बसमध्ये आक्षेपार्ह स्थितीत आढळलं ‘कपल’; पोलिसांनी दोघांना अर्धनग्न अवस्थेतच पोलीस ठाण्यात आणलं!

Bus

मध्य प्रदेशच्या रीवा जिल्ह्यात पोलिसांचा अमानवी चेहरा समोर आला आहे. जिल्ह्यातील शाहपूर हद्दीच्या पोलिसांनी एका बसमध्ये प्रेमी युगुलाला आक्षेपार्ह स्थितीत पकडलं. पण कारवाई करताना पोलिसांसोबत एकही महिला पोलीस कर्मचारी सोबत नव्हती आणि पोलिसांनी सुरूवातीला युगुलाला शिवीगाळ केली. त्यानंतर तरुणीला अर्धनग्न अवस्थेतच पोलीस ठाण्यात घेऊन जाण्याचा धक्कादायक प्रकार पोलिसांनी केला आहे.

संबंधित घटनेचा व्हिडिओ देखील सोशल मीडियात व्हायरल झाला आहे. व्हिडिओ पाहिल्यास रीवा पोलिसांच्या अमानवी कृत्याचा संताप आल्याशिवाय राहवत नाही अशी वाईट वागणूक पोलिसांनी तरुणीला दिली आहे. दरम्यान, घटनेच्या चौकशीचे आदेश वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिले आहेत. समोर आलेल्या माहितीनुसार एका बसमध्ये प्रेमी युगुल आक्षेपार्ह स्थितीत आढळून आले होते. त्यानंतर स्थानिक नागरिकांनी पोलिसांना याबाबतची माहिती दिली. मग पोलीस बसमध्ये दाखल झाले. त्यावेळी बसमध्ये आक्षेपार्ह स्थितीत युगुल आढळून आले. त्यानंतर पोलिसांनी त्यांच्यासोबत चुकीच्या पद्धतीनं व्यवहार करणं सुरू केलं. पोलिसांनी चक्क तरुणीला त्याच अवस्थेत पोलीस ठाण्यात नेण्याचा प्रताप केला आहे.