी कोरोनामुक्त झाले. 8 पोलिसांनी कोरोनामुळे प्राण गमावले.

Also Read- नागपुरात लॉकडाऊनमध्ये १४ मे पासून काही अंशी शिथिलता

PM मोदींची सर्वात मोठी घोषणा; 20 लाख कोटींच्या आर्थिक पॅकेजमुळे कोणाला होईल फायदा?

जर तुम्हालाही नरेंद्र मोदींशी संपर्क साधायचा असेल तर जाणून घ्या ही माहिती
Narendra Modi

नवी दिल्ली, 12 मे : येत्या 17 मे रोजी देशातील तिसऱ्या टप्प्यातील लॉकडाऊन संपणार आहे. अद्यापही देशभरात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी लॉकडाऊनबाबत काय सांगणार याकडे जनतेचे लक्ष लागून राहिले असताना पंतप्रधानांनी ही मोठी घोषणा केली आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तब्बल 20 लाख कोटी रुपयांच्या आर्थिक पॅकेजची घोषणा केली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील ठळक मुद्दे –

1 जगभरात आतापर्यंत 42 लाखांहून अधिक लोकांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. पावणेतीन लाख लोकांचा मृत्यू झाला आहे. भारतातही अनेकांनी सुहृह गमावले आहेत. मी त्यांच्याप्रति संवेदना व्यक्त करतो. एका विषाणूमुळे जगातल्या कोट्यवधी लोकांचे जीव धोक्यात आहेत. सारं जग जीव वाचवायच्या लढाईत गुंतलं आहे. आपण कुणीच हे असं संकट यापूर्वी पाहिलेलं नाही. ऐकलेलंही नाही. मानवजातीसाठी हे सगळं अकल्पित आहे. हे संकट अभूतपूर्व आहे. पण हरणं, थकणं, हार मानणं मानवाला मंजूर नाही.

2. देशातील उद्योगधंदे रुळावर आणण्यासाठी मागणी वाढवणे आवश्यक आहे. यासाठी प्रत्येक स्टेक होर्डर्सनी सतर्क राहायला हवे. कोरोना संकटाचा सामना करीत असताना नव्या संकल्पासह मी आज एक विषेश आर्थिक पॅकेजची घोषणा करीत आहे. हा आर्थिक पॅकेज आत्मनिर्भर भारत अभियानाचे मुख्य काम करणार आहे. या आर्थिक पॅकेजची किंमत 20 लाख कोटी रुपये इतकी असून ही रक्कम भारताच्या जीडीपीच्या 10 टक्के आहे.

3 20 लाख कोटी रुपयांचं हे पॅकेज 2020 मध्ये देशाच्या विकास यात्रेला व स्वावलंबी भारताच्या संकल्पनेले नवीन गती मिळवून देईल. या पॅकेजमध्ये जमीन, कामगार, लिक्वडिटी (तरलता) आणि कायदा या सर्वांवर लक्ष दिले आहे. हे पॅकेज कृषी, एमएसएमई, लघु उद्योग यांच्यासाठी करण्यात आले आहे. हे आर्थिक पॅकेज देशातील शेतकरी व श्रमिकांसाठी आहे. हे पॅकेज मध्यमवर्गींसाठी आहे, जो प्रामाणिकपणे टॅक्स देतो.

4 आर्थिक पॅकेजमुळे सर्व क्षेत्रात गुणवत्ता वाढवेल. शेती व उद्योगांना या पॅकेजचा मोठा फायदा होईल.

5 स्वावलंबी भारत उभारण्याची गरज आहे. कोरोना संकटाच्या आधी एकही PPE किट बनत नव्हती. N-95 मास्कचं उत्पादन अगदी कमी होतं. आता स्थिती आहे, की भारतात दररोज 2 लाख PPE किट आणि मास्कचं उत्पादन होत आहे. संकटाचं रुपांतर संधीत करण्याची भारताची ही दृष्टी आपल्यासाठी प्रभावी ठरणार आहे.

6 आज जगभरात स्वयंपूर्ण शब्दाचा अर्थ पूर्णपणे बदलला आहे. जागतिकीकरणात या शब्दाचा अर्थ – अर्थकेंद्रित वैश्विकरणापेक्षा मानवकेंद्रित जागतिकीकरण अभिप्रेत आहे. भारताची संस्कृती, भारताचे संस्कार त्या स्वयंपूर्णतेची व्याख्या करतात, तेव्हा मानवकल्याण हे ध्येय असते. त्यात आत्मकेंद्रीत दृष्टिकोन नसतो. जगाची शांती, मैत्री आणि सहयोग यात समाविष्ट आहे. सारं विश्व आपलं कुटुंब आहे, ही आपली संस्कृती आहे.

7 21 वे शतक भारताचं व्हावं हे आपलं स्वप्नचं नाही तर आपली जबाबदारी आहे. मात्र याचा मार्ग काय असेल. जगाच्या सध्याच्या स्थितीनुसार याचा मार्ग एकच आहे..आत्मनिर्भर भारत…शास्त्रातही आपल्याला हेच सांगितलं आहे.

8 विश्व एक परिवार आहे. भारत जेव्हा आत्मनिर्भरताविषयी म्हणतो तेव्हा आत्मकेंद्री भारत अपेक्षित नाही. आपली संस्कृती संपूर्ण विश्वाला आपला परिवार मानते. ती पृथ्वीला आई मानते. भारत भूमी जेव्हा आत्मनिर्भर होते, तेव्हा सुखी व समृद्ध विश्व तयार होते.

9 भारताच्या प्रगतीमध्ये नेहमी वैश्विक प्रगती समाविष्ट आहे. भारताच्या कृतीचा प्रभाव वैश्विक कल्याणाकडेच असतो. ग्लोबल वॉर्मिंग, तणावमुक्ती यासाठी भारताने जगाला भेट दिली आहे. जगण्या-मरण्याच्या या जागतिक लढाईत आता भारताची औषधं कामास येत आहे. भारताची जगभर प्रशंसा होते, तेव्हा ती अभिमानाची गोष्ट असते.

10 लॉकडाऊन 4 नवीन नियमांचां असेल, राज्यांकडून मिळणाऱ्या सल्ल्यानुसार नियम ठरवले जातील. 18 मेपूर्वी याबाबत माहिती देण्यात येईल, असेही पंतप्रधान मोदी यावेळी म्हणाले.

नागपुरात लॉकडाऊनमध्ये १४ मे पासून काही अंशी शिथिलता

उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष व आरोग्य समिती अध्यक्ष यांनी केला कोविड केअर सेंटरचा पाहणी दौरा

covid care centre

नागपूर, ता. १३ : कळमेश्वर रोड पर येरला येथे तयार करण्यात आलेले “कोविड केअर सेंटर” ची पाहणी बुधवारी उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समिती अध्यक्ष श्री. विजय (पिंटु) झलके आणि आरोग्य समिती सभापती श्री.विरेन्द्र कुकरेजा यांनी केली. येथे नागपूर महापालिकेतर्फे ५००० खाटांचा कोविड केअर सेंटर तयार करण्यात आला आहे. सदर केन्द्रात सध्या ५०० खाटा ठेवण्यात आले असून आवश्यकते अनुसार त्याचात वाढ केली जाईल.

उपमहापौर श्रीमती कोठे यांनी व्यवस्थेवर समाधान व्यक्त करतांना सल्ला दिला की मानसूनचा काळात कोविड केअर सेंटर मध्ये राहणा-या नागरिकांची चांगली काळजी करावी. त्यांचासाठी शौचालयापर्यंत जायला व्यवस्था करुन दयावी. स्थायी समिती अध्यक्ष श्री. विजय (पिंटु) झलके यांनी तिथे राहणारे संशयित रुग्णांसाठी सुरक्षाची काळजी घेण्याचे व केन्द्र- राज्य शासनाव्दारे निर्गमीत मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्याचे निर्दश दिले. आरोग्य समिती सभापती श्री. विरेन्द्र कुकरेजा यांनी उपचारासाठी नियुक्त करण्यात येणारे वैद्यकीय चमूसाठी वेगळी व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. त्यांनी या कर्मचा-यांच्या वेळोवेळी तपासणी करण्याचा सल्ला दिला.

यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. योगेन्द्र सवई, इन्सीडेन्ट कमांडर व अधिक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता मनोज गणवीर व राजेश दुफारे आदी उपस्थित होते.

Also Read- नागपुरात लॉकडाऊनमध्ये १४ मे पासून काही अंशी शिथिलता

नागपुरात लॉकडाऊनमध्ये १४ मे पासून काही अंशी शिथिलता

“No leave for health officials” Tukaram Mundhe
“No leave for health officials” Tukaram Mundhe

नागपूर, ता. १३ : राज्य शासनाने दिलेल्या आदेशाच्या अधीन राहून नागपुरात १४ मे पासून ऑनलाईन मद्यविक्रीला नागपुरातही परवानगी देण्यात आली आहे. परंतु यासाठी ग्राहकाजवळ मद्यपरवाना असणे आवश्यक आहे. याव्यतिरिक्त लॉकडाऊनमध्ये काही अंशी शिथिलता देण्यासंदर्भातील नवे आदेश नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी आज (ता. १३) जारी केले. त्यानुसार काही दुकाने आळीपाळीने निरनिराळ्या दिवशी सुरू राहतील.

नागपुरात ऑनलाईन मद्यविक्री राज्य शासनाने ११ मे रोजी काढलेल्या आदेशानुसार सुरु होईल. प्रतिबंधित क्षेत्रातून किंवा क्षेत्रात मद्यविक्रीला किंवा मद्य ऑनलाईन पद्धतीने मागविण्यास परवानगी राहणार नाही. मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी जारी केलेल्या नव्या आदेशानुसार नागरी क्षेत्रातील बांधकाम जेथे कामगार निवासी राहतील, तेथे बांधकाम सुरू करता येईल. आयटी कार्यासाठी आवश्यक हार्डवेअर आणि पॅकेजिंग साहित्याचे उत्पादन, इलेक्ट्रिक सामुग्रीची दुकाने, हार्डवेअर आणि बिल्डिंग मटेरिअल (केवळ सोमवार, बुधवार, शुक्रवार), ऑटो स्पेअर्स आणि रिपेअर शॉप, टायर शॉप, ऑईल आणि लुब्रिकेन्ट्स शॉप (मंगळवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार), ऑप्टिकल, स्टेशनरी आणि होजियारी शॉप (मंगळवार, गुरुवार, शनिवार, रविवार) अशाप्रकारे सुरू राहतील. ई-कॉमर्स (जीवनावश्यक वस्तू, औषधी आणि उपकरण), खासगी कार्यालये १५ टक्के उपस्थितीत, सर्व शासकीय कार्यालय ३३ टक्के उपस्थितीत सुरू करता येतील. याव्यतिरिक्त, मान्सूनपूर्व सर्व कामे सुरू करता येतील. प्रतिबंधित क्षेत्रात हा आदेश लागू राहणार नाही. केवळ तेथे जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सकाळी ७ ते दुपारी ३ या वेळेत सुरू असतील. प्रतिबंधित क्षेत्राव्यतिरिक्त अन्य ठिकाणी जीवनावश्यक वस्तूंव्यतिरिक्त ज्या बाबींना परवानगी देण्यात आली आहे ती प्रतिष्ठाने सकाळी ७ ते रात्री ७ या वेळेत सुरु राहतील. जिल्हाअंतर्गत आणि जिल्ह्याबाहेरील प्रवासी वाहतूक, नागरी क्षेत्रातील उद्योग, कॅब आणि टॅक्सी सेवा, थिएटर, मॉल, जलतरण हौद, जिम आदींना मात्र परवानगी राहणार नाही.

मनपा आयुक्तांनी आदेशात नमूद केल्याप्रमाणे ज्या-ज्या बाबी सुरू करण्यास मुभा दिली आहे, त्यासाठी स्वतंत्र परवानगीची गरज राहणार नाही. हा आदेश म्हणजेच परवानगी समजण्यात यावे, असेही आदेशात नमूद केले आहे. हे सुरू करताना लॉकडाऊनचे सर्व नियम पाळावे लागतील. सोशल डिस्टंसिंग, मास्कचा वापर या गोष्टी बंधनकारक राहतील.

लॉकडाऊनकाळात नागपूरकरांनी दिलेल्या सहकार्यामुळे प्रशासनाला परिस्थितीवर नियंत्रण मिळविता आले. त्यामुळे लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल करण्याचा निर्णय घेण्यात आला. यापुढेही नागरिकांनी असेच सहकार्य केल्यास लवकरच सर्व सेवा सुरू करता येतील, असे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी म्हटले आहे.

हे राहणार सुरू

– केवळ परवानगी असणाऱ्या कामासाठी वैयक्तिक गाड्यांचा‌ वापर

– एका कारमध्ये दोन व्यक्ती प्रवास करू शकतील.

– दोन चाकी गाडीवर सहप्रवासी बसण्यास परवानगी नाही.

– आवश्यक सामुग्रीचे उत्पादन जसे औषधी, मेडिकल उपकरणं, त्यासाठी लागणारे साहित्य

– नियमित सुरू ठेवण्याची आवश्यकता असणारे प्रोडक्शन युनिट आणि वितरण व्यवस्था

– आयटी कार्यासाठी आवश्यक हार्डवेअर आणि पॅकेजिंग साहित्याचे उत्पादन

– नागरी क्षेत्रात जेथे बांधकाम स्थळांवरच कामगार उपलब्ध असतील तेथील बांधकाम (प्रतिबंधित परिसर सोडून इतर परिसरातील नवनिर्मिती बांधकामांसाठी वेळोवेळी परवानगी दिली जाईल.)

