Actor Sanjay Dutt has been detected with stage 3 lung cancer and a close friend of the actor has …
Actor Sanjay Dutt has been detected with stage 3 lung cancer and a close friend of the actor has revealed to Bollywood Hungama that, “Baba is devastated by the news”Last week, the Mission Kashmir actor was admitted to Lilavati Hospital after he reportedly complained of breathlessness. The doctors thought this might be because of COVID-19 so he underwent a Coronavirus test but the results came out negative. After being in the hospital for two days, he got discharged on Monday.
Yesterday, the 61-year old revealed that he is taking a short break from work and urged his fans not to worry or unnecessarily speculate. Soon after the message of the actor’s cancer diagnosis went viral celebs took to social media to wish Baba a speedy recovery. From Neha Dhupia to Raveena Tandon everyone offered Sanjay Dutt encouragement during his tough phase. Let us have a look at some of the Twitter reactions.
You are, have and always will be a fighter @duttsanjay. I know the pain it causes but I also know you are strong and will see this tough phase through. My prayers and best wishes for your speedy recovery.
Prime Minister Narendra Modi will launch the platform for “Transparent Taxation – Honoring the Honest” via video conferencing on August 13, 2020.
Prime Minister Narendra Modi will launch the platform for “Transparent Taxation – Honoring the Honest” via video conferencing on August 13, 2020.
The Central Board of Direct Taxes (CBDT) has carried out several major tax reforms in direct taxes in recent years. Last year, the Corporate Tax rates were reduced from 30 per cent to 22 per cent and for new manufacturing units, the rates were reduced to 15 per cent. Dividend distribution tax was also abolished.
The focus of the tax reforms has been on reduction in tax rates and on simplification of direct tax laws.
Several initiatives have been taken by the CBDT for bringing in efficiency and transparency in the functioning of the IT Department. This includes bringing more transparency in official communication through the newly introduced Document Identification Number (DIN) wherein every communication of the Department would carry a computer generated unique document identification number.
Similarly, to increase the ease of compliance for taxpayers, IT Department has moved forward with pre-filing of income tax returns to make compliance more convenient for individual taxpayers. Compliance norms for startups have also been simplified.
With a view to provide for resolution of pending tax disputes the IT Department also brought out the Direct Tax “Vivad se Vishwas Act, 2020” under which declarations for settling disputes are being filed currently. To effectively reduce taxpayer grievances / litigation, the monetary thresholds for filing of departmental appeals in various appellate Courts have been raised.
Several measures have been taken to promote digital transactions and electronic modes of payment. The IT department is committed to take the initiatives forward and has also made efforts to ease compliances for taxpayers during the Covid times by extending statutory timeliness for filing returns as also releasing refunds expeditiously to increase liquidity in the hands of taxpayers.
The upcoming launch of the platform for ” Transparent Taxation – Honoring the Honest ” by the Prime Minister will further carry forward the journey of direct tax reforms.
The event will be witnessed by various Chambers of Commerce, Trade Associations, Chartered Accountants’ associations and also eminent taxpayers, apart from the officers and officials of Income Tax Department. Union Minister of Finance and Corporate Affairs Nirmala Sitharaman and Minister of State for Finance and Corporate Affairs Anurag Singh Thakur will also present on the occasion.
Gold and silver prices on Wednesday fell sharply for the second straight day. On MCX, October gold futures fell as much as 3% or ₹1,500 to ₹50,441 per 10 gram. Silver futures on MCX fell over 5% or ₹5,000 per kg to ₹61972.
Last week, gold prices in India had jumped over ₹56,000 while silver had almost touched ₹78,000.The fall was in line with the international spot prices where gold prices fell as US bond yields advanced and the dollar recovered.
Analysts, however, predict that the yellow metal would soon be back on the upward trend.
According to the analysts the fall in gold prices has been caused due to Russia’s announcement that it has developed the first vaccine for novel coronavirus.
The sharp spike in prices and job losses across sectors had wiped out gold demand in India. Nidhi Saxena, 31, a software engineer who works in a technology firm based in Mumbai, India, was planning to buy gold bangles in July, but changed her mind as gold prices spiked and colleagues were laid off.“I can’t even think of buying gold right now when I am not even sure if my job is safe,” she said.
नागपूर : वडिलोपार्जित मालमत्तेच्या वादात सोमवारी रात्री सख्ख्या मोठ्या भावाला चाकूने भोसकून ठार मारणाऱ्या आरोपीला त्याच्या तीन साथीदारांसह पोलिसांनी मंगळवारी पहाटे मोर्शीत (जि. अमरावती) अटक केली. या मानकापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील जय हिंद नगरात सोमवारी रात्री ही थरारक घटना घडली होती. अमीन अली सय्यद अली (वय ४१) असे मृताचे नाव आहे.
अमीनचे मानकापुरात वडिलोपार्जित दुमजली घर आहे. एक भाऊ खाली तर दुसरा वरच्या माळ्यावर राहतो. तेथे दोन दुकाने भाड्याने दिलेली आहे. दोन्ही दुकानाचे भाडे अमीन स्वतःच घेत होता. त्याचा लहान भाऊ आरोपी सय्यद आसिफ सय्यद अली एका दुकानाचे भाडे मिळावे म्हणून अमिनसोबत भांडायचा. यावरून गेल्या अनेक दिवसांपासून त्यांच्यात वाद सुरू होता. सोमवारी रात्री ९.३० च्या सुमारास या वादाला पुन्हा तोंड फुटले. दुकानाचे भाडे आणि मालमत्तेची हिस्सेवाटनी करायला अमीन तयार नसल्यामुळे त्यांच्यात हाणामारी झाली. आधीच तयारीत असलेला आरोपी आसिफ, त्याचा मेव्हणा जावेद खान हबीब खान आणि त्याचे मित्र तमीज खान हफिज खान तसेच सादिक खान हबीब खान यांनी अमीनवर चाकूने हल्ला केला. त्यामुळे तो गंभीर जखमी झाला. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे रात्री उशिरा त्याला मृत घोषित करण्यात आले. दरम्यान, या घटनेची माहिती मिळाल्यानंतर मानकापूरचे ठाणेदार गणेश ठाकरे आणि त्यांचा ताफा, गुन्हे शाखेचे वरीष्ठ निरीक्षक भानुदास पिदूरकर तसेच परिमंडळ दोनच्या पोलिस उपायुक्त विनिता शाहू आपल्या ताफ्यासह घटनास्थळी पोहोचले. तेथील सीसीटीव्ही फुटेज आणि आरोपींचे मोबाईल नंबर मिळवून पोलिसांनी मोर्शी येथे धाव घेतली. तिथे सासरवाडीत लपून बसलेला मुख्य आरोपी आसिफ, त्याचा मेव्हणा जावेद आणि जावेदचे मित्र तमीज तसेच सादिक या चौघांना पोलिसांनी अटक केली.
१५ दिवसांपासून होता तयारीत आरोपी आसिफ हा अमीनची हत्या करण्यासाठी खूप दिवसांपासून तयारीत होता. १५ दिवसांपूर्वी असाच वाद झाल्यामुळे अमीन याने आरोपी आसिफला ठोसा लगावला होता. आसिफच्या तक्रारीवरून त्यावेळी मानकापूर पोलिसांनी कलम ३२५ अन्वये गुन्हाही दाखल केला होता. तेव्हापासून आसिफ अमिनचा काटा काढण्याच्या तयारीत होता. सोमवारी त्याने मेव्हणा आणि त्याच्या दोन मित्रांना नागपुरात बोलवून घेतले. आणि अमिनची हत्या केली.
गुन्ह्यात वापरलेली कार जप्त पोलिसांनी या प्रकरणी आलिया अली अमीन अली हिच्या तक्रारीवरून खुनाचा गुन्हा दाखल करून आरोपींना अटक केली. त्यांनी या गुन्ह्यात वापरलेली सँट्रो कारही जप्त केली. पोलीस उपायुक्त विनिता शाहू, गुन्हे शाखेचे उपायुक्त गजानन शिवलिंग राजमाने, सहायक आयुक्त विलास सोनवणे, यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ निरीक्षक गणेश ठाकरे, भानुदास पिदुरकर, उपनिरीक्षक कृष्णा शिंदे, युवराज सहारे, कैलास मगर, प्रसाद रणदिवे, अमित मिश्रा, लक्ष्मी तांबूसकर, हवालदार रवींद्र भुजाडे, रामेश्वर गीते, संतोष मदनकर, अरविंद झिलपे, नायक अंकुश राठोड, राजेश्वर वरठी, अजय पाटील, रवी शाहू, रोशन वाडीभस्मे, हितेश कुंडे, शेषराव राऊत, योगेश गुप्ता आणि महिला शिपाई कविता दुर्गे यांनी ही कामगिरी बजावली.
नागपूर : ‘कोरोना’मुळे उद्भवलेल्या संसर्गजन्य परिस्थितीचा विचार करता या वर्षी गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करण्यात यावा, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे. शहरी भाग वगळता नागपूर जिल्ह्यासाठी मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. सार्वजनिक गणेश मंडळांनी मर्यादित स्वरूपाचे मंडप उभारावे तसेच सजावटदेखील जास्त आकर्षक ठेवू नये, असे त्यात नमूद करण्यात आले आहे.
सार्वजनिक मंडळासाठी ४ फूट तर घरगुती गणपती २ फुटाच्या मर्यादेतील असावे. नागरिकांनी पारंपरिक गणेशमूर्तीऐवजी घरातील धातू, संगमरवर आदी मूर्तीचे पूजन करावे. मूर्ती शाडूची पर्यावरणपूरक असल्यास त्याचे विसर्जन शक्यतो घरच्या घरीच करावे.
गणेशोत्सवाकरिता वर्गणी, देणगी स्वेच्छेने दिल्यास त्यांचा स्वीकार करावा. जाहिरातीच्या प्रदर्शनामुळे गर्दी आकर्षित होणार नाही याकडे लक्ष देण्यात यावे, असेदेखील जिल्हाधिकारी रवींद्र ठाकरे यांनी स्पष्ट केले आहे. गणेश दर्शनाची सुविधा आॅनलाईन, केबल नेटवर्क, वेबसाईट व फेसबुक इत्यादीद्वारे उपलब्ध करून देण्याबाबत जास्तीत जास्त व्यवस्था करण्यात यावी, असेदेखील सार्वजनिक मंडळांना आवाहन करण्यात आले आहे.
