Home Blog Page 178

HSC Results 2019 : पहिला मान कॉमर्सला

नागपूर : गेल्या अनेक वर्षांत बारावीत अव्वल स्थान सायन्स शाखेतील विद्यार्थी वा विद्यार्थिनी मिळवत आले आहे. यंदा मात्र ही परंपरा मोडली, कॉमर्स शाखेतील विद्यार्थिनींनी. विदर्भातून पहिला आणि दुसरा क्रमांक याच शाखेतील विद्यार्थिनींनी पटकाविला आहे. भंडारा येथील नूतन कन्या कनिष्ठ महाविद्यालयातील खुशी संतोष गंगवानी हिने ९६.४६ टक्के गुणांसह विदर्भातून अव्वल स्थान पटकाविले. नागपूरच्या कौशल्यादेवी माहेश्वरी ज्युनिअर कॉलेजमधील कॉमर्सच्या इशिका नरेश सतीजा हिने ९६.३० गुणांसह दुसरे स्थान पटकाविले आहे. गोंदियातील गुजराती कनिष्ठ महाविद्यालयाची सायन्स शाखेची सिया धनेंद्र ठाकूर हिने ९५.८४ गुण घेत तिसरे स्थान पटकाविले. सिया ही सायन्स शाखेत विदर्भातून पहिली आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावीच्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल मंगळवारी जाहीर केला. राज्यातील नऊ विभागांमधून कोकण विभाग ९३.२३ टक्क्यांसह अव्वल स्थानी राहिले. नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी ८२.५१ टक्के लागला. गेल्यावर्षीपेक्षा हा निकाल ५.०६ टक्क्यांनी कमी आहे. ८७.८८ टक्के उत्तीर्णांसह पुणे विभागाने दुसरा क्रमांक तर अमरावती विभागाने ८७.५५ टक्क्यांसह तिसऱ्या क्रमांकावर झेप घेतली. विदर्भातील जिल्ह्यांचा विचार करता ९१.५५ टक्के निकाल देत वाशीमने बाजी मारली आहे. ८७.९९ टक्क्यांसह गोंदिया जिल्हा दुसऱ्या स्थानी आहे. गडचिरोली जिल्ह्याचा सर्वांत कमी म्हणजे ६८.८० टक्के निकाल लागला. यावेळी बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण विद्यार्थ्यांचे प्रमाण ८५.८८ टक्के असून, गेल्या पाच वर्षांतील हे नीचांकी प्रमाण आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत उत्तीर्णांचे प्रमाणही २.५३ टक्क्यांनी कमी झाले आहे.

गेल्या वर्षीच्या तुलनेत राज्याचा निकाल २.५३ टक्क्यांनी घसरला आहे. या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण ८५.८८ टक्के आहे. राज्यातील तब्बल ४ हजार ४७० विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. परिणामी प्रवेशासाठी चढाओढ राहणार आहे. कृतिपत्रिका आणि प्रश्नपत्रिकांच्या आराखड्यामधील बदलामुळे निकाल कमी झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. निकालात घसरण होण्यामागे इंग्रजी आणि गणित, जीवशास्त्र, रसायनशास्त्र आणि पदार्थविज्ञान हे विषय कारणीभूत ठरले आहेत. या विषयांत नापास होण्याचे प्रमाण गेल्यावर्षीपेक्षा अधिक आहे. एकूण निकालात मुलींचेच वर्चस्व आहे. मुलींच्या निकालात कोकणने बाजी मारली असून यात सर्वात कमी निकाल नाशिक विभागाचा आहे.

नागपूर विभागाची घसरण

नागपूर विभागात यंदा १ लाख ५८ हजार ४२७ नियमित विद्यार्थ्यांची नोंदणी झाली होती. त्यापैकी १ लाख ५८ हजार ३१९ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. त्यापैकी १ लाख ३० हजार ६३२ विद्यार्थी उत्तीर्ण झाले. मागील वर्षी नागपूर विभागातून १ लाख ६४ हजार ६२७ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती. त्यातुलनेत यंदा ६ हजार ३०८ विद्यार्थ्यांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळेदेखील निकाल घसरला असल्याचा दावा करण्यात येत आहे.

अधिक वाचा : Electricity duty exemption to industries in Vidarbha, Marathwada extended up to 2024

CSIR-NEERI आणि HER Foundation मिळून Menstruation Hygiene बद्दल जनजागृती

नागपूर : 28 मे 2019 International Hygiene Day चे निमित्याने CSIR-NEERI आणि HER Foundation मिळून VSPM Dental College & Research Centre येथे Menstruation आणि Hygiene तसेच Sanitary Napkins चा सुरळीत वापर व वापरलेल्या Sanitary Napkins च्या शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट करण्याबद्दलची माहिती व त्यांचे प्रात्यक्षिक देऊन तेथील विद्यार्थी, शिक्षकवर्ग तसेच कर्मचारी यांच्यात जनजागृती करण्यात आली. कार्यक्रमाची प्रस्तावना HER Foundation  च्या संचालिका अंड भूमीत सावरकर यांनी केली.

नंतर VSPM Dental College & Research Centre च्या Dean डॉ. उषा रडके यांनी अभिनंदन पार स्वागत केले. त्यानंतर CSIR-NEERI  चे मुख्य वैज्ञानिक आणि प्रमुख व संसाधन प्रबंधन प्रभाग प्रोसेसर डॉ. नितीन लाभसेटवार यांनी Menstruation आणि Hygiene आणि त्यादरम्यान शारीरिक, मानशिक आरोग्याची जोपासना हि शास्त्रोक्त पद्धतीने करणे व सोबत त्याचा प्रचार , प्रसार कशा पद्धतीने करावा तसेच मासिक पाळी दरम्यान Sanitary Napkins   चा वापर त्याचे फायदे आणि अति महत्वाचे म्हणजे वापरातील न्याप्कीन च्या शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट आरोग्याच्या व प्रयावार्नाच्या दृष्टीने किती व कसा महत्वाचा आहे हे सांगितले.

त्यानंतर CSIR-NEERI  चे शास्त्रज्ञ अंकित गुप्ता यांनी CSIR-NEERI ने बनविलेल्या ElectricSanitary Pad Incinerator “Green Dispo” द्वारे Sanitary Napkins चा विल्हेवाट अशाप्रकारे करता येईल हे प्रात्यक्षिक सांगून दिले .त्याच दरम्यान Oscar Winning Short Film दाखविण्यात आली. विद्यार्थिनी SanitaryNapkin वापरणे आणि’ त्यांची योग्य विल्हेवाट लावणे याचे शान्कांनीसारण करण्यात आले. सर्वात शेवटी कार्यक्रमाची सांगता हि HER Foundation च्या संचालिका रुचिता देश्मीख यांनी केली. ह्या कार्यक्रमात VSPM Dental College & Research Centre च्या विद्यार्थिनी तशेच येथील शिक्षिका आणि कर्मचारी होते.

या कार्क्रमादार्म्यान प्रामुख्याने HER Foundationच्या संचालिका भूमीत सावरकर, रुचिता देशमुख, आणि CSIR-NEERI चे मुख्य वैज्ञानिक आणि प्रमुख उर्जा व संसाधन प्रबनधन विभाग डॉ. नितीन लाभसेटवार तसेच निरी चे वैज्ञानिक अंकित गुप्ता, डॉ. पूजा जैन, डॉ पूनम प्रसाद, VSPM Dental College & Research Centre च्या Dean डॉ. उषा रडके, डॉ. शिनाय, डॉ. जया जोशी उपस्तित होते.

अधिक वाचा : नागपुरात उष्माघाताचे १० बळी

Electricity duty exemption to industries in Vidarbha, Marathwada extended up to 2024

महानिर्मिती

Nagpur : State Cabinet, in its first meeting after the Model Code of Conduct for Lok Sabha elections was lifted, took a decision to extend the exemption from payment of electricity duty granted to industries in Vidarbha and Marathwada regions. The exemption, which was effective for the period from 2013 to 2019, has been extended up to the years 2024. The extension will put a burden of Rs 600 crore on the State Exchequer.

Chandrashekhar Bawankule, Energy Minister and Guardian Minister of Nagpur district, stated that the Government still took the decision to enable the industries in Vidarbha and Marathwada to survive in competition. Already, the previous exemption provided a boost to industrialisation in these industrially backward regions and also generated employment opportunities. Energy Department placed the proposal in this regard before the State Cabinet. Devendra Fadnavis, Chief Minister, who chaired the meeting, took a positive stand and approved the proposal, stated Bawankule in a press release.

Under the Package Scheme of Incentives-2013, the Government was providing exemption from payment of electricity duty and stamp duty, and also VAT refund. The said scheme was applicable up to March 31, 2019. As per the Industries Policy-2019, electricity duty exemption has been granted to micro, small, and medium industries in C, D, and D+ industrial areas and in Naxal-affected areas. However, there were industries that did not fit the criteria but were in Vidarbha and Marathwada regions. Hence, the State Cabinet decided to grant exemption from payment of electricity duty to such industrial units for a period from April 1, 2019 to March 31, 2024.

The entire State of Maharashtra saw an investment of Rs 2,17,774.10 crore in energy sector alone. Of this, the investment of Rs 1,57,204.10 crore was made in Vidarbha and Marathwada regions. Now, to keep up the momentum and encourage new industries and generate more employment opportunities in Vidarbha and Marathwada, the exemption from payment of electricity duty has been extended up to 2024.

Also Read : आता पाकिस्तानचे चार तुकडे होतील : मेजर बक्षी

आता पाकिस्तानचे चार तुकडे होतील : मेजर बक्षी

नागपूर : ‘आमच्या पिढीने १९७१ साली अवघ्या तेरा दिवसात पाकिस्तानचे तुकडे केले होते. तरी त्यांचा दुष्टपणा कायमच आहे. आत्मसन्मान, देशप्रेम शिकवून गेलेल्या स्वा. सावरकर, शिवाजी महाराजांचे सळसळणारे रक्त घेऊन जन्माला आलेली आताची पिढी जेव्हा तुटून पडेल तेव्हा पाकिस्तान्यांचे चार तुकडे होतील. त्याची एक झलक त्यांना बालाकोटमध्ये बघायला मिळाली आहे’, हे त्वेषपूर्ण उद्गार आहेत, मेजर जनरल (निवृत्त) जी. डी. बक्षी यांचे.

मंगळवारी मेजर जनरल बक्षी उभे राहिले, त्यांनी बोलायला सुरुवात केली आणि त्यांनी श्रोत्यांना जिंकून घेतले. सभागृहाने त्यांना उभे राहून मानवंदना केली आणि ‘जयहिंद’च्या घोषणांनी खचाखच भरलेले सभागृह दुमदुमले. प्रसंग होता स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समितीच्या सामाजिक अभिसरण व तेजस्विनी महिला गौरव पुरस्काराचे वितरणाचा. स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारक समितीचे अध्यक्ष चंद्रकांत लाखे यांच्या अध्यक्षतेखाली सायंटिफिक सभागृहात आयोजित कार्यक्रमाला मेजर जनरल (निवृत्त) जी. डी. बक्षी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.

आपल्या देशात ५० टक्के युवक हे २५ वर्षांपेक्षा कमी वयाचे असून त्यांची फौज उभी करण्याचा प्रयत्न झाला, तर जगातली ती सर्वांत मोठी फौज ठरेल. आपले सैन्य आज तांत्रिकदृष्ट्याही सक्षम असल्याचे बालाकोट हल्ल्याने दाखवून दिले आहे. एवढी सैनिकी ताकद आज कोणत्याही देशाजवळ नाही. आता आपण पाकिस्तान्यांसमोर एक लक्ष्मणरेखा आखून दिली असून ती पार कराल तर कुत्र्यासारखे मराल, असा इशाराही दिला आहे. महाभारताने आपल्याला ‘अहिंसा परमोधर्म’ असे सांगितले असले, तरी धर्माच्या रक्षणासाठी हिंसाच उत्तम आहे, असे स्वातंत्र्यवीर सावरकरांचे म्हणणे होते. आजच्या पिढीचे प्रेरणास्थान स्वा. सावरकर आणि शिवाजी महाराज हे आहेत. सावरकरांनी जी देशप्रेमाची भावना युवकांच्या मनात निर्माण केली होती, त्यांनी जे अखंड भारताचे स्वप्न पाहिले होते ते आजची ही युवा पिढी पूर्ण करेल, असा विश्वास बक्षी यांनी व्यक्त केला.

