Home Blog Page 111

सीताबर्डी मर्चंट्स असोसिएशनतर्फे हॉकर्सविरोधात एक दिवसाचा बंद

सीताबर्डी

नागपूर : सीताबर्डी मर्चंट्स असोसिएशनच्या सर्व दुकानदारांनी बुधवारी हॉकर्सविरोधात एकजुटतेचे प्रदर्शन करीत हॉकर्सना दुकानासमोर अवैध व्यवसाय करण्यास मनाई करून हुसकावून लावले. यापुढे अवैध हॉकर्सना दुकानासमोर अतिक्रमण करू न देण्याचा निर्धार सीताबर्डी मेनरोड येथील दुकानदारांनी बंददरम्यान केला.

दुकानदार हुसेन अजानी यांनी सांगितले, सीताबर्डी मेनरोडवर ७०० पेक्षा जास्त अवैध हॉकर्स अरेरावी करून व्यवसाय करतात. मंगळवारी रात्री हॉकर्सनी अवैधरित्या व्यापाऱ्यांच्या दुकानासमोरील मुख्य रस्त्यावर स्वत:च्या व्यवसायासाठी चार बाय चार आकाराचे चुन्याने डब्बे आखले. त्यावरून रात्रीच दुकानदार आणि हॉकर्समध्ये तणाव निर्माण झाला. मेनरोडवरील दुकाने बंद करण्याचा हॉकर्सचा डाव व्यापाऱ्यांनी हाणून पाडताना बुधवारी सकाळी सर्वच दुकानदारांनीआपापली दुकाने बंद ठेवून निषेध नोंदविला. दुकानदारांच्या कृतीला न जुमानता हॉकर्सनी मोर्चा काढून दुकानदारांविरुद्ध नारेबाजी केली. त्याला प्रत्युत्तर म्हणून दुकानदारांनीही हॉकर्सला विरोध केला.

अजानी म्हणाले, पूर्वी १०८ वैध हॉकर्स होते. ही संख्या ७०० वर गेली असून दिवसेंदिवस त्यात वाढच होत आहे. हॉकर्समुळे आमच्यावर दुकाने बंद करण्याची वेळ आली आहे. लहानसहान गोष्टीवरून हॉकर्स अरेरावीवर उतरतात आणि थेट धमकी देतात. यापूर्वी सीताबर्डी पोलीस ठाण्यात अनेक तक्रारी केल्या आहेत. बुधवारी पोलीस उपायुक्त विनिता शाहू यांनी मध्यस्थी करून हॉकर्सना पिटाळून लावले. या संदर्भात सीताबर्डीच्या पोलीस निरीक्षकांनीही मध्यस्थी केली. यापुढे हॉकर्सची मनमानी व अरेरावी चालू देणार नाही आणि एकजुटीने त्यांचा विरोध करू, असे अजानी यांनी सांगितले.

दोन्ही पक्षांविरुद्ध गुन्हा दाखल

सीताबर्डी पोलिसांनी दोन्ही पक्षांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी हॉकर गोपीचंद आंभुरे, विनायक तिरपुडे, दुर्गाप्रसाद केवलरामानी, संदीप साहू, हेमंत गोतमाांगे, नरेश ढगे,राजेश चंदू अग्रवाल, आतिक अंसारी आणि त्यांचे साथीदार यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला. तसेच व्यापाºयांमध्ये हुसेन, किसन अग्रवाल, प्रदीप गुप्ता, विजय अग्रवल, प्रजोत देशपांडे, किसन मांगवानी, पराग ठक्कर, मंसुर अंसारी, नारायण चौरसिया, अर्जीन भोजवानी आणि इतर लोकांविरुद्ध गुन्हा दाखल केला. व्यापारी गुरुवारी यासंदर्भात पोलीस आणि मनपा आयुक्तांची भेट घेणार आहेत. त्यांचे म्हणणे आहे की, नेत्यांच्या माध्यमातून दबाव टाकून हॉकर्सना मदत केली जात आहे.

कळमन्यात संत्रा आणि मोसंबीची आवक वाढली

संत्रा

नागपूर : सध्या कळमना फळे बाजारात संत्रा आणि मोसंबीची आवक गेल्यावर्षीच्या तुलनेत दुप्पट आहे. गेल्यावर्षी १ ते २० सप्टेंबरदरम्यान दोन्ही फळांची १४१ क्विंटल तर यंदा याच कालावधीत ६,५२९ क्विंटल आवक झाली. दोन्ही फळांची आवक वाढल्याने भावात घसरण झाली आहे. सध्या संत्र्याला दर्जानुसार ७५० ते २,३७५ रुपये क्विंटल भाव मिळाला. तर गेल्यावर्षी याच कालावधीत २,८७५ ते ३,०२५ रुपये क्विंटल भाव मिळाला होता. याशिवाय मोसंबीच्या किमतीतही गेल्यावर्षीच्या तुलनेत बराच फरक आहे. या महिन्यात २० दिवसात ७४,६६० क्विंटल मोसंबी कळमना बाजारात विक्रीसाठी आली. मोसंबीला ८५० ते २,३०० रुपये भाव मिळाला. तुलनात्मरीत्या गेल्यावर्षी याच काळात २० दिवसात ३,७५४ क्विंटल मोसंबीची आवक झाली होती. आवक कमी झाल्याने भाव जास्त मिळाले होते. अर्थात, १५०० ते ४,१०० रुपये क्विंटल असे दुप्पट भाव होते.

‘माझे कुटुंब, माझी जबाबदारी’ घेण्यास आशांचा नकार

अभियान

नागपूर : महाराष्ट्र शासन कोरोना संक्रमण टाळण्यासाठी ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’ अभियान राबवित आहे. या अभियानात महत्त्वाचा वाटा आशा वर्करचा आहे. या अभियानाच्या माध्यमातून राज्यभरात व्यापक सर्वेक्षण होणार आहे. परंतु आशांनी अभियानाची जबाबदारी घेण्यास नकार दिला आहे. या अभियानात सहभागी करून घेण्यापूर्वी शासनाने आशांच्या काही मागण्या मान्य कराव्यात, यासाठी संविधान चौकात आंदोलन करण्यात आले. या अभियानाचे मानधन आशांना हवे आहे. परंतु शासन त्याबाबत बोलायला तयार नाही. सरपंच, ग्रामसेवक, वैद्यकीय अधिकारी यांच्याकडून आशांना मदत होत नाही. आशांवर जबरदस्ती व दबाव टाकून कामे लादली जात आहेत. सुरक्षा साधनांचा अभाव असून कार्यक्रम राबविण्यासाठी बहुतांश साहित्य अद्यापही दिले गेलेले नाहीत. गटप्रवर्तक टीमवर्कमध्ये सहभागी नसताना रिपोर्टिंगचे काम व सर्वेक्षणाचे काम दिले आहे. आशांवर होत असलेल्या अन्यायाच्या विरोधात संविधान चौकात काळ्या फिती लावून आंदोलन केले. शासनाने तातडीच्या या प्रश्नांची सोडवणूक न केल्यास तीन दिवसीय लाक्षणिक संप २८ सप्टेंबरपासून करण्याचा इशारा दिला आहे. आंदोलनाचे नेतृत्व महासचिव प्रीीती मेश्राम, राजेंद्र साठे यांनी केले. आंदोलनात रंजना पौनीकर, पौर्णिमा पाटील, नंदा लिखार, रुपलता बोंबले, अंजू चोपडे, मनीषा बारस्कर, मंदा गंधारे आदी उपस्थित होते.

आता मोबाइलवरून देता येईल परीक्षा!

परीक्षा

नागपूर : अंतिम वर्षाच्या आॅनलाइन परीक्षांबाबत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात युद्धपातळीवर तयारी सुरू आहे. विशेष म्हणजे विद्यार्थी हे त्यांच्या मोबाइलवरूनदेखील परीक्षा देऊ शकणार आहेत. यासाठी विद्यापीठाने आरटीएमएनयू परीक्षा हे विशेष मोबाइल अ‍ॅप विकसित केले आहे.

या माध्यमातून ते एक तासात सर्व प्रश्न सोडवू शकतील. विशेष म्हणजे राज्यातील हा पहिलाच प्रयोग असल्याचे कुलगुरू डॉ. सुभाष चौधरी, परीक्षा व मूल्यमापन संचालक डॉ. प्रफुल्ल साबळे यांनी सांगितले. १ ते १८ आॅक्टोबर या कालावधीत अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांची आॅनलाइन परीक्षा होणार आहे. इंटरनेटची कनेक्टिव्हिटी गेली तरी विद्यार्थी पेपर सोडवू शकतील. केवळ पेपर सबमिट करताना इंटरनेट असणे आवश्यक राहणार आहे. एका तासानंतर पेपर सोडवू शकणार नाहीत.

विद्यापीठाने घेतली चाचणी : नागपूर विद्यापीठाने या मोबाइल अ‍ॅपची चाचणीदेखील घेतली आहे. चारही जिल्ह्यांतील दुर्गम भागातदेखील चाचपणी झाली व अ‍ॅप कमी इंटरनेट रेंजमध्येदेखील काम करू शकत असल्याची माहिती कुलगुरूंनी दिली. गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांची विद्यापीठाकडे माहिती येईल व त्यांची नावे शिस्तपालन समितीकडे पाठविण्यात येतील, अशी माहिती देण्यात आली.

गरिबांनी उपचार कुठे घ्यायचे?

पॉझिटिव्ह

नागपूर : शहरात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची वाढती संख्या व होणारे मृत्यू लक्षात घेता शहरातील ४२ खासगी रुग्णालयांमध्ये कोविड रुग्णांचे उपचार सुरू आहेत. पुन्हा संख्या वाढवली जात आहे. सोबतच खासगी रुग्णालयांकडून काढण्यात येणाऱ्या बिलाचे ऑडिट केले जात असल्याचा दावा मनपा प्रशासनाने केला आहे. दुसरीकडे आधी पैसे जमा करा नंतर उपचार अशी भूमिका खासगी हॉस्पिटलने घेतली आहे. अशा परिस्थितीत दीड-दोन लाख रुपये जमा करणे शक्य नसलेल्या गरीब कोविड रुग्णांनी उपचार कुठे घ्यायचे, असा गंभीर प्रश्न उभा ठाकला आहे.

कोविड रुग्णांसाठी बेडची संख्या २ हजारापर्यंत वाढवल्याचा दावा करण्यात आला आहे. दुसरीकडे उपचारासाठी रुग्णांची भटकंती थांबलेली नाही. शासकीय रुग्णालयात जागा नाही. खासगी रुग्णालयात दाखल करून घेतले जात नाही. मनपाच्या नियंत्रण कक्षाकडे विचारणा करण्याचा प्रयत्न केला तर वेळेवर फोन लागत नाही. लागला तरी उपचार मिळेलच याची शाश्वती नाही. अशा परिस्थितीत दोन-अडीच लाख खर्च करण्याची कुवत नसलेल्यांनी उपचार कुठे घ्यावे, असा गंभीर प्रश्न पडला आहे.

उपचारावरील खर्चाचा बोर्ड लावावा
खासगी रुग्णालयांनी दर्शनी भागात कोविड रुग्णांच्या माहितीसाठी उपचारासाठी येणाऱ्या खर्चाची माहिती असलेला बोर्ड लावावा. तसेच कोविड रुग्णांसाठी असलेले बेड, उपचार सुरू असलेले रुग्ण, रिक्त बेड, उपचार करणाऱ्या डॉक्टरांची माहिती द्यावी, अशी नागरिकांची मागणी आहे.

अधिकारी खासगी रुग्णालयात भरती
कोरोनाबाधितांवर वेळेत उपचार करता यावेत, यासाठी मेडिकल आणि मेयो येथे अतिरिक्त खाटांची व्यवस्थाही करण्यात आली असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले होते. विविध यंत्रणांनी सज्ज असल्याचे वेळोवेळी सादरीकरण केले. मात्र यंत्रणा सज्ज असल्याचे सांगणारे अनेक अधिकारी खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत आहेत.