नागपूर : महापालिकेची आर्थिक स्थिती बिकट आहे. अर्थसंकल्पाच्या निम्माच म्हणजे १५०० कोटींचा महसूल वित्त वर्षात जमा होण्याची शक्यता मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी वर्तविली आहे. याचा फटका शहरातील विकास कामांना बसला आहे. पाणीपुरवठा योजनेचे सक्षमीकरण शहरातील रस्ते विकास, मलनिस्सारण योजना, पथदिवे, परिवहन, प्रस्तावित सीबीएससी शाळांचा प्रकल्प यासह अन्य प्रकल्पांचा यात समावेश आहे.
केंद्र सरकारच्या जेएनएनयूआरएम योजनेत मनपाला ४५.३५ कोटी तर अमृत योजनेत ५५ कोटींचा वाटा उचलायचा आहे. सार्वजनिक विद्युत वितरण व्यवस्था सक्षम करण्यासाठी १४५ कोटींची गरज आहे. शहरातील पाणीपुरवठा योजनेचे सक्षमीकरण करण्यासाठी २२७ कोटींची अर्थसंकल्पात तरतूद प्रस्तावित आहे. मलनिस्सारण केंद्रासाठी १७९ तर बायो मायनिंगसाठी ४० कोटींचा खर्च करावयाचा आहे. हा खर्च अत्यावश्यकच आहे. परंतु महापालिकेची आर्थिक परिस्थिती विचारात घेता आवश्यक निधी उपलब्ध होण्याची शक्यता दिसत नाही.
शहरातील परिवहन यंत्रणा चालविण्यासाठी ११८ कोटी, वॉर्डातील विकास कामांसाठी १० कोटी, सार्वजनिक आरोग्य ३०.८२ कोटी, माहिती व तंत्रज्ञान २५.४२ कोटींची तरतूद केली आहे. तसेच मागासवर्गीय कल्याणासाठी ५६.१३, महिला बालविकास ५६.१३ कोटी, दिव्यांगांसाठी ५६.१३ तर क्रीडा विकासासाठी ४४.९० कोटींची तरतूद केली आहे. मनपाच्या तिजोरीत जमा होणारा महसूल व आस्थापना खर्च वजा केल्यास फार तर दोनशे ते तीनशे कोटी वाचतात. यातून कंत्राटदारांची देणी, कर्मचाऱ्यांची जुनी देणी जवळपास ६०० कोटींच्या आसपास आहेत. अशा परिस्थितीत विकासासाठी निधी उपलब्ध होण्याची शक्यता नाही. राज्य सरकारकडूनही आर्थिक अनुदान मिळण्याची फारशी अपेक्षा नसल्याने मनपाच्या अडचणी वाढल्या आहेत.
सीबीएसई शाळांसाठी हवे १०८ कोटी
पुढील शैक्षणिक सत्रात महानगरपालिकेच्या सहा शाळा या इंग्रजी माध्यमात सुरू करण्याचा प्रस्ताव आहे. या शाळा सीबीएसईनुसार चालवण्याचा संकल्प आहे. यासाठी महापालिकेच्या अर्थसंकल्पात १०८.०६ कोटींची तरतूद केली आहे. मात्र आर्थिक परिस्थिती विचारात घेता निधी उपलब्ध होण्याची शक्यता दिसत नाही.
विद्युत व्यवस्थेसाठी १४५ कोटी लागणार
शहरातील पथदिव्यांची यंत्रणा अत्याधुनिक करण्याचे प्रस्तावित आहे. शहरातील सर्व स्ट्रीटलाईट स्मार्ट लाईटमध्ये रूपांतरित करण्यात येणार आहे. यासाठी १४५ कोटींची तरतूद केली आहे. परंतु निधीअभावी हा प्रकल्प लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.
रस्त्यांच्या सुधारण्यासाठी १५९ कोटींची गरज
एकात्मिक रस्ते विकास प्रकल्पांतर्गत शहरातील सिमेंट रस्त्यातील मनपाचा वाटा १२५ कोटी, रस्त्यांची कामे व दुरुस्ती करण्यासाठी २५ कोटी लागणार आहेत. यासाठी तरतूद केली आहे. परंतु निधी उपलब्ध न झाल्याने कामे थांबली आहेत.
मागास घटकांनाही फटका
अर्थसंकल्पात आर्थिकदृष्ट्या मागास घटकांच्या विकासासाठी यासाठी २१६.९९ कोटींची तरतूद करण्यात आली आहे. हा निधी मागासवर्गीयांवर खर्च करावयाचा आहे. परंतु परिस्थितीमुळे निधी उपलब्ध होताना दिसत नाही.
नागपूर : एसटी महामंडळाच्यावतीने समाजातील विविध घटकांना सवलती देण्यात येतात. या सवलतीचे २४१.९६ कोटी रुपये महाराष्ट्र शासनाकडे थकीत आहेत. कोरोनामुळे एसटी बसेसची चाके थांबली आहेत. कर्मचाऱ्यांवर आर्थिक संकट आले आहे. त्यामुळे महाराष्ट्र शासनाने विविध सवलतींची थकीत असलेली रक्कम त्वरित एसटी महामंडळाला देण्याची मागणी एसटी कर्मचारी आणि संघटनांच्यावतीने करण्यात येत आहे.
शासनाने परराज्यातील कामगारांना त्यांच्या राज्याच्या सीमेवर पोहोचविण्यासाठी एसटी बसने मोफत प्रवास करण्याची मुभा दिली होती. या प्रवासाचा खर्च महाराष्ट्र शासन देणार होते. परंतु त्यांच्या प्रवासाचे ९४.९६ कोटी रुपये मदत व पुनर्वसन खात्याने अद्यापही दिलेले नाहीत. याशिवाय पोलीस वॉरंट, कारागृह वॉरंट, निवडणुकीसाठी वापरण्यात आलेल्या बसच्या भाड्याचे १४७ कोटी रुपये शासनाकडे थकीत आहेत. ही रक्कम त्वरित महामंडळाला देऊन महामंडळावर आलेले आर्थिक संकट दूर करावे, अशी मागणी महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस(इंटक)चे राज्य प्रसिद्धीप्रमुख सुभाष गोजे यांनी केली.
संकट दूर करावे
‘शासनाने विविध सवलतीच्या रकमेतून ५५० कोटी रुपये एसटी महामंडळाला दिलेले आहेत. परंतु मदत व पुनर्वसन खात्याकडून ९४.९६ कोटी, तर गृह विभागाकडून १४७ कोटी रुपये येणे आहे. ही रक्कम तात्काळ एसटी महामंडळास देऊन एसटीवर आलेले आर्थिक संकट दूर करावे.’
-मुकेश तिगोटे, सरचिटणीस महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक), मुंबई
नागपूर : अवघ्या महाराष्ट्राचे आराध्य दैवत असलेल्या बाप्पा मोरयाचा उत्सव आता काहीच दिवसावर येऊन ठेपला आहे. मात्र, अजूनही विक्रेत्यांमधील मूर्ती विक्रीबाबतचा संभ्रम संपलेला नाही. असे असताना मनपाच्या झोन कार्यालयातून विक्रेत्यांची दिशाभूल केली जात आहे. विक्रीची परवानगी मागण्यासाठी येणाऱ्या विक्रेत्यांच्या हातात दंडाची पावती ठेवली जात आहे.
कोरोना संसर्ग आणि टाळेबंदीमुळे इतर क्षेत्राप्रमाणेच मूर्तिकार संकटात आहेत. त्याच पार्श्वभूमीवर यंदा मनपा आयुक्तांकडून श्रीगणेशोत्सव शांततेत पार पाडण्याचे आवाहन केले जात आहे. २२ ऑगस्टपासून श्रीगणेशोत्सव सुरू होत आहे तरीदेखील मूर्तिकारांवरील संकट संपण्याची चिन्हे दिसत नाहीत. त्यातच विक्रेत्यांनाही प्रशासकीय बाबूगिरीचा सामना करावा लागत आहे. विक्रेते मनपाच्या झोन कार्यालयात विक्रीची किंवा स्टॉल लावण्याची परवानगी घेण्यास जात आहेत. मात्र, काही झोन कार्यालयात थेट परवानगी नाकारली जात आहे.
दंड म्हणजेच परवानगी
सोमवारपासून सक्करदरा बाजारात मूर्ती विक्रीची दुकाने लावणार असल्याने, त्याच्या परवानगीसाठी आणि माती व पीओपी मूर्तींची नोंदणी करण्यासाठी नेहरूनगर झोनमध्ये शनिवारी गेलो होतो. त्याअनुषंगाने तेथे हजार रुपये शुल्काची पावती फाडली. पावती बघितल्यावर लक्षात आले की पावती दंडाची आहे. विचारणा केल्यावर त्यांनी दंडाची पावती म्हणजेच परवानगी असल्याचे सांगितले. मात्र, दुकान लावण्याआधीच दंड कसला, याबाबत त्यांच्याकडून स्पष्टीकरण मिळाले नाही. परवानगी हवी असेल तर सिव्हिल लाईन्सला जा, असे सांगण्यात आल्याचे मूर्ती विक्रेते बबलू कापट यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
विक्रीची परवानगीे, ऑड-इव्हन पाळा
मूर्ती विक्रीची परवानगी कधीच नाकारलेली नाही, ती सुरूच आहे. काही विक्रेत्यांना त्यांनी नियम न पाळल्यामुळे दंड केल्यानंतर ते स्वत: झोन कार्यालयात गेले आणि आता तरी परवानगी द्या, अशी विनवणी करत होते. विक्रीची परवानगी प्रत्येक झोन कार्यालयातून घेता येईल. विक्री करताना प्रत्येक विक्रेत्याला ऑड-इव्हनचा नियम पाळावाच लागणार आहे.
-राम जोशी, अतिरिक्त आयुक्त, मनपा
मुंबई – कोरोनासोबत राज्यातील नागरिकांवर आणखी एक संकट कोसळले आहे ते म्हणजे वाढीव वीज बिलाचे. वाढीव वीज बिलांनी नागरिकांना जोरदार शॉक दिल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. नागपूरमध्ये वीज बीलाचा आकडा पाहून धक्का बसल्याने एका 57 वर्षीय व्यक्तीने आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत आहे. या व्यक्तीच्या कुटुंबीयास 40 हजार रुपये वीजबील आले होते, याच धसका घेतल्यानेच त्यांचा मृत्यू झाल्याचा आरोप त्यांच्या कुटुंबीयांनी केला आहे. याप्रकरणी नागपूर शहर पोलिसांनी माहिती दिली.