‘दे दी हमे आजादी बिना खड्स बिना ढाल’ असे म्हणणे पाप असून सुभाषचंद्र बोसांच्या आजाद हिंद सेनेमुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळालेले आहे. पण गेल्या ७२ वर्षात आजाद हिंद सेनेची कुणालाच आठवण झाली नाही. नरेंद्र मोदी सरकारने पहिल्यांदा आजाद हिंद सेनेला राजपथावर आणले. त्यांचा सन्मान केला. आतापर्यंत लढल्या गेलेल्या निवडणुका या जातीच्या आधारवर होत्या. यावर्षी पहिल्यांदा त्या देशभक्तीच्या आधारे त्या लढल्या गेल्या असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. स्वातंत्र्यवीर वि. दा. सावरकर यांच्या जयंती निमित्ताने आज पुरुषोत्तम मार्तंड उपाख्य बापू जोग व मीना जोग यांना सामाजिक अभिसरण पुरस्कार तर आत्मदीपम् सोसायटीच्या संस्थापक जिज्ञासा कुबडे यांना तेजस्विनी महिला गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

हाऊसफुल्ल गर्दी

मेजर जनरल जी. डी. बक्षी यांना ऐकायला श्रोत्यांची हाऊसफुल्ल गर्दी झाली होती. सभागृह खचाखच भरून गेले होते. काही लोकांनी स्टेजवर, मधल्या ओळी खाली बसून कार्यक्रमाचा आनंद घेतला. बाहेरही मोठ्या संख्येने लोक उपस्थित होते. उभे राहायलाही जागा नसल्यामुळे अनेकजण परत गेले. बक्षी यांनी भाषणाला सुरुवात करताच टाळ्यांचा एकच कडकडाट झाला.

जोरदार घोषणाबाजी

जी. डी. बक्षी यांचे भाषण सुरू होताच ‘भारतमाता की जय’ अशा घोषणा झाल्या. त्यांनी राणी लक्ष्मीबाई, शिवाजी महाराजांचा उल्लेख केला तेव्हाही श्रोत्यांनी त्यांचा जयजयकार केला. जी. डी. बक्षी यांच्या त्वेषपूर्ण भाषणादरम्यान अनेकदा वंदेमातरमचेही सूरू उमटले. त्यांचे भाषण आटोपल्यानंतर सर्व श्रोत्यांनी उभे राहुन त्यांना मानवंदना केली व ‘जयहिंद’च्या घोषणांना सभागृह हालून गेले.

अधिक वाचा : नागपुरात उष्माघाताचे १० बळी

नागपुरात उष्माघाताचे १० बळी

नागपूर : नागपुरातील उष्णतेच्या या लाटेत गेल्या ४८ तासांत दहा जणांचा जीव गेला आहे. ते उष्माघाताचे बळी ठरले आहेत. गेल्या दोन आठवड्यांपासून विदर्भात सूर्य आग ओकत आहे. नागपुरात तर दरदिवशी मोसमातील उच्चांक बदलत आहे. मंगळवारी उपराजधानीत ४७.५ अंश सेल्सिअस इतके इतिहासातील तिसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक तापमान नोंदविण्यात आले.

शहरात दहा विविध ठिकाणी दहा जणांचे मृतदेह आढळले. गणेशपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कॉटन मार्केट येथे, रामझुल्याखाली तसेच अशोक चौकातील फुटपाथवर, कोतवाली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील एम्पायर ट्रान्सपोर्ट कॅरियर दुकानाच्या पायरीवर, सक्करदरा उडाणपुलाखाली, हनुमान मंदिर परिसरातील भोसले जिमसमोर, मोठा ताजबागेतील बुलंद गेटसमोर, धंतोली पोलिस ठाण्याच्या हद्दीतील केअर हॉस्पिटल समोरील शहीद उड्डाण पुलाखाली, सिव्हिल लाइन्स परिसरातील आयजी ऑफिसच्या कुंपणाजवळील फुटपाथवर, सीताबर्डी पोलिस ठाण्याच्या हद्दीतील प्रयास अॅकॅडमीच्या प्रवेशद्वाराच्या बाजूच्या पॅसेजमध्ये अनोळखी व्यक्तींचे मृतदेह आढळले आहेत.

विदर्भात यंदा एप्रिल महिन्याच्या अखेरीसच उन्हाचा कडाका सुरू झाला होता. एप्रिल महिन्याअखेरीसच तापमान ४६ अंशांपर्यंत पोहोचले होते. त्यामुळे तेव्हापासूनच उष्माघाताच्या बळींना सुरुवात झाली. गेल्या दोन आठवड्यात किमान २५ अनोळखी व्यक्तींचे मृतदेह रस्त्यावर आढळले आहेत.

तीव्र उन्हासाठी ओळखल्या जाणाऱ्या चंद्रपुरात सर्वाधिक ४७.८ इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली. उष्णतेची ही तीव्र लाट पुढील दोन राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. यंदा नागपूर सर्वाधिक ४७.९ अंश सेल्सिअसचा विक्रम मोडणार का याकडे लक्ष लागले आहे.

अधिक वाचा : मोदींचा शपथविधी : शाही जेवण, ६००० पाहुणे आणि बरंच काही

मोदींचा शपथविधी : शाही जेवण, ६००० पाहुणे आणि बरंच काही

नागपूर : राष्ट्रपती भवनात अत्यंत साध्या पण देखण्या समारंभात ३० मे रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा शपथविधी समारंभ पार पडणार आहे. या कार्यक्रमाला १४ राष्ट्रप्रमुख उपस्थित राहणार असून तब्बल ६००० पाहुण्यांचा पाहुणचार करण्यात येणार आहे.

राष्ट्रपती भवनासमोरील पटांगणात हा समारंभ पार पडणार आहे. हा कार्यक्रम अत्यंत साध्या पद्धतीने पार पडावा अशी इच्छा खु्द्द राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी व्यक्त केली आहे. त्यानुसार संध्याकाळी सात वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे. शपथविधी नंतर आलेल्या पाहुण्यांसाठी शाही भोजनाचे आयोजन करण्यात आलं आहे. या भोजनात दाल रायसिना सारख्या भारतीय पदार्थांसोबत विदेशी मांसाहारी पदार्थांचाही समावेश करण्यात आला आहे. पूर्व आशियातील देशांचे अनेक राष्ट्रप्रमुख या कार्यक्रमात सहभागी होणार असल्यामुळे अनेक ईस्ट आशियन मांसाहारी पदार्थांचा समावेश करण्यात आला आहे. सात वाजताच्या शपथविधीसाठी दुपारी ४च्या रणरणत्या उन्हातच पाहुणे येण्यास सुरुवात होणार आहे. त्यामुळे पाहुण्यांना पाण्याच्या बॉटल्सही देण्यात येणार आहेत.

गुरुवारी संध्याकाळी पार पडणाऱ्या या समारंभासाठी मंगळवारी संध्याकाळपासूनच राष्ट्रपती भवनात तयारीला सुरुवात झाली आहे. ६००० लोकांसाठी मेजवानी तयार करण्यासाठी दोन दिवस लागणार आहेत. या ६००० पाहुण्यांमध्ये भारतातील अनेक पक्षांचे नेते, इतर देशांचे राजदूत, राष्ट्रप्रमुख आणि विचारवंताचा समावेश आहे. कार्यक्रमाची रुपरेषा २०१४ सारखीच असणार आहे.

‘येथे’ चौथ्यांदा शपथविधी समारंभ

राष्ट्रपती भवनाच्या पटांगणात चौथ्यांदा शपथविधी समारंभ आयोजित करण्यात आला आहे. एरवी शपथविधी समारंभ राष्ट्रपती भवनातील दरबार हॉलमध्ये पार पडतो. पण ४००-५०० इतकीच या हॉलची क्षमता असल्यामुळे पटांगणाची निवड करण्यात आली आहे. सर्वप्रथम १९९० मध्ये चंद्रशेखर यांचा शपथविधी या पटांगणात झाला होता. त्यानंतर १९९८ मध्ये अटल बिहारी वाजपेयींनीही इथेच पंतप्रधानपदाची शपथ घेतली होती. २०१४ मध्ये मोदींनीही सार्क राष्ट्राध्यक्षांच्या उपस्थितीत येथे शपथ घेतली होती. आता २०१९ चा शपथविधीही इथेच पार पडणार आहे.

अधिक वाचा : “ग्रीन क्रूड ऑइल’ से विदर्भ और देश समृद्ध बनाऊंगा : गडकरी

“ग्रीन क्रूड ऑइल” से विदर्भ और देश समृद्ध बनाऊंगा : गडकरी

नागपुर : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी ने कृषि उत्पादन से तैयार होने वाले ग्रीन क्रूड ऑइल से विदर्भ सहित संपूर्ण देश को समृद्ध बनाने का आश्वासन देते हुए कहा कि इसमें ग्रीन क्रूड एंड बायोफ्यूल फाउंडेशन की भूमिका महत्वपूर्ण है। ग्रीन क्रूड एंड बायोफ्यूल फाउंडेशन के अध्यक्ष संशोधक डॉ. हेमंत जांभेकर, सचिव अजित पारसे ने केंद्रीय मंत्री गडकरी से मुलाकात कर उनके जन्मदिन पर अभिनंदन किया।

इस दौरान पदाधिकारियों के साथ गडकरी ने जैव-ईंधन, इथेनॉल उत्पादन से किसानों को होने वाला फायदा, सीधे उद्योग से किसानों को जोड़ना, उद्योग अथवा रिफाइनरी खड़ी करना, रोजगार निर्मिती, आयात किए कच्चे तेल पर खर्च आदि पर चर्चा की। कृषि माल को योग्य भाव न मिलने पर किसान निराशा में उसे फेंक देता है। इस कृषि माल का उपयोग इथेनॉल, जैव-ईंधन उत्पादन के लिए करने पर देश का किसान समृद्ध होगा। इस दिशा में ग्रीन क्रूड एंड बायोफ्यूल फाउंडेशन का कार्य महत्वपूर्ण होने का उल्लेख कर गडकरी ने पदाधिकारियों की प्रशंसा की।

चार महीने पहले केंद्रीय मंत्री गडकरी द्वारा लोकार्पित ‘इंडिया फॉर इथेनॉल’ वेबपोर्टल पर अब तक अनेक लोगों ने भेंट दी। जिसमें 54 प्रतिश नागरिक ग्रामीण क्षेत्र के और किसान है। किसानों के साथ उनके क्षेत्र में जैव-ईंधन निर्मिती प्रकल्प स्थापन कर रोजगार दिलाना, उद्योग सहायता प्रकल्प चलाना, किसानों को जैवईंधन के बाबत सोशल मीडिया, इंटरनेट, कम्प्यूटर द्वारा संपूर्ण जानकारी देने का काम ग्रीन क्रूड एंड बायोफ्यूल फाउंडेशन कर रहा है।

और पढिये : नागपुर में चलती बस में लगी आग, सभी यात्रियो ने बस के रुकते ही बस से कूदकर अपनी जान बचाई

नागपुर में चलती बस में लगी आग, सभी यात्रियो ने बस के रुकते ही बस से कूदकर अपनी जान बचाई

