नागपूरचे महापौर संदीप जोशी सात दिवसांच्या स्वयंविलगीकरणात

संदीप जोशी

नागपूर: कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आलेल्या व्यक्तीच्या संपर्कात आल्याने सावधगिरी बाळगत नागपूरचे महापौर संदीप जोशी यांनी सात दिवस विलग राहण्याचा निर्णय घेतला आहे. गुरुवारी सकाळी त्यांनी टिष्ट्वटरवर ही पोस्ट टाकली आहे.
या पोस्टमध्ये त्यांनी, आपण डॉक्टरांच्या सल्ल्याने विलग राहण्याचा निर्णय घेतला आहे असे म्हटले आहे. तसेच ज्या व्यक्ती आपल्या संपर्कात बुधवार संध्याकाळपासून होत्या, त्यांनीही स्वविलगीकरणाचा निर्णय घ्यावा असे आवाहन केले आहे.