Home Blog Page 177

नागपूर : विद्यार्थ्यांसह दोघे अपघातात ठार

Nagpur नागपूर

नागपूर : विरुद्ध दिशेने येणाऱ्या जेसीबीने मोटरसायकलला धडक दिल्याने विद्यार्थ्यासह दोघे ठार तर एक युवक जखमी झाला. ही घटना रविवारी रात्री ९ वाजताच्या सुमारास कळमन्यातील जबलपूर रिंगरोड येथे घडली.

पृथ्वीराज मनोहररराव जाधव (वय २१, रा. हाउसिंग बोर्ड, रघुजीनगर) व सुशांत नागदेवते (रा. आदिवासी कॉलनी) अशी मृतांची तर शुभम गुणवंतराव वाघ (वय २२, रा. आदिवासी कॉलनी) असे जखमीचे नाव आहे. त्याच्यावर खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. शुभमची प्रकृती चिंताजनक असल्याची माहिती आहे. पृथ्वीराज हा पॉलिटेक्निकच्या अंतिम वर्षाला शिकत होता. सुशांत हा कॅटरिंगचे काम करीत होता. रविवारी सुशांत, शुभम हे दोघे पृथ्वीराजच्या एमएच-४९- एएक्स-३२९५ या क्रमांकाच्या मोटरसायकलने रामटेक येथे दर्शनासाठी गेले. रात्री ते ट्रिपलसिट मोटरसायकलने नागपूरकडे येत होते. कळमन्यातील जबलपूर महामार्गवर एमएच-३४- एल-६६७९ या क्रमांकाचा जेसीबी यूटर्न घेत होता. अचानक जेसीबी मोटरसायकसमोर आला. मोटरसायकल जेसीबीवर आदळली. तिघेही गंभीर जखमी झाले. पृथ्वीराज व सुशांत या दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. अपघातानंतर चालक जेसीबी सोडून पसार झाला. घटनेची माहिती मिळताच कळमना पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पोलिसांनी शुभम याला खासगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले. पंचनामा करून दोघांचे मृतदेह मेयो हॉस्पिटलकडे रवाना केला. पोलिसांनी प्राणांतिक अपघाताचा गुन्हा दाखल करून जेसीबी चालकाचा शोध सुरू केला आहे.

काच फोडून जेसीबीच्या केबिनमध्ये पडला

मोटरसायकल सुशांत चालवित होता. त्याच्या मागे पृथ्वीराज व शुभम बसला होता. हा अपघात एवढा भीषण होता की मागे बसलेला शुभम हवेत उडाला. जेसीबीची काच फोडून तो केबिनमध्ये पडला, अशी माहिती आहे.

आईचा सहारा हिरावला

सुशांतच्या वडिलांचे निधन झाले आहे. त्याची आई निवृत्त परिचारिका आहे. सुशांत हा एकुलता एक मुलगा होता. त्याची आई आजारी असते. एकुलत्या एक मुलाच्या मृत्यूने आईवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याच्या आईचा सहारा हिरवल्याने हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. पृथ्वीराजचे वडील स्कूलबसचालक आहेत. त्याला दोन बहिणी आहेत. शुभम बारावीत होता. तिघांनीही रामटेकला जात असल्याचे नातेवाइकांना सांगितले नव्हते. घटनास्थळावर आढळलेल्या दस्तऐवजांवरुन तिघांची ओळख पटली.

अधिक वाचा : नागपूर : गोंदियात स्फोटके जप्त

निवडणुकीत ईव्हीएम घोटाळा ? काँग्रेस शहानिशा करणार

Rahul Gandhi

नागपूर : लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला अनपेक्षित यश मिळालं तर काँग्रेसचा दारूण पराभव झाला. आता हा पराभव काँग्रेसच्या त्रुटींमुळे झाला आहे की ईव्हीएम घोटाळ्यामुळे झाला आहे याची शहानिशा काँग्रेस करणार आहे.

लोकसभा निवडणुकांमध्ये भाजपला ३०३ तर काँग्रेसला केवळ ५२ जागा जिंकता आल्या. एकेकाळी ३०० हून अधिक जागा जिंकणाऱ्या काँग्रेसचा इतका दारूण पराभव का झाला याचं प्रत्येक मतदानकेंद्रानुसार विश्लेषण काँग्रेस करणार आहे. त्यासाठी सर्व उमेदवारांकडून निवडणूक आयोगाने दिलेला फॉर्म क्रमांक २० मागवण्यात आला आहे.

फॉर्म क्रमांक २०मध्ये प्रत्येक मतदानकेंद्रावर उमेदवाराला किती मतं मिळाली याची तपशीलवार माहिती दिली असते. प्रत्येक मतदानकेंद्रातील परिक्षेत्रात मतदानाआधी काँग्रेस सर्व्हे केला होता. त्या सर्व्हेचे निकाल आणि उमेदवाराला मिळालेली एकूण मतं याची चाचपणी काँग्रेस करणार आहे.

जर दोन्ही आकड्यांमध्ये जास्त फरक नसेल, इतर काही कारणांमुळे मतं कमी मिळाली असतील तर संघटना बळकट करण्यासाठी काँग्रेस पक्ष रणनीती आखणार आहे. पण जर या दोन आकड्यांमध्ये प्रचंड तफावत आढळल्यास संबंधित मतदानकेंद्रांवर ईव्हीएम घोटाळा तर झालेला नाही याची पडताळणी काँग्रेस पक्षाकडून केली जाणार आहे.

लोकसभा निवडणुकांच्या आधीपासूनच विविध राज्यांमध्ये ईव्हीएमनुसार होणाऱ्या मतमोजणीत घोटाळा होत असल्याचे आरोप करण्यात येत आहेत. यासंदर्भात सर्व विरोधी पक्षांनी सर्वोच्च न्यायालयात एक याचिकाही दाखल केली होती. ईव्हीएम हॅक होण्याचे, ईव्हीएम घोटाळ्याचे आरोप निवडणूक आयोगाने वारंवार फेटाळले आहेत.

राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनीही लोकसभा निवडणुकांमध्ये ईव्हीएम घोटाळा झाला असल्याचा अंदाज व्यक्त केला आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर आता काँग्रेसच्या तपासणीत काय स्पष्ट होतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

अधिक वाचा : नागपूर : गोंदियात स्फोटके जप्त

नागपूर : गोंदियात स्फोटके जप्त

नागपूर : सालेकसा तालुक्यातील टेकाटोला ते मुरकुटडोह रस्त्यावरील पुलाखाली माओवाद्यांनी घातपाताचा कट रचून स्फोटके पेरून ठेवली होती. गुप्त माहितीवरून पोलिसांनी परिसरामध्ये शोध मोहीम राबवून माओवाद्यांचा घातपाताचा कट उधळून लावला. पुलाखाली पेरलेली स्फोटके पोलिसांनी जप्त केली आहे.

‘सालेकसा हद्दीत घातपात घडविण्यासाठी आयईडी पेरून ठेवला आहे,’ अशी माहिती पोलिस अधीक्षक विनिता साहू यांना मिळाली होती. त्यांनी आमगाव येथील उपविभागीय पोलिस अधिकारी जालीदर नालकुल यांना परिसरात शोध मोहीम राबविण्याचे आदेश दिले. त्यानुसार ‘सी-६०’ पथक व बॉम्बशोधक व नाशक पथकासह सर्च ऑपरेशन राबविण्यात आले. या ऑपरेशनदरम्यान, पोलिसांना टेकाटोला ते मुरकुटडोह क्रमांक ३ कडे जाणाऱ्या रस्त्यावरील पुलाखाली एक जर्मनचा डबा व काही दूरपर्यंत इलेक्ट्रीक वायर आढळले. या वरून बॉम्ब असल्याची खात्री झाली. पेरुन ठेवलेले बॉम्ब त्यांनी निकामी केले.

घटनास्थळी एक जर्मन डब्बा १० किलो क्षमतेचा असून, त्यामध्ये सिल्वर रंगाचा दाणेदार स्फोटकपदार्थ मिळून आला. त्यामध्ये खिळे व काचेचे तुकडे मिश्रित केलेले होते. एक नग जिलेटीन स्टीक सुपर पावर ९० सोलर १२५ ग्रॅम, एक नग इलेक्ट्रीक डेटानेटर, काळ्या रंगाचा १३५ फूट लांब वायर, व १७५ फूट लांब हिरव्या पांढऱ्या रंगाचा वायर असे, स्फोटसाहित्य पोलिसांनी जप्त केले आहे.

या कारवाईने बॉम्बशोधक व नाशक पथकाला यश आले असून, माओवाद्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहेत. ही कारवाई उपविभागीय पोलिस अधिकारी जालीदर नालकुल, देवरीचे उपविभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले, सालेकसाचे ठाणेदार राजकुमार डुणगे, सी-६० पथक सालेकसा व बीडीडीएस पथकाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांनी बजाविली. यापूर्वी महाराष्ट्र दिनी माओवाद्यांनी गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यातील जांबुडखेडा मार्गावरील लेंडारी पुलाखाली भीषण स्फोट घडविला होता. यामध्ये १५ जवानांचा मृत्यू झाला होता.

अधिक वाचा : ‘सत्ते पे सत्ता’चा रिमेक बनणार; मुख्य भूमिकेत शाहरुख ?

‘सत्ते पे सत्ता’चा रिमेक बनणार; मुख्य भूमिकेत शाहरुख ?

shahrukh khan

नागपूर : अमिताभ बच्चन व हेमा मालिनीच्या सुपरहिट ‘सत्ते पे सत्ता’ या चित्रपटाचा रिमेक लवकरच बनणार आहे. या रिमेकमध्ये मुख्य भूमिकेत अभिनेता शाहरूख खान दिसणार असल्याची जोरदार चर्चा सध्या रंगली आहे.

बॉलिवूडमधील प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शिका व दिग्दर्शिका फराह खान या चित्रपटाचे दिग्दर्शन करणार आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, फराह खाननं ‘सत्ते पे सत्ता’ च्या रिमेकमधील मुख्य भूमिकेसाठी शाहरुखला विचारले. शाहरुखदेखील ही भूमिका साकारण्यास उत्सुक आहे. शाहरुखचे गेले काही चित्रपट फ्लॉप ठरत असल्याने तो कमबॅकसाठी एका चांगल्या स्क्रिप्टच्या शोधात आहे आणि सत्ते पे सत्तापेक्षा उत्तम स्क्रिप्ट त्याला मिळू शकत नाही असं त्याला वाटते.’