नागपुर : हिंगना से सीताबर्डी की ओर आ रही मनपा संचालित “आपली बस” में हिंगना रोड पर बालाजी नगर परिसर में अचानक आग लग गई। बस के इंजिन से धुआं उठता देखकर बस चालक ने सतर्कता दिखाते हुए बस काे सडक किनारे रोक दिया। बस में सवार सभी यात्री बस के रुकते ही कूदकर अपनी जान बचाई। इस बीच बस पूरी तरह आग की चपेट में आ चुकी थी।

बस धूं धूं कर जल उठी। घटनास्थल पर पहुंचे दमकल कर्मियों ने आग पर काबू पाया। बस पूरी तरह जलकर खाक हो गई। आग काफी भीषण थी, जिससे बस में लगे टीन तक पिघल गई। कहा जा रहा है कि भीषण गर्मी के चलते यह हादसा हुआ। घटना में किसी प्रकार की जनहानि नहीं हुई। यह हादसा मंगलवार की सुबह करीब 6.25 बजे हुई। दमकल विभाग के अनुसार  “आपली बस” क्रमांक एम एच 31 सी ए – 6245 का चालक मनीष करांगे मंगलवार को सुबह बस लेकर सीताबर्डी के लिए रवाना हुआ।

चलती बस में बालाजी नगर स्थित भारत पेट्रोलियम के सामने अचानक आग लग गई। बताया जाता है कि  पहले बस चालक मनीष करांगे को इंजिन की जगह से धुआं निकलता दिखाई दिया। किसी अनहोनी की आशंका के चलते चालक ने बस रोक दी। चालक ने सभी यात्रियों को बस से उतर जाने को कहा और बताया कि बस के इंजिन से धुआं निकल रहा है बस में आग लग सकती है। यह सुनते ही सभी यात्री बस से नीचे उतर गए।

बस में 25 यात्री हिंगना से सीताबर्डी के बीच सफर करने के लिए बैठे थे। इस बीच बस चालक भी बस से उतर गया। चालक के बस से नीचे उतरते ही केबिन में तेजी से धुआं फैल गया। उसके बाद बस में आग लग गई। इस बारे में एमआईडीसी दमकल विभाग को सूचना दी गई। चर्चा है कि एमआईडीसी अग्निशमन दल के अधिकारी- कर्मचारी देरी से पहुंचे। इस बीच बस में आग फैल चुकी थी। एमआईडीसी दमकल कर्मियों के पहुंचने में देरी होती देख किसी ने मनपा दमकल कर्मियों को वाहन भेजने की गुजारिश की।

तब मनपा के दमकल कर्मी भी पहुंचे। इस बीच एमआईडीसी के दमकलकर्मी भी पहुंच गए। दमकल कर्मियों ने कडी मशक्कत कर आग पर काबू तो पा लिया लेकिन बस जलकर खाक हो चुकी थी। इस घटना के दौरान करीब एक घंटे तक इस परिसर में यातायात बाधित हो गया। घटनास्थल पर मौजूद यातायात पुलिस कर्मियों ने यातायात को सुचारू किया।

और पढिये : ‘राजकीय संन्यास’ हा माझा जुमला !

भाडे पट्टा वाटपासाठी मनपाचे सर्वेक्षण सुरू

आयुक्त तुकाराम मुंढे

नागपूर : ‘सर्वांसाठी घरे’ या शासन योजनेनुसार आणि शासन निर्णयानुसार नागपूर शहरातील अतिक्रमितांना भाडे पट्टेवाटपाचे काम युद्धपातळीवर करण्यासाठी नागपूर महानगरपालिकेने कंबर कसली आहे. यासाठी स्वतंत्र पट्टा वाटप सेलची निर्मिती करण्यात आली असून झोपडपट्टीधारकांच्या सामाजिक आणि आर्थिक सर्व्हेक्षणासाठी तीन एजंसींची नियुक्ती करण्यात आली आहे. सर्व्हेक्षणाचे कार्यानेही आता वेग घेतला असून माहिती संकलनाचे कार्य सुरू झाले आहे.

राज्य शासनाने १७ नोव्हेंबर २०१८ च्या शासन निर्णयानुसार, सन २०११ पूर्वीच्या सर्व अतिक्रमितांना भाडे पट्टे वाटप करण्याचा निर्णय घेतला. याच निर्णयाच्या अनुषंगाने स्वतंत्र शासन निर्णयही घेण्यात आले. नासुप्रच्या जागेवर वसलेल्या जागेवरील अतिक्रमण धारकांना पट्टे देणे, स्थानिक स्वराज्य संस्था क्षेत्रात असलेल्या सर्व शासकीय विभागाच्या (वनविभाग वगळून) जमिनीवरील असलेली अतिक्रमणे नियमानुकूल करून भाडेपट्टा देणे, नागरी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या मालकीच्या जागेवरील अतिक्रमण नियमानुकूल करून भाडेपट्टे देणे आणि नागपूर महानगर विकास प्राधिकरणच्या जागेवरील अतिक्रमणे नियमानुकूल करून भाडेपट्ट्याने देण्याबाबतचे हे निर्णय आहेत. या निर्णयाच्या अनुषंगाने नागपूर महानगरपालिकेच्या वतीने मनपा क्षेत्रात विधानसभा मतदारसंघनिहाय असलेल्या झोपडपट्टीतील नागरिकांची माहिती गोळा करण्यासाठी प्रति दोन मतदारसंघ मिळून एक अशा तीन एजंसीची नियुक्ती करण्यात आली आहे. सीएफएसडीसी (CFSDC), इमॅजिस (Imagis) आणि आर्किनोव्हा (Archinova) ह्या तीन एजंसीचा यात समावेश आहे. ह्या तीनही एजंसी सध्या शहरात पीटीएस सर्व्हेक्षणाच्या माध्यमातून सामाजिक-आर्थिक माहिती संकलित करीत आहेत. यामध्ये मनपाच्या जागेवरील अतिक्रमणधारकांची माहिती संकलनाला प्रथम प्राधान्य असून त्यानंतर नझूल आणि शासकीय विभागांच्या जागेवरील झोपडपट्ट्या आणि सरतेशेवटी संमिश्र मालकीच्या जागेवरील झोपडपट्ट्यांच्या सर्व्हेक्षणाला प्राधान्य राहील.

११ हजारांवर कुटुंबांचे सर्व्हेक्षण

तीनही एजंसीने आतापर्यंत ११ हजारांवर कुटुंबांचे सर्व्हेक्षण केले आहे. मनपा मालकीच्या जागेवरील १३ झोपडपट्ट्यांमधील ३८७४ कुटुंबांची माहिती संकलित झाली असून त्यापैकी १२६० कुटुंबांनी संपूर्ण कागदपत्रे जमा केली आहेत. यापैकी ३७८ कुटुंबांना भाडे पट्टे वाटप करण्यात आले आहेत. २२७ कुटुंबांना डिमांड वाटप झाले आहेत. जागोजागी लावलेल्या शिबिराच्या माध्यमातून ६५१ कुटुंबांना मालमत्ता कराचा भरणा करून भाडेपट्टा प्राप्त करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. याव्यतिरिक्त नझुलच्या जागेवर असलेल्या झोपडपट्ट्यांमधील ७८६१ घरांचे सर्व्हेक्षण झाले असून त्यापैकी २३९२ कुटुंबांनी संपूर्ण कागदपत्रे जमा केली आहेत. कागदपत्रांची पडताळणी केल्यानंतर १७६८ झोपड्यांची अंतिम माहिती नझुल आणि उपजिल्हाधिकारी कार्यालयाकडे मनपाकडून पाठविण्यात आली आहे.

स्वतंत्र पट्टेवाटप सेल

पट्टेवाटपाच्या कामाला गती यावी यासाठी नागपूर महानगरपालिकेचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी मनपात स्वतंत्र पट्टेवाटप सेलची निर्मिती केली आहे. अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख यांच्या मार्गदर्शनात सहायक आयुक्त मिलिंद मेश्राम यांच्याकडे या सेलचे नियंत्रण अधिकारी म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. मनपा आयुक्त अभिजीत बांगर स्वत: पट्टेवाटप कामाचा पाठपुरावा करीत असून प्रत्येक सोमवारी संबंधित अधिकाऱ्यांकडून कामाच्या प्रगतीचा आढावा ते घेत आहेत.

पट्टे प्राप्तीनंतर वित्तीय कर्जासाठी पात्र

सध्या कुठलाही अतिक्रमणधारक वित्तीय कर्जासाठी पात्र ठरत नाही. मात्र महाराष्ट्र शासनाने ६ मार्च २०१९ रोजी काढलेल्या शासन निर्णयानुसार भाडेपट्टा मिळणारा प्रत्येक व्यक्ती त्याच्या अधिकारात आलेले घर तारण ठेवून शिक्षण अथवा अन्य कुठल्याही कारणासाठी कुठल्याही बँकेकडून वित्तीय कर्जाची उचल करू शकतो. त्यामुळे अतिक्रमणधारकांनी मालमत्ता कराचा भरणा करुन सर्व्हेक्षण करणाऱ्या एजंसीला कागदपत्रे देण्याचे आवाहन मनपाचे आयुक्त अभिजीत बांगर यांनी केले आहे. मनपाचे कर निरीक्षक प्रत्येक वॉर्डात जाऊन कर संकलन करीत आहेत. अतिक्रमण धारकांनी थकीत कर देऊन भाडे पट्ट्यासाठी पात्र व्हावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. भाडेपट्टा आणि नोंदणी शुल्क भरण्यासाठी प्रत्येक दुय्यम निबंधक कार्यालयाच्या बाजूला विशेष दालन तयार करण्यात आले असून ते शुल्क तेथे भरण्याचे आवाहनही मनपातर्फे करण्यात आले आहे.

अधिक वाचा : Rahul Gandhi To Lead Congress In Lok Sabha ? Amid Crisis, New Formula

Rahul Gandhi To Lead Congress In Lok Sabha ? Amid Crisis, New Formula

राहुल गांधी Rahul Gandhi

Nagpur : Rahul Gandhi remains firm on quitting as Congress president after the party’s national election rout but may agree to lead the party in the Lok Sabha, sources say after he held a series of meetings with party leaders this morning. Rahul Gandhi’s sister Priyanka Gandhi Vadra, Rajasthan Chief Minister Ashok Gehlot and his deputy Sachin Pilot were among visitors to his Delhi home on Tuesday. Sources say the Congress chief has called a meeting at his home at 4.30 pm today.

Here are the latest developments in this big story :

Sources say Rahul Gandhi is likely to be elected chairperson of the Congress Parliamentary Party. He will then decide on who will lead the party in the Lok Sabha and Rajya Sabha.

But Rahul Gandhi has refused to change his mind on quitting as party chief, a decision he conveyed at a post-mortem by the Congress Working Committee on Saturday.

“He will not change his mind, though I want him to continue,” said Tarun Gogoi, a member of the Congress Working Committee. Mr Gogoi said Rahul Gandhi was extremely upset with senior leaders of the party. “He was not happy with some of our seniors. The way they behaved, he felt they should have worked hard but they were not up to his expectations,” the former Assam Chief Minister told.

He said Rahul Gandhi was asked in the meeting whether a “general should run away”. “He said I am not running away. I will fight even more. If I am not looking after the Congress party, then I can fight the ideology,” Mr Gogoi revealed.

On Monday, Rahul Gandhi, 48, told two Congress leaders, Ahmed Patel and KC Venugopal, to look for his replacement, according to sources. Ahmed Patel, a close aide of Rahul Gandhi’s mother Sonia Gandhi, denied it and said it was a meeting for “routine administrative work”.

Sources say the party is coming to terms with Rahul Gandhi’s resolve and the possibility of another chief. The new chief has to be approved by all three Gandhis – Rahul Gandhi, Sonia Gandhi and Priyanka Gandhi – say sources.