लॉकडाऊन काळातील 3 महिन्यांच्या वीज बिलाची ही रक्कम पाहून ग्राहकांची पायाखालची जमीनच सरकताना दिसत आहे. यासंदर्भात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून वीज बिलासंदर्भात नागरिकांच्या समस्यांकडे लक्ष देण्याचे सूचवले होते. मात्र, अद्यापही नागरिकांना वीज बिलाच्या समस्यांना तोंड द्यावे लागत आहे.
नागपूर शहरात शनिवारी दुपारी यशोधरा नगर येथील 57 वर्षीय व्यक्तीचा मृत्यू झाला. पीटीआय एजन्सीच्या वृत्तानुसार, लीलाधर लक्ष्मण गैधा यांना 40 हजार रुपये वीज बिल आल्याचे समजताच, त्यांना धक्का बसल्याचे कुटुंबीयांनी म्हटले आहे. जादा वीज बील आल्यामुळे लीलाधर यांनी जास्त दारू पिण्यास सुरुवात केली होती. त्याच नैराश्येतून शनिवारी दुपारी अंगावर रॉकेल टाकून त्यांनी स्वत:ला पेटवून घेतले. त्यानंतर, कुटुंबीयांनी तत्काळ त्यांना रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले होते.
लीलाधर हे आपल्या घरातील ग्राऊंड फ्लोअरला राहात होते, तर दुसऱ्या मजल्यावर भाडेकरू राहत आहेत. लीलाधर यांच्या घरात कुठेही सुसाईड नोट न आढळल्याने लीलाधर यांच्या आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. दरम्यान, ग्राहकांना जास्त रकमेची देयके मिळत असल्याच्या तक्रारींची गंभीर दखल घेत देयक आकारणीत अधिक पारदर्शकता आणावी आणि ग्राहकांच्या तक्रारींचे ताबडतोब निराकरण करण्यासाठी संनियंत्रण यंत्रणा उभारावी, असे निर्देश महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने वीज कंपन्यांना दिले आहेत. ग्राहकाच्या गाऱ्हाण्यांचे निवारण केल्याशिवाय कोणाचाही वीज पुरवठा खंडीत करण्यात येऊ नये, असे आयोगाने निर्देश दिले आहेत.
नागपूर : जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नागपूर व प्रकल्प संचालक आत्मा नागपूर यांच्या संयुक्त विद्यमाने रानभाज्या महोत्सव आयोजित करण्यात आला आहे. जिल्हास्तरावर आयोजित हा महोत्सव शासकीय वसाहत रविनगर येथील खुल्या मैदानात रविवार ९ ऑगस्टला सकाळी ११ वाजता आयोजित केला आहे.
९ ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो. रानभाज्यांचे महत्त्व लोकांपर्यंत पोहचविणे व त्यातून आदिवासी शेतकऱ्यांना उत्पन्नाचे स्रोत निर्माण व्हावे याकरिता महाराष्ट्र शासनामार्फत ‘रानभाज्या महोत्सव’ साजरा करण्यात येत आहे. हा महोत्सव जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये ९ ऑगस्ट रोजी आयोजित करण्यात येणार आहे. रानभाज्या पावसाच्या सुरवातीला आढळून येत असून औषधी गुणधर्माने परिपूर्ण असल्याने आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत उपयुक्त असतात. सदर महोत्सवामध्ये शेवगा, काटवल, गुळवेल, बांबू आस्ते, खापरखुटी, सुरण, चंदनबटवा यासारख्या विविध रानभाज्या विक्रीस उपलब्ध होणार आहेत.
रानभाज्यांचे सेवन मधुमेह, मूळव्याध, डोकेदुखी, मुतखडा, हृदयविकार, पित्त, श्वसनाचे आजार, मानसिक थकवा, स्थूलपणा, हत्तीरोग, सांधेदुखी, अतिसार, अपचन यासारख्या विविध विकारांसाठी हितकारक आहे.
नागपूर : राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी महात्मा ज्योतिबा फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना जाहीर केली. परंतु अजूनही हजारो शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळालेला नाही. एकट्या नागपूर विभागाचाच विचार केला तर विभागातील तब्बल ३१,९३० लाभार्थी शेतकरी अजूनही राज्य शासनाच्या कर्जमुक्ती योजनेच्या प्रतीक्षेत आहेत. यात चंद्रपूर जिल्ह्यातील सर्वाधिक ११,६७५ लाभार्थी शेतकरी योजनेच्या प्रतीक्षेत आहेत. त्यानंतर वर्धा येथील ६,०३३, भंडारा येथील ५,४९० शेतकऱ्यांचा क्रमांक लागतो.
या योजनेंतर्गत दोन लाख रुपयापर्यंत कर्ज घेणाऱ्या सर्व शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यात येणार आहे. या योजनेत कुणालाही अर्ज करायचा नाही. केवळ आधार प्रमाणिकरण करायचे आहे. ज्यांचे आधार प्रमाणिकरण असेल त्यांनाच याचा लाभ मिळणार आहे. नागपूर विभागाचा विचार केला तर नागपुरातील बँकांकडून या योजनेसाठी एकूण २ लाख ४४ हजार १४० शेतकऱ्यांचे खाते अपलोड करण्यात आले होते. यापैकी २ लाख २८ हजार ६१८ खाते आधार
प्रमाणिकरणासाठी प्राप्त झाले. यापैकी २ लाख १६ हजार १६० शेतकऱ्यांचे खाते प्रमाणिकरण झाले. या प्रमाणिकरण झालेल्या खात्यापैकी १ लाख ८४ हजार २३० सभासदांच्या खात्यात शासनाने रक्कम जमा केली म्हणजेच ही खाती कर्जमुक्त झाली. ३१ हजार ९३० लाभार्थी शेतकरी अजूनही कर्जमुक्तीच्या प्रतीक्षेत आहेत. नागपूर विभागात आतापर्यंत एकूण १२६८ कोटी लाख रुपयांची कर्जमाफी झालेली आहे.
१२,४५८ लाभार्थी शेतकरी आधार प्रमाणिकरणात अडकले
याशिवाय नागपूर विभागातील १२,४५८ लाभार्थी शेतकरी हे आधार प्रमाणिकरणात अडकले आहेत. यामध्ये नागपूर जिल्ह्यातील ३,०४५, वर्धा ३,३००, भंडारा २,८४९, गोंदिया १,०५९, चंद्रपूर १,९२२ आणि गडचिरोली येथील २८३ शेतकऱ्यांचा समावेश आहे.
नागपूर : नागपूर स्मार्ट अॅण्ड सस्टेनेबल सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशन लिमिटेड आणि नागपूर महापालिकेच्यावतीने गुरुवारी सकाळी इंडिया सायकल्स फॉर चेंज चॅलेंज उपक्रमांतर्गत कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. शहरातील नागरिकांना सायकल चालविण्याकरिता प्रोत्साहन देणे हा या कार्यक्रमाचा उद्देश असून या माध्यमातून नागपूरला बायसिकल कॅपिटल ऑफ इंडिया बनविण्याचा निर्धार करण्यात आला.
केंद्र शासनाचे गृह निर्माण व शहरी विकास मंत्रालयातर्फे हा कार्यक्रम सुरु करण्यात आला आहे.
स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके, सत्ता पक्षनेता संदीप जाधव, विरोधी पक्षनेता तानाजी वनवे, अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी महेश मोरोणे आणि मोठ्या प्रमाणात सायकल चालक उपस्थित होते. प्रमुख पाहुण्यांनी सायकलिंगचा आनंद घेतला.
प्रास्ताविकात महेश मोरोणे यांनी कार्यक्रमाची माहिती दिली. देशभरातील १०० स्मार्ट सिटीपैकी ९५ शहरांनी केंद्र शासनाच्या या उपक्रमात भाग घेतला असून यात, नागपूर शहराचाही समावेश आहे. या कार्यक्रमांतर्गत नागपूर शहरामध्ये सायकल चालविण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करावयाचे आहे. ऑक्टोंबरपर्यंत सुरक्षित सायकल चालविण्याकरिता अंतर्भूत बायलेन तयार करणे, सर्वेक्षण करणे आणि वेगवेगळे कार्यक्रम आयोजित करण्यात येणार आहे. ऑक्टोबर नंतर ११ शहरांचे दुसऱ्या फेरीसाठी केंद्र शासनामार्फत निवड केली जाईल आणि पारितोषिक म्हणून एक कोटी रुपयाचा पुरस्कार देण्यात येईल. सायकलचा वापर केल्यामुळे प्रदूषण कमी करण्यात मदत होते आणि नागरिकांचा शारीरिक व्यायाम देखील होते.
यावेळी पिंटू झलके,संदीप जाधव,तानाजी वनवे व जलज शर्मा यांनी सुध्दा नागरिकांना सायकलचा जास्तीत-जास्त वापर करुन नागपूरला बायसिकल कॅपिटल ऑफ इंडिया बनविण्याचे आवाहन केले.
या कार्यक्रमात अॅमस्टरडॅमच्या बी.वाय.सी.एस. संस्थेच्या बायसिकल मेयर दीपांती पाल यांनी भाग घेतला. या कार्यक्रमात सहायक आयुक्त महेश धामेचा, प्रकाश वराडे, विजय हुमणे, साधना पाटील, सुषमा मांडगे, किरण बागडे, स्मार्ट सिटी कंपनी सेकेट्ररी भानुप्रिया ठाकूर, राजेश दुपारे, अर्चना अडसड, प्रणिता उमरेडकर, राहुल पांडे, सोनाली गेडाम, अनुप लाहोटी, पराग अर्मळ, कुणाल गजभिये, परिमल इनामदार, मुकेश मेहाडिया आदी उपस्थित होते.
नागपूर : ‘भारतीय वस्तू-आमचा अभिमान’ या घोषवाक्यानुसार कॉन्फडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्स (कॅट) ‘चीन भारत छोडो’ हा नारा देत चिनी वस्तूंवर बहिष्कार टाकण्याची देशव्यापारी मोहीम ९ ऑगस्टपासून सुरू करणार आहे. या मोहिमेंतर्गत सर्व राज्यातील जवळपास ६०० शहरांमध्ये सोशल डिस्टन्सिंग आणि सुरक्षेचे पालन करून सार्वजनिक प्रदर्शन करणार आहे. ‘कॅट’ ही संघटना देशातील ७ कोटी किरकोळ व्यापाऱ्यांची संघटना आहे, हे विशेष.