१९८२ साली प्रदर्शित झालेल्या या चित्रपटातील हेमामालिनीच्या भूमिकेसाठी फराहनं अभिनेत्री कतरिना कैफला विचारले आहे. पण कतरिना सध्या ‘भारत’ च्या प्रमोशमध्ये व्यग्र असल्याने ती त्यानंतर या ऑफरबद्दल विचार करणार असल्याची माहिती मिळाली आहे.

अधिक वाचा : दीपांती बनीं नागपुर की प्रथम साइकिल मेयर

नागपुर : चितेत उडी घेऊन युवकाची आत्महत्या

नागपूर : जळत्या चितेत उडी घेऊन ३४ वर्षीय युवकाने आत्महत्या केली. अंगावर शहारे आणणारी ही थरारक घटना शनिवारी सायंकाळी जयताळा स्मशानघाट येथे घडली. महेश मारोतीराव कोटांगळे (३४), रा. रमाबाई आंबेडकरनगर जयताळा, असे मृताचे नाव आहे.

महेश हा खासगी काम करीत होता. तो मनोरुग्ण होता. महेश हा आई-वडील, मोठे भाऊ मुकूंदा व सत्यवान यांच्यासोबत राहात होता. महेश याच्यावर डॉ. तोटे यांच्याकडे उपचार सुरू होते. शनिवारी परिसरातील पार्वताबाई या वृद्धेचे निधन झाले. सायंकाळी त्यांच्या पार्थिवावर जयताळा स्मशानघाट येथे अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांचे नातेवाइक गेले. याचवेळी महेश धावत आला आणि त्याने जळत्या चितेत उडी घेतली. येथे खेळत असलेल्या मुलांनी हे दृश्य बघितले. त्यांनी आरडा-ओरड केली. नागरिकांनी धाव घेतली. महेश याला काठीने बाहेर काढले. तोपर्यंत होरपळून महेश याचा मृत्यू झाला होता.

एका नागरिकाने महेश याचा भाऊ मुकूंदा यांना मोबाइलवर घटनेची माहिती दिली. मुकूंदा व त्यांचे अन्य नातेवाइक तेथे आले. तोपर्यंत एमआयडीसी पोलिस स्टशेनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक भारत क्षीरसागर यांच्यासह पोलिसांचा ताफाही तेथे पोहोचला होता. पोलिसांनी पंचनामा करून मृतदेह मेडिकल कॉलेज हॉस्पिटलकडे रवाना केला. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. सहायक पोलिस उपनिरीक्षक जीवलग घाटे या प्रकरणाचा तपास करीत आहेत.

पहिलीच घटना

उपराजधानीत आत्महत्येची अशाप्रकरची ही पहिलीच घटना होय. या घटनेने परिसरातील नागरिक सुन्न झाले आहेत. घटना आठवली की त्यांच्या अंगार शहारे येतात. महेश हा गत तीन दिवसांपासून स्वमग्न राहात होता. तो असे काही करेल, असे वाटले नव्हते. चक्क जळत्या चितेत उडी घेईल याची तर कल्पनाही नव्हती, असे परिसरातील नागरिक सांगतात.

महेश काकाने उडी घेतली

परिसरातील मुले घाटाजवळ क्रिकेट खेळत होती. ते खळत असतानाच अचानक महेश याने पेटत्या चितेत उडी घेतली. मुले आरडाआरेड करीत तेथून पळायला लागली. महेश काकाने उडी घेतली, महेश काकाने चितेत उडी घेतली,असे म्हणत ते वस्तीत आले. नागरिक जमा झाले. महेश काकाने चितेत उडी घेतल्याचे मुलांनी नागरिकांना सांगितले. नागरिकांनी लगेच स्मशानघाटकडे धाव घेतली. त्याला वाचविण्याचा प्रयत्न केला. परंतु तोपर्यंत उशीर झाला होता. या घटनेचा मुलांच्या मनावर परिणाम झाला असून ते अद्याप धक्क्यात आहेत.

आत्महत्या करणाऱ्या घाटावरच अंत्यसंस्कार

ज्या घाटावरील पेटत्या चितेत उडी घेऊन महेश याने आत्महत्या केली, त्याच जयताळा स्मशान घाटावर रविवारी दुपारी महेश याच्या पार्थिवावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले. महेश याच्या आत्महत्येने कोटांगळे कुटुबींयाना जबर धक्का बसला आहे.

अधिक वाचा : फिर चढ़ा पारा, 47 पर पहुंचा, नागपुर विदर्भ में टॉप पर

फिर चढ़ा पारा, 47 पर पहुंचा, नागपुर विदर्भ में टॉप पर

नागपुर : मौसम खुलने के साथ ही आसमान साफ हुआ और नागपुर का तापमान ऊपर चढ़ गया। रविवार को नागपुर 47 डिग्री तापमान के साथ विदर्भ में सबसे गर्म रहा। शनिवार शाम को हुई बारिश के कारण रात का तापमान गिरा था और न्यूनतम तापमान 26.3 डिग्री पर आ गया था।

दिन में पारा चढ़ा है, पर रात में उतरा है, इसलिए उमस बनी हुई है। मौसम विभाग के अनुसार, मौसम खुलने के कारण आसमान साफ हुआ और दिन में पारे ने जबर्दस्त उछाल मारा। 24 घंटे में अधिकतम तापमान में 3.2 डिग्री की वृद्धि हुई। न्यूनतम तापमान जरूर कम हुआ।

सोमवार को आसमान साफ रहेगा और गर्मी ज्यादा हो सकती है। बारिश होने की संभावना कम ही है। अधिकतम के साथ ही न्यूनतम तापमान भी बढ़ सकता है। सोमवार को अधिकतम तापमान 46 डिग्री रह सकता है। गर्म हवा की चूभन होगी। रविवार को नागपुर के साथ ही ब्रह्मपुरी में भी अधिकतम तापमान 47 डिग्री रहा।

दक्षिण-पश्चिम यूपी से कर्नाटक तक बनी द्रोणिका अब खत्म हो गई है। इसी कारण आसमान से बादल छंट गए और तापमान में वृद्धि हो रही है। 48 घंटे बाद तापमान में कमी आने की संभावना है।

और पढिये : दीपांती बनीं नागपुर की प्रथम साइकिल मेयर

दीपांती बनीं नागपुर की प्रथम साइकिल मेयर

नागपुर : विश्व स्तर पर साइक्लिंग को बढ़ावा देने में लगी एमस्टरडम की संस्था वीवाईसीएस की ओर से नागपुर की दीपांती को शहर की प्रथम बायसिकल मेयर घोषित किया गया। संयुक्त राष्ट्र से समर्थित यह संस्था ऐसे लोगों को यह खिताब प्रदान करती है, जो साइक्लिंग में दक्ष होने के साथ-साथ लोगों को साइिकल चलाने के लिए प्रेरित कर सके।

दीपांती नियमित रूप से लंबी दूरी तक साइक्लिंग करने वाले समूह नागपुर रॉदेनर्स की सदस्य हैं। उन्हें दो वर्ष के लिए इस खिताब से नवाजा गया है। लाेगों को साइिकल चलाने के लिए प्रेरित करने में लगी नागपुर की संस्था स्वराज्य विभिन्न कार्यक्रमों को आयोजन करती है। इसी क्रम में यह भी एक पहल है। इस अवसर पर दीपांती ने कहा कि साइकिल हर समस्या का उपाय है। इससे शहर को प्रदूषण मुक्त करने में मदद मिलेगी।

उन्होंने कहा कि आवश्यक होने पर वाहनों का उपयोग किया जाना चाहिए पर घर के आसपास जाने के लिए साइकिल का उपयोग किया जाना चाहिए। उन्होंने शहर के नागरिकों से इस मुहिम में सहसोग की भी अपील की।

और पढिये : बीडगांव में ड्रायफ्रूटस कंपनी के गोदाम में भीषण आग

बीडगांव में ड्रायफ्रूटस कंपनी के गोदाम में भीषण आग

नागपुर : कामठी तहसील के तहत आने वाले बीडगांव में ड्रायफ्रूटस कंपनी के गोदाम में भीषण आग लगने से करोड़ों रुपए का माल जलकर खाक हो गया। दमकल विभाग के 25 वाहनों ने आग पर काबू पाया। आग बुझाने के लिए गोदाम की दीवारें व शटर को भी कई जगह से तोड़ना पड़ा। इस आगजनी से बड़ी मात्रा में रखे बादाम, काजू व अन्य ड्राई फ्रूट्स जल कर खाक हो गया। दमकल विभाग ने बताया कि गोदाम के अंदर रखा काजू,बादाम व अन्य कुछ ड्रायफ्रूडस जलकर खाक हो गया। घटना बीडगांव स्थित नाकोड़ा फ्रूट के मेवा गोदाम में शनिवार को हुई।

घटना के बारे में मिली जानकारी के अनुसार बीड़गांव में नाकोड़ा ग्रुप के नाकोड़ा फ्रूट प्रोडक्ट प्राइवेट लिमिटेड एवं पार्श्वनाथ ओवरसीज के मेवा गोदाम है। पता चला है कि यह कंपनी मंजू चौधरी की है। इसके संचालक प्रवीण चौधरी और जयेश चौधरी हैं। इस कंपनी के गोदाम में 1 जून को देर रात करीब 1 से 2 बजे के बीच अचानक भीषण आग लग गई। आग पूरे गोदाम में फैल चुकी थी। इस बारे में दमकल विभाग को सूचना दी गई। सूचना मिलने पर दमकल विभाग के अधिकारी- कर्मचारी घटनास्थल पर चार दमकल वाहनों के साथ पहुंचे। दमकल कर्मियों ने आग बुझाने का कार्य शुरू कर दिया ।

आग की तीव्रता को देखते हुए घटनास्थल पर शहर और ग्रामीण क्षेत्र से वाहनों को बुलाया गया। इस बीच कंपनी के संचालक भी वहां पहुंच चुके थे। आग इतनी भयंकर थी कि उस पर काबू पाने के लिए करीब 25 घंटे लग गए। 25 घंटे के बाद बाद यह आग पूरी तरह बुझ नहीं पाई थी। रविवार की सुबह करीब 6 बजे तक आग धधक रही थी। दमकल कर्मियों ने एहतियात के तौर पर रविवार को भी दमकल वाहन वहां पर खडा कर रखा था।

कहा जा रहा है कि आग शायद शार्ट सर्किट से लगी होगी। दमकल विभाग के अधिकारियों का कहना है कि इस मामले की जांच चल रही है। गोदाम के अंदर फायर फाइटिंग की किस तरह की सुविधा थी। इस बारे में भी छानबीन जारी है। अग्निकांड से उक्त कंपनी की संपति व बडी मात्रा में रखा स्टॉक जलकर खाक हो जाने से करोड़ों रुपए का नुकसान माना जा रहा है।

और पढिये : PM मोदींना या देशात मनमानी करू देणार नाही ! : ओवेसी

PM मोदींना या देशात मनमानी करू देणार नाही ! : ओवेसी

नागपूर : मुस्लिम बांधवांनी भाजपला घाबरू नये. या देशात आम्ही भाडेकरू नाही तर समसमान भागीदार आहोत. हिंदूंइतकाच आमचाही या देशावर अधिकार आहे. धार्मिक स्वातंत्र्याचा अधिकार आम्हाला संविधानाने दिला आहे अशा शब्दात केंद्रातील भाजप सरकारवर एमआयएम प्रमुख खासदार असदुद्दिन ओवेसींनी निशाणा साधला आहे. हैदराबाद येथे मक्का मशिदीत एका जनसभेला ते संबोधित करत होते.