At the Saturday meeting, Rahul Gandhi also asked the leaders not to consider his mother and sister as his replacement, throwing the party into more turmoil. In its 134-year history, the Congress has been led mostly by members of the Nehru-Gandhi family and has not done very well under the rare non-Gandhi, like Sitaram Kesri.

The Congress failed to win a single seat in 18 states and union territories and won only 52 seats in the 543-member Lok Sabha – not enough to qualify even for the post of Leader of Opposition (a party needs 55 for that).

It lost even in the states of Rajasthan, Chhattisgarh and Madhya Pradesh that it won in December, and failed the test in Karnataka, which it has been ruling since last May in alliance with HD Kumaraswamy. The Congress is firefighting to keep its governments in Madhya Pradesh, Rajasthan and Karnataka, where the BJP is breathing down its neck.

The Congress’s complete collapse is encapsulated by Mr Gandhi’s defeat in his constituency Amethi, which has been loyal to the Gandhi family for three decades.

Also Read : ‘राजकीय संन्यास’ हा माझा जुमला !

‘राजकीय संन्यास’ हा माझा जुमला !

नागपूर : ‘पराभूत झाल्यास राजकीय संन्यास घेऊ’, हा एक जुमला होता, अशी कबुली काँग्रेस नेते नाना पटोले यांनी दिली. भाजप नेत्यांनी गेल्या निवडणुकीत दिलेली शेकडो आश्वासने हे जुमले होते. त्यांच्या अनेक जुमल्यांमुळे मीदेखील एक प्रयोग करण्याचा प्रयत्न केला. राजकीय संन्यास घेण्याची ही वेळ नाही तर, देशाला वाचवण्याची वेळ असल्याचे पटोले पत्रपरिषदेत म्हणाले. निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांच्या वागणुकीवरून संतापलेल्या पटोले यांच्यासह शहर अध्यक्ष विकास ठाकरे, प्रदेश प्रवक्ते अतुल लोंढे, अॅड. अभिजित वंजारी यांनी सोमवारी एका भरगच्च पत्रकार परिषदेत भाजप, नितीन गडकरी व प्रशासनाला लक्ष्य केले. पटोले यांनी गडकरी यांचे विजयाबद्दल अभिनंदन करून त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छाही दिल्या.

नागपूर, भंडारा असो वा संघटना, आम्ही काम करणार आहोत. विधानसभा निवडणुकीबाबत जूनच्या पहिल्या आठवड्यात कार्यकर्त्यांचा मेळावा घेऊन बिगूल फुंकवण्यात येईल, असे नाना पटोले यांनी सांगितले. विधानसभा निवडणूक लढण्याबाबत विचारले असता, पक्ष निर्णय घेईल, त्यानुसार आपण काम करू, असे ते म्हणाले. नागपूरचे जिल्हाधिकारी व निवडणूक अधिकारी अश्विन मुद्गल यांची कार्यप्रणाली हुकूमशहासारखी आहे. त्यांच्याविरोधात तक्रार करून न्यायालयात दाद मागण्यात येईल,’ असा पटोले यांनी दिला.

या मुद्यावर पटोले म्हणाले, निवडणूक प्रक्रियेत मुद्गल यांनी अपेक्षित सहकार्य केले नाही. निवडणुकीतील अनागोंदीबद्दल त्यांच्याकडे वारंवार आक्षेप नोंदविले. ५५ तक्रारी केल्या. त्यांनी ईव्हीएमची तपासणी करू दिली नाही. मतमोजणीपूर्वी तपासणी करण्यापूर्वीच पाच विधानसभा मतदारसंघांतील ईव्हीएम सीलबंद करण्यात आल्या. यानंतर एका मतदारसंघातील चार ईव्हीएमची तपासणी करता आली. ईव्हीएमबाबत फॉर्म-सी १७ आणि प्रतिनिधींकडे असणाऱ्या माहितीत विसंगती दिसून आली. त्यामुळे पूर्व नागपुरातील मतमोजणी काही वेळ थांबवण्यात आली होती. दुपारी त्यांच्या निदर्शनास ही बाब आणून देत असताना वंजारी व इतर पदाधिकाऱ्यांविरोधात त्यांनी आवाज चढवला. यानंतर मी स्वत: मतमोजणी केंद्रावर गेल्यानंतर वाद झाला. त्यांनी आमच्या विरोधात पोलिसात तक्रार केली. आम्हीही तक्रार करणार आहोत. ही बाब निवडणूक आयोगाच्या निदर्शनास आणून देण्यात येईल. जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून सरकारचा चेहरा जनतेसमोर असतो. तशी प्रतिमा तयार होते. खासदार, आमदार राहिलेले व अन्य लोकप्रतिनिधी वा राजकीय व सामाजिक कार्यकर्त्यांशी जिल्हाधिकाऱ्यांची अशी वागणूक असल्यास सर्वसामान्यांशी ते कसे वागत असतील, याचा अंदाज लावता येऊ शकतो, असेही पटोले म्हणाले.

अधिक वाचा : १२ वीचा निकाल जाहीर; यंदाही मुलींची बाजी

१२ वीचा निकाल जाहीर; यंदाही मुलींची बाजी

नागपूर : महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता बारावी निकाल जाहीर झाला असून यंदा बारावी बोर्डाचा ८५.८८ टक्के इतका निकाल लागला आहे. यंदाही निकालात मुलींनीच बाजी मारली असून मुलीचे उत्तीर्ण होण्याचे प्रमाणा मुलांपेक्षा ७.८५ टक्के अधिक आहे. मंडळाच्या अध्यक्षा डॉ. शकुंतला काळे आणि सचिव डॉ. अशोक भोसले यांनी ही माहिती दिली. मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळांवर दुपारी एक वाजता सर्व निकाल पाहता येतील.

राज्यातील तब्बल ४४७० विद्यार्थ्यांना ९० टक्क्यांपेक्षा जास्त गुण मिळाले आहेत. यंदा १२ वीच्या परीक्षेला राज्यभरात एकूण १४ लाख ९१ हजार ३०६ विद्यार्थी परीक्षेला बसले होते. यांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या ८ लाख ४२ हजार ९१९ तर विद्यार्थिनींची संख्या ६ लाख ४८ हजार १५१ इतकी होती.

दरम्यान आयपॅडवर परीक्षा देणाऱ्या निशिका या विद्यार्थिनीला ७३ टक्के गुण मिळाले आहेत. निशिका ही मुंबईतील सोफीया कॉलेजची विद्यार्थीनी आहे.

यंदा इयत्ता १२वीच्या निकालात कोकण विभागाने बाजी मारली असून नागपूर विभागाचा निकाल सर्वात कमी लागला आहे. यंदा कोकण विभागाचा निकाल ९३. २३ टक्के इतका लागला आहे. तर, पुणे विभागाचा निकाल ८७.८८ टक्के, अमरावती विभागाचा ८७.५५ टक्के, कोल्हापूर विभागाचा ८७.१२ टक्के, लातूर विभागाचा ८६.०८ टक्के, नाशिक विभागाचा ८४.७७ टक्के, मुंबई विभागाचा ८३. ८५ टक्के, तर नागपूर विभागाचा ८२.५१ टक्के निकाल लागला आहे.

शाखेनुसार विचार करता यंदा विज्ञान शाखेचा निकाल ९२. ६० टक्के, वाणिज्य शाखेचा ८८. २८ टक्के आणि कला शाखेचा निकाल ७५.४५ टक्के लागला आहे.

रिंकू राजगुरूच्या निकालाबाबत उत्सुकता

सैराट चित्रपटाच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेली आर्ची अर्थात अभिनेत्री रिंकू राजगुरू हीनेही यंदा १२वी परीक्षा दिली असून, रुपेरी पडद्यावर यशस्वी ठरलेली रिंकू परीक्षेत कसे यश मिळवते याची उत्सुकता सर्वाांनाच लागली आहे.

मंडळाच्या पुढील अधिकृत संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे

www.mahresult.nic.in
www.hscresult.mkcl.org
www.maharashtraeducation.com

अधिक वाचा : बारावीचा निकाल आज होणार जाहीर

Cricket World Cup : आज भारत-बांगलादेश सराव सामना

नागपूर : पहिल्या सराव सामन्यात न्यूझीलंडच्या स्विंग गोलंदाजीसमोर शरणागती पत्करणाऱ्या भारतीय संघाला आज, मंगळवारी वर्ल्डकपआधी सरावाची अंतिम संधी मिळेल. दुसऱ्या आणि अंतिम सराव सामन्यात भारतीय संघाची लढत बांगलादेशविरुद्ध होणार आहे. दुसरीकडे, बांगलादेशचा हा पहिलाच सराव सामना असेल. कारण, त्यांचा पाकिस्तानविरुद्धचा पहिला सराव सामना पावसामुळे रद्द करण्यात आला होता. मश्रफी मोर्तझाच्या नेतृत्वाखालील बांगलादेशचा संघ वर्ल्डकपमध्ये सहभागी झाला आहे.

वर्ल्डकपच्या विजेतेपदाच्या प्रबळ दावेदारांमध्ये भारतीय संघाचाही समावेश आहे. मात्र, आयपीएलनंतर इंग्लंडमध्ये दाखल झालेल्या भारतीय फलंदाजांना वेगवान खेळपट्ट्यांशी जुळवून घेताना पहिल्या सामन्यात तरी अडचण आली. पहिल्या सराव सामन्यात न्यूझीलंडने गोलंदाजीसाठी अनुकूल असलेल्या द ओव्हलच्या खेळपट्टीवर जबरदस्त स्विंगचा मारा करून भारताचा डाव अवघ्या ३९.२ षटकांत गुंडाळला होता. ट्रेंट बोल्टने सुरुवातीपासूनच टप्प्यावर मारा केला होता. त्यामुळे रोहित शर्मा, शिखर धवन, लोकेश राहुल, कुलदीप यादव यांना त्याचा प्रभावी मारा काही पेलवला नाही. लोकेश राहुलला चौथ्या क्रमांकावर फलंदाजीची संधी मिळाली होती. मात्र, बोल्टचा एक उसळता चेंडू हलक्या हाताने खेळण्याची चूक त्याला भोवली. हार्दिक पंड्याने थोडी फटकेबाजी केली खरी; पण नीशमचा ‘आउट स्विंग’ला तो चकला.

धोनीने ४२ चेंडू खेळून संयम दाखवला. मात्र, साउदी पुढे सरसावून मोठा फटका मारण्याचा त्याचा प्रयत्नही फसला होता. दिनेश कार्तिकलाही आपल्या फलंदाजीची चुणूक दाखवता आली नाही. या खेळपट्टीवर तग धरू शकला तो एकटा रवींद्र जडेजा. त्याने या सराव सामन्यात अर्धशतक ठोकले होते. ‘इंग्लंडमधील ढगाळ वातावरणात भारताचे आघाडीचे फलंदाज अपयशी ठरण्याची शक्यता आहे. अशा स्थितीत संघातील मधल्या आणि तळाच्या फलंदाजांनी झुंजार कामगिरी करण्यास तयार रहावे,’ अशी अपेक्षा कर्णधार कोहलीने व्यक्त केली आहे.

गोलंदाजांमध्ये भुवनेश्वरकुमार, जसप्रीत बुमराह, शमी आणि हार्दिक पंड्या यांच्या वाटेला केवळ चार षटके आली. कर्णधार विराट कोहलीने मात्र या सराव सामन्यात फिरकी गोलंदाजांचा अधिक वापर केला. चहलने ६ षटकांत ३७ धावा देत एक विकेट घेतली होती, तर कुलदीप यादवला ८.१ षटकांत एकही विकेट घेता आली नाही. आयपीएलमध्ये कोलकाता संघाकडून खेळताना खराब कामगिरीमुळे त्याला बसविण्यात आले होते. त्याचा आत्मविश्वास पुन्हा वाढावा म्हणून त्याला अधिक षटके देण्यात आल्याची चर्चा होती. रवींद्र जडेजाने मात्र ७ षटकांत केवळ २७ धावा देत एक बळी मिळवला. डावपेचांची प्रभावी अमंलबजावणी करण्यास अपयश आल्याची बाब कोहलीने मान्य केली होती. आता दुसऱ्या सामन्यात त्याचे डावपेच काम करतात, की नाही, याबाबत उत्सुकता असेल.

