Home Blog Page 69

आजपासून नवे निर्बंध; हे असेल सुरू

about nagpur lockdown

मुंबई: महाराष्ट्रात ओसरण्याच्या वाटेवर असलेली कोरोना लाट पुन्हा एकदा उचल खात असल्याने सरकारने शुक्रवारपासून नवे निर्बंध लावले आहेत. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करण्यासाठी पाच टप्पे जाहीर करण्यात आले होते. मात्र, आता राज्य सरकारच्या नव्या आदेशानुसार सर्व जिल्ह्यांना आणि महापालिकांना तिसऱ्या टप्प्यातील निर्बंधच लागू करावे लागणार आहेत.

राज्यात वाढत असलेली रुग्णसंख्या आणि डेल्टा प्लसचे रुग्ण वाढत आहेत. ही चिंता वाढत असल्याने संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील नियमावाली लागू नसतील. जिल्हाधिकाऱ्यांना आठवड्याचा आरटीपीसीआर चाचण्यांचा पॉझिटिव्हिटी दर लक्षात घ्यावा लागणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांना पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू करायचे असतील, तर त्यांना मागील दोन आठवड्यांतील करोना रुग्णसंख्येचा अभ्यास करावा लागेल. जर कोरोना रुग्णसंख्येमध्ये वाढ होत असल्याचे दिसत असेल, तर वरील टप्प्यातील निर्बंध लागू करावे लागतील.

काय सुरू? काय बंद?

  • अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी सात ते दुपारी दोनपर्यंत
    इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते दुपारी दोन यावेळेत खुली राहतील. सर्व मॉल आणि थिएटर बंद राहतील.
  • सोमवार ते शुक्रवार हॉटेल सेवा फक्‍त ५० टक्‍के क्षमतेने दुपारी दोनपर्यंत खुली राहतील.
  • पार्सल व्यवस्था असेल. ही सुविधा शनिवार-रविवार बंद राहील.
  • मुंबईतील लोकल सेवा आणि रेल्वे बंद राहतील.
  • मॉर्निंग वॉक, मैदानांवर व्यायाम, सायकलिंग पहाटे पाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंत
  • खासगी आणि सरकारी कार्यालये ५० टक्के क्षमतेने सुरू
  • सोमवार ते शनिवार चित्रीकरणास स्टुडिओत परवानगी.
  • सोमवार ते शुक्रवार मनोरंजन कार्यक्रम ५० टक्के क्षमतेने दुपारी दोन वाजेपर्यंत
  • लग्नसोहळ्यास ५० तर अंत्यविधीला २० लोकांना उपस्थितीची मुभा
  • बांधकाम दुपारी दोन वाजेपर्यंत
  • शेतीविषयक सर्व कामांना मुभा
  • ई कॉमर्स दुपारी दोन वाजेपर्यंत

पीएसआय बनविण्याचे आमिष देऊन महिला होमगार्डचा विनयभंग करणारा ठाणेदार निलंबित

नृत्य शिक्षकाने दारू पाजून २२ वर्षीय विद्यार्थिनीवर केला अत्याचार

नागपूर – महिला होमगार्डला आपल्या कक्षात बोलवून तिच्याशी लज्जास्पद वर्तन करणारे यशोधरानगरचे ठाणेदार अशोक मेश्राम यांना आज निलंबित करण्यात आले. एवढेच नव्हे तर ज्या ठाण्यात ते गुरुवारपर्यंत ठाणेदार होते, त्याच यशोधरानगर पोलीस ठाण्यात त्यांच्यावर विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला. या घडामोडीमुळे पोलीस दलात प्रचंड खळबळ निर्माण झाली आहे.

तक्रार करणारी महिला होमगार्ड २४ वर्षांची आहे. ती २ जूनपासून यशोधरानगर पोलीस ठाण्यात कर्तव्यावर होती. ठाणेदार मेश्रामने तिची ड्युटी आपल्या कक्षासमोर (बेल ड्युटी) लावून घेतली. तिची काैटुंबिक स्थिती विचारून तिला ‘तुला पीएसआय’ बनवितो, असे सांगून तिच्याशी जवळीक निर्माण करण्याचे प्रयत्न केले. तिला फोन आणि मेसेज करूनही सलगी साधली. ती फारसा प्रतिसाद देत नसल्याचे पाहून बुधवारी सायंकाळी मेश्रामने तिला आपल्या कक्षात बोलविले. तिला लाईन गार्ड (वर्दीच्या खांद्यावर असलेली दोरी)चे बटन लावून मागण्याच्या बहाण्याने तिच्याशी लज्जास्पद वर्तन केले. या प्रकारामुळे महिला होमगार्ड रडू लागली. तेवढ्यात तिचा मावसभाऊ पोलीस ठाण्यात आला. त्याला पीडित महिलेने हा प्रकार सांगितला. त्याने हे प्रकरण पोलीस उपायुक्त नीलोत्पल यांच्याकडे नेले. निलोत्पल यांनी पोलीस आयुक्त अमितेशकुमार यांना मेश्रामविरोधातील तक्रार सांगितली. आयुक्तांनी त्याची प्रकरणाची गंभीर दखल घेतली. मेश्राम यांची गुरुवारी सकाळीच ठाण्यातून उचलबांगडी करून त्यांना नियंत्रण कक्षात रुजू होण्याचे आदेश दिले. दुसरीकडे या गंभीर प्रकरणाची चाैकशी परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त विनीता साहू यांच्याकडे सोपविली. साहू यांनी गुरुवारी दिवसभर पीडित महिला होमगार्ड, तसेच ठाण्यात अन्य काही महिला आणि पुरुष कर्मचाऱ्यांची चौकशी केली. चाैकशीत अनेक महिलांनी मेश्राम यांच्या तक्रारी केल्या. तसा अहवाल उपायुक्त साहू यांनी पोलीस आयुक्तांना दिला. त्यावरून त्यांनी गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. या पार्श्वभूमीवर, मेश्रामविरुद्ध विनयभंग करून धमकी दिल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल करण्यात आला. त्यानंतर पोलीस आयुक्तांनी मेश्रामच्या निलंबनाचे आदेश काढले.

एक हजार रुपये दिले

विनयभंग केल्यानंतर होमगार्ड महिलेने विरोध केल्याने मेश्राम घाबरला. त्याने तिच्या हातात एक हजार रुपये कोंबून तिला गप्प राहण्यास बजावले. मात्र, पीडितेला तिच्या मैत्रीणींनी हिम्मत दिल्याने या प्रकरणाचा बोभाटा झाला.

फिरायला जाण्याची ईच्छा

मेश्रामचे यापूर्वीही महिलेच्या संबंधाने दोनदा बोंब झाली. दोन वर्षांपूर्वी लुटेरी दुल्हनशी सलगी असूनही काही मित्रांमुळे ते बचावले. यशोधरानगर ठाण्यात एकीला १० हजारांचे गिफ्ट देऊन फिरायला नेण्याची ईच्छा व्यक्त केल्याचेही प्रकरण या तक्रारीत नमूद आहे. त्यामुळे तो दुसरा गुन्हा दाखल होण्याची शक्यताही वर्तविली जात आहे.

5G फोन, पाउण लाख जॉब्ज… Reliance च्या AGM मध्ये झाल्या 10 मोठ्या घोषणा

jio
Mukesh Ambani

मुंबई : रिलायन्सची 44 वी वार्षिक सर्वसाधारण सभा 24 जूनला झाली. Coronavirus च्या संकटाच्या पार्श्वभूमीवर या वर्षीची सभाही (RIL AGM) व्हर्च्युअल स्वरूपात झाली. रिलायन्सचे चेअरमन मुकेश अंबानी (Mukesh Ambani) यांनी या AGM मध्ये काही महत्त्वपूर्ण घोषणा केल्या. Google बरोबरच्या सहकार्यातून तयार झालेला Jio Phone Next हा देशातला पहिला 5G फोन गणेश चतुर्थीला लाँच करण्याची सर्वांत मोठी घोषणा मुकेश अंबानी यांनी केली. याशिवाय त्यांनी वर्षभरातले इतरही प्लॅन सांगितले.

पाहा रिलायन्सच्या सर्वसाधारण सभेतल्या 10 मोठ्या घोषणा..

1. रिलायन्सच्या 44 व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत (Reliance AGM)सर्वांत मोठी घोषणा झाली 5G फोनची. Jio Phone Next गुगलच्या सहकार्याने तयार केला आहे. तो येत्या 10 सप्टेंबरला लाँच होईल, अशी घोषणा मुकेश अंबानी यांनी केली.

2. गेल्या वर्षभरात रियान्सने 75 हजार नव्या नोकऱ्या दिल्या. मुकेश अंबानी यांनी सांगितलं की त्यांची ही कंपनी देशात सर्वाधिक GST, VAT आणि इन्कम टॅक्स भरणारी कंपनी आहे.

3. गेल्या वर्षभरात रिलायन्सचा एकत्रित रेव्हेन्यू 5,40,000 कोटी रुपये एवढा होता. यातले इक्विटी कॅपिटलमधून 3.24 लाख कोटी रुपये आले. रिलायन्सच्या शेअर होल्डर्सना गुंतवणुकीतून चौपट रिटर्न मिळाले.

4. मुकेश अंबानी यांनी AGM मध्ये सांगितलं की वर्षभरात त्यांचा व्यापार अपेक्षेपेक्षा जास्त वाढला. अत्यंत वाईट परिस्थितीतही हा फायदा झाला आणि त्यातून मानवतेच्या सेवेसाठी कोरोना काळात रिलायन्स परिवार मोठं काम करू शकले.

5. मुकेश अंबानी यांनी ग्रीन एनर्जी प्लॅनची घोषणा केली. गुजरातच्या जामनगरमध्ये 5000 एकर जागेत धीरूभाई अंबानी ग्रीन एनर्जी गीगा कॉम्प्लेक्स विकसित करण्यात येत आहे. यासाठी 60 हजार कोटी रुपये गुंतवणूक करण्यात येणार आहे.

6. रिलायन्स इंडस्ट्रील ग्लोबल होणार, अशी घोषणा करण्यात आली. यासिर अल रुमैयन हे सौदी अराम्कोचे चेअरमन रिलायन्सला सामील झाल्याने ही प्रक्रिया सुरू झाल्याचं अंबानी यांनी सांगितलं.

7. सौदी अराम्कोबरोबरचा व्यवहार वर्षभरात प्रत्यक्ष सुरू होईल, अशी घोषणा मुकेश अंबानी यांनी केली.

8. रिलायन्स व्हॅल्यू चेन पार्टनरशिप आणि फ्यूचर टेक्नॉलॉजीवर या वर्षात 15 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्याची घोषणा अंबानी यांनी AGM मध्ये केली.

9. पर्यावरणस्नेही न्यू एनर्जी बिझनेस सुरू करण्याची घोषणाही मुकेश अंबानी यांनी केली. रिलायन्स न्यू एनर्जी कौन्सिल स्थापन करण्यात आली आहे. त्याअंतर्गत 2021 मध्येच 100 गिगावॉट क्षमतेची सोलर एनर्जी निर्माण केली जाईल.

10. जिओ होणार जगातली दोन नंबरची सर्वात मोठी मोबाईल डेटा कंपनी, अशी घोषणाही मुकेश अंबानी यांनी रिलायन्सच्या AGM मध्ये केली. देशात सध्या जिओचे 40 कोटींहून अधिक सबस्क्रायबर्स आहेत.

क्राईम कॅपिटल, गेल्या चार दिवसांत 10 जणांच्या हत्येनं हादरलं नागपूर

Senior citizen found killed in Ganeshpeth flat Nagpur

नागपूर, 25 जून: नागपुरात (Nagpur Crime) गेल्या चार दिवसात दहा जणांची हत्या झाल्याची माहिती मिळतेय. दिवसेंदिवस गंभीर गुन्ह्यांच्या घटनांमुळे क्राईम कॅपिटल (Crime Captial) अशी ओळख नागपूरची बनली आहे. या दहा जणांच्या हत्येनं नागपूर जिल्हा चांगलाच हादरून गेला आहे. या वाढत्या गुन्हेगारीमुळे (Crime News) नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे.

दरम्यान दिलासादायक बाब म्हणजे या गुन्ह्यांतील आरोपींना अटक करण्यात पोलिसांना यश आलं आहे. चार दिवसात दहा जणांची हत्या झाली आहे. या दहापैकी 8 हत्या नागपूर शहर तर दोन हत्या नागपूर जिल्ह्यातल्या कुही आणि उमरेड ग्रामीण भागात झाली आहे.

