नागपूर : कमी गुण मिळाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या

Date:

नागपूर : कमी गुण मिळाल्याने १६ वर्षीय विद्यार्थिनीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना पिपळा फाटा येथील गजाननगर येथे रविवारी दुपारी १ वाजताच्या सुमारास घडली. कृतिका सुनील विभुते, असे मृताचे नाव आहे. कृतिकाला दहावीत ४५ टक्के गुण मिळाले. कमी गुण मिळाल्याने पॉलिटेक्निकमध्ये प्रवेश मिळणार नसल्याने ती तणावात होती.

रविवारी सकाळी तिचे वडील बाहेर गेले. आई कामावर गेली. कृतिका व तिचा सात वर्षीय लहान भाऊ घरी होता. कृतिकाने ओढणीने गळफास लावून आत्महत्या केली. तिच्या लहान भावाला ती लटकलेली दिसली. त्याने शेजाऱ्यांना माहिती दिली. घरासमोर गर्दी झाली. याचवेळी कृतिकाचे वडील सुनील हे परतले. त्यांना घरासमोर गर्दी दिसली. घरात गेले असता कृतिका गळफास लावलेली दिसली.

दरम्यान एका नागरिकाने हुडकेश्वर पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच सहायक पोलिस उपनिरीक्षक आनंद राऊत यांच्यासह पोलिसांचा ताफा तेथे पोहोचला. पंचनामा करून पोलिसांनी मृतदेह मेडिकल कॉलेज हॉस्पिटलकडे रवाना केला. हुडकेश्वर पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

अधिक वाचा : युवराज सिंगचा आज क्रिकेटला अलविदा ?

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related