केदार, विजय शंकरला मिळणार संधी?

विजय शंकरला या अखेरच्या सराव सामन्यात संधी मिळेल, की नाही याबाबत उत्सुकता आहे. पहिल्या सराव सामन्यापूर्वी नेटमध्ये फलंदाजी करीत असताना त्याच्या हाताला खलील अहमदचा चेंडू लागला होता. वैद्यकीय अहवालात त्याची दुखापत गंभीर नसल्याचे स्पष्ट झाले होते. मात्र, तरीही त्याला पहिल्या सराव सामन्यात संधी मिळाली नव्हती. दुसरीकडे, आयपीएलदरम्यान अष्टपैलू केदार जाधवचा खांदा दुखावला होता. तो तंदुरुस्त असल्याचे म्हटले होते. मात्र, त्यालाही पहिल्या सराव सामन्यात संधी मिळाली नव्हती. या दोघांच्या बाबतीत संघव्यवस्थापनाला कुठलाही धोका पत्करायचा नाही. त्यामुळे यांच्या समावेशाबाबत उत्सुकता आहे.

वेळ : दुपारी ३ पासून

स्थळ : सोफिया गार्डन, कार्डिफ

थेट प्रक्षेपण : स्टार स्पोर्ट्सवर

अधिक वाचा : बारावीचा निकाल आज होणार जाहीर

बारावीचा निकाल आज होणार जाहीर

नागपूर : फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल, मंगळवार दि. २८ मे रोजी दुपारी १ वाजता जाहीर करण्यात येणार आहे. हा निकाल विद्यार्थ्यांना राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईट्सवर पाहता येईल.

मंडळाच्या पुढील अधिकृत संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे –

www.mahresult.nic.in

www.hscresult.mkcl.org

www.maharashtraeducation.com

एसएमएसद्वारे असा मिळवा निकाल

Bsnl मोबाइल ऑपरेटरद्वारे ५७७६६ या क्रमांकावर MHHSC या फॉरमॅटमध्ये एसएमएस पाठवून निकाल मिळवता येईल.

निकालानंतर लगेच दुसऱ्या दिवसापासून गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी अर्ज करता येणार आहेत. गुणपडताळणी २९ मे ते ७ जून या कालावधीत करता येणार आहे. उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी २९ मे ते १७ जून पर्यंत अर्ज करता येईल. पुरवणी परीक्षा मागील वर्षीप्रमाणेच जुलै-ऑगस्टमध्ये होणार आहे.

अधिक वाचा : नागपूरः चकमकीत नक्षलवाद्यांचे शिबिर उद्ध्वस्त

नागपूरः चकमकीत नक्षलवाद्यांचे शिबिर उद्ध्वस्त

नागपूर : जिल्ह्यातील दराची येथील जंगलात सोमवारी सकाळी झालेल्या चकमकीत माओवाद्यांचा शिबिर पोलिसांनी उद्ध्वस्त केला असून शस्त्रसाठ्यासह स्फोटके जप्त केली आहेत.

धानोरा तालुक्यातील कटेझरी पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या दराचीच्या जंगलात माओवाद्यांचे शिबिर असल्याची माहिती मिळाल्यानंतर ‘सी-सिक्स्टी’ कमांडो पथकाने सोमवारी सकाळी या भागात अभियान राबवले. जवान त्या भागात पोहोचताच माओवाद्यांनी जवानांवर गोळीबार केला.

जवानांनी प्रत्युत्तरादाखल गोळीबार केला असता जवानांचा वाढता दबाव पाहून माओवादी पळून गेले. घटनास्थळावरून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठ्यासह आणि स्फोटके जप्त करण्यात आले आहेत. या चकमकीत काही माओवादी जखमी झाल्याचा अंदाज असून या भागात कोंबिंग ऑपरेशन सुरू होते.

अधिक वाचा : प्रेमप्रकरणातून महिलेची हत्या

प्रेमप्रकरणातून महिलेची हत्या

नागपूर : प्रेम तर केले परंतु लग्न करायचे नाही, या नादात तरुणाने विवाहितेची हत्या केली. ही घटना भिवापूर तालुक्यातील नांद शिवारात १९ तारखेला घडली असावी, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. घटनेच्या सात दिवसानंतर हे प्रकरण समोर आले असून या प्रकरणात तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे. उर्मिला गजानन धरणे (वय ४२, रा. नांद) असे मृत महिलेचे, तर रोशन देवके, सुनील ढोणे, सचिन दरत (सर्व रा. नांद), अशी आरोपींची नावे आहेत.

उर्मिला ही विवाहित असून तिला दोन मुली आहेत. दरम्यान, आरोपी रोशनसोबत तिला प्रेम जडले. गेल्या चार वर्षांपासून उर्मिला व रोशन यांचे हे प्रेमप्रकरण सुरू होते. हा प्रकार लक्षात आल्यानंतर तिच्या पतीने तिला सोडचिठ्ठी दिली. त्यानंतर रोशन आणि उर्मिला हे लग्न करण्याच्या तयारीत होते. परंतु, रोशनच्या कुटुंबियांचा याला विरोध होता. १८ मे रोजी रोशन हा उर्मिलासह आपल्या घरी गेला असता त्याच्या कुटुंबीयांनी या दोघांनाही घरातून हाकलून लावले. यानंतर ते दोघेही काही दिवस बेपत्ता होते. दरम्यान रोशन हा गावात दिसत असताना उर्मिला कुठे आहे, असा प्रश्न तिच्या कुटुंबियांना पडला. यामुळे त्यांनी याबाबत रोशनकडे चौकशी केली असता त्याने थातूरमातूर उत्तरे देऊन, ‘मला याविषयी काहीच माहिती नाही’, असा पवित्रा घेतला. त्यानंतर उर्मिलाच्या कुटुंबीयांनी उर्मिला बेपत्ता असल्याबाबत भिवापूर पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवताना रोशनवर संशय आल्याने पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन कसून चौकशी केली. चौकशीत जो प्रकार समोर आला तो एकदम धक्कादायक होता.

रोशन याने सुरुवातीला गळा दाबून उर्मिलाची हत्या केली. नंतर शेतातीलच एका झाडावर तिचा मृतदेह लटकवून तिने आत्महत्या केल्याचा देखावा निर्माण केला होता. परंतु, या प्रकरणातील आरोपी सुनील व सचिन यांनी, ‘ही आत्महत्या दिसत नसून हत्या दिसत आहे’, असे रोशनला सांगितले. त्यामुळे तिन्ही आरोपींनी एका बंडीमधून पूर्वी उर्मिलाचा मृतदेह रोशन याच्या शेतात नेला. तिथे खड्डा खोदून उर्मिलाचा मृतदेह पुरला. ही बाब चौकशीत सामोर येताच पोलिसांनी रोशन व त्याच्या दोन साथीदारांना सोबत घेऊन सोमवारी सकाळी घटनास्थळ गाठले. त्यानंतर मृतदेह बाहेर काढून घटनास्थळावर पंचनामा केला. रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया भिवापूर पोलिस करीत होते. तिन्ही आरोपी हे पोलिसांच्या ताब्यात आहेत. मंगळवारी त्यांना कोर्टात हजर करीत पोलिस कोठडी घेऊन पुढील तपास पोलिस करणार आहेत.

अधिक वाचा : नारा घाट के पास झोपड़पट्टी में भीषण अग्निकांड, 6 गैस सिलेंडर फटे, 11 झोपड़ियां खाक

बारावीचा निकाल उद्या होणार जाहीर

नागपूर : फेब्रुवारी-मार्च २०१९ मध्ये घेण्यात आलेल्या बारावीच्या परीक्षेचा ऑनलाइन निकाल उद्या, मंगळवार दि. २८ मे रोजी दुपारी १ वाजता जाहीर करण्यात येणार आहे. हा निकाल विद्यार्थ्यांना राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या अधिकृत वेबसाईट्सवर पाहता येईल.

मंडळाच्या पुढील अधिकृत संकेतस्थळांवर विद्यार्थ्यांना निकाल पाहता येणार आहे –

www.mahresult.nic.in

www.hscresult.mkcl.org

www.maharashtraeducation.com

एसएमएसद्वारे असा मिळवा निकाल

Bsnl मोबाइल ऑपरेटरद्वारे ५७७६६ या क्रमांकावर MHHSC या फॉरमॅटमध्ये एसएमएस पाठवून निकाल मिळवता येईल.

निकालानंतर लगेच दुसऱ्या दिवसापासून गुणपडताळणी आणि छायाप्रतीसाठी अर्ज करता येणार आहेत. गुणपडताळणी २९ मे ते ७ जून या कालावधीत करता येणार आहे. उत्तरपत्रिकेच्या छायाप्रतीसाठी २९ मे ते १७ जून पर्यंत अर्ज करता येईल. पुरवणी परीक्षा मागील वर्षीप्रमाणेच जुलै-ऑगस्टमध्ये होणार आहे.

अधिक वाचा : विदर्भ में सबसे गर्म रहा नागपुर, पारा पहुंचा 46.5 डिग्री पर

काँग्रेस-राष्ट्रवादीमुळेच आमच्या उमेदवारांचा पराभव : आंबेडकर

नागपूर : लोकसभा निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीचे उमेदवार पडल्याची चर्चा असतानाच वंचित आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीमुळेच त्यांचे उमेदवार पराभूत झाल्याचा दावा केला आहे. लोकसभा निवडणुकीत वंचितच्या उमेदवारांनी चांगली कामगिरी केल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं.

विदर्श, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यात वंचितच्या उमेदवारांना घसघशीत मतं मिळाली आहेत. अनेक ठिकाणी आमचे उमेदवार विजयाच्या जवळ पोहोचले होते. मात्र काँग्रेस-राष्ट्रवादीने आमची मतं खाल्ल्याने आमचे उमेदवार पराभूत झाले. मुंबईत आम्हाला जास्त मतं खेचता आली नाही. आम्ही मुंबईत प्रचारात कमी पडलो हे खरं आहे. पण, विधानसभेत असं होणार नाही, असं प्रकाश आंबेडकर यांनी स्पष्ट केलं.

आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीला आम्ही लागलो आहोत. भारिप-बहुजन महासंघ, एमआयएम आणि जनता दल मिळून वंचित बहुजन आघाडीच्या बॅनरखाली विधानसभा लढवेल. आम्ही महाराष्ट्रात कमीत कमी ५५ जागांवर विजय मिळवू, असंही ते म्हणाले. काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण आणि राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील विधानसभा निवडणुकीत आघाडी करण्यासाठी तुमच्याशी चर्चा करणार आहेत, त्याबाबत तुमचं काय मत आहे? असा सवाल केला असता, ज्यांची नावं तुम्ही घेत आहात, त्यांची त्यांच्या पक्षात कोणीच दखल घेत नाहीत. ते आमच्याशी काय चर्चा करणार? असा प्रतिसवाल आंबेडकरांनी केला. राष्ट्रीय राजकारणात काँग्रेस मागे पडली आहे. आगामी काळातही हेच चित्र असेल. पण तरीही काँग्रेस दुसऱ्या पक्षांना पुढे येऊ देत नाही. आम्ही राष्ट्रीय राजकारणात असतो तर भाजपला नाकीनऊ आणले असते, असंही त्यांनी सांगितलं.