– कोव्हिड-१९ च्या नियमानुसार जीवनावश्यक सामुग्रीची दुकाने आणि बाजारसंकुल

– प्रतिबंधित परिसरात फक्त जीवनावश्यक सामुग्रीची दुकाने सकाळी ७ ते दुपारी ३ वाजता दरम्यान सुरू राहतील.

– इलेक्ट्रिकल सामुग्रीची दुकाने, कुलर, हार्डवेअर आणि बिल्डिंग मटेरिअल (केवळ सोमवार, बुधवार, शुक्रवार)

– ऑटो स्पेअर्स आणि रिपेअर शॉप, टायर शॉप, ऑईल आणि लुब्रिकेन्ट्स शॉप (मंगळवार, गुरुवार, शनिवार आणि रविवार)

– ऑप्टिकल, स्टेशनरी आणि होजियारी शॉप (मंगळवार, गुरुवार, शनिवार, रविवार)

– ऑनलाईन मद्यविक्री

– ई-कॉमर्स (जीवनावश्यक वस्तू, औषधी आणि उपकरण)

– खासगी कार्यालये १५ टक्के उपस्थितीत

– सर्व शासकीय कार्यालय ३३ टक्के उपस्थितीत)

– मान्सूनपूर्व सर्व कामे

– २० लोकांच्या उपस्थितीत लग्न समारंभ करता येईल.

हे राहणार बंद

– सर्व देशांतर्गत आणि आंतरदेशीय विमानसेवा (मेडिकल सर्व्हिसेस आणि एअर अँबुलन्स वगळून)

– प्रवासी रेल्वे गाड्या (गृह मंत्रालय आणि राज्य शासनाने परवानगी दिलेल्या गाड्या वगळून)

– आंतरराज्यीय प्रवासी बस वाहतूक (शासनाची परवानगी असलेल्या वगळून)

– मेट्रो रेल्वे सेवा

– सर्व शाळा, महाविद्यालाये, शिकवणी वर्ग (ऑनलाईन वर्गाना परवानगी राहील)

– सिनेमा हॉल, शॉपिंग मॉल, जिम्नॅशियम, स्पोर्ट कॉम्प्लेक्स, जलतरण हौद आदी

– सर्व सामाजिक, राजकीय, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक तसेच गर्दी होणारे सर्व कार्यक्रम

– सर्व धार्मिक स्थळे

– सायकल रिक्षा आणि ऑटो रिक्षा

– टॅक्सी आणि कॅब सेवा

– जिल्ह्यातील आणि जिल्ह्याबाहेरील बससेवा

– सलून आणि स्पा

– सेझ, औद्योगिक वसाहती, निर्यात करणारे उद्योग.

Also Read- अमरावती जिल्ह्यात २४ रुग्ण कोरोनामुक्त

Virat Kohli An “Imposing Character”, Won’t Want Split Captaincy: Nasser Hussain

Virat Kohli , विराट कोहली
विराट कोहली

New Delhi : An “imposing character” like Virat Kohli will not be comfortable sharing power and hence split captaincy is not something that will work in Indian cricket, feels former England skipper Nasser Hussain. However, he does feel that the Indian team management often messes up selections as they did in that World Cup semi-final against New Zealand and split coaching might be a good idea. Hussain’s view on selection was echoed by India’s twin World Cup hero Yuvraj Singh, who wants to know how the current Indian coaching staff headed by Ravi Shastri is dealing with players of different mindsets.

Asked if split captaincy can work in India, like it did in England, Hussain didn’t sound confident.

“It depends on the character, Virat (Kohli) is such an imposing character, all encompassing, it would be difficult for him to hand over, he wouldn’t want to hand anything over. Whereas with England, we have (Eoin) Morgan and (Joe) Root, two likeable, laidback (characters),” Hussain said during a podcast on Cricbuzz.

However, split coaching is not a bad idea, said Hussain, a respected voice in world cricket.

“…Coaches have so much to do, whether you should have a split coach, they have so much on their plate. Just to give you a fresh perspective like Trevor Bayliss for example.”

“He cracked white ball for England, we didn’t really crack Test match cricket. So maybe two different coaches would be the right way to go,” he opined.

“One thing they don’t do well is selection like they couldn’t get a number 4 despite having so many great batsmen. Unlike New Zealand, who have only that many players to choose from, India have so much of talent, that after two failures, a new player comes in and then a next,” he said.

Yuvraj Singh one of India’s greatest white ball cricketers, is baffled as to how someone like Vikram Rathour can be an Indian batting coach for T20 cricket.

“You have guys like Vikram Rathour…he’s been my senior. He’s been a mentor when I was playing state, but with all due respect, if someone hasn’t played international cricket for a longer time than the younger generation that is prone to more T20 cricket and 50 over…”

“What are you going to tell them? Vikram Rathour might tell them about technique but there is no one to work on the mental side,” Yuvraj said on YouTube channel SportScreen.

In fact, Yuvraj believes the current coaching staff isn’t doing a great job.

“I am sure under Ravi Shastri the players have done really well, they’ve won in Australia and done quite well. But my point is, as a coach I don’t know how Ravi is, I’ve hardly played under him…”

“I know you cannot have a particular way with every player you have to have different ways with different players and I don’t see that with the current coaching staff,” Yuvraj said.

Also Read- नागपूर : १४ पॉझिटिव्ह रूग्ण वाढले

नागपूर : १४ पॉझिटिव्ह रूग्ण वाढले

Coronavirus: नियम आणि शिस्तीचे पालन करून हे ९० गावं झाले करोनामुक्त

नागपूर : नागपुरातील कोरोनाबाधित रूग्णांच्या संख्येत गेल्या २४ तासांत बुधवारी १४ ने वाढ झाली आहे. नागपुरातील करोनाबाधित रूग्णांची संख्या आता ३०० वरून ३१४ वर गेली आहे. नव्याने आढळलेल्या १४ रूग्णामध्ये ६ गर्भवती महिलांचा समावेश असल्याची माहिती सुत्रांनी दिली आहे.

नागपुरात सर्वाधीक रूग्ण सतरंजीपुरा आणि मोमिनपुरा या दोन परिसरातून आहे. नागपुरात ६ मार्चला कोरोनाचा पहिला रूग्ण सापडल्यानंतर २४ एप्रिलला ४८ दिवसांत कोरोनाबाधित रूग्णांची शंभरी झाली होती. त्यानंतर ६ मे रोजी १२ दिवसानंतर नागपुरात कोरोनाच्या रूग्णांचे दुसरे शतक नोंदविले. तर त्यानंतर आता काल मंगळवारी १२ मे रोजी अवघ्या ६ दिवसात नागपुरातील कोरोनाबाधित रूग्णांची संख्या पुन्हा एकदा शंभरच्या पार पोहोचली आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनासमोरील चिंता आणखी अधिक वाढल्या आहेत. नागपुरातील कोरोना बाधित रूग्णांची वाढती संख्या लक्षात घेता नागपूर नजीक राधाकृष्ण सस्तंग ब्यास यांच्या जागेत ५ हजार क्षमतेचे कोविड सेंटर उभारण्यात आले आहे.

Also Read- अमरावती जिल्ह्यात २४ रुग्ण कोरोनामुक्त

अमरावती जिल्ह्यात २४ रुग्ण कोरोनामुक्त

corona-free-patients

नागपूर : अमरावतीच्या जिल्हा कोविड रूग्णालयातून २४ रूग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. रुग्णालयात दाखल या सर्व रुग्णांचा कोरोना चाचणी अहवाल उपचारानंतर निगेटिव्ह आला. मोठ्या संख्येने रूग्ण उपचारानंतर घरी परतत असल्याने ही बाब दिलासा देणारी ठरली असून, वैद्यकीय यंत्रणेने या सर्वांचे अभिनंदन करत त्यांना निरोप दिला. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम, परिचारिका वर्षा पागोटे यांच्यासह अनेक डॉक्टर, पारिचारिका, आरोग्य कर्मचारी, सफाई कर्मचारी यावेळी उपस्थित होते. यावेळी ब-या झालेल्या सर्व नागरिकांना मिठाई देण्यात आली. यानंतर दक्षता म्हणून हे सर्वजण होम क्वारंटाईन राहणार आहेत.

जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. श्यामसुंदर निकम यांनी ब-या झालेल्या रूग्णांना शुभेच्छा दिल्या. डॉक्टर, पारिचारिका, आरोग्य कर्मचारी जीव धोक्यात घालून अहोरात्र रूग्णसेवा देत आहेत. अमरावती महापालिका हद्दीतील २४ रुग्ण बुधवारी (दि १३) बरे होऊन परतत आहेत, याचे समाधान आहे. जिल्ह्यासाठी ही बातमी दिलासा देणारी व मनोबल वाढविणारी आहे, अशी प्रतिक्रिया डॉ. निकम यांनी व्यक्त केली. यात ११ पुरुष व्यक्ती व १३ महिलांचा समावेश आहे. खोलापुरी गेट येथील पाच महिला व तीन पुरुष अशा आठ जणांचा समावेश आहे. हनुमाननगर येथील एका महिलेचा समावेश आहे. कंवरनगर येथील दोन महिला व एक पुरुष अशा तिघांचा समावेश आहे. नालसाबपुरा येथील दोन पुरुष व दोन महिलांचा समावेश आहे. काटा सुप्रियानगर येथील एका पुरुषाचा समावेश आहे. गौसनगर येथील एका पुरुषाचा समावेश आहे. ताजनगर येथील तीन महिला व तीन पुरुष अशा सहा जणांचा समावेश आहे. अशा २४ व्यक्तींना बुधवारी घरी सोडण्यात आले.

आज एकूण २५ रूग्ण उपचारानंतर बरे झाले. मात्र, त्यातील एक रुग्णास डायलिसिस घेणारा असल्यामुळे त्याला दक्षता म्हणून सध्या रुग्णालयातच ठेवण्यात आले. योग्य ती काळजी घेऊन त्यांनाही लवकरच घरी सोडण्यात येईल, असे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निकम यांनी सांगितले. कोरोना हा योग्य उपचारांनी बरा होतो. रुग्णालयात सर्व डॉक्टर, पारिचारिका, आरोग्य कर्मचा-यांनी चांगले सहकार्य केले. वेळोवेळी आमचे मनोबल वाढविले. कुणाही नागरिकांनी कोरोनाची कुठलीही लक्षणे दिसली की तत्काळ रूग्णालयात जाऊन उपचार घ्यावेत. कुठलीही माहिती लपवू नये. योग्य उपचारांनी हा आजार बरा होतो, अशी भावना या बऱ्या झालेल्या रूग्णांनी यावेळी व्यक्त केली. उपचारादरम्यान रुग्णांनी वॉर्डातील सर्व स्टाफशी चांगले सहकार्य केले. स्वत:चे मनोधैर्य कायम ठेवले. आज ते बरे होऊन आपल्या घरी परतत आहेत, याचा आम्हा सर्वांना आनंद आहे. या काळात नागरिकांनीही दक्षतेचे पालन करावे. कुठलीही लक्षणे दिसताच तत्काळ संपर्क साधावा, असे आवाहन कोविड रूग्णालयात सेवा देणाऱ्या परिचारिकांनी केले.

कुणालाही लक्षणे दिसताच त्यांनी तत्काळ दवाखान्यात जाऊन तपासणी करून घ्यावी. योग्य उपचारांनी हा आजार बरा होतो. त्यामुळे माहिती लपवू नये, असे आवाहन परिचारिका वर्षा पागोटे यांनी केले.

अमरावतीत ८४ पॉझिटिव्ह

जिल्ह्यात अद्यापपर्यंत ८४ रूग्ण आढळून आले आहेत. त्यापैकी १२ व्यक्ती मयत आहेत. एक रुग्ण जीएमसी, नागपूर येथे रेफर करण्यात आला आहे. आतापर्यंत ४५ रूग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. २६ रुग्ण कोविड रूग्णालयात उपचार घेत आहेत.

Also Read- पंतप्रधानांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ अपीलनंतर अमित शाह यांनी घेतला मोठा निर्णय

कोरोना संकट : १६ लाख सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात

corona-crises-salaries-cut

नवी दिल्ली : लॉकडाऊनचा परिणाम सरकारी कर्मचाऱ्यांवर होताना दिसतोय. महागाई भत्त्यात होणारी वाढ केंद्र सरकारने थांबवली होती. आता आणखी एक वाईट बातमी समोर येतेय. साधारण १६ लाख सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारातून ५ हजार रुपयांची कपात होणार आहे. उत्तर प्रदेश सरकारने आपल्या कर्मचाऱ्यांना मिळणारा ६ वा भत्ता थांबवला आहे.

उत्तर प्रदेश सरकारने मंगळवारी १६ लाख कर्मचाऱ्यांना मिळणारे ६ वा भत्ता थांबवला. सोमवारी कॅबिनेटच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. युपीचे अप मुख्य सचिव संजीव मित्तल यांनी यासंदर्भातील आदेश जारी केले. ही वेतन कपात झाल्याने सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारात ५ हजार कमी येणार आहेत.