20 जून रोजी पहिली घटना

नागपूर जिल्ह्यातल्या उमरेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत संध्याकाळी साडे पाचच्या सुमारास शुभम ठवकर या ट्रक चालकाची हत्या झाली. दगड, विटा, फरशीनं शुभमची हत्या करणाऱ्या दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली. शोएब उर्फ जॉनी शाहिद शेख आणि विक्रांत ऊर्फ विकी महेंद्रसिंग चंदेल अशी दोन्ही आरोपींची नावं आहेत. मृत शुभम आणि शोएब हे दोघेही ट्रक चालक होते. काही दिवसांपूर्वी या दोघांमध्ये भांडण झालं होतं. त्याचाच राग मनात ठेवून आरोपींनी शुभमची हत्या केली.

20 जूनलाच दुसरी घटना

कुही तालुक्यातील मांगली शिवार येथे शेतावर काम करणाऱ्या व्यक्तीचा मृतदेह आढळून आला. वकील ज्ञानेश्वर फुले हे त्यांच्या पत्नीसह शेतावर गेले होते. त्यावेळी त्यांना त्यांच्या शेतावर काम करणारा नरेंश कुरुडकरचा मृतदेह फार्महाऊसमध्ये सापडला. फुले यांच्या शेतावर काही दिवसांपूर्वी अविनाश नरुळे हा ट्रॅक्टरचालक काम करत होता. मात्र तो डिझेल चोरी करायचा म्हणून त्याला कामावरुन काढून टाकण्यात आलं होतं. अविनाशनं राकेश महाजन याच्यासोबत हात मिळवणी करुन नरेशची हत्या केल्याचं तपासात समोर आलं.

21 जून रोजी तिसरी घटना

नागपूर शहरातील पाचपावली पोलीस स्टेशनच्या हद्दीत संपत्तीच्या वादातून पुतण्या आणि त्याच्या पत्नीनं काकाची हत्या केली. नितीन निनावे आणि त्याची पत्नी माधुरी निनावे अशी आरोपींची नावं आहेत. पोलिसांनी दोन्ही आरोपींना अटक केली आहे. तर नामदेव लक्ष्मण निनावे असं मृत काकाचं नाव आहे. काका नामदेव आणि पुतण्या नितीन एकाच घरात राहायचे. संपत्तीवरून त्यांच्यात दररोज वाद व्हायचे. दोन दिवसांपूर्वी देखील त्यांच्यात असाच वाद झाला. काकानं नितीनच्या मुलाची गळा आवळून हत्या करण्याची धमकी दिली होती. त्यामुळे संतापलेल्या नितीनने काकांच्या डोक्यावर काठीनं वार करुन त्यांची हत्या केली

21 जूनला नागपूर हादरलं (चौथी घटना)

तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीतील टिमकी परिसरात एकाच कुटुंबातील पाच जणांची हत्या केली. हत्या केल्यानंतर आरोपी आलोक मातूरकर यानंही आत्महत्या केली. आलोक हा टेलर होता. मेहुणीसोबत असलेल्या अनैतिक संबंधांमुळे आलोकचे कुटुंब आणि मेहुणीच्या कुटुंबात वाद सुरु होते. आलोकनं आपल्या पत्नीसह दोन मुलांची आणि सासू, मेहुणीची हत्या केली. पहाटेच्या सुमारास आरोपी आलोकनं स्वतः देखील आत्महत्या केली.

22 जून ला पाचवी घटना

योगेश धोंगडे या 30 वर्षीय तरुणाची अनैतिक संबंध असल्याचा संशय आणि जुगाराच्या जुन्या वादातून हत्या झाली. ही घटना नागपूर शहरातील कोतवाली पोलीस स्टेशन अंतर्गत शिवाजी नगर भागात घडली. स्थानिक गुंड गोलू धोटे याला योगेशचे आपल्या पत्नीसोबत अनैतिक संबंध असल्याचा संशय होता. याच संशयातून गुंड दोन दिवसांपासून त्याचा शोध घेत होता. घटनेच्या दिवशीचं गोलूने योगेशच्या घरावर देखील हल्ला केला. मात्र, योगेश पळून गेला. त्यानंतर गोलू आणि त्याच्या साथीदाराने योगेशला जवळच्या नाग नदीच्या पात्रात गाठलं आणि धारधार शस्त्राने त्याची हत्या केली.

22 जूनला सहावी घटना

अक्षय लांडगे आणि त्याच्या साथीदारांनी शेषराव बनसोड या तरुणाची हत्या केली.जरीपटका पोलीस स्टेशन अंतर्गत भीमसेना नगरात ही घटना घडली आहे. एक महिन्यांपूर्वी मृत शेषराव बनसोड आणि अक्षय लांडगे यांच्यात वाद झाला होता. याचाच राग मनात धरुन आरोपीनं बनसोड याची हत्या केली आहे. अक्षयविरोधात हत्येचा गुन्हा नोंदवत त्याला अटक करण्यात आली.

बसमध्ये आक्षेपार्ह स्थितीत आढळलं ‘कपल’; पोलिसांनी दोघांना अर्धनग्न अवस्थेतच पोलीस ठाण्यात आणलं!

Bus

मध्य प्रदेशच्या रीवा जिल्ह्यात पोलिसांचा अमानवी चेहरा समोर आला आहे. जिल्ह्यातील शाहपूर हद्दीच्या पोलिसांनी एका बसमध्ये प्रेमी युगुलाला आक्षेपार्ह स्थितीत पकडलं. पण कारवाई करताना पोलिसांसोबत एकही महिला पोलीस कर्मचारी सोबत नव्हती आणि पोलिसांनी सुरूवातीला युगुलाला शिवीगाळ केली. त्यानंतर तरुणीला अर्धनग्न अवस्थेतच पोलीस ठाण्यात घेऊन जाण्याचा धक्कादायक प्रकार पोलिसांनी केला आहे.

संबंधित घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. व्हिडिओ पाहिल्यास रीवा पोलिसांच्या अमानवी कृत्याचा संताप आल्याशिवाय राहवत नाही अशी वाईट वागणूक पोलिसांनी तरुणीला दिली आहे. दरम्यान, घटनेच्या चौकशीचे आदेश वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार एका बसमध्ये प्रेमी युगुल आक्षेपार्ह स्थितीत आढळून आले होते. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. मग पोलीस बसमध्ये दाखल झाले. त्यावेळी बसमध्ये आक्षेपार्ह स्थितीत युगुल आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यासोबत चुकीच्या पद्धतीनं व्यवहार करणं सुरू केलं. पोलिसांनी चक्क तरुणीला त्याच अवस्थेत पोलीस ठाण्यात नेण्याचा प्रताप केला आहे.

विवाहबाह्य संबंधातून नागपुरात पत्नीच्या प्रियकराची हत्या, नाल्याचं पाणी लालेलाल

नागपूर : नागपुरात हत्यांचं सत्र थांबण्याचं नाव घेताना दिसत नाही. कोतवाली पोलीस स्टेशन हद्दीतील शिवाजी नगर परिसरात भरदिवसा योगेश धोंगडे नावाच्या युवकाची हत्या करण्यात आली. अनैतिक संबंधातून ही हत्या झाली असण्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. आरोपीने तरुणाला नाल्यात उतरवून धारदार शस्त्राने वार केले. यावेळी त्याच्या रक्ताने नाल्याचे पाणी लालेलाल झाले. बघ्यांनी या घटनेचा व्हिडीओ शूट केला, मात्र कोणीही मदतीला न आल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. (Nagpur Man killed out of Extra Marital Affair)

कुटुंबातील पाच जणांची हत्या करुन कुटुंबप्रमुखाने आत्महत्या करण्याचा प्रकार नागपुरात ताजा असतानाच भरदिवसा शिवाजी नगर परिसरात आणखी एक हत्या घडली. आरोपी गोलू धोटे याच्या पत्नीशी त्याच परिसरात राहणाऱ्या योगेश धोंगडे याचे विवाहबाह्य संबंध असल्याचं बोललं जातं.

तरुणावर धारदार शस्त्राने वार

आरोपीने योगेशला बोलण्यासाठी नाग नाल्याजवळ बोलावलं होतं. यावेळी दोघांमधील वाद इतका विकोपाला गेला, की गोलूने त्याला नाल्यात उतरवत त्याच्यावर धारदार शस्त्राने वार केले. विशेष म्हणजे अनेक जण हा प्रकार बघत राहिले होते. त्यांनी या घटनेचा व्हिडीओही शूट केला. त्यानंतर आरोपी पसार झाला.

दरम्यान, तरुणावर हल्ला झाल्यामुळे त्याच्या रक्ताने नाग नदीचं पात्र लालेलाल झाल्याचं पाहायला मिळालं. हत्येच्या थराराची व्हिडीओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या प्रकरणी दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

मेव्हणीला चाकूचा दाखवत अतिप्रसंग?

दुसरीकडे, नागपुरात राहणाऱ्या आलोक माटूरकर याने पत्नी, दोन मुलं, सासू आणि मेव्हणी अशा पाच जणांची हत्या करुन आत्महत्या केली होती. सोमवारी हा प्रकार उघडकीस आल्यानंतर नागपूरसह संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. मात्र काही तासातच या प्रकरणात नवीन बाबी पुढे येताना दिसत आहेत. आरोपी आलोक माटूरकरने हत्या करण्यापूर्वी मेव्हणीला चाकूचा दाखवत अतिप्रसंग केल्याचा संशय आहे. त्यानंतर त्याने तिचा गळा कापला असावा. भाऊजी घरात शिरताच काहीतरी करेल याचा अंदाज आल्याने मेहुणीने मोबाईलमध्ये ऑडिओ रेकॉर्डिंग सुरु केले होते. त्यात त्यांच्या संघर्षाचा आवाजही रेकॉर्ड झाल्याची माहिती आहे.

हत्येचा कट आधीपासूनच रचला

इतकंच नाही तर आरोपीने हत्येचा प्लान आधीपासूनच आखला होता त्यासाठी त्याने ऑनलाईन चाकू मागवले होते. ते त्याच्या मुलीच्या नावाने आल्याचं पुढे आलं आहे. आरोपी हा महिलांना वश करण्याची विद्या घेत होता, असंही समोर येत आहे. मात्र त्याचा उपयोग त्याने यात केला की नाही याची माहिती घेतली जात आहे. पोलिसांनी यातील अनेक घटनांना दुजोराही दिला मात्र तपास सुरू असल्याने त्यावर पोलीस विशेष बोलण्याचं टाळत आहेत.

नागपूरला हादरवणाऱ्या या घटनेचा तपास पोलीस सगळ्याच बाजूने करत आहेत. यात नेमकं काय झालं आणि कोणती अशी कारणं होती की सर्वसाधारण व्यक्तीने आपल्या जवळच्या पाच जणांची मोठ्या निर्दयतेने हत्या केली, आणि आत्महत्याही केली, याचं पोलिसांसमोर आव्हान आहे. शव विच्छेदन अहवाल पुढे आल्यानंतर अनेक बाबी स्पष्ट होण्याची शक्यता आहे.

कोरोनामुक्त गावांमध्ये १०वी, १२वीचे वर्ग सुरू करण्याबाबत चाचपणी; मुख्यमंत्र्यांनी दिले निर्देश

महाराष्ट्र लॉकडाऊन

मुंबई : काही महिन्यांपासून कोरोनामुक्त झालेली व भविष्यातही कोरोनामुक्त राखण्याची खात्री देणाऱ्या गावांमध्ये इयत्ता दहावी आणि बारावीचे वर्ग सुरू करता येतील का, याची चाचपणी शालेय शिक्षण विभागाने करावी, असे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मंगळवारी एका बैठकीत दिले.

शिक्षण विभागाची बैठक मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झाली. शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. कोरोनामुक्त असलेले व भविष्यातही कोरोनामुक्त राहू अशी केवळ ग्वाही देणारी नव्हे तर त्यानुसार कृती करणाऱ्या गावांचा या बाबत विचार करावा, असे मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले.

बारावीच्या विद्यार्थ्यांचे मूल्याकंन करताना सीबीएससी बोर्डाने जाहीर केलेल्या १२ वीच्या मूल्यांकनाच्या धर्तीवर तसेच राज्याने १० वी साठी मूल्यांकनाची जी पद्धत निश्चित केली, त्याचा तुलनात्मक अभ्यास करावा. त्यानुसार अभ्यासपूर्ण प्रस्ताव सादर करावा, असेही मुख्यमंत्री म्हणाले.

कोरोनामुळे दोन्ही पालक गमावलेल्या विद्यार्थ्यांच्या पहिली ते बारावीपर्यंतचा शैक्षणिक खर्च शासनामार्फत उचलण्याची योजना प्रस्तावित करण्यात येत आहे, अशी माहिती गायकवाड यांनी दिली. यावर मुख्यमंत्र्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला असून यासाठी निधीसह प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या बैठकीत मान्यतेसाठी सादर करावा, अशा सूचना त्यांनी दिल्याचे गायकवाड यांनी सांगितले.

