सहा राज्यांत कोविड-19 रुग्णसंख्येत मोठी वाढ, महाराष्ट्रात संख्या सर्वात जास्त

सहा राज्यांत कोविड-19 रुग्णसंख्येत मोठी वाढमहाराष्ट्रात संख्या सर्वात जास्त

देशभरातील सहा राज्यांत दैनंदिन कोविड-19 रुग्णसंख्येत मोठी वाढ होत असल्याची नोंद होत आहे. महाराष्ट्र, केरळ, पंजाब, कर्नाटक, गुजरात आणि तामिळनाडू या राज्यांचा त्यात समावेश आहे. महाराष्ट्रात सर्वाधिक रूग्णांची नोंद झाली असून 10,187 नवे रूग्ण आढळून आले आहेत. त्याखालोखाल केरळमध्ये 2,791 तर पंजाबमध्ये 1,159 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. केंद्र सरकार सतत सक्रीय रुग्णांची वाढ नोंदविणाऱ्या आणि जेथे कोविड रूग्णसंख्येत सतत वाढ होत आहे अशा दैनंदिन राज्ये/केंद्रशासित प्रदेशांच्या संपर्कात आहे.

दैनंदिन रुग्णसंख्येतील मोठी वाढ दर्शविणाऱ्या महाराष्ट्र आणि पंजाबसाठी उच्च स्तरीय समिती केंद्राकडून नियुक्त करण्यात आली आहे. आठ राज्यांत दैनंदिन रूग्णांत सतत वाढ होत असलेली दिसून येत आहे. गेल्या 24 तासांतील नव्या रुग्णसंख्येतील एकूण वाढ 84.71% असून 18,711 नव्या रूग्णांची नोंद झाली आहे. भारतात सक्रीय रुग्णांची संख्या आज 1.84 लाखांवर (1,84,523) पोचली आहे. भारतातील  सक्रीय रूग्णसंख्या एकूण रुग्णसंख्येच्या 1.65 %इतकी आहे. हे आकडे दिनांक 17 जानेवारी 2021 ते 07 मार्च 2021 पर्यंतचे आहे.