चोरट्याचा पोलिसालाच फटका

नागपूर : नागपूर रेल्वेस्थानकावर सध्या चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असून, शनिवारी एका पोलिसाचीच पर्स चोरट्याने लांबवली. या पर्समध्ये ११ हजार रुपये रोख होते.

पोलिस लाइन टाकळी निवासी प्रल्हाद दिनकर काळे (२९) हे शनिवारी सकाळच्या सुमारास नातेवाइकांना सोडायला नागपूर रेल्वेस्थानकावर आले. गीतांजली एक्स्प्रेसमध्ये सामान ठेवत असताना गर्दीचा फायदा घेत चोरट्याने त्यांच्या खिशातील पर्स लंपास केली. पर्समध्ये ११ हजार रोख, आधारकार्ड, पोलिस ओळखपत्र, पॅनकार्ड, वाहन परवाना, एटीएम कार्ड व इरत कागदपत्र असा ऐवज होता. याप्रकरणी त्यांनी लोहमार्ग पोलिसांकडे तक्रार केली.

दुसरी चोरीची घटना इंटरसिटी एक्स्प्रेसमध्ये शनिवारी सायंकाळच्या सुमारास घडली. रजनीकांत लोकनाथ सनमारे (३०, रा. गोंदिया) इंटरसिटी एक्स्प्रेसने गोंदिया ते इतवारी जनरल बोगीतून प्रवास करीत होते. इतवारी येथे गाडीतून उतरत असताना खिशातून १४ हजार रुपये किमतीचा मोबाइल लंपास करण्यात आला. त्यांनी इतवारी लोहमार्ग पोलिस ठाणे गाठून चोरीची तक्रार केली. पुढील तपास सुरू आहे.

तिसरी घटना हमसफर एक्स्प्रेसमध्ये शनिवारी दुपारी घडली. इतवारी निवासी सुधीर अशोककुमार मोदी हे ग्वाल्हेरला जाण्यासाठी नागपूर रेल्वेस्थानकावर आले होते. हमसफर एक्स्प्रेस आल्यानंतर गाडीत चढताना गर्दीचा फायदा घेत चोरट्याने त्यांचा ९ हजार रुपये किमतीचा मोबाइल लंपास केला. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांत त्यांनी तक्रार केली.

मथुरा, उत्तर प्रदेशचे हरिशकुमार श्रीपालसिंग (३०) हे राजनांदगाव येथे जाण्याकरिता नागपूररेल्वे स्थानकावर आले. गोंडवाना एक्स्प्रेसमध्ये चढताना चोरट्याने त्यांचा १३ हजार रुपये किमतीचा मोबाइल चोरून नेला. ही घटना जनरल बोगीत घडली.

अधिक वाचा : वीएनआईटी की टीम ने बनाई हार्वड ग्लोबल हैकेथॉन के टॉप तीन में जगह

Comments

comments