नियंत्रणाची गरज
मनपाची चार रुग्णालये सुसज्ज करण्यात आली. येथे कोविड रुग्णांवर उपचार होणे अपेक्षित होते. मात्र इंदिरा गांधी रुग्णालय वगळता अन्य ठिकाणी उपचार सुरू झालेले नाही. इंदिरा गांधी रुग्णालयातही मनुष्यबळाची समस्या आहे. दुसरीकडे खासगी रुग्णालयांवर प्रशासनाचा वचक दिसत नाही. रुग्णांकडून वारेमाप बिल वसुलणाºया रुग्णालयांना नोटीस बजावण्यापलिकडे कारवाई होत नसल्याने त्यांना प्रशासनाचा धाक राहिलेला नाही.

नागपुरातील चार नवीन मेट्रो स्टेशनची सुरक्षा आयुक्तांनी केली तपासणी

मेट्रो

नागपूर : मेट्रो रेल्वे सुरक्षा आयुक्त (सीएमआरएस) जनककुमार गर्ग आणि त्यांच्या चमूने २१ सप्टेंबरला ऑरेंज लाईन (रिच-१), अ‍ॅक्वा लाईन (रिच-३) मार्गातील अजनी चौक व रहाटे कॉलनी आणि एलएडी चौक व बन्सीनगर या नवीन चार मेट्रो स्टेशनची पाहणी करून सोईसुविधा आणि तांत्रिक बाबींचा आढावा घेतला आणि समाधान व्यक्त केले.
गर्ग यांनी स्टेशनच्या कार्याची प्रशंसा केली. महामेट्रोला स्थानकांचे प्रमाणपत्र मिळण्याचा विश्वास असून नव्याने मेट्रो सेवा सुरू होईल. १२ मेट्रो स्टेशनऐवजी आता १६ मेट्रो स्टेशनवरून मेट्रो सेवा सुरूहोऊ शकेल. अधिकाऱ्यांनी एएफसी गेट, इमर्जन्सी कॉल पॉईंट, प्लॅटफार्म परिसरातील इमर्जन्सी स्टॉप प्लंगर, लिफ्ट, प्रसाधनगृह, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, बेबी केअर रूम, दिव्यांगाकरिता विशेष प्रसाधनगृह, मार्गदर्शिका, सूचना बोर्ड, सिग्नलिंग उपकरण खोली, टेलिकॉम उपकरण खोली, ट्रान्सफार्मर, स्टेशन नियंत्रण कक्ष व विविध सुरक्षा नियमांची पाहणी केली. यावेळी प्रात्यक्षिक करण्यात आले. संभाव्य आणीबाणीच्या परिस्थितीत करायच्या उपाययोजनांची समीक्षा त्यांनी केली. या प्रसंगी वेगवेगळ्या मॉक ड्रीलचे आयोजन करण्यात आले. गर्ग यांनी १३२ केव्ही व्हॅट रिसिव्हिंग सबस्टेशनची पाहणी करून प्रशंसा केली.
दौऱ्यात संचालक (प्रकल्प) महेश कुमार, कार्यकारी संचालक अरुण कुमार, जे. पी. डेहरीया, अनिल कोकाटे, महाव्यवस्थापक सुधाकर उराडे, मुख्य प्रकल्प व्यवस्थापक (ओएचई) नामदेव रबडे, उपमुख्य प्रकल्प व्यवस्थापक विद्यासागर, नरेंद्र उपाध्याय तसेच जनरल कन्स्लटंटचे परतेती व इतर अधिकारी उपस्थित होते.

CoronaVirus in Nagpur : नागपुरातील १३६२ रुग्ण कोरोनामुक्त : बरे होण्याचे प्रमाण ८३.१८ टक्के

कोरोनामुक्त

नागपूर : जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांच्या तुलनेत कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या सलग तिसऱ्या दिवशी अधिक राहिली. मंगळवारी १६६२ रुग्ण कोरोनामुक्त झाले तर, १२७३ नवीन कोरोना रुग्ण आढळून आले. तसेच, कोरोनातून बरे होण्याचे प्रमाण ८३.१८ टक्के झाले. देशामध्ये हे प्रमाण ८०.८६ टक्के आहे. नागपूरचे प्रमाण २.३२ टक्के अधिक असल्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला आहे. एवढेच नाही तर नागपूरमधील हे आतापर्यंतचे सर्वाधिक प्रमाण आहे. जूनमध्ये बरे होण्याचे प्रमाण ८२ टक्क्यापर्यंत पोहचले होते.

कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांमध्ये १३६२ रुग्ण शहरातील तर, ३०० रुग्ण ग्रामीणमधील आहेत. जिल्ह्यात आतापर्यंत ५५ हजार २१२ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. त्यात शहरातील ४५ हजार ३७७ तर, ग्रामीणमधील ९८३५ रुग्णांचा समावेश आहे. सध्या कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांच्या तुलनेत नवीन रुग्ण मिळण्याचे प्रमाण कमी होत आहे. जिल्ह्यात सध्या ९०१८ (शहर-५७८२, ग्रामीण-३२३६) कोरोना रुग्ण आहेत. त्यात ३७९८ गृह विलगीकरणातील रुग्ण आहेत. कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णांमध्ये शहरातील ९२५, ग्रामीणमधील ३४० तर, इतर भागातील ८ रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण ६६ हजार ३८० कोरोनाबाधित झाले आहेत. जिल्ह्यात मंगळवारी ५३२७ (शहर-३४४५, ग्रामीण-१८८२) नमुने तपासण्यात आले. आतापर्यंत एकूण ४ लाख ७ हजार ८६ नमुने तपासण्यात आले.

५४ रुग्णांचा मृत्यू
मंगळवारी कोरोनामुळे ५४ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यात शहरातील ४१, ग्रामीणमधील ५ तर, इतर ठिकाणच्या ८ रुग्णांचा समावेश आहे. आतापर्यंत २१५० कोरोना बाधितांचा मृत्यू झाला आहे. प्रशासन मृत्यूसंख्या कमी करण्याचा प्रयत्न करीत आहे. सप्टेंबरमध्ये आतापर्यंत ११०५ रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

खासगी प्रयोगशाळेत ३५६ पॉझिटिव्ह
खासगी प्रयोगशाळेत तपासलेल्या ९१४ मधून ३५६ नमुने पॉझिटिव्ह आढळून आले. अ‍ॅन्टीजेन चाचणीत ३८२० मधील २६५ नमुने पॉझिटिव्ह मिळाले. तसेच, एम्समध्ये १२८, मेडिकलमध्ये १९६, मेयोमध्ये १८३, माफसूमध्ये १०१ तर, नीरीमध्ये ४४ नमुने पॉझिटिव्ह मिळून आले.

अ‍ॅक्टिव – ९०१८
स्वस्थ – ५५२१२
मृत्यू – २१५०

डोळ्यात तिखट फेकून खुनाचा प्रयत्न : युवकाची मृत्यूशी झुंज

मृत्यूशी झुंज

नागपूर : जुन्या वादातून तिघांनी एका युवकाच्या डोळ्यात तिखट फेकून तलवार आणि चाकूने हल्ला करीत खून करण्याचा प्रयत्न केला. ही घटना रविवारी रात्री सदर परिसरात घडली.
अनिकेत मुकेश अंगलवार (२७) रा. खलासी लाईन असे जखमी युवकाचे नाव असून तो मेयो रुग्णालयात दाखल आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अनिकेत हा रविवारी रात्री साडेनऊ वाजता खलासी लाईन चौरसिया चौकात मित्रासोबत उभा होता. दरम्यान, आरोपी उमेश ऊर्फ अम्मू मनोजकुमार पैसाडेली (२५) रा. कडबी चौक), मॉरीस आरीक स्वामी फ्रान्सिस आणि फरहान ऊर्फ गट्टू फिरोज बेग दोघेही रा. कॅथलिक क्लब, खलासी लाईन हे तेथे आले. त्यांनी जुन्या वादातून अनिकेतशी वाद घातला. त्यानंतर चिडलेल्या आरोपींनी पाठीमागे लपविलेली तलवार, चाकू आणि लोखंडी रॉड काढले आणि अनिकेतच्या डोळ्यात तिखट फेकले. त्यानंतर अनिकेतवर अचानक हल्ला केला करीत खून करण्याचा प्रयत्न केला. अनिकेत रक्ताच्या थारोळ्यात पडल्यानंतर आरोपींनी पळ काढला. गंभीर जखमी अनिकेतला मित्रांनी मेयो रुग्णालयात दाखल केले. पोलिसांनी आरोपींविरुद्ध खून करण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला. रात्री उशिरापर्यंत पोलिसांनी एकाही आरोपीला अटक केली नव्हती. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथक गठित केले आहे.

विनाकारण चेन पूलिंग केल्यामुळे ६.२५ लाखाचा दंड

चेन पूलिंग

नागपूर : कोणतेही कारण नसताना रेल्वेची चेन पूलिंग करणे हा गुन्हा आहे. तरीसुद्धा कारण नसताना चेन पूलिंग करून रेल्वेगाडी थांबविणाऱ्या १ हजार ८२१ जणांवर दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या नागपूर विभागाने कारवाई करून ६.२५ लाख रुपये दंड वसूल केला आहे.

दक्षिण पूर्व मध्य रेल्वेच्या रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दलाने वर्षभरात अनेक उल्लेखनीय कामे केली. यासोबतच चाईल्ड लाईनच्या मदतीने रागाच्या भरात घरातून निघून गेलेल्या ५०० बालकांना त्यांच्या पालकांकडे सुरक्षित पोहोचविले. रेल्वे मालमत्तेची चोरी किंवा अनधिकृत ताबा मिळविण्याच्या २५८ प्रकरणांमध्ये ४१७ आरोपींना अटक करून साडेतीन कोटींची मालमत्ता जप्त करण्यात आली. गुन्हेगारीवर नियंत्रण मिळविण्याच्या दृष्टीने नियमांचे उल्लघंन करणाऱ्या ३३ हजार ३१ दोषींवर रेल्वे अ‍ॅक्टनुसार कारवाई करण्यात आली. १८२ गुन्हेगारांना अटक करण्यात आली. महत्त्वाच्या १९ स्थानकांवर निर्भया फंड अंतर्गत सीसीटीव्ही यंत्रणा उभारण्यात आली आहे.

याशिवाय प्रवाशांची सुरक्षा आणि आरोग्याच्या दृष्टीने विचार करीत अनधिकृतपणे खाद्यपदार्थांची विक्री करणाऱ्या ५ हजार २३४ अवैध व्हेंडर्सविरूद्ध कारवाई करून ३२ लाखांचा दंड वसूल करण्यात आला.

नागपुरात एलपीजीने भरलेल्या ट्रकची केली चोरी

एलपीजी

नागपूर : खापरीत एलपीजी सिलिंडर भरलेल्या ट्रकची चोरी करण्यात आली. पोलिसांनी ट्रकमध्ये लावलेल्या जीपीएसच्या साहाय्याने आरोपीला अटक केली आहे. ही घटना शनिवारी रात्री घडली.
कैलाश बाबुलाल राठोड ( ४९) असे आरोपीचे नाव आहे. त्याचा साथीदार भारत भास्कर हरडे (३५) फरार आहेत. दोघेही अमरावतीचे रहिवासी आहेत. न्यू सुभेदार ले-आऊट येथील रहिवासी नितीन बेलखोडे यांच्याकडे ट्रक क्रमांक एम. एच. ३१, सी. बी.-७६५१ आहे. राजेंद्र अजित त्यांचा ट्रकचालक आहे. १९ सप्टेंबरच्या रात्री १० वाजता राजेंद्रने एचपीसीएल येथून ४५० एलपीजी सिलिंडर घेतले. तो ट्रक खापरीमध्ये उभा करून कामानिमित्त निघून गेला. सिलिंडर एचपी डीलरच्या गोदामात पोहोचवायचे होते. अडीच तास झाल्यानंतर राजेंद्रला ट्रक चोरी झाल्याची माहिती मिळाली. राजेंद्रने याची माहिती आपले मालक नितीन बेलखोडे यांना दिली. बेलखोडे यांनी त्वरित बेलतरोडी ठाण्यात तक्रार दाखल केली. ४५० एलपीजी सिलिंडर असल्यामुळे पोलिसही सक्रिय झाले. जीपीएसच्या माध्यमातून त्यांना ट्रक अमरावतीकडे गेल्याची माहिती मिळाली. आरोपी लहान मार्गाने जात होते. त्यामुळे पोलिसांची चिंता वाढली. बेलतरोडी मार्गातील सर्व पोलीस ठाण्यांना सूचना देऊन ट्रक पकडण्याचे आवाहन केले. हिंगणघाटजवळ पोलिसांनी ट्रक पकडला. पोलिसांना पाहून भारत हरडे फरार झाला. ट्रकचालक कैलाश राठोड पोलिसांच्या हाती लागला. त्याच्याकडून १३.५० लाख रुपये किमतीचे एलपीजी सिलिंडर तसेच ट्रक हस्तगत केला. कैलाशने भारतच्या सांगण्यानुसार ट्रक चोरी केल्याची माहिती दिली. भारतने ट्रक खरेदी करून देण्याच्या बहाण्याने आपणास नागपुरात आणले असल्याचे त्याने सांगितले. भारतला अटक केल्यानंतर या प्रकरणाचा खुलासा होणार आहे.

