आजपासून नवे निर्बंध; हे असेल सुरू

about nagpur lockdown

मुंबई: महाराष्ट्रात ओसरण्याच्या वाटेवर असलेली कोरोना लाट पुन्हा एकदा उचल खात असल्याने सरकारने शुक्रवारपासून नवे निर्बंध लावले आहेत. महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांमधील निर्बंध शिथिल करण्यासाठी पाच टप्पे जाहीर करण्यात आले होते. मात्र, आता राज्य सरकारच्या नव्या आदेशानुसार सर्व जिल्ह्यांना आणि महापालिकांना तिसऱ्या टप्प्यातील निर्बंधच लागू करावे लागणार आहेत.

राज्यात वाढत असलेली रुग्णसंख्या आणि डेल्टा प्लसचे रुग्ण वाढत आहेत. ही चिंता वाढत असल्याने संपूर्ण महाराष्ट्रात कुठेही पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील नियमावाली लागू नसतील. जिल्हाधिकाऱ्यांना आठवड्याचा आरटीपीसीआर चाचण्यांचा पॉझिटिव्हिटी दर लक्षात घ्यावा लागणार आहे. जिल्हाधिकाऱ्यांना पहिल्या आणि दुसऱ्या टप्प्यातील निर्बंध लागू करायचे असतील, तर त्यांना मागील दोन आठवड्यांतील करोना रुग्णसंख्येचा अभ्यास करावा लागेल. जर कोरोना रुग्णसंख्येमध्ये वाढ होत असल्याचे दिसत असेल, तर वरील टप्प्यातील निर्बंध लागू करावे लागतील.

काय सुरू? काय बंद?

 • अत्यावश्यक सेवेतील दुकाने सकाळी सात ते दुपारी दोनपर्यंत
  इतर दुकाने सोमवार ते शुक्रवार सकाळी सात ते दुपारी दोन यावेळेत खुली राहतील. सर्व मॉल आणि थिएटर बंद राहतील.
 • सोमवार ते शुक्रवार हॉटेल सेवा फक्‍त ५० टक्‍के क्षमतेने दुपारी दोनपर्यंत खुली राहतील.
 • पार्सल व्यवस्था असेल. ही सुविधा शनिवार-रविवार बंद राहील.
 • मुंबईतील लोकल सेवा आणि रेल्वे बंद राहतील.
 • मॉर्निंग वॉक, मैदानांवर व्यायाम, सायकलिंग पहाटे पाच ते सकाळी नऊ वाजेपर्यंत
 • खासगी आणि सरकारी कार्यालये ५० टक्के क्षमतेने सुरू
 • सोमवार ते शनिवार चित्रीकरणास स्टुडिओत परवानगी.
 • सोमवार ते शुक्रवार मनोरंजन कार्यक्रम ५० टक्के क्षमतेने दुपारी दोन वाजेपर्यंत
 • लग्नसोहळ्यास ५० तर अंत्यविधीला २० लोकांना उपस्थितीची मुभा
 • बांधकाम दुपारी दोन वाजेपर्यंत
 • शेतीविषयक सर्व कामांना मुभा
 • ई कॉमर्स दुपारी दोन वाजेपर्यंत