नागपूर : गुन्हेगाराचा पंजा छाटला

नागपूर : पारडीतील अंबेनगर भागात वैमनस्यातून गुन्हेगाराने कुख्यात रमेश ऊर्फ काल्या कामदेव डांगरे रा.महाजनपुरा याचा धारदार शस्त्राने हाताचा पंजा छाटला. ही थरारक घटना मंगळवारी रात्री उघडकीस आली. याप्रकरणी पोलिसांनी कृष्णा सुरेश मदनकर रा.अंबेनगर याला अटक केली आहे.

कृष्णा व काल्या या दोघांमध्ये अनेक दिवसांपासून वाद सुरू आहे. मंगळवारी रात्री काल्या हा अंबेनगर भागात फिरत होता. कृष्णा याला तो दिसला. त्याने धारदार शस्त्राने काल्या याच्यावर हल्ला केला. काल्याने हाताने वार अडविला असता त्याचा पंजा छाटल्या गेला. त्यानंतरही कृष्णाने त्याच्यावर वार केले व पसार झाला.

एका नागरिकाने पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच कळमना पोलिस घटनास्थळी पोहोचले. कृष्णा याचे नाव समोर आले. पोलिसांनी कृष्णा याला अटक केली. काल्या याच्यावर मेयो हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत.

अधिक वाचा : नागपूर : राष्ट्रीय अग्निशमन सेवा महाविद्यालयात ३५० प्रशिक्षणार्थ्यांची बोगस भरती