मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : आदित्य ठाकरेंना उपमुख्यमंत्रिपद देण्यास तयार

Date:

नागपूर : शिवसेनेचे युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना राज्याचे उपमुख्यमंत्रिपद देण्यास आम्ही कधीही तयार आहोत. आदित्य हे ठाकरे घराण्यातील निवडणूक लढवणारे पहिलेच असतील आणि ते सरकारमध्ये सहभागी झाल्यास आम्हाला आनंदच होईल, असे वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले आहे. या वेळी भारतीय जनता पक्षाला अभूतपूर्व यश मिळणार असल्याचाही पुनरुच्चार त्यांनी केला.

‘महा जनादेश यात्रे’ दरम्यान बोलताना आदित्य ठाकरे यांच्याबाबत विचारलेल्या प्रश्नाचे उत्तर देताना फडणवीस यांनी हे मत व्यक्त केले आहे. यावेळी त्यांनी विविध विषयांवर आपली मते व्यक्त केली. गेल्या वेळी २०१४ मध्ये शिवसेनेच युती तोडण्याचा निर्णय घेतला होता. त्यावेळी भारतीय जनता पक्षाने १४४ जागा लढवून १२२ जागा जिंकल्या होत्या. आता अर्ध्या जागा घेऊन काही मित्रपक्षांनाही देण्याचा आमचा मानस आहे. आता आम्ही किती जागा जिंकू ते नक्की सांगता येणार नाही, मात्र यावेळचा विजय ऐतिहासिक असेल इतके नक्की, असेही फडणवीस म्हणाले.

भाजप-शिवसेना युती होणारच !

आगामी विधानसभा निवडणुकीत काहीही झाले तरी भाजप-शिवसेना युती होणारच हे स्पष्ट आहे. आम्ही मोठा पक्ष असलो तरी मित्रपक्षाला बाजूला सारायचे ही आमची नीती नाही. आम्ही समान जागांवर लढणार आहोत. या जागा १३० ते १४० इतक्या असतील. उर्वरित जागा आम्हाला मित्रपक्षांनाही द्यायच्या आहेत.

या पुढील निवणूक आम्ही केवळ विकास याच मुद्द्यावर लढवणार असल्याचे फडणवीस म्हणाले. आम्ही राज्यातल्या जनतेला चांगले सरकार दिले असून आमच्यावर विश्वास ठेवावा असे जनतेला वाटत असल्याचेही फडणवीस म्हणाले.

‘आता लावलाय हाऊसफुल्लचा बोर्ड’

मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले की, ‘भाजपमधील इतर पक्षांमधील नेत्यांच्या प्रवेशाला महा भरती असे म्हणणे योग्य नाही. आणि आता तर आम्ही आमच्या दरवाज्यांपुढे हाऊसफुल्लचा बोर्ड लावला आहे. मात्र असे असले तरी देखील काही व्हीआयपी नेत्यांना आम्ही पक्षप्रवेश देणार आहोत. मात्र हे नेते स्वच्छ चारित्र्यांचे असायला हवेत. तसेच त्यांनी जनतेची कामे केलेली असली पाहिजेत. येत्या काही दिवसांमध्ये आणखी काही मोठ्या नेत्यांचा प्रवेश भाजपमध्ये होणार आहे’.

अधिक वाचा : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने २२ आठवड्यांनंतर गर्भपाताची दिली परवानगी

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

AI’s Next Steps in the IT Industry

 What is Artificial Intelligence?  Artificial Intelligence (AI) has transformed the...

Best places in India for summer

Looking for the best places to visit in summer,...

Top 10 best summer visiting place in India

India has the top summer vacation places to be...

Celebrate Mahavir Jayanti 2025: A Tribute to the Spiritual Guide of Jainism

Who was Lord Mahavir? Mahavir Jayanti is celebrated as the...