नागपूर शहरातील बहुतांश सिग्नलवरच्या भिकाऱ्यांना आवरणार कोण? त्यांच्यामुळेही कोरोना वाढण्याचा धोका

भिकाऱ्यांना

नागपूर : वाहन चालविणारी अथवा वाहनात बसलेली व्यक्ती मास्क लावून नसेल तर पोलीस लगेच त्याच्याकडून २०० रुपयांचे चालान फाडतात. परंतु याच सिग्नलवर भीक मागणारी लहान मुले, महिला या कुठलेही सुरक्षितता न बाळगता वाहनांना, चालकांना हात लावून भीक मागतात. शहरातील अनेक चौकांमध्ये हे दृश्य बघायला मिळते. चालान भरणारे वाहन चालक सुद्धा पोलिसांना त्यांच्याकडे बोट दाखवून यांचे काय, अशी विचारणा करतात. पण वाहतूक पोलीस सुद्धा हतबलतेने त्यांच्याकडे दुर्लक्ष करतात.

कोरोनाच्या वाढत्या संक्रमणामुळे आणि पोलिसांकडून होत असलेल्या कारवाईच्या भीतीपोटी प्रत्येकजण तोंडाला मास्क लावून फिरत आहे. पायी चालणाऱ्यांनी मास्क न वापरल्यास त्यांच्यावरही कारवाई करण्यात येत आहे. पण शहरातील काही सिग्नलवर भटकंती करणारी काही लोकं टोळीने दिसून येतात. यातील पुरुष मंडळी कुठले तरी सामान चौकात विकत असतात. महिला व मुले सिग्नलवर थांबलेल्या वाहन चालकांकडून भीक मागत असतात. त्यांची लहान लहान मुले सिग्नल थांबल्याबरोबर वाहनांच्या जवळ येतात. गाड्यांना हात लावतात. दुचाकीवर असलेल्यांना सुद्धा हात लावून पैशाची मागणी करतात. हे लोकं समूहाने राहतात. कोरोनासारखी महामारी असतानाही कुणाच्याही तोंडाला मास्क नसतो, बिनधास्तपणे रस्त्यावर हुंदाडत असतात. कोरोनापासून बचावण्यासाठी प्रशासनाने काही सुरक्षेचे मापदंड घातले आहे. पण हे भटकंती करणारे त्याकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे ही लोकं कोरोनाचे वाहक ठरू शकतात, अशी भीती नागरिकांना आहे. या लोकांना आवर घाला, अशी भावना नागरिकांची आहे.

भीक मागणाऱ्यांविरुद्ध कारवाई थांबली
महिला व बाल कल्याण विभाग, पोलीस विभागातील सामाजिक सुरक्षा पथक हे संयुक्तपणे भीक मागणाऱ्यांविरु द्ध कारवाई करते. पण या विभागाकडून कारवाईच बंद आहे. शहरातील आरबीआय चौक, अग्रसेन चौक, आकाशवाणी चौक, पंचशील चौक, छत्रपती चौक, तुकडोजी चौक अशा अनेक चौकात लहान मुले, महिला भीक मागतांना दिसत आहे. नागरिक त्यांच्यामुळे भयभीत आहे. कोरोना संक्रमणाच्या काळात प्रशासनाकडून कारवाई व्हावी, अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे.

पुरामुळे नागपूर जिल्ह्यात २९ हजार हेक्टरवरील पिकांचे नुकसान

पिक

नागपूर : ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीमुळे जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. कृषी विभागाने नुकसानीच्या केलेल्या पंचनाम्यात २९२६२.११ हेक्टरवरील शेतीचे नुकसान झाल्याचे निष्पन्न झाले आहे. कृषी विभागाने नुकसानीचा अहवाल शासनाला पाठविला आहे.

अतिवृष्टीमुळे निर्माण झालेल्या पूरपस्थितीने जिल्ह्यातील मौदा, कामठी, पारशिवनी, कुही, नरखेड, रामटेक, सावनेर या तालुक्यातील ६१ वर गावे बाधित झाली असून ४९११ कुटुंबांना फटका बसला आहे. महसूल विभागातर्फे यापूर्वीच बाधित क्षेत्रातील शेतीसह, नागरी भागातील नुकसानीचा प्राथमिक अहवाल शासनास सादर करण्यात आला आहे. पूरामुळे १६०२ जनावरे मृत्यू पावलेत, ७७६५ घरांची पडझड झाली. ५० जनावरांच्या गोठ्याचे नुकसान झाले आहे. पुराचा सर्वाधिक फटका पिकांना बसला आहे. जिल्ह्यात यंदा खरीपाचे एकूण क्षेत्र ५ लाख १०० हेक्टर इतके नियोजित करण्यात आले होते. यापैकी २९ हजार २६२.११ हेक्टरवरील शेती पिकांचे नुकसान झाले आहे. यामध्ये कोरडवाहूतील २७८२९.८५ हेक्टर, ओलिताखालील १३५२.४७ हेक्टर व बहुवार्षिक पिकाखालील ७९.७९ हेक्टरचा समावेश आहे. यामध्ये सर्वाधिक कापूस, सोयाबीन, तूर, धान या मुख्य पिकांसह भाजीपाला व इतर पिकांचे नुकसान झाले आहे.

यंदा कोरोनानंतरही जिल्ह्यात खरीपामध्ये बंपर पेरणी झाली होती. यामुळे शेतकऱ्यांना चांगले उत्पादनाची हमी होती. परंतु पुरामुळे शेतकºयांवर चांगलेच संकट कोसळले आहे. पूर परिस्थितीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी गेल्या काही दिवसांपूर्वीच केंद्राचेही पथक जिल्ह्यात येऊन गेले. जिल्हा प्रशासन व कृषी विभागानेही नुकसानीचा अहवाल शासनाकडे पाठविला आहे. त्यामुळे लवकरात लवकर नुकसान भरपाई मिळावी, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे.

‘उमरेड कऱ्हांडला’त दिसून आले नवीन वाघ

वाघ

नागपूर : उमरेड कऱ्हांडला अभयारण्यात सध्या नवीन वाघांची उपस्थिती दिसून आली आहे. वन अधिकाऱ्यांनुसार पावसाळ्याचे दिवस असल्याने उमरेड-पवनी कऱ्हांडला अभयारण्यात अन्य वन क्षेत्रातील वाघांचेही स्थलांतरण होत आहे. वनक्षेत्रात लागून असलेले कॅमेरेही याची साक्ष देताहेत.

प्रत्येक सोमवारी वन कर्मचारी कॅमर ट्रॅपची तपासणी करतात. या तपासणीत काही कॅमेऱ्यांमध्ये नवीन वाघ दिसून आलेत. यात वाघ आणि वाघीण या दोघांचाही समावेश आहे. यासोबतच कुही वन परिक्षेत्रात ब्रह्मपुरीचा वाघ टी -२२ सुद्धा पाहिला गेला आहे. त्यामुळेच १२ सप्टेंबर रोजी जेव्हा मृत वाघ आढळून आला तेव्हा ते वाघांच्या आपसातील लढाईत मारला गेल्याचे मानले जात आहे. मृत २ वर्षीय वाघ हा अभयाारण्याती वाघीन टी-१७ च्या तीन छाव्यांपैकी एक असल्याची माहिती समोर आली आहे. या पार्श्वभूमीवर वन अधिकाऱ्यानी वाघांची उपस्थिती असलेल्या ठिकाणी कॅमरा ट्रॅप वाढवण्याचे निर्देश दिले आहेत.

कॅमेराही चोरीला
कऱ्हांडला वन्यजीव परिक्षेत्रातील कक्ष क्रमांक १४१८ मधून एक कॅमेरा चोरीला गेल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या कॅमेऱ्याची किमत १० हजार रुपये आहे. वन्यजीव क्षेत्रातील कॅमरा चोरी गेल्याने सुरक्षा व्ययवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. वन्यप्राण्यांच्या कॅमेऱ्यासमोरून जाताच फ्लॅशसह फोटो निघतो. त्यामुळे काही प्राणी कॅमेऱ्याला हलवून ते काढण्याचा प्रयत्नही करतात. यापार्श्वभूमीवर न कर्मचारी गस्त घालतांना वनक्षत्रातील कॅमऱ्यावरही नजर ठेवतात. १५ सप्टेंबर रोजी कॅमेरा दिसून न आल्याने विभागीय चौकशीनंतर उमरेड पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली.

परीक्षा ऑनलाईन, मनस्ताप शिक्षकांना

परीक्षा

नागपूर विद्यापीठांमध्ये ऑनलाईन परीक्षा होणार असतानादेखील राज्य शासनाने सर्व महाविद्यालयातील शिक्षकांना १०० टक्के उपस्थिती अनिवार्य केली आहे. कोरोनाचा प्रकोप वाढत असताना या निर्देशांमुळे शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर आहे. जर केवळ अंतिम वर्षाची परीक्षा ऑनलाईन होणार आहे तर सर्व शिक्षकांना बोलविण्याची आवश्यकता का आहे, असा प्रश्न शिक्षकांकडून उपस्थित करण्यात येत आहे.

राज्याच्या उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने १८ सप्टेंबर रोजी नवा शासन निर्णय जाहीर केला. विद्यापीठे आणि कॉलेजेस येथे शंभर टक्के उपस्थिती राखली जावी असे आदेशांमध्ये म्हटले आहे. १ ते ३१ ऑक्टोबर या काळात अंतिम वर्षांच्या परीक्षा होणार असून नोव्हेंबरमध्ये निकाल जाहीर होणार आहेत. त्यामुळे प्राध्यापक आणि कर्मचारी यांची शंभर टक्के उपस्थिती आवश्यक असल्याचे शासनाने म्हटले आहे. शासनाचा आदेश पाहता महाविद्यालयांनी घरुन ऑनलाईन काम करणाऱ्या शिक्षकांना त्वरित रुजू होणाच्या सूचना दिल्या आहेत.
यामुळे शिक्षकांमध्ये नाराजीचा सूर आहे. अंतिम वर्षाच्या परीक्षा विद्यापीठ घेणार असून सर्व प्रक्रिया ऑनलाईन आहे. अशा स्थितीत मूल्यांकनाचेदेखील काम जास्त राहणार नाही. अशा स्थितीत सर्व वर्षांना शिकविणाºया शिक्षकांना बोलविण्याची काहीच गरज नाही, असे शिक्षकांचे म्हणणे आहे.

कोरोना झाला तर जबाबदार कोण
अनेक संलग्नित महाविद्यालयांत शिक्षकांना एकाच ठिकाणी दाटीवाटीने बसावे लागते. सध्या शिक्षकांना आळीपाळीने बोलविण्यात येत आहे. मात्र सर्वांना एकत्रित बोलविले तर फिजिकल डिस्टन्सिंग राखण्याचे मोठे आव्हान राहणार आहे. अशा स्थितीत शिक्षकांना कोरोना झाला तर त्याचा जबाबदार कोण राहील असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे.

