पैसा हाच अजय देवगणचा धर्म: विन्ता नंदा

नागपूर : ‘मीटू’चे आरोप असलेले ज्येष्ठ अभिनेते आलोक नाथ ‘दे दे प्यार दे’ चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये झळकल्याने अभिनेत्री तनुश्री दत्तानं अभिनेता अजय देवगणवर सडकून टीका केली. त्यात आता लेखिका, निर्मात्या विन्ता नंदा यांनीही अजयला लक्ष्य केलंय. अजय, मला तुझ्याकडून ही अपेक्षा नव्हती असं म्हणत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली आहे.

बलात्कारसारख्या गंभीर आरोपांनंतरही आलोक नाथ यांना चित्रपटात काम दिल्यामुळे विन्ता नंदाही नाराज झाल्या आहे. एका वृत्तपत्राला मुलाखत देताना विन्ता नंदा यांनी अजयबाबतची ही नाराजी बोलून दाखवली. ‘मला अजय देवगणकडून आता काहीही अपेक्षा नाही. तो ठामपणे भूमिका घेऊ शकणार नाही, कारण अशा लोकांसाठी पैसाच हा त्यांचा धर्म असतो. बॉक्स ऑफिस म्हटलं की प्रत्येक धर्म मागे पडतो, सत्य-असात्यातील फरक गळून पडतो आणि केवळ पैसा कमावणं हे एकमेव उद्दिष्ट टिकून राहतं. अजयसुद्धा हेच करत आहे.’ असं विन्ता नंदा म्हणाल्या.

बॉलिवूडमध्ये ‘मी टू’ चळवळीने जोर धरला आणि अनेक महिलांनी त्यांच्यावर झालेल्या अन्यायाला वाचा फोडली. लेखिका, निर्मात्या विन्ता नंदा यांच्यावर आलोकनाथ यांनी १९ वर्षांपूर्वी केलेल्या बलात्काराचा खुलासा केला होता. आलोकनाथ यांनी हे आरोप फेटाळतानाच नंदा यांच्याविरोधात कोर्टात खटला दाखल करत एक रुपया नुकसान भरपाई मागितली होती.

अधिक वाचा : ‘हे’ कलाकार मतदान करू शकत नाहीत