सार्वत्रिक निवडणुकांमध्ये ३०० हून अधिक जागा घेत भाजप विजयी झाल्यानंतर दोनच दिवसांत दिल्लीजवळील गुरुग्राम येथे एका मुस्लिम बांधवावर हल्ला करण्यात आला. अशा घटना देशातील इतर भागांमध्ये गेल्या पाच वर्षांत अनेकदा घडल्या आहेत. या पार्श्वभूमीवर केंद्रातील मोदी सरकारवर असदुद्दिन ओवेसी यांनी सडकून टीका केली. ‘मोदींना जर असं वाटत असेल की ३०० हून अधिक जागा मिळाल्यामुळे ते देशावर मनमानी करू शकतील तर तसं होणार नाही. भाजपला घाबरण्याची मुसलमानांना काहीच गरज नाही. आम्ही या देशात काही मारेकरी म्हणून राहत नाही. तर या देशात भागीदार आहोत. जर मोदी मंदिरांमध्ये जाऊ शकत असतील तर मुसलमानही मशिदीत जाऊ शकतात. तो आमचा संविधानिक अधिकार आहे.’ अल्पसंख्यांक धोक्यात येतील तेव्हा संविधानाच्या आधारे मुस्लिम बांधवांसाठी मी लढीन असा विश्वासही ओवेसींनी व्यक्त केला.

दलित-मुस्लिम एकता गरजेची

या देशात कायम वंचित राहिलेल्या दलित आणि मुस्लिम या घटकांनी एकत्र येणं गरजेचं आहे असं मत यावेळी ओवेसी यांनी व्यक्त केलं आहे. ‘या देशातील दलित आणि मुसलमानांच्या अधिकारांसाठी एमआयएम कायम लढत राहील.’ दलित-मुस्लिम एकत्र आल्यामुळेच महाराष्ट्रातील औरंगाबाद या जागेवर एमआयएम विजयी झालं आहे असंही असदुद्दिन ओवेसींनी सांगितलं आहे. यावेळी भारिप नेते प्रकाश आंबेडकर यांचा उल्लेख त्यांना मोठा भाऊ असा केला आहे.

अधिक वाचा : मोदींच्या मंत्रिमंडळात ५१ कोट्यधीश, हरसिमरत कौर सर्वात श्रीमंत

नागपूर : आपली बससाठी ‘चलो अॅप’

City Bus नागपूर Nagpur आपली बस

नागपूर : शहरात धावणाऱ्या आपली बसच्या सेवेत लवकरच ‘चलो अॅप’ सुरू होणार आहे. हे अॅप प्रत्येक प्रवाशांनी डाऊनलोड केल्यास त्यांना प्रवास करावयाच्या मार्ग व त्या मार्गावरून धावणाऱ्या बसची परिपूर्ण माहिती मिळणार आहे. शुक्रवारी परिवहन समितीच्या बैठकीत या प्रस्तावास मंजुरी प्रदान करण्यात आली. या अॅपला कार्यान्वित करण्यासाइी मनपावर कुठलाही आर्थिक भार पडणार नाही.

प्रवासी माहिती सिस्टमसाइी हे अॅप मनपातर्फे सुरू करण्यात येत आहे. झोपहोप टेक्नॉलॉजी प्रा. लिमिटेडतर्फे या अॅपची सेवा देण्यात येणार आहे. यासाठी लागणारा सर्व आर्थिक खर्च व संचलन खर्चही झोपहोपतर्फेच वहन करण्यात येणार आहे. या सेवेत खंड पडू नये व मनपाच्या व्यवस्थेमध्ये खंड पडू नये म्हणून बँक गॅरंटी देण्याचेही मान्य केले आहे. या कंपनीचे इतर कोणतेही उत्पादन मनपाला घ्यावयाचे नाही, असे बैठकीत ठरविण्यात आले. तिकिटिंग व आटोमोडेड फेअरकलेक्टिंग सिस्टम पूर्वापर सुरू असल्याने मनपाचे अंतर्गत बस वाहनताफा यावर संपूर्णपणे नियंत्रण व रिअलटाइम डाटा शहरातील नागरिकांना उपलब्ध होणार आहे.

अॅपरवर काय दिसणार ?

– प्रवाशाला अॅन्ड्राइड मोबाइल संचावर संपूर्ण शहर बसच्या मार्गाचे विवरण दिसेल.

– प्रवासी घरी बसून चलो अॅप संचालित करू शकेल.

– प्रवाशाला प्रवास करावयाच्या मार्गावरील बस थांब्याची माहिती मिळेल.

– बस थांब्यावरून जाणाऱ्या बसचे नाव टाकल्यास मार्गावरच्या बसचा क्रमांक मिळेल.

– बसला किती वेळ लागेल, भाडे किती, जागा किती उपलब्ध याचीही माहिती मिळेल.

‘वॉटर एटीएम’ची वाढती मागणी

पूर्व नागपुरातील केडीके कॉलेज व सीताबर्डी डीपी रोड येथे ‘वॉटर एटीएम’च्या यशस्वी प्रयोगानंतर आता नगरसेवकांनीही वॉटर एटीएम मागितले आहे. १०० एलपीएच नॅचरल झिओलाइट फिल्टर बेस्ड वॉटर एटीएम नंदनवन परिसरातील केडीके कॉलेजसमोरील बस स्टॉपजवळ लावण्यात आला आहे. मोरभवन येथेही एक वॉटर एटीएम लावण्यात येणार आहे. एक एटीएम १२ लाख ३ हजार ६०० रूपये किमतीचा आहे. परिवहन समितीच्या बैठकीत नगरसेविका अभिरूची राजगिरे यांनी शांतीनगर घाटाजवळील चौकात, नगरसेविका अर्चना पाठक यांनी अनंतनगर बसस्टॉप जवळ आणि नगरसेविका मनीषा धावडे यांनी छापरूनगर चौकात वॉटर एटीएमची मागणी केली. मागणीनुसार या ठिकाणी एटीएम लावण्यासाठी येणाऱ्या एकंदरीत खर्चास अर्थसंकल्पातील तरतुदीच्या अधीन राहुन मान्यता प्रदान करण्यात आली.

अधिक वाचा : मोदींच्या मंत्रिमंडळात ५१ कोट्यधीश, हरसिमरत कौर सर्वात श्रीमंत

मोदींच्या मंत्रिमंडळात ५१ कोट्यधीश, हरसिमरत कौर सर्वात श्रीमंत

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मंत्रिमंडळातील ५८ पैकी ५१ मंत्री कोट्यधीश असून पंजाबच्या हरसिमरत कौर सर्वात श्रीमंत मंत्री आहेत. मोदींच्या नवीन मंत्रिमंडळात केवळ ६ मंत्री कोट्यधीश नसून ओडिशाचे प्रताप सारंगी (संपत्ती १३ लाख ) सर्वात गरीब मंत्री ठरले आहेत. असोसिएशन फॉर डेमॉक्रेटिक रिफॉर्म्स या संस्थेने ही आकडेवारी जाहीर केली आहे.

शिरोमणी अकाली दलच्या हरसिमरत कौर यांच्याकडे तब्बल २१७ कोटींची संपत्ती आहे. त्यांच्यानंतर महाराष्ट्रातून राज्यसभा खासदार असलेले पियुष गोयल हे दुसरे सर्वात श्रीमंत मंत्री असून त्यांच्याकडे एकूण ९५ कोटींची संपत्ती आहे. या दोघांनंतर देशाचे गृहमंत्री अमित शहांचा (संपत्ती: ४० कोटी) नंबर लागतो. या कोट्यधीशांच्या यादीत पंतप्रधान नरेंद्र मोदी ४६व्या क्रमांकांवर आहेत. त्यांच्याकडे २ कोटींची संपत्ती आहे. मंत्रिमंडळातील १० मंत्री मोदींहून गरीब आहेत. मुजफ्फरनगरचे खासदार संजीव कुमार बलियान, अरुणाचल पश्चिमचे खासदार किरण रिजीजू आणि फत्तेहपूरहून खासदार असलेल्या साध्वी निरंजन ज्योती यांच्याकडे १ कोटींची संपत्ती आहे.

देबाश्री चौधरी (६१ लाख) , रामेश्वर तेली(४३ लाख) , व्ही. मुरलीधरन ( २७ लाख), कैलाश चौधरी ( २४ लाख) आणि प्रताप सारंगी (१३ लाख) हे सहाच मंत्री कोट्यधीश नाही.

अधिक वाचा : नागपुरात नेटवर्क मिळेना, फोन काही लागेना

नागपुरात नेटवर्क मिळेना, फोन काही लागेना

नागपूर : मोबाइलचे अचानक नेटवर्क जाणे, फोन सुरू असताना अचानक कट होणे, फोर-जी सेवा असली तरी नेटवर्क कमकुवत असल्यामुळे थ्री-जी वा टू-जीची सेवा मिळण्यासारखे प्रकार शुक्रवारी सकाळी ‘आयडिया’च्या ग्राहकांसोबत घडले. सुमारे अर्धा ते एक तास चाललेल्या या प्रकारामुळे ग्राहकांनी नेटवर्कवर नाराजी व्यक्त केली.

गेल्या काही महिन्यांमध्ये आयडियासह सर्व मोबाइल नेटवर्क कंपन्यांच्या सेवेमध्ये समस्या आढळून आल्या आहेत. व्होडाफोन, एअरटेल, रिलायन्स जीओ, बीएसएनएल अशा सर्वच कंपन्यांचे कॉल ड्रॉप होण्याची वारंवारता वाढली आहे. याचा फटका ग्राहकांना बसत आहे. हातात महागडा स्मार्टफोन असूनही नेटवर्क नसल्यास उपयोग काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. शुक्रवारी सकाळी दहा ते अकरा वाजतादरम्यान शहरातील आयडियाच्या ग्राहकांना मोबाइलमध्ये ‘नो नेटवर्क’ असे आढळले. नेटवर्क दर्शविणाऱ्या दांड्यादेखील मोबाइलमध्ये दिसत नव्हत्या. नेटवर्क नसल्यामुळे कॉल लावणे वा आलेला कॉल स्वीकारण्यात अडचण निर्माण झाली. डेटा कनेक्शनदेखील सुरू नव्हते. काही वेळाने केवळ डेटा कनेक्शन सुरू होते. पण, कॉल स्वीकारता वा करता येत नव्हता.

