स्टायलीश ‘राधे’ पुन्हा भेटीला येतोय!

नागपूर : सलमान खानचा ‘तेरे नाम’ चित्रपट आठवतोय ना? त्यातल्या त्याच्या हेअरस्टाइलची खूप चर्चा झाली होती. आता सल्लूच्या चाहत्यांसाठी बातमी म्हणजे ‘तेरे नाम’चा दुसरा भाग येणार आहे. या सिनेमाच्या कथेवर काम सुरू असल्याचं कळतंय.

पहिल्या भागात जशी जोरदार अॅक्शन होती तशीच दुसऱ्या भागातही पाहायला मिळेल असं बोललं जातंय. त्यात हिरो सलमानच असेल का, त्याची कोणती स्टाइल पाहायला मिळेल याची चर्चा आता होतेय.

अधिक वाचा : लष्करात प्रथमच महिला जवान; ऑनलाइन नोंदणी प्रक्रिया सुरू