राज्यातील कोरोनाग्रस्तांचा आकडा 19 हजारांच्या पुढे, आज नवीन 1089 रुग्णांची नोंद

Date:

मुंबई : महाराष्ट्रातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. आज राज्यात तब्बल 1089 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. यासोबतच राज्यातील आकडा 19063 वर पोहचला असून 731 जणांचा मृत्यू झाला आहे. अकोल्यात एकाचदिवसी तब्बल 42 नवीन रुग्ण सापडले आहेत. तर , औरंगाबादमध्ये 99 नवीन रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच, नंदुरबारमध्ये एका कोरोनाग्रस्त महिलेचा मृत्यू झाला.

काल राज्यात सलग दुसऱ्या दिवशी बाराशेवर नव्या रुग्णांची नोंद झाली. गुरुवारी १२१६ नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद झाली होती. गुरुवारी २०७ रुग्ण बरे झाले. राज्यात काेरोनामुक्तांचा आकडा ३३०१ वर गेला आहे. राज्यात २ लाख २१०५ चाचण्यांपैकी १ लाख ८३८८० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

राज्यात सलग दुसऱ्या दिवशी बाराशेवर नव्या रुग्णांची नोंद झाली. गुरुवारी १२१६ नव्या कोरोनाग्रस्तांची नोंद होऊन एकूण रुग्णसंख्या १७,९७४ वर गेली आहे. गुरुवारी ४३ जणांचा मृत्यू झाला. एकूण बळींचा आकडा ६९४ वर गेला आहे. गुरुवारी २०७ रुग्ण बरे झाले. राज्यात काेरोनामुक्तांचा आकडा ३३०१ वर गेला आहे. राज्यात २ लाख २१०५ चाचण्यांपैकी १ लाख ८३८८० जणांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.

लॉकडाऊनमुळे विविध देशांमध्ये अडकलेल्या भारतीयांचा मायदेशी प्रवास सुरू आहे. ‘वंदे मातरम मिशन’ अंतर्गत सुमारे 15 हजार भारतीयांना विशेष विमानांनी भारतात आणले जात आहे. मुंबईतील 1900 प्रवासी परतणार आहेत. या लोकांना क्वारंटाइन करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेने शहरातील 88 हॉटेलमध्ये 3343 खोल्यांची व्यवस्था केली आहे. 7 मेपासून देशातील 14 हजार 800 लोकांना 64 खास विमानांद्वारे जगातील विविध देशांमधून परत आणले जात आहे.

स्थलांतरित मजुरांना वैद्यकीय प्रमाणपत्र घ्यावे लागणार नाही

लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजुरांना त्यांच्या गावी जाण्यासाठी रेल्वे प्रवास करण्यापूर्वी सरकारने वैद्यकीय प्रमाणपत्र देण्याची अट मागे घेतली आहे. यासंदर्भात गुरुवारी नवीन मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आली. सरकारने स्पष्ट केले की, आता रेल्वेत चढण्यापूर्वी मजुरांची मोफत वैद्यकीय तपासणी केली जाईल. या तपासणीनंतर रेल्वेने जाणाऱ्या सर्व प्रवाश्यांसाठी समान वैद्यकीय प्रमाणपत्र बनविण्यात येणार आहे.

मंत्रालयातील आयएएस अधिकाऱ्यास कोरोनाची लागण

मंत्रालयात कार्यरत प्रधान सचिव दर्जाच्या एका ज्येष्ठ आयएएस अधिकाऱ्यास कोरोनाचा संसर्ग झाला आहे. मंत्रालयातील सहा अधिकारी काेरोनाग्रस्त आहेत.

राज्यात ४५७ पोलिस कोरोनाग्रस्त,

राज्यात एका आयपीएससह ४० अधिकारी व ४१७ कर्मचारी असे ४५७ पोलिस, बेस्टचे ४० कर्मचारी तसेच ६ कैद्यांना संसर्ग झाला आहे.

नागपुरात २५५ बाधित

मागील २४ तासांत नागपुरात किमान ६० जणांची भर पडून कोरोनाबाधितांचा एकूण आकडा २५५ वर पोहोचला आहे. बुधवारपासून अचानक रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ होत असल्याने स्थानिक प्रशासन हादरले असून संसर्ग पसरू नये यासाठी आता नवे परिसर सील केले जात आहे.