दरम्यान, शहरातील विविध भागांमधून आयडियाच्या ग्राहकांना या प्रकारच्या समस्येचा सामना करावा लागत असल्याच्या तक्रारी येऊ लागल्या. तक्रारींचा वाढता ओघ पाहता कंपनीतर्फे तांत्रिक समस्या सोडविण्यात आली. त्यानंतर नेटवर्क सुरळीत झाले.

आता नेटवर्क सुरळीत

कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, सायबर कट नावाची तांत्रिक समस्या निर्माण झाली होती. त्यामुळे ग्राहकांना नेटवर्कमध्ये अडथळा निर्माण झाला. दहा मिनिटांमध्ये संबंधित समस्या दूर करण्यात आली. आता नेटवर्कमध्ये कुठलीही अडचण नाही.

सर्वांचे हाल सारखेच

सध्याच्या काळात मोबाइलशिवाय जगणे कठीण बनले आहे, त्यामुळे नाममात्र अपवाद वगळता सर्वाकडे मोबाइल असतोच. नागरिक त्यांच्या सोईनुसार विविध मोबाइल कंपन्यांची सीमकार्ड वापरतात. मात्र, अलीकडे मोबाइल कंपन्यांच्या सदोष सेवेमुळे सर्वच कंपन्यांचे ग्राहक त्रासले आहेत. प्रत्येक मोबाइल कंपनीच्या ग्राहकाला विचारल्यानंतर काहीना काही तक्रार असल्याचे आढळून येते. बीएसएनएल ही कंपनी शासनाची आहे. मात्र, या कंपनीचे सीमकार्ड वापरणाऱ्या ग्राहकांना सर्वाधिक त्रास होत असल्याचे दिसून येत आहे. यानंतर खासगी मोबाइल नेटवर्क कंपन्यांचेही तेच हाल आहेत. कॉल ड्रॉपची समस्या सर्वाधिक असल्याची ओरड सातत्याने ग्राहकांकडून होत आहे, हे विशेष !

अधिक वाचा : नदी स्वच्छतेच्या कामाची गती वाढवून नियमित सफाई करा : महापौर नंदा जिचकार

नदी स्वच्छतेच्या कामाची गती वाढवून नियमित सफाई करा : महापौर नंदा जिचकार

नागपूर : शहरात सर्वत्र नदी स्वच्छता अभियान सुरू आहे. मात्र वस्त्यांमधून वाहणा-या नद्यांमध्ये कचरा टाकण्यात येत असल्याने तो कचरा पूलाखाली अडकतो त्यामुळे पाण्याच्या प्रवाहाला अडथळा निर्माण होतो व परिसरात दुर्गंधी पसरते. शहरात अनेक ठिकाणी अशीच स्थिती आहे. याकडे गांभीर्याने लक्ष देत पावसाळ्यामध्ये नागरिकांना कोणतिही अडचण निर्माण होउ नये यासाठी नदी स्वच्छतेच्या कामाची गती वाढवा व नियमित सफाई करा, असे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.

शहरात सुरू असलेल्या नदी स्वच्छता अभियानांतर्गत महापौर नंदा जिचकार यांनी शुक्रवारी (ता.३१) नाग नदीच्या स्वच्छतेचे निरीक्षण केले. यावेळी स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, धंतोली झोन सभापती विशाखा बांते, ज्येष्ठ नगरसेवक सुनील अग्रवाल, नगरसेविका कांता रारोकर, मनिषा अतकरे, नगरसेवक राजकुमार साहु, अधीक्षक अभियंता मनोज तालेवार, नदी स्वच्छता अभियानाचे नोडल अधिकारी डॉ. प्रदीप दासरवार, आरोग्य अधिकारी (स्वच्छता) डॉ. सुनील कांबळे, कार्यकारी अभियंता अनिरुद्ध चौगंजकर, कार्यकारी अभियंता (स्लम) राजेंद्र रहाटे, कार्यकारी अभियंता अनिल कडू, धंतोली झोनच्या सहायक आयुक्त स्मिता काळे, उपअभियंता सी.आर. गभणे, उपअभियंता अजय डहाके, कनिष्ठ अभियंता सर्वश्री नितीन झाडे, गजानन वराडे, जगदीश बावनकुळे, जलप्रदाय डेलिगेट्स प्रवीण आगरकर, लकडगंज झोनचे विभागीय अधिकारी वामन काईलकर, गांधीबाग झोनचे झोनल अधिकारी सुरेश खरे, आरोग्य विभागाचे राजेश गायधनी, राजेश नागपुरे आदी उपस्थित होते.

नदी स्वच्छता अभियान निरीक्षण दौऱ्यामध्ये महापौर नंदा जिचकार, स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांच्यासह इतर पदाधिका-यांनी शहरातून वाहणा-या नाग नदीच्या विविध स्थळाची पाहणी केली. शंकरनगर पूल, सेंट्रल मॉल पूल, विद्यापीठ ग्रंथालयाजवळील पूल, हॉटेल निडोज लगतचा यशवंत स्टेडियम जवळील पूल, धंतोली झोन कार्यालयाजवळील पूल, मोक्षधाम घाटाजवळील पूल, बैद्यनाथ चौकातील पूल, अशोक चौकातील पूल, रेशीमबाग येथील लोकांची शाळा जवळील पूल, जुनी शुक्रवारी, जगनाडे चौक गायत्री नगरातील नदीचे पात्र, के.डी.के. कॉलेज, हिवरी नगर पम्पींग स्टेशन, प्रजापती चौक, पारडी भंडारा रोड, भरतवाडा, नाग व पिवळी नदी संगम, धारगाव रिंग रोड आदी ठिकाणी महापौर नंदा जिचकार यांच्यासह पदाधिका-यांनी निरीक्षण करून अधिकाऱ्यांना आवश्यक कार्यवाहीचे निर्देश दिले.

नदीची स्वच्छता करताना पुलाच्या खाली व अनेक ठिकाणी जेसीबी पोहचत नसल्याने त्या ठिकाणचा गाळ काढला जात नाही. त्यामुळे येथे कचरापण अडकला जातो. अशा ठिकाणी लवकरात लवकर मजुरांकडून स्वच्छता करणे, तसेच पुलाच्या जवळ ३० मीटर पर्यंतच्या भागात दर तीन दिवसांनी नियमीत सफाई करण्याचे निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले. वस्त्यांमधून वाहणा-या नदीमध्ये अनेक ठिकाणी नागरिकांकडून कचरा टाकण्यात येत असल्याचे निरीक्षणादरम्यान दिसून आले. आपल्या शहरातील नदी स्वच्छ ठेवणे हे आपले कर्तव्य आहे. नदीत कचरा टाकल्याने पावसाळ्यात त्याचा त्रास आपल्यालाच सहन करावा लागतो. त्यामुळे नागरिकांनी आपली जबाबदारी समजून नदीमध्ये कचरा न टाकण्याचे आवाहन यावेळी महापौर नंदा जिचकार यांनी केले. या विषयाकडे विभागाने जातीने लक्ष देउन नदी काठावरील अथवा अन्य कोणत्याही ठिकाणी नदीमध्ये कचरा टाकताना कुणीही आढळल्यास संबंधितांवर कठोर दंडात्मक कारवाई करावी, असेही निर्देश महापौर नंदा जिचकार यांनी दिले.

लकडगंज झोन परिसरातून वाहणा-या नाग नदीच्या स्वच्छता कार्यामध्ये लकडगंज झोनचे विभागीय अधिकारी वामन काईलकर यांच्याकडून हलगर्जीपणा केला जात असल्याचे यावेळी निदर्शनास आले. पावसाळ्यामध्ये नागरिकांना होणा-या त्रासापासून सुटका मिळावी यासाठी मनपातर्फे दरवर्षी नदी स्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. नागरिकांच्या सुविधेबाबत कामचुकारपणा व हलगर्जीपणा बाळगणा-या अधिका-यांबाबत महापौर नंदा जिचकार यांनी कठोर पवित्रा घेत विभागीय अधिकारी वामन काईलकर यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे निर्देश दिले.

नदी स्वच्छतेचे कार्य सर्वत्र सुरू असून याबाबत योग्य देखरेख ठेवून पावसाळ्यापूर्वी लवकरात लवकर स्वच्छतेचे संपूर्ण कार्य पूर्ण करुन नागरिकांना पावसाळ्यात त्रास होणार नाही याबाबत योग्य कार्यवाही करण्याचेही महापौर नंदा जिचकार यांनी यावेळी निर्देशित केले.

अधिक वाचा : दवा बाजार में लगी आग, करोड़ों का सामान खाक

दवा बाजार में लगी आग, करोड़ों का सामान खाक

नागपुर : गंजीपेठ स्थित दवा बाजार की इमारत में गुरुवार-शुक्रवार दरम्यानी रात शॉर्ट सर्किट के कारण आग लग गई। चारों ओर धुंआ ही धुंआ फैल गया। प्रत्यक्षदर्शियों ने रात 2.19 बजे अग्निशमन विभाग को फोन कर जानकारी दी।

50 करोड़ से अधिक के नुकसान की आशंका है। गंजीपेठ स्थित हज हाउस के पास थोक दवा बाजार है। यहां दुकानें बंद करने के बाद रात में आग भड़क गई। कारण शॉर्ट सर्किट बताया जा रहा है। एक के बाद एक दुकानों में आग फैलती गई। चारों ओर धुंआ-धुंआ हो गया। कुछ लोगों ने रात 2.19 बजे अग्निमशन विभाग को घटना की जानकरी दी।

शहर के सभी 8 फायर स्टेशनों से फायर की गाड़ियां सूचना मिलते ही घटनास्थल पर पहुंची और आग पर काबू पाने में जुट गईं। बावजूद इसके देर शाम तक आग को पूरी तरह से बुझाया नहीं जा सका था।चारों तरफ सिर्फ धुआं ही धुआं होने से मालूम ही नहीं चल रहा था कि अंदर की स्थिति क्या है। दुकानों के बंद होने के कारण भी आग बुझाने में परेशानी हुई। दुकानों को तोड़ने के बाद ही आगे पर काबू पाने में सफलता मिली।

जानकारी मिलने पर पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुले, विधायक सुधाकर कोहले और वरिष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी ने अधिकारियों को उचित कार्रवाई करने के निर्देश दिए ।

अधिक वाचा : जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांचा सेवानिवृत्ती सत्कार

जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांचा सेवानिवृत्ती सत्कार

नागपूर : अशोक कोल्हटकर हे नागपूर महानगरपालिकेला लाभलेले लोकप्रिय जनसंपर्क अधिकारी म्हणून ओळख पावले आहेत. कामाला प्राधान्य देउन ते पूर्ण करण्यासाठी धडपडणारा अधिकारी म्हणून ते पदाधिका-यांसह प्रशासनामध्येही परिचित आहेत. जनसंपर्क अधिकारी पदावर असणारे प्रेम आणि पदासोबत समरस होण्याची त्यांची शैली ही कौतुकास्पद आहे. कोणत्याही कामाला हमखास पूर्ण करणारा कर्तव्याप्रति निष्ठा असणारा अधिकारी म्हणूनच अशोक कोल्हटकरांची ओळख कायम राहिल, या शब्दांमध्ये महापौर नंदा जिचकार यांनी सेवानिवृत्त जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांच्या कार्याचा गौरव केला.

