लग्नाआधीच नवरीच्या आई-वडिलांचं निधन, नातेवाईक न आल्यानं पोलिसांनी केलं कन्यादान

लॉकडाऊनच्या काळात पार पडलेल्या लग्नात मुलीच्या घरचे कोणीच येऊ शकले नाहीत तेव्हा तिचे नातेवाईक म्हणून पोलीसच उभा राहिले.

wedding attend

नागपूर, 07 मे : कोरोनामुळे सगळीकडं लॉकडाऊन करण्यात आलं आहे. या काळात अनेकदा पोलिसांनी नागरिकांना वेगवेगळ्या पद्धतीनं केलेल्या मदतीचं सर्वच स्तरातून कौतुक झालं आहे. आता तर पोलीस एका मुलीचे बाप म्हणून उभा राहिले. नागपूर पोलिसांनी याचा एक फोटो शेअर केला आहे. पोलिसांनी मुलीच्या लग्नात तिच्या नातेवाईकांची भूमिका बजावली. लॉकडाऊन असल्यानं तिचे कुटुंबिय लग्नासाठी हजर राहु शकले नाहीत. तर लग्नाआधीच तिच्या आई वडिलांचं निधन झालं होतं. त्यामुळं आयुष्यातल्या या महत्वाच्या क्षणी तिच्या घरच्या लोकांची उणीव भासत होती.

ट्विटरवर नागपूर पोलिसांनी एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये पोलिस विभागाचे कर्मचारी आणि नवविवाहीत दाम्पत्य दिसत आहे. पोलिस त्यांना आशीर्वाद देत आहेत. नवरीच्या आई वडिलांचा मृत्यू झाला होता. तिच्या इतर नातेवाईकांना लग्नात उपस्थित राहता आलं नव्हतं.

नागपूर पोलिसांनी ट्विटरवर म्हटलं की, मुलीच्या आई वडिलांचं निधन झालं होतं. लॉकडाऊन असल्यानं तिच्या कोणत्याच नातेवाईकांना लग्नासाठी उपस्थित राहता आलं नव्हतं. नागपूर पोलिसांनी तिच्या नातेवाईकांची ही कमी भरून काढण्याचा प्रयत्न केला. जोडप्याला आशीर्वाद देण्यासाठी पोलीस उपस्थित होते.

पोलिसांच्या या कामगिरीचं कौतुक सोशल मीडियावर होत आहे. यासाठी अनेकांनी आभारही मानले आहे. पोलिसांकडून असं पहिल्यांदाच झालेलं नाही. याआधी पुण्यातही असाच प्रकार झाला आहे. तेव्हा एका पोलिस अधिकाऱ्याने आणि पत्नीने कन्यादान करत मुलीच्या आई वडिलांची भूमिका बजावली.

Also Read- 8 dead, over 1000 fall sick after gas leak at Andhra Pradesh chemical plant