नागपुरात ६ ते ८ ठिकाणांवर कोरोनासाठीच्या आरटीपीसीआर चाचण्या पार पाडल्या जात आहेत. बुधवारी दिवसभरात पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या अचानक वाढली. सायंकाळपर्यंत आकडा ४४ पर्यंत गेला होता. बुधवारी रात्रीपर्यंत तो ६० वर पोहोचला. गुरुवारी दिवसभरात रुग्णांचा आकडा वाढून तो सायंकाळपर्यंत २५५ पर्यंत पोहोचला होता. यापैकी १८२ रुग्णांवर नागपुरातील मेडिकल कॉलेज हॉस्पिटल आणि इंदिरा गांधी वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये उपचार सुरू आहेत. सर्वाधिक संख्येने सतरंजीपुरा आणि मोमीनपुरा या वस्त्यांमधून रुग्ण येत आहेत. त्यामुळे हे दोन्ही परिसर मागील अनेक दिवसांपासून सील करण्यात आले आहेत.

पुण्यात १२४ नवीन कोरोना रुग्ण, सात जणांचा मृत्यू; ८४ जण बरे होऊन घरी गेले, विभागात ७५० बरे

पुणे शहरात कोरोनामुळे मृत्युमुखी पडणाऱ्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, सलग दुसऱ्या दिवशीही आणखी ७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. धक्कादायक बाब म्हणजे हे सातही मृत्यू अवघ्या बारा तासांत झाले आहे. त्यामुळे मृत्यूचे तांडव कधी थांबणार, असा प्रश्न नागरिकांना पडू लागला आहे. दरम्यान, शहरासह जिल्ह्यात मृतांची संख्या १३३ वर जाऊन पोहोचली आहे. गुरुवारी एका दिवसात १२४ नवीन कोरोना रुग्ण वाढले असून ८४ कोरोनाबाधित बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे.

विभागातील ७५० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले असून विभागात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २ हजार ७३४ झाली आहे, तर ॲक्टिव्ह रुग्ण १ हजार ८४२ आहेत. विभागातील पाच जिल्ह्यांंत एकूण १४२ कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तसेच ९४ रुग्ण गंभीर असून उर्वरित निरीक्षणाखाली आहेत, अशी माहिती पुण्याचे विभागीय आयुक्त डॉ. दीपक म्हैसेकर यांनी दिली.

धुळ्यात आणखी १ डाॅक्टर पाॅझिटिव्ह

धुळे | हिरे वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील काेरोनाबाधित डॉक्टरचा अहवाल येऊन २४ तास उलटत नाही तोच पुन्हा एक डॉक्टर पॉझिटिव्ह आला. एकीकडे हिरे रुग्णालयात कोरोनावर मात करून घरी परतणाऱ्यांची संख्या वाढत असताना पुन्हा नव्याने बाधित होणाऱ्यांची संख्या वाढते आहे. हा डॉक्टर देवपुरातील मोहंमदी नगरातील रहिवासी असून ५० वषीय आहे. दिवसभरात हिरे रुग्णालयात सुमारे २९० जणांची प्राथमिक तपासणी झाली. यापैकी ४१ जणांना दाखल केले.

सोलापुरात १७६ रुग्ण

सोलापूर जिल्ह्यात १७६ कोरोनाबाधित रुग्ण असून २४ बाधित रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. ॲक्टिव्ह रुग्णसंख्या १४२ आहे. एकूण दहा कोरोनाबाधित रुग्णांचा अातापर्यंत मृत्यू झाला आहे.

मनमाडला अडकलेले १०६ भाविक पंजाबकडे रवाना

येथील प्रसिद्ध गुरुद्वारात लॉकडाऊनमुळे ४२ दिवसांपासून अडकून पडलेल्या १०६ शीखधर्मीय भाविक यात्रेकरूंना चार विशेष बसेसद्वारे गुरुवारी रवाना करण्यात आले. तत्पूर्वी या बांधवांची नियमाप्रमाणे आरोग्य तपासणी करण्यात आली व प्रमाणपत्र देण्यात आले.