नागपूर महानगरपालिकेचे जनसंपर्क अधिकारी पदावर कार्यरत अशोक कोल्हटकर यांचा शुक्रवारी (ता.३१) सपत्नीक सेवानिवृत्ती सत्कार करण्यात आला. मनपा मुख्यालयातील डॉ. पंजाबराव देशमुख स्मृती स्थायी समिती सभागृहामध्ये आयोजित कार्यक्रमात महापौर नंदा जिचकार यांच्यासह उपमहापौर दीपराज पार्डीकर, स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे, विरोधी पक्षनेते तानाजी वनवे, क्रीडा समिती सभापती नागेश सहारे, नगरसेवक सर्वश्री संजय महाजन, परसराम मानवटकर, नितीन साठवणे, किशोर जिचकार, नगरसेविका कल्पना कुंभलकर, विद्या मडावी, अभिरुची राजगिरे, अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे, अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख, निगम सचिव हरीश दुबे, कार्यकारी अभियंता अनिल कडू, निगम अधीक्षक मदन सुभेदार, सहायक जनसंपर्क अधिकारी प्रदीप खर्डेनवीस, कर्मचारी नेते राजेश हाथीबेड उपस्थित होते.

यावेळी महापौर नंदा जिचकार यांच्या हस्ते अशोक कोल्हटकर यांचा शाल, श्रीफळ, तुळशीचे रोप आणि भेटवस्तू व त्यांच्या पत्नी पमिता कोल्हटकर साडीचोळी देउन सत्कार करण्यात आला.

महापौर नंदा जिचकार म्हणाल्या, हमखास निकाल देणारा अधिकारी म्हणून अशोक कोल्हटकरांवर मी नेहमी विश्वास ठेवला व प्रत्येकवेळी त्यांनी ते सार्थक ठरविले. जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकरांचा कार्यकाळ चांगला राहिला. निवृत्तीमध्ये गालबोट लागू नये, निवृत्तीनंतर समाधानी आयुष्य जगता यावे यामध्येच जीवनाचे खरे सार आहे. कुटुंबाच्या सहकार्यामुळे यामध्येही कोल्हटकर खरे उतरले. मनपाच्या सेवेमधून निवृत्त होत असले तरी कोल्हटकरांसोबत मनपाचे नाते कायम राहिल, असेही महापौर नंदा जिचकार म्हणाल्या.

स्थायी समिती सभापती प्रदीप पोहाणे यांनी अशोक कोल्हटकर यांच्या सेवानिवृत्तीबद्दल गौरवोद्गार काढले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. नाविण्यपूर्ण कार्यक्रमाची संकल्पना मांडून ते यशस्वीरित्या घडवून आणण्याची शैली असलेला अधिकारी अशोक कोल्हटकर आहे, अशा शब्दांमध्ये विरोधी पक्षनेते तानाजी वनवे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. अतिरिक्त आयुक्त रवींद्र ठाकरे यांनीही त्यांचा उत्कृष्ठ अधिकारी म्हणून आपल्या भाषणातून गौरव केला. अशोक कोल्हटकर यांच्यासारख्या कर्तव्यदक्ष आणि कुठल्याही कार्यात पुढाकार घेणा-या अधिका-याची उणीव नेहमीच भासेल, असेही ते म्हणाले.

सत्काराला उत्तर देताना जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. नागपूर महानगरपालिकेने माझ्यावर पालक म्हणून प्रेम केले आहे. या ‌ऋणाची उतराई करणे शक्य नाही. मी आज सेवानिवृत्त होत असलो तरी जेव्हा गरज पडेल किंवा जेव्हा संधी मिळेल तेव्हा मी सेवा देण्यासाठी तत्पर असेल, असे सांगताना आपल्या सेवाकाळातील कटू-गोड अनुभवांना त्यांनी उजाळा दिला. अतिरिक्त आयुक्त अझीझ शेख आणि निगम सचिव हरीश दुबे यांनीही जनसंपर्क अधिकारी अशोक कोल्हटकर यांना शुभेच्छा दिल्या.

यावेळी अनेक उपस्थितांनी त्यांचा पुष्पगुच्छ व भेटवस्तू देउन सत्कार केला. कार्यक्रमाचे संचालन आनंद आंबेकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जनसंपर्क विभागाचे राजेश वासनिक, दिलीप तांदळे, राकेश चहांदे, सागर कावलकर, नितीन फुल्लुके, मधुरा बोरडे, गणेश नारनवरे, विनोद डोंगरे, देवराव गेडाम, राजू मेश्राम, गौरव बिसने, गजेंद्र चंद्रशेखर, अविनाश कोसरकर, नरेंद्र रामटेके, फुलचंद चंदनखेडे, शिवशंकर गौर, रंजीत घरडे, तेजराम बडगे आदींनी सहकार्य केले.

अधिक वाचा : India Unemployment Rate At 6.1% In 2017-18 : Government

India Unemployment Rate At 6.1% In 2017-18 : Government

Nagpur : India’s unemployment rate rose to 6.1% in 2017/18 fiscal year, the statistics ministry said on Friday.

The same figure was leaked to a newspaper in January, which said it was the highest since 1972-73.

Also Read : Article 15 Trailer : Ayushmann Khurrana As A Determined Cop In This Social Drama Will Hold Your Attention

Article 15 Trailer : Ayushmann Khurrana As A Determined Cop In This Social Drama Will Hold Your Attention

Nagpur : The trailer of Article 15, Ayushmann Khurrana’s new film, released on Thursday evening and is a must watch. The Article 15 trailer begins with disturbing scenes of rape and communal riots with the narrator highlighting a haunting truth – “We’re invisible to them. Sometimes we are regarded as untouchables and again sometimes as scheduled castes but never as ordinary citizens.” The narration actually appears to be the voice of those suffocated as a result of the social discrimination so prevalent in the rural parts of the country.

Article 15 trailer shows Ayushmann Khurrana as a determined cop who attempts to investigate the gang rape and murder of two Dalit women, which turned out to be their fate for demanding a raise of Rs. 3. What is actually a murder case, is staged to look like an example of honour killing as a cover up, which prompts Ayushmann Khurrana to refresh our memories about Article 15 of the Indian Constitution.

From the trailer, the movie appears to be based on the 2014 Badaun rape case.

Take a look at the trailer here :

Article 15 – Trailer | Ayushmann Khurrana | Anubhav Sinha | Releasing on 28June2019

Also Read : Electricity duty exemption to industries in Vidarbha, Marathwada extended up to 2024

नागपुरात दगडाने ठेचून गुंडाची हत्या

नागपूर : दारु पिण्यासाठी सतत पैसे मागणाऱ्या व गाडी हिसकावणाऱ्या कुख्यात गुन्हेगारांची तिघांनी दगडाने ठेचून हत्या केली. ही खळबळजनक घटना गिट्टीखदानमधील नवीन काटोल नाका परिसरात गुरुवारी सकाळी उघडकीस आली. गुंडाची हत्या केल्यानंतर तिन्ही मारेकरी एमआयडीसी पोलिस ठाण्यात पोलिसांसमोर शरण आले. प्रकरण गिट्टीखदानमधील असल्याने पोलिसांनी तिघांना गिट्टीखदान पोलिसांच्या स्वाधीन केले. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली, तर अल्पवयीन मारेकऱ्याला ताब्यात घेतले.

अंकित रामप्रसन्न तिवारी (वय २१, रा. राजीवनगर), असे मृताचे नाव आहे. सुनील ईश्वर डहरवाल (वय २१, रा. खडगाव रोड) व राहुल सीताराम डहरवाल (वय १९, रा. बालाजीनगर) अशी अटकेतील मारेकऱ्यांची नावे आहेत. तिघेही चुलत भाऊ आहेत. अंकित याच्याविरुद्ध अनेक गुन्हे दाखल आहेत. एमआयडीसी भागात तो दादागिरी करीत होता. काही दिवसांपूर्वी त्याने तिघांना दारु पिण्यासाठी पैसे मागितले. त्यांनी नकार दिल्याने अंकितने त्यांना मारहाण केली होती. काही दिवसांपूर्वी अंकित याने राहुल याची मोटरसायकल हिसकावण्याचा प्रयत्न केला होता. यावेळी राहुल व त्याचा वाद झाला होता. अंकित हा आपल्याला ठार मारेल,अशी भीती राहुल याला होती.मंगळवारी रात्रीही त्याने राहुलला धमकी दिली. सुनील, राहुल व त्याच्या अल्पवयीन चुलत भावाने अंकितची हत्या करण्याचा कट आखला.

बुधवारी तिघेही त्याला घेऊन एमआयडीसीतील बारमध्ये गेले. तेथे त्याला दारु पाजली. त्यानंतर चौघे दोन मोटरसायकलने नवीन काटोल नाका परिसरात आले. येथे रॉडने अंकितवर वार केले. अंकित खाली पडला. त्यानंतर तिघांनी दगडाने डोके ठेचून अंकितची हत्या केली. अंकितचा खून केल्यानंतर तिघेही मोटरसायकलने एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये आले. अंकितची हत्या केल्याची माहिती पोलिसांना दिली. एमआयडीसी पोलिसांनी गिट्टीखदान पोलिसांना माहिती दिली.

गिट्टीखदान पोलिस एमआयडीसी पोलिस स्टेशनमध्ये पोहोचले. तिघांना ताब्यात घेऊन घटनास्थळ गाठले. पंचनामा करून अंकित याचा मृतदेह शवविच्छेदनासाठी हॉस्पिटलकडे रवाना केला. पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली. गुरुवारी दोघांना न्यायालयात हजर केले. न्यायालयाने सुनील व राहुलची दोन दिवसांसाठी पोलिस कोठडीत रवानगी केली.

