करोनावरील लसनिर्मितीचा शोध अंतिम टप्प्यात: WHO

Coronavirus nagpur: पाच प्रकारच्या नवीन स्ट्रेनमुळे नागपुरात करोनाचा उद्रेक

वॉशिंग्टन: करोनाच्या वाढत्या संसर्गामुळे जगभरातील अनेक देश हतबल झाले असताना दुसरीकडे वैज्ञानिकांचे लस शोधण्याचे प्रयत्न सुरू आहेत. करोनाला मात देणाऱ्या लस निर्मितीमध्ये सात ते आठ कंपन्यांचे वैज्ञानिक अंतिम टप्प्यानजिक आले असल्याची माहिती जागतिक आरोग्य संघटनेने दिली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेचे महासंचालक टेड्रोस घेब्रेयसस यांनी सांगितले की, करोनाची लस तयार करण्यासाठी किमान १२ ते १८ महिन्यांचा कालावधी लागण्याची शक्यता आहे. मात्र, ही लस लवकर तयार व्हावी यासाठीदेखील प्रयत्न सुरू आहेत. सात ते आठ कंपन्यांची टीम लस तयार करण्याच्या अंतिम टप्प्यात आली आहे. त्याशिवाय जवळपास १०० हून अधिक संस्था लस तयार करण्यासाठी झटत आहेत. त्याशिवाय जागतिक आरोग्य संघटना जगभरातील ४०० वैज्ञानिकांच्या संपर्कात असल्याची माहिती त्यांनी दिली. लस विकसित करण्यासाठी निधीची मोठ्या प्रमाणावर आवश्यकता असल्याचे त्यांनी सांगितले. मागील एक आठवड्यांपूर्वी ४० देश, विविध संस्था-संघटना, बँकांनी करोनावर उपचार, परीक्षणांसाठी जवळपास ७.४ अब्ज युरोचा निधी आरोग्य संघटनेला मिळाला आहे. लवकर लस विकसित करण्यासाठी आणि त्याचे उत्पादन करून जगभरात वितरण करण्यासाठी अधिक निधीची आवश्यकता भासणार असल्याचे त्यांनी सांगितले.

दरम्यान, याआधी इस्राएल आणि इटलीने करोनाला मात देणारी लस विकसित केली असल्याचा दावा केला होता. मानवावर त्या लसीची चाचणी घेतली जाणार आहे. तर, ब्रिटनमध्येही ऑक्सफोर्ड विद्यापीठाने तयार केलेल्या लसीची क्लिनिकल चाचणी सुरू असून त्याचे परिणाम पुढील महिन्यात येणार असल्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.