‘जो बोले सो निहाल, सत श्री अकाल’ आणि ‘सतनाम वाहेगुरु ‘चा गजर करीत भाविक यात्रेकरूंनी मनमाड गुरुद्वारा प्रति आभार व्यक्त केले. गुरुवारी सकाळी अकरा वाजता मनमाड गुरुद्वारातून या यात्रेकरूंच्या चार बसेस मनमाड येथून पंजाब राज्यात मार्गस्थ झाल्या. या वेळी मनमाड गुरुद्वारा प्रबंधक बाबा रणजित सिंग, मनमाडचे पोलिस उपअधीक्षक समीरसिंह साळवे, पालिकेचे मुख्याधिकारी डॉ दिलीप मेनकर, योगेश पाटील, धनंजय कमोदकर, चंद्रकांत परब, गुरुजित कांत, गुरुदीप सिंह कांत, संजय कटारिया, सुधीर पाटील, उपजिल्हा रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. जी. एस. नरवणे उपस्थित होते. केंद्र आणि राज्य सरकार,पंजाब आणि महाराष्ट्र सरकार यांच्यात समन्वय साधून याबाबत कागदपत्रांची पूर्तता करण्यात आली. पालकमंत्री छगन भुजबळ यांनी बसेस उपलब्ध करून परवानगीसाठी सहकार्य केले. या चारही विशेष बसेसचे निर्जंतुकीकरण करण्यात आले. मध्यप्रदेश, राजस्थान मार्गे हे भाविक यात्रेकरू पंजाब राज्यातील लुधियाना येथे पोहोचतील.

सातारा जिल्ह्यात रुग्णसंख्या ११३ वर

सातारा । सातारा जिल्ह्यात गुरुवारी सकाळीच कोरोनाचे तीन बाधित रुग्ण सापडल्यानंतर दुपारीच कोरोनाचे नवीन १७ रुग्ण सापडल्याने जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. कोरोना बाधितांच्या निकट सहवासित आलेल्यांना अनुमानित म्हणून दाखल केले होते. त्यापैकी सहाजणांचा तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आला आहे, तर कराड येथील कृष्णा वैद्यकीय महाविद्यालय व उपजिल्हा रुग्णालयात बाधितांच्या निकट सहवासित आलेल्यांना अनुमानित म्हणून दाखल केले होते. त्यापैकी १२ जणांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले असल्याची माहिती जिल्हा प्रशासनाच्यावतीने देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोना बाधितांची एकूण संख्या ११३ वर गेल्याने सातारा जिल्ह्याने दुर्दैवाने कोरोना बाधितांची शंभरी पार केली आहे. यामुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.

सिंधुदुर्ग जिल्ह्यात आणखी एक बाधित, रुग्णसंख्या झाली चार

रायगड | सिंधुदुर्ग जिल्ह्यात गुरुवारी आणखी एक कोरोनाबाधित रुग्ण आढळून आला आहे. २७ वर्षांच्या या रुग्णाने मुंबई येथून आला आहे. कुडाळ तालुक्यातील जांभवडे गावातील हा रुग्ण २८ एप्रिलला मुंबईतील परळ येथून जिल्ह्यात दाखल झाला होता. त्यानंतर त्याला कुडाळ येथील संस्थात्मक विलगीकरणात ठेवण्यात आले होते. बाधित क्षेत्रातून आला असल्याने ५ मे रोजी त्याचा स्वॅब तपासणीसाठी पाठवला होता. त्याचा अहवाल आज आला असून त्याला कोरोनाची लागण झाली असल्याचे समोर आले आहे.

Also Read- पोलिसांनो, कठोर व्हा अन्‌ नागरिकांनो, सहकार्य करा!

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

AWS in 2025: Big updates, innovation and what they mean to you

Amazon Web Services (AWS) continues to redefine the Cloud...

Shop Any Item Under Rs99 !! Biggest Selling Products in India

In today’s fast-paced world, convenience is key—and that’s exactly...

AI in Digital Marketing – The Ultimate Guide

Introduction: In today's rapidly developed digital world, Artificial Intelligence...

Globallogic Inaugurates a Stem Innovation Lab in Nagpur to Advance Regional Talent

Equipping over 400 students with future-ready skills through hands-on...