काँग्रेस चोरांचा पक्ष

भाजपची बी टीम म्हणून तुमच्यावर काँग्रेसकडून आरोप केला जातोय? असा प्रश्न आंबेडकरांना विचारण्यात आला. त्यावर आम्ही भाजपची बी टीम नाही. हा आमच्याबद्दल काँग्रेस-राष्ट्रवादीने चालविलेला अपप्रचार आहे. कारण काँग्रेस स्वत:च चोरांचा पक्ष आहे. आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीसोबतही नाही आणि भाजप-शिवसेनेसोबतही नाही. या निवडणुकीतील काँग्रेसची भूमिका अत्यंत धोकादायक होती. त्यामुळेच आम्ही या निवडणुकीत आमचं अस्तित्व दाखवून दिलंय आणि येणाऱ्या निवडणुकीच्याही कामाला लागलोय, असं आंबेडकर म्हणाले.

अधिक वाचा : महापालिकेतर्फे गोरेवाडा तलाव परिसरात स्वच्छतेचा जागर, महापौरांसह स्वयंसेवी संस्थेचे तलाव परिसरात श्रमदान

महापालिकेतर्फे गोरेवाडा तलाव परिसरात स्वच्छतेचा जागर, महापौरांसह स्वयंसेवी संस्थेचे तलाव परिसरात श्रमदान

नागपूर : नागपूर महानगरपालिका आणि पर्यावरण स्वयंसेवी संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने रविवारी गोरेवाडा तलाव स्वच्छता मोहिम राबविण्यात आली. या स्वच्छता मोहिमेमध्ये महापौर नंदा जिचकार व नगरसेवक हरिश ग्वालबंशी यांच्यासह गोरेवाडा जंगल ट्रेकर्स, आय क्लिन, पर्यावरण प्रेरणा विदर्भ, स्वच्छ असोसिएशन या स्वयंसेवी संस्थेच्या कार्यकर्त्यांनी श्रमदान केले.

नागपूर महानगरपालिकेद्वारे तलाव स्वच्छता अभियान मोठ्या प्रमाणावर राबविण्यात येते. यावर्षीही हे तलाव स्वच्छता अभियान सुरू करण्यात आले आहे. या स्वच्छता अभियानामध्ये सर्व स्वयंसेवी संस्थांनी सहभाग घेण्याचे आवाहन मनपातर्फे करण्यात आले आहे. गोरेवाडा तलाव परिसरातील काही स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेऊन तलाव परिसर स्वच्छ करण्याचा पुढाकार घेतला आहे. यामध्ये स्वच्छ असोसिएशनच्या अनसूया छाब्रानी, शरद पालीवाल, दिलीप तभाने, प्रशांत कडू आणि मेअर इनोव्हेशन अवार्डची संपूर्ण चमू सहभागी होती.

यावेळी महापौर नंदा जिचकार यांनी तलाव परिसरातील ट्रॅकची पाहणी केली. तलाव स्वच्छ ठेवण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी पुढाकार घ्यायला हवा. तलावात व सभोवतालच्या परिसरात कचरा होणार नाही याची प्रत्येकानी काळजी घ्यायला हवी. आपणही कचरा टाकू नये व इतरांना टाकू देऊ नये, असा सल्ला महापौरांनी यावेळी दिला. तलाव परिसरानंतर महापौर नंदा जिचकार यांनी फेण्ड्स कॉलनीमध्ये जाऊन स्वच्छता मोहिम राबविली. यावेळी त्यांनी जागृती कॉलनीमधील अमृत की खेती या प्रकल्पाला भेट दिली. यावेळी महापौर नंदा जिचकार यांच्यासह त्यांचे पती शरद जिचकार प्रामुख्याने उपस्थित होते.

या स्वच्छता अभियानामध्ये योगेश अनेजानी, तुषार पांडे, वंदना मुजुमदार, संदीप अग्रवाल, आदीत्य पाठक, रूपेंद्र नंदा, अलका कुशवाह, अरविंद गावंडे यांच्यासह परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

अधिक वाचा : नारा घाट के पास झोपड़पट्टी में भीषण अग्निकांड, 6 गैस सिलेंडर फटे, 11 झोपड़ियां खाक

नारा घाट के पास झोपड़पट्टी में भीषण अग्निकांड, 6 गैस सिलेंडर फटे, 11 झोपड़ियां खाक

नागपुर : गर्मी के इस मौसम में जरीपटका थाने से कुछ दूरी पर नारा घाट के पास झोपडपट्टी में आग लगने से 11 झोपडियां जलकर खाक हो गईं। प्रत्यक्षदर्शियों के अनुसार घटना के दौरान बस्ती के लोगों ने एक मकान के अंदर आग के बीच फंसे दो बच्चों को बाहर निकाला।

आग लगने के बाद 6 गैस सिलेंडरों में विस्फोट होने से आग तेजी से फैल गई। इस झोपड़पट्टी में अधिकांशत: मजदूर वर्ग के लोग रहते हैं। घटना के समय कुछ परिवार मकानों काे ताला बंद कर मजदूरी करने चले गए थे। कुछ लोगों के बच्चे घर में खेल रहे थे। आग में गहने, नकदी, दस्तावेज, कपड़े, अनाज सहित सबकुछ जलकर खाक हो गया। आग बस्ती के अंदर गीता इंगले की झोपड़ी से लगी।

चर्चा है कि झोपड़ी में बिजली से हीटर का उपयोग कर पानी गर्म किया जा रहा था, जिससे आग लग गई। पश्चात आग तेजी से फैली और देखते ही देखते 11 झोपडीया आग ने अपनी चपेट में ले लिया और जलकर खाक हो गईं। घर से मजदूरी करने के लिए निकले मजदूरों को जब उनके घर में आग लगने की जानकारी मिली, तो वह काम छोड़ अपने घर की ओर दौड़ पड़े, लेकिन उनके पहुंचने से पहले वहां पुलिस और दमकल विभाग के कर्मचारी पहुंच चुके थे। इस बस्ती में सैकड़ों झोपड़े हैं।झोपड़पट्टियों तक सड़क होने से जल्द दमकल विभाग ने मौके पर पहुंचकर आग पर काबू पा लिया।

और पढिये : विदर्भ में सबसे गर्म रहा नागपुर, पारा पहुंचा 46.5 डिग्री पर

विदर्भ में सबसे गर्म रहा नागपुर, पारा पहुंचा 46.5 डिग्री पर

नागपुर : नवतपा के दूसरे दिन रविवार को विदर्भ में नागपुर सबसे गर्म रहा। नागपुर व पडोसी जिले वर्धा का अधिकतम तापमान 46.5 डिग्री रहा। पारे ने उछाल मारा और  इस सीजन का नागपुर का यह सबसे ज्यादा तापमान है। नागपुर में न्यूनतम तापमान 30.2 डिग्री रहा। पिछले 20 दिनों से गर्म चल रहे चंद्रपुर को आज नागपुर ने पिछे छोड़ दिया।

मौसम विभाग के अनुसार सूरज की किरणों के सीधे पड़ने से नागपुर समेत विदर्भ में भयंकर गर्मी पड़ रही है। रविवार को नागपुर इस सीजन का सबसे गर्म दिन रहा और अगले कुछ दिनों तक पारा इसके आस पास ही रहने की संभावना है। नागपुर समेत पूरे विदर्भ में पारे का आग उगलना जारी रहेगा। तपती धूप में कुछ पल के लिए आसमान में बादल छाने से फौरी राहत तो मिलती है, लेकिन तापमान में कमी आने की संभावना नजर नहीं आ रही।

तेज धूप से स्थानीय स्तर पर मौसम में परिवर्तन होकर अगर हल्कि बारिश हो जाए तो पारे में गिरावट आ सकती है। स्थानीय स्तर पर होनेवाले परिवर्तन की भविष्यवाणी नहीं की जा सकती। सोमवार को तापमान 46 डिग्री के आस पास रहने व आंशिक रूप से बादल छाए रहने की संभावना है। बादल छाए रहने के बावजूद हल्कि बारिश होने की संभावना नहीं है। अगले कुछ दिनों तक विशेष सतर्कता बरतने की सलाह दी जा रही है। पिछले 20 दिनों से सबसे गर्म चल रहे चंद्रपुर का तापमान रविवार को गिरकर 46.2 डिग्री रहा। नवतपा में लू लगने की संभावना बढ़ जाती है। नवतपा वैसे तो 3 जून तक रहेगा, लेकिन हल्कि बारिश होने पर तापमान में कमी आ सकती है।

और पढिये : राम मंदिरासाठी संघ आग्रही; नव्या सरकारकडून अपेक्षा

 

राम मंदिरासाठी संघ आग्रही; नव्या सरकारकडून अपेक्षा

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पार्टीने केंद्रात स्पष्ट बहुमत प्राप्त केल्याने राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या नव्या सरकारकडून असलेल्या अपेक्षा आता वाढल्या आहेत. राष्ट्रीय लोकतांत्रिक आघाडीच्या नावाने सरकार स्थापन होत असले तरीही भाजपकडे असलेल्या ३०३ खासदारांच्या पाठबळावर जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० आणि अयोध्येतील राम मंदिर यासारखे प्रलंबित असणारे मुद्दे आता निकाली निघतील, अशी अपेक्षा संघ स्वयंसेवकांकडून व्यक्त होत आहे.

अयोध्येतील राम मंदिर निर्माणासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आता आग्रही होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. सुप्रीम कोर्टाने राम मंदिर निर्माणाचा मुद्यावर सहमतीने तोडगा काढावा, असा आदेश दिला आहे. त्यासाठी मध्यस्थही नियुक्त केले आहेत. मध्यस्थांकडूनही जर तोडगा काढण्यात आला नाही तर बहुमत प्राप्त केलेल्या भाजप सरकारला अध्यादेश काढण्यासाठी संघ परिवाराकडून बाध्य करण्यात येईल, अशी शक्यता राजकीय गोटातून व्यक्त होत आहे.

देशात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहण्यापूर्वी संघ परिवाराकडून राम मंदिराचे बांधकाम सुरू करण्याच्या मागणीसाठी हुंकार सभा घेण्यात आल्या होत्या. त्या सभांमध्ये सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांनी राम मंदिरासाठी प्रदीर्घ प्रतीक्षा केली असून, केंद्र सरकारने त्यावर आता अध्यादेश काढावा, अशी थेट मागणी केली होती. परंतु, त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सदर प्रकरणावर न्यायालयीन आदेशाचे पालन करण्यात येईल, असे नमूद केले होते. तर भाजपाने २०१९ च्या जाहीरनाम्यातही न्यायालयीन निर्णयाच्या अधीन राहून केंद्र सरकार राम मंदिर निर्माणासाठी आवश्यक असणारे निर्णय घेईल, असे नमूद केले होते.

दरम्यान, देशातील जनतेने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना अभूतपूर्व असे यश दिले आहे. त्यामुळे संघ परिवाराकडूनही आता केंद्र सरकारकडून राम मंदिर निर्माणासाठी अंतिम तोडगा काढण्याबाबत दबाव टाकण्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यासोबतच काश्मीरचा प्रश्न कायमचा सोडवण्यासाठी राज्य घटनेतील कलम ३७०देखील रद्द करण्याची मागणी जोरकसपणे मांडण्यात येईल. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत येत्या १९ तारखेला संघ प्रशिक्षण वर्गाच्या समारोपाला स्वयंसेवकांना संबोधित करणार आहेत. त्यावेळी संघाच्या केंद्र सरकारकडून असणाऱ्या अपेक्षा परखडपणे मांडण्यात येण्याची संभावना आहे. त्यात राम मंदिर, कलम ३७०, परराष्ट्र धोरण आणि आर्थिक सुधारणांबाबतही सरसंघचालकांकडून अपेक्षा व्यक्त होण्याची शक्यता आहे.