हिवरे बाजार पॅटर्न

ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते पोपटराव पवार यांच्या नेतृत्वात हिवरे बाजार (जि. अहमदनगर) येथे शाळा सुरू झाली आहे. गाव कोरोनामुक्त असल्याने जिल्हा प्रशासनाच्या सहकार्याने हे शक्य झाले. त्या धर्तीवर राज्यात आता चाचपणी केली जाईल.

राज्यातील सर्व शाळा सुरू करा : पोपटराव पवार

कोरोना नियमांची योग्यरीत्या अंमलबजावणी करत राज्यातील प्राथमिक व माध्यमिक विद्यालय सुरू करण्यास परवानगी द्यावी, अशी मागणी हिवरे बाजारचे सरपंच पोपटराव पवार यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे.

डेल्टा प्लस : कोरोनाच्या नव्या विषाणुंसंबंधी ३ राज्यांना केंद्राकडून सतर्काच्या सूचना; महाराष्ट्राचा समावेश

नवी दिल्ली  : करोनाच्या दुसऱ्या लाट ओसरू लागली असताना ‘डेल्टा प्लस’ या करोनाच्या नव्या प्रकाराने धोका निर्माण झालेला आहे. ६० टक्के वेगाने हा डेल्टा प्लस संक्रमित होत आहे. त्यामुळे केंद्रीय आरोग्य विभागाने महाराष्ट्र, केरळ आणि मध्य प्रदेश या राज्यांच्या मुख्य सचिवांना यासंदर्भात पत्र पाठवून सतर्क केलं आहे.

डेल्टा प्लस या नव्या प्रकाराचे बाधित रुग्ण कमी असले तरी, त्याची क्षमता आणि त्याच्या प्रसाराचा वेग जास्त आहे. त्यामुळे केंद्र सरकारने देशातील तीन राज्यांना तातडीने पावले उचलण्याचा इशारा दिला आहे. यामध्ये महाराष्ट्र, केरळ आणि मध्य प्रदेश या तीन राज्यांचा समावेश आहे.

डेल्टा प्लस या तीनही राज्यांमध्ये कोरोनाच्या व्हेरिएंटचे विषाणू रुग्णांमध्ये आढळून आले आहेत. त्यांना वेळीच आवर घालण्यासाठी केंद्राने या राज्यांना डेल्टा प्लसचे रुग्ण आढळलेल्या भागात निर्बंध आणि नियोजनात्मक पाऊलं उचलण्याचे आदेश दिलेले आहेत.

केंद्रीय आरोग्य विभागाच्या माहितीनुसार करोनाचा डेल्टा व्हेरिएंट भारतासह जगातल्या एकूण ८० देशांमध्ये सापडला आहे. मात्र, डेल्टा प्लस व्हेरिएंट आत्तापरर्यंत एकूण ९ देशांमध्ये आढळला आहे. यामध्ये अमेरिका, ब्रिटन, पोर्तुगाल, स्वित्झर्लंड, जपान, पोलंड, नेपाळ, चीन आणि रशिया या देशांचा समावेश आहे.

डेल्टा प्लसचे भारतात एकूण २२ रुग्ण सापडले आहेत. या २२ पैकी १६ रुग्ण महाराष्ट्राच्या रत्नागिरी आणि जळगावमध्ये आढळले आहेत. त्याशिवाय काही रुग्ण केरळ आणि मध्य प्रदेशमध्ये आढळले आहेत.

डेल्टा प्लस विषयी आढावा घेणाऱ्या आयएनएसएसीओजी (Indian SARS-CoV-2 Genomic Consortia) या गटाच्या अभ्यासातून आलेल्या निष्कर्षांच्या आधारावर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने डेल्टा प्लस प्रकाराविषयी महाराष्ट्र, केरळ आणि मध्य प्रदेश या राज्यांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे.

करोनाचा डेल्टा प्लस प्रकार महाराष्ट्रातील रत्नागिरी आणि जळगाव, केरळमधील पलक्कड आणि पथ्थनमथित्ता, मध्य प्रदेशमधील भोपाळ आणि शिवपुरी जिल्ह्यांमध्येआढळला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने या तीनही राज्यांना सल्ला दिला आहे की, स्थानिक सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापनाने या प्रकाराविषयी अधिक लक्षपूर्वक आणि कार्यक्षमपणे काम करणं आवश्यक आहे. आधीपासूनच या यंत्रणा व्यापक अर्थाने त्या पातळीवर काम करत असल्या, तरी डेल्टा प्लसबाबत अधित सतर्क राहण्याची गरज आरोग्य मंत्रालयानं व्यक्त केली आहे.

राज्यातील वटवाघूळांमध्ये पहिल्यांदाच ‘निपाह’ विषाणू आढळला; मृत्यूदर ६५% असल्यानं चिंतेत भर

fruit-bat nipah

मुंबई/पुणे: कोरोनाची दुसरी लाट ओसरली असताना तिसऱ्या लाटेचा धोका कायम आहे. तिसरी लाट थोपवण्यासाठी सध्या राज्यभरात लसीकरण अभियानाला वेग देण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यातच आता महाराष्ट्राची चिंता वाढवणारी बातमी आहे. राज्यातील वटवाघळांच्या दोन प्रजातींमध्ये निपाह विषाणू आढळून आला आहे. राज्यातील वटवाघळांमध्ये निपाह विषाणू आढळून येण्याची ही पहिलीच वेळ आहे. पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरोलॉजीच्या तज्ज्ञांनी याबद्दलचं संशोधन केलं आहे.

निपाह विषाणू असलेल्या वटवाघळांच्या प्रजाती साताऱ्यातल्या महाबळेश्वरमधील गुफेत मार्च २०२० मध्ये आढळून आल्या. याआधी राज्यात कधीही वटवाघळांमध्ये निपाह विषाणू आढळून आला नव्हता अशी माहिती याबद्दलचं संशोधन करणाऱ्या पथकाच्या प्रमुख डॉ. प्रज्ञा यादव यांनी दिली. देशात याआधी काही राज्यांमध्ये निपाह विषाणू आढळून आला आहे. हा विषाणू वटवाघूळांमधून माणसांमध्ये संक्रमित होतो.

निपाह विषाणू अतिशय धोकादायक मानला जातो. निपाहवर कोणतंही औषध किंवा लस उपलब्ध नाही. निपाह विषाणूची लागण झाल्यानंतरचा मृत्यूदर खूप जास्त आहे. कोरोनाची लागण झालेल्यांपैकी बहुतांश जण बरे होतात. देशातील जवळपास सगळ्याच राज्यांचा रिकव्हरी रेट ९० टक्क्यांच्या पुढे आहे. तर मृत्यूदर १ ते २ टक्क्यांच्या दरम्यान आहे. निपाहवर औषध उपलब्ध नसल्यानं मृत्यूदर तब्बल ६५ टक्क्यांच्या पुढे आहे.

गेल्या काही वर्षांपासून वटवाघळांमुळे विषाणू पसरत असल्याचं वारंवार समोर आलं आहे. इबोला, मारबर्ग यासारखे विषाणू वटवाघुळांमुळेच पसरले होते. कोरोना विषाणूच मूळदेखील वटवाघळांमध्येच असल्याची शक्यता काही तज्ज्ञांनी वर्तवली आहे.

निपाह विषाणूचा सर्वप्रथम १९९८-९९ साली मलेशियात आढळून आला. डुकरं आणि डुकरांची काळजी घेणाऱ्यांमध्ये तेव्हा हा विषाणू आढळून आला. त्यावेळी मृत्यूदर ४० टक्के होता. २००१ मध्ये पश्चिम बंगालच्या सिलिगुडीत निपाह आढळला. यानंतर २००७ मध्ये पश्चिम बंगालच्याच नाडिया जिल्ह्यात निपाह आढळला. २०१८ मध्ये केरळच्या कोझिकोडेत निपाहमुळे १८ जणांचा मृत्यू झाला. त्यानंतर २०१९ मध्ये पुन्हा कोझिकोडेत निपाह आढळून आला.

खासदार नवनीत राणा यांना दिलासा; जात प्रमाणपत्र रद्द करण्याच्या हायकोर्टाच्या निर्णयाला सुप्रीम कोर्टाची स्थगिती

नवी दिल्ली : बनावट कागदपत्रांच्या आधारे जात प्रमाणपत्र बनविले असल्याचा ठपका ठेवत मुंबई उच्च न्यायालयाने अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांचे ‘ते’ प्रमाणपत्र रद्द केले होते. सर्वोच्च न्यायालयाने या प्रकरणी आता खा. राणा यांना दिलासा देत उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे.

नवनीत राणा यांचे जात प्रमाणपत्र रद्द झाल्यानंतर त्यांची खासदारकी राहणार की जाणार, याचीही चर्चा सुरू झाली होती. दरम्यानच्या काळात त्यांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागितली होती. न्यायालयाने मंगळवारी झालेल्या सुनावणीदरम्यान उच्च न्यायालयाच्या निर्णयाला स्थगिती दिली. विशेष म्हणजे उच्च न्यायालयाने खा. राणा यांना दोन लाख रुपयांचा दंडही ठोठावला होता. शिवसेनेचे नेते आनंदराव अडसूळ यांचा 2019 च्या सार्वत्रिक निवडणुकीत पराभव करीत नवनीत राणा पहिल्यांदाच खासदार बनल्या होत्या.

खा. राणा यांनी अनुसूचित जातीचे असल्याबद्दलचे प्रमाणपत्र सादर केले होते. सदर प्रमानपत्रावर अडसूळ यांनी आक्षेप घेत याचिका दाखल केली होती. मुंबई हायकोर्टाच्या न्यायमूर्ती धनुका आणि न्यायमूर्ती बिश्त यांच्या खंडपीठाने बनावट कागदपत्रांच्या आधारे जात प्रमाणपत्र बनविले असल्याचा निष्कर्ष काढत राणा यांचे प्रमाणपत्र रद्द केले होते. सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली नसती तर राणा यांना खासदारकी गमवावी लागली असती.

धक्कादायक!! एकाच कुटुंबातील 5 जणांची हत्या करून आरोपीची आत्महत्या

Nagpur Crime News: Man kills neighbour in Kalamna

नागपूर : नागपूरमध्ये ( Nagpur) गुन्हेगारीच्या घटनांचे सत्र सुरू आहे. शहरातील तहसील पोलीस स्टेशनच्या (Tehsil Police Station) हद्दीत एकाच कुटुंबातील 5 जणांची हत्या (Murder of 5 members of the same family) करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. पाच जणांची हत्या केल्यानंतर एकाने आत्महत्या केली आहे. या घटनेमुळे नागपुरात एकच खळबळ उडाली आहे.

नागपूरमधील तहसील पोलीस ठाण्याच्या हद्दीत ही घटना घडली आहे. दुपारी 12 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. अलोक माथुरकर असं हत्या आणि आत्महत्या करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. अलोक माटूळकर यांने आपल्या कुटुंबातील पाच जणांची हत्या केली. हत्या केल्यानंतर स्वत: आत्महत्या केली आहे.

अलोक माटूळकर (Alok Matulkar) याने आपली पत्नी, मुलगी, मुलगा, सासू व मेव्हणीची हत्या केली. या हत्याकांडामुळे परिसरात एकच खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि पंचनामा करून सर्व मृतदेह ताब्यात घेतले आहे. मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहे.

अलोक हे टेलरिंगचे काम करायचे. प्रमोद भिसिकर यांच्या घरी भाड्याने राहायचे. कौटुंबिक कलहातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. अलोकने इतक्या टोकाचे पाऊल का उचलले, याचे कारण अद्याप समजू शकले नाही. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहे.

फेसबुकवरील मैत्री पडली महागात; महिलेची 2.5 कोटींची फसवणूक

Biggest Froud

जयपूर: राजस्थान पोलिसांनी फेसबुकवर (Facebook) मैत्री करुन 2.5 कोटी रुपयांचा सायबर फ्रॉड (Cyber Fraud) करणाऱ्या एका आरोपीला अटक केली आहे. आरोपी नीरज सूरीने फेसबुकवर एका महिलेशी मैत्री करुन तिला 3.9 मिलियन डॉलर संपत्तीची वारस बनवण्याच्या नावाने फसवणूक केली आहे. पोलिसांनी आरोपीला देहरादूनमधून अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 2017 मध्ये सवाई माधोपूर येथे राहणाऱ्या गुंजन शर्मा यांनी कोतवाली पोलीस ठाण्यात यासंदर्भात अहवाल दाखल केला. त्यानंतर पोलीस महासंचालकांच्या आदेशानुसार, जयपूर सायबर क्राईम पोलिसांनी मोठ्या तपासानंतर प्रकरणाच्या मुळाशी जात आरोपीला अटक केली.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपीने पीडितेला फेसबुकवर रेबेका क्रिस्टीन नावाने ओळख सांगितली आणि चर्चा सुरू केली. बोलताने त्याने स्वत:ला कॅन्सर पीडित महिला असल्याचं सांगितलं आणि पतीचा मृत्यू झाल्याचंही म्हटलं. आरोपीने सांगितलं, की त्याच्या कुटुंबात कोणीही नाही आणि त्याच्याकडे 3.9 मिलियन डॉलरची संपत्ती आहे. ही संपत्ती त्या महिलेच्या नावे करायचं आरोपीने सांगितलं. आरोपीने आपल्या बोलण्यातून, पीडित महिलेला आपल्या जाळ्यात अडकवलं.