‘कॅट’चे अध्यक्ष बी सी भरतिया म्हणाले, चिनी वस्तूंनी भारतीय रिटेल बाजारावर गेल्या २० वर्षांपासून कब्जा केला आहे. बदलती परिस्थिती ध्यानात ठेवून चिनी उत्पादनांपासून रिटेल बाजार स्वतंत्र करून आत्मनिर्भर भारतीय बाजार बनविण्याची गरज आहे. रक्षाबंधन सण भारतीय राखीच्या रूपात साजरा करण्याच्या ‘कॅट’च्या मोहिमेला देशातील लोकांनी समर्थन दिले आणि चिनी राख्यांचा बहिष्कार केला. त्यामुळे चिनी राखी बाजाराला देशात ४ हजार कोटींचा फटका बसला. जर लोकांनी संकल्प घेऊन चिनी वस्तूंचा बहिष्कार केल्यास देशात केवळ भारतीय बनावटीच्या वस्तूंची विक्री होईल. ‘कॅट’च्या नेतृत्वात ७ कोटी व्यापाऱ्यांनी हा संकल्प घेतला आहे.
गोकुळाष्टमी, गणेशोत्सव, नवरात्र, दसरा, धनत्रयोदशी, दिवाळी, भाऊबीज आणि तुळशी विवाह हे सण पूर्णपणे भारतीय वस्तूंनी साजरे करण्यात येणार आहे. या सणांमध्ये कोणत्याही चिनी वस्तूंचा उपयोग होणार नाही. यावर्षी विशेषत: दिवाळी भारतीय दिवाळी म्हणून साजरी करण्यात येणार आहे. याकरिता कॅटने व्यापक तयारी सुरू केली आहे.
‘चीन भारत छोडो’ अभियानात देशात स्टार्टअप कंपन्यांमध्ये चिनी कंपन्यांनी केलेली गुंतवणूक मागे घेण्याची मागणी करण्यात येणार आहे. त्याच्या बदल्यात भारतीय कंपन्यांना सरकारने आवश्यक आर्थिक मदत करण्याची मागणी करण्यात येणार आहे. ५९ चिनी अॅपवर भारताने प्रतिबंध लावला आहे. आता उर्वरित चिनी अॅपवर सरकारने त्वरित प्रतिबंध लावावा. सरकारने विविध प्रकल्पातील चिनी कंपन्यांची भागीदारी रद्द केली आहे. त्याच धर्तीवर सीमावर्ती भागात सुरक्षा संबंधित क्षेत्र, महामार्ग आणि अन्य प्रकल्पाच्या उभारणीत चिनी मशीनवर प्रतिबंध लावावा. ‘कॅट’ अभियानांतर्गत संपूर्ण देशातील व्यापाऱ्यांना आणि अन्य लोकांना जागरूक करणार आहे.
नागपूर : सेमिनरी हिल्सच्या वनपरिक्षेत्र कार्यालयात कार्यरत असलेल्या एका ५० वर्षीय बीट रक्षकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्याच्यावर मेयो येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. गुरुवारी सकाळी ५ वाजता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे वन विभागात खळबळ उडाली असून विना कामाने कार्यालयात येणाऱ्या कर्मचाऱ्यांना मनाई करण्यात आली आहे.
कामठी येथील रहिवासी असलेल्या या वनरक्षकाकडे बालोद्यान व जपानी गार्डनची जबाबदारी होती. २३ जुलैला त्याची कोरोनाची चाचणी पॉझिटिव्ह आली होती. त्यामुळे येथील वनकर्मचाऱ्यांना १४ दिवसासाठी होम क्वारंटाईन होण्याचे आदेश देण्यात आले होते. नागपूर शहरातील वन विभागातील कर्मचाऱ्याचा कोरोनामुळे मृत्यू होण्याची ही दुसरी घटना आहे. यापूर्वी वनभवनातील एका अकाऊंटंटचा कोरोनामृळे मृत्यू झाल्यानंतर त्याच्या ४५ वर्षीय लिपिक मित्राची चाचणीही पॉझिटिव्ह आली होती. वनभवनाच्या मुख्यालयातील भांडार विभागात कार्यरत असलेली एक कंत्राटी सेवेतील महिला कर्मचारीही कोरोना पॉझिटिव्ह निघाली आहे. वनरक्षकाच्या मृत्यूनंतर कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीवर बरेच नियंत्रण आणण्यात आले आहे.
एनएमएमआरडीएचे अधिकारी पॉझिटिव्ह
सिव्हिल लाईन येथील नासुप्र कार्यालयातील दुसऱ्या मजल्यावरील एनएमएमआरडीए कार्यालयातील कार्यकारी अभियंता गुरुवारी कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे आढळून आले आहे. त्यामुळे या अधिकाऱ्यांचा कक्ष सील करून निर्जंतुक करण्यात आला आहे. अधिकारी पॉझिटिव्ह आढळून आल्याने नासूप्र कार्यालयातील कर्मचारी व अधिकाऱ्यात खळबळ उडाली. याबाबत माहिती मिळताच अनेक कर्मचाऱ्यांनी कार्यालय सोडून घरचा रस्ता धरला. नासुप्रचे संपूर्ण कार्यालय निर्जंतुक करण्याचे काम सायंकाळपर्यंत सुरू होते.
नागपूर : शहरातील दोन कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी भगवान शेजुळ व सिद्धार्थ सहारे यांचे गुरुवारी सकाळी कोरोना संसगार्मुळे दु:खद निधन झाले. शहरात कोरोनाचा संसर्ग व मृत्यूचे प्रमाण वाढते असल्याने वैद्यकीय वर्तुळ व प्रशासनासमोरचे आव्हान वाढत आहे.
शहर पोलीस दलात कार्यरत असलेल्या दोन पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, अवघ्या सव्वा दोन तासाच्या कालावधीत या दोन्ही मृत्यूच्या नोंदी झाल्या.
पोलीस उपनिरीक्षक शेजुळ हे मुख्यालयात कार्यरत होते. ते २६ जुलै पासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे कर्तव्यावर गेले नव्हते. ३१ जुलैला त्यांनी मुख्यालयाच्या वरिष्ठांना फोन वरून माहिती देऊन आपल्या गैरहजेरीचे कारण सांगितले. दरम्यान, ४ ऑगस्टला त्यांच्यावर योग्य उपचार होत नसल्याची बातमी पुढे आली. त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दखल घेऊन त्यांना मेडिकलमध्ये दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना गुरुवारी सकाळी ५.४० च्या सुमारास शेजुळ यांचा मृत्यू झाला. तत्पूर्वी प्रतापनगरातील एका खासगी इस्पितळात दाखल असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सिद्धार्थ हरिभाऊ सहारे यांचा मृत्यू झाला.
सहारे धंतोली पोलिस ठाण्यात कार्यरत होते. गेल्या आठवड्यात त्यांची प्रकृती चांगली वाटत नसल्यामुळे त्यांनी धंतोलीच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना माहिती देऊन सुट्टी मागितली. त्यानंतर ते रामदासपेठेतील खासगी इस्पितळात दाखल झाले. येथे प्रकृती जास्त झाल्यामुळे त्यांना प्रतापनगरातील खाजगी इस्पितळात पाठविण्यात आले. उपचार सुरू असताना डॉक्टरांनी गुरुवारी पहाटे ३.१५ च्या सुमारास सहारे यांना मृत घोषित केले. शेजुळ आणि सहारे यांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे वृत्त चर्चेला आल्याने पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली.
माहिती कळताच पोलीस हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. सतीश शिंदे यांनी शहानिशा करून घेतल्यानंतर पोलीस आयुक्तांना माहिती दिली. त्यानंतर या दोन्हीच्या मृत्यू बाबत परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त विनिता शाहू आणि परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांनी कागदपत्रे ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली.
पोलिसांना धडकी
विशेष म्हणजे, आतापर्यंत शहर पोलीस दलात ५० पेक्षा जास्त कोरोना बाधित पोलिसांची नोंद झाली. मात्र, मृत्यू झाल्याची आणि एकाच दिवशी दोन पोलिसांचा मृत्यू झाल्याने अवघ्या पोलिस दलाला धडकी भरली आहे.
नागपूर: कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने सावधगिरी बाळगत नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी सात दिवस विलग राहण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी सकाळी त्यांनी टिष्ट्वटरवर ही पोस्ट टाकली आहे.
या पोस्टमध्ये त्यांनी, आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने विलग राहण्याचा निर्णय घेतला आहे असे म्हटले आहे. तसेच ज्या व्यक्ती आपल्या संपर्कात बुधवार संध्याकाळपासून होत्या, त्यांनीही स्वविलगीकरणाचा निर्णय घ्यावा असे आवाहन केले आहे.
Yesterday I have come in a close proximity to a person whose family member was positive for coronavirus. Whilst I am fine, I am undergoing self isolation for next 7 days as a precaution on the recommendation of doctors.
नागपूर : कामठी उपजिल्हा रुग्णालयातील शवविच्छेदन गृहात शीतगृह तयार करण्यात आले आहे. येथील बर्फ तयार करणारी फ्रिजर मशीन गत चार वर्षांपासून बंद आहे. परिणामी मृताच्या नातेवाईकांना दरवेळी पदरमोड करून बर्फाच्या लाद्या विकत आणाव्या लागत आहेत. यासाठी त्यांना बाराशे ते पंधराशे रुपयांचा फटका बसतो.
कामठी शहरातून नागपूर-जबलपूर राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. या मार्गावर अपघाताचे प्रमाण वाढले आहेत. त्यामुळे कामठी, मौदा, खात, पारशिवनी, मनसर खापरखेडा या परिसरातील अपघात, वीज कोसळणे, आत्महत्या, खून तसेच अन्य घटनांमधील मृतदेह कामठी येथील उपजिल्हा रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी आणले जातात. काही कारणास्तव तपासणीला विलंब होत असल्याने मृतदेह सुरक्षित रहावेत म्हणून या रुग्णालयातील शवविच्छेदन गृहात शीतगृहाची निर्मिती केली आहे. या शीतगृहातील फ्रिजर मशीनमध्ये दोन मृतदेह ठेवण्याची सोय आहे. मात्र ही मशीन गेल्या चार वर्षापासून बंद आहे.
