इंग्रज हूकूमशाही प्रमाणे भाजप सत्तेचा गैर उपयोग करत आहे : काँग्रेस प्रवक्ते रणदीपसिंह सुरजेवाला

Date:

नागपुर : २ ऑक्टोबर रोजी वर्धा येथील सेवाग्राम गांधी आश्रम येथे कांग्रेस चे अध्यक्ष राहुल गांधी, पूर्व अध्यक्ष सोनिया गांधी, पूर्व प्रधानमंत्री डॉ. मनमोहन सिंह सहित वरिष्ठ नेते मंडळी महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंती निमित्त उपस्थित राहून सरकार च्या विषयी मंथन करणार आहेत. त्याची माहिती देण्या करता काँग्रेसचे माजी मंत्री आणि जेष्ठ नेते रणदीप सिंघ सुरजावाला यांनी नागपूरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत बोलत असतांना म्हटले की ‘इंग्रजांप्रमाणे भाजप सत्तेचा गैर उपयोग करत आहे’ अशी टीका त्यांनी केली.

भाजपच्या जीएसटी, नोटबंदी तसेच शेतकऱ्यांची कर्जमाफी या फसवेगिरीच्या योजना आहेत. त्यामुळे सामान्य जनता त्रस्त आहे. तसेच संघ ही गांधीजींच्या विचारा पासून फार लांब आहे. त्यांच्या विचारात आणि आचरणात देखील भिन्नता आहे. संघ ही एक अशी संस्था आहे, जी लहान अंशी देखील भारताचे प्रतिनिधीत्व करू शकत नाही. भाजपने राफेल खरेदीचे सपष्टीकरण द्यावे, अशी मागणी सुरजावाला यांनी केली.

महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त सर्व काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते एकत्रित येणार आहेत. ७६ वर्षांनंतर पहिल्यांदाच सेवाग्राम येथे अखिल भारतीय काँग्रेस कार्यकारिणीची बैठक होणार आहे. त्या कार्यक्रमाची रूपरेषा ठरवण्याकरीता सोमवारी नागपूरमध्ये बैठक पार पडली. या बैठकीला कांग्रेस चे प्रदेश अध्यक्ष अशोक चव्हाण, विधानसभा में नेता प्रतिपक्ष राधाकृष्ण विखे पाटील, कांग्रेस सचिव यशोमति ठाकुर, कांग्रेस नेता विजय वडेट्‌टीवार, प्रदेश प्रवक्ता अतुल लोंढे, सचिन सावंत उपस्थित होते.

अधिक वाचा : संधी मिळाल्यास मुलास पुन्हा परदेशात नेणार – महापौर नंदा जिचकार

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related