रेबेका क्रिस्टीन अशी ओळख सांगितलेल्या आरोपीने त्याचा वकील आणि भारतीय प्रतिनिधी पुढील प्रक्रिया करण्यासाठी तिच्याशी संपर्क करतील असं पीडितेला सांगितलं. त्यानंतर पीडित महिलेला फॉरेन एक्सचेंज डिपार्टमेंटकडून लगेचच ईमेल आला. बॅन जॉनसन नावाने प्रतिनिधी असल्याचं म्हणत त्याने महिलेशी संपर्क केला आणि इंटरनॅशनल मॉनिटरिंग फंडवर लागणारे चार्जेस, प्रोसेसिंग फीस आणि वकीलांच्या खर्चासहित इतर काही फॉर्मेलिटीजसाठी पैसे लागणार असल्याचं त्याने सांगितलं.

55 बँक खात्यात मागवले अडीच कोटी रुपये –

या सर्वांच्या नावाने महिलेकडून 2.5 कोटी रुपये वेगवेगळ्या 55 बँक खात्यात मागवले. प्रॉपर्टीच्या हव्यासापोटी महिलेने जसे सांगितले तसे पैसे बँक खात्यात पाठवले. पोलिसांनी केलेल्या सखोल चौकशीनंतर अनेक घोटाळे समोर आले. उच्च तंत्रज्ञानाचा वापर करत पोलिसांनी आरोपी नीरज सूरीची ओळख पटवली आणि त्याला अटक केली.

चौकशीत अनेक खुलासे –

आरोपीने एका बनावट सीए कार्ड बनवून दिल्ली, मसूरी आणि देहरादूनमध्ये ऑफिस ओपन करुन लोकांना लोन देणं, जीएसटी आयटीआर, पॅनकार्ड आणि आधार कार्ड बनवून त्याच कागदपत्रांनी बनावट बँक खाती ओपन करण्यासाठी कागदपत्र तयार करत होता. तसंच नायजेरियन लोकांसह मिळून त्यांना बँक खाती उपलब्ध करुन देऊन अधिक कमिशन कमावण्याचं काम होत होतं.

SIP मध्ये 12% व्याजासह 26 लाखांचा परतावा मिळवा, वाचा सुरुवातीला किती पैसे लावावे लागतात?

money

मुंबई : तुम्हाला तुमचा दैनंदिन खर्च सांभाळून हळूहळू गुंतवणूक वाढवत नेऊन भविष्य सुरक्षित करायचं असेल तर त्यासाठी एसआयपी (SIP) उत्तम पर्याय आहे. तुम्ही दैनंदिन खर्चात बचत करुन हळूहळू दरवर्षी एका विशिष्ट प्रमाणात गुंतवणूक वाढवू शकता. अखेरीस तुम्हाला त्याचा चांगला परतावा मिळतो. यानुसार तुम्ही वर्षाला निश्चित रक्कम वाढवू शकता किंवा मासिक गुंतवणुकीत छोटी रक्कम वाढवू शकता. ही रक्कम 10 ते 20 टक्के देखील असू शकते (Investing of 5000 rupees per month in SIP for 15 years gives 26-lakh return).

किती रुपये गुंतवल्यास चांगली कमाई
एसआयपीमध्ये किती रुपये गुंतवल्यास चांगला परतावा मिळतो हे जाणून घेणं आवश्यक आहे. उदाहरणार्थ तुम्ही एसआयपीमध्ये प्रत्येक महिन्याला 5,000 रुपये गुंतवले. ही एसआयपी 15 वर्षांपर्यंत सुरू ठेवल्यास 12 टक्के व्याजाप्रमाणे परतावा मिळतो. याप्रमाणे 15 वर्षांनंतर तुमचा फंड 26 लाख रुपये होईल. महिन्याची 5 हजार किंवा दिवसाची जवळपास 165 रुपये गुंतवणूक 15 वर्षांनंतर 26 लाख रुपयांमध्ये रुपांतरीत होईल.

दरवर्षी 5 टक्के एसआयपी रक्कम वाढवल्यास 32 लाख रुपयांचा परतावा
जर प्रत्येक वर्षी 5 टक्के एसआयपीची रक्कम वाढवली तर 15 वर्षांनंतर ही रक्कम 32 लाख रुपये होते. याचा अर्थ तुमची एसआयपी पहिल्या वर्षी 250 रुपये, दुसऱ्या वर्षी 262 रुपये आणि तिसरे वर्षी 275 रुपयांनी वाढत जाईल. यात दरवर्षी तुम्ही थोडी थोडी रक्कम वाढवल्यानं तुमच्या आर्थिक नियोजनावरही ताण येत नाही.

नागपुरात ‘खाकी वर्दी’चा प्रेमळ चेहरा; निराधार आजीच्या गळणाऱ्या छतावर पोलिसांनी टाकली ताडपत्री

Nagpur-Police-Humanity

नागपूर : नागपुरात खाकी वर्दीतली माणुसकीचं नागपूर पोलिसांनी पुन्हा दर्शन घडवलं. नागपूर पोलिसांनी 70 वर्षीय निराधार महिलेच्या घरावर ताडपत्री टाकून दिली. शांतीनगरातील नर्मदा बावनकुळेंना पोलिसांनी आधार दिला (Nagpur Police Shows Humanity Put Tadpatri On The Leaking Roof Of 70 Year Old Lady).

नेमकं काय घडलं?
गुन्हेगारांवर वचप निर्माण करणाऱ्या नागपूर पोलिसांनी खाकीतल्या माणूसकीचं आदर्श दर्शन घडवलं आहे. नागपुरात पेट्रोलिंगदरम्यान पोलिसांनी एका 70 वर्षीय निराधार महिलेच्या घरावर ताडपत्री टाकून दिली आणि नर्मदा बावनकुळे यांच्या छताची गळती कायमची थांबली. संकटात असलेल्या निराधार आजीला मदत करणाऱ्या नागपूर पोलिसांचं आता सर्वत्र कौतुक होतंय.

पोलिसही माणसंच आहेत. ते सुद्धा माणुसकीच्या नात्याने मदत करतात. कधी कायद्याचे रक्षण करण्यासाठी आणि वाढती गुन्हेगारी रोखण्यासाठी कठोर राहावं लागतं. पण वेळोवेळी पोलिसांच्या माणुसकीचं दर्शन घडवणाऱ्या घटना घडत असतात. नागपुरातील शांतीनगर परीसरात अशीच एक घटना घडलीये.

निराधार आजीला नागपूर पोलिसांचा आधार
शांतीनगर परिसरात नर्मदा बावनकुळे या 70 वर्षीय आजी राहतात. त्यांना कुणाचाही आधार नाही. त्या एकट्याच राहतात. त्यांचं घरही कौलारु घर आहे. पावसाळ्याचे दिवस असल्याने पावसामुळे त्यांच्या घराचं छत गळत असतं. गुन्हेगारांवर वचप निर्माण करण्यासाठी पोलीस पेट्रोलिंग करत असताना त्यांची या निराधार नर्मदा बावनकुळे आजींच्या घराकडे लक्ष गेलं. त्यांचं छत गळत असल्याचं पोलिसांच्या लक्षात आलं. त्याच वेळी पोलिसांनी पुढाकार घेत ताडपत्री विकत आणली आणि आजीच्या गळणाऱ्या छतावर टाकली.

पोलिसांच्या या कौतुकास्पद कामामुळे त्यांचं सर्वत्र कौतुक होत आहे. तर नर्मदा बावनकुळे यांनी देखील नागपूर पोलिसांचे आभार मानले आहेत.

फोटो काढायला गेलेले,शाळकरी मुलाचा शेततळ्यात बुडून मृत्यू

नागपूर – चिखल मातीने भरलेल्या पाय धुण्यासाठी शेततळ्यात उतरलेल्या तीन पैकी दोन शाळकरी मुलांना एका तरुणाने वाचवले. मात्र, एकाचा पाण्यात बुडून करुण अंत झाला. वाठोडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत जयस्वाल शाळेजवळ गुरुवारी सायंकाळी ५ च्या सुमारास ही घटना घडली. उमदे उल्ला सलीम खान (वय १५) असे मृत मुलाचे नाव आहे. तो सुमीतनगरजवळ राहत होता.

आठवीचा विद्यार्थी असलेला उमदे त्याच्या दोन मित्रांसह वाठोड्यातील जयस्वाल शाळेच्या बाजुला असलेल्या शिवारात फिरायला गेला होता. तिकडे या तिघांनी मोबाईलवर फोटो काढून घेतले. सायंकाळी ४.३० च्या सुमारास लिंबाच्या बागेजवळ गेले. तेथे त्यांनी फोटो काढून घेतले. बाजुलाच एक शेततळे आहे. त्याला कुंपनही घातले आहे. चिखलांनी पाय माखले असल्यामुळे हे तिघे शेततळ्यात उतरले. त्यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज नव्हता. त्यामुळे ते पाण्यात बुडू लागले. बाजुलाच एक तरुण होता. त्याला हे दिसल्याने तो त्यांच्याकडे धावला. त्याने दोरी फेकून दोघांना पाण्याबाहेर काढले. उमदे मात्र पाण्यात बुडून मृत झाला. दरम्यान, या घटनेची माहिती कळताच जयस्वाल शाळेजवळची मंडळी तिकडे धावली. त्यांनी वाठोडा पोलिसांना माहिती कळविली. वाठोड्याच्या ठाणेदार आशालता खापरे यांनी लगेच आपल्या सहकाऱ्यांसह तिकडे धाव घेतली. अग्निशमन दलालाही बोलवून घेतले. पावसामुळे चिखल असल्याने वाहन घटनास्थळापर्यंत जात नव्हते. त्यामुळे अग्निशमन दलाच्या जवानांना तेथे पोहचण्यास उशिर झाला. त्यांनी उमदेला पाण्यातून बाहेर काढले. सलीम खान मुस्ताक खान (वय ४८) यांनी दिलेल्या तक्रारीवरून वाठोडा पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

परिसरात हळहळ
या घटनेचे वृत्त सुमीतनगरात पसरताच रहिवाशी हळहळ करू लागले. उमदेच्या कुटुंबात आईवडील, दोन बहिणी आणि एक भाऊ असल्याचे पोलीस सांगतात. त्याच्या कुटुंबीयांना या घटनेमुळे तीव्र मानसिक धक्का बसला आहे.

सात तासात 23 वेळा एकाच एटीएम कार्डचा वापर, मशीन हॅक करुन लाखो रुपये लंपास, सीसीटीव्हीत घटना कैद

Banks

नागपूर : नागपुरात एटीएम हॅक करणाऱ्या टोळीने एसबीआय बँकेच्या एटीएममधून लाखो रुपये लंपास केले आहेत. या टोळीने दोन दिवसात पाच ठिकाणी एटीएम मशीनला हॅक करुन पैसे लंपास केले आहेत. एटीएम मशीनमध्ये पैसे भरण्यासाठी अधिकारी गेले तेव्हा संबंधित प्रकार त्यांच्या लक्षात आला. पोलिसांनी या घटनेचा तपास केला असता या घटनेचा सोक्षमोक्ष लागला. मात्र, याप्रकरणी अजून एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. पोलिसांचा सध्या शोध सुरु आहे. तसेच परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्याद्वारे चोरट्यांचा शोध सुरु आहे (ATM loot gang hack ATM machine and stolen more than two lakh rupees in Nagpur).

नेमकं काय घडलं?
नागपूरच्या बजाजनगर पोलीस स्टेशन हद्दीतील व्हीएनआयटीत एसबीआयची शाखा आहे. एका अज्ञात आरोपीने 14 जूनला एकाच एटीएम कार्डचा 23 वेळा वापर करुन 2.30 लाख रुपये काढले. प्रत्येक वेळी एटीएममधून रोख रक्कम निघाल्यानंतरही ट्रान्झेक्शन फेल असं येत होतं. त्यानंतर 15 जून रोजी एटीएममध्ये रोख रक्कम जमा करण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांना 2.30 लाख रुपयांचा फरक जाणवला. अखेर त्यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे याबाबत तक्रार केली (ATM loot gang hack ATM machine and stolen more than two lakh rupees in Nagpur).