अध्यापन तर नियमित सुरूच
कोरोना काळात अध्यापन नियमित सुरू असून विद्यार्थ्यांचे आॅनलाईन वर्ग होत आहेत. त्यामुळे अभ्यासक्रम मागे राहण्याची शक्यता नाही. विशेषत- अभियांत्रिकी महाविद्यालयांत तर आॅनलाईन सरावावर जास्त भर दिला जात आहे. अशा स्थितीत अंतिम वर्षाच्या निकालासाठी सर्व शिक्षकांना कामावर बोलविणे हा अन्यायच असल्याची शिक्षकांमध्ये भावना आहे.

वेतनाचे काय करणार
सद्यस्थितीत बहुतांश खासगी महाविद्यालयांत शिक्षकांच्या वेतनात कपात करण्यात आली आहे. जर शिक्षकांना १०० टक्के प्रमाणात दररोज बोलविले, तर त्यांना पूर्ण वेतन देणार का असा सवालदेखील शिक्षकांनी उपस्थित केला आहे.

शिक्षक संघटनांकडून मौन
कोरोना काळात शिक्षकांना १०० टक्के बोलविण्याच्या निर्णयावरुन शिक्षकांमध्ये रोष आहे. मात्र शिक्षक संघटनांनी मात्र यासंदर्भात मौन बाळगले आहे. या संघटनांच्या भूमिकेवर शिक्षकांकडून आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

आदिवासी विद्यार्थ्यांना मिळणार सुवर्ण महोत्सवी शिष्यवृत्ती

आदिवासी

नागपूर : पहिली ते दहावीपर्यंत शिक्षण घेणाऱ्या आदिवासी विद्यार्थ्यांना सुवर्ण महोत्सवी आदिवासी पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती योजना लागू आहे. आदिवासी विकास विभागाकडून दिल्या जाणाऱ्या या शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांचे अर्ज अपेक्षित नमुनयात सादर करण्याचे निर्देश शिक्षण अधिकाऱ्यांनी निर्गमित केले आहेत.

या शिष्यवृत्ती योजनेंतर्गत वर्ग १ ते ४ च्या विद्यार्थ्यांना १०००, ५ ते ७ च्या विद्यार्थ्यांना १५०० व ८ ते १० च्या विद्यार्थ्यांना २००० रुपयांची शिष्यवृत्ती देण्यात येते. योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांची शाळेतील उपस्थिती ८० टक्के आवश्यक आहे. नामांकित शाळा, सैनिकी शाळा, आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना ही शिष्यवृत्ती लागू नाही. योजनेचा लाभ घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे अर्ज विहित नमुन्यात मुख्याध्यापकांनी भरून, त्याची छाननी करून, प्रपत्र अ मध्ये मुख्याध्यापकांनी माहिती भरून पंचायत समिती, शहर साधन केंद्र येथील अधिकाऱ्याकडे सादर करायचा आहे. शिष्यवृत्तीचा पहिला हप्ता १५ ते ३० नोव्हेंबरच्या कालावधीत मिळणार आदे. तर दुसरा हप्ता १५ मार्च ते ३१ मार्च या कालावधीत मिळणार आहे.

नागपुरात पहिल्याच दिवशी मिळाला एसटी ला ‘रिस्पॉन्स’

एसटी

नागपूर : कोरोनामुळे एसटीची चाके ठप्प झाली होती. त्यानंतर एसटीने प्रवासी वाहतूक सुरू केली. सुरुवातीला केवळ २२ प्रवाशांची वाहतूक करण्याचे आदेश महाराष्ट्र शासनाने दिले होते. त्यानंतर शुक्रवारपासून पूर्ण क्षमतेने प्रवासी वाहतूक करण्याचे आदेश मध्यवर्ती कार्र्यालयाने दिले. त्यानुसार पहिल्याच दिवशी एसटीमध्ये प्रवाशांची गर्दी झाली. एका बसमध्ये ४४ च्या वर प्रवासी बसले. त्यामुळे एसटीचे उत्पन्न वाढून कर्मचाऱ्यांच्या वेतनाचा प्रश्न मार्गी लागण्याची अपेक्षा वर्तविण्यात येत आहे.

कोरोनामुळे मार्च महिन्यापासून एसटी बसेस ठप्प झाल्या होत्या. उत्पन्नाचे स्त्रोत म्हणून एसटीने बसेसचे ट्रकमध्ये रूपांतर करून माल वाहतुकीस सुरुवात केली. त्यानंतर खासगी वाहनांचे टायर रिमोल्ड करून देण्यास सुरुवात केली. महाराष्ट्र शासनाने आदेश दिल्यानंतर एसटीने प्रवासी वाहतुकीस सुरुवात केली. त्यानुसार केवळ २२ प्रवाशांची वाहतूक सुरू होती. काही दिवस एसटीला नुकसान सोसावे लागले. त्यानंतर शुक्रवारपासून पूर्ण क्षमतेने बसेस चालविण्याचे आदेश एसटीच्या नागपूर विभाग नियंत्रक कार्यालयाला प्राप्त झाले आहेत. त्यानुसार सकाळपासून पूर्ण क्षमतेने बसेस चालविण्यात येत आहेत. पहिल्याच दिवशी एसटीला चांगला प्रतिसाद मिळाला. बहुतांश मार्गावरील बसेसमध्ये ४४ प्रवासी बसले. ४४ प्रवाशांशिवाय ११ प्रवाशांना बसमध्ये उभे राहण्याचे परवानगी असते. परंतु एसटीमध्ये प्रवाशांची संख्या वाढल्यामुळे कर्मचाऱ्यांमध्ये आनंद व्यक्त करण्यात येत आहे. परंतु अजून नागपुरातील चालक-वाहकांना सॅनिटायझर, मास्क पुरविण्यात आले नसल्यामुळे असंतोष व्यक्त करण्यात येत आहे.

पहिल्याच दिवशी प्रतिसाद
‘पुर्ण क्षमतेने बसेस चालविण्याचे आदेश मिळाल्यानंतर आम्ही बसेस प्रवाशांसाठी उपलब्ध करून दिल्या. पहिल्याच दिवशी प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळाला. त्यानुसार एसटीला चांगले उत्पन्न होईल.’
अनिल आमनेरकर, आगार व्यवस्थापक, गणेशपेठ आगार

वाहकांना सुरक्षा पुरवावी
एसटी बसेस पुर्ण क्षमतेने सुरु करण्याचा निर्णय आहे. परंतु त्यामुळे बसमध्ये प्रवाशांची गर्दी होत आहे. वाहकांना कोरोनाचा संसर्ग होऊ नये यासाठी मास्क, सॅनिटायझर पुरविण्याची गरज आहे.’
अजय हट्टेवार, प्रादेशिक सचिव, एसटी कामगार संघटना

वाहकांना सॅनिटायझर, मास्क द्यावेत
‘ पुर्ण क्षमतेने बसेस सुरु करण्याचा निर्णय चांगला आहे. बसेसमध्ये प्रवाशांची संख्या वाढणार आहे. त्यामुळे सुरक्षेसाठी वाहकांना सॅनिटायझर, मास्क पुरविण्यात यावे.’
शालीनी जामनीक, वाहक, नागपूर

कुटुंबासाठी ‘जनता कर्फ्यू’ स्वयंस्फूर्तीने पाळा !

जनता कर्फ्यू

नागपूर : नागपुरात कोरोनाचा प्रकोप वाढत आहे. कोरोनाचे संक्रमण होऊ नये यासाठी किमान दोन दिवस आपल्या कुटुंबासाठी, कुटुंबातील प्रत्येक सदस्यासाठी ‘जनता कर्फ्यू’चे पालन स्वयंस्फूर्तीने करा, असे आवाहन महापौरसंदीप जोशी यांनी केले आहे.

यासंदर्भात बोलताना ते म्हणाले, जनता कर्फ्यू म्हणजे जनतेने स्वयंस्फूर्तीने ठेवलेला बंद. या शहराचे आरोग्य ही आपली प्रत्येकाची जबाबदारी आहे. कोरोनाचे संक्रमण दिवसेंदिवस वाढत आहे. दोन दिवस का होईना, आपल्या वागण्याने जर या संक्रमणावर ब्रेक लागत असेल तर आपण ते या शहरासाठी करायलाच हवे. शहरातील सर्व जनप्रतिनिधींच्या आग्रहाखातर नागपूर महानगरपालिकेने ‘जनता कर्फ्यू’चे आवाहन केले. जनता कर्फ्यू म्हणजे स्वयंशिस्त पाळणे होय. त्यामुळे हे बंद राहील का, ते बंद राहील का, पोलिसांचे दंडे पडतील का, मनपाकडून दंड ठोठावला जाईल का, हे प्रश्न उपस्थित करण्यापेक्षा आपण स्वत:हून दोन दिवस घराबाहेर पडणार नाही, असा प्रण करणे आवश्यक आहे. आपल्याला आपल्या कुटुंबाची चिंता असेल, काळजी असेल तर जनता कर्फ्यू पाळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

‘जनता कर्फ्यू’दरम्यान केवळ वैद्यकीय सुविधा आणि औषधींचे दुकाने वगळता काहीही सुरू राहणार नाही, याची काळजी व्यापाऱ्यांनी घ्यायची आहे. अनेक व्यापारी संघटनांनी आपण जनता कर्फ्यू पाळणार असल्याचे पत्र आपल्याला दिले असल्याचेही महापौरसंदीप जोशी यांनी सांगितले. जनता कर्फ्यूदरम्यान ज्या विद्यार्थ्यांच्या परीक्षा आहेत, त्यांना कुठलीही अडचण येणार नाही. त्यांनी आपले प्रवेशपत्र सोबत बाळगावे. कोरोनाशी लढा अधिक तीव्र करण्याच्या दृष्टीने आणि कोरोनाची साखळी खंडित करण्याच्या दृष्टीने जनता कर्फ्यू यशस्वी करणे आवश्यक आहे. यासाठी जनप्रतिनिधींनीही जनतेला उद्युक्त करावे, असे आवाहन महापौर संदीप जोशी यांनी केले आहे.

नागपुरात दोन दिवसाचा जनता कर्फ्यू : महापौरांचे आवाहन

जनता कर्फ्यू

नागपूर : झपाट्याने वाढणारी कोरोनाबाधितांची संख्या ही चिंतेची बाब आहे. वारंवार आवाहन करूनही काही बेजबाबदार नागरिकांमुळे धोका निर्माण झाला आहे. नागरिक आणि लोकप्रतिनिधींकडून लॉकडाऊनची मागणी होत असली तरी हा कोरोनावरील उपाय नाही. प्रशासनामार्फत त्याला परवानगीही नाही. मात्र नागरिकांमध्ये जनजागृती यावी, त्यांनी जबाबदारीने वागावे यासाठी ३० सप्टेंबरपर्यंत आता प्रत्येक शनिवारी आणि रविवारी शहरात जनता कर्फ्यू पाळण्याचे महापौर संदीप जोशी यांनी आवाहन केले आहे.

मनपा मुख्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज प्रशासकीय इमारतीतील सभा कक्षात बुधवारी झालेल्या लोकप्रतिनिधींच्या बैठकीत महापौरांनी ही घोषणा केली. यावेळी आ. नागो गाणार, गिरीश व्यास, कृष्णा खोपडे, विकास कुंभारे, मोहन मते, स्थायी समिती अध्यक्ष पिंटू झलके, सत्तापक्षनेते संदीप जाधव, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, मनपा आयुक्त राधाकृष्णन बी., ज्येष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी, अतिरिक्त आयुक्त राम जोशी, अतिरिक्त आयुक्त जलज शर्मा, अतिरिक्त आयुक्त संजय निपाने आदी उपस्थित होते.

