मालमत्ता कराचे बकाया धारका विरुद्ध धरमपेठ झोनने केली वारंट कारवाई, खुले भूखंड जप्त

NMC मनपा नागपूर Nagpur

नागपूर : धरमपेठ झोन अंतर्गत मौजा दाभा येथील खसरा क्रमांक १२०/१ मधील वेलकम को. ऑप. हाऊ . सोसायटी लिमिटेड नागपूर एकूण १३ भूखंड जप्त करण्यात आले. त्यांचे वर १९८२ पासून एकूण १२,९१,६६९/- राशी बकाया आहेत आणि कोळसा दाभा खसरा क्रमांक ४८/२४९५० मधील गुरुदत्त सह निर्माण संस्थांचे एकूण १३ खुले भूखंड जप्त करण्यात आले. त्यांचे वर १९८७ पासून एकूण राशी ६,६२,६२१/- बकाया आहे. असे एकूण २६ खुले भूखंड जप्त करण्यात आले . त्यांच्या एकूण बकाया १९,५४,२९०/- रुपये थकित आहे.

झोनचे सहा. आयुक्त श्री. महेश मोरोणे यांचे मार्गदर्शनात सहा. अधिकारी श्री रोसिया, कर निरीक्षक श्री. मेहरोलिया, श्री निमगडे, श्री वांद्रे , श्री विजय जाधव हे या कार्यवाहीत सहभागी झाले होते.

धरमपेठ झोनतर्फे थकीत मालमत्ता कराची वसुलीसाठी दररोज वारंट कार्यवाही करण्याचे दर्शन मालमत्ता बकाया या धारकांना आव्हान/विनंती करण्यात येते कि त्यांनी कराचा भरणा त्वरित करावा व जप्ती टाळावी.

अधिक वाचा : “वसुंधरा बचाव प्लॅस्टिक कॅरीबॅग हटाओ” महिलांनी दिला जागदिक महिला दिनी नारा

Comments

comments