अधिक वाचा : नागपूरमध्ये नभी खेळ रंगला एअरोमॉडेलिंगचा

नागपूरमध्ये नभी खेळ रंगला एअरोमॉडेलिंगचा

नागपूर : लहानग्यांच्या विश्वात हक्काचे स्थान निर्माण केलेले विमान म्हणजे कायमच उत्सुकतेचा विषय. विमान कसे बनते, इथपासून तर कसे उडतेपर्यंतच्या सर्वच गोष्टी चिमुकल्यांसह मोठ्यानांही भुरळ घालत असतात. विमान आणि त्यासंबंधीची उत्सुकता रविवारी क्षणोक्षणी मानकापुरातील विभागीय क्रीडा संकुलात जाणवली. निमित्त होते एअरोमॉडलर्स असोसिएशन आणि एअरोव्हिजन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित एअरोमॉडेलिंग शोचे!

‘विमानाचा शोध कुणी लावला,’ असे विचारल्यानंतर राइट बंधू असे नाव आपल्या तोंडावर सहजपणे येते. पण, राइट बंधूच्या संशोधनापूर्वी अस्तित्वात आलेल्या एअरोमॉडेलिंगला अद्याप गांभीर्याने घेण्यात आलेले नाही. लोकांमध्ये एअरोमॉडेलिंग काय आहे, हे समजून घ्यावे, त्याबद्दलची उत्सुकता वाढावी, या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या शोमध्ये देशातील वजनाने सर्वांत हलके तसेच सर्वांत मोठे एअरोमॉडेल उडविण्याचा विक्रम करण्यात आला. शहरातील डॉ. राजेश जोशी यांनी तयार केलेल्या ‘पेनी प्लेन’चे यशस्वी उड्डाण करण्यात आले.

केवळ तीन ग्रॅमचे रबर पॉवर्ड फ्री फ्लाइट एअरो मॉडेल साकारण्यासाठी त्यांनी बालसा लाकडाच्या २ मिमी. अशा अतिशय पातळ काड्यांचा वापर केला आहे तसेच अतिशय पातळ अशा मायलार फिल्मचा पखांच्या कव्हरिंगसाठी वापर केला असून. खास प्रकारचे १.५ मिमी.चे अतिशय लवचिक असे रबरदेखील वापरले आहे. साडेतीन ग्रॅमचा या पेनी प्लेनला कुठलेही इंजिन नसून रबरच्या माध्यमातून ते उडते. त्याचा आकार १८ बाय २० इंच आहे. या एअरोमॉडेलने १.३ मिनिटांचे उड्डाण यशस्वीरित्या केले. याशिवाय गोवा येथून आलेल्या कमांडर (निवृत्त) टी. आर. अनंत नारायणन यांनी तयार केलेल्या पेनी प्लेनने १ मिनिट २९ सेकंदांचे उड्डाण केले.

संपूर्ण शोमध्ये आकर्षणबिंदू ठरला तो रोहित डे या युवकाने बनवलेले सर्वांत मोठ्या आकाराचे एअरोमॉडेल. १.५ मीटर आकार आणि १ किलोग्रॅम वजनाचे एअरोमॉडेल बीएससी अंतिम वर्षाला असलेल्या रोहितने तयार केले आहे. आऊटडोअर स्वरुपाचे हे मॉडेल पहिल्यांदा इनडोअर स्टेडियममध्ये उडविण्यात आले.

एकाच ठिकाणी तीन वेगवेगळ्या प्रकारचे एअरोमॉडेल उडविण्याचा विक्रम यावेळी करण्यात आला. कार्यक्रमाला एअरोमॉडेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष ओ. डी. शर्मा प्रामुख्याने उपस्थित होते. शोला उपस्थित शालेय विद्यार्थ्यांनी एअरोमॉडेलचे तंत्र, प्रकार आदींबाबत माहिती जाणून घेतली.

अधिक वाचा : नागपूरः संघ वर्गाच्या समारोपाला रतन टाटांची हजेरी !

नागपूरः संघ वर्गाच्या समारोपाला रतन टाटांची हजेरी !

नागपूर : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या तृतीय वर्ष संघ शिक्षा प्रशिक्षण वर्गाच्या समारोपाला प्रसिद्ध उद्योगपती व टाटा समूहाचे अध्यक्ष रतन टाटा प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. प्रशिक्षण वर्गाच्या समारोपाला समाजातील प्रतिष्ठातांना आमंत्रित करण्याची प्रथा आहे. त्यात प्रथमच उद्योगपती रतन टाटा यांना आमंत्रित करण्यात येत असल्याची माहिती संघातील सूत्रांनी दिली.

गेल्या प्रशिक्षण वर्गाच्या समारोपाला माजी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांना आमंत्रित करण्यात आले होते. त्यानंतर देशातील राजकीय वातावरण तापले होते. काँग्रेसकडूनच प्रणव मुखर्जी यांच्यावर टीका झाली होती. परंतु, प्रणव मुखर्जी यांनी टीकेनंतरही संघस्थानावर हजेरी लावली होती. इतकेच नव्हेतर त्यांनी संघ अत्यंत जवळून अनुभवला होता. संघ विचारधारेच्या विरोधातील मते असतानाही माजी राष्ट्रपती मुखर्जी यांनी संघस्थानावर येऊन त्यांची राष्ट्रवादाची मते परखडपणे मांडली होती. त्यामुळेच यंदा प्रशिक्षण वर्गाच्या समारोपाला कोणते अतिथी येणार, त्याबाबत उत्सुकता निर्माण झाली.

दरम्यान, संघाच्या तृतीय वर्ष प्रशिक्षण वर्गासाठी देशभरातून ८२५ स्वयंसेवक सहभागी झाले आहेत. त्या प्रशिक्षणाचा समारोप १६ मे रोजी होत असून, त्या समारोपाला उपस्थित राहण्याचे निमंत्रण उद्योगपती रतन टाटा यांना देण्यात आले आहे. त्यांनी अद्याप त्या निमंत्रणाचा स्वीकार केला नसला तरीही येत्या काही दिवसांत त्यांच्याकडून सकारात्मक प्रतिसाद येईल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

केंद्रात पुन्हा एकदा मोदी सरकार स्थापन होत असल्याने स्वयंसेवकांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे. केंद्रात बहुमताचे सरकार स्थापन करण्यात भाजपला यश आले आहे. सरसंघचालक डॉ. मोहन भागवत हे लोकसभा निवडणुकीच्या निकालानंतर पहिल्यांदाच जाहीर भाषण करणार आहेत. त्यामुळे सरसंघचालक डॉ. भागवत यांच्या भाषणाकडेही देशाचे लक्ष लागले आहे.

उद्योगपती रतन टाटा यांच्यासाठी संघ हा नवखा नाही. यापूर्वी १८ एप्रिल रोजी रतन टाटा यांनी नागपुरातील संघ मुख्यालयात सरसंघचालक डॉ. मोहन भागवत यांची भेट घेतली होती. त्यावेळी ही भेट अतिशय गोपनीय ठेवण्यात आली होती. तर त्याआधी २८ डिसेंबर २०१६ रोजीदेखील रतन टाटा संघ मुख्यालयात आले होते. याशिवाय रतन टाटा हे सरसंघचालकांसोबत मुंबईतील एक कार्यक्रमातदेखील उपस्थित होते.

अधिक वाचा : राहुल गांधी यांचा राजीनामा कार्यकारिणीने फेटाळला

राहुल गांधी यांचा राजीनामा कार्यकारिणीने फेटाळला

Rahul Gandhi

नागपूर : काँग्रेसच्या राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत आज अध्यक्ष राहुल गांधी यांनी राजीनामा सादर केला मात्र कार्यकारिणीने हा राजीनामा एकमताने फेटाळून लावला. काँग्रेससाठी हा आव्हानात्मक काळ आहे आणि अशावेळी आपल्या नेतृत्वाची पक्षाला नितांत गरज आहे, असे नमूद करत राहुल यांनीच पक्षाध्यक्षपदी कायम राहावे, असा आग्रह कार्यकारिणीने केला.

कार्यकारिणीच्या बैठकीनंतर झालेल्या पत्रकार परिषदेत काँग्रेस प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी याबाबत माहिती दिली. देशातील जनतेने जो कौल दिला आहे त्याचा काँग्रेस आदर करत आहे. पक्षावर देशातील १२ कोटीपेक्षाही अधिक मतदारांनी विश्वास व्यक्त केला असून त्यांचे आम्ही आभार मानत आहोत, असे सुरजेवाला पुढे म्हणाले.

लोकसभा निवडणुकीच्या निकालांवर आज चिंतन करण्यात आलं. त्याअंती पक्षाच्या रचनेत मोठ्या प्रमाणात बदल करण्यावर एकमत झालं असून त्याचे सर्वाधिकार राहुल यांच्याकडे देण्याचा निर्णय कार्यकारिणीत घेण्यात आल्याचेही सुरजेवाला यांनी सांगितले. संसदेत एक सकारात्मक व जबाबदार विरोधी पक्षाची भूमिका आम्ही निभावू, असेही यावेळी नमूद करण्यात आले.

बैठकीत काय घडलं ?

लोकसभा निवडणुका पक्षाने माझ्या नेतृत्वाखाली लढल्या. त्यामुळे या पराभवास मीच जबाबदार असून त्यासाठी मी माझ्या पदाचा राजीनामा देत असल्याचे राहुल यांनी बैठकीत सांगितले. त्यावर माजी पंतप्रधान मनमोहन सिंग, सोनिया गांधी आणि प्रियांका गांधी यांनी राहुल यांची मनधरणी केली व राजीनामा मागे घेण्याचा आग्रह धरला. विशेषत: मनमोहन यांनी राहुल यांना राजीनाम्याचा आपण विचारच करू नये, असे सांगितले. निवडणुकीत हार-जीत ही असतेच पण त्यापुढे जाऊन पक्षाला आपल्या नेतृत्वाची गरज आहे. आपल्याशिवाय पक्षाकडे दुसरा कोणताही पर्याय नाही, असे मनमोहन यांनी सांगितले. इंदिरा गांधी आणि संजय गांधी यांनाही पराभव पाहावा लागला होता मात्र, त्यांच्याच नेतृत्वाखाली पक्षाने पुन्हा यश पाहिलं, असा दाखलाही मनमोहन यांनी दिला.

अधिक वाचा : AICTE reduces direct quota for diploma students

AICTE reduces direct quota for diploma students

Nagpur : The All India Council for Technical Education (AICTE) has reduced the lateral quota of direct admission to second-year engineering courses for students completing diploma course. Earlier, the quota was of 20 per cent which has been reduced to half. It means only 10% of the approved seats from the upcoming academic year (2019-20) would be filled in second year engineering by diploma students.

There are three major courses under Technical education. They are engineering and technology, pharmacy and MCA. The decision of reduction would be applicable to all these three courses. Of course, this decision received not-so-good reaction from all the sectors.

Students who are pursuing diploma engineering courses with a hope to get admissions to direct second year engineering, called as lateral quota felt, the rule should be implemented from the academic year 2022-23. In 2022-23, the present students would be able to take admissions and new students would be aware of the new and would be ready to face the situation.

One top officer in Department of Technical Education (DTE) said, “Already we are facing problems of vacancy in Diploma institutes. We try to convince the students that if they opt for diploma courses they would get direct admission to second year engineering where they need not appear in Common Entrance Test. Now with the decision of reducing the quota we became helpless.”

Dr Anil Sahastrabudhe, Chairman of AICTE said, “There are more vacant seats of first year engineering over and above these 10 per cent seats available for direct second year admission of diploma students than the number of diploma students passing out each year. Why should we bother about 10 per cent? There are 50 per cent vacant seats of first year available for direct second year admission plus 10 per cent supernumerary seats over and above near 7 lakh vacant seats.” He also made clear several states including Maharashtra had demanded to cut the quota so it was done. Maharashtra has 729 diploma institutes with intake capacity of 1,55,302. Last year, nearly 90,000 seats remained vacant.