अधिक वाचा : आर्थिक आरक्षणाचा लाभ या वर्षात नाहीचः SC

आर्थिक आरक्षणाचा लाभ या वर्षात नाहीचः SC

नागपूर : महाराष्ट्रात पदव्युत्तर मेडिकल अभ्यासक्रमासाठी सन २०१९-२० या शैक्षणिक वर्षाची प्रवेश प्रक्रिया १० टक्के आर्थिक आरक्षण लागू होण्याच्या आधीच सुरू झाली असल्यामुळे, या शैक्षणिक वर्षासाठी आर्थिक आरक्षणाची तरतूद लागू करता येणार नाही, असे सर्वोच्च न्यायालयाने स्पष्ट केले आहे. मेडिकल कौन्सल ऑफ इंडियाने या अभ्यासक्रमासाठी अतिरिक्त जागा निर्माण केल्या नाहीत, तर हे आरक्षण लागू करता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

सरन्यायाधीश रंजन गोगोई आणि न्या. अनिरुद्द बोस यांच्या खंडपीठापुढे या प्रकरणाची सुनावणी झाली. पदव्युत्तर मेडिकल अभ्यासक्रमासाठीची प्रवेश प्रक्रिया नोव्हेंबर २०१८पासून सुरू झाली आहे. खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना १० टक्के आरक्षण देणारी १०३वी घटनादुरुस्ती जानेवारी २०१९मध्ये मंजूर झाली, तर महाराष्ट्र राज्याने पदव्युत्तर मेडिकल अभ्यासक्रमासाठी १० टक्के आर्थिक आरक्षण मार्चमध्ये लागू केले, असे खंडपीठाने या आदेशात नमूद केले. सध्या सुरू असलेल्या प्रवेश प्रक्रियेत आर्थिक आरक्षण लागू करता येणार नाही, कारण ही प्रक्रिया आधीच सुरू झाली आहे, असे न्यायालयाने स्पष्ट केले.

खुल्या प्रवर्गातील विद्यार्थी रजत राजेंद्र अग्रवाल याने या मुद्द्यावर न्यायालयात धाव घेत, महाराष्ट्र सरकारच्या पदव्युत्तर मेडिकल अभ्यासक्रमासाठी १० टक्के आर्थिक आरक्षणाच्या आदेशाला आव्हान दिले होते. अतिरिक्त जागा निर्माण न करता आर्थिक आरक्षण लागू केले, तर खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठीच्या जागा कमी होतील, अशी भूमिका त्याने मांडली होती.

पदव्युत्तर मेडिकल प्रवेशाबाबत सर्वोच्च न्यायालयाची स्पष्टोक्ती

– महाराष्ट्रात प्रवेश प्रक्रिया आधीच सुरू झाल्याचे कारण

– अतिरिक्त जागा उपलब्ध केल्याशिवाय तरतूद अशक्य

अधिक वाचा : काश्मीर : सुरक्षा दलासोबत चकमक; २ अतिरेकी ठार

काश्मीर : सुरक्षा दलासोबत चकमक; २ अतिरेकी ठार

नागपूर : जम्मू-काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यात आज सकाळी दहशतवादी आणि सुरक्षा दलात चकमक झडली. त्यात जवानांनी दोन दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं. ही चकमक सुरूच आहे.

दक्षिण काश्मीरमधील शोपियान जिल्ह्यातील द्रगड सुगान परिसरात दहशतवादी लपून बसल्याची माहिती सुरक्षा दलांना मिळाली होती. त्यानंतर सुरक्षा दलांनी शोधमोहीम हाती घेतली. त्याचवेळी दहशतवाद्यांनी सुरक्षा दलाच्या जवानांवर अंदाधुंद गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल जवानांनीही गोळीबार केला. यात दोन दहशतवाद्यांचा खात्मा केला.

काश्मीर खोऱ्यात सुरक्षा दलांनी दहशतवाद्यांविरोधात मोठी मोहीम उघडली आहे. बारामुल्ला जिल्ह्यातील सोपोर परिसरात गुरुवारी सुरक्षा दलांनी दोन दहशतवाद्यांना टिपलं होतं. या महिन्यात सुरक्षादलांनी आतापर्यंत २० दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं आहे.

अधिक वाचा : नागपूर : ‘गो-एयर’च्या कर्मचाऱ्याची आत्महत्या

नागपूर : ‘गो-एयर’च्या कर्मचाऱ्याची आत्महत्या

नागपूर

नागपूर : ‘गो एयर’ कंपनीच्या युवा कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही खळबळजनक घटना गुरुवारी दुपारी अजनीतील चंद्रमणीनगर भागात उघडकीस आली. मंथन महेंद्र चव्हाण (वय १९), असे मृताचे नाव आहे. कंपनीतील अधिकाऱ्याच्या छळाला कंटाळून त्याने आत्महत्या केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंथन याचे वडील महेंद्र खासगी काम करतात. आई सुषमा चव्हाण (शेंद्रे) या शहर पोलिस दलीतील विशेष शाखेत कार्यरत आहेत.

मंथन याला सिमॉन हा लहान भाऊ असून तो सातव्या वर्गात शिकतो. सुमारे एक वर्षापूर्वी मंथन हा ‘गो एयर’ कंपनीत ‘ग्राऊंड स्टाफ’मध्ये कामाला लागला. काही दिवसांपूर्वी त्याची प्रकृती खालावली. त्याने याबाबत कंपनीच्या अधिकाऱ्यांना माहिती दिली होती.

आजारी असल्याची माहिती दिल्यानंतरही कंपनीचे अधिकारी त्याला कामावर बोलावित होते.त्याला नोकरीवरून काढण्याची धमकी देत त्याचा छळ करीत होते. त्यामुळे मंथन हा तणावात होता. यातूनच गुरुवारी दुपारी मंथन याने गळफास घेऊन आत्महत्या केली. अजनी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

अधिक वाचा : अगस्त में दौड़ेगी हिंगना-बर्डी के बीच मेट्रो

अगस्त में दौड़ेगी हिंगना-बर्डी के बीच मेट्रो

नागपुर : मेट्रो का खापरी से बर्डी का सेक्शन शुरू करने के बाद जल्द ही हिंगना से बर्डी का सेक्शन शुरू होनेवाला है। दो माह में इस सेक्शन पर मेट्रो ट्रेन का संचालन शुरू हो जाएगा। यह जानकारी मेट्रो के निदेशक बृजेश दीक्षित ने दी। गुरुवार को लोकमान्य नगर स्टेशन से सुभाष नगर स्टेशन तक पहली बार हुई मेट्रो रेल की ट्रायल में वह पत्रकारों से चर्चा कर रहे थे।

दीक्षित ने बताया कि वर्तमान स्थिति में उक्त दो स्टेशनों के बीच काम पूरा हो गया है, जिसका फासला 5 किमी है, लेकिन इस सेक्शन में बर्डी तक कुल 10.8 किमी का फासला तय करना पड़ता है। जिसका काम अभी पूरा नहीं हुआ है। आगामी 2 माह में पूरा हो जाएगा, जिसके बाद यहां से सीधे कमर्शियल राइड शुरू की जाएगी। विविंग गैलरी के बारे में बताया कि इस सेक्शन का सबसे इंस्ट्रेस्टिंग पार्ट विविंग गैलरी रहेगी, जो सुभाष नगर स्टेशन से धरमपेठ कॉलेज तक रहेगा।समय-समय पर फंड मिलता रहेगा, तो काम समय पर पूरा कर लिया जाएगा।

वर्तमान में 80 प्रतिशत काम हो गया है, जिसमें 60 प्रतिशत तक फंड खर्च हुआ है। उपरोक्त सेक्शन में सफर करना यात्रियों के लिए अच्छा अनुभव रहेगा। सड़कों के बीच ऊंचाई से चलनेवाली मेट्रो से इस रूट पर एक तरफ घनी बस्तियां देखने मिलेंगी, वहीं दूसरी ओर अंबाझरी तलाब का अद्भुत नजारा देखने मिलेगा। मेट्रो से अंबाझरी तलाब का एंड हिस्सा भी देखने मिलेगा, जिसे बहुत ही कम लोगो ने देखा है।

और पढिये : मेट्रो के ट्रिपल डेकर को रेलवे की मंजूरी, एनएचआई की सहमति बाकी

मेट्रो के ट्रिपल डेकर को रेलवे की मंजूरी, एनएचआई की सहमति बाकी

नागपुर : मेट्रो के गड्डीगोदाम ट्रिपल डेकर की डिजाइन तैयार हो गई है। इसे रेलवे ने हरी झंडी दिखा दी है, लेकिन एनएचआई से अभी सहमति नहीं मिली है। इससे इसका काम अटका हुआ है। इससे मेट्रो के विकास में बाधा पहुंच रही है। नागपुर शहर में वर्तमान में एयरपोर्ट से लेकर अजनी तक डबल डेकर बनाया गया है। इसी परियोजना में एक ओर डबल डेकर साकार होनेवाला है। जो एलआईसी चौक से कड़बी चौक तक रहेगा।

इस डबल डेकर के बीच में रेलवे ओवर ब्रिज आ रहा है, लिहाजा जब यहां डबल डेकर साकार होगा, तो वह ट्रिपल डेकर की तरह दिखेगा। शहर में मेट्रो का काम 4 रीच अंतर्गत हो रहा है। उपरोक्त डेकर रीच-2 में होगा।यह 2019 में साकार हो जाएगा। इस ट्रिपल डेकर में रेलवे व एनएचआई का आवागमन रहने से दोनों विभागों की सहमति लेना जरूरी है। रेलवे ने हामी तो भर दी है, लेकिन एनएचआई ने हामी नहीं भरी है।

और पढिये : 72 एकड़ में साढ़े 5432 पौधे लगाकर महा मेट्रो ने बनाया लिटिल वुड

मोदींच्या शपथग्रहणापूर्वीचे १० मोठे सस्पेन्स

PM Narendra Modi

नागपूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संध्याकाळी ७ वाजता पद आणि गोपनीयतेची शपथ घेतील. या वेळी त्यांच्या मंत्रिमंडळात कोण-कोण असेल याबाबत २३ मेपासूनच चर्चा सुरू झालीय. निवडणूक निकालानंतर पंतप्रधान मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शहा जवळ जवळ रोजच या विषयावर चर्चा करत आले आहेत. नव्या मंत्रिमंडळातील मंत्री आणि त्यांची खाती याबाबत सर्वकाही निश्चित झाले असून त्याबाबत गुप्तता पाळली जात आहे. मात्र, आजच्या शपथविधीवेळीच हे गूढ उघड होणार आहे. गेल्या अनेक दिवसांपासून मोदी मंत्रिमंडळातील चेहऱ्यांबाबत तर्कवितर्क लढवले जात आहेत. अमित शहा सरकारचा भाग बनतील, की ते संघटनेतच राहतील, अरुण जेटलींचा जागा कोण घेणार…. अशा अनेक प्रश्नांवर चर्चा रंगली आहे.