शवविच्छेदन गृहात ठेवलेले मृतदेह उत्तरीय तपासणीअभावी कुजले असल्याने त्याची दुर्गंधी सुटते. त्या दुर्गंधीचा परिसरात राहणाऱ्या तसेच या भागातून रोज ये-जा करणाºया नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.
रुग्णालय प्रशासनाने ही मशीन दुरुस्त करण्याची वरिष्ठांकडे अनेकदा मागणी केली आहे. परंतु कुणीही त्याची गांभीर्याने दखल घेत नाही. या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. दोन वर्षापूर्वी कन्हान नदीकाठाने एका अनोळखी महिलेचा मृतदेह मिळाला होता. मृताची ओळख होईपर्यंत प्रेत शवविच्छेदन गृहात ठेवण्यात आले होते. अनोळखी मृतदेह सुरक्षित ठेवण्यासाठी कुणीही बर्फाच्या लाद्याची सोय करीत नसल्याने तो मृतदेह तसाच पडून असतो. यासंदर्भात परिसरातील महिलांनी मोर्चा काढून उपजिल्हा रुग्णालयात धडक दिली होती. त्या दरम्यान कामठी नगर परिषदचे माजी उपाध्यक्ष रणजित सफेलकर यांनी महिलांना शांत करून कुजलेल्या प्रेतावर अंत्यसंस्कार केले होते. उपजिल्हा रुग्णालय शवगारातील फ्रिजर मशीनची समस्या त्वरित सोडविण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
कामठी उपजिल्हा रुग्णालयातील शवागृहात अद्यावत फ्रिजर मशीन व विविध साहित्याच्या खरेदीसाठी निधी मंजूर झाला आहे. लॉकडाऊनमुळे या कामात व्यत्यय आला आहे. हे काम लवकरच पूर्ण होईल.
– डॉ. श्रद्धा भाजीपाले,
प्रभारी अधीक्षक, कामठी उपजिल्हा रुग्णालय
नागपूर : तीन ते चार महिन्याचे भरमसाट वीज बिल एकाचवेळी पाठवण्यात आल्याने राज्यभरातील नागरिक त्रस्त आहेत. राज्य मंत्रिमंडळाच्या मागच्या बैठकीत नागरिकांना दिलासा देण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे. ऊर्जा विभागाने दिलासा देणारे अनेक पर्याय मंजुरीसाठी राज्य विद्युत नियामक आयोगाकडे पाठविले आहे. त्याचवेळी लॉकडाऊनच्या काळातील १०० युनिटपर्यंतचे वीज बिल माफ व्हावे, यासाठी काँग्रेसचे मंत्री दबाव टाकत आहेत.
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष व राज्याचे महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी सोमवारी यासंदर्भात पक्षाचे प्रदेश कार्याध्यक्ष व ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांच्याशी प्रदीर्घ चर्चा केली. यादरम्यान झालेल्या चर्चेत लॉकडाऊन काळातील १०० युनिटपर्यंतचे वीज बिल माफ करून नागरिकांना दिलासा देण्यात यावा, याबाबत मानस तयार करण्यात आले. ते मंत्रिमंडळाच्या बैठकीत या मागणीसाठी दबाव निर्माण करतील.
दुसरीकडे महावितरणच्या सूत्रानुसार ऊर्जा विभागाने नियामक आयोगासमोर नागरिकांना दिलासा देण्यासाठी अनेक पर्यायांचा प्रस्ताव पाठविला आहे. यात १०० युनिटपर्यंतचे वीज बिल माफ करणे, एकूण बिलावर सूट देणे यासारख्या पर्यायांचा समावेश आहे. महावितरणने स्पष्ट केले की, नागरिकांना दिलासा देण्याबाबत त्यांचा कुठलाही आक्षेप नाही. परंतु वीज बिलात जी काही सूट दिली जाईल, त्याचा भार राज्य सरकारने उचलावा. कंपनीची आर्थिक स्थिती मात्र दिलासा देण्यासारखी नाही, असे कंपनीचे म्हणणे आहे.
नागपूर : शहरात दररोज कोव्हिड पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या वाढत आहे. यामधील बहुतांशी रुग्ण हे लक्षणे नसलेली आहेत. मात्र या पॉझिटिव्ह रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्व ‘हाय रिस्क’ व्यक्तींची तपासणी होणे आवश्यक आहे. त्यामुळे पॉझिटिव्ह आलेले रुग्ण आणि मृत पावलेले कोरोनाग्रस्त रुग्ण यांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना शोधणे, याला प्राधान्य असायला हवे. यादृष्टीने सर्वच झोनल वैद्यकीय अधिकारी व त्यांच्या चमूने काटेकोरपणे कार्यवाही करावी, असे निर्देश मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी दिले आहेत.
मनपा आयुक्तांनी मंगळवारी (ता.४) सर्व झोनल वैद्यकीय अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीमधील ‘कोरोना वार रूम’मध्ये झालेल्या बैठकीत अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, उपायुक्त निर्भय जैन, प्रभारी उपायुक्त अमोल चौरपगार, वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ. योगेंद्र सवाई, अतिरिक्त वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ.प्रवीण गंटावार, अतिरिक्त सहायक आरोग्य अधिकारी डॉ.विजय जोशी यांच्यासह सर्व झोनल वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
यावेळी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे म्हणाले, कोव्हिडचा संसर्ग रोखण्यासाठी पॉझिटिव्ह रुग्णाच्या संपर्कातील आलेल्या व्यक्तींचा शोध घेणे व त्यांची चाचणी करणे आवश्यक आहे. एका व्यक्तीच्या संपर्कातील किमान २० जणांचे ‘कॉन्टॅक्ट ट्रेसिंग’ करून त्यांची चाचणी करण्यात यावी. चाचणीत संपर्कातील व्यक्ती पॉझिटिव्ह आल्यास त्याची संपूर्ण माहिती घेऊन त्याला लक्षणे नसल्यास ‘होम आयसोलेशन’मध्ये किंवा ‘कोव्हिड केअर सेंटर’मध्ये उपचार करण्यात यावे. याशिवाय त्या व्यक्तीच्या संपर्कातीलही व्यक्तीचा शोध घेणे बंधनकारक आहे. लक्षणे नसलेल्या पॉझिटिव्ह व्यक्तींचे दहा दिवस देखरेख आवश्यक आहे. आय.एल.आय लक्षणे असलेले व्यक्ती कोवीड चाचणीसाठी समोर येत नाही व स्वत:च औषध घेतात किंवा खाजगी दवाखान्यात वा रुग्णालयात जाऊन उपचार करतात व ही माहिती मनपाला देत नाही. परिणामस्वरुप अशा रुग्णांना वेळेत योग्य उपचार मिळत नाही. हे टाळण्यासाठी कोणत्याही व्यक्तीला काही लक्षणे आढळल्यास त्यांनी शहरातील मनपाच्या २१ ‘कोव्हिड टेस्टिंग सेंटर’पैकी संबंधित झोनमधील केंद्रात जाऊन चाचणी करावी. सदर रुग्ण उपचारासाठी जर एखाद्या खाजगी रुग्णालयात गेल्यास कायद्यान्वये त्या रुग्णालयाने त्याची माहिती मनपाला देणे आवश्यक आहे. अशा रुग्णांची माहिती मिळताच संबंधित झोनल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपल्या चमूसह रुग्णाच्या चाचणीबाबत आवश्यक कार्यवाही करावी. शहरातील कोव्हिडच्या संसर्गाची साखळी खंडित करण्यासाठी या सर्व दिशानिर्देशांचे काटेकोरपणे पालन करून योग्य कार्यवाही करणे हे प्रत्येक झोनल वैद्यकीय अधिकाऱ्यांचे कर्तव्य आहे. त्यादृष्टीने प्रत्येकाने कार्य करावे, असेही ते म्हणाले.
आयुक्तांनी सांगितले की, कोव्हिड पॉझिटीव्ह आलेल्या रुग्णांना अतिसौम्य, सौम्य वा लक्षणे नसल्यास यांना स्क्रीनिंगसाठी आमदार निवास येथील केंद्रामध्ये पाठविले जाईल व तपासणी नंतर रुणांना वैद्यकीय सल्ल्यानुसार होम आयसोलेशन, कोव्हिड केअर सेंटर किंवा कोव्हिड रुग्णालयात पाठविण्यात येईल.
आयुक्तांनी सांगितले की, ७ जुलै, २०२० च्या केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सूचनेनुसार लक्षणे नसलेल्या रुग्णांना होम आयसोलेशनमध्ये ठेवावे. या रुग्णांवर खाजगी रुग्णालयात उपचार केले जात आहे. असे आढल्यास साथ रोग प्रतिबंधक कायद्यान्वये संबंधित खाजगी रुग्णालयावर कारवाई करण्यात येईल. त्यादृष्टीने सर्व झोनल वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपापल्या झोनमधील खाजगी रुग्णालयांची वेळावेळी तपासणी करणे व त्यांच्याकडून रोजची माहिती घेऊन त्याचा अहवाल संबंधित विभागप्रमुखांना रोज सादर करावा, असेही निर्देश आयुक्तांनी यावेळी दिले.
शहरातील कुठल्याही नागरिकाला काही लक्षणे असल्यास त्यांनी मनपाला तशी माहिती द्यावी. लक्षणे नसताना एखादी व्यक्ती पॉझिटिव्ह आल्यास संबंधित व्यक्तीने घाबरून न जाता मनपाद्वारे देण्यात येणाऱ्या सूचनांचे पालन करावे.
Admissions of Moderate cases with prior booking between 9am to 6pm. No walk-in Patients-TEAM OCHRI
Shri Uday Bhaskar Nair, Chairman – Orange City Hospital & Research Institute (a unit of Ravi Nair Hospitals Private Limited) responded to call of Nagpur Government authorities led by Dr. Sanjeev Kumar- Nagpur Divisional Commissioner, Shri.Tukaram Munde- Nagpur Municipal Commissioner and Shri.Ravindra Thakre- Nagpur District Collector to support the Government for tackling the ongoing Covid 19 pandemic. Thus OCHRI has successfully opened a Dedicated Covid Healthcare Center (DCHC) facility to serve COVID positive patients with mild to moderate symptoms. Mr. Nair’s effervescent motivation mobilized the entire OCHRI fraternity to overcome any fears and accordingly Dr. Usha Nair- RNHPL Director swiftly put in place the required measures extending committed healthcare services.
