नागपूर : गांधीबागेत चोरट्यांचा हैदोस

Date:

नागपूर : गणेशपेठ पोलिस स्टेशनअंतर्गत सेंट्रल एव्हेन्यूवरील गुंडांच्या तोडफोडीची घटना ताजी असतानाच आता सेंट्रल एव्हेन्यूवरीलच गांधीबागेत चोरट्यांनी हैदोस घातला. चोरट्यांनी एकामागून एक दोन दुकाने फोडली तर अन्य एका दुकानात घरफोडीचा प्रयत्न केला. चोरट्यांनी दोन दुकानांमधील काऊंटरमधून एकूण दोन लाख ८५ हजारांची रोख लंपास केली. बुधवारी सकाळी उघडकीस आलेल्या या घटनांमुळे व्यापाऱ्यांमध्ये दहशतीचे वातावरण आहे.

विनोद हंसराज हुडिया (वय ५५, रा. वर्धमानगर) यांचे गांधीबागेतील हॅण्डलूम मार्केटमध्ये श्रीकृष्ण साडी सेंटर आहे. मंगळवारी रात्री चोरट्यांनी त्यांच्या दुकानाच्या शटरचे कुलूप तोडले. काउंटरमधील दीड लाखांची रोख चोरी केली. त्यानंतर चोरट्यांनी गोपाल सेठ यांच्या मिलिंद टेक्सटाइल्सच्या शटरचे कुलूप तोडले. दुकानातील लाकडी पेटीतील १ लाख ३५ हजार रुपयांची रोख लंपास केली. याच दुकानाच्या बाजूला रमेश जेठानंद कुंगवाणी यांचे पार्वती टेक्सटाइल्स आहे. चोरट्यांनी या दुकानाचेही कुलूप तोडण्याचा प्रयत्न केला. मात्र चोरट्यांचा प्रयत्न फसला. चोरटे पसार झाले. बुधवारी सकाळी ही घटना उघडकीस येताच व्यापाऱ्यांमध्ये खळबळ उडाली. विनोद हुडिया यांनी दिलेल्या तक्रारीवरून तहसील पोलिसांनी घरफोडीचा गुन्हा दाखल करून चोरट्यांचा शोध सुरू केला आहे.

अधिक वाचा : नागपुरात हुंड्यासाठी दाबला पत्नीचा गळा

Share post:

Subscribe

Popular

More like this
Related

New Announcement by Meta: Changing WhatsApp Business Pricing

Meta has officially announced significant updates to WhatsApp Business...

Pioneering Global Excellence: DMIHER’S Maiden Performance in Times Higher Education (THE) World University Rankings 2025

"DMIHER Achieves Global Milestone: Debut Performance in Times Higher...

Building on Decades of Cooperation: Länd Here Campaign Invites Skilled Workers From Maharashtra to Germany’s Baden-württemberg

Decades of Partnership: Länd Here Campaign Welcomes Skilled Workers...