शहा मंत्री होणार की पक्षाध्यक्षच राहणार ?

या वेळी मोदी पुन्हा सत्तेत आल्यास अमित शहा मंत्रिमंडळात सहभागी होतील अशी अनेक दिवसांपासून चर्चा सुरू आहे. शहा यांना कोणते खाते दिले जाईल, याकडेही सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. शहा यांना अर्थमंत्रीपद किंवा गृह मंत्रालय दिले जाईल अशीही चर्चा आहे. शहा मंत्रिपद न स्वीकारता ते पक्षाध्यक्षच राहतील, अशीही समांतर चर्चा रंगली आहे. जर शहांना मंत्रिपद दिले गेले, तर भाजपच्या ‘एक व्यक्ती, एक पद’ या सिद्धांतानुसार त्यांना पक्षाचे अध्यक्षपद सोडावे लागणार आहे.

जेटलींची जागा कोण घेणार ?

आपल्या आजारपणामुळे आपण मंत्रिपद स्वीकारू शकणार नाही असे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहून कळवले आहे. या मुळे जेटली यांचे मंत्रिपद कुणाला मिळणार, अशी चर्चा रंगली आहे. जेटली यांच्या अनुपस्थितीत हे पद पीयूष गोयल यांनी सांभाळले होते. हे लक्षात घेता गोयल या पदाचे दावेदार असू शकतील. तर, अर्थमंत्रिपदासाठी शहांचे नावही घेतले जात आहे.

स्मृती इराणींना कोणते मंत्रिपद मिळणार ?

स्मृती इराणी यांनी काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांचा पराभव करत काँग्रेसचा पारंपरिक गड जिंकला. या मुळे स्मृतींना महत्वाचे खाते मिळेल असे म्हटले जात आहे. म्हणून स्मृती इराणी यांच्या मंत्रिपदाबाबत सर्वांनाच उस्तुकता आहे.

सुषमांची जागा कोण घेणार ?

आरोग्याच्या कारणामुळे परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज यांनी यंदाची लोकसभा निवडणूक लढवली नव्हती. म्हणूनच, सुषमा स्वराज मंत्रिमंडळात असतील की नाही, याबाबतही उत्सुकता आहे. जर सुषमा स्वराज यांनी मंत्रिपद स्वीकारले नाही, तर परराष्ट्र मंत्रिपदी कुणाची वर्णी लागणार याबाबत उस्तुकता आहे.

जेडीयूला दोन मंत्रिपदे ?

भाजपव्यतिरिक्त एनडीएच्या घटकपक्षांना कोणती मंत्रिपदे मिळणार याबावरही लोकांच्या नजरा खिळल्या आहेत. या वेळी जेडीयू देखील सरकारचा भाग असणार आहे. जेडीयूला दोन मंत्रिपदे दिली जातील अशी चर्चा आहे. जेडीयूचे राज्यसभा खासदार आरपीसी सिंग आणि मुंगेरचे लोकसभा खासदार राजीव रंजन सिंग उर्फ लल्लन सिंग मंत्री बनू शकतात.

शिवसेनेकडून यावेळी कोण ?

शिवसेनेचे खासदार अरविंद सावंत यांचे नाव मंत्रिपदाच्या शर्यतीत आहे. ते अनंत गीतेंची जागा घेतील अशी चर्चा आहे.

सुखबीर घेणार पत्नीची जागा ?

अकाली दलाकडून या वेळी सुखबीर सिंग बाद यांना मंत्रिपद मिळण्याची दाट शक्यता आहे. गेल्या सरकारमध्ये त्यांच्या पत्नी हरसिमरत कौर कॅबिनेट मंत्री होत्या.

रामविलास पासवान की चिराग पासवान ?

या वेळी निवडणूक न लढलेले रामविलास पासवान यांच्याबाबतही उत्सुकता कायम आहे. पासवान यांनी त्यांचे पुत्र चिराग पासवान यांना मंत्री बनवले जाण्याचे संकेत दिले होते. परंतु, एलजेपीच्या बैठकीत पासवान यांना मंत्री, तर चिराग यांना पक्षाच्या संसदीय पक्षाचा नेता बनवण्याबाबचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला होता.

बंगालमधील मंत्र्यांची संख्या वाढणार ?

या वेळी पश्चिम बंगालमध्ये भाजपने चांगली कामगिरी केली. याच कारणामुळे केंद्रीय मंत्रिमंडळात पश्चिम बंगालचे प्रतिनिधीत्व वाढण्याची शक्यता आहे. बगालमधून २०१४ च्या निवडणुकीत भाजपला केवळ २ जागा जिंकता आल्या होत्या. आता मात्र हा आक़ा १८ वर पोहोचला आहे.

मनोज सिन्हांचे काय होणार ?

मनोज सिन्हा यांचा गाजीपूरमधून पराभव झाला आहे. मात्र त्यांना राज्यसभेच्या मार्गे मंत्रिमंडळात स्थान दिले जाईल अशी चर्चा आहे.

दरम्यान, संतोष गंगवार यांना हंगामी लोकसभा सभापती बनवले जाणार आहे. ते नव्या खासदारांना शपथ देतील. ते बरेलीहून आठव्यांदा लोकसभेत पोहोचले आहेत.

अधिक वाचा : दोन पोलिस अधिकाऱ्यांवर हल्ला

दोन पोलिस अधिकाऱ्यांवर हल्ला

नागपूर : उपराजधानीत विविध ठिकाणी दोन पोलिस उपनिरीक्षकांवर हल्ला करण्यात आला. दोन्ही प्रकरणात पोलिसांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करून चौघांना अटक केली आहे. पहिली घटना अंबाझरीतील फुटाळा तलाव परिसरात घडली. राजेश गोपाल परतेकी (वय ४२, रा. जुना फुटाळा) व अतुल राजकुमार ढेंगे (वय ३२, रा.कुणबी मोहल्ला) हे दोघे फुटाळा तलाव परिसरात दारु पित होते. याचवेळी पोलिस उपनिरीक्षक एस. बी. जाधव व त्यांचे सहकाऱ्यांना गस्त घालत होते. पोलिसांना ते दारु पिताना दिसले. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. पोलिसांच्या वाहनात बसून दोघांना घेऊन जाधव हे अंबाझरी पोलिस स्टेशनमध्ये येत होते. यादरम्यान दोघांनी वाहनातच दारु प्यायला सुरुवात केली. जाधव यांनी त्यांना हटकले. दोघांनी त्यांना शिविगाळ करून मारहाण करायला सुरुवात केली. यात जाधव यांच्या हाताला जखमी झाली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोघांना अटक केली.

दुसरी घटना मंगळवारी रात्री आठ वाजताच्या सुमारास लष्करीबागेतील आवळेबाबू चौकात घडली. पाचपावली पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक सचिन सूर्यवंशी व त्यांचे सहकारी परिसरात नाकाबंदी करीत होते. आरजू पानीपत गोंडाणे (वय २९) व अंकुश पानीपत गोंडाणे (वय २३, दोन्ही रा. कुशीनगर) हे मोटरसायकलने जात होते. पोलिसांनी तपासणीसाठी दोघांना थांबविले. त्यामुळे दोघे संतापले. त्यांनी सूर्यवंशी यांच्यावर हल्ला केला. अन्य पोलिसांनी लगेच त्यांना पकडले. याप्रकरणी पोलिसांनी शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा गुन्हा दाखल करून आरजू व अंकुशला अटक केली.

अधिक वाचा : नागपुरात पोलिस कर्मचाऱ्याची आत्महत्या

नागपुरात पोलिस कर्मचाऱ्याची आत्महत्या

नागपूर

नागपूर : प्रतापनगर पोलिस स्टेशनमध्ये तैनात पोलिस कर्मचाऱ्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना बुधवारी सायंकाळी एमआयडीसीतील गेडाम ले-आऊट भागात उघडकीस आली. विकास निळकंठ गुडधे (वय ४५), असे मृताचे नाव आहे. त्यांच्या आत्महत्येमुळे पोलिस विभागात खळबळ उडाली आहे. कौटुंबिक कलहातून त्यांनी आत्महत्या केल्याचे सांगण्यात येत असले तरी कामाच्या तणावातून व वरिष्ठ अधिकाऱ्याच्या छळाला कंटाळून त्यांनी आत्महत्या केल्याची चर्चा पोलिस विभागात आहे.

निळकंठ आधी लष्करात होते. सेवानिवृत्तीनंतर ते शहर पोलिस दलात दाखल झाले. तीन वर्षांपूर्वी त्यांची प्रतापनगर पोलिस स्टेशनमध्ये नियुक्ती करण्यात आली. बुधवारी दुपारी ३ वाजताच्या सुमारास विकास घरी आले. यावेळी त्यांची आई व भाऊ घरी होते. त्यांच्या पत्नी कामानिमित्त बाहेर गेल्या होत्या. यादरम्यान विकास यांनी त्यांच्या खोलीत पंख्याला दोरी बांधून गळफास घेतला. सायंकाळी सहा वाजता त्यांच्या पत्नी घरी आल्या असता ही घटना उघडकीस आली. त्यांच्या पत्नीने आरडाओरड केली. विकास यांची आई व भाऊ खोलीत आले. विकास यांच्या भावाने एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच एमआयडीसी पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह मेडिकल कॉलेज हॉस्पिटलकडे रवाना केला. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.

अधिक वाचा : कर्तव्यदक्ष चालक आणि वाहकाचा परिवहन समिती मनपातर्फे सन्मान, प्रसंगावधानाने वाचविला १५ प्रवाशांचा जीव

कर्तव्यदक्ष चालक आणि वाहकाचा परिवहन समिती मनपातर्फे सन्मान, प्रसंगावधानाने वाचविला १५ प्रवाशांचा जीव

नागपूर : हिंगणा मार्गावरील बालाजीनगर येथे मंगळवारी (ता.२८) आपली बसला लागलेल्या आगीमध्ये प्रसंगावधान दाखवून सुमारे १५ प्रवाशांचा जीव वाचविणा-या कर्तव्यदक्ष चालक आणि वाहकाचा बुधवारी (ता.२९) नागपूर महानगरपालिकेतर्फे सत्कार करण्यात आला. मनपाचे परिवहन समिती सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे यांच्या हस्ते आपली बसचे चालक मनिष करांगळे व वाहक अमित किटुकले यांना शाल, पुष्पगुच्छ, श्रीफळ व रोख पुरस्कार देउन सन्मानित करण्यात आले.