कोरोनामुळे राज्य सरकारच्या उत्पन्नात घट झाली. तसेच कोरोनाचा प्रादुर्भाव थांबवण्यासाठी निधीची गरज लागणार आहे. हे पाहता सरकारी कर्मचाऱ्यांचे वेतन थांबवण्याचा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले.

सचिवालय भत्ता – १० हजारहून अधिक कर्मचा्यांना किमान ६२५ रुपये आणि जास्तीत जास्त 2000 रुपयांचा लाभ मिळतो.

शहर भरपाई भत्ता – १ लाख कर्मचाऱ्यांना किमान ३४० आणि जास्तीत जास्त ९०० रुपये मिळतो. राज्यातील प्रत्येक कनिष्ठ अभियंत्यास ४०० रुपये विशेष भत्ता मिळतो.

पीडब्ल्यूडी कर्मचार्‍यांना संशोधन, सुव्यवस्थित डिझाइन भत्ता म्हणून ४०० हून अधिक कर्मचारी-अधिकाऱ्यांना या भत्ता मिळतो.

आय अँड पी, सिंचन विभागात शिस्तबद्ध भत्ता म्हणून ५०० हून अधिक कर्मचार्‍यांना लाभ मिळतो.

भविष्य निर्वाह खाती सांभाळणार्‍या कर्मचार्‍यांना प्रोत्साहन भत्ता म्हणून ४०० हून अधिक कर्मचार्‍यांना लाभ मिळतो.

पंतप्रधानांच्या ‘आत्मनिर्भर भारत’ अपीलनंतर अमित शाह यांनी घेतला मोठा निर्णय

amit shah

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मंगळवारी जनतेशी संवाद साधत चौथ्या टप्प्यातील लॉकडाऊनबाबत माहिती दिली. तसेच यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वदेशा उत्पादनांवर जास्त भर देण्याचे आवाहन लोकांना केले होते. यासाठी मोदींनी Vocal for Local हे सांगत लोकानां स्वदेशी वस्तुंचा जास्तीत जास्त वापर करण्यास सांगितले. मोदींच्या या आवाहनानंतर गृहमंत्री अमित शहा यांनी एक मोठी घोषणा केली.

अतिम शहा यांनी ट्वीट करत असे सांगितले ती, सर्व केंद्रीय अर्धसैनिक पोलीस दलाच्या कॅन्टीन व स्टोअरमध्ये फक्त स्वदेशी उत्पादने विकली जातील. हा निर्णय 1 जूनपासून अंमलात आणला जाणार आहे. यामुळे 10 लाख केंद्रीय अर्धसैनिक दलातील सुमारे 50 लाख कुटुंबे केवळ 2800 कोटी रुपयांची देशी उत्पादने खरेदी करतील.

अमित शाह यांनी काय केले ट्वीट?

अमित शाह यांनी ट्वीट करत, काल पंतप्रधानांनी देशाला आत्मनिर्भर होण्याचे आवाहन केले. लोकांना जास्तीत जास्त स्वदेशी वस्तुंचा वापर करण्यास सांगितले होते. यामुळं निश्चितच येणाऱ्या काळात भारत जगाचे नेतृत्व करू शकेल, असे सांगत शाह यांनी केंद्रीय अर्धसैनिक पोलीस दलाच्या कॅन्टीन व स्टोअरमध्ये फक्त स्वदेशी उत्पादने विकली जातील. अशी घोषणा केली. यामुळं जवळजवळ 50 लाख कुटुंब स्वदेशी वस्तुंचा वापर करतील.

5 वर्षात देशाला आत्मनिर्भर करायचे आहे-अमित शाह

अमित शाह यावेळी असेही म्हणाले की, देशातील बनवलेल्या उत्पादनांचा जास्तीत जास्त वापर करुन इतरांनीही तसे करण्यास प्रोत्साहित करावे असे मी आवाहन लोकांना करतो. प्रत्येक भारतीयाने स्वदेशी वस्तूंचा वापर करण्याचे वचन दिले तर पाच वर्षांत देशातील लोकशाही स्वयंपूर्ण होऊ शकते.

काय म्हणाले होते मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या भाषणात देशाता आत्मनिर्भर करण्यास सांगितले. आज जगभरात स्वयंपूर्ण शब्दाचा अर्थ पूर्णपणे बदलला आहे, असेही सांगितले. यावेळी मोदींनी 20 लाख कोटी रुपयांचं हे पॅकेजची घोषणा केली. त्यासह 2020 मध्ये देशाच्या विकास यात्रेला व स्वावलंबी भारताच्या संकल्पनेले नवीन गती मिळवून देईल. या पॅकेजमध्ये जमीन, कामगार, लिक्वडिटी (तरलता) आणि कायदा या सर्वांवर लक्ष दिले आहे. हे पॅकेज कृषी, एमएसएमई, लघु उद्योग यांच्यासाठी करण्यात आले आहे. हे आर्थिक पॅकेज देशातील शेतकरी व श्रमिकांसाठी आहे. हे पॅकेज मध्यमवर्गींसाठी आहे, जो प्रामाणिकपणे टॅक्स देतो.

लॉकडाऊनच्या काळात आरोग्य सल्ल्यासाठी मोफत ऑनलाईन ई- संजीवनी ओपीडी

free-online-opd-e-sanjivani-opd

मुंबई: कोरोनामुळे राज्यात लॉकडाऊन सुरू आहे त्यामुळे काही ठिकाणी खासगी दवाखाने बंद आहेत अशा परिस्थितीत नागरिकांना आरोग्यविषयक तपासणी, सल्ला घेताना येणारी अडचण लक्षात घेऊन ऑनलाईन ई-संजीवनी ओपीडी सेवा सुरू करण्यात आली आहे. राज्यात प्रायोगिक तत्वावर सुरू झालेली ही सेवा पूर्णपणे सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी www.esanjeevaniopd.in या संकेतस्थळाला रुग्णांनी भेट देऊन तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा, असे आवाहन आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी केले आहे.

केंद्र आणि राज्य शासनाच्या आरोग्य विभागाचा हा संयुक्त उपक्रम असून त्यासाठी रुग्णाकडून शुल्क आकारले जाणार नाही. ही ऑनलाईन ओपीडी सकाळी ९. ३० ते दुपारी १.३० या काळात उलप्ध असणार असून रविवारी ही सेवा उपलब्ध नसेल. मात्र टप्प्याटप्प्याने त्याची वेळ वाढविण्यात येणार असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

नांदेड, भंडारा, नाशिक येथील जिल्हा रुग्णालयातील १६ वैद्यकीय अधिकाऱ्यांना ऑनलाईन ओपीडी सेवेचे प्रशिक्षण देण्यात आला आहे. गेले काही दिवस प्रायोगिक तत्वावर ही सेवा सुरू करण्यात आली. आता मात्र राज्यभर सर्वत्र सेवा सुरू झाली असून आतापर्यंत सुमारे ४०० हून अधिक रुग्णांना या सेवेमार्फत उपचार देण्यात आले आहेत.

या ॲप्लिकेशनच्या माध्यमातून एखादा रुग्ण राज्यातील कोणत्याही जिल्ह्यातून कुठल्याही जिल्ह्यातील वैद्यकीय अधिकाऱ्यांसोबत संगणक, लॅपटॉप अथवा मोबाईल याचा वापर करून कुठल्याही आजारावर सल्लामसलत करू शकतो. थेट व्हीडिओ कॉन्फरन्सिंग, लिखीत संदेश याद्वारे वैद्यकीय अधिकाऱ्यांसमवेत चर्चा करता येईल.

कशी वापराल ही सेवा ?

१) नोंदणी करून टोकन घेणे- त्यासाठी मोबाईल क्रमांकाद्वारे नोंदणी करता येईल. त्यावर ‘ओटीपी’ आल्यानंतर त्या माध्यमातून रुग्णाने नोंदणी अर्ज भरायचा आहे. त्यानंतर टोकनसाठी विनंती करायची. आजाराबाबत काही कागदपत्रे, रिपोर्ट असतील ते अपलोड करता येतील. त्यानंतर एसएमएसद्वारे रुग्णाचा ओळख क्रमांक आणि टोकन क्रमांक प्राप्त होईल.

२) लॉगइन करण्यासाठी एसएमएसद्वारे नोटीफिकेशन येईल. त्यानंतर रुग्णाला दिलेल्या ओळख क्रमांकच्या आधारे लॉगइन करता येईल.

३) वेटींग रुम- वेंटीग रुमवर एन्टर केल्यानंतर काही वेळातच ‘कॉल नाऊ’ हे बटन कार्यान्वित (ॲक्टिवेट) होईल. त्यानंतर व्हिडिओ कॉल करता येईल.

४) तुम्हाला डॉक्टर स्क्रीनवर दिसतील. त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर लगेच ई-प्रिस्क्रीप्शन प्राप्त होईल.

करोनावरील लसनिर्मितीचा शोध अंतिम टप्प्यात: WHO

Coronavirus nagpur: पाच प्रकारच्या नवीन स्ट्रेनमुळे नागपुरात करोनाचा उद्रेक

वॉशिंग्टन: करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे जगभरातील अनेक देश हतबल झाले असताना दुसरीकडे वैज्ञानिकांचे लस शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. करोनाला मात देणाऱ्या लस निर्मितीमध्ये सात ते आठ कंपन्यांचे वैज्ञानिक अंतिम टप्प्यानजिक आले असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस घेब्रेयसस यांनी सांगितले की, करोनाची लस तयार करण्यासाठी किमान १२ ते १८ महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. मात्र, ही लस लवकर तयार व्हावी यासाठीदेखील प्रयत्न सुरू आहेत. सात ते आठ कंपन्यांची टीम लस तयार करण्याच्या अंतिम टप्प्यात आली आहे. त्याशिवाय जवळपास १०० हून अधिक संस्था लस तयार करण्यासाठी झटत आहेत. त्याशिवाय जागतिक आरोग्य संघटना जगभरातील ४०० वैज्ञानिकांच्या संपर्कात असल्याची माहिती त्यांनी दिली. लस विकसित करण्यासाठी निधीची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. मागील एक आठवड्यांपूर्वी ४० देश, विविध संस्था-संघटना, बँकांनी करोनावर उपचार, परीक्षणांसाठी जवळपास ७.४ अब्ज युरोचा निधी आरोग्य संघटनेला मिळाला आहे. लवकर लस विकसित करण्यासाठी आणि त्याचे उत्पादन करून जगभरात वितरण करण्यासाठी अधिक निधीची आवश्यकता भासणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, याआधी इस्राएल आणि इटलीने करोनाला मात देणारी लस विकसित केली असल्याचा दावा केला होता. मानवावर त्या लसीची चाचणी घेतली जाणार आहे. तर, ब्रिटनमध्येही ऑक्सफोर्ड विद्यापीठाने तयार केलेल्या लसीची क्लिनिकल चाचणी सुरू असून त्याचे परिणाम पुढील महिन्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

२ सेल्फीचा Vivo V19 भारतात लाँच, पाहा किंमत

vivo v19

नवी दिल्लीः विवो कंपनीने आपला स्मार्टफोन Vivo V19 आज भारतात लाँच केला आहे. या फोनचे खासे वैशिष्ट्ये म्हणजे यात ड्युअल सेल्फी कॅमेरा, ४५०० एमएएच क्षमतेची बॅटरी आणि क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७१२ प्रोसेसर देण्यात आला आहे. ग्लोबर बाजारात हा फोन गेल्या महिन्यात लाँच करण्यात आला होता.

Vivo V19 ची किंमत – फीचर्स
कंपनीने भारतात या फोनला ८ जीबी प्लस १२८ जीबी स्टोरेजमध्ये उतरवले आहे. या फोनची किंमत २७ हजार ९९० रुपये ठेवण्यात आली आहे. ८ जीबी रॅम प्लस २५६ जीबी स्टोरेजच्या फोनची किंमत ३१ हजार ९९० रुपये आहे. हा फोन ब्लॅक आणि सिल्वर कलरमध्ये उपलब्ध असणार आहे. या फोनची विक्रीय १५ मे पासून अॅमेझॉन आणि फ्लिपकार्टसह अन्य साईट्सवरून होणार आहे.

कंपनीने या फोनच्या खरेदीवर एचडीएफसी आणि आयसीआयसीआय क्रेडिट कार्ड्सवर १० टक्के कॅशबॅक दिला जात आहे. तसेच वन टाइम स्क्रीन रिप्लेसमेट ऑफर आणि ४० हजार रुपये किंमतीची जिओ बेनिफिट्स मिळत आहे. तसेच विवो एअरटेल ग्राहकांना डबल डेटा, एअरटेल एक्सस्ट्रिम प्रीमियम सब्सक्रिप्शन, विंक म्युझिक सब्सक्रिप्शन यासारखी सुविधा दिली जात आहे. व्होडाफोन – आयडिया ग्राहकांना १.५ जीबीचा अतिरिक्त डेटा मिळत आहे.