This DCHC approved by Nagpur Municipal Corporation has been housed in totally segregated OCHRI Building B with separate entrance. It accommodates CCU beds with centralized Oxygen and suction facility.
Dr. Nandu Kolwadkar leads the Specialist team of Dr. Sameer Choudhary, Dr. Santosh Dhole, Dr. Ravindra S. And Dr. M. Sushant to attend the admitted patients. Dr. Milind Pande – Pathologist and Dr. Nishikant Lokhande – Radiologist are heading the diagnostic units. 2 ENT Surgeons, 1 Intensivist, 1 Physician and 1 Chest Physician encompass OCHRI Specialist team. Round the clock senior Resident Medical Officers and Nurses have been made available.
On this occasion, Dr. Nandu Kolwadkar-OCHRI COVID Unit Specialist Incharge who inaugurated the unit in a traditional manner stated that OCHRI management is doing its best to set a benchmark in a novel manner to improve the wellness quotient of the patients admitted in this new division.
Dr. Anup Marar-OCHRI Director stated that the specialist team considering the DCHC boundaries, will confirm the status of patient prior to admission after perusing the clinical reports to justify rightful admission and thus reserves the right of admission in the patient’s best interest. Admission in OCHRI DCHC, subject to availability of beds will be undertaken between 9am to 6pm only, he added.
Dr. Sameer Choudhary- ENT Specialist also reassured all OCHRI regular patients that Non COVID Patient Care in OCHRI as per routine will continue in OCHRI Building A & C through separate entrance and dedicated manpower.
For bed booking and seeking guidance related to admission of COVID positive patients with mild to moderate symptoms at OCHRI DCHC housed in dedicated Building B.
Shri.Sunil Sure, Dr. Deepak Dongre, Sr.Jessy Abraham, Smt.Priya Sashi, Sr.Rahel Patrange, Dr.Sajan Nair, Shri.Sawant Waghmare, Shri.Avinash Ganar, Shri.Madhukar Chanore, Shri.Pranay Ramakrishnan, Shri.Neeraj Patil, Shri.Naresh Tiwari, Shri.Anwar and Shri.Anup Saxena are leading respective teams to ensure smooth working of this unit befitting OCHRI standards.
Smt.Saramma Samuel-OCHRI HR Incharge further stated that Vehicle parking for OCHRI Doctors/ Staff, Non Covid patients and their relatives reaching OCHRI Non Covid Buildings A & C has been arranged courtesy office of Nagpur Divisional Commissioner in Grounds of Jupiter High School across road with due thanks to Gurudas Shikshan Sanstha School Management. All to note.
Samsung’s latest lifestyle TV, The Serif will be available at No Cost EMIs starting at INR 2,916
– New 7 kg Front Load Hygiene Steam Washing Machine to be launched at INR 29,490
India –Samsung, India’s most trusted consumer electronics brand, has announced that its stunning lifestyle TV, The Serif will be available at a special discount of INR 10,000 during the Amazon Prime Day sale on August 6 and August 7, 2020. Samsung is also launching its popular Front Load Hygiene Steam Washing Machine in 7kg variant during sale with 19% discount and exciting EMI and cashback offers.
The Serif is a statement centerpiece that not only redefines TV viewing but also elevates the design of any living space. Unlike conventional TVs that belong next to the wall, The Serif can fit anywhere in the room and looks magnificent from every angle. During the Amazon Prime Day sale, consumers will also get 10% instant cashback on their HDFC debit and credit cards. They can also opt for the 24-month No-Cost EMI option, with EMIs starting as low as INR 2,916.
Front Load Hygiene Steam Washing Machine comes with Samsung’s Hygiene Steam technology ensuring clean and sanitized clothes. It is capable of removing ingrained dirt and 99.9% of bacteria and allergens. During the sale, consumers will get a 19% discount on the washing machine, with 10% instant cashback on their HDFC debit and credit cards, and option of a 12-month No-Cost EMI with EMIs starting as low as INR 2,458.
“Great design, premium technology, personalization and functionality are key factors for people looking to buy consumer durables to upgrade their homes. We are partnering with Amazon to bring to our consumers exciting offers on the beautiful lifestyle TV, The Serif and new Front Load Hygiene Steam Washing Machine, with special discounts and cashback offers. With this portfolio, we are sure to address evolving needs of our consumers, especially as they are spending more time at home,” said Piyush Kunnappallil, Director – Online Business, Consumer Electronics, Samsung India.
Price & Offers
During Amazon Prime Day Sale, consumers will get a special discount of INR 10,000 on all models of The Serif. Post special discount, The Serif will be available for INR 69,990, INR 89,990 & INR 1,09,990 for 43-inch (1m 08cm), 49-inch (1m 23cm) and 55-inch (1m 38cm) screen size, respectively. Consumers can also opt for the 24-month No-Cost EMI option, with EMIs starting as low as INR 2,916.
Front Load Hygiene Steam Clean Washing Machine 7kg capacity variant will be available for INR 29490 post a 19% discount. Consumers will get an option of 12 months no cost EMI starting at INR 1,166 and INR 2,458, respectively.
That’s not all, consumers will get a 10% instant cashback on their HDFC debit and credit cards while buying any of the above products.
Samsung Product Line Up
The Serif –
The Serif goes beyond the traditional concept of a TV to a piece of home décor that elevates the design of any living space – a result of the true collaboration between Samsung and the acclaimed Parisian design duo Ronan and Erwan Bouroullec.
From its iconic Uni-body design in the shape of the letter “I” to its brilliantly crisp QLED picture, The Serif is a statement centerpiece that not only redefines TV viewing, but also creates an eccentric space that complement one’s lifestyle while creating a lasting impression. The Serif is the only television that comes inbuilt with NFC (Near Field Communication) technology for seamless entertainment.
Equipped with Quantum Dot Technology, The Serif displays brilliant picture quality matched by boldly clear and immersive sound. By detecting distracting noises and automatically adjusting volume in real time, The Serif keeps the focus on the meaningful sounds and voices with the Active Voice Amplifier (AVA) feature.
Front Load Hygiene Steam Washing Machine –
The Hygiene Steam cycle ensures that the garments are clean and sanitized. It improves the washing quality by releasing a steam from the bottom of the drum. As a result, each garment inside the drum is completely saturated. It further, removes dirt and up to 99.9% of bacteria.
Samsung Front Load Hygiene Steam Washing Machine comes with a 5 Star Rating – enabling consumers to spend less on electricity bills and protect the planet. Its low power usage cuts down on costs and also reduces harmful CO2 emissions, making it environment friendly.
With the Smart Check feature – consumers can avoid the inconvenience and cost of a broken machine. Smart Check is an automatic error-monitoring system. Using Samsung Smart Washer/Dryer smartphone App, it detects and diagnoses problems at an early stage. It then provides quick, easy solutions and saves you time.
About Samsung Electronics Co., Ltd.
Samsung inspires the world and shapes the future with transformative ideas and technologies. The company is redefining the worlds of TVs, smartphones, wearable devices, tablets, digital appliances, network systems and memory, system LSI, foundry and LED solutions. For latest news on Samsung India, please visit Samsung India Newsroom at http://news.samsung.com/in. For Hindi, log on to Samsung Newsroom Bharat at https://news.samsung.com/bharat. You can also follow us on Twitter @SamsungNewsIN
नागपूर : ५ आॅगस्ट रोजी अयोध्या येथील श्रीराम मंदिराचे भूमिपूजन होणार असल्याने देशभरातच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. स्वातंत्र्यानंतर या लढ्याला संघाने हरतºहेने पाठबळ दिले व विविध पातळ्यांवर मौलिक सहभाग दर्शविला. मंदिरासंदर्भात संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत १९५९ साली अधिकृत प्रस्ताव मांडण्यात आला होता हे विशेष.
५ आॅगस्ट रोजी अयोध्या येथील श्रीराम मंदिराच्या भूमिपूजनप्रसंगी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक डॉ. मोहन भागवत व सरकार्यवाह भय्याजी जोशी हे प्रामुख्याने उपस्थित राहणार आहे. द्वितीय सरसंघचालक गोळवलकर गुरुजी यांच्या कार्यकाळात १९५९ मध्ये सर्वात अगोदर देशातील मंदिरांवर झालेले आक्रमण यासंदर्भात प्रस्ताव मांडण्यात आला होता. प्राचीन मंदिरांचे समाजात सहिष्णूता कायम ठेवत पुनर्निर्माण व्हावे, अशी भूमिका यात संघाने मांडली होती. मात्र त्यावेळी अयोध्येतील राममंदिरापेक्षा काशी विश्वनाथ मंदिरावर जास्त भर होता. त्यानंतर सुमारे दोन दशके संघातर्फे कुठलाही अधिकृत प्रस्ताव मांडण्यात आला नाही. मात्र विश्व हिंदू परिषद व इतर संघटनांच्या माध्यमातून मंदिराच्या मुद्यावर समाजात चर्चा कायम ठेवली होती. याशिवाय वेळोवेळी तत्कालीन सरसंघचालक व सरकार्यवाहांनी सार्वजनिक मंचांवरुन राम मंदिरासंदर्भातील मुद्दा जनतेसमोर मांडला होता.
नागपूर : पत्रकार अर्णब गोस्वामी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरुद्ध अपमानजनक भाषेचा वापर करून सरकार पाडण्याची धमकी दिल्याचा आरोप करत उद्धव ठाकरे फॅन्स क्लबतर्फे निषेध नोंदविण्यात आला.
अर्णब गोस्वामी यांना अटक करून त्यांच्या चॅनलविरुद्ध कडक कारवाई करावी, अशी तक्रारही कळमना पोलिसांकडे करण्यात आली. उद्धव ठाकरे फॅन्स क्लबचे रवनीश पांडे यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, रिपब्लिकन भारत या चॅनेलचे संपादक अर्णब गोस्वामी यांनी शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याविरोधात अपमानजनक भाषेचा वापर केला.
मुंबई : अभिनेता सुशांतसिंह राजपूत आत्महत्या प्रकरणाचा तपास मुंबई पोलिसांकडून काढून घेऊन सीबीआय किंवा विशेष तपास पथकाकडे (एसआयटी) वर्ग करावा किंवा मुंबईबाहेर हे प्रकरण वर्ग करावे, अशी मागणी करणारी जनहित याचिका नागपूरचे रहिवासी समित ठक्कर यांनी उच्च न्यायालयात दाखल केली आहे.