शहरात जनता कर्फ्यू लागू करावा अशी बहुतांश उपस्थित लोकप्रतिनिधींनी मागणी केली. त्यानुसार महापौरांनी घोषणा केली. प्रारंभी शहरातील रुग्णालयांची संख्या, बेड्सची संख्या, कोविड केअर सेंटरची स्थिती, रुग्णवाहिका, शववाहिकांची संख्या आदींचा आढावा घेतला.

नागरिकांनी काटेकोर पालन करावे
बैठकीत शहरात लॉकडाऊन लावण्यासंदर्भात भूमिका मांडण्यात आली. मात्र लॉकडाऊनचा निर्णय राज्यशासनाचा असल्याने आयुक्तांनी याला नकार दिला. शहरातील कोरोनाबाधितांची संख्या वाढत असली तरी मनपाद्वारे त्यादृष्टीने सुविधा निर्माण करण्याचे कार्य युद्धपातळीवर सुरू आहे. वैद्यकीय सुविधांमध्येही भर पडली आहे, मात्र कोविड संक्रमणाची जनतेच्या मनामध्ये भीती निर्माण झाली आहे. त्यासाठी दोन दिवस जनता कर्फ्यू लागू करणे आवश्यक आहे, अशी भूमिका लोकप्रतिनिधींनी मांडली. त्यानुसार महापौरांनी उद्या शुक्रवारी रात्री ९.३० वाजतापासून ते सोमवारी सकाळी ७.३० पर्यंत नागरिकांनी काटेकोरपणे जनता कर्फ्यूचे पालन करावे, असे आवाहन केले. यानंतर पुढील शनिवारी आणि रविवारी म्हणजे २६ आणि २८ सप्टेंबरला सुद्धा जनता कर्फ्यू राहील. त्यानंतर पुन्हा सर्व लोकप्रतिनिधींची बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल, असेही महापौर यावेळी म्हणाले.

दुकाने बंद ठेवण्याचे आवाहन
जनता कर्फ्यूच्या काळात औषध दुकानाव्यतिरिक्त कोणतीही दुकाने, आस्थापने सुरू ठेवू नये, नागरिकांनी शक्यतो घराबाहेर पडू नये. तसेच शहरातील व्यापाऱ्यानीसुध्दा स्वयंस्फूर्तीने त्यांची दुकाने व आस्थापना दोन दिवस बंद ठेवून या मोहिमेस सहकार्य करावे, असे आवाहन महापौरांनी केले आहे.

लॉकडाऊनची नव्हे तर जबाबदारीची गरज
आज शहराची स्थिती पाहता लॉकडाऊनची नव्हे तर सामाजिक जबाबदारीची जास्त गरज आहे. प्रत्येक नागरिकाने आपली जबाबदारी ओळखून नियमांचे पालन करणे आवश्यक आहे. आज शहरात आवश्यक त्या सर्व वैद्यकीय सुविधा सज्ज असून त्या वाढीसाठी दररोजच मनपाचे प्रयत्न सुरू आहेत. त्यामुळे शहरात लॉकडाऊनची गरज नसल्याचे मत आयुक्त राधाकृष्णन बी. यांनी व्यक्त केले.

कोरोनाचा प्रकोप असतानाही रेल्वेगाड्या फुल्ल

रेल्वे

नागपूर : कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत आहेत. कोरोनाचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी मार्च महिन्यापासून रेल्वेत लॉकडाऊन करण्यात आले. त्यानंतर रेल्वे बोर्डाने विशेष रेल्वेगाड्या सुरू केल्या आहेत. अत्यावश्यक असल्यास नागरिक प्रवास करीत आहेत. अशा स्थितीत नागपुरातून चारही दिशांना जाणाऱ्या रेल्वेगाड्यात वेटिंगची स्थिती असून आणखी महिनाभर हीच स्थिती राहणार असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

कोरोनामुळे रेल्वेत लॉकडाऊन करण्यात आले होते. टप्प्याटप्प्याने रेल्वे बोर्डाने वाहतूक सुरू केली. सुरुवातीला विशेष रेल्वेगाड्या सुरु करण्यात आल्या. यातील काही गाड्या नागपूरमार्गे धावत होत्या. यात आणखी १२ रेल्वेगाड्यांची भर पडली. कोरोनामुळे नागरिक अत्यावश्यक असल्यास प्रवास करीत आहेत. तरीसुद्धा सर्वच रेल्वेगाड्यात वेटिंगची स्थिती आहे. रेल्वेगाडी क्रमांक ०२८१० हावडा-छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईच्या एसी फर्स्टमध्ये १७ सप्टेबरला वेटिंग १७, सेकंड एसीत वेटिंग २९, थर्ड एसीत वेटिंग ५० आणि स्लिपरमध्ये १९९ वेटिंग आहे. रेल्वेगाडी क्र मांक ०२८०९ छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई-हावडात १९ सप्टेंबरला फर्र्स्ट एसीत वेटिंग ४, सेकंड एसीत वेटिंग २१, थर्ड एसीत वेटिंग २२, स्लिपरमध्ये वेटिंग ७९ आहे. रेल्वेगाडी क्र मांक ०२८३४ हावडा-अहमदाबादमध्ये १९ सप्टेंबर रोजी सेकंड एसीत वेटिंग ९, थर्ड एसीत वेटिंग २८, स्लिपरमध्ये वेटिंग १०२ सुरू आहे. रेल्वेगाडी क्र मांक ०२८३३ अहमदाबाद-हावडामध्ये २१ सप्टेंबरला सेकंड एसीत वेटिंग १३, थर्ड एसीत वेटिंग २२, स्लिपरमध्ये वेटिंग ५७ आहे. रेल्वेगाडी क्र मांक ०२७२३ हैदराबाद-नवी दिल्लीमध्ये फर्स्ट एसीत वेटिंग २, सेकंड एसीत वेटिंग २, थर्ड एसीत वेटिंग २ आणि स्लिपरमध्ये वेटिंग ८ सुरु आहे. रेल्वेगाडी क्र मांक ०२२९५ बंगळुर-पटनामध्ये सेकंड एसीत वेटिंग ३, थर्ड एसीत वेटिंग ११, स्लिपरमध्ये वेटिंग २४ आहे. तर रेल्वेगाडी क्रमांक ०२७९१ सिकंदराबाद-दानापूरमध्ये सेकंड एसीत वेटिंग ६, थर्ड एसीत वेटिंग ५, स्लिपरमध्ये वेटिंग २४ सुरु आहे. नागपूर मार्गे चारही दिशांना धावणाऱ्या रेल्वेगाड्यात पुढील महिनाभर हीच स्थिती राहणार असल्याची माहिती रेल्वेच्या अधिकाऱ्यांनी दिली.

कन्फर्र्म तिकीटधारकांनाच प्रवेश
रेल्वेगाड्यात वेटिंगची स्थिती असली तरी कन्फर्म तिकीट असलेल्या प्रवाशांनाच प्रवासाची परवानगी देण्यात येत आहे. त्यामुळे प्रवासाच्या वेळेपर्यंत तिकीट कन्फर्म न झाल्यास प्रवाशांना प्रवासाचा बेत रद्द करावा लागत आहे.

रेल्वेगाड्यांना चांगला प्रतिसाद
रेल्वे बोर्डाने विशेष रेल्वेगाड्यांची घोषणा केली आहे. त्यानुसार नागपूरमार्गे जवळपास ३२ रेल्वेगाड्या धावत आहेत. या रेल्वेगाड्यांना चांगला प्रतिसाद मिळत आहे. सर्वच रेल्वेगाड्यात वेटिंगची स्थिती आहे.
-एस. जी. राव, जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे, नागपूर विभाग

पावणेतीन वर्षानंतर सापडला नागपुरातील कुख्यात इच्छू

पोलिस

नागपूर : मकोकात वॉन्टेड असलेला मोमिनपुऱ्यातील इप्पा टोळीतील इर्शाद ऊर्फ इच्छू खान पावणेतीन वर्षांनंतर पोलिसांच्या हाती लागला आहे. तहसील पोलिसांनी त्याला अटक केली आहे. इच्छूला अटक केल्यानंतर पोलिसांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

इच्छू मकोकांतर्गत तुरुंगात असलेल्या इप्पा आणि नौशादचा भाऊ आहे. इप्पा टोळीची एकेकाळी मोमिनपुरा परिसरात दहशत होती. २५ डिसेंबरला इप्पा टोळीने प्रतिस्पर्धी इम्मू काल्याला ‘तू हमारी तरफ आंख उठाकर देखता है, हमारी बात सुनता नहीं’ असे सांगून तलवारीने हल्ला केला. या घटनेनंतर पोलीस इप्पा टोळीचा शोध घेत होते. गुन्हे शाखेला इप्पा साथीदारांसह मोतिबागमध्ये असल्याची माहिती मिळाली. तेथे पोहोचल्यानंतर इप्पा टोळीने सहायक पोलीस निरीक्षकावर जीवघेणा हल्ला केला होता. त्यानंतर इप्पा टोळीवर मकोकाची कारवाई करण्यात आली होती. इप्पा-नौशाद आणि त्यांचे साथीदार तुरुंगात आहेत. त्यानंतर इच्छू पोलिसांना चकमा देत फिरत होता. मंगळवारी पहाटे पोलिसांना इच्छू डोबीनगर झोपडपट्टीत आल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी योजना आखली. ते इच्छूच्या घरासमोरील झोपडीत शिरले. तेथे इच्छू पोलिसांच्या हाती लागला. इच्छूला अटक केल्यामुळे तहसील पोलिसांना मोठे यश मिळाले आहे. इच्छूची चौकशी केल्यास शहरातील अनेक गुन्हेगारांची माहिती मिळू शकते. त्याला न्यायालयासमोर हजर करून १२ दिवसांची पोलीस कोठडी मिळविण्यात आली आहे. ही कारवाई पोलीस उपायुक्त राहुल माकणीकर, गजानन राजमाने यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक जयेश भांडारकर, दिलीप सागर, उपनिरीक्षक स्वप्निल वाघ, प्रशांत राठोड, सहायक उपनिरीक्षक संजय दुबे, हवालदार प्रमोद शनिवारे, सुनील ठाकूर, संजय मिश्रा, शंभू सिंह, शिपाई मनीष रामटेके, सुरज ठाकूर, कृष्णा चव्हाण, पुरुषोत्तम जगनाडे, रंजित बावणे, किशोर गरवारे, नजीर शेख, गगन यादव, नितीन राठोड, विकास यादव, ज्योती शर्मा यांनी पार पाडली.

आता सरकारनेच खासगी हॉस्पिटल चालवावेत! : रजिस्ट्रेशन प्रती केल्या जमा

खासगी हॉस्पिटल

नागपूर : खासगी कोविड हॉस्पिटल्ससाठी राज्य सरकारने अत्यंत तुटपुंजे दर लादले आहेत. या दरात इस्पितळांमध्ये सेवा देणे परवडणारे नाही. दरांमध्ये सुधारणा व काही बाबतीत सवलती द्याव्यात म्हणून ‘आयएमए’ने शासनाशी पत्रव्यवहार केला. मात्र, योग्य प्रतिसाद न देता १ सप्टेंबरला नवे एकतर्फी दर राज्य शासनाने जाहीर केलेत. याचा निषेध करीत सरकारनेच आता आमचे हॉस्पिटल चालवावे, असे आवाहन ‘आयएमएने’ करत मंगळवारी सदस्यांनी आपल्या हॉस्पिटल रजिस्ट्रेशनच्या प्रती इंडियन मेडिकल असोसिएशनच्या (आयएमए) कार्यालयात जमा केल्या.