Vivo V19 ची खास वैशिष्ट्ये
अँड्रॉयड १० वर काम करणाऱ्या या फोनमध्ये ६.४४ इंचाचा फुल एचडी प्लस सुपर अमोलेड डिस्प्ले दिला आहे. यात क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन ७१२ प्रोसेसर, ८ जीबी रॅम पर्यंत आणि २५६ जीबी स्टोरेज देण्यात आला आहे. या फोनमध्ये क्वॉड कॅमेऱ्याचा रियर सेटअप दिला आहे. रियर कॅमेऱ्यात ४८ मेगापिक्सलचा प्लस ८ मेगापिक्सलचा प्लस २ मेगापिक्सलचा प्लस २ मेगापिक्सलचे चार लेन्स दिले आहेत. कॅमेऱ्यात नाइड मोड, अल्ट्रा स्टेबल व्हिडिओ, आर्ट पोर्ट्रेट व्हिडिओ आणि सुपर मायक्रो यासारखे अनेक फीचर्स देण्यात आले आहेत.

३२ मेगापिक्सलचा ड्युअल सेल्फी कॅमेरा
या फोनमध्ये ड्युअल सेल्फी कॅमेरा दिला आहे. यात ३२ मेगापिक्सलचा आणि ८ मेगापिक्सलचे असे दोन सेन्सर असणार आहेत. फ्रंटला कॅमेऱ्यात सुपर नाईटी सेल्फी, सुपर वाइड अँगल सेल्फी आणि अल्ट्रा स्टेबल व्हिडिओ यासारखे फीचर्स देण्यात आले आहेत. फोनमध्ये ३३ वॅट फ्लॅश चार्ज २.० सोबत ४५०० एमएएच क्षमतेची बॅटरी देण्यात आली आहे.

लॉकडाउन वाढणार का?; पंतप्रधान मोदी आज रात्री ८ वाजता साधणार संवाद

जर तुम्हालाही नरेंद्र मोदींशी संपर्क साधायचा असेल तर जाणून घ्या ही माहिती
Narendra Modi

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदी पुन्हा एकदा कोरोनाचे संकट आणि लॉकडाउनच्या पार्श्वभूमीवर देशाला संबोधित करतील. पंतप्रधान मोदी आज रात्री ८ वाजता देशातील जनतेशी संवाद साधणार आहेत. आपल्या संबोधनाद्वारे ते कोरोनाला रोखण्यासाठी सरकारने घेतल्या उचललेल्या पावलांबाबत जनतेला माहिती देण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यावेळी ते लॉकडाउनबाबत महत्त्वाची घोषणा करतील अशीही शक्यता व्यक्त केली जात आहे.

पंतप्रधान कार्यालयाने ट्विट करत ही माहिती दिली. आपल्या संबोधनादरम्यान आणखी नवा निर्णय घोषित करतील का, देशातील आर्थिक स्थितीला उभारी देण्यासाठी ते काही उपाय योजना सूचवतील का, किंवा काही ठिकाणी ते लॉकडाउन शिथील करतील का, या आणि अशा अनेक प्रश्नांची उत्तरे पंतप्रधानांच्या संवादादरम्यान मिळण्याची शक्यता आहे.

केंद्र सरकारने घोषित केलेला देशव्यापी लॉकडाउनचा तिसरा टप्पा येत्या रविवारी, १७ मे रोजी पूर्ण होत आहे. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना आणि लॉकडाउनबाबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे देशातील सर्व मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली. यावेळी अनेक मुख्यमंत्र्यांनी लॉकडाउन आणखी वाढवण्याची आवश्यकता असल्याचे मत मांडले आहे.

अल्पावधित पाच हजार बेड क्षमतेचे ‘कोव्हिड केअर सेंटर’ तयार

नागपूरता. ११ : ‘कोरोना’ विषाणूच्या दृष्टीने पुढील काही दिवस महत्त्वाचे आहेत. नागपुरात सारे काही सध्या नियंत्रणात असले तरी उद्भवणाऱ्या कुठल्याही परिस्थितीशी दोन हात करता यावे, यासाठी नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे सूक्ष्मनियोजन करून त्यादृष्टीने तयारी करीत आहे. त्याच अनुषंगाने कळमेश्वर मार्गावरील येरला येथील राधास्वामी सत्संग ब्यास या संस्थेच्या सहकार्याने त्यांच्या आश्रमाच्या परिसरात पाच हजार बेडचे नियोजन असलेले सर्व सोयींनी युक्त ‘कोव्हिड केअर सेंटर’ उभारण्यात आले आहे. अशा प्रकारचे इतक्या मोठ्या क्षमतेचे व एवढ्या कमी कालावधीत तयार होणारे हे पहिले ‘कोव्हिड केअर सेंटर’ ठरू शकते.

ही संकल्पनाच मुळात नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मांडली. सध्या नागपुरात विविध ठिकाणी सुमारे ४२ विलगीकरण कक्ष उभारण्यात आले आहे. क्षमतेच्या दृष्टीने आणि त्यामध्ये विलगीकरण करण्यात आलेल्या नागरिकांच्या संख्येच्या तुलनेत ते आता अपुरे पडण्याची शक्यता आहे. कारण नागपुरात जे-जे व्यक्ती कोरोनाबाधीत आढळत आहेत, त्यांच्या संपर्कातील सर्वच लोकांना सार्वजनिक आरोग्याच्या दृष्टीने सक्तीच्या विलगीकरणात पाठविण्याची भूमिका मनपा आयुक्तांनी स्वीकारल्याने विलगीकरण केलेल्यांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. भविष्यात कोविड रुग्ण संख्येत वाढ झाल्यास त्यांची योग्य सोय अशा ठिकाणी व्हावी, त्यांच्यावर तेथेच उपचार करता यावे, यादृष्टीने मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी ‘कोव्हिड केअर सेंटर’ची संकल्पना मांडली. त्यांच्या या संकल्पनेला राधास्वामी सत्संग ब्यास ने सहकार्य करीत उपचार कालावधीसाठी जागा उपलब्ध करून दिली. केवळ जागाच उपलब्ध करून दिली नाही तर या सेंटरसाठी आवश्यक त्या सर्व सोयी उपलब्ध करून देण्याची तयारी दर्शविली. मॅटीन, बॅरिकेटींग, कम्पार्टमेंट, साईडिंग, डोम या सर्व व्यवस्था संस्थेने उपलब्ध करून दिल्या. इतकेच नव्हे तर शुद्ध पिण्याचे पाणी आणि रुग्णांकरिता सात्विक भोजन ही सुद्धा व्यवस्था संस्थेने केली आहे. डॉक्टर तसेच आरोग्य कर्मचारी, बेड, चादर, उशी, भोजनासाठी ट्रे व अन्य काही व्यवस्था नागपूर महानगरपालिकेच्या वतीने करण्यात आली आहे. एकूणच केंद्र शासन आणि राज्य सरकारने ‘कोविड केअर सेंटर’बाबत ठरवून दिलेल्या सर्व मार्गदर्शक तत्वांचे पालन करूनच हे ‘कोव्हिड केअर सेंटर’ उभारण्यात आले आहे. या सेंटरला भेट देऊन येथील संपूर्ण व्यवस्थेची मनपा आयुक्त श्री.तुकाराम मुंढे यांनी पाहणी केली.

 ‘कोव्हिड केअर सेंटर’मध्ये सद्यस्थितीत ५०० बेड तयार करण्यात आले असून गरजेनुसार ती पुढे वाढविण्यात येणार आहे. येथे महिला आणि पुरुष रुग्णांसाठी स्वतंत्र बेड आणि प्रसाधनगृहांची व्यवस्था आहे. प्रत्येक बेडला क्रमांक देण्यात आले असून तोच रुग्ण क्रमांक राहील. प्रत्येक १०० बेडच्या मागे २० डॉक्टर, वैद्यकीय चमू आणि इतर कर्मचा-यांची टिम कार्यरत असणार आहे. सोशल डिस्टंसिंगच्या नियमांची काटेकोर अंमलबजावणीसह ‘कोव्हिड केअर सेंटर’मध्ये उत्तम व्यवस्था करण्यात आली आहे.

विलगीकरण केलेल्या रुग्णांसाठी आवश्यक ती सर्व वैद्यकीय व्यवस्था येथे करण्यात आली आहे. त्यांचे तापमान तपासणी, रक्त तपासणीही येथे केली जाणार आहे. याशिवाय रुग्णांचे येथे स्वॅब घेण्यात येईल. स्वॅबच्या अहवालानंतर रुग्ण जर पॉझिटिव्ह असेल आणि प्रकृती अतिगंभीर असेल तरच त्याची रवानगी रुग्णालयातील कोव्हिड वॉर्डात करण्यात येईल. मात्र पॉझिटिव्ह असतानाही जर प्रकृती गंभीर नसेल, सहज उपचार शक्य असतील तर त्याला तेथेच अन्य कक्षात स्थलांतरित केले जाईल.

रुग्णांसोबतच या ठिकाणी वैद्यकीय अधिकारी, कर्मचारी, पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांच्या राहण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. इंसिडंट कमांडर व अधीक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी यांना या सेंटर ची जबाबदारी देण्यात आली आहे.

भविष्यात सेंटरची गरज पडू नये : आयुक्त तुकाराम मुंढे

यासंदर्भात बोलताना मनपा आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले, कोव्हिड केअर सेंटर सर्व सोयींनी युक्त आहे. आवश्यकतेनुसार येथील बेडची संख्या वाढविण्यात येत असून तब्बल पाच हजार बेडचे नियोजन आहे. त्यादृष्टीनेच ह्या कोव्हिड केअर सेंटरची आखणी आणि निर्मिती करण्यात आली आहे. या सेंटरच्या निर्मितीसाठी राधास्वामी सत्संग ब्यास  संस्थेचे मोलाचे सहकार्य लाभले. या सहकार्याबद्दल मनपातर्फे संस्थेचे मन:पूर्वक आभार. मात्र ह्या सेंटरची भविष्यात गरज पडू नये, असेच आपले मत आहे. नागपुरातून पूर्णत: कोरोना हद्दपार व्हावा, यासाठी नागरिकांनी लॉकडाऊनचे सर्व नियम पाळावेत. पुढील काही दिवस घरीच राहावे. सोशल डिस्टंसिंग पाळावे. मास्कचा वापर करावा. कोरोनाची साखळी खंडित करण्यासाठी संपूर्ण सहकार्य करावे, असे आवाहन मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे.

India Book of Records-85 kms running in drawing room

Dr. Rajendra Jaiswal

Dr. Rajendra Jaiswal’s new record to support Corona Warriors..

These Corona warriors, including doctors, nurses, hygiene and sanitation staff, police personnel, media and several others engaged in maintenance of essential services and supplies have steadfastly contributed to the effort to prevent spread of Covid-19.

To express gratitude and salute the frontline workers on 2nd May, 2020, Dr. Rajendra Jaiswal, a fitness enthusiasts, very elite athlete and renowned Ironman name of the central India created a India Book of Record by running 85kms in his own home drawing room for 12 hours 56 minutes which had been live on Facebook and whole world witnessed the same.

He started running from 5.45 am to 6.40 pm,  with a motive to express gratitude and appreciation towards the determination and committed efforts of our ‘corona warriors’ – the medical professionals, health workers, policemen, government staff and media, for their relentless efforts against Covid-19 through a number of activities on ground, in air and at sea. Dr. Rajendra Jaiswal dedicated this record to spread awareness about the fitness from home in lockdown period wherein in this manner one can at least contribute to reduce the spread of the COVID-19, by staying at home following social distancing norms, staying fit for healthy mind and emotional wellbeing.

He coveys moving your body and breaking a sweat also improves your mood, alleviates depression and aids cognitive abilities which leads to rush of endorphin and dopamine when you finish a challenging yet satisfying workout you are just what you need to stay mentally and emotionally fit.

According to him if he can do 85 km at home then everyone of us can also do at least 5 km walk any time at one’s own home and be healthy. As he is an active member of various not for profit government organization like Rotary Club of Nagpur, Junior Chambers International, so after completion of the record, lot of people have followed him and started indoor exercises and at the same time they have come forward to help Corona Warriors. He had arranged to donate 100 PPE KITS to support and protect them.

Dr.Rajendra Jaiswal is the only Hundred miler runner from Central India and he has also created a record of 81 kms non-stop 12.5 hours run with Tiranga in hand on 26th January 2019 certified by Asia Book of World records. He does physical training daily from morning 5.30 to 7.00 am followed by yoga till 9.00 am in the home only.

This run was all supported by wife Vinita, sons Maaheen, Ritvik, Mr. Sameer Jaiswal, mentors Dr. Amit Samarth, Ms. Sunita Wadhawan Dr. Sunita Dhote, Vaibhav Andhare, Miles and Milers, Orange City Runners, Ashish Agrawal, YogSutra the way of life and Run Buddies.

Also Read- Football returns as South Korea’s K-League kicks off with fans watching from afar

Pending CBSE Class 10, 12 Board Exams To Be Held Between July 1-15

CBSC

New Delhi: The Class 10 and 12 examinations for schools affiliated to the Central Board of Secondary Education (CBSE), that were put off amid the ongoing coronavirus pandemic, will be held in the first half of July, Education Minister Ramesh Pokhriyal Nishank said on Friday.

“The students have been impatiently waiting for the schedule for pending exams. It has been decided today that the exams will be conducted from July 1 to 15,” he said.

The CBSE will announce a detailed schedule of the exams later in the evening, he said.

Universities and schools across the country were closed and exams postponed on March 16 when the central governent announced a countrywide classroom shutdown as one of the measures to contain the COVID-19 outbreak.

Later, a nationwide lockdown was announced on March 24, which has now been extended till May 17.

