नागपूर : पानी न दिल्याने पत्नीची हत्या

नागपूर : पिण्यासाठी पानी न दिल्याने पतीने पत्नीची गळा आवळून हत्या केली. ही घटना कोराडीतील ओमकार ले-आऊट भागात उघडकीस आली. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून मारेकरी पतीला अटक केली आहे. आकाश रंजन जांभुळकर,असे अटकेतील मारेकऱ्याचे तर पायल आकाश जांभुळकर, असे मृताचे नाव आहे. आकाश मजुरी करतो. त्याला दारुचे व्यसन आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही मध्य प्रदेशातील रहिवासी आहेत. तीन वर्षांपूर्वी दोघांनी प्रेमविवाह केला. कामाच्या शोधात दोघे नागपुरात आले. ‘दारु सोड’ अशी विनवणी पायल ही आकाश याला करीत होती. त्यामुळे दोघांमध्ये सतत वाद होत होता. ६ जूनला आकाश दारु पिऊन घरी आला. त्याने पायलला पिण्यासाठी पाणी मागितले. तिने पाणी देण्यास नकार दिला. त्यामुळे संतप्त होऊन आकाश याने पायलचा गळा आवळून खून केला. पायलने आत्महत्या केल्याचा देखावा निर्माण केला. कोराडी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली.

पोलिस उपनिरीक्षक ए.आर.गंगकाचूर यांनी तपास सुरू केला. तपासादरम्यान गळा आवळून आकाशने पायलची हत्या केल्याचे समोर आले. पोलिसांनी हत्येचा गुन्हा दाखल करून आकाश याला अटक केली.

अधिक वाचा : नागपूर : कमी गुण मिळाल्याने विद्यार्थिनीची आत्महत्या