महिला दिनानिमित्त महापालिकेत जनजागृती

महिलांना पटवून दिले मतदानाचे महत्त्व

नागपूर

नागपूर : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधुन नागपूर महानगरपालिकेमध्ये मतदानाबाबत जनजागृती करण्यात आली. यावेळी उपस्थित महिलांना लोकशाहीमध्ये मतदानाचे महत्त्व पटवून देण्यात आले.

नागपूर महानगरपालिकेतर्फे जागतिक महिला दिनानिमित्त मनपामध्ये आयोजित कार्यक्रमात पीसीपीएनडीटीच्या नोडल ऑफिसर डॉ. भावना सोनकुसळे, विविध भारतीवरील निवेदिका श्रद्धा भारद्वाज, उपायुक्त डॉ. रंजना लाडे, उपअभियंता तथा राष्ट्रीय महानगरपालिका महिला कर्मचारी संघाच्या अध्यक्षा कल्पना मेश्राम उपस्थित होत्या.

लोकशाही आणि सुशासनात महिलांना नाकारता येणे शक्य नाही. महिलांचीही यामध्ये महत्वाची भूमिका आहे. ही भूमिका योग्यरित्या बजावून आपल्या अधिकारांचा वापर लोकशाहीचे सशक्तीकरण करण्यासाठी महिलांनी मतदान प्रक्रियेमध्ये सहभागी होणे आवश्यक आहे. यासाठी मतदार नोंदणी न झालेल्या महिलांनी मतदार यादीत नाव नोंदवून प्रत्येक क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने अग्रस्थानावर झेंडा मिरविणा-या महिलांनी आपली भूमिका चोख बजावून मतदानाचा टक्का वाढविण्यातही आपले मौलिक योगदान देण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.

अधिक वाचा : मालमत्ता कराचे बकाया धारका विरुद्ध धरमपेठ झोनने केली वारंट कारवाई, खुले भूखंड जप्त

Comments

comments