Also Read- Football returns as South Korea’s K-League kicks off with fans watching from afar

नागपूरच्या पार्वतीनगरातील १०६ नमुने निगेटिव्ह

parvatinagar

नागपूर :तरंजीपुरा व मोमिनपुरानंतर हॉटस्पॉट ठरू पाहणाऱ्या रामेश्वरी रोड पार्वतीनगरातील १०६ संशयितांचे नमुने निगेटिव्ह आले. यामुळे आरोग्य यंत्रणेला मोठा दिलासा मिळाला आहे. परंतु या वसाहतीसह आजूबाजूच्या वसाहती सील केल्याने व २३० वर नागरिकांना क्वारंटाईन करण्यात आल्याने येथील रहिवाशांमध्ये भीतीचे वातावरण कायम आहे.

पार्वतीनगर येथील २२वर्षीय युवकाचा सहा मे रोजी मेडिकलमध्ये उपचारादरम्यान मृत्यू झाला. या युवकाला गेल्या काही दिवसांपासून ताप, खोकला व सर्दीची लक्षणे होती. हा रुग्ण ‘स्किझोफ्रेनिया’ नेही ग्रस्त होता. त्याला झटके येत असल्याने या आजारावरही उपचार सुरू होते. त्याच्या कानामध्ये इन्फेक्शन झाल्याने बुधवारी तो मेडिकलच्या अपघात विभागात आला. डॉक्टरांनी त्याला तपासल्यावर व त्याच्या लक्षणांवरून त्याची कोविड संशयित म्हणून नोंद केली. परंतु उपचार सुरू असताना त्याचा मृत्यू झाला. यामुळे पार्वतीनगरात खळबळ उडाली.

महानगरपालिकेने धंतोली झोनअंतर्गत येणाऱ्या प्रभाग क्रमांक ३५ मधील पार्वतीनगर, रामेश्वरी रोड, त्रिशरण चौक आदी परिसर सील केला. या शिवाय मृताच्या नातेवाईकांसह आजूबाजूच्या घरातील २३० लोकांना क्वारंटाईन केले. या सर्वांचे नमुने घेऊन तपासणीसाठी पाठविण्यात आले. मेयोच्या प्रयोगशाळेत आज पहिल्या फेरीत ५९ तर दुसऱ्या फेरीत ४७ असे एकूण १०६ नमुने तपासले असता सर्वच नमुने निगेटिव्ह आले. यामुळे ‘हॉटस्पॉट’ ठरू पाहणाऱ्या या वसाहतीतील नागरिकांसह आरोग्य यंत्रणेला काहीसा दिलासा मिळाला आहे. उर्वरित नमुन्यांचा अहवाल शनिवारी प्राप्त होणार आहे.

Also Read- राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 19 हजारांच्या पुढे, आज नवीन 1089 रुग्णांची नोंद

Football returns as South Korea’s K-League kicks off with fans watching from afar

South Korea's K-League Football

Suwon/Seoul: The 2020 K-League season started on Friday with a match between Jeonbuk Hyundai Motors and Suwon Samsung Bluewings played without spectators after a delay of more than two months caused by the coronavirus outbreak.

The Jeonju World Cup Stadium, home turf of Jeonbuk Hyundai Motors, was not filled with fans but giant yellow and white cards saying “#CU SOON STAY STRONG” were placed on empty seats, while coaches and substitutes wore face masks.

Broadcasters from 10 countries, mostly in Asia and Europe, have bought rights for the season and South Korea’s football association K-League live-streamed Friday’s match on Twitter and YouTube with English commentary.

Han Dong-min, a Bluewings fan who usually watches games in the stadium, was rooting for his team at a pub in Suwon, on the outskirts of Seoul.

“I was really happy to watch a soccer match even it was without fans,” said the 22-year-old Han after his team’s 1-0 defeat.

After a goalless first half, Jeonbuk striker Lee Dong-gook scored in the 83rd minute to clinch victory for the defending champions.

Lee celebrated the goal with sign language meaning respect, joining the “Thanks To You Challenge” in South Korea to express gratitude to medical workers fighting hard to tackle the virus.

“I was disappointed as all soccer games around the world were suspended because of the coronavirus,” said Lee Sang-hyup, a 24-year-old Bluewings fan in Suwon.

“But after watching today’s game, I feel like my heart is beating after a long time.”

South Korea, which has conducted widespread testing, intensive contact tracing and tracking apps to contain the spread of the virus, eased social distancing rules from 6 May.

The K-League opener followed the start of South Korea’s baseball league on 5 May, which attracted fans of Major League Baseball (MLB) craving to watch games with MLB on hold due to the coronavirus pandemic.

The K League is Asia’s oldest professional league, dating back to 1983, and teams will play 27 matches this season, down from 38 due to the delay caused by the coronavirus.

Also Read- Asian Paints forays into the Hand & Surface Sanitizer category

राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 19 हजारांच्या पुढे, आज नवीन 1089 रुग्णांची नोंद

Coronavirus: नियम आणि शिस्तीचे पालन करून हे ९० गावं झाले करोनामुक्त

मुंबई : महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. आज राज्यात तब्बल 1089 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यासोबतच राज्यातील आकडा 19063 वर पोहचला असून 731 जणांचा मृत्यू झाला आहे. अकोल्यात एकाचदिवसी तब्बल 42 नवीन रुग्ण सापडले आहेत. तर , औरंगाबादमध्ये 99 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच, नंदुरबारमध्ये एका कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू झाला.

काल राज्यात सलग दुसऱ्या दिवशी बाराशेवर नव्या रुग्णांची नोंद झाली. गुरुवारी १२१६ नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली होती. गुरुवारी २०७ रुग्ण बरे झाले. राज्यात काेरोनामुक्तांचा आकडा ३३०१ वर गेला आहे. राज्यात २ लाख २१०५ चाचण्यांपैकी १ लाख ८३८८० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

राज्यात सलग दुसऱ्या दिवशी बाराशेवर नव्या रुग्णांची नोंद झाली. गुरुवारी १२१६ नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद होऊन एकूण रुग्णसंख्या १७,९७४ वर गेली आहे. गुरुवारी ४३ जणांचा मृत्यू झाला. एकूण बळींचा आकडा ६९४ वर गेला आहे. गुरुवारी २०७ रुग्ण बरे झाले. राज्यात काेरोनामुक्तांचा आकडा ३३०१ वर गेला आहे. राज्यात २ लाख २१०५ चाचण्यांपैकी १ लाख ८३८८० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

लॉकडाऊनमुळे विविध देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांचा मायदेशी प्रवास सुरू आहे. ‘वंदे मातरम मिशन’ अंतर्गत सुमारे 15 हजार भारतीयांना विशेष विमानांनी भारतात आणले जात आहे. मुंबईतील 1900 प्रवासी परतणार आहेत. या लोकांना क्वारंटाइन करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने शहरातील 88 हॉटेलमध्ये 3343 खोल्यांची व्यवस्था केली आहे. 7 मेपासून देशातील 14 हजार 800 लोकांना 64 खास विमानांद्वारे जगातील विविध देशांमधून परत आणले जात आहे.

स्थलांतरित मजुरांना वैद्यकीय प्रमाणपत्र घ्यावे लागणार नाही

लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी रेल्वे प्रवास करण्यापूर्वी सरकारने वैद्यकीय प्रमाणपत्र देण्याची अट मागे घेतली आहे. यासंदर्भात गुरुवारी नवीन मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आली. सरकारने स्पष्ट केले की, आता रेल्वेत चढण्यापूर्वी मजुरांची मोफत वैद्यकीय तपासणी केली जाईल. या तपासणीनंतर रेल्वेने जाणाऱ्या सर्व प्रवाश्यांसाठी समान वैद्यकीय प्रमाणपत्र बनविण्यात येणार आहे.

मंत्रालयातील आयएएस अधिकाऱ्यास कोरोनाची लागण

मंत्रालयात कार्यरत प्रधान सचिव दर्जाच्या एका ज्येष्ठ आयएएस अधिकाऱ्यास कोरोनाचा संसर्ग झाला आहे. मंत्रालयातील सहा अधिकारी काेरोनाग्रस्त आहेत.

राज्यात ४५७ पोलिस कोरोनाग्रस्त,

राज्यात एका आयपीएससह ४० अधिकारी व ४१७ कर्मचारी असे ४५७ पोलिस, बेस्टचे ४० कर्मचारी तसेच ६ कैद्यांना संसर्ग झाला आहे.

नागपुरात २५५ बाधित

मागील २४ तासांत नागपुरात किमान ६० जणांची भर पडून कोरोनाबाधितांचा एकूण आकडा २५५ वर पोहोचला आहे. बुधवारपासून अचानक रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याने स्थानिक प्रशासन हादरले असून संसर्ग पसरू नये यासाठी आता नवे परिसर सील केले जात आहे.

नागपुरात ६ ते ८ ठिकाणांवर कोरोनासाठीच्या आरटीपीसीआर चाचण्या पार पाडल्या जात आहेत. बुधवारी दिवसभरात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या अचानक वाढली. सायंकाळपर्यंत आकडा ४४ पर्यंत गेला होता. बुधवारी रात्रीपर्यंत तो ६० वर पोहोचला. गुरुवारी दिवसभरात रुग्णांचा आकडा वाढून तो सायंकाळपर्यंत २५५ पर्यंत पोहोचला होता. यापैकी १८२ रुग्णांवर नागपुरातील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल आणि इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये उपचार सुरू आहेत. सर्वाधिक संख्येने सतरंजीपुरा आणि मोमीनपुरा या वस्त्यांमधून रुग्ण येत आहेत. त्यामुळे हे दोन्ही परिसर मागील अनेक दिवसांपासून सील करण्यात आले आहेत.

पुण्यात १२४ नवीन कोरोना रुग्ण, सात जणांचा मृत्यू; ८४ जण बरे होऊन घरी गेले, विभागात ७५० बरे

पुणे शहरात कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, सलग दुसऱ्या दिवशीही आणखी ७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे हे सातही मृत्यू अवघ्या बारा तासांत झाले आहे. त्यामुळे मृत्यूचे तांडव कधी थांबणार, असा प्रश्न नागरिकांना पडू लागला आहे. दरम्यान, शहरासह जिल्ह्यात मृतांची संख्या १३३ वर जाऊन पोहोचली आहे. गुरुवारी एका दिवसात १२४ नवीन कोरोना रुग्ण वाढले असून ८४ कोरोनाबाधित बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

विभागातील ७५० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २ हजार ७३४ झाली आहे, तर ॲक्टिव्ह रुग्ण १ हजार ८४२ आहेत. विभागातील पाच जिल्ह्यांंत एकूण १४२ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच ९४ रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

धुळ्यात आणखी १ डाॅक्टर पाॅझिटिव्ह

धुळे | हिरे वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील काेरोनाबाधित डॉक्टरचा अहवाल येऊन २४ तास उलटत नाही तोच पुन्हा एक डॉक्टर पॉझिटिव्ह आला. एकीकडे हिरे रुग्णालयात कोरोनावर मात करून घरी परतणाऱ्यांची संख्या वाढत असताना पुन्हा नव्याने बाधित होणाऱ्यांची संख्या वाढते आहे. हा डॉक्टर देवपुरातील मोहंमदी नगरातील रहिवासी असून ५० वषीय आहे. दिवसभरात हिरे रुग्णालयात सुमारे २९० जणांची प्राथमिक तपासणी झाली. यापैकी ४१ जणांना दाखल केले.

सोलापुरात १७६ रुग्ण

सोलापूर जिल्ह्यात १७६ कोरोनाबाधित रुग्ण असून २४ बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्णसंख्या १४२ आहे. एकूण दहा कोरोनाबाधित रुग्णांचा अातापर्यंत मृत्यू झाला आहे.

मनमाडला अडकलेले १०६ भाविक पंजाबकडे रवाना

येथील प्रसिद्ध गुरुद्वारात लॉकडाऊनमुळे ४२ दिवसांपासून अडकून पडलेल्या १०६ शीखधर्मीय भाविक यात्रेकरूंना चार विशेष बसेसद्वारे गुरुवारी रवाना करण्यात आले. तत्पूर्वी या बांधवांची नियमाप्रमाणे आरोग्य तपासणी करण्यात आली व प्रमाणपत्र देण्यात आले.

‘जो बोले सो निहाल, सत श्री अकाल’ आणि ‘सतनाम वाहेगुरु ‘चा गजर करीत भाविक यात्रेकरूंनी मनमाड गुरुद्वारा प्रति आभार व्यक्त केले. गुरुवारी सकाळी अकरा वाजता मनमाड गुरुद्वारातून या यात्रेकरूंच्या चार बसेस मनमाड येथून पंजाब राज्यात मार्गस्थ झाल्या. या वेळी मनमाड गुरुद्वारा प्रबंधक बाबा रणजित सिंग, मनमाडचे पोलिस उपअधीक्षक समीरसिंह साळवे, पालिकेचे मुख्याधिकारी डॉ दिलीप मेनकर, योगेश पाटील, धनंजय कमोदकर, चंद्रकांत परब, गुरुजित कांत, गुरुदीप सिंह कांत, संजय कटारिया, सुधीर पाटील, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जी. एस. नरवणे उपस्थित होते. केंद्र आणि राज्य सरकार,पंजाब आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात समन्वय साधून याबाबत कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी बसेस उपलब्ध करून परवानगीसाठी सहकार्य केले. या चारही विशेष बसेसचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. मध्यप्रदेश, राजस्थान मार्गे हे भाविक यात्रेकरू पंजाब राज्यातील लुधियाना येथे पोहोचतील.