Also Read : अल्पवयीन दुचाकीचोर पोलिसांच्या जाळ्यात

अल्पवयीन दुचाकीचोर पोलिसांच्या जाळ्यात

नागपूर : मौज मजेसाठी मोटारसायकलची चोरी करणाऱ्या अल्पवयीन तरुणास गुन्हे शाखेच्या पथकाने सापळा रचून शुक्रवारी अटक केली. या अल्पवयीन मुलाने शहरातून सहा मोटारसायलची चोरी केली होती. त्या सगळ्या दुचाकीही पोलिसांनी ताब्यात घेतल्या.

मानेवाडा येथील पराग अशोक उतलेवार हे काही कामानिमित्त आपल्या दुचाकीने इसासनी भागातील लता मंगेशकर रुग्णालयात गेले होते. पार्किंगमध्ये गाडी लावून ते कामाला गेले असता एका अल्पवयीन चोरट्याने त्यांची एम. एच. ३१-बी डब्ल्यू ७३०९ ही दुचाकी चोरून नेली. याबाबत पराग यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल करीत तपास सुरू केला. या घडामोडीत अशाच क्रमांकाची एक दुचाकी हिंगणा एमआयडीसीच्या गस्त पथकाला दिसली. त्यांनी अल्पवयीन मुलावर पाळत ठेवून त्याचा पाठलाग करीत त्याला ताब्यात घेतले.

गुन्हे शाखेचे अतिरिक्त पोलिस आयुक्त नीलेश भरणे, सहाय्यक पोलिस आयुक्त सुधीर नंदनवार यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा रचण्यात आला. त्याला ताब्यात घेतल्यानंतर चौकशी केली असता मुलाने शहरातून आणखी मोटारसायकल चोरल्याचे कबूल केले. मौजमजेसाठी हा अल्पवयीन मुलगा चोरलेल्या मोटारसायकल तो एमआयडीसी परिसरात लपवून ठेवत असल्याचे त्याने कबूल केले. पोलिसांनी त्याच्याकडून एक लाल रंगाची पल्सर, टिव्हिएस स्टार मोपेड, एक हिरोहोंडा स्प्लेंडर अशा सहा दुचाकी जप्त केल्या. या कारवाईसाठी पोलिस निरीक्षक संतोष खांडेक, सहाय्यक पोलिस निरीक्षक उल्हास भुसारी, प्रशांत चौगुले, राजकुमार देशमुख, श्रीनिवास मिश्रा, वसंता चौरे, सुनिल चौधरी, नरेश रेवतकर, सुरेश ठाकूर, रवींद्र बाराई, राजेश डेनगुरिया, राहुल इंगोले, मंगेश मडावी आदींनी सहकार्य केले.

अधिक वाचा : मोदी सरकारचा शपथविधी ३० मे रोजी

मोदी सरकारचा शपथविधी ३० मे रोजी

नागपूर : लोकसभा निवडणुकीत भाजपने नोंदविलेल्या अभूतपूर्व आणि ऐतिहासिक विजयानंतर केंद्रात सरकार स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे. आज, शनिवारी सायंकाळी ५ वाजता संसदेच्या केंद्रीय सभागृहात भाजपच्या तसेच राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या संसदीय पक्षाची बैठक होत आहे. या बैठकीत पंतप्रधानपदासाठी नरेंद्र मोदी यांच्या नावावर शिक्कामोर्तब करण्यात येईल. बैठकीनंतर लगेचच मोदी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन सरकार स्थापन करण्यासाठी दावा करण्याची शक्यता आहे. मोदी सरकारचा शपथविधी ३० मे रोजी होणार आहे.

केंद्रात पूर्ण बहुमताने सलग दुसऱ्यांदा सत्तेत आलेल्या भाजप-रालोआच्या या बैठकीला शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, लोजपाचे अध्यक्ष रामविलास पासवान, अकाली दलाचे नेते सुखबीरसिंह बादल आदी नेते उपस्थित राहणार आहेत. मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रीय मंत्रिमंडळात सदस्यांच्या समावेशासाठी तसेच त्यांना देण्यात येणाऱ्या खात्यांविषयी चर्चा करण्यासाठी भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा आज, शनिवारी आणि उद्या, रविवारी रालोआच्या नेत्यांशी स्वतंत्रपणे भेटणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. पंतप्रधान मोदी यांनी सर्व खासदारांना पुढील शंभर दिवसांचा कार्यक्रम निश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत. मागच्या पाच वर्षांमध्ये अपूर्ण राहिलेल्या कामांना प्राधान्याने पूर्ण करण्यावर भाजपने भर देण्याचे ठरविले आहे.

सायंकाळी पंतप्रधान मोदी यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळाची शेवटची बैठक होऊन त्यात सोळावी लोकसभा विसर्जित करण्याच्या शिफारसीचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसार मोदी यांनी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांची भेट घेऊन पंतप्रधानपदाचा राजीनामा देण्याचा उपचार पूर्ण केला आणि नवे सरकार स्थापन होईपर्यंत राष्ट्रपतींनी मोदींना काळजीवाहू पंतप्रधान म्हणून काम करण्याचा आग्रह केला.

आडवाणी, जोशींचे आशीर्वाद

पंतप्रधान मोदी आणि भाजपाध्यक्ष अमित शहा यांनी शनिवारी सकाळी भाजपचे बुजुर्ग नेते लालकृष्ण अडवाणी आणि डॉ. मुरली मनोहर जोशी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांचे चरणस्पर्श करत आशीर्वाद घेतले. यावेळी जोशी यांनी मोदींना आग्रहाने पेढाही भरवला.

अधिक वाचा : बसपा उमेदवार मोहम्मद जमालांची पक्षातून हकालपट्टी

बसपा उमेदवार मोहम्मद जमालांची पक्षातून हकालपट्टी

नागपूर : बसपाने नागपूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार व मनपातील गटनेते मोहम्मद जमालसह पक्षाचे प्रदेश सचिव नागोराव जयकर यांच्यासह सोलापूरचे उमेदवार तसेच औरंगाबाद व सोलापूर महापालिकेतील प्रत्येकी एक नगरसेवकांस मतमोजणीच्या एका दिवसानंतर तडकाफडकी पक्षातून काढल आहे. पक्षविरोधी कारवाई केल्याचा ठपका ठेवत ही कारवाई करण्यात आली आहे. पक्षाचे प्रदेश प्रभारी व राज्यसभेचे खासदार अशोक सिद्धार्थ व प्रभारी प्रमोद रैना यांनी तातडीने यासंदर्भात निर्देश दिले. त्यानुसार प्रदेशाध्यक्ष सुरेश साखरे, प्रभारी प्रा. ना. तु. खंदारे यांनी तातडीने यासंदर्भातील पत्र जारी केले. या कारवाईमुळे अनेकांच्या भुवया उंचावल्या असून, पक्षात खळबळ उडाली आहे.

मोहम्मद जमाल हे यावेळी नागपूर लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार होते. त्यांना ३१ हजारांवर मते मिळाली. पक्षाला आजवर मिळालेल्या उमेदवारांपेक्षा कमी मते मिळाली. ते पक्षाचे मनपातील गटनेतेही आहेत. ते पक्षाचे कॅडर म्हणून ओळखले जातात. त्यांच्या पत्नीही बसपाच्या गेल्यावेळी नगरसेविका होत्या. पक्षाने त्यांना यावेळी निवडणुकीच्या रिंगणात उतरविले होते. त्यांच्यासोबतच पक्षात एका दशकाहून अधिक काळ काम करणारे व विद्यमान प्रदेश सचिव नागोराव जयकर यांनाही तडकाफडकी पक्षातून बाहेरचा रस्ता दाखविण्यात आला. जयकर हे यापूर्वी जिल्हाध्यक्ष होते. या दोघांसोबतच सोलापूर लोकसभा मतदारसंघातील बसपाचे उमेदवार राहुल सरोदे यांनाही पक्षातून काढले. त्यांनी ऐन निवडणुकीतून माघार घेतली होती. औरंगाबाद महापालिकेतील बसपाचे नगरसेवक महेंद्र सोनवणे, सोलापूर मनपातील नगरसेवक आनंदा चंदनशिवे यांच्यावरही पक्षविरोधी कारवाईचा ठपका ठेवत पक्षातून काढण्यात आले.

बसपाचे उमेदवार मोहम्मद जमाल हे उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी भाजपच्या संपर्कात असल्याची जोरदार चर्चा होती. काहिंनी तर गडकरी यांच्या निवासस्थानातून बाहेर पडतानाचे त्यांचे फोटो व्हायरलही केले होते. जयकर यांची भूमिकाही संपूर्ण निवडणूक काळात संशयास्पद असल्याचे पक्षातील कार्यकर्ते सांगत होते. त्यामुळे पक्षाने निवडणुकीची प्रक्रिया पूर्ण होण्याची प्रतीक्षा केली. गुरूवारी मतमोजणी पार पडल्यानंतर शुक्रवारी यासंदर्भातील आदेश पक्षाच्या नेत्यांनी प्रदेशाध्यक्ष व प्रदेश प्रभारींना दिले. त्यानंतर जमाल, जयकरांसह एकूण पाच जणांची पक्षातून हकालपट्टी करण्यात आल्याचे पत्र प्रसिद्धीस जारी करण्यात आले.

अधिक वाचा : छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती समारंभ मंगळवारी

सेंट्रल लाफ्टर क्लब : मोदी की जीत पर सेंट्रल लाफ्टर क्लब के सदस्यों ने मनाई खुशियां

नागपुर : सेंट्रल लाफ्टर क्लब के सदस्यों ने लोकसभा चुनाव में एनडीए की जीत की खुशी में शुक्रवार सुबह जापानी गार्डन के पास पीएम मोदी के मुखौटे पहनकर पहुंचे। कुछ लोग नागपुर से फिर विजय हासिल करने वाले सांसद नितीन गडकरी के मुखौटे भी पहन रखे थे। जीत की खुशी लोगों ने नाच गाकर खुशियां मनाईं। इस अवसर पर क्लब के अध्यक्ष किशोर टुटेजा, रमेश जेठवानी, सुरेंद्र गुप्ता, नलिन मजीठिया समेत बड़ी संख्या में लोग शामिल हुए।

और पढिये : छत्रपती शिवाजी महाराज, शाहू महाराज, महात्मा फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर संयुक्त जयंती समारंभ मंगळवारी

Nagpur Weather

Nagpur
haze
38 ° C
38 °
38 °
12 %
3.6kmh
0 %
Sat
38 °
Sun
41 °
Mon
41 °
Tue
42 °
Wed
44 °

Stay connected

5,248FansLike
422FollowersFollow
500FollowersFollow
394FollowersFollow
2,380SubscribersSubscribe

Most Popular

Top 100 new year Wishes

Top 100 New Year Wishes 2023

0
Top 100 New Year Wishes 2023: If you are searching for some good wishes for the new year 2023 then you are on the...

Dhamma Chakra Pravartan Din : 15 Famous quotes by Dr. Babasaheb Ambedkar

0
Dhamma chakra Pravartan Din also known by the name of DhammaChakra Anupratan Din is a day to praise the Buddhist change of B. R....
Happy Diwali 2021

15+ Unique Happy Diwali wishes for 2022

0
Nowadays the only way through which connection is possible is the social networking site. The biggest festival in India is coming soon. Diwali is...
makar Sankranti

Top 100 best quotes, WhatsApp messages, wishes and greetings for Makar Sankranti 2024

0
Makar Sankranti Wishes : Makara Sankranti (Sankranthi) is a Hindu festival that encourages people to live in peace and harmony. Here are best quotes,...