राज्य ‘आयएमए’ने आयुर्वेद, होमिओपॅथी, युनानी आणि दंतवैद्यकीय अशा सर्वच पॅथींच्या २४ विविध वैद्यकीय संस्थांची १२ सप्टेंबर रोजी बैठक बोलावली होती. सर्व संघटनांनी आयएमएच्या आंदोलनास पाठिंबा दिला आहे. एकत्र काम करण्यासाठी संयुक्त कृ ती समिती स्थापन करण्याचा निर्णयही घेतला आहे. येत्या सात दिवसात जर सरकारने डॉक्टरांच्या मागण्या मान्य केल्या नाहीत तर महाराष्ट्रातील सर्व डॉक्टर बेमुदत काम बंद करतील, असा इशाराही दिला आहे. ‘आयएमए’चे पॅट्रन डॉ. अशोक अढाव, नागपूर शाखेच्या अध्यक्ष डॉ. अर्चना कोठारी, सचिव डॉ. राजेश सावरबांधे यांनी ‘लोकमत’ला सांगितले, राज्यातील २५ हजार छोटी रुग्णालये या अन्यायकारक दरांच्या ओझ्याखाली दबून गेली आहेत. ती बंद पडण्याच्या मार्गावर आहेत. याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र पाठवून हे दर वाढवण्यासाठी तीन दिवसात एक बैठक घ्यावी, अशी विनंती केली होती. परंतु त्या बाबतीत कुठलेही उत्तर मिळाले नाही. यामुळे आयएमएने आंदोलन उभे केले आहे. मंगळवारी सर्व हॉस्पिटल्सची नोंदणीपत्रके जमा केली. यामुळे आता राज्य शासनानेच आमचे हॉस्पिटल ताब्यात घ्यावे आणि त्याच दरात ते चालवून दाखवावे, असेही आवाहन केले.

या आहेत मागण्या
-हॉस्पिटल्सना न परवडणारे दर व कायद्याच्या धमक्या देऊ नका.
-आयएमएसोबत चर्चा करून हॉस्पिटल्सना परवडणारे नवे दर जाहीर करा.
-कोविड हॉस्पिटल्सप्रमाणे नॉन-कोविड हॉस्पिटल्सला ऑडिटर पाठवून दडपशाही करू नका.
-डॉक्टरांना प्रमाणित दर्जाचे पीपीई किट्स, मास्क माफक दरामध्ये उपलब्ध करा. या वस्तू शुल्क नियंत्रणाखाली आणा.
– डॉक्टरांना समाजकंटकांच्या हल्ल्यापासून संरक्षण द्या. वैद्यकीय कर्मचाऱ्यांवर होणाऱ्या हल्ल्यामध्ये योग्य कायद्याची कलमे लावण्यासाठी पोलिसांना आदेश द्या.
-सतत कायद्याच्या धमक्या देऊन डॉक्टरांना गुन्हेगारांसारखी वागणूक देऊ नका.
-डॉक्टरांची अवास्तव मानहानी बंद करा.
-महात्मा फुले जनारोग्य योजनेतील सहा महिन्यांची थकबाकी द्या.
-राज्यपालांनी आदेश दिलेल्या आयएमएसोबतच्या राज्य आणि जिल्हा समन्वय समितीच्या बैठका बोलवा.
-खासगी डॉक्टरांच्या ५० लाखांच्या विम्याचे आश्वासन लाल फितीतून सोडवा.
-कोविडशी लढताना शहीद झालेल्या डॉक्टरांना महाराष्ट्र राज्यातर्फे मरणोत्तर सन्मानित करा.

वाहनांवरील जीएसटी २८ वरून १८ टक्के करा

जीएसटी

नागपूर : कोरोनामुळे वाहन विक्रीवर आणि या क्षेत्रात होणाऱ्या रोजगारनिर्मितीवर परिणाम झाला आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्यांनी मिळून प्रवासी वाहन आणि दुचाकीवरील जीएसटी कमी करण्याची गरज आहे. सरकारनेजीएसटीचा दर २८ टक्क्यांवरून १८ टक्के केला तर वाहन उत्पादकांसोबतच सरकारलाही फायदा होणार असल्याची प्रतिक्रिया विविध कंपन्यांच्या डीलर्सनी लोकमतशी बोलताना व्यक्त केली.

केंद्रीय मंत्री प्रकाश जावडेकर यांनी ऑटो संघटनेच्या एका कार्यक्रमात बोलताना वाहनांवरील जीएसटी दर कमी होण्याचे संकेत दिले होते. ऑटोमोबाईल इंडस्ट्रीची मागणी पाहता जीएसटी दरामध्ये कमी करण्याबाबत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्याशी चर्चा करणार असल्याचे सूतोवाच त्यांनी केले होते. वाहनांवरील जीएसटी कमी झाल्यास सणांमध्ये फोर-व्हीलर आणि टू-व्हीलरच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे. सध्या वर्षाला २२ दशलक्ष दुचाकी विकल्या जातात. मात्र जर दुचाकी आणि चारचाकीच्या दरात वाढ झाली तर विक्रीवर परिणाम होऊ शकतो.

फेडरेशन ऑफ ऑटोमोबाईल्स डीलर्स असोसिएशनचे अध्यक्ष आशिष काळे म्हणाले, सध्या प्रवासी वाहन आणि दुचाकीवर तब्बल २८ टक्के जीएसटी लागतो. याशिवाय १५०० सीसीच्या वाहनांवर २२ टक्के अधिभार लावला जातो. त्यामुळे या क्षेत्रावर नकारात्मक परिणाम होत आहे. वाहनांवरील जीएसटी कमी करण्याची असोसिएशनची पूर्वीपासून मागणी आहे. आता केंद्रीय स्तरावर याची दखल घेतली आहे. कोरोना काळात वाहनांच्या विक्रीवर विपरीत परिणाम झाला आहे. त्यानंतरच्या महिन्यात विक्री वाढली, पण त्या प्रमाणात वाहनांची डिमांड वाढली नाही. अनेक कंपन्यांनी उत्पादन कमी केले. त्यामुळे रोजगारावर परिणाम झाला आहे. जीएसटी कमी केल्यास वाहनांची विक्री वाढून शासनाला महसूलही जास्त प्रमाणात मिळेल. जीएसटीवर २२ टक्के अधिभार आकारण्यात येतो. त्यामुळे लक्झरी कारवर तब्बल ५० टक्के जीएसटी आकारणी होते. त्यामुळे कारच्या किमती वाढतात आणि लक्झरी कारच्या विक्रीवर परिणाम होतो.

टाटा मोटर्सचे डीलर डॉ. पी.के. जैन म्हणाले, चारचाकी आणि दुचाकी वाहनांवरील २८ टक्के जीएसटी १८ टक्के करण्याची मागणी आता जोर धरू लागली आहे. लक्झरी कारचा विचार केल्यास जीएसटी आणि अधिभार असा एकूण ५० टक्के कर लागतो. जीएसटी कमी केल्यास वाहनांची विक्री वाढेल आणि शासनाला महसूल जास्त मिळेल. तसेच पूर्वीच्या तुलनेत आता डीलर्सला जीएसटीचा भरणा उत्पादन स्तरावर करावा लागतो. त्यामुळे डीलर्सची गुंतवणूक वाढली आहे. जीएसटी कमी केल्यास वाहनांची विक्री वाढेल. टाटा वाहनांना देशस्तरावर मागणी वाढली आहे. जीएसटी कमी करण्यासाठी पंतप्रधानांनी पावले उचलावीत.

पाटणी मारुतीचे महाव्यवस्थापक रवी जोशी म्हणाले, सणांचा सीझन जवळ आला आहे. त्यामुळे ऑटो सेक्टरमध्ये मागणी वाढविण्यासाठी काही पावले उचलणे गरजेचे आहे. त्यापैकी एक म्हणजे सर्व प्रकारच्या वाहनांवरील जीएसटीचे दर २८ टक्क्यांवरून कमी करून ते १८ टक्के केले जावेत. मारुतीमध्ये वाढ आहे. रिकव्हर केले आहे. बुकिंगमध्ये वाढ झाली आहे.

कोरोना महामारीमुळे देशातील लहान व्यावसायिक आर्थिक संकटात आहेत

दुकाने

नागपूर : कोरोना महामारीमुळे देशातील लहान व्यावसायिक आर्थिक संकटात आहेत. भविष्यात या व्यावसायिकांना केंद्र व राज्य शासन आणि बँकांनी मदत न केल्यास देशातील २५ टक्के अर्थात जवळपास १.७५ कोटी व्यावसायिकांची दुकाने बंद होतील. त्याचा देशाच्या अर्थव्यवस्थेवर विपरीत परिणाम होणार असल्याची अशी भीती कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया ट्रेडर्सने (कॅट) एका सर्वेक्षणात व्यक्त केली आहे.

देशाची अर्थव्यवस्था मंदीत आहे. या व्यावसायिकांसाठी केंद्र आणि राज्य शासनाने कोरोना समर्थन पॅकेज जाहीर करण्याची मागणी कॅटने केली आहे. कॅटचे राष्ट्रीय अध्यक्ष बी. सी. भरतीया म्हणाले, देशातील किरकोळ व्यापारी संघटित आहेत, पण या क्षेत्राची गणना असंघटित क्षेत्र म्हणून केली आहे. या व्यवसायात देशात जवळपास ७ कोटी व्यावसायिकांचा समावेश आहे. शिवाय या माध्यमातून ४० कोटी जणांना रोजगार प्रदान केला असून ६० लाख कोटी रुपयांचा वार्षिक व्यवसाय करतात. भारतात या माध्यमातून जवळपास ८ हजारांपेक्षा अधिक मुख्य वस्तूंचा व्यवसाय केला जातो. त्यानंतरही बँकाया क्षेत्राला औपचारिकरीत्या आर्थिक मदत करण्यास अपयशी ठरल्या आहेत. केवळ ७ टक्के लहान व्यावसायिकांना बँकांनी मदत केली आहे उर्वरित ९३ टक्के व्यावसायिकांच्या आर्थिक गरजा अनौपचारिक स्त्रोतांवर अवंलबून आहेत.

कोरोनाच्या आधीही देशातील घरगुती व्यवसाय वित्तीय संकटातून जात होता. कोरोना महामारीने हे व्यावसायिक अस्तित्वासाठी संघर्ष करीत आहेत. केंद्र सरकारने घोषित केलेल्या २० लाख कोटींच्या पॅकेजमध्ये लहान व्यावसायिकांसाठी एक रुपयाचीही तरतूद नाही. शिवाय देशातील कोणत्याही राज्याने या व्यावसायिकांना वित्तीय मदत दिलेली नाही. अर्थव्यवस्थेत सर्व क्षेत्र तसेच प्रवासी श्रमिकांनाही वित्तीय पॅकेज देण्यात आले. राजकीय लोक या व्यावसायिकांना अर्थव्यवस्थेची जीवनरेषा समजतात, त्यांना काहीही मदत दिलेले नाही. त्यानंतरही या व्याावसायिकांनी कोरोना महामारीच्या काळात नेहमीच सरकारची मदत केल्याचे भरतीया यांनी स्पष्ट केले.

देशातील १.७५ कोटी दुकाने बंद झाली तर त्याची जबाबदारी केंद्र आणि राज्य शासनाची ठरणार आहे. त्यामुळे देशात बेरोजगारांची संख्या वाढले आणि अर्थव्यवस्थेवर विपरित परिणाम होईल. दुसरीकडे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आत्मनिर्भर भारताच्या स्वप्नाला क्षती पोहोचेल. केंद्र आणि राज्य शासनाने बँकांचे ईएमआय, पाणी व वीजबिल, संपत्ती कर, व्याजाचे भुगतान आदींमध्ये सूट द्यावी, असे भरतीया म्हणाले.

‘पदव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यास कंपन्यांवर कारवाई’

पदवी

नागपूर : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार राज्यभरातील विद्यापीठांमध्ये अंतिम वर्षाच्या परीक्षांची तयारी युद्धस्तरावर सुरू आहे. या विद्यार्थ्यांकडे पाहण्याचा उद्योगजगताचा दृष्टिकोन बदलेल अशी चर्चा आहे. मात्र या विद्यार्र्थ्यांना दरवर्षीप्रमाणेच पदवी प्रमाणपत्र देण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांच्या पदवीकडे शंकेच्या नजरेने पाहिले तर सरकार तातडीने हस्तक्षेप करेल. वेळ पडली तर संबंधित कंपन्यांवर कारवाई करण्यासही मागेपुढे पाहणार नाही, असे उच्च व तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत यांनी स्पष्ट केले.