सातारा जिल्ह्यात रुग्णसंख्या ११३ वर

सातारा । सातारा जिल्ह्यात गुरुवारी सकाळीच कोरोनाचे तीन बाधित रुग्ण सापडल्यानंतर दुपारीच कोरोनाचे नवीन १७ रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. कोरोना बाधितांच्या निकट सहवासित आलेल्यांना अनुमानित म्हणून दाखल केले होते. त्यापैकी सहाजणांचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, तर कराड येथील कृष्णा वैद्यकीय महाविद्यालय व उपजिल्हा रुग्णालयात बाधितांच्या निकट सहवासित आलेल्यांना अनुमानित म्हणून दाखल केले होते. त्यापैकी १२ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या ११३ वर गेल्याने सातारा जिल्ह्याने दुर्दैवाने कोरोना बाधितांची शंभरी पार केली आहे. यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणखी एक बाधित, रुग्णसंख्या झाली चार

रायगड | सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुरुवारी आणखी एक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे. २७ वर्षांच्या या रुग्णाने मुंबई येथून आला आहे. कुडाळ तालुक्यातील जांभवडे गावातील हा रुग्ण २८ एप्रिलला मुंबईतील परळ येथून जिल्ह्यात दाखल झाला होता. त्यानंतर त्याला कुडाळ येथील संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते. बाधित क्षेत्रातून आला असल्याने ५ मे रोजी त्याचा स्वॅब तपासणीसाठी पाठवला होता. त्याचा अहवाल आज आला असून त्याला कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे.

Also Read- पोलिसांनो, कठोर व्हा अन्‌ नागरिकांनो, सहकार्य करा!

पोलिसांनो, कठोर व्हा अन्‌ नागरिकांनो, सहकार्य करा!

Mpl Commssioner & Police CP Meeing

नागपूर, ता. ८ : कोव्हिड-१९ च्या दृष्टीने नागपूर शहरासाठी पुढील १५ दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. या १५ दिवसांवर आपले नियंत्रण राहिले नाही तर पुढील १५ महिने असेच राहावे लागेल. त्यामुळे पोलिसांनो, प्रतिबंधित क्षेत्रामधील कुठलाही व्यक्ती बाहेर येणार नाही, असा बंदोबस्त करा आणि नागरिकांनो, तुम्ही सहकार्य करा असे आवाहन करतानाच जर नागरिकांनी ऐकले नाही तर कठोर पावले उचलावे लागतील आणि अधिकाऱ्यांनी कुचराई केली तर कठोर कारवाईला सामोरे जावे लागेल असा कडक इशाराही नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिला.

गेल्या दोन दिवसांत नागपूर शहरात एका विशिष्ट भागात मागील दोन दिवसांत वाढलेल्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधित क्षेत्रात पोलिस बंदोबस्त आणि निर्बंध अधिक कडक करण्यासंदर्भात नागपूर महानगरपालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पोलिस आयुक्तांसह वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक घेतली. या बैठकीत ते बोलत होते. बैठकीला पोलिस आयुक्त डॉ. भूषणकुमार उपाध्याय, सहपोलिस आयुक्त रवींद्र कदम, अपर पोलिस आयुक्त शशीकांत महावरकर, पोलिस उपायुक्त राहुल माकणीकर, पोलिस उपायुक्त श्वेता खेडकर, मनपाचे अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त निर्भय जैन, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवाई, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. प्रवीण गंटावार, सतरंजीपुरा झोनचे सहायक आयुक्त विजय हुमणे, धंतोली झोनच्या सहायक आयुक्त किरण बगडे, नेहरूनगर झोन सहायक आयुक्त स्नेहा करपे उपस्थित होते.

या बैठकीत नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी वाढत्या रुग्णसंख्येबाबत चिंता व्यक्त केली. सतरंजीपुऱ्यात रुग्ण आढळल्यानंतर तेथील क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले. तेथील निर्बंध कडक केले. संपर्कात आलेल्यांना विलगीकरण कक्षात पाठवले. यामुळे आज तेथील परिस्थिती नियंत्रणात आली. मात्र मागील दोन दिवसांतील रुग्णसंख्येने शतक पार केले. यातील बहुतांश रुग्ण मोमीनपुरा परिसरातील आहे. हे क्षेत्र प्रतिबंधित घोषित केले असले तरी येथून आवागमन काही प्रमाणात सुरू असल्याचे लक्षात आले. काल-परवा या क्षेत्राव्यतिरिक्त आढळलेला एक रुग्ण हा मोमीनपुरा क्षेत्रात जाणे-येणे करीत असल्याचे समोर आले. ही बाब अत्यंत गंभीर आहे. असेच जर अन्य नागरिकही करीत असेल तर हे यापुढे खपवून घेतले जाणार नाही. मनपा अधिकारी आणि पोलिसांत समन्वय असायलाच हवा. या समन्वयातून यापुढे केवळ एक प्रवेश वगळता संपूर्ण क्षेत्र सील करा, असे कडक निर्देश आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले.

तक्रार असेल तर येथे करा….!

क्षेत्र प्रतिबंधित असले आणि कुणी काही तक्रारीचे कारण घेऊन बाहेर जाण्याचा प्रयत्न करीत असेल तर त्यांना नागपूर महानगरपालिकेचे ‘नागपूर लाईव्ह सिटी ॲप’ डाऊनलोड करण्यास सांगा. अन्य काही अडचण असेल तर मनपाच्या नियंत्रण कक्षाला फोन करून माहिती द्यायला सांगा, असेही मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले.

तर सरळ विलगीकरण कक्षात करा रवानगी

नागपूर महानगरपालिकेने जे क्षेत्र प्रतिबंधित केले आहे, त्या क्षेत्राच्या बाहेर कुणीही यायला नको किंवा बाहेरचा व्यक्ती आत जायला नको. तो मग कुणीही असो. कुठल्याही पदावर असो. जर तो पोलिसांशी हुज्जत घालत असेल तर त्याची रवानगी सरळ विलगीकरण कक्षात करा, असेही स्पष्ट निर्देश आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले.

मोमीनपुऱ्यात केवळ १० ते ४ अत्यावश्यक वस्तूंची दुकाने राहणार उघडी

मोमीनपुरात शनिवार ९ मे पासून अत्यावश्यक वस्तूंची दुकाने केवळी सकाळी १० ते दुपारी ४ पर्यंतच सुरू राहतील. तसे आदेश मनपा आयुक्तांतर्फे निर्गमित केले आहेत.. दुपारी ४ नंतर कुणीही रस्त्यावर दिसणार नाही, याची काळजी नागरिकांनी घ्यायची आहे. तेथील लोकांच्या आरोग्यासाठीच हे कडक निर्णय घेण्यात येत असून नागरिकांनी त्यासाठी मनपा प्रशासन आणि पोलिस प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

नागरिकांना भावनिक आवाहन आणि इशाराही

अत्यावश्यक सेवेत असणाऱ्या एका कर्मचाऱ्याला नागरिकांनी मारहाण केल्याचे प्रकरण आज घडले, जे अत्यंत वाईट आहे. स्वत: बिनधास्त बाहेर फिरणाऱ्या नागरिकांनी अत्यावश्यक सेवेतील व्यक्तीला मारहाण करणे दुर्देवी आहे. अशा प्रवृत्तींची गय न करता सरळ त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. पुढील १५ दिवस अत्यंत महत्त्वाचे आहेत. ह्या दिवसांत नियंत्रण ठेवले नाही, तर अत्यंत वाईट परिस्थिती उद्‌भवेल. त्यामुळे नागरिकांनी लॉकडाऊन संपलेला नसल्यामुळ घरातच राहावे आणि नागपूर शहरातील नागरिकांचे आरोग्य सुरक्षित करावे, असे भावनिक आवाहन आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केले आहे. जर नागरिकांनी आताही ऐकले नाही तर संपूर्ण शहरात संचारबंदी करावी लागेल, असा इशारा त्यांनी दिला आहे.

Also Read- विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा वगळता इतर विद्यार्थी थेट पुढच्या वर्गात

Asian Paints forays into the Hand & Surface Sanitizer category

Viroprotek

Mumbai, May 8, 2020: Asian Paints, India’s leading paint company has announced its foray into the sanitizer category with the launch of the Viroprotek range of Hand and Surface Sanitizers.

Asian Paints has entered into this category to support the Government in its various measures towards COVID-19 relief and address the huge need of hand and surface sanitization in these testing times. The product is being manufactured at the Company’s existing plant at Ankleshwar, Gujarat, after obtaining all the necessary statutory approvals and permissions. Viroprotek range of Hand and Surface Sanitizers meet the highest quality standards, and will be available in various pack sizes, addressing the growing concerns surrounding health and hygiene. The products will be available in the market starting next week.

“Asian Paints being a ‘Responsible and Caring Brand’ has always been proactive in supporting various Government Initiatives and helping communities around us. We have been working in the Health and Hygiene space for some time and had introduced earlier Royale Health Shield, a revolutionary product which helps customers in maintaining good standards of Hygiene and Bacterial protection for their Homes. We felt it apt to consolidate our portfolio in the hygiene space and address the growing requirement of hand and surface sanitizers for increased protection and assist the Government in fighting against the COVID-19 pandemic.” said Amit Syngle, Managing Director & CEO, Asian Paints Limited.

In March 2020, Asian Paints had committed Rs. 35 crores towards the Central as well as other Emergency Relief State to combat Covid-19 pandemic. The company is also working with several NGO’s for providing food, masks and sanitizers. It is also providing the necessary support to the Painter/Contractor Communities and has undertaken several proactive measures like providing dedicated helpline and also transferring funds directly into their bank accounts. Additionally, the company is also providing free sanitization of the dealer outlets and free insurance for people at the outlets including shop boys.

Also Read- Reliance Jio Sells 2.3% Stake to US Tech Fund Vista Equity Partners for Rs 11,367 Crore

विद्यापीठाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा वगळता इतर विद्यार्थी थेट पुढच्या वर्गात

udya-samant

मुंबई – कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात सुरु लॉकडाऊनमुळे महाविद्यालयीन, विद्यापीठांच्या परीक्षा सोबतच इतर स्पर्धा परीक्षा आणि सीईटी परीक्षा लांबणीवर पडल्या होत्या. परीक्षा आणि पुढील शैक्षणिक वर्षाबद्दल विद्यार्थ्यांच्या मनात अनेक संभ्रम होते. विद्यार्थ्यांच्या मनातील परीक्षांबद्दलचा गोंधळ दूर करण्यासाठी आज महाराष्ट्र राज्य उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी फेसबूक लाईव्हच्या माध्यामातून संवाद साधला.

समितीने दिलेल्या अहवाला विषयी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार,महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याशी चर्चा करून विद्यार्थ्यांच्या हिताचा विचार करूनच निर्णय घेण्यात येत आहे.जर राज्यात कोरोनाची परिस्थिती अशीच राहिली व लॉकडाऊन कालावधी वाढला तर पुन्हा एकदा २० जुन पर्यंत या विषयी फेर आढावा घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिल्या आहेत असे सामंत यांनी सांगितले.

समितीने केलेल्या शिफारशी नुसार ज्या विद्यार्थ्यांच्या परिक्षा होणार नाहीत त्यांना पुढील वर्गात प्रवेश देण्यात येणार आहे. हा प्रवेश देताना त्यांचे ग्रेड्स व मार्क्स ही त्यांना दिले जातील. ही मार्क्स देण्याची पद्धती ही विद्यार्थ्यांना मिळणारी ५० टक्के ग्रेड ही अंतर्गत मुल्यमापनावर आधारीत व ५० टक्के या पूर्वीच्या सत्रातील परीक्षेचे गुण यावरून ठरणार आहे. पूर्वीच्या परीक्षा किंवा सत्रांचे गुण उपलब्ध नसल्यास वार्षिक सत्राच्या पहिल्या वर्षांच्या परीक्षांच्या बाबत १०० टक्के अंतर्गत मुल्यमापन करण्यात येणार आहे. या गुणांबाबत काही शंका असल्यास तसेच त्यामध्ये मुल्यवर्धन करण्याची विद्यार्थ्याची इच्छा असल्यास त्यास ऐच्छिक परीक्षा देता येणार आहे. अशा प्रकारच्या परीक्षांबाबत विद्यापीठ स्तरावर निर्णय घेण्यात येणार आहे. तसेच दुर्दैवाने जर एखादा विद्यार्थी या परीक्षांमध्ये नापास झाला तर त्यालाही पुढील वर्षात प्रवेश दिला जाईल पण, त्यांना नापास झालेल्या विषयांची परीक्षा द्यावी लागेल. या विषयीचे वेळापत्रकाचे निर्णय ही विद्यापीठ स्तरावर घेण्यात येणार आहेत. एटीकेटीच्या विद्यार्थ्यांनाही हाच नियम लागू असणार आहे. हा निर्णय घेत असताना कोणत्याही विद्यार्थ्याचे शैक्षणिक वर्षाचे नुकसान होणार नाही याची पूर्ण दक्षता येईल. असे ही सामंत यांनी संगित

विद्यार्थी व पालक यांच्या शंकाचे निरासन करून त्याच्या सामुपदेशनासाठी प्रत्येक जिल्ह्यात केंद्र स्थापन करण्यात येईल. अंतिम वर्षाच्या सर्व विद्यार्थ्यांनी १ जुलै ते ३० जुलै दरम्यान परीक्षा होणार आहेत असे नजरेसमोर ठेऊन अभ्यास सुरू करावा. तसेच ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा होणार नाहीत त्यांनीही सुट्टी आहे, अभ्यास नाही म्हणून घरा बाहेर न पडता घरातच रहावे. उन्हाळी सुट्टीबाबत प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी या सर्वांचा विचार करून प्रत्येक विद्यापीठाने त्यांच्या स्तरावर निर्णय घ्यावा. युजीसीने दिलेल्या मार्गदर्शक सुचनांनुसार शैक्षणिक वर्ष हे १ सप्टेंबर पासून सुरू करावयाचे आहे. त्या दृष्टीने उच्च व तंत्रशिक्षण विभाग काम करत आहे. समितीने दिलेल्या या अहवालास सर्व विद्यापीठांच्या कुलगुरूंनी सहमीती दर्शवली आहे. लॉकडाऊनच्या काळात विद्यार्थी हे महाविद्यालयांमध्ये उपस्थित होते असे गृहीत धरूनच त्यांची उपस्थित गृहीत धरण्यात येणार आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांनी आता कोणत्याही प्रकारच्या संभ्रमास बळी पडू नये व आपल्या अभ्यासावर व शैक्षणिक सत्रांवर लक्ष केंद्रीत करावे असे आवाहनही सामंत यांनी यावेळी केले.

