मुंबईने आयपीएल जिंकली, चेन्नईवर मात

नागपूर : शेवटच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात मुंबई इंडियन्सने चेन्नई सुपर किंग्जचा १ धावेने पराभव केला. मुंबईने फायनलमध्ये विजय मिळवत चौथ्यांदा आयपीएलचा किताब जिंकला. चेन्नईच्या वॉटसनने अखेरपर्यंत लढत दिली. पण त्याची ८० धावांची झुंजार खेळी अपयशी ठरली.

मुंबईने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. मुंबईने २० षटकांमध्ये ८ गडी गमवत १४९ धावा केल्या आणि चेन्नईला विजयासाठी १५० धावांचं आव्हान दिलं. मुंबईकडून किरॉन पोलार्डने सर्वाधिक ४१ धावा केल्या. त्या खालोखाल क्विंटन डी कॉकने २९ धावांचे योगादन दिले.

स्कोअरकार्ड

चेन्नईनेही फलंदाजीची चांगली सुरुवात केली. सलामीला उतरलेल्या शेन वॉटसनने अखेरपर्यंत एक बाजू लावून धरली. पण वॉटसन धावचित झाल्याने सामना अतितटिचा झाला. सामना अखेरच्या चेंडूपर्यंत रंगला. चेन्नईला विजयासाठी शेवटच्या चेंडूत दोन धावांची गरज होतील. मात्र, शार्दुल ठाकूर पायचित झाला आणि मुंबईने चौथ्यांना आयपीएल जिंकली.

अधिक वाचा : ‘लादेन किलर’ अपाचे हेलिकॉप्टर वायुसेनेच्या ताफ्यात दाखल