आरोपींविरोधात गुन्हा दाखल
वरिष्ठ अधिकाऱ्यांनी या प्रकरणी तपासणी केली असता एटीएमच्या सीसीटीव्हीमध्ये संशयास्पद व्यक्ती आढळून आले. त्यांनी 14 जूनला सकाळी साडेनऊ वाजेपासून दुपारी तीन वाजेपर्यंत 23 वेळा ट्रांझेक्शन केले होते. आरोपी ट्रांझेक्शन करताना पैसे निघण्याच्या ठिकाणी हात ठेवायचे. त्यामुळे पैसे निघत असल्याचे दिसून येत नव्हते. याप्रकरणी अज्ञात अरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींचा शोध सुरु आहे.

पुण्यात एटीएम फोडणारे गजाआड
पुणे जिल्ह्यातील भोसरी परिसरातील पांजरपोळ येथील ‘एसबीआय’च्या एटीएममध्ये चोरी झाली होती. एटीएम गॅस कटरने कापून मशीनमधून पैसे ठेवण्याच्या ट्रेसह 22 लाख 95 हजार 600 रुपयांची रोकड पळवण्यात आली होती. हा प्रकार 10 जून रोजी सकाळी उघडकीस आला होता.

हरियाणामधून टोळीला अटक
या टोळीला भोसरी पोलिसांनी हरियाणामधून अटक केली. अकरम दीनमोहम्मद खान, शौकीन अक्तर खान, अरसद आसमोहम्मद खान उर्फ सोहेब अख्तर अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांचे आणखी तीन साथीदार पसार आहेत. भोसरी पोलीस त्यांचा शोध घेत आहेत

अटक केलेल्या आरोपींकडून चोरलेल्या रकमेपैकी 6 लाख 24 हजार 500 रुपये रोकड, गुन्हा करताना वापरलेला ट्रक, गॅस कटर, घरगुती वापराची एक गॅस टाकी, मेडिकल वापराचे दोन ऑक्सिजन सिलेंडर, एटीएममधील पैसे ठेवण्याचे तीन ट्रे, दोन कोयते, तीन मोबाईल फोन असा एकूण 26 लाख 33 हजार 360 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

हरियाणातील आणखी एक टोळी
याआधीही महाराष्ट्रासह गुजरात, कर्नाटक, मध्यप्रदेश, हरियाणा, राजस्थान, उत्तर प्रदेश येथे एटीएम मशीनमधील लाखो रुपये चोरणाऱ्या आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश करण्यात आला होता. या प्रकरणी गेल्या वर्षी दोघांना हरियाणामधूनच अटक करण्यात आली होती.

JOB Alert : कोरोनाच्या संकटात तरुणांना मोठा दिलासा! देशातील टॉप 5 IT कंपन्यांमध्ये तब्बल 96 हजार नोकऱ्या

'ही' कंपनी देणार भारतातील टेक सेक्टर मध्ये ४ हजार लोकांना नोकरी

नवी दिल्ली – कोरोनाच्या संकटात बेरोजगारांसाठी एक खूशखबर आहे. नासकॉमने दिलेल्या माहितीनुसार, यंदाच्या आर्थिक वर्षात भारतातील आघाडीच्या पाच आयटी कंपन्या तब्बल 96 हजार कर्मचाऱ्यांना भरती (Jobs) करुन घेणार आहेत. त्यामुळे आयटी संबंधित शिक्षण पूर्ण केलेल्या तरुणांना मोठा दिलासा मिळणार आहे. काही दिवसांपूर्वीच बँक ऑफ अमेरिकेने एक अहवाल प्रसिद्ध केला होता. यामध्ये आगामी काळात ऑटोमेशनुळे सॉफ्टवेअर क्षेत्रातील जवळपास 30 लाख नोकऱ्या कमी होतील, असे म्हटले होते. मात्र, त्याचवेळी भारतीय आयटी कंपन्यांमधील रोजगारनिर्मितीचे चित्र सुखावणारी बाब आहे.

देशात सध्या माहिती व तंत्रज्ञान क्षेत्रातील कंपन्या 1.6 कोटी रोजगार उपलब्ध करुन देत आहेत. मात्र, 2022 पर्यंत ऑटोमेशनमुळे 30 लाख कर्मचाऱ्यांची कपात करण्यात येईल, असा बँक ऑफ अमेरिकेचा अंदाज आहे. या कर्मचारी कपातीमुळे आयटी कंपन्यांची तब्बल 100 अब्ज डॉलर्सची बचत होईल. त्यामुळे आगामी काळात रॉबोट प्रोसेस ऑटोमेशन आयटी क्षेत्रासाठी धोक्याची घंटा मानली जात आहे. RPA अर्थात रॉबोट प्रोसेस ऑटोमेशन हे एकप्रकारचे सॉफ्टवेअर आहे. त्यामुळे साचेबद्ध आणि जादा मेहनतीची कामे करण्यासाठी कर्मचाऱ्यांची गरज लागणार नाही. त्यामुळे अनेकांच्या नोकऱ्या जाण्याची शक्यता आहे. एकट्या अमेरिकेत RPA मुळे 10 लाख नोकऱ्या जातील, असा अंदाज आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

देश कोरोनाच्या संकटाचा सामना करत असतानाच दुसरीकडे कोट्यवधींचे रोजगारदेखील धोक्यात आले आहेत. अर्थव्यवस्थेच्या वाढीसाठी महत्त्वपूर्ण योगदान देणाऱ्या क्षेत्रांवर कोरोनामुळे प्रचंड मोठं संकट निर्माण झालं आहे. त्यामुळे कित्येकांच्या डोक्यावर बेरोजगारीची टांगती तलवार आहे. अनेकांना रोजगार देणाऱ्या प्रमुख क्षेत्रांना कोरोनाचा थेट फटका बसला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये नोकरी गमावणाऱ्यांमध्ये सर्वाधिक कर्मचारी हे तरुण आहेत किंवा अगदी जुने कर्मचारी आहेत. फॉर्च्यून 500 लिस्टच्या कंपन्यांमध्ये करण्यात आलेल्या एका सर्वेक्षणानुसार ही माहिती समोर आली आहे. भारतात एप्रिल 2021 दरम्यान 2000 लोकांमध्ये हा सर्व्हे करण्यात आला आहे.

फायनान्शिअल टेक्नॉलॉजी कंपनी एफआयएस (FIS) द्वारे करण्यात आलेल्या सर्व्हेनुसार कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये 55 वर्षांपेक्षा अधिक वय असणाऱ्या 6 टक्के कर्मचाऱ्यांची नोकरी स्थायी स्वरुपात गेली आहे. गेल्यावर्षी हा आकडा 4 टक्के होता. तर 24 वर्षांपेक्षा कमी वय असणाऱ्या फ्रेशर्समध्ये 11 टक्के लोकांनी स्थायी स्वरुपात नोकरी गमावली आहे. गेल्यावर्षी ही आकडेवारी 10 टक्के होती. भारतीय अर्थव्यवस्थेचा अभ्यास करणाऱ्या सेंटर फॉर मॉनिटरिंग इंडियन इकोनॉमी (CMII) ने मेमध्ये असे म्हटले होते की, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे देशामध्ये 1 कोटीपेक्षी अधिक भारतीयांनी नोकरी गमावली आहे. बेरोजगारी दर 12 महिन्यातील सर्वोच्च आहे. हा दर 12 टक्के एवढा झाला आहे.

या योजनेत करा 4500 रुपयांची गुंतवणूक, मिळवता येईल 1 कोटींचा फंड; वाचा सविस्तर

money

देशभरात कोरोनामुळे (Coronavirus Pandemic) आर्थिक स्थिती बिकट होत आहे. अशावेळी गुंतवणूक (Investment Options) करण्याच्या विविध पर्यायांचा विचार लोकं करत आहेत. तुम्ही देखील योग्य रिटर्न (Get Good Return) मिळवण्याचा विचार करत असाल तर SIP या पर्यायाचा विचार करू शकता. यातून तुम्ही तुमचं कोट्यवधी कमावण्याचं स्वप्न देखील पूर्ण करू शकता. त्याकरता तुम्हाला नियोजनबद्ध गुंतवणूक करणं आवश्यक आहे. सिस्टमॅटिक इनव्हेस्टमेंट प्लान (SIP- Systematic Investment Plan) च्या माध्यमातून तुम्ही थोडी थोडी गुंतवणूक करून कोट्यवधींचे मालक बनू शकता. सध्याच्या काळात एक चांगला रिटर्न मिळवण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे. दरम्यान हे देखील लक्षात ठेवणं गरजेचं आहे की शेअर बाजारातील तेजी आणि घसरणीमुळे रिटर्नमध्ये देखील चढउतार पाहायला मिळेल.

एखाद्या गुंतवणुकदाराला SIP च्या माध्यमातून चांगला रिटर्न हवा असेल तर त्याने लाँग टर्मसाठी गुंतवणूक करणं आवश्यक आहे. SIP मध्ये कम्पाउंडिंग लाभ देखील मिळतो. ज्याकरता एक्सपर्ट्स 15 ते 20 वर्षांसाठी गुंतवणूक करण्याचा सल्ला देतात.

मिळेल 15 ते 20 टक्क्यांपर्यंत रिटर्न

मार्केट एक्सपर्ट्सच्या म्हणण्यानुसार जर 20 वर्षांसाठी गुंतवणूक केली तर ग्राहकांना त्यावर 15 ते 20 टक्के परतावा मिळू शकेल. शिवाय गुंतवणूकदाराने निवडलेल्या एसआयपी पॉलिसीच्या प्रकारावर अवलंबून आहे. योग्य वेळी योग्य एसआयपी निवडल्यास 15 ते 20 टक्के परतावा सहज मिळू शकेल.

कशाप्रकारे करावी लागेल गुंतवणूक?

उदाहरणार्थ जर तुम्ही एखाद्या एसआयपीमध्ये 4500 रुपयांची गुंतवणूक केली आणि यामध्ये तुम्ही 15 टक्के परतावा मिळेल अशी अपेक्षा व्यक्त करत आहात. तुम्ही ही गुंतवणूक 20 वर्षांसाठी केली आहे. SIP कॅलक्यूलेटरच्या साहाय्याने या गुंतवणुकीवर मिळणाऱ्या एकूण रिटर्नबद्दल बोलायचे झाले तर, 20 वर्षांनी तुम्ही 68,21,797.387 रुपयांचे मालक बनू शकता. याठिकाणी एक ट्रीक वापरून तुम्ही 1 कोटींचा देखील फंड उभा करू शकता.

कसा मिळवाल 1 कोटींचा फंड

तुम्ही या गुंतवणुकीतून 1 कोटी रुपये कमावू इच्छित असाल तर तुम्हाला दरमहा 500 रुपयांचा टॉपअप वाढवावा लागेल. तुम्ही सोप्या पद्धतीने कोट्यवधी बनू शकता. जर तुम्ही अशी ट्रीक वापराल तर सुरुवातीच्या 4500 रुपयांच्या गुंतवणुकीचे 20 वर्षांनंतर मॅच्युरिटीवेळी 1,07,26,921.405 रुपये मिळू शकतील.

दाभाडकरांनी तरुणासाठी सोडला नव्हता बेड; माहिती अधिकारात वस्तुस्थिती समोर

नागपूर : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत नागपुरातील मनीषनगर येथील ज्येष्ठ नागरिक व राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक नारायण दाभाडकर यांनी स्वत: अत्यवस्थ असताना करोनाबाधित तरुणासाठी बेड सोडल्याची घटना घडली होती. मात्र, या घटनेबाबत माहिती अधिकारातून माहिती घेतली असता दाभाडकरांनी बेड सोडला नव्हता तर जावई आणि मुलीने त्यांची प्रकृती गंभीर असल्याने घरी नेले होते, असा तपशील समोर आला आहे.

दरम्यान, या माहितीनंतर काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी राष्ट्रीय सयंसेवक संघावर टीका केली असून भाजप आणि संघाने दाभाडकर यांच्या मृत्यूचा वापर प्रतिमा संवर्धनासाठी केला आहे. ’माहिती अधिकार कार्यकर्ते मोहनिश जबलपुरे यांनी हा तपशील माहिती अधिकाराच्या माध्यमातून प्राप्त झाला. गुरुवारी सचिन सावंत यांनी ही माहिती ट्विट केली आहे. नारायण दाभाडकर हे २२ एप्रिलला नागपूर महापालिकेच्या इंदिरा गांधी रुग्णालयातून घरी परतले होते. त्यानंतर तीन दिवसांनी त्यांचा मृत्यू झाला. त्यानंतर काही लोकांनी यासंदर्भात एक पोस्ट व्हायरल केली होती. त्यात ‘मी आता ८४ वर्षांचा आहे. मी माझे सर्व आयुष्य जगून घेतले. मला उपचाराची गरज नाही. माझा बेड तुम्ही या गरजू रुग्णाला द्या आणि त्याच्यावर उपचार करा’, असे सांगून ते घरी परतले असा उल्लेख होता. दाभाडकर यांच्यासंदर्भातील कथित त्यागाची पोस्ट सर्वत्र व्हायरल झाली. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चौहान यांच्यासह भाजपच्या अनेक नेत्यांनी दाभाडकर त्यांच्या या त्यागाचे कौतुक केले होते. दरम्यान, रुग्णालयानेच याबाबत खुलासा केल्याने प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. त्यामुळे आरोप प्रत्यारोप सुरू होते.