स्वायत्त विद्यापीठांनाही विद्यापीठ अनुदान आयोगाच्या (युजीसी) निर्देशाप्रमाणे याच फॉरमॅटद्वारे परीक्षा घ्याव्या लगणार आहेत.
चार वर्षाचा कोर्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना केवळ आठव्या सत्राची (सेमिस्टर) परीक्षा द्यावी लागणार आहे.

तसेच पाच वर्षाचा कोर्स असणाऱ्या विद्यार्थ्यांना केवळ १० व्या सेमिस्टरची परीक्षा द्यावी लागेल.

ज्या अभ्यासक्रमाच्या परीक्षा वार्षिक होतात, त्यांच्या केवळ अंतिम वर्षाच्या विद्यार्थांची परीक्षा घेण्यात येईल.

दोन वर्षाच्या अभ्यासक्रमाच्या केवळ चौथ्या सत्राची (सेमिस्टर) परीक्षा होईल.

गोंडवाना विद्यापीठ हे हिरव्या पट्ट्यामध्ये (ग्रीन झोन) येत असल्यामुळे तेथील अंतिम वर्षांच्या विद्यार्थांच्या परीक्षा घेण्याबाबत मुभा दिली आहे. या विद्यापीठांतर्गत गडचिरोली आणि चंद्रपूर हे जिल्हे येतात. येथील भोगोलिक परिस्थिती पाहून विद्यापीठ स्वतःच्या वेळापत्रकानुसार परीक्षा घेईल.

एसएनडीटी विद्यापीठाच्या राज्यातील महाविद्यालयीन परीक्षा या वेळापत्रकानुसारच होतील इतर राज्यातील त्याच्या परीक्षेच्या वेळापत्रकानुसार होतील.

उन्हाळी सुट्टीबाबत सर्व विद्यार्थी, प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांचा विचार करून संबंधित विद्यापीठ अंतिम निर्णय घेईल.

नवीन शैक्षणिक वर्ष हे १ सप्टेंबर पासून सुरू करण्यासाठी सर्व परीक्षांचे निकाल हे १५ ऑगस्ट पर्यंत लावण्यात येतील.
सामाईक प्रवेश परीक्षांच्या (सीईटी) बाबतीत येत्या ८ दिवसांत निर्णय जाहीर करण्यात येईल.
पदविका, पदवी आणि पदव्युत्तरच्या अंतिम वर्षाच्या प्रॅक्टिकलच्या परीक्षा जर महाविद्यालयात घेता आल्या नाहीत तर विद्यार्थ्यांनी सादर केलेल्या जर्नल किंवा ऑनलाईन ओरल घेऊन गुणांकन केले जाईल.

या मराठी तरुण उद्योजकाचे बिझनेस पार्टनर बनले रतन टाटा, कंपनीत ५० टक्के गुंतवणूक

ratan tata

मुंबई : टाटा ग्रुपचे प्रमुख आणि प्रसिद्ध उद्योगपती रतन टाटा यांनी मुंबईतील 18 वर्षांच्या अर्जुन देशपांडेच्या औषध विक्री करणाऱ्या ‘जेनरिक आधार’ या कंपनीत 50 टक्के भागीदारी घेतली आहे. ही कंपनी दुकानदारांना कमी किंमतीत औषधं पुरवते.

टाटांनी यामध्ये किती पैसे गुंतवले हे समोर आलेलं नाही. अर्जुन देशपांडे याने दोन वर्षापूर्वी आपल्या आई वडिलांकडून पैसे घेऊन या कंपनीची सुरवात केली होती.

अर्जुन देशपांडे यांनी स्वत: ही गोष्ट शेअर केली आहे. पण त्याने टाटांकडून किती पैसे गुंतवण्यात आले हे नाही सांगितलं. त्याने सांगितलं की, रतन टाटा हे मागील 3-4 महिन्यांपासून या प्रस्तावावर विचार करत होते. टाटांना त्यांच्यासोबत पार्टनर बनणायचं होतं आणि हा व्यवसाय चालवण्यासाठी मेंटोर देखील. अर्जुन देशपांडे एका वृत्तवाहिनीला माहिती दिली की, सर रतन टाटा यांनी त्याच्या कंपनीत ५० टक्के भागीदारी घेतली आहे. याबाबत लवकरच औपचारिक घोषणा केली जाईल.’

सूत्रानुसार, रतन टाटा यांनी यामध्ये वैयक्तिक गुंतवणूक केली आहे. यामध्ये टाटा ग्रुपचा काही संबंध नाही. याआधी रतन टाटा यांनी ओला, पेटीएम, स्नॅप्टर, क्योरफिट, अरबन लॅडर, लेन्सकार्ट आणि लाइब्रेट सारख्या अनेक स्टार्टअप कंपन्यामध्ये पैसे गुंतवले आहेत.

अर्जुन देशपांडेने दोन वर्षांपूर्वी जेनेटिक आधारची सुरुवात केली होती. आता कंपनीची वार्षिक उलाढाल ६ कोटींच्या घरात पोहोचली आहे. ही एक युनीक फार्मेसी एग्रीगेटर मोडनेस मॉडेलवर काम करणारी कंपनी आहे. ही कंपनी उत्पादकांकडून जेनेरिक औषधं खरेदी करुन सरळ दुकानदारांना विकते. यामुळे होलसेलरचं 16 ते 20 टक्के मार्जिन वाचतं.

मुंबई, पुणे, बंगळुरु आणि ऑडिशाचे 30 रिटेलर या कंपनीसोबत जोडलेले आहेत. प्रॉफिट शेअरींग मॉडेल वर चालते. जेनेरिक आधारमध्ये 55 कर्मचारी आहेत. ज्यामध्ये फार्मासिस्ट, आयटी इंजीनियर आणि मार्केटिंग प्रोफेशनल यांचा समावेश आहे.

अर्जुन देशपांडेने माहिती दिली की, एक वर्षाच्या आत त्यांची कंपनी १००० फ्रेचायजी मेडिकल स्टोर उघडण्याचा विचार करत आहे. आम्ही आमचा विस्तार महाराष्ट्र, गुजरात, आंध्र प्रदेश, तमिळनाडू आणि दिल्ली पर्यंत करु.’

Also Read- बुलडाण्याची कोरोनामुक्तीकडे यशस्वी वाटचाल!

बुलडाण्याची कोरोनामुक्तीकडे यशस्वी वाटचाल!

corona

बुलडाणा : कोरोनाने जगभर थैमान घातले असताना राज्यातही कोरोनाचा प्रादुर्भाव चांगलाच वाढला आहे. जिल्ह्यामध्ये कोरोनाने शिरकाव करीत २४ रूग्ण बाधीत केले. कोरोना फैलाव रोखण्यासाठी बुलढाणा जिल्हा प्रशासनाने विविध कडक उपाययोजनांची अंमलबजावणी केली. त्यामुळे जिल्ह्यात सकारात्मक वातावरण कोरोना निवळण्यासाठी तयार झाले आहे. आतापर्यत २० रूग्णाने कोरोनावर मात केल्यामुळे त्यांना सुट्टी देण्यात आली आहे. अशाप्रकारे बुलडाणा जिल्ह्याची कोरोनामुक्तीकडे यशस्वी वाटचाल सुरू आहे.

जिल्ह्यात चिखली येथे तीन, चितोडा ता. खामगांव येथे दोन, शेगांव येथे तीन, देऊळगांव राजा येथे दोन, सिंदखेडराजा येथे एक, मलकापूर येथे चार आणि बुलडाणा येथे नऊ कोरोनाबाधीत रूग्ण आढळले होते. त्यापैकी आतापर्यंत बुलडाणा येथील पाच, शेगांव येथील तीन, चितोडा ता. खामगांव येथील दोन, चिखली येथील दोन, मलकापूर येथील चार, दे.राजा येथील दोन आणि सिंदखेड राजा येथील एक कोरोनाबाधीत रूग्ण बरे होवून घरी परतले आहे.

त्यामध्ये आज एका रूग्णाची भर पडली आहे. आज चिखली येथील एक रूग्ण बरा होवून स्वगृही परतला आहे. अशाप्रकारे एकूण २०६ रूग्ण बरे झाले. बुलडाणा प्रशासनाने आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातून राबविलेल्या उपाययोजनांमुळे आज एका रूग्णाचा दुसरा रिपोर्ट निगेटिव्ह आला. त्याला जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रेमचंद पंडित यांच्यासह सर्व डॉक्टर्स, नर्सेस, ब्रदर्स यांनी टाळ्या वाजवून स्वागत केले.

त्यानंतर रुग्णवाहिकेतून संबंधित रुग्णांना त्यांच्या घरी सोडण्यात आले. या एका रूग्णामुळे बुलढाणा जिल्ह्यात कोरोनापासून बरे झालेल्या रूग्णांची संख्या २० झाली आहे. जिल्ह्यात कोविड -१९ आजाराने २४ रूग्ण बाधित होते. बुलढाणा येथे आतापर्यंत कोरोनापासून बरे झालेल्या २० रूग्णांना घरी सोडण्यात आले आहे. आता ३ रूग्णांवर कोविड रूग्णालयात उपचार सुरू आहेत.

Also Read- CoronaVirus in Nagpur: नागपुरातील पार्वतीनगर नवा हॉटस्पॉट ठरण्याचा धोका

Reliance Jio Sells 2.3% Stake to US Tech Fund Vista Equity Partners for Rs 11,367 Crore

Reliance Jio

India 2020: Reliance Jio, the telecom unit of Reliance Industries Ltd (RIL), has sold a 2.3 per cent stake to Vista Equity Partners, a US-based private equity firm that runs the world’s largest exclusively tech-focused fund, for Rs 11,367 crore.

Vista’s investment is at an 12.5 percent premium over the Facebook deal announced in April. The deal puts Jio Platforms’ equity value at Rs 4.91 lakh crore and an enterprise value at Rs 5.16 lakh crore.

This is the third high profile-investment in Reliance Jio in as many weeks, after Facebook acquired a minority 9.9 per cent stake for Rs 43,534 crore and Silver Lake invested 5655 crore for a stake of 1.5 per cent.

The investment by Silver Lake Partners in Jio announced earlier this week was also at a similar premium to the Facebook deal.

Jio Platforms has now raised Rs 60,596.37 crore from leading technology investors in less than three weeks as the company looks to pare its debt.

Vista has a track record of investing in cutting edge tech companies in their early stage, and each of its investments have been profitable in its history of 10 years. This is Vista’s first sizable investment in India.

This reaffirms Jio as a strong tech-enterprise focused on one of the most exciting and large markets in the world and emphasises the quality of management, RIL said.

Vista’s investment showcases Jio as the next-generation software and platform company, beyond a telecom enterprise. This reaffirms Jio’s continuing attraction among global investors for its deep understanding of the Indian markets, the rapid digitisation opportunity post-Covid-19 and its capabilities to bring cutting-edge technologies and tools such as AI, Blockchain, AR/VR and Big data into play for all Indians.

Diverse marquee investors are becoming long-term shareholders of Jio Platforms because of a unique set of technologies and platforms under one entity. There are no similar opportunities available anywhere else globally.

Also Read- 15 Migrants Run Over By Train In Maharashtra, Driver Tried To Stop

CoronaVirus in Nagpur: नागपुरातील पार्वतीनगर नवा हॉटस्पॉट ठरण्याचा धोका

parvatinagar

नागपुर: हॉटस्पॉट ठरलेल्या सतरंजीपुरा व मोमीनपुरानंतर रामेश्वरी, पार्वतीनगर नवा हॉटस्पॉट तर ठरणार नाही ना, अशी शंका व्यक्त केली जात आहे. मंगळवारी कोरोनाबाधित एका युवकाच्या मृत्यूनंतर हा धोका निर्माण झाला आहे. सुरक्षेच्या दृष्टीने मृताचे निवासस्थान असलेला परिसर सील करण्यात आला आहे. बुधवारी रात्री १५० लोकांना तर गुरुवारी ८० अशा २३० लोकांना क्वारंटाईन करण्यात आले. यात प्रामुख्याने मृताच्या कुटुंबीयासह आजूबाजूला राहणाऱ्या नागरिकांचा समावेश आहे. मृताच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेतला जात आहे. तसेच मृताला कोरोना बाधा कशी झाली याचाही शोध मनपाच्या आरोग्य विभागातील अधिकारी घेत आहेत.