यावेळी परिवहन व्यवस्थापक शिवाजी जगताप, प्रशासकीय अधिकारी रवींद्र पागे, श्रम अधिकारी अरुण पिपरूडे, यांत्रिकी अभियंता योगेश लुंगे, सहायक प्रभव बोकारे, बस ऑपरेटरचे प्रतिनिधी निलमणी गुप्ता, आर.के.साटी, स्मार्ट सिटी बस ऑपरेटर श्री. पारेख, डिम्स कंपनीचे सतीश सदावर्ते उपस्थित होते.

मंगळवारी (ता.२८) ऑरेंटस्ट्रिट डेपोमधील मे. हंसासिटी बस सर्व्हीसेस प्रा.लि. नागपूरतर्फे संचालन करण्यात येत असलेली बस क्रमांक एम.एच.३१ सी.ए.६२४५ ही बस ड्युटी क्रमांक १३५/ए वर हिंगणा ग्रामिण दवाखाना ते बर्डी मार्गावर सेवा देत होती. हिंगणा मार्गावरील बालाजीनगर महिंद्रा कंपनीजवळ सकाळी ६.२० वाजता दरम्यान शार्ट सर्कीटमुळे अचानक बसने पेट घेतला. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता प्रसंगावधान दाखवून चालक मनिष करांगळे (आयडी क्र. ३०४६९) यांनी लगेच बस रस्त्याच्या बाजुला उभी केली व वाहक अमित किटुकले (आयडी क्र. ९०१५८) यांच्या मदतीने बसमधील अंदाजे १५ प्रवाशांना सुखरूप बाहेर काढले. यानंतर लगेच त्यांनी एमआयडीसी नागपूर शहर पोलिस स्टेशन व अग्निशमन विभागाला तात्काळ माहिती दिली.

या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेत परिवहन समिती सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे यांनी शहर बस वाहतूक करणारे सर्व ऑपरेटर व डेपो यांनी सर्व गाड्यांची तात्काळ तपासणी करून वायरींग सिस्टीम दुरूस्त करून घेणे व दुरूस्त झाल्याची खात्री करून त्यासंबंधी अहवाल विभागाला पाठविण्याचे निर्देश दिले.

मनपा कर्मचा-यांचे बनणार परिवार आरोग्य अभियान कार्ड

आपली बसच्या प्रकरणानंतर मनपामध्ये सेवा देणारे चालक, वाहक व इतर कर्मचारी आणि त्यांच्या परिवाराच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. या सर्वांच्या आरोग्याच्या सुरक्षेच्या दृष्टीने मनपातर्फे महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला असून त्या अंतर्गत मनपातील शहर बसचे चालक, वाहक व इतर कर्मचारी आणि त्यांच्या परिवाराचे महात्मा गांधी परिवार आरोग्य अभियान कार्ड काढण्यात येणार असल्याची माहिती परिवहन समिती सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे यांनी यावेळी दिली. यासंबंधीची कार्यवाही लवकरच पूर्ण करण्यात येणार असून सर्व चालक, वाहक व इतर कर्मचा-यांनी स्वत:सह परिवाराचे आरोग्य कार्ड काढण्याचे आवाहनही परिवहन समिती सभापती जितेंद्र (बंटी) कुकडे यांनी केले.

अधिक वाचा : World Cup 2019 : अवघे विश्व न्हाऊन निघणार क्रिकेटरंगात !

World Cup 2019 : अवघे विश्व न्हाऊन निघणार क्रिकेटरंगात !

नागपूर : तब्बल १५० खेळाडू आणि १० संघांतील तुंबळ लढती वन-डे क्रिकेट वर्ल्डकपच्या निमित्ताने ब्रिटनमध्ये आज, गुरुवारपासून अनुभवायला मिळणार आहेत. स्पर्धेच्या या वाटचालीत कोण धावचीत होणार, कोण नांगर टाकून शेवटपर्यंत टिकून राहणार हे या स्पर्धेच्या दीड महिन्याच्या कालावधीत जगभरातील तमाम चाहत्यांना पाहता येणार आहे. यजमान इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका यांच्यात आज होणाऱ्या लढतीने या स्पर्धेचा आरंभ होणार आहे.

या वर्ल्डकपचा ढाचा बदलण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येकाला नऊ सामने खेळायला मिळणार आहेत. त्यातील चार संघ उपांत्य फेरीत प्रवेश करतील. ९ आणि ११ जुलैला उपांत्य लढती रंगणार असून १४ जुलैला अंतिम सामना खेळविला जाईल. उपांत्य फेरीसाठी एखाद्या संघाला नऊपैकी किमान पाच सामने जिंकावे लागतील. १९८३ आणि २०११मध्ये विश्वविजेतेपद पटकावणाऱ्या भारताकडून नेहमीप्रमाणे प्रचंड अपेक्षा आहेतच; पण यजमान इंग्लंड, ऑस्ट्रेलिया हे संघही विजेतेपदाच्या शर्यतीत आघाडीवर आहेत. दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, पाकिस्तान यांच्याकडूनही चोख प्रत्युत्तराची अपेक्षा आहे. भारताचा सलामीचा सामना दक्षिण आफ्रिकेशी ५ जूनला होणार आहे. पण तेवढेच आकर्षण असेल ते १६ जूनला होणाऱ्या पाकिस्तानविरुद्धच्या लढतीचे.

भारताच्या वर्ल्डकपमधील लढती

५ जून : दक्षिण आफ्रिका (साऊदम्प्टन)

९ जून : ऑस्ट्रेलिया (ओव्हल)

१३ जून : न्यूझीलंड (नॉटिंगहॅम)

१६ जून : पाकिस्तान (मँचेस्टर)

२० जून : अफगाणिस्तान (साऊदम्प्टन)

२७ जून : वेस्ट इंडिज (मँचेस्टर)

३० जून : इंग्लंड (बर्मिंगहॅम)

२ जुलै : बांगलादेश (बर्मिंगहॅम)

६ जुलै : श्रीलंका (लीड्स)

अधिक वाचा : 72 एकड़ में साढ़े 5432 पौधे लगाकर महा मेट्रो ने बनाया लिटिल वुड

72 एकड़ में साढ़े 5432 पौधे लगाकर महा मेट्रो ने बनाया लिटिल वुड

नागपुर : मेट्रो प्रोजक्ट के लिए शहर में जगह-जगह पेड़ काटे गए थे। काटे गए पेड़ों की जगह नए 5 पौधे लगाने का नियम है। मेट्रो ने इसी क्रम में हिंगना रोड पर लगाकर लिटिल वुड सेफ्टी पार्क बनाया है। इनमें मेट्रो ने लगभग साढ़े पांच हजार पौधे लगाए हैं।

यह पार्क 72 एकड़ में फैला हुआ है।इसे आकर्षक बनाने के लिए झोपड़ी की तरह सेक्शन बनाए गए हैं। मेट्राे प्रोजेक्ट की पूरी जानकारी मॉडल के द्वारा यहां दिखाए जाएंगे। नागरिकों के टहलने के लिए यहां गार्डन तैयार किया जा रहा है। नागपुर एकमात्र ऐसा शहर है, जहां पर शहर के बीच में जंगल है।

अब यहां पर एक और जंगल बनने वाला है। महा मेट्रो रेल प्रोजेक्ट ने अंबाझरी तालाब के पास हिंगना रोड पर 5 हजार 432 पेड़ लगाए हैं। यहां पर 40 अलग-अलग प्रजातियों के पेड़ लगाए गए हैं, जिसमें फल और फूलों के भी पौधे हैं। इन पेड़ों को पानी देने के लिए भी पंप स्टेशन लगाया है। क्षेत्र में एक कुआं है, जहां का पानी निकालकर उसे फिल्टर कर फिर ड्रिपिंग सिस्टम से पेड़ों को पानी दिया जाता है। इस पद्धति से पानी व्यर्थ नहीं बहता।

पूरे क्षेत्र में पाइप लगा रखे हैं, जिनमें छेद कर ड्रिप लगाई गई है और हर पेड़ के आसपास धीरे-धीरे पानी बहता है। इससे पानी जमीन में जाने से पेड़ की जड़ें आसान से पानी सोख लेती है और पौधे जल्दी बढ़ते हैं। यह जानकारी लिटिल वुड सेफ्टी पार्क की देख-रेख करने वाले पुरुषोत्तम ढोणे ने दी है।

और पढिये  : पायल साहू ने जीता “मिस इंडिया 2019” का ताज

पायल साहू ने जीता “मिस इंडिया 2019” का ताज

नागपुर : शहर की पायल साहू ने “मिस इंडिया डीसी ब्रांड एंबेसेडर 2019” का ताज जीत लिया है। कार्यक्रम का आयोजन देहरादून में किया गया। उन्होंने मिस्टर एंड मिसेज इंडिया डीसी ब्रांड एंबेसेडर 2019 के ऑडिशन में भाग लिया। उनका अंतिम दौर के लिए चुनाव किया गया। ब्यूटी पेजेंट मे जज की भूमिका में सूफी डबरी, अनु डागर, श्रेता त्यागी व कुलदीप शर्मा थे। पायल अपनी सफलता का श्रेय इमरान खान, माता भारती और पिता बाबला को देती हैं। उन्होंने कहा कि मिस यूनीवर्स का खिताब प्राप्त करना उनका अगला लक्ष्य है।

और पढिये  : “ग्रीन क्रूड ऑइल” से विदर्भ और देश समृद्ध बनाऊंगा : गडकरी

Nagpur Weather

Nagpur
haze
30 ° C
30 °
30 °
23 %
1.5kmh
0 %
Sat
30 °
Sun
41 °
Mon
41 °
Tue
42 °
Wed
44 °

Stay connected

5,248FansLike
422FollowersFollow
500FollowersFollow
394FollowersFollow
2,380SubscribersSubscribe

Most Popular

Top 100 new year Wishes

Top 100 New Year Wishes 2023

0
Top 100 New Year Wishes 2023: If you are searching for some good wishes for the new year 2023 then you are on the...

Dhamma Chakra Pravartan Din : 15 Famous quotes by Dr. Babasaheb Ambedkar

0
Dhamma chakra Pravartan Din also known by the name of DhammaChakra Anupratan Din is a day to praise the Buddhist change of B. R....
Happy Diwali 2021

15+ Unique Happy Diwali wishes for 2022

0
Nowadays the only way through which connection is possible is the social networking site. The biggest festival in India is coming soon. Diwali is...
makar Sankranti

Top 100 best quotes, WhatsApp messages, wishes and greetings for Makar Sankranti 2024

0
Makar Sankranti Wishes : Makara Sankranti (Sankranthi) is a Hindu festival that encourages people to live in peace and harmony. Here are best quotes,...