मोहनिश जबलपुरे यांना रुग्णालयातून प्राप्त माहितीमध्ये दाभाडकर यांच्या नातेवाईकांनी रुग्णालयाला दिलेल्या पत्राचा समावेश आहे. त्यात दाभाडकर यांच्या शरीरातील ऑक्सिजनची पातळी खालावलेली असतानाही त्यांनी रुग्णालय सोडण्याचा निर्णय का घेतला यामागचे कारण त्यात आहे. ‘रुग्णालयात व्हेंटिलेटरची सुविधा नव्हती व रुग्णाची स्थिती गंभीर असल्याने तेथील डॉक्टरांनी इतर हॉस्पिटलमध्ये नेण्याचा सल्ला दिला होता. तेव्हा दाभाडकर यांनी व त्यांच्या जावयाने स्वत:च्या जबाबदारीवर घरी जाण्याची लेखी परवानगी मागितली’, असे त्या पत्रातून स्पष्ट होते.

या पत्रात कोणत्याही तरुणासाठी किंवा इतर कोणासाठीही बेड सोडला नसल्याचा उल्लेख नाही. सावंत यांनी केलेल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. ‘दिवंगत नारायण दाभाडकर यांच्या मृत्यूचा उपयोग संघाच्या प्रतिमा संवर्धनासाठी करण्याचा अश्लाघ्य प्रकार भाजपने केला. यात मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज चौहान व अनेक भाजपा संघाचे नेते सहभागी झाले. वस्तुस्थिती माहिती अधिकारात समोर आली आहे. हॉस्पिटलमध्ये व्हेंटिलेटरची सुविधा नव्हती. पेशंटची स्थिती गंभीर असल्याने मोठ्या हॉस्पिटलमध्ये नेण्याचा सल्ला दिला होता. दाभाडकर यांनी स्वतः व त्यांच्या जावयाने स्वतः च्या जबाबदारी वर घरी जाण्याची लेखी परवानगी मागितली. या पत्रात कोणत्याही तरुणाचा उल्लेख नाही. या माहिती नंतरही दिवंगत दाभाडकर यांच्याबद्दलचा आमच्या मनातील आदर कमी होणार नाही. त्यांना राजकारणात ओढणे हे अयोग्य आहे. त्यांनी जरी असे पाऊल उचलले असते तरी त्याचा संघाशी संबंध जोडणे हे उचित नव्हते. ’

याबाबत दाभाडकर यांच्या कन्या आसावरी कोठीवान-दाभाडकर यांनी आधीच स्पष्टीकरण दिले आहे, त्यात म्हटलंय, ‘मृत्यूचे भांडवल करायचे नव्हते आम्हाला त्यांच्या मृत्यूचे भांडवल करायचे नाही. याआधी देखील चित्रफितीद्वारे हे स्पष्ट केले होते. भांडवल करायचे नव्हते म्हणून रुग्णालयाला दिलेल्या माहितीत आम्ही तसे काही नमूद केले नाही. परंतु आपला ऑक्सिजन काढून इतर कुणाला देण्यासारखा त्याग नाही. दाभाडकर समाजासाठी आदर्श आहेत.’

‘ईडी’कडून नागपुरात एकाचवेळी दोन सीए आणि एका कोळसा व्यापाऱ्याच्या घरी छापेमारी

नागपुर:  सक्त वसुली संचालनालय म्हणजेच ईडीने नागपुरात तीन ठिकाणी छापे टाकले आहेत. नागपुरातील एका माजी मंत्र्यांशी संबधीत प्रकरणाशी हे छापे असल्याची माहिती आहे. मात्र या कारवाई संदर्भात ईडीच्या कोणत्याही अधिकार्‍यांने दुजोरा दिलेला नाही.

बुधवारी (दि १६) मुंबईहून ईडीचे पथक नागपुरात पोहोचले. त्यानंतर स्थानिक ईडी अधिकाऱ्यांच्या मदतीने पथकाने एकाच वेळी दोन सीए आणि एका कोळसा व्यापाऱ्याच्या घरी छापे टाकले. अद्यापही ही कारवाई सुरूच आहे. ईडीच्या या कारवाईमुळे राजकीय वर्तुळात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे.

नागपुरातील एका माजी मंत्र्याच्या प्रकरणात चौकशी दरम्यान कोलकाता येथे दोन बनावट कंपन्यांचे दस्तऐवज सीबीआयला आढळले होते. या बनावट कंपन्यांद्वारे कोट्यवधी रुपयांचे काही व्यवहार झाले असा संशय सीबीआयला असल्याची माहिती आहे. सीबीआयने याबाबत ईडीला माहिती दिल्यानंतर ईडीनेही गुन्हा दाखल करीत प्रकरणाचा तपास सुरू केला.

गुन्हा दाखल केल्यानंतर ईडीच्या तीन पथकांनी २५ मे रोजी अंबाझरीतील शिवाजीनगर येथील हरे कृष्ण अपार्टमेंट, सदरमधील न्यू कॉलनी, आणि गिट्टीखदानमधील जाफरनगर येथे तिघांकडे छापे टाकले. तब्बल पाच तास ईडीच्या अधिकाऱ्यांनी तिघांच्या निवासस्थानांची झाडाझडती घेतली होती. त्यानंतर आता पुन्हा तीन ठिकाणी ईडी ने झाडाझडती घेतली आहे त्यामुळे संबधित माजी मंत्र्याच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

लग्नास नकार देणाऱ्याविरुद्ध बलात्काराची तक्रार; बार व्यवस्थापकावर आरोप

जामिनासाठी बोगस कागदपत्रे बनविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; जिल्हा न्यायालयासमोरच चालायचा प्रकार
जामिनासाठी बोगस कागदपत्रे बनविणाऱ्या टोळीचा पर्दाफाश; जिल्हा न्यायालयासमोरच चालायचा प्रकार

नागपूर – लग्न करण्याची थाप मारून सहा महिन्यांपासून इकडे तिकडे फिरविणाऱ्या तरुणाने आता लग्नास स्पष्ट नकार दिल्यामुळे तरुणीने त्याच्याविरुद्ध बलात्काराची तक्रार नोंदवली. बेलतरोडी पोलिसांनी या प्रकरणी एका बार व्यवस्थापकाविरुद्ध गुन्हा दाखल करून प्रकरण तपासात घेतले आहे.

जयदीप किशोर भगत (वय ३०) असे या प्रकरणातील आरोपीचे नाव असून तो वर्धा मार्गावरील गावंडे ले-आऊटमध्ये राहतो. पोलिसांच्या माहितीनुसार, नातेवाईकांचा बीअर बार चालविणारा भगत डिसेंबर २०२० मध्ये तक्रार करणाऱ्या तरुणीला बघण्यासाठी तिच्या घरी गेला होता. यावेळी मध्यस्थांमार्फत त्याची ओळख झाली. एकमेकांना पसंत करण्याचा कार्यक्रम पार पडल्यानंतर त्यांच्यातील घसट वाढली. तरुणीच्या तक्रारीनुसार, २१ डिसेंबर २०२० पासून तो तिला इकडे तिकडे फिरायला नेऊ लागला.

मनीषनगरातील एका हॉटेलमध्ये नेऊन त्याने तिच्यासोबत शरीरसंबंध प्रस्थापित केले. बाहेरगावीही अनेक ठिकाणी हा प्रकार झाला. आता त्याचे मन भरले की काय, कळायला मार्ग नाही. भगतने लग्नास नकार दिला आहे. मध्यस्थांकडे हा प्रकार गेल्यानंतर त्यांनीही त्याची समजूत काढण्याचे प्रयत्न केले. मात्र त्याची नकारघंटा कायम आहे. त्यामुळे तरुणीने बेलतरोडी पोलिसांकडे धाव घेऊन भगतविरुद्ध बलात्काराचा आरोप लावणारी तक्रार नोंदवली आहे. पोलिसांनी सोमवारी या प्रकरणात फसवणूक आणि बलात्काराचा गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.

आता १५ मिनिटात ओळखता येणार … गर्दीतील कोरोना बाधित

world bank support india's against covid-19

लंडन,
ब्रिटनच्या शास्त्रज्ञांनी शोधलेल्या अनोख्या उपकरणाच्या सहाय्याने आता फक्त पंधरा मिनिटात कोरोना बाधित रुग्णाचा शोध घेणे शक्य होणार आहे. एखाद्या खोलीत अनेक व्यक्ति जमले असतील तर त्यापैकी कोणी कोरोना बाधित असेल तर त्या खोलीतील अलार्म वाजेल आणि पंधरा मिनिटातच ही गोष्ट निदर्शनात येईल. खोलीचा आकार मोठा असेल तर मात्र ही गोष्ट समजण्यासाठी अर्धा तास लागू शकेल. आगामी कालावधीत विमानातील केबिन क्लास रूम केअर सेन्टर्स, घर आणि कार्यालयांमध्ये हे तंत्रज्ञान उपयोगी ठरणार आहे.

या उपकरणाचे नाव कोविड अलार्म असे ठेवण्यात आले आहे. आगीची सूचना देणाऱ्या स्मोक अलार्म पेक्षा हे उपकरण थोडे मोठे असणार आहे. लंडन स्कूल ऑफ हायजिन अँड ट्रॉपिकल मेडिसिन आणि डरहम युनिवरसिटी या दोन संस्थांमधील वैज्ञानिकानी संयुक्तपणे प्रयोग करून हे संशोधन यशस्वी केले आहे. वैज्ञानिकांनी जेव्हा चाचणी केली तेव्हा त्याचे निष्कर्ष 98 ते शंभर टक्के खरे आले. आगीची सूचना देणाऱ्या स्मोक अलार्म पेक्षा हे उपकरण थोडे मोठे असणार आहेरुग्ण शोधण्यासाठी सध्या आरटिपीसीआर आणि एंटीजन या दोन प्रकारच्या चाचण्या केल्या जातात. पण त्यापेक्षाही ही अलार्म सिस्टीम जास्त प्रभावी असल्याचा संशोधकांनी दावा केला आहे. एखाद्या खोलीत असलेल्या अनेक व्यक्तींपैकी कोणाला कोरोनाचे संक्रमण झाले आहे, हे शोधण्यासाठी मात्र पुन्हा एकदा चाचणी करून घ्यावी लागते.

खोलीत जर जास्त लोक जमले असतील तर त्यामध्ये संक्रमित रुग्ण असेल तर आपोआप हा अलार्म वाजणार आहे त्यानंतर प्रत्येकाची व्यक्तिगत चाचणी करून शोध घेतला जाणार आहे. संशोधकांनी दिलेल्या माहितीनुसार फक्त कोरोना नव्हे तर इतर अनेक रुग्णांचा शोध घेण्यासाठी ही अलार्म सिस्टम महत्वाची ठरू शकते. डरहॅम युनिव्हर्सिटीतील बायोसायन्स प्रोफेसर लिंडसे यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे प्रत्येक रोगाचा एक स्वतंत्र असा वास असतो. त्या वासाच्या सहाय्याने रुग्णांचा शोध घेणे शक्य आहे. यासाठी हे उपकरण विकसित करण्यात आले असून त्याची किंमत फक्त पाच लाख 15 हजार रुपये आहे.

Google चं नवं फीचर, आता मिळणार फोटो आणि व्हिडीओ Hide करण्याची सुविधा

1 जूनपासून Google आपली विनामूल्य सेवा करणार बंद, स्टोरेजसाठी द्यावे लागेल पैसे

हे फीचर प्रामुख्याने गुगल फोटोजसाठी (Google Photos) असेल. या फीचरचा वापर करुन युजरला आपले खासगी फोटो आणि व्हिडीओ लपवता म्हणजेच हाइड (Hide) करता येणार आहेत.

नवी दिल्ली, 15 जून : स्मार्टफोन (Smartphone) असो की कम्प्युटर, सर्वच युजर्ससाठी गुगल (Google) हे अत्यंत महत्वाचं टूल ठरलं आहे. जीमेलसह अन्य सुविधा तसंच विविध फीचर्स गुगलकडून सातत्याने युजरसाठी दिली जात आहेत. त्यात आता एका नव्या फीचरचा समावेश होत आहे. हे फीचर प्रामुख्याने गुगल फोटोजसाठी (Google Photos) असेल. या फीचरचा वापर करुन युजरला आपले खासगी फोटो आणि व्हिडीओ लपवता म्हणजेच हाइड (Hide) करता येणार आहेत.