प्रभाग क्रमांक ३५ मध्ये हा भाग येत असून त्यात पार्वतीनगर, जोगीनगर, जयभीमनगर, धारीवाल ले-आऊट, रामेश्वरी, काशीनगर हा भाग येतो. येथील लोकांनी घराबाहेर पडणे बंद केले. अनेक लोकांनी घरे बंद करून शहरातील नातेवाईकांकडे जाणे पसंत केले. काहींनी बुधवारी रात्री बेला, बुटीबोरी, बोरखेडी, हिंगणा, उमरेड, पाचगाव, कुही, सिर्र्सी, गुमगाव, डोंगरगाव, कामठी, कन्हान, कोराडी, कळमेश्वर, टाकळघाट आदी गावात धाव घेतल्याची माहिती आहे.

झोपडपट्ट्याबाबत सतर्कतेची गरज

कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता प्रादुर्भाव होऊ नये यासाठी हॉटस्पॉट ठरलेल्या परिसरासह इतरही भागातील झोपडपट्ट्यांवर प्रशासनाकडून लक्ष केंद्रित करून सतर्कता बाळगण्याची गरज आहे. स्लम भागातील लोकांचा बाहेर वाढलेला वावर बघता या ठिकाणी सुरक्षेसाठी कठडे लावून परिसर बंद केले जात असून नागरिकांना बाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात येत आहे. शहरात ४२४ झोपडपट्ट्या असून यातील २९३ नोंदणीकृत तर १३१ अघोषित आहेत. त्यातील बहुतांश या मध्य, पूर्व व दक्षिण नागपुरात आहे. सतरंजीपुरा आणि मोमीनपुरा या हॉटस्पॉट ठरलेल्या परिसराला लागून मध्य व पूर्व नागपुरात ५८ झोपडपट्ट्या आहेत.

कोरोनाबाधितावर प्रथमच अग्निसंस्कार

उपराजधानीत मंगळवारी दगावलेल्या पार्वतीनगर येथील २२ वर्षीय कोरोनाग्रस्ताचा अंत्यविधी बुधवारी मोक्षधाम घाट येथे दहनविधीतून करण्यात आला. पूर्वी शहरातील सतरंजीपुरा आणि मोमीनपुरा परिसरातील प्रत्येकी एक अशा दोघांचा अंत्यविधी दफनविधीतून करण्यात आला होता. महापालिकेच्या आरोग्य विभागाने संसर्गाचा धोका सांगितल्यामुळे अंत्यविधीसाठी केवळ तीनच नातेवाईक मोक्षधाम घाटावर पोहचले, तर महापालिकेचेही निवडक अधिकारी खबरदारी म्हणून येथे उपस्थित होते. त्यानंतर येथे दाहसंस्कार झाले.

Also Read- परगावी जाणाऱ्या मजुरांना स्वतंत्र वैद्यकीय प्रमाणपत्राची आवश्यकता नाही

15 Migrants Run Over By Train In Maharashtra, Driver Tried To Stop

maharashtra train accident

Mumbai: Fifteen migrant workers in a group of 20 were killed after a cargo train ran over them while they were sleeping on the tracks in Maharashtra’s Aurangabad this morning, the railways said. The migrants were walking from Jalna to Bhusaval, 157 km apart. Four of the survivors, who are in shock, are being counselled by the police, senior police officer Mokshada Patil said. The fifth survivor has been admitted to hospital with injuries.
“We are counselling the survivors before we speak to them for more details,” Ms Patil said.

The police said the migrants, who were headed to Madhya Pradesh, likely assumed that trains were not running due to the coronavirus lockdown and slept off on the tracks. They were run over by the passing train at 5.15 am today at the district 360 km from Mumbai.

The tracks were strewn with footwear and other personal belongings. Even the rotis they were carrying for their journey were seen on the tracks.

There were reportedly no children in the group.

The Railway Ministry tweeted the driver tried to stop the train.

“During early hours today after seeing some labourers on track, loco pilot of goods train tried to stop the train but eventually hit them between Badnapur and Karmad stations in Parbhani-Manmad section. Injured have been taken to Aurangabad Civil Hospital. Inquiry has been ordered,” the Railway Ministry tweeted.

Prime Minister Narendra Modi tweeted “all possible assistance” is being provided. “Extremely anguished by the loss of lives due to the rail accident in Aurangabad, Maharashtra. Have spoken to Railway Minister Shri Piyush Goyal and he is closely monitoring the situation. All possible assistance required is being provided,” PM Modi tweeted.

Former Maharashtra Speaker Haribhau Bagde, who is also the MLA from Phulambri, visited the accident site.

Madhya Pradesh Chief Minister Shivraj Singh Chouhan gave his condolences and spoke with Railway Minister Piyush Goyal, seeking help for the families of the workers who died in the accident. Mr Chouhan also announced Rs 5 lakh compensation for their families.

Mr Chouhan is in touch with Maharashtra Chief Minister Uddhav Thackeray for arrangements related to treatment of the injured migrants, officials in Madhya Pradesh said.

Though several states have been running “Shramik” special trains for migrants who need to return home for emergency reasons, many have started walking back on their own.

In Uttar Pradesh, Chief Minister Yogi Adityanath has said no migrant worker should walk back home from big cities like Delhi.

Also Read- परगावी जाणाऱ्या मजुरांना स्वतंत्र वैद्यकीय प्रमाणपत्राची आवश्यकता नाही

परगावी जाणाऱ्या मजुरांना स्वतंत्र वैद्यकीय प्रमाणपत्राची आवश्यकता नाही

Migrant workers

नागपूर, ता. ७ : लॉकडाऊनमध्ये शहराशहरात अडकलेल्या परप्रांतीय मजूर आणि अन्य व्यक्तींना स्वगृही परतण्यासाठी शासनाने पाऊल उचलले आहे. प्रवासापूर्वी त्यांच्याकडे शासनाने प्राधिकृत केलेल्या वैद्यकीय अधिकाऱ्याचे प्रमाणपत्र असावे, अशी अट घातली होती. मात्र ही अट आता शासनाने एका नव्या आदेशातून रद्द केली आहे.

स्वगृही परतणाऱ्या मजूर आणि अन्य व्यक्तींना आता स्वतंत्र वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी खेटे मारावे लागणार नाही. प्रशासनाकडून आलेल्या यादीनुसार जे मजूर ज्यावेळी प्रवास करतील, त्या प्रवासापूर्वी त्यांचे डिजीटल थर्मामीटर आणि अन्य चाचण्यांच्या माध्यमातून स्क्रिनींग करण्यात येईल. शासकीय वैद्यकीय अधिकारी, महानगरपालिकेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांतर्फे ही तपासणी मोफत करण्यात येईल. तपासणीनंतर ज्या प्रवाशांमध्ये ताप अथवा कुठलाही आजार नाही अशा प्रवाशांची केवळ एक यादी देण्यात येईल. त्यामुळे स्वतंत्र वैद्यकीय प्रमाणपत्राची गरज नसल्यामुळे ही अटच रद्द करण्यात करण्यात येत असल्याचे आदेशात म्हटले आहे.

Also Read- लग्नाआधीच नवरीच्या आई-वडिलांचं निधन, नातेवाईक न आल्यानं पोलिसांनी केलं कन्यादान

लग्नाआधीच नवरीच्या आई-वडिलांचं निधन, नातेवाईक न आल्यानं पोलिसांनी केलं कन्यादान

wedding attend

नागपूर, 07 मे : कोरोनामुळे सगळीकडं लॉकडाऊन करण्यात आलं आहे. या काळात अनेकदा पोलिसांनी नागरिकांना वेगवेगळ्या पद्धतीनं केलेल्या मदतीचं सर्वच स्तरातून कौतुक झालं आहे. आता तर पोलीस एका मुलीचे बाप म्हणून उभा राहिले. नागपूर पोलिसांनी याचा एक फोटो शेअर केला आहे. पोलिसांनी मुलीच्या लग्नात तिच्या नातेवाईकांची भूमिका बजावली. लॉकडाऊन असल्यानं तिचे कुटुंबिय लग्नासाठी हजर राहु शकले नाहीत. तर लग्नाआधीच तिच्या आई वडिलांचं निधन झालं होतं. त्यामुळं आयुष्यातल्या या महत्वाच्या क्षणी तिच्या घरच्या लोकांची उणीव भासत होती.

ट्विटरवर नागपूर पोलिसांनी एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये पोलिस विभागाचे कर्मचारी आणि नवविवाहीत दाम्पत्य दिसत आहे. पोलिस त्यांना आशीर्वाद देत आहेत. नवरीच्या आई वडिलांचा मृत्यू झाला होता. तिच्या इतर नातेवाईकांना लग्नात उपस्थित राहता आलं नव्हतं.

नागपूर पोलिसांनी ट्विटरवर म्हटलं की, मुलीच्या आई वडिलांचं निधन झालं होतं. लॉकडाऊन असल्यानं तिच्या कोणत्याच नातेवाईकांना लग्नासाठी उपस्थित राहता आलं नव्हतं. नागपूर पोलिसांनी तिच्या नातेवाईकांची ही कमी भरून काढण्याचा प्रयत्न केला. जोडप्याला आशीर्वाद देण्यासाठी पोलीस उपस्थित होते.

पोलिसांच्या या कामगिरीचं कौतुक सोशल मीडियावर होत आहे. यासाठी अनेकांनी आभारही मानले आहे. पोलिसांकडून असं पहिल्यांदाच झालेलं नाही. याआधी पुण्यातही असाच प्रकार झाला आहे. तेव्हा एका पोलिस अधिकाऱ्याने आणि पत्नीने कन्यादान करत मुलीच्या आई वडिलांची भूमिका बजावली.

Also Read- 8 dead, over 1000 fall sick after gas leak at Andhra Pradesh chemical plant

8 dead, over 1000 fall sick after gas leak at Andhra Pradesh chemical plant

gas leaks at Andhra Pradesh

India 2020: At least eight people died and more than thousand people fell sick after inhaling poisonous gas leaked from a chemical factory in Andhra Pradesh’s Visakhapatnam district in the early hours of Thursday.

The incident happened at around 3 am at LG Polymers Ltd at Gopalapatnam, when people in the nearby colonies were fast asleep.

Many people, who rushed on to the streets unable to bear the pungent smell of the gas, collapsed on the roads. A large number of people, mostly children and old people, are learnt to have fainted within their homes, assistant commissioner of police Swaroopa Rani said.

“The police are unable to enter the colonies because of the foul smell. They went around the colonies asking the people to come out of their homes and move to safer places,” she said.

An ambulance driver who was rushed to move the sick to the hospitals was also suffocated and nauseous.

With the help of the police, hundreds of people had managed to move to safer places within hours. Those who fell sick were rushed to King George Hospital and some other private hospitals.

A National Disaster Response Force (NDRF) team was also pressed into service to evacuate people from the nearby colonies. Fire tenders from Hindustan Petroleum Corporation Ltd were trying to reduce the impact of the gas using water.

The gas has spread to 20 nearby colonies, causing suffocation to the people. Local legislator P Gana Babu said ambulances meant for coronavirus cases were diverted to move the people from around the place to safer places.

District collector Vinay Chand told reporters that about 200 people fell ill due to suffocation. Locals said many people remained in their houses and were not responding to calls. Officials advised people not to move towards Gopalapatnam till noon.

The LG polymers company was making arrangements for reopening the plant from Thursday (May 7), after more than 40 days of closure.

Andhra Pradesh’s minister for tourism M Srinivasa Rao and deputy superintendent of police Udaya Bhaskar visited the affected colonies.

Also Read- India’s identity imbibed with Lord Buddha’s teachings, beliefs, says PM Modi

Nagpur Weather

Nagpur
haze
36 ° C
36 °
36 °
11 %
2.6kmh
0 %
Sat
38 °
Sun
41 °
Mon
41 °
Tue
42 °
Wed
44 °

Stay connected

5,248FansLike
422FollowersFollow
500FollowersFollow
394FollowersFollow
2,380SubscribersSubscribe

Most Popular

Top 100 new year Wishes

Top 100 New Year Wishes 2023

0
Top 100 New Year Wishes 2023: If you are searching for some good wishes for the new year 2023 then you are on the...

Dhamma Chakra Pravartan Din : 15 Famous quotes by Dr. Babasaheb Ambedkar

0
Dhamma chakra Pravartan Din also known by the name of DhammaChakra Anupratan Din is a day to praise the Buddhist change of B. R....
Happy Diwali 2021

15+ Unique Happy Diwali wishes for 2022

0
Nowadays the only way through which connection is possible is the social networking site. The biggest festival in India is coming soon. Diwali is...
makar Sankranti

Top 100 best quotes, WhatsApp messages, wishes and greetings for Makar Sankranti 2024

0
Makar Sankranti Wishes : Makara Sankranti (Sankranthi) is a Hindu festival that encourages people to live in peace and harmony. Here are best quotes,...