विधिमंडळात २२ महिला आमदार पण स्वछतागृह मात्र एक

विधिमंडळात २२ महिला आमदार पण स्वछतागृह फक्त एक

महाराष्ट्राच्या विधिमंडळात २० ते २२ महिला आमदार असून नागरिकांचे प्रश्न मांडण्याची जबाबदारी या महिला लोकप्रतिनिधींनवर आहे . पण याच  महिला आमदारांसमोर स्वछतागृहाचा मोठा प्रश्न उपस्तिथ झाला आहे. त्याला कारण ही तसेच आहे. २२ महिला आमदार मिळून एकच स्वछतागृह विधिमंडळात असल्याची माहिती समोर आली आहे. भाजपा आमदार माधुरी मिसाळ यांनी याबाबत तक्रार  केली आहे.

स्वच्छतागृह अस्वच्छ आणि इतर दालनात न वापरलेले शेवाळ असलेले फर्निचर देखील  तिथे वापरण्यात येत असल्याचे मिसाळ यांनी म्हटले आहे. जनतेतून  निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींनाच या स्वछतागृहासाठी भांडावे लागत आहे.तर सर्व सामन्यांचे काय हाल असतील असा प्रश्न या प्रकरणावरून उपस्थीत झालेला आहे.

महिला दिनाच्या दिवशी  माधुरी मिसाळ यांनी हा मुद्दा उपस्थित केला. महाराष्ट्राचे विधिमंडळ म्हणजे राज्यसाठी जनतेसाठी योजना बनवणारे कायदे बनवणारे सभागृह आणि इथेच जर महिला आमदारांना स्वछतागृहांची योग्य सुविधा नसेल तर जनतेचे काय हाल असतील असा प्रश्न उपस्थित होतो. कोरोना काळात तर स्वच्छतागृह अस्वच्छ असेल तर अजून जास्त समस्या होऊ शकतील. महिला आमदारांच्या स्वच्छतागृहांची योग्य साफ सफाई होत नाही आणि हे भर सभागृहात सांगण्याची वेळ महिला आमदारांवर यावी हे दुर्दैवी असल्याचे मिसळ यांनी म्हटले आहे.