टेक्नोलॉजी कंपनी गुगलने मागील महिन्यात झालेल्या Google I/O मध्ये गुगल फोटोजबाबत एका नव्या सुविधेची घोषणा केली होती. त्यानुसार कंपनीने गुगल फोटोजसाठी लॉक्ड फोल्डर फीचर (Locked Folder Feature) सुविधा सुरू केली आहे. यामुळे युजर पासकोड (Passcode) किंवा फिंगर प्रिंटसच्या (Finger Prints) माध्यमातून एका सुरक्षित फोल्डरमध्ये वैयक्तिक फोटोज, व्हिडीओ हाईड म्हणजेच लपवून ठेवू शकतो.

या लॉक केलेल्या फोल्डरमध्ये सेव्ह केलेले फोटो किंवा व्हिडीओ फोटो ग्रीड, सर्च, अल्बम किंवा मेमरीमध्ये दिसू शकणार नाहीत. तसंच थर्ड पार्टी अ‍ॅप्सच्या माध्यमातून देखील असे फोटो किंवा व्हिडीओ दिसू शकणार नाहीत. हाइड केलेल्या फोटोंचा क्लाऊडवर (Cloud) बॅकअप घेता येणार नाही. जर कोणत्याही फोटो किंवा व्हिडीओचा तुम्ही यापूर्वी बॅकअप घेतला असला, तर गुगल तो हटवणार असून, हे फोटो आणि व्हिडीओ लोकल फोल्डरमध्येच राहणार आहेत.

(वाचा – ऑफिस सुरू करण्यासाठी कंपन्या तयार?वाचा सर्व्हेनुसार काय आहे कर्मचाऱ्यांचं म्हणणं)
असा करा वापर –

युजरला हे फीचर वापरायचं असेल, तर लायब्ररी>युटिलिटीज>लॉक्ड फोल्डरमध्ये जाऊन या नव्या लॉक्ड फोल्डरचा वापर सुरू करू शकता. एकदा याची सेटिंग केल्यानंतर युजर आपले फोटो आणि व्हिडीओ या लायब्ररीला जोडू शकतील.

गुगल कॅमेरा अ‍ॅप देखील सेट करु शकता –

युजरला आपले नवे फोटो किंवा व्हिडीओ थेट या लॉक्ड फोल्डरमध्ये सेव्ह करायचे असतील, तर गुगल कॅमेरा अ‍ॅपचं (Google Camera App) सेटिंग करावं लागेल. या सुविधेचा वापर करण्यासाठी युजरला कॅमेरा अ‍ॅप सुरू करावं लागेल. यासाठी वरील बाजूच्या डाव्या कोपऱ्यातील आयकॉनवर टॅप करावं लागेल आणि लिस्टमधलं लॉक्ड फोल्डर सुरू करावं लागेल.

(वाचा – सुरक्षा ऐजन्सीकडून ‘फ्रॉड टू फोन’ नेटवर्कचा पर्दाफाश, 8 मास्टरमाईंड अटकेत)
गुगल पिक्सेल (Google Pixel) –

ही सुविधा सध्या केवळ गुगल पिक्सेल स्मार्टफोनवरच सुरू करण्यात आली आहे. यात Google Pixel 3 सीरीज, Pixel 4 आणि Pixel 5 सीरीजचा समावेश आहे. सध्या हे फीचर पिक्सेल स्मार्टफोनसाठी एक्सक्लुसिव्ह ठरत आहे. लवकरच लॉक्ड फोल्डर हे फीचर अँड्रॉईड फोन्ससाठी सुरू केलं जाईल आणि या वर्षी सर्व युजर्स या फीचरचा वापर करू शकतील, असं कंपनीच्या सूत्रांनी सांगितलं आहे.

Right to protest fundamental right, cannot be termed as terrorist act: Delhi HC

Not Making Tea No Provocation For Husband To Assault Wife: High Court

NEW DELHI :

RIGHT to protest is a fundamental right and cannot be termed as a ‘terrorist act,’ the Delhi High Court on Tuesday said while granting bail to JNU student Devangana Kalita in a case related to the communal violence in north east Delhi during protests against the Citizenship Amendment Act. A Division Bench said the court must be careful in employing the definitional words and phrases used in the anti terror law UAPA “in their absolute, literal sense or use them lightly in a manner that would trivialise the extremely heinous offence of ‘terrorist act,’ without understanding how terrorism is different even from conventional, heinous crime.”

It said it was constrained to say that in its anxiety to suppress dissent and in the morbid fear that matters may get out of hand, “the State has blurred the line between the constitutionally guaranteed ‘right to protest’ and ‘terrorist activity.’ “If such blurring gains traction, democracy would be in peril,” a bench of Justices Siddharth Mridul and Anup Jairam Bhambhani said in its 83-page judgement while deliberating with the case and imposition of anti-terror law against Kalita. It said right to protest peacefully without arms is a fundamental right under Article 19(1)(B) of the Constitution and has not been outlawed yet. “Considering however, that the right to protest is a fundamental right that flows from the constitutionally guaranteed right to assemble peaceably and without arms enshrined in Article 19(1)(B) of our Constitution, surely the right to protest is not outlawed and cannot be termed as a ‘terrorist act’ within the meaning of the UAPA, unless of course the ingredients of the offences under sections 15, 17 and/or 18 of the UAPA are clearly discernible from the factual allegations contained in chargesheet and the material filed therewith,” it said. Kalita was arrested along with others in May last year under the stringent Unlawful Activities (Prevention) Act (UAPA) in connection with a case of larger conspiracy related to riots.

The High Court, by separate judgements, also granted bail to another JNU student Natasha Narwal and Jamia Millia Islamia student Asif Iqbal Tanha in the UAPA case. While dealing with Kalita’s case, the division bench referred to its judgement in Tanha’s case and said the phrase ‘terrorist act’ has been given a very wide and detailed definition in Section 15 of the UAPA. Referring to a Supreme Court verdict, the High Court said that the extent and reach of a terrorist activity must travel beyond the effect of an ordinary crime and must not arise merely by causing disturbance of law and order or even public order.

“The Supreme Court says that the effect of terrorist activity must be such that it travels beyond the capacity of the ordinary law enforcement agencies to deal with it under the ordinary penal law,” it said. The High Court said the intent and purpose of Parliament in enacting the UAPA and in amending it in 2004 and 2008 to bring terrorist activity within its scope, was and could only have been, to deal with matters of profound impact on the ‘Defence of India,’ nothing more and nothing less. “It was not the intent, nor purpose of enacting UAPA that other offences of the usual and ordinary kind, however grave, egregious or heinous in their nature and extent, should also be covered by UAPA, since such conventional matters would have fallen within Entry 1 of List-II (State List) and/or Entry 1 of List-III (Concurrent List) of the Seventh Schedule of our Constitution,” the bench said.

निवृत्त पोलीस असलेल्या बापाने दोन्ही मुलांवर केला गोळीबार, एकाचा मृत्यू

नवी मुंबई: गाडी सर्विसला (bike servicing) देण्याच्या कारणावरून जन्मदात्या बापाने आपल्या दोन मुलावर गोळीबार केल्याची धक्कादायक घटना नवी मुंबईत (Navi Mumbai) घडली. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आला आहे. या गोळीबारात त्यांचा दोन नंबरचा मुलगा विजय ज्याच्यावर 3 गोळ्या झाडण्यात आल्या होत्या त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

नवी मुंबईतील ऐरोली भागात सोमवारी संध्याकाळी ही घटना घडली. निवृत्त पोलीस कर्मचारी (retired police officer) भगवान पाटील असं गोळीबार करणाऱ्या व्यक्तीचे नाव आहे. मुलगा विजय आणि सुजय यांच्यावर त्याने गोळीबार केला. विजय याच्यावर 3 गोळ्या झाडण्यात आल्या आहेत तर दुसरा मुलगा सुजयला गोळी घासून गेली. विजयला तातडीने ऐरोलीच्या इंद्रावती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. पण, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. विजय घरातला एकुलता एक कमावता मुलगा होता. वडिलांच्या दारूच्या व्यसनामुळे वसई इथे आपल्या कुटुंबासोबत वेगळा राहत होता. सोमवारी गाडीच्या सर्विसिंगच्या पैश्यांवरून दोघात वाद झाला.

विजयने गाडी सर्विस करण्यासाठी टाकली होती. त्याची माहिती देण्यासाठी तो वडिल भगवान यांच्याकडे आला होता. त्यानंतर सर्विसच्या पैशांवरून भगवान आणि विजय यांच्यात वाद झाला आणि काही कळायच्या आत भगवान यांनी विजयवर गोळीबार केला. यावेळी त्यांचा दुसरा मुलगा सुजय सुद्धा सोबत होता. विजयला वाचवण्यासाठी त्यांनी प्रयत्न केला असता त्यालाही गोळी लागली.

दोन्ही भाऊ जखमी अवस्थेत रस्त्यावर विव्हळत होते. घटनेची माहिती कळताच कुटुंबीयातील इतर सदस्य धावून आले आणि तातडीने विजय आणि सुजयला इंद्रावती रुग्णालयात दाखल केले आहे. पण, उपचारादरम्यान, त्याचा मृत्यू झाला.

भगवान पाटील हे निवृत्त पोलीस कर्मचारी आहे. त्यांच्याकडे परवान असलेले पिस्तुल आहे. याआधीही त्यांनी मेहुणा आणि नगरसेवक राजू पाटील यांना देखील पिस्तुलीचा धाक दाखवला होता. पोलिसांनी तेव्हा पिस्तुल जप्त केले होते. त्यानंतर ताकीद देऊन पिस्तुल पुन्हा ताब्यात दिले होते. काही दिवस उलटत नाही तेच भगवान पाटील यांनी आपल्याच लेकरावर रागाच्या भरात गोळीबार केला. या घटनेमुळे नवी मुंबईत एकच खळबळ उडाली आहे.

कुंभ मेळ्यादरम्यान 1 लाख कोविड चाचण्या बनावट, खोट्या आकड्यांच्या वृत्तानं खळबळ

हरिद्वार येथे झालेल्या कुंभ मेळ्याच्या (Kumbh Mela) काळात अनेकांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह (Corona Positive) आल्याचं समोर आलं होतं. मात्र, यातील बहुतेक रिपोर्ट हे बनावट असल्याचं तपासणीत समोर आलं

हरिद्वार 15 जून : हरिद्वार येथे झालेल्या कुंभ मेळ्याच्या (Kumbh Mela) काळात अनेकांचे कोरोना रिपोर्ट पॉझिटिव्ह (Corona Positive) आल्याचं समोर आलं होतं. मात्र, यातील बहुतेक रिपोर्ट हे बनावट आणि खोटे असल्याचं आता उत्तराखंडच्या आरोग्य विभागाने (Uttarakhand health department) केलेल्या प्राथमिक तपासणीत समोर आलं आहे. याबाबत 1,600 पानांचं स्पष्टीकरणही देण्यात आलं आहे. कुंभ मेळ्याच्या काळात आढळलेल्या कोरोनाबाधितांपैकी तब्बल 1 लाख कोरोना पॉझिटिव्ह रिपोर्ट बनावट (1 lakh Covid test results during Kumbh festival were fake) असल्याचं यात सांगण्यात आलं आहे.

यातीलच एक उदाहरण म्हणजे, एकच फोन नंबर तब्बल 50 लोकांच्या नावापुढे रजिस्टर करण्यात आला आहे. दुसरी बाब म्हणजे या सर्वांसाठी एकच अँटीजन कीट वापरलं गेलं असून ( याचा वापर केवळ एकदाच करता येतो) यातच 700 जणांची चाचणी केली गेली आहे. यात देण्यात आलेले पत्ते आणि नावंही पूर्णपणे काल्पनिक असल्याचं आढळलं आहे. आणखी एक धक्कादायक बाब म्हणजे हरिद्वारमधील घर क्रमांक 5 मधील एकाच घरातून 530 जणांचे सॅम्पल घेतल्याची यात नोंद आहे. एकाच घरात ५०० लोक राहाणं शक्य आहे का? असा प्रश्नही यानंतर उपस्थित झाला आहे. यात देण्यात आलेले इतर पत्तेही विचित्र आहेत. ज्यांचा कुंभ मेळ्याशी काहीही संबंध नाही.

अधिकाऱ्यानं याबाबत माहिती देत म्हटलं, की अनेक फोन नंबर फेक आहेत. कानपूर, मुंबई, अहमदाबाद आणि 18 इतर लोकेशनवरील लोकांनी एकसारखेच नंबर शेअर केले आहेत. आरोग्य सचिव अमित नेगी यांनी दिलेल्या माहितीनुसार, तपास अहवाल हरिद्वाराच्या डीएमकडे पाठविण्यात आला आहे. यात बरीच अनियमितता सापडली आहेत. 15 दिवसात डीएमकडून सविस्तर अहवाल मिळाल्यानंतर आम्ही कारवाई करू, असंही नेगी म्हणाले. हरिद्वारचे जिल्हादंडाधिकारी सी. रवीणकर यांनी सांगितले की, या प्रकरणाची चौकशी करत असून पुढील सूचना येईपर्यंत सर्व एजन्सीचे प्रलंबित पेमेंट थांबविण्यात आले आहे.

