गडचिरोलीच्या दुकानांत आणि घरात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत ; भामरागडला पुराने वेढले

Date:

नागपूर : भामरागड – गडचिरोलीच्या भामरागड परिसरात शुक्रवारपासून पावसाचा हाहा:कार सुरू असून पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. पर्लकोटा नदीला पूर आल्याने भामरागडला चहुबाजूंनी पुराच्या पाण्याने वेढले आहे. दुकानांत आणि घरात पाणी शिरल्याने जनजीवन विस्कळीत झालं आहे.

पर्लकोटा नदीवरील पुलावरून पाणी वाहू लागल्याने वाहतूक बंद झाली आहे. तर आरेवाडा-लाहेरी मार्गसुद्ध बंद करण्यात आला आहे. प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला असून पूर स्थिती असणाऱ्या भागातील नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आलं आहे.

गडचिरोली जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांपासून मुसळधार पाऊस सुरू आहे. या पावसामुळे प्राणहिता, गोदावरी, बांडिया, पामुलगौतम, पर्लकोटा या नद्यांना पूर आला आहे.

अधिक वाचा : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : ‘ईव्हीएम’ विरोधात आंदोलनाऐवजी जनतेत जा, सहानुभूती मिळेल

 

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related