सोमवारी त्यांनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ तसेच गोंडवाना विद्यापीठाच्या परीक्षांच्या तयारीचा आढावा घेतला. त्यानंतर आयोजित पत्रपरिषदेत ते बोलत होते. अंतिम वर्षाच्या परीक्षांवर बरेच आरोप झाले. परीक्षा घेणारच नाही असे आम्ही कधीच म्हटले नव्हते. केवळ आताची स्थिती लक्षात घेता सध्या पदवी देऊ व ज्यांना गुणसुधार करायचा आहे, त्यांची नंतर परीक्षा घेऊन अशी आमची भूमिका होती. मी परीक्षा न घेण्याच्या माझ्या मतावर आजही ठाम आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करणे हे कर्तव्यच असून ३१ आॅक्टोबरपर्यंत राज्यातील विद्यापीठात अंतिम वर्षाच्या परीक्षा होतील, असे सामंत यांनी सांगितले.

लोकसंख्या ३५ लाख, खाटा केवळ २८३७; नागपुरात कोरोना नियोजन ढेपाळले

खाटा

नागपूर : रुग्णसंख्येचा वेग कमालीचा वाढला आहे. रोज १५०० ते २००० हजारावर रुग्णांची भर पडत आहे. परंतु गेल्या सात महिन्यात वैद्यकीय सेवांना घेऊन प्रशासनाकडून ठोस नियोजनच झाले नाही. परिणामी, गंभीर रुग्णांवरही भटकंतीची वेळ आली आहे. ३५ लाख लोकसंख्या असलेल्या शहरात सध्याच्या स्थितीत शासकीय कोविड हॉस्पिटलमध्ये १२५० तर खासगीमध्ये १५८७ अशा एकूण २८३७ खाटा उपलब्ध आहेत. तातडीने उपाययोजना न झाल्यास भविष्यात कोरोनाचे संकट आणखी गडद होण्याची शक्यता आहे.

नागपुरात कोरोनाचा पहिला रुग्ण ११ मार्च रोजी आढळून आला. या महिन्यात के वळ १६ रुग्णांची नोंद होती. एप्रिल महिन्यात दोन मृत्यू, १३८ रुग्ण होते. मे महिन्यात ५४१ रुग्ण, ११ मृत्य होते. जून महिन्यापासून रुग्ण वाढण्यास सुरुवात झाली. १५०५ रुग्ण व १५ रुग्णांचा जीव गेला. जुलै महिन्यात ५३९२ रुग्ण व ९८ मृत्यू होते तर ऑगस्ट महिन्यात २९५५५ रुग्ण ९१९ मृत्यूची नोंद झाली. तज्ज्ञांनुसार या कालावधीत प्रशासनाने किमान एक हजार खाटा ऑक्सिजनच्या व ५०० खाटा आयसीयूच्या के ल्या असत्या तर आज खाटांसाठी धावाधाव दिसली नसती.

६२ नव्हे ३७ खासगी हॉस्पिटलमध्ये कोविड उपचार
प्रशासनाने ६२ खासगी रुग्णांलयात कोविड रुग्णांवर उपचार उपलब्ध करण्याचा दावा केला होता. दोन हजारांवर खाटा उपलब्ध होतील, अशी घोषणाही के ली. परंतु प्रत्यक्षात ३७ खासगी हॉस्पिटलमध्येच कोरोनाबाधितांवर उपचार सुरू होऊ शकले. १०० टक्के खाटा मिळविण्यास प्रशानाला यश आले नाही. यामळे सध्याच्या स्थितीत खासगीच्या केवळ १५८७ खाटा रुग्णसेवेत आहेत.

खासगीचे शुल्क न परडवणारे
शासनाने सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांसाठी खासगीमध्ये प्रतिदिवस ४०००, मध्यम लक्षणे असलेल्यांसाठी ७५०० तर गंभीर रुग्णांसाठी ९५०० रुपयांचे दर ठरवून दिले आहेत. परंतु याच्यामध्ये महागडी औषधे, इंजेक्शन, रक्ताच्या महागड्या तपासण्या, सीटी स्कॅन, सुपर स्पेशालिटी डॉक्टरांची व्हिझिट व पीपीई किटचा खर्च रुग्णांना करावा लागतो. यामुळे सौम्य लक्षणे असलेल्या रुग्णांचा १४ दिवसांचा खर्च सुमारे एक ते दीड लाखांच्या घरात जातो. मध्यम लक्षणे असलेल्या रुग्णांचा खर्च १ लाख ९० हजार ते २ लाख ३५ हजारांपर्यंत जातो तर गंभीर रुग्णांचा खर्च हा साडेचार ते साडेपाच लाखांपर्यंत जाण्याची शक्यता असते. यातच बहुसंख्य हॉस्पिटल रुग्ण भरती करण्यापूर्वीच एक ते दोन लाख अ‍ॅडव्हान्स जमा करण्यास लावत असल्याने हा खर्च गरीब व सामान्य रुग्णांच्या आवाक्याबाहेरचा आहे.

मेयो, मेडिकलच्या १२०० खाटा मर्यादित
मेयोने आपल्या सर्जिकल कॉम्प्लेक्सचे रूपांतर ६०० खाटांच्या डेडिकेटेड हॉस्पिटलमध्ये केले आहे. यांच्याकडे आता दुसरी सोय नाही. नॉनकोविडच्या रुग्णांसाठी केवळ २५० खाटा शिल्लक आहेत. मेडिकलने आपले ट्रॉमा केअर सेंटरसह इतर वॉर्डाला कोविड हॉस्पिटलचे स्वरूप देत ६०० खाटा उपलब्ध करून दिल्या आहेत. उर्वरित १६०० खाटांवर नॉनकोविडच्या रुग्णांवर उपचार केला जात आहे. विशेष म्हणजे, दिवसेंदिवस हे रुग्ण वाढत आहे. यामुळे या दोन्ही रुग्णालयात कोविडच्या खाट वाढविणे शक्य नसल्याचे चित्र आहे.

खाट रिकामी असताना न दिल्यास कारवाई
खासगी कोविड हॉस्पिटलमध्ये उपलब्ध खाटा व रिकाम्या खाटांची माहिती म्हणजे ‘डॅशबोर्ड’ लावणे आवश्यक आहे. असे न झाल्यास संबंधित हॉस्पिटलला नोटीस बजावली जाईल. तसेच खासगी रुग्णालयात खाट रिकामी असतानाही कोरोना रुग्णांना खाट उपलब्ध न केल्यास संबंधित हॉस्पिटलवर नियमानुसार कारवाई केली जाईल.
जलज शर्मा, अतिरिक्त आयुक्त, मनपा

नर्र्सिंग होममध्येही कोविडवर उपचार सुरू व्हावेत. कोविड रुग्णांची भयावह पद्धतीने रुग्णसंख्या वाढत आहे. प्रत्येक रुग्णावर संशयित म्हणूनच उपचार के ले जात आहे. यामुळे छोटे हॉस्पिटल व नर्सिंग होमनेही कोविडच्या रुग्णांवर उपचार करण्यास सुरूवात करायला हवी. शासनाने तशी परवानगी द्यायला हवी. यामुळे गरजू रुग्णांवर तातडीने उपचार होऊ शकतील.
-डॉ. अनुप मरार, संयोजक, विदर्भ हॉस्पिटल असोसिएशन

नागपुरात सुक्या मेव्याची मागणी वाढली, भाव घटले

सुक्या मेव्याची मागणी

नागपूर : कोरोना संसर्गाच्या भीतीमुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यावर सर्वोत्तम उपाय म्हणून बाजारात सुक्या मेव्याची विक्री वाढली आहे. विक्रीच्या प्रमाणात भाव कमी झाले आहेत. कॉर्पोरेट कंपन्याकडून मागणी कमी असली तरीही सामान्यांकडून मोठ्या प्रमाणात खरेदी करण्यात येत असल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

सुक्या मेव्यामध्ये बादाम, अंजीर, किसमिस, काजूला जास्त मागणी आहे. आता गरीबांसह मध्यमवर्गीय खरेदीसाठी पुढे येत आहेत. खास कुटुंबीयातील लहानांसाठी ते खरेदी करीत आहेत. आंतरराष्ट्रीय बाजारपेठांच्या पार्श्वभूमीवर यावर्षी सप्टेंबरमध्ये भाव वाढलेले नाहीत. सर्वाधिक रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यासाठी महत्त्वपूर्ण समजले जाणारे बादामचे दर ठोकमध्ये प्रति किलो १५० ते २०० रुपये किलो कमी झाले आहेत. मुख्यत्वे अमेरिकन बादामाला जास्त मागणी असते. भारत आणि चीन मोठे खरेदीदार आहे. सध्या अमेरिका आणि चीनमध्ये असलेल्या तणावामुळे चीनने अमेरिकेकडून बादामाची खरेदी थांबविली आहे. याशिवाय अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमध्ये अस्थिरता असल्याने मालाची आवक बंद आहे. त्याचा परिणाम भावाच्या घसरणीवर झाला आहे. सध्या ठोकमध्ये दर्जानुसार ७०० ते ९०० रुपये भाव आहे.

विक्रेत्यांनी सांगितले की, लॉकडाऊनमध्ये लोकांनी सुका मेव्याकडे कानाडोळा करीत केवळ जीवनाश्यक वस्तूंची खरेदी करीत होते. याशिवाय सणांमध्ये हॉटेल, रेस्टॉरंट संचालक आणि लग्नसमारंभात मोठ्या प्रमाणात खरेदी होते. पण यंदा हॉटेल व रेस्टॉरंट पूर्ण क्षमतेने सुरू नसून लग्नसमारंभ बंद आहेत. त्याचाही परिणाम विक्रीवर झाला आहे. सध्या अनलॉक-४ मध्ये सुका मेव्याची मागणी वाढली, पण त्या प्रमाणात जवळपास १० टक्के दर कमी झाल्याचे विक्रेत्यांनी सांगितले.

सध्या ठोक बाजारात काजू दर्जानुसार ८५० ते ११०० रुपये किलो, बादाम ७०० ते ९०० रुपये, आक्रोट १००० ते १३००, किसमीस १८० ते ५०० आणि अंजीरचे भाव १२०० ते १५०० रुपये आहेत. सणांच्या दिवसात गिफ्ट देण्यासाठी कॉर्पोरेट कंपन्याकडून मागणी वाढते. अनेक विक्रेते पॅकिंग करण्यासाठी माल मागवितात. पण यंदा कोरोनामुळे अनिश्चिततेचे वातावरण आहे. यंदा दसरा आणि दिवाळीत स्थिती काय राहील, याचा अंदाज लावणे कठीण असल्याने अनेकांनी मालाचे ऑर्डर अजूनही दिलेले नाहीत. ऑक्टोबरमध्ये गिफ्ट पॅकिंग व्यवसाय जोरात सुरू होईल आणि सुक्या मेव्याला मागणी वाढेल, अशी शक्यता विक्रेत्यांनी व्यक्त केली.

हावडा-मुंबई, हावडा-अहमदाबादसाठी विशेष रेल्वेगाड्या

रेल्वे

नागपूर : रेल्वे बोर्डाने हावडा-मुंबई-हावडा आणि हावडा-अहमदाबाद-हावडा या आठवड्यातून एकदा धावणाऱ्या रेल्वेगाड्या आठवड्यातून तीन वेळा चालविण्याची घोषणा केली आहे. या गाड्या नागपूरमार्गे धावणार असल्यामुळे प्रवाशांची सुविधा झाली आहे.

रेल्वे बोर्डाने रेल्वे वाहतूक सुरू करण्याची तयारी केली आहे. रेल्वेत लॉकडाऊन संपल्यानंतर सुरुवातीला २३० रेल्वेगाड्या सुरु केल्या होत्या. त्यानंतर आता १२ सप्टेंबरपासून ८० रेल्वेगाड्या सुरु करण्यात आल्या. ८० वरून ही संंख्या ८६ करण्यात आली आहे. प्रवासी वाहतूक वाढविण्यासाठी ज्या गाड्या आठवड्यातून एक दिवस धावत होत्या त्या गाड्या आठवड्यातून तीन दिवस चालविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. हा निर्णय शनिवारपासून लागू करण्यात आला आहे. यात रेल्वेगाडी क्रमांक ०२८१०/०२८०९ हावडा-मुंबई-हावडा मेलचा समावेश आहे. सोबतच रेल्वेगाडी क्रमांक ०२८३४/०२८३३ हावडा-अहमदाबाद-हावडा या विशेष रेल्वेगाडीला आता आठवड्यातून तीन दिवस चालविण्यात येणार आहे. त्यानुसार रेल्वेगाडी क्रमांक ०२८१० आता सोमवार, बुधवार आणि शनिवारी आपल्या नियोजित वेळेनुसार हावडावरून धावणार आहे.

रेल्वेगाडी क्रमांक ०२८०९ आता बुधवार, शुक्रवार आणि सोमवारी मुंबईवरून धावणार आहे.रेल्वेगाडी क्रमांक ०२८३४ मंगळवार, शुक्रवार आणि रविवारी हावडावरून तर रेल्वेगाडी क्रमांक ०२८३३ शुक्रवार, सोमवार आणि बुधवारी अहमदाबादवरून धावणार आहे. या रेल्वेगाड्यांच्या वेळेत कुुठलाही बदल करण्यात आलेला नाही. या चारही रेल्वेगाड्या १ जूनपासून सुरु करण्यात आलेल्या २३० रेल्वेगाड्यात समाविष्ट होत्या. या गाड्या दररोज धावत होत्या. परंतु कोरोनामुळे प्रवाशांची संख्या कमी झाल्यामुळे मागील दोन महिन्यापासून या गाड्या आठवड्यातून एक दिवस चालविण्यात येत होत्या.

नागपुरात कोरोनाबाधितांचा उच्चांक, २३४३ पॉझिटिव्ह; ४५ मृत्यू

रुग्ण

नागपूर : रुग्णसंख्येचा वेग दिवसागणिक वाढतच चालला आहे. रविवारी २३४३ नव्या रुग्णांची भर पडली. रोजच्या रुग्णसंख्येतील ही विक्रमी वाढ आहे. यात शहरातील २०४२, ग्रामीणमधील २९६ तर जिल्हा बाहेरील पाच रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णांची एकूण संख्या ५२,४७१ झाली आहे. आज ४५ रुग्णांचे मृत्यू झाले असून मृतांची संख्या १६५८ वर पोहोचली आहे. नागपूर जिल्ह्यात वाढत्या रुग्णसंख्येने चिंतेचे वातावरण आहे. मागील आठवड्यातील ८ तारखेला २२०५ तर ११ तारखेला २०६० पॉझिटिव्ह रुग्णांची नोंद झाली होती. परंतु या आठवड्याच्या सुरुवातीलाच यापेक्षा अधिक रुग्ण आढळून आल्याने आरोग्य यंत्रणेसमोर मोठे आव्हान उभे ठाकले आहे. आज ७९७३ रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या. यात ३४११ रुग्णांची आरटीपीसीआर चाचणी तर ४५६२ रुग्णांची रॅपिड अ‍ॅन्टिजन चाचणी करण्यात आली. अ‍ॅन्टिजन चाचणीत ८३७ रुग्ण पॉझिटिव्ह आले, तर आरटीपीसीआर चाचणीत १५०६ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत.

खासगी लॅबमध्ये ६३८ रुग्ण पॉझिटिव्ह
महानगरपालिके ने ५०वर विविध ठिकाणी कोरोनाच्या नि:शुल्क चाचणीची सोय के ली असतानाही अनेक संशयित रुग्ण खासगी लॅबमध्ये जात आहे. आज या लॅबमधून ६३८ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. या शिवाय, एम्स प्रयोगशाळेमधून १०५, मेडिकलमधून २९९, मेयोमधून ३५०, माफसूमधून ७६, नीरीमधून ७८ रुग्ण पॉझिटिव्ह आले आहेत. आज १७६९ रुग्ण बरे झाले असून बरे झालेल्या रुग्णांची संख्या ३९,१४९ वर पोहचली आहे. सध्याच्या स्थितीत ११६६४ रुग्ण उपचार घेत आहेत.

मेडिकलमध्ये आतापर्यंत ८०४ तर मेयोमध्ये ६५६ मृत्यू
कोरोना प्रादुर्भावाच्या या सात महिन्यात मेडिकलमध्ये ८०४, सर्वाधिक मृत्यू झाले. शिवाय, मेयोमध्ये ६५६ तर एम्समध्ये एका रुग्णाचा मृत्यू झाला. खासगी हॉस्पिटलमध्ये सुद्धा मृत्यूची संख्या मोठी आहे.

किसान रेल होणार सुरू; थेट बांगलादेशपर्यंत जाणार विदर्भातील संत्री

रेल्वे

नागपूर : विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांना लवकरच त्यांचा माल थेट बांगलादेशमध्ये कमी वेळात पाठविता येणार आहे. विदर्भातून थेट बांगलादेशमध्ये माल नेता यावा यासाठी विशेष ‘किसान रेल’ सुरू करण्यात येणार आहे. यासंदर्भातील प्रस्तावाला रेल्वे विभागाने मंजुरी दिली असून त्याचा रोडमॅप तयार करण्यात येईल. यासंदर्भात रेल्वे अधिकाऱ्यांची केंद्रीय भूपृष्ठ वाहतूक तसेच सूक्ष्म-लघु-मध्यम उद्योगमंत्री नितीन गडकरी यांच्यासमवेत बैठक झाली.

विदर्भातील संत्रा उत्पादक शेतकऱ्यांसाठी बांगलादेश ही मोठी बाजारपेठ मानण्यात येते. दरवर्षी सुमारे अडीच लाख टन संत्री बांगलादेशमध्ये निर्यात करण्यात येतात. विदर्भातून बांगलादेशपर्यंत मालवाहतूक करण्यासाठी साधारणत: ७२ तास लागतात. तर रेल्वेमार्गाने हेच अंतर ३६ तासात पार करता येणे शक्य आहे. जर माल लवकर पोहोचला तर त्याची गुणवत्ता कायम राहील व वाहतुकीचा खर्चदेखील कमी होईल, अशी शेतकऱ्यांची भूमिका होती. नितीन गडकरी यांनी यासंदर्भात रेल्वे विभागाला प्रस्ताव सादर केला होता.
१२ सप्टेंबर रोजी गडकरी यांनी रेल्वे अधिकाऱ्यांची बैठक घेतली. यात मध्य रेल्वेचे डीआरएम सोमेश कुमार, डीसीएम कृष्णा पाटील प्रामुख्याने उपस्थित होते. संबंधित प्रस्तावाला रेल्वेने हिरवी झेंडी दाखविली असल्याची माहिती सोमेश कुमार यांनी या बैठकीत दिली.

२० बोग्यांची राहणार रेल्वे
ही विशेष रेल्वेगाडी २० बोग्यांची असेल व ४६० टन माल वाहून नेण्याची क्षमता असेल. वरुड, काटोल, नरखेड स्थानकांवरुन शेतकरी आपला माल या गाडीतून पाठवू शकतील. यासाठी विशेष संकेतस्थळ तयार करुन शेतकऱ्यांकडून आधीच बुकिंग घेण्याची सूचना गडकरी यांनी केली.

चिंताजनक! विदर्भात रुग्णसंख्या लाखाच्या दिशेने तर मृत्यू दहा हजाराकडे

चीनमध्ये डेल्टा प्लस व्हेरियंटचा फैलाव प्रचंड वेगाने

नागपूर : विदर्भात वाढत्या कोरोनाबाधितांची व मृत्यूची संख्या चिंतेत भर टाकणारी आहे. रविवारी, ४२७० रुग्ण पॉझिटिव्ह आले. आतापर्यंतच्या रोजच्या रुग्णसंख्येतील ही सर्वात मोठी भर आहे. या रुग्णांमुळे एकूण रुग्णांची संख्या ९४, ७९३ झाली आहे. विशेष म्हणजे, दहाही जिल्ह्यात मृत्यूची नोंद झाली. ८२ रुग्णांच्या मृत्यूने मृतांची संख्या ६११५ पोहोचली आहे. नागपूर जिल्ह्यातही विक्रमी रुग्णांची नोंद झाली. २३४३ रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णांची एकूण संख्या ५२,४७१ वर गेली आहे. ४५ रुग्णांचे मृत्यू झाले असून मृतांची संख्या १६५८ झाली आहे.

अमरावती जिल्ह्यातही रुग्णसंख्येने उच्चांक गाठला ४६२ रुग्ण पॉझिटिव्ह आले. रुग्णांची संख्या ८७७४ झाली असून दोन रुग्णाच्या मृत्यूने मृतांची संख्या १९८ वर गेली आहे. भंडारा जिल्ह्यात नऊ रुग्णांच्या मृत्यूने खळबळ उडाली. मृतांची संख्या ६० झाली आहे. १८० रुग्णांची भर पडल्याने रुग्णांची संख्या २८७८ वर गेली आहे. चंद्रपूर जिल्ह्यात २९० रुग्ण पॉझिटिव्ह आले असून पाच रुग्णांचा मृत्यू झाला आहे. रुग्णसंख्या ५८५८ तर मृतांची संख्या ७१ झाली आहे. यवतमाळ जिल्ह्यात २५८ रुग्ण पॉझिटिव्ह तर पाच रुग्णाच्या मृत्यूची नोंद झाली. रुग्णसंख्या ५७०९ झाली असून मृतांची संख्या १५५वर पोहचली आहे.

अकोला जिल्ह्यातही सर्वाधिक रुग्णांची नोंद झाली. २३३ रुग्णांचे निदान झाल्याने येथील रुग्णसंख्या ५६२० झाली आहे. चार रुग्णांचा मृत्यू झाला असून मृतांची संख्या १८१ वर गेली आहे. वाशिम जिल्ह्यात ११४ रुग्ण व चार रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. रुग्णसंख्या २८०४ तर मृतांची संख्या ५४ झाली आहे.

बुलडाणा जिल्ह्यात १७७ रुग्ण पॉझिटिव्ह व एका रुग्णाचा मृत्यू झाला. बाधितांची संख्या ४९५१ वर गेली आहे. वर्धा जिल्ह्यात १३३ रुग्ण कोरोनाबाधित असल्याचे निष्पन्न झाले. बाधितांची संख्या २५७० झाली आहे. जिल्ह्यात तीन रुग्णांच्या मृत्यूने मृतांची संख्या ४७ झाली आहे. गोंदिया जिल्ह्यात ८० रुग्णांचे निदान तर चार रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली. रुग्णसंख्या ३१५८ तर मृतांची संख्या ४९ झाली आहे.

Nagpur Weather

Nagpur
haze
25 ° C
25 °
25 °
50 %
2.6kmh
0 %
Thu
36 °
Fri
38 °
Sat
40 °
Sun
42 °
Mon
41 °

Stay connected

5,248FansLike
422FollowersFollow
500FollowersFollow
394FollowersFollow
2,380SubscribersSubscribe

Most Popular

Top 100 new year Wishes

Top 100 New Year Wishes 2023

0
Top 100 New Year Wishes 2023: If you are searching for some good wishes for the new year 2023 then you are on the...

Dhamma Chakra Pravartan Din : 15 Famous quotes by Dr. Babasaheb Ambedkar

0
Dhamma chakra Pravartan Din also known by the name of DhammaChakra Anupratan Din is a day to praise the Buddhist change of B. R....
Happy Diwali 2021

15+ Unique Happy Diwali wishes for 2022

0
Nowadays the only way through which connection is possible is the social networking site. The biggest festival in India is coming soon. Diwali is...
makar Sankranti

Top 100 best quotes, WhatsApp messages, wishes and greetings for Makar Sankranti 2024

0
Makar Sankranti Wishes : Makara Sankranti (Sankranthi) is a Hindu festival that encourages people to live in peace and harmony. Here are best quotes,...