संतप्त मनपा कर्मचा-याने विष पिऊन केला विधान भवन समोर आत्महत्येचा प्रयत्न

विधान भवन

नागपूर : नागपूर महानगरपालिकेतील एका कर्मचा-याने विष पिऊन नागपूर विधान भवन समोर आत्महत्येचा प्रयत्न केला. पोलिसांनी तत्काल त्याला ताब्यात घेतले ही घटना बुधवारी सकाळी 11.30 वाजण्याच्या सुमारास ही घटना विधान भवनासमोर घडली. मात्र सतर्क पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या कर्मचाऱ्याला ताब्यात घेतले.

प्राप्त माहिती नुसार प्रकाश बर्डे असे या मनपा कर्मचा-याचे नाव आहे. मागील काळात मनपाने 17 कर्मचा-यांना नोकरीतून काढले होते. त्या विरूद्ध या कर्मचा-यांनी न्यायालयाचे दरवाजे ठोठावले होते. मात्र न्यायालयाने कर्मचा-यांच्या बाजूने निकाल देऊनही मनपाने त्यांना कामावर रुजू करून घेतले नाही. यामुळे संतप्त कर्मचा-यांमध्ये असंतोष खदखदत होता. आपल्याला सरकार समक्ष न्याय मिळावा या हेतूने प्रकाश बर्डे याने विष पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला.

अधिक वाचा : हलबा समाजबांधवांचा सरकारला इशारा : महिलांनी थाळी वाजवून वेधले लक्ष