एजन्सीने नियुक्त केलेले नमुने गोळा करणारे 200 जण हे राजस्थानमधील विद्यार्थी आणि डेटा एंट्री ऑपरेटर असल्याचे समजले, जे हरिद्वारला कधीच आले नव्हते. नमुने गोळा करण्यासाठी नमुने घेणाऱ्याला शारीरिकरित्या त्याठिकाणी उपस्थित राहावे लागते. एजन्सीत नोंदवले गेलेल्या नमुने गोळा करणाऱ्यांशी संपर्क साधला असता असं आढळलं, की त्यातील 50 टक्के व्यक्ती राजस्थानमधील रहिवासी आहेत. यातील बरेच जण विद्यार्थी किंवा डेटा एंट्री ऑपरेटर होते, असा अधिकाऱ्यानं सांगितलं.

यात नमुने घेण्यासाठी गेला असल्याची नोंद असलेल्या एकाकडे चौकशी केली असता, तो हनुमानगड (राजस्थान) येथील सरकारी अधिकृत केंद्रामध्ये कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमात सहभागी असल्याचं समजलं. चौकशी केली असता त्याने सांगितले, की तो कुंभ येथे कधीच आला नव्हता. तो म्हणाला, की त्याच्या प्रशिक्षकाकडून हा डेटा देण्यात आला आहे. प्रशिक्षकानं त्याला हा आपल्या प्रशिक्षणाचा भाग असल्याचं सांगत ते अपलोड करण्यास सांगितले होते, असे तपास अहवालात म्हटले आहे.

आरोग्य विभागानं याबाबत प्रतिक्रिया देताना म्हटलं, की एजन्सी प्रत्येक अँटीजन टेस्टसाठी 350 रुपये देते तर RT-PCR टेस्टसाठी यापेक्षाही जास्त पैसे दिले जातात. त्यामुळे, या प्रकरणात करोडोंचा घोटाळा झाल्याचा संशय आता व्यक्त केला जात आहे. हे संपूर्ण प्रकरण तेव्हा समोर आलं, जेव्हा मागील आठवड्यात पंजाबमधील एका व्यक्तीला त्याच्या फोनवर हरिद्वार आरोग्य विभागाकडून कोविड निगेटिव्ह असल्याचा मेसेज आला. हा व्यक्ती कुंभ मेळ्यात आलाच नव्हता. यानंतर त्यानं याप्रकरणी तक्रार दाखल केल्यानंतर हे संपूर्ण प्रकरण उजेडात आलं.

सोनं खरेदी-विक्रीकरण्याआधी हॉलमार्कचे नवे नियम जाणून घ्या; सामान्यांना असा होणार फायदा

३५ लाख रूपयांचे सोन्याचे दागिने पॉलिशला दिले, कारागीर झाला पसार

मुंबई : देशात आजपासून सोनं विक्री करताना गोल्ड हॉलमार्किंग म्हणजेच सोनं शुद्धता प्रमाणपत्र अनिवार्य असेल. आजपासून देशात त्याची अंमलबजावणी सुरू होईल. हॉलमार्किंगचा नियम सोन्याची विक्री करणा-यांसाठी लागू असेल. मात्र ग्राहक त्यांच्याकडे असलेलं सोनं हॉलमार्कशिवाय विकू शकतात. (India to enforce mandatory gold hallmarking from June 15: Here what buyers need to know)

केंद्र सरकारने एक वर्षापूर्वी याबाबत माहिती दिली होती. कोरोना महामारीमुळे ही तारीख पुढे ढकलण्यात आली होती. हॉलमार्किंग अनिवार्य असल्यामुळे सोने बाजारात काय बदल होणार हे जाणून घेऊया. तसेच हॉलमार्किंगसंबंधी जोडलेले सर्व नियम जाणून घ्या.

काही वेळापूर्वी केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांनी सांगितलं की, भारतात स्वर्ण आभूषण सर्वोत्तम क्वालिटीचे असणे आवश्यक आहे. ग्राहकांना लवकरात लवकर हॉलमार्क प्रमाणित सोन्याचे दागिने उपलब्ध होणार आहे.

काय असतं हॉलमार्क?
हॉलमार्क हे सोने, चांदी आणि प्लॅनिटमच्या धातुंचे शुद्धतेचे प्रमाण म्हणजे हॉलमार्क. हे विश्वसनीय असल्याचे माध्यम आहे. हॉलमार्कची ही प्रक्रिया पूर्ण देशात उपलब्ध आहे. ही प्रक्रिया भारताच्या ब्यूरोमार्फत म्हणजे BIS मार्फत होणार आहे.

किती आहे हॉलमार्कची क्षमता
वर्तमानात हॉलमार्किंग केंद्र एका दिवसात 1500 दागिन्यांना हॉलमार्क करतात. या केंद्रांची दरवर्षी अनुमानित हॉलमार्किंग क्षमता 14 करोड आभूषण म्हणे दागिन्यांवर हॉलमार्क केले जातात. वर्ल्ड गोल्ड काऊन्सिलच्या म्हणण्यानुसार, भारतात जवळपास 4 लाख ज्वेलर्स आहेत. यामध्ये 35879 बीएसआय सर्टिफाइड ज्वेलर्स आहेत.

भारतात हॉलमार्किंगशी जोडलेले नवे नियम
या नियमानुसार, आता 14,18 आणि 22 कॅरेटच्या सोन्याच्या दागिन्यांवर हॉलमार्क (BIS Hallmark) असेल तरच त्यांची विक्री करता येईल.

अन्यथा संबंधित सराफा व्यापाऱ्याला दागिन्याच्या किंमतीच्या पाचपट दंड अथवा एक वर्षाचा कारावास होऊ शकतो. हॉलमार्किंगसाठीची नोंदणी प्रक्रिया ऑनलाईन स्वरुपातही उपलब्ध करुन देण्यात आली आहे.

त्यामुळे आता सर्व सराफा व्यापाऱ्यांना आपल्या दागिन्यांवर हॉलमार्किंग लावणे बंधनकारक राहील. यामुळे ग्राहकांची फसवणूक न होता त्यांना शुद्ध सोने मिळेल.

30 जूनपर्यंत पॅन-आधार करा लिंक

Aadhar Card
PM Kisan Yojna beneficiaries should link bank accounts with Aadhar till 15th

आधार कार्ड आणि पॅन कार्ड लिंक करण्यास केंद्र सरकारने दिलेली मुदत लवकरच 30 जूनपर्यंत आहे. त्यामुळे नागरिकांनी मुदतीपूर्वी हे दोन्ही दस्तावेज तातडीने लिंक करावेत, असे आवाहन सरकारच्या वतीने करण्यात आले आहे. आधार कार्ड आणि पॅन कार्ड हे अत्यंत महत्त्वाचे दस्तावेज आहेत. कोणत्याही सरकारी अथवा आर्थिक कामांसाठी या दोन दस्तावेजांचे सादरीकरण करणे आवश्यक असते. या पृष्ठभूमीवर केंद्र सरकारने हे दोन्ही दस्तावेज लिंक करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी वारंवार मुदतवाढ देखील दिली होती.

कोरोनामुळे देशात उद्भवलेल्या परिस्थितीच्या पृष्ठभूमीवर केंद्र सरकारने पॅन आणि आधार कार्ड लिंक करण्यासाठी मुदतवाढ दिली होती. तथापि, आता वाढवून दिलेली अंतिम मुदत संपण्यासाठी फारच कमी वेळ बाकी राहिला आहे. जर पॅनकार्ड आधारशी दिलेल्या मुदतीत लिंक केले नाही, तर ते रद्द होईल. अंतिम मुदत संपल्यानंतर एखाद्या वापरकर्त्याने पॅन कार्ड आधार कार्डाशी लिंक केले, तर पॅन कार्ड आधार क्रमांकाच्या सूचनेच्या तारखेपासून कार्यान्वित होईल, असे केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (सीबीडीटी) आपल्या अधिसूचनेत म्हटले आहे.

आयकर अधिनियमातील नवीन तरतुदीनुसार वापरकर्त्याने पॅन कार्ड मुदतीनंतर आधार कार्डशी जोडले, तर त्या वापरकर्त्याकडून याकरिता शुल्क घेतले जाणार आहे. मुदतीनंतर जोडल्यास संबंधित व्यक्तीला दंड भरावा लागणार आहे. मात्र, दंडाची ही रक्कम 1000 रुपयांपेक्षा कमी असेल. तुमचे पॅनकार्ड निष्क्रिय किंवा बंद झाले, तर तुम्ही पॅनची गरज असलेले कोणतेही अर्थिक व्यवहार करू शकणार नाहीत. परंतु, जर पॅन आधार कार्डशी अंतिम मुदतीनंतर म्हणजेच 30 जूननंतर जोडले गेले, तर संबंधित व्यक्तीला कलम 234 एच अंतर्गत यासाठी शुल्क अदा करावे लागेल.

 

Colleagues remember SSR on 1st death anniversary

sushant singh rajput
MUMBAI :
BOLLYWOOD personalities Sara Ali Khan, Shraddha Kapoor, Rajkummar Rao, producer Ekta Kapoor and filmmaker Abhishek Kapoor on Monday paid tributes to actor Sushant Singh Rajput on his first death anniversary. Rajput, 34, was found dead at his Bandra house on June 14, 2020. Ekta Kapoor shared a series of pictures on her Instagram page and hashtagged the caption, “Remembering Sushant Singh Rajput.” “Wished on the stars with you… Now I wish on a star knowing it’s you,” she wrote. Abhishek Kapoor, who directed Rajput in “Kai Po Che!” and “Kedarnath”, said he is yet to come to terms the actor’s demise. “One year today… Still numb. #omnamahshivaya #sushantsinghrajput #superstar forever,” he wrote. Rajput’s friend and casting director Mukesh Chhabra, who directed the actor in his last cinematic outing “Dil Bechara”, shared Abhishek Kapoor’s sentiment.
“Nothing seems to be the same. The void you left behind still remains. Here’s hoping I’ll see you once again. Miss you brother. #stillnumb #sushantsinghrajput,” he added. Sara Ali Khan, who worked with Rajput in her 2018 debut “Kedarnath”, shared a picture with the late actor and recalled how he was instrumental in “introducing” her to the world of acting.
“Whenever I needed help, advice or a laugh you were always there. You introduced me to the world of acting, made me believe that dreams could come true, and gave me all that I have today. Still can’t believe you’re gone. But every time I look at the stars, the rising sun or the moon I know you’re here. From ‘Kedarnath’ to Andromeda,” the actor wrote. Rajput’s “Chhichhore” co-star Shraddha Kapoor posted a picture with him on Instagram and captioned, “Shine on, dearest Sush.” Rao, who starred with the late actor in “Kai Po Che!”, shared a picture on his Instagram Story, with the caption “Bhai (brother).” Rajput’s “Raabta” co-star Kriti Sanon shared a collage from the look test she did with the actor for the 2017 romantic-drama. Rajput’s former girlfriend, actor Rhea Chakraborty, posted an emotional note on Instagram remembering her “love”. “There isn’t a moment where I believe that you aren’t here anymore. They said that time heals everything but you were my time and my everything.

Nagpur Weather

Nagpur
haze
28 ° C
28 °
28 °
54 %
6.2kmh
40 %
Sat
31 °
Sun
35 °
Mon
36 °
Tue
37 °
Wed
36 °

Stay connected

5,248FansLike
422FollowersFollow
500FollowersFollow
394FollowersFollow
2,380SubscribersSubscribe

Most Popular

Top 100 new year Wishes

Top 100 New Year Wishes 2023

0
Top 100 New Year Wishes 2023: If you are searching for some good wishes for the new year 2023 then you are on the...

Dhamma Chakra Pravartan Din : 15 Famous quotes by Dr. Babasaheb Ambedkar

0
Dhamma chakra Pravartan Din also known by the name of DhammaChakra Anupratan Din is a day to praise the Buddhist change of B. R....
Happy Diwali 2021

15+ Unique Happy Diwali wishes for 2022

0
Nowadays the only way through which connection is possible is the social networking site. The biggest festival in India is coming soon. Diwali is...
makar Sankranti

Top 100 best quotes, WhatsApp messages, wishes and greetings for Makar Sankranti 2024

0
Makar Sankranti Wishes : Makara Sankranti (Sankranthi) is a Hindu festival that encourages people to live in peace and harmony. Here are best quotes,...