उपमहापौर, स्थायी समिती अध्यक्ष व आरोग्य समिती अध्यक्ष यांनी केला कोविड केअर सेंटरचा पाहणी दौरा

नागपूर महापालिकेतर्फे ५००० खाटांचा कोविड केअर सेंटर तयार करण्यात आला आहे. सदर केन्द्रात सध्या ५०० खाटा ठेवण्यात आले असून आवश्यकते अनुसार त्याचात वाढ केली जाईल.

covid care centre

नागपूर, ता. १३ : कळमेश्वर रोड पर येरला येथे तयार करण्यात आलेले “कोविड केअर सेंटर” ची पाहणी बुधवारी उपमहापौर मनीषा कोठे, स्थायी समिती अध्यक्ष श्री. विजय (पिंटु) झलके आणि आरोग्य समिती सभापती श्री.विरेन्द्र कुकरेजा यांनी केली. येथे नागपूर महापालिकेतर्फे ५००० खाटांचा कोविड केअर सेंटर तयार करण्यात आला आहे. सदर केन्द्रात सध्या ५०० खाटा ठेवण्यात आले असून आवश्यकते अनुसार त्याचात वाढ केली जाईल.

उपमहापौर श्रीमती कोठे यांनी व्यवस्थेवर समाधान व्यक्त करतांना सल्ला दिला की मानसूनचा काळात कोविड केअर सेंटर मध्ये राहणा-या नागरिकांची चांगली काळजी करावी. त्यांचासाठी शौचालयापर्यंत जायला व्यवस्था करुन दयावी. स्थायी समिती अध्यक्ष श्री. विजय (पिंटु) झलके यांनी तिथे राहणारे संशयित रुग्णांसाठी सुरक्षाची काळजी घेण्याचे व केन्द्र- राज्य शासनाव्दारे निर्गमीत मार्गदर्शक तत्वांचे पालन करण्याचे निर्दश दिले. आरोग्य समिती सभापती श्री. विरेन्द्र कुकरेजा यांनी उपचारासाठी नियुक्त करण्यात येणारे वैद्यकीय चमूसाठी वेगळी व्यवस्था करण्याचे निर्देश दिले. त्यांनी या कर्मचा-यांच्या वेळोवेळी तपासणी करण्याचा सल्ला दिला.

यावेळी आरोग्य अधिकारी डॉ. योगेन्द्र सवई, इन्सीडेन्ट कमांडर व अधिक्षक अभियंता श्वेता बॅनर्जी, कार्यकारी अभियंता मनोज गणवीर व राजेश दुफारे आदी उपस्थित होते.

Also Read- नागपुरात लॉकडाऊनमध्ये १४ मे पासून काही अंशी शिथिलता