गर्लफ्रेण्डला फिरविण्यासाठी वाहनचोरी

नागपूर : ‘गर्लफ्रेण्ड’ला फिरविण्यासाठी वाहनचोरी करणाऱ्या अल्पवयीन चोरांच्या टोळीतील तिघांना पाचपावली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तिघेही १६ ते १७ वर्षे वयोगटातील आहेत. ते शिक्षण घेत आहेत. त्यांचेही वडील मजुरी करतात. तिघांनाही मैत्रिणी आहेत. मैत्रिणींना फिरविण्यासाठी तिघेही मोटरसायकल व मोपेड चोरी करीत होते. पेट्रोल संपल्यानंतर मोपेड किंवा मोटरसायकल तेथेच ठेवून पुन्हा दुसरे वाहन चोरी करीत होते.

पाचपावली पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक अशोक मेश्राम, निरीक्षक संजय जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक सूरज सुरोशे, उपनिरीक्षक पी.आर.इंगळे, हेडकॉन्स्टेबल रामेश्वर कोहळे, संतोष ठाकूर,विजय यादव, राजेश देशमुख, विनोद गायकवाड, महेश जाधव, शिपाई अभय साखरे, शैलेंद्र चौधरी हे गस्त घालत होते. गस्तीदरम्यान तिघेही आवळेबाबू चौकात संशयास्पदस्थितीत फिरताना दिसले.

पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. त्यांच्याकडील वाहनाबाबत चौकशी केली. वाहन चोरीचे असल्याचे निष्पन्न झाले. पोलिसांनी तिघांची कसून चौकशी केली असता त्यांच्याकडून सदरमधील तीन , तहसील, जरीपटक्यातील चोरीचे गुन्हे उघडकीस आणून सहा वाहने जप्त केली.

मोबाइल चोरही जाळ्यात

वैशालीनगर भागात पाचपावली पोलिसांनी कुख्यात मोबाइल चोराला अटक केली. रजत ऊर्फ हनी महेंद्र सहारे ( वय २६,रा. नालंदानगर),असे अटकेतील चोरट्याचे नाव आहे. त्यांच्याकडून चोरीचे आठ मोबाइल व मोटरसायकल जप्त करण्यात आली. हनी याच्याविरुद्ध मोबाइल चोरीचे अनेक गुन्हे दाखल असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

अधिक वाचा : पैसा हाच अजय देवगणचा धर्म: विन्ता नंदा