नागपूर : युवकासह दोघांची हत्या

नागपूर : उपराजधानी नागपूर व कळमेश्वर पोलिस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या गौंडखैरी येथे युवकासह दोघांची हत्या करण्यात आली. अर्ध्या तासात घडलेल्या या दोन हत्याकांडांनी शहर व ग्रामीण पोलिसांमध्ये खळबळ उडाली आहे. पहिली घटना कळमेश्वर पोलिस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या गोंडखैरी येथे रविवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास उघडकीस आली.

अज्ञात मारेकऱ्याने डोक्यावर वार करून २८ वर्षीय युवकाची हत्या केली. धीरज ठग (रा. गोंडखैरी), असे मृताचे नाव आहे. कळमेश्वर पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून मारेकऱ्याचा शोध सुरू केला आहे.

या हत्येनंतर गिट्टीखदानमधील व्हेटरनरी कॉलेज चौकात खुनाची दुसरी घटना रविवारी रात्री ८.३० वाजताच्या सुमारास उघडकीस आली. शिविगाळ करण्यास मनाई केल्याने चौधरी यांची चाकूने वार करून हत्या करण्यात आली.

शेरा नावाच्या गुन्हेगाराने चौधरी यांची हत्या केल्याचे पोलिसांनी सांगितले. पाच दिवसांपूर्वीच शेरा हा कारागृहातून जामिनावर बाहेर आला. उशीरात्रीपर्यंत पोलिस मारेकऱ्यांचा शोध घेत होते.

अधिक वाचा : नागपूर : दोनशे रुपयांची बॅग पडली २८ हजारांत

 

Comments

comments