मुंबई पोलीस आयुक्त व वांद्रे पोलीस यांच्याकडून होत असलेल्या उशिरामुळे प्रत्येक दिवशी महत्त्वाची कागदपत्रे व पुरावे नष्ट केली जात आहेत, असे ठक्कर यांनी याचिकेत म्हटले आहे. बॉलीवूड, राजकारण आणि अंडरवर्ल्ड यांचे एकमेकांशी संबंध आहेत. याला सुशांत बळी ठरला आणि त्याचमुळे त्याने आत्महत्या केली, असे याचिकेत म्हटले आहे.
सुशांतच्या घरात काम करणाऱ्या एकाने वृत्तवाहिनीला दिलेली मुलाखत आणि मुंबई पोलिसांचा अहवाल यात तफावत आहे. उदा. घरातील काम करणाºयाने पोलिसांना सांगितले की, आत्महत्येपूर्वी सुशांतने फळाचा रस प्यायला आणि त्यानंतर तो जॉगिंगला गेला. मात्र, याचा उल्लेख पोलिसांनी केला नाही, असे याचिकेत म्हटले आहे. सुशांतचे टिष्ट्वटर आणि फेसबुक अकाउंट त्याच्या मृत्यूनंतरही कोणी तरी वापरत होते, बॉलीवूडचे काही अभिनेता, अभिनेत्री, डायरेक्टर यांनीही समाजमाध्यद्वारे सुशांतला फिल्म इंडस्ट्रीतले काही बड्या लोकांनी लक्ष्य केल्याचे म्हटले आहे. त्यामुळे प्रकरणाचा नीट तपास करावा, अशी मागणी याचिकेत आहे. याशिवाय ठक्कर यांना पोलीस संरक्षण द्यावे, कारण बॉलीवूड माफियाकडून त्यांना धमक्या येत आहेत, अशीही विनंतीही त्यांनी न्यायालयाला याचिकेद्वारे केली आहे. बुधवारी या याचिकेवर सुनावणी होण्याची शक्यता आहे.
नागपूर:मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महापालिकेची पाच रुग्णालये अद्ययावत केल्याचे सांगितले होते. दुर्दैवाने या रुग्णालयाचे काम अद्यापही अपूर्ण आहे. शिवाय मनपा रुग्णालयांमध्ये मनुष्यबळाचा अभाव असल्यामुळे येथे एकही कोरोनाचा रुग्ण नाही. कोरोना रुग्णांनी खासगी रुग्णालये फुल्ल झाली आहेत. दुसरीकडे मेयो, मेडिकल रुग्णालयांमध्ये बेड रिकामे असल्यानंतरही रिकामे नसल्याचे भासविले जात असल्याची धक्कादायक माहिती स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके यांनी दिली.
सोमवारी महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत कोरोना रुग्णांचा आढावा घेण्यात आला. शहरातील रुग्णालयांमध्ये दाखल रुग्ण व बेडची उपलब्धता या याबाबतची माहिती घेण्यात आली. बैठकीत अधिकाऱ्यांनी शहरातील कोरोना रुग्ण तसेच बेडच्या उपलब्धतेची माहिती सादर केली. यात महापालिकेच्या एकाही रुग्णालयाचा समावेश नव्हता. महापालिकेच्या रुग्णालयात ५०० बेडची व्यवस्था असल्याचे मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सांगितले होते.
दरम्यान, त्यांनी या कामाच्या निविदा न काढता ई-मेलच्या माध्यमातून निविदा प्रक्रिया राबविली होती. घाईघाईच्या या निर्णयामुळे या रुग्णालयाची कामे अपूर्ण अवस्थेत आहेत. कोविड-१९ च्या रुग्णांना बेड उपलब्ध नसल्याचे सांगितले जात आहे. मात्र, मेडिकल, मेयो येथे अर्धेअधिक बेड रिकामे असल्याची माहितीही अधिकाऱ्यांनी दिली. प्रशासनाच्या अशा भूमिकेमुळे रुग्णांना खासगी रुग्णालयात जावे लागत असल्याचे झलके यांनी सांगितले.
महापालिकेच्या रुग्णालयात एकही कोरोना रुग्ण दाखल नाही. रुग्णालयात मनुष्यबळाचा अभाव आहे. आयुक्त तुकाराम मुंढे यांनी पाच रुग्णालये सज्ज असल्याचा मोठा गाजावाजा केला होता. दुर्दैवाने मनपाचे एकही रुग्णालय अद्ययावत झाले नाही. याव्यतिरिक्त राधास्वामी सत्संग मंडळातील बेडदेखील इतरत्र हलविण्यात आले आहेत.
– पिंटू झलके
स्थायी समिती अध्यक्ष, मनपा
नागपूर :महापालिकेच्या स्थायी समितीच्या बैठकीत सोमवारी पाणीपट्टी दरवाढीच्या प्रस्तावाला मंजुरी न देता तो जलप्रदाय विभागाकडे परत पाठविण्यात आला. जलप्रदाय विभागाने ५ टक्के दरवाढीचा प्रस्ताव दिला होता. निवासींसोबत झोपडपट्टीवासीयांनाही ही वाढ सोसावी लागणार आहे. प्रति युनिटमागे ३५ पैसे जादा द्यावे लागतील. यातून महापालिकेचे उत्पन्न १० ते १३ कोटींनी वाढण्याची अपेक्षा आहे. परंतु कोरोना काळात नागरिकांवर आर्थिक भुर्दंड बसणार असल्याने हा प्रस्ताव मंजूर न करता प्रशासनाने सभागृहाकडे मंजुरीसाठी पाठवावा, अशी शिफारस समितीने केली. अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष पिंटू झलके यांनी दिली.
निवासी वापरासाठी १ ते २० व २१ ते ३०, ३१ ते ८० आणि ८० युनिट पुढे असे प्रत्येक टप्प्यात ही दरवाढ प्रस्तावित आहे. निवासी वापरासाठी एका रुपयाची तर, झोपडपट्ट्यांसाठी ३३ पैसे ते एक रुपयांपर्यंतची ही वाढ होणार आहे. संस्थात्मक व व्यावसायिक वापराच्या पाण्याच्या शुल्कातही वाढ होणार आहे. स्थायी समितीने या प्रस्तावाला मंजुरी न देता तो परत पाठविला. पाच टक्के पाणीपट्टी दरवाढीचे अधिकार महापालिका आयुक्तांना आहेत. सभागृहात या प्रस्तावाला मंजुरी दिल्यानंतर सुधारित दरवाढ लागू होईल, अशी माहिती स्थायी समितीचे अध्यक्ष पिंटू झलके यांनी दिली.
कोरोनात दरवाढीचा बोजा नको
पाणीपट्टीत दरवाढ ही प्रचलित व दरवर्षी होणारी असली तरी कोरोना संसर्गामुळे व्यवसायिक, नोकरदार आर्थिक अडचणीत सापडले आहेत. त्यात सर्वसामान्यांना या दरवाढीचा बोजा नको अशी भूमिका स्थायी समितीने मांडली. दरवर्षी एप्रिल महिन्यात पाणीपट्टी दरवाढ केली जाते मात्र यावर्षी उशिराने ही दरवाढ लागू केली जाणार आहे. यात सर्व स्तरातील पाण्याचे दर ३५ पैसे ते एक रुपयांपर्यंत वाढतील
१३ कोटींचा महसूल वाढणार
पुढील आर्थिक वर्षात मनपाला पाणीपट्टीच्या माध्यमातून २६० कोटींचा महसूल अपेक्षित आहे. यात पाणी पट्टीतून १३ कोटी गृहीत धरण्यात आलेले आहे.
संस्थात्मक वापरासाठीच्या तीन स्तरातील ही वाढ आहे. निवासी पाणीवापराच्या तुलनेत व्यावसायिक वापरासाठी पाणीशुल्क अधिक आहे. यामुळे व्यावसायिकावर पाणीपट्टीचा बोजा अधिक पडणार आहे.
नागपूर : ५ ऑगस्ट रोजी अयोध्येत श्रीराम मंदिराचे भूमिपूजन होणार आहे. ‘कोरोना’मुळे तेथे निमंत्रितानाच प्रवेश आहे. त्यामुळे नागपूरलाच अयोध्यामय करण्यासाठी भाजपकडून पावले उचलण्यात आली आहेत. यानिमित्ताने नागपुरात ३०० ठिकाणी ‘रामधून’ वाजवून आनंदोत्सव साजरा करण्यात येणार आहे. शिवाय चौकाचौकात विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात येणार असून, सायंकाळी मंदिरांसह अनेक ठिकाणी रोषणाई करण्यात येईल.
भूमिपूजनाच्या निमित्ताने नगरसेवक तसेच विविध आघाड्यांचे पदाधिकारी रामपूजन करतील; सोबतच प्रसाद वितरण, भजन, कीर्तन यांचे आयोजन करण्यात येईल. मोठ्या चौकात आतषबाजी करण्यात येईल व सायंकाळी परिसरातील मंदिरांमध्ये रोषणाई करण्यात येईल.
नागरिकांनीदेखील सायंकाळी घरासमोर दिवे लावून या आनंदोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन शहराध्यक्ष आ. प्रवीण दटके यांनी केले आहे. शहरातील काही चौकांमध्ये त्यादृष्टीने सजावट करण्यासदेखील सुरुवात झाली आहे. सर्व आयोजनात सहभागी असलेल्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना ‘कोरोना’संदर्भात काळजी घेत व ‘सोशल डिस्टन्सिंग’ पाळत काम करण्याची सूचना करण्यात आली आहे. शिवाय नागरिकांनीदेखील काळजी घ्यावी असे भाजपातर्फे सांगण्यात आले आहे.
नागपूर : देशात २०१९-२० या वर्षाला २५.३७ लाख टन कागदाचा वापर झाल्याची नोंद आहे. विशेष म्हणजे यात दरवर्षी १० टक्क्याची वाढ होत असल्याची नोंद असोसिएशन ऑफ चेंबर ऑफ कॉमर्स अॅन्ड इंडस्ट्री ऑफ इंडियाने केली आहे. कोरोना संकटाच्या काळात यामध्ये कमतरता आली असली तरी देशातील सर्वात वाढणारे क्षेत्र असून यातून प्रत्यक्ष-अप्रत्यक्षपणे १५ लाख लोकांना रोजगार मिळत आहे.
माजी पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू यांनी १ ऑगस्ट १९४० रोजी देशातील पहिली पेपर मिल पुणे येथे सुरू केली. पेपर मिल्स असोसिएशन सदस्यांच्या मागणीनंतर केंद्र शासनाने हा दिवस नॅशनल पेपर डे म्हणून साजरा करण्यास मान्यता दिली आहे. यानिमित्त दि नागपूर पेपर ट्रेडर्स असोसिएशनचे माजी अध्यक्ष व पेपर डे कमिटीचे चेअरमन असीम बोरडिया यांनी पेपर उद्योगाच्या सद्यस्थितीची माहिती दिली. आज देशभरात ६०० पेपर मिल्स कार्यरत असून जगात सर्वात मोठी पेपर इंडस्ट्री म्हणून भारताची ओळख आहे.
विशेष म्हणजे भारत हा लेखन, प्रिन्टींग तसेच झेरॉक्स पेपरचा सर्वात मोठा निर्यातदार देश आहे. शिवाय पॅकेज व कोटेड पेपरची निर्मितीही मोठ्या प्रमाणात होत आहे. दरम्यान युएसए, युरोप, दुबई, सिंगापूर आदी देशांमधून टिशू पेपर, टि-बॅग टिशू, फिल्टर पेपर, मेडिकल ग्रेड कोटेड पेपर आदींची आयात केली जाते.
मात्र असे असले तरी पेपर उद्योग पर्यावरणासाठी हानीकारक असल्याची बदनामी होत असल्याची खंत असीम बोरडिया यांनी व्यक्त केली. हा प्रकार या उद्योगाविषयी संभ्रम पसरविणारा आहे. वास्तविक ७७ टक्के पेपर उत्पादन टाकाऊ वस्तूंपासून होते. ४२ टक्के कृषी वेस्ट (धान व गव्हाचे कुटार) आणि ३५ टक्के टाकाऊ पेपर (रद्दी) रिसायकल करून. यातून रोजगार निर्मितीच होत आहे. उर्वरित २३ टक्के युकेलिप्टस व बांबूच्या वूड पल्पपासून. त्यातही वनसंवर्धनाच्या नवीन धोरणानुसार पेपर मिल्स मालकांना वृक्ष कापल्यानंतर पाचपट वृक्षलागवड करणे बंधनकारक करण्यात आले असल्याने तोही धोका कमी झाला आहे. उलट यामुळे कृषी रोजगाराला चालना मिळत आहे. त्यामुळे पेपर उद्योगाबाबत संभ्रम पसरविण्यात येऊ नये, असे आवाहन त्यांनी केले.
१५ लाख टन वूडपल्पची गरज
सध्या पेपर उद्योगात वर्षाला ११ लाख टन वूडपल्पची गरज आहे आणि ९ लाख टन वूडपल्प उपलब्ध आहे. उरलेली गरज पूर्ण करण्यासाठी विदेशातून वूडपल्प आयात करावा लागतो आहे. २०२४-२५ मध्ये ही गरज १५ लाख टनापर्यंत वाढणार आहे. मात्र गेल्या ८-१० वर्षापासून विविध राज्यांनी कायद्यात बदल करीत बांबूच्या व्यावसायिक वृक्षारोपणाला मान्यता दिली आहे. शिवाय या काळात पेपर मिल्स मालकांनीही नियमानुसार वृक्षलागवड केली असून येत्या काळात ही तफावत भरेल आणि गरजेपेक्षा जास्त वूडपल्पचे उत्पादन होईल, असा विश्वास बोरडिया यांनी व्यक्त केला.
नागपूर : कोरोनामुळे एसटीची चाके ठप्प झाली आहेत. त्यामुळे उत्पन्न बंद झाले आहे. गुजरात, आंध्रप्रदेश, तेलंगणा, हिमाचल आदी राज्यांमध्ये कोरोनाच्या संकटात महामंडळाच्या कर्मचाऱ्यांचे वेतन तेथील राज्य शासन देत आहे. परंतु महाराष्ट्रात एसटी कर्मचाऱ्यांसोबत दुजाभाव करण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाच्या प्रत्येक उपक्रमात एसटी मोलाची साथ देते. परंतु एसटी महामंडळ संकटात असताना महाराष्ट्र शासनाने मदतीचा हात पुढे न केल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांत संतापाची लाट उसळली आहे.
एसटी महामंडळ राज्य शासनाचा उपक्रम आहे. महाराष्ट्र शासनाच्या वतीने अनेक योजना राबविण्यात येतात. यात विद्यार्थी, अपंग, पत्रकार, ज्येष्ठ नागरिक आदींचा समावेश आहे. या योजनांचे नेहमीच महाराष्ट्र शासनाकडे कोट्यवधी रुपये शिल्लक असतात. कोरोनाच्या संकटात हा निधी महाराष्ट्र शासनाने दिलासुद्धा आहे. परंतु गुजरात, आंध प्रदेश, तेलंगणा, हिमाचल प्रदेश आदी राज्यात येथील एसटी महामंडळांना राज्य शासन मदत करीत असल्याचे महाराष्ट्र एसटी वर्कर्स कामगार काँग्रेस (इंटक)चे राज्य प्रसिद्धी प्रमुख सुभाष गोजे यांनी सांगितले. महाराष्ट्रात मात्र विपरीत परिस्थिती आहे.
मार्च महिन्याचे २५ टक्के, मे महिन्याचे ५० टक्के वेतन तसेच जून महिन्याचे १०० टक्के वेतन कर्मचाऱ्यांना मिळाले नसल्यामुळे त्यांची अवस्था बिकट झाली आहे. अशा परिस्थितीत महाराष्ट्र शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनाची जबाबदारी उचलण्याची मागणी एसटीचे कर्मचारी करीत आहेत. कोरोनाच्या संकटात एसटीच्या कर्मचाऱ्यांनी जीवाची बाजी लावून परराज्यातील कामगारांना त्यांच्या सीमेपर्यंत सुखरूप पोहोचविले. त्यामुळे एसटीच्या वतीने राबविण्यात येणारे उपक्रम लक्षात घेऊन राज्य शासनाने एसटी कर्मचाऱ्यांच्या वेतनासाठी सकारात्मक पाऊल उचलण्याची मागणी होत आहे.
एसटीला तातडीने मदतीची गरज
राज्यातील उत्पादित नसलेल्या महामंडळासह शासकीय कर्मचाऱ्यांचे वेतन दिले जात आहे. परंतु कोट्यवधी रुपये कराच्या माध्यमातून देणाऱ्या एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांचे तीन महिन्यांचे वेतन थकले आहे. त्यामुळे राज्य शासनाने तात्काळ विशेष अर्थसाहाय्य देऊन कर्मचाऱ्यांना वेतन द्यावे.’
मुकेश तिगोटे, सरचिटणीस, महाराष्ट्र एसटी वर्कर्स काँग्रेस (इंटक)
नागपूर : यावर्षी रक्षाबंधन, गोकुळाष्टमी, पोळा, हरितालिका, गणेशोत्सव, गौरीपूजन हे सण ऑगस्ट महिन्यात येत असल्याने व्यापाऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण असून खरेदीला उधाण येणार आहे. चार महिन्यांच्या मंदीनंतर ऑगस्ट महिन्यात चांगल्या व्यवसायाची व्यापाऱ्यांना अपेक्षा आहे. एकीकडे कोरोना संसर्गाची भीती आणि दुसरीकडे व्यवसायाची संधी, यावर मात करीत यंदाच्या ऑगस्टमध्ये येणारे सण ‘कॅश’ करण्याची तयारी व्यापाऱ्यांनी चालविली आहे.
जीवनाला अध्यात्म, भक्तिभावाचा स्पर्श देण्यासाठी सर्वच सण-उत्सवांना देवकल्पना, पौराणिक कथा-कल्पनांची जोड दिली आहे. विशिष्ट देवतेचे अधिष्ठान, श्रद्धा, भक्तिभाव, पूजा, व्रत, नैवेद्य इत्यादींची जोड दिल्यामुळे सण धार्मिक भावनेने, श्रद्धेने साजरे केले जातात. या सणांची व्यापारी आतुरतेने वाट पाहत असतात. अनेक वर्षांनंतर हिंदू संस्कृतीत साजरे करण्यात येणारे सहा सण ऑगस्ट महिन्यातच आले आहेत. खाद्यान्नापासून ते नवीन वस्तू खरेदीचे मुहूर्त याच महिन्यात आहेत. ऑटोमोबाईल क्षेत्र असो वा इलेक्ट्रॉनिक्स आणि सजावटीच्या वस्तूंच्या बाजारात उत्साहाचे वातावरण राहणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स क्षेत्रात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी कंपन्यांनी नवीन उत्पादने आणि योजना आणल्या आहेत. याची तयारी शोरूम संचालकांनी आतापासूनच सुरू केल्याची माहिती व्यावसायिक व्यावसायिकांनी लोकमतशी बोलताना दिली.
गणेशोत्सवाच्या पहिल्या दिवशी सोने-चांदी, दुचाकी-चारचाकी, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू आणि नवीन घर खरेदीची परंपरा आहे. या निमित्ताने दुकानदारांनी तयारी चालविली आहे. ग्राहकांना खरेदीसाठी फायनान्स कंपन्यांच्या शून्य टक्के योजना आहेत. याशिवाय सणांची खाद्यसंस्कृती आजही भारतीय समाजात चांगलीच मूळ धरून आहे. रक्षाबंधनानिमित्त नामांकित कंपन्यांनी बहिणींना भेट देण्यासाठी आकर्षक पॅकिंगमध्ये भेटवस्तू आणि चॉकलेट बाजारात आणले आहेत. गणेशोत्सवात सर्वच क्षेत्रातील व्यापाऱ्यांना व्यवसायाची संधी आहे. त्यात सजावटीच्या वस्तूंपासून खाद्यान्न कंपन्यांना सर्वाधिक व्यवसायाची अपेक्षा आहे.
३ ऑगस्ट रक्षाबंधन
१२ ऑगस्ट गोकुळाष्टमी
१८ ऑगस्ट पोळा
२१ ऑगस्ट हरितालिका
२२ ऑगस्ट श्री गणेश चतुर्थी (गणेश स्थापना)
२६ ऑगस्ट गौरीपूजन
Makar Sankranti Wishes : Makara Sankranti (Sankranthi) is a Hindu festival that encourages people to live in peace and harmony. Here are best quotes,...