नागपुरात हुंड्यासाठी दाबला पत्नीचा गळा

crime, Murder in Nagpur नागपूर

नागपूर : माहेराहून १८ लाख रुपयांचा हुंडा न आणल्याने पतीने नातेवाइकांच्या मदतीने पत्नीचा गळा दाबून खून करण्याचा प्रयत्न केला. ही थरारक घटना इमामवाड्यातील सिरसपेठ येथे उघडकीस आली. सोनम राहुल कुबडे (वय २५) असे पत्नीचे तर राहुल अरुण कुबडे (वय २८, रा. सिरसपेठ) असे पतीचे नाव आहे.

सोनमने दिलेल्या तक्रारीवरून इमामवाडा पोलिसांनी राहुलसह त्याच्या पाच नातेवाइकांविरुद्ध ठार मारण्याचा प्रयत्न करणे व हुंडा प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे. अरुण कुबडे, चंदाबाई अरुण कुबडे, सोनाली मंगेश बोद्रे, विजय गिरडकर, अशी गुन्हा दाखल करण्यात आलेल्या नातेवाइकांची नावे आहेत. राहुल हा खासगी काम करतो. सोनमचे वडील निवृत्त सैनिक आहेत.

१३ जून २०१७ मध्ये सोनमचे राहुल याच्यासोबत लग्न झाले. लग्नानंतर राहुल व त्याचे नातेवाईक सतत पैशांची मागणी करायला लागले. सुरुवातीला सोनमने माहेरून काही पैसे आणून राहुल व त्याच्या नातेवाइकांना दिले. त्यानंतर राहुल व त्याच्या नातेवाइकांनी दुकान खरेदीसाठी माहेरुन १८ लाख रुपये आणण्याची मागणी सोनमकडे केली. तिने नकार दिला. त्यामुळे संतप्त होऊन राहुल याने सोनमचा गळा दाबून हत्या करण्याचा प्रयत्न केला.

सततच्या त्रासाला कंटाळून अखेर सोनमने इमामवाडा पोलिसांत तक्रार दिली. पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे.

अधिक वाचा : नागपूर – व्हीएनआयटीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

Comments

comments