मुंबईत एकाच दिवशी २ आत्महत्या; २० वर्षीय तरुण आणि १६ वर्षीय तरुणीने केली आत्महत्या

मुंबईत एकाच दिवशी २ आत्महत्या,२० वर्षीय तरुण आणि १६ वर्षीय तरुणीने केली आत्महत्या

मुंबई : मुंबईत सकाळी एका २० वर्षीय तरुणाने वडील आणि आजोबांची हत्या करून आत्महत्या करण्याची घटना घडून काही तास उलटत नाही तेच प्रभादेवीमध्ये एका अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभादेवी येथील साई सुंदर नगर इथं ही घटना घडली. सुंदर नगरमधील 12 क्रमांकाच्या इमारतीत राहणाऱ्या एका 16 वर्षीय मुलीने इमारतीवरून उडी मारुन आत्महत्या केली. मृत मुलगी ही 10 व्या वर्गात शिकत होती. या अल्पवयीन मुलीने इतके टोकाचे पाऊल का उचलले, याची माहिती अद्याप समोर येऊ शकली नाही.

घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. घटनास्थळाचा पंचनामा करून मुलीचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. मुलीचा मृतदेह शवविच्छेदन करण्यासाठी केईएम रुग्णालयात पाठवला आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलीस करत आहे.

 

वडील आणि आजोबांची हत्या करून मुलाची आत्महत्या                                                                    दरम्यान, आज सकाळी मुंबईतील मुलुंड परिसरात एका 20 वर्षी तरुणाने आपल्या जन्मदात्या बापाची आणि आजोबांची हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. वडील आणि आजोबांची हत्या केल्यानंतर या तरुणानेही इमारतीवरून उडी मारून आत्महत्या केली.

मुलुंड पश्चिम एलबीएस रोडवरील वसंत कॉम्प्लेक्स या इमारतीमध्ये ही घटना घडली आहे. शार्दुल मांगले असे या 20 वर्षीय तरुणाचे नाव आहे. त्याचे आजोबा सुरेश मांगले (84) आणि वडील मिलिंद मांगले यांचे मृतदेह घरी आढळून आले आहेत.शार्दुलने आपल्या वडिलांनी हत्या केली आणि त्यानंतर आजोबांची हत्या केली. आपल्या जन्मदात्या बापाची हत्या आपल्या हातून झाल्यानंतर हादरलेल्या शार्दुलने आत्महत्या करण्याचे टोकाचे पाऊल उचलले. शार्दुलने राहत असलेल्या इमारतीच्या छतावरून उडी मारुन आपला जीव दिला.

पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन तिन्ही मृतदेह ताब्यात घेतली. घरात वडील आणि आजोबांचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात पडलेले होते. पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला असून मृतदेह शवविच्छेदनासाठी शासकीय रुग्णालयात पाठवले आहे.

शार्दुलने आपल्या वडिलांनी आणि आजोबांची हत्या का केली, हत्या केल्यानंतर आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. मुलुंड